शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची

अंतु बर्वा's picture
अंतु बर्वा in जनातलं, मनातलं
3 Feb 2017 - 10:36 pm

aa

खडकापाशी तो उदास बसला होता. इथेच ती महिन्याभरापुर्वी भेटली होती.
तीनं जग पहिलेल नव्हतं पण गप्पांना अंत नव्हता, तासनतास बोलायचे दोघं.
आमच्याकडे असं तुमच्याकडे कसं? प्रश्नांवर प्रश्न.
तो म्हणायचा, चल माझ्याबरोबर. माझं जग आवडेल तुला.
शेवटी कुणाला कळु द्यायचं नाही या अटीवर राजी झाली.
पण गोष्टी लपत थोडीच असतात?
कळलच शेवटी जगाला आणि तिलाही कळलं, सर्वच माणसं त्याच्यासारखी चांगली नसतात.
असा परिकथेतला प्रकार लांबुनच पाहिल तो माणुस कसला? त्यांना तिच्यावर प्रयोग करायचे होते, तिचं प्रदर्शन मांडायच होतं.
आता ती कधीच दिसणार नव्हती. ओल्या रेतीतले तिचे शेवटचे ठसे बघत तो विचार करत राहीला, त्या दिवशी तिच्या पायावर पाणी सांडलं नसतं तर?

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

4 Feb 2017 - 10:07 am | जव्हेरगंज

ना तिच्यावर प्रयोग करायचे होते, तिचं प्रदर्शन मांडायच होतं.

&

त्या दिवशी तिच्या पायावर पाणी सांडलं नसतं तर?

काही समजले नाही!!!

शब्दबम्बाळ's picture

6 Feb 2017 - 10:18 am | शब्दबम्बाळ

अहो ते बहुतेक जलपरी वगैरेचा म्याटर हाय!

अमलताश's picture

6 Feb 2017 - 3:20 pm | अमलताश

अधुरी प्रेमकथा असावी असं वाटतंय... एकमेकांशी लग्न करायचं ठरवून पाहण्याचा कार्यक्रम केला असावा अन् ऐनवेळी पायावर पाणी सांडल्यामुळे तिच्या पायावरचे कोडाचे डाग दिसले .. आणि त्यांनी तिला नाकारली .. जरा अजबच तर्कट आहे.. पण असं असेल तर मला फार आवडली ही कथा !

चिनार's picture

6 Feb 2017 - 3:35 pm | चिनार

अरे देवा....
या तर्कटाच्या आधारे, पायावर पाणी सांडल्यामुळे तिची पावले उलटी होती हे लक्षात आल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

अमलताश's picture

7 Feb 2017 - 2:24 pm | अमलताश

हे पण भारीय की.. चित्रातले पाय मग समुद्राकडे जाणारे होतात..

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2017 - 4:30 pm | मराठी कथालेखक

स्पर्धा संपल्यावर लेखकाने(वा लेखिकेने) कथा विस्कटून सांगावी ही विनंती.

चिगो's picture

18 Feb 2017 - 4:06 pm | चिगो

टॉम हँक्सचा 'स्प्लॅश' चित्रपट आठवला..

नायिका जर जलपरी असेल तर मजा नाही