शतशब्दकथा स्पर्धा २०१७: दृष्टीकोन

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
1 Feb 2017 - 7:41 pm

a

नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारावरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला. त्या मुलाकडे पैसे नसणार, मग आत कसली देवाणघेवाण चालली होती? मी वर खाली उड्या मारत समोरच्या प्लॅटफॉर्मवर चढलो. ऑफिसमध्ये घुसणार इतक्यात तो पोरगा रडून लाल झालेले डोळे पुसत बाहेर आला.
"क्या हुआ रे?"
"उठाबशा काढायला लावल्या साल्याने. शंभर!"

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2017 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2017 - 9:58 pm | अत्रुप्त आत्मा

हूक बसला.. पण सिक्स नाय गेली.

लोथार मथायस's picture

2 Feb 2017 - 4:29 am | लोथार मथायस

अपेक्षित twist आलाच नाही

रातराणी's picture

1 Feb 2017 - 10:00 pm | रातराणी

:) आवडली!

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2017 - 1:27 am | टवाळ कार्टा

आवडेश

बापू नारू's picture

2 Feb 2017 - 10:01 am | बापू नारू

छान