शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची
लेखनप्रकार
खडकापाशी तो उदास बसला होता. इथेच ती महिन्याभरापुर्वी भेटली होती.
तीनं जग पहिलेल नव्हतं पण गप्पांना अंत नव्हता, तासनतास बोलायचे दोघं.
आमच्याकडे असं तुमच्याकडे कसं? प्रश्नांवर प्रश्न.
तो म्हणायचा, चल माझ्याबरोबर. माझं जग आवडेल तुला.
शेवटी कुणाला कळु द्यायचं नाही या अटीवर राजी झाली.
पण गोष्टी लपत थोडीच असतात?
कळलच शेवटी जगाला आणि तिलाही कळलं, सर्वच माणसं त्याच्यासारखी चांगली नसतात.
असा परिकथेतला प्रकार लांबुनच पाहिल तो माणुस कसला? त्यांना तिच्यावर प्रयोग करायचे होते, तिचं प्रदर्शन मांडायच होतं.
आता ती कधीच दिसणार नव्हती. ओल्या रेतीतले तिचे शेवटचे ठसे बघत तो विचार करत राहीला, त्या दिवशी तिच्या पायावर पाणी सांडलं नसतं तर?
वाचने
2412
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
ना तिच्यावर प्रयोग करायचे
In reply to ना तिच्यावर प्रयोग करायचे by जव्हेरगंज
अहो ते बहुतेक जलपरी वगैरेचा
अधुरी प्रेमकथा असावी
In reply to अधुरी प्रेमकथा असावी by अमलताश
अरे देवा....
In reply to अरे देवा.... by चिनार
हे पण भारीय की.. चित्रातले
स्पर्धा संपल्यावर लेखकाने(वा
टॉम हँक्सचा 'स्प्लॅश'..
नायिका जर जलपरी असेल तर मजा