शतशब्दकथा स्पर्धा २०१७: सागरकिनारे

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
1 Feb 2017 - 7:32 pm

aa

"अगं पण का? माझं काय चुकलंय?"

"अरे तुझं नाही काहीच चुकलेलं, पण मी शब्द दिलाय त्याला.."

"तुझ्यासाठी सगळ्यांनी सरप्राईज पार्टी अरेंज केलीये... आजतरी नको जाऊस..."

"त्यांच्यासाठीच थांबले होते इतकी वर्ष, फक्त एक वाढदिवस मला माझ्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करू दे..प्लीज"

सागरकिनारे... गुणगुणत घराबाहेर पडलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पहातच राहिला.

आयुष्यात अनपेक्षित क्षणी प्रेमात पडलेले दोघे, कर्तव्याच्या, समाजाच्या जाणिवेनं दुरावलेले.

दोघांनाही तारून नेणारं तिचं वचन, साठावा वाढदिवस फक्त त्याच्याबरोबर.

त्यांच्या ठरलेल्या समुद्रकिनारी ओळखीच्या पाऊलखुणा पाहून ती सुखावली. तिनं त्याच्या पावलांवर चालत विरहाची एकेक वर्ष पुसून टाकली. दोघांनी हातात हात घेऊन नवीन पाऊलखुणा बनवल्या. एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न, एक प्रवास पूर्ण झाला.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

1 Feb 2017 - 7:46 pm | ज्योति अळवणी

मस्त

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2017 - 9:24 pm | टवाळ कार्टा

हायला....मलापण कोणीतरी असे म्हणालेले... मग मी विचारले...जेवताना एकाच कवळी वापरायची का?

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2017 - 9:38 pm | टवाळ कार्टा

हायला....मलापण कोणीतरी असे म्हणालेले... मग मी विचारले...जेवताना एकाच कवळी वापरायची का?

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2017 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा

ठीकठाक.

साहेब..'s picture

2 Feb 2017 - 8:30 am | साहेब..

सॉरी

निओ's picture

2 Feb 2017 - 1:02 pm | निओ

आवडली

स्वप्नरंजन म्हणून ठीक आहे.