सुक्ष्म गीतकथा: सुक्ष्मकथांचा मजेदार उपप्रकार

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
13 Jan 2017 - 5:52 pm

एक इनंती: आधी २० सुक्ष्मकथा-१ हा दुवा वाचावा. मग पुढे धकावं.

सुक्ष्मकथेत अजून काय मजा आणता येईल याचा विचार करतांना एक नवीन उपप्रकार सापडला (मुळात ही कल्पना शैलेंद्र शिर्के यांची. कल्पनाविस्तार अन कथा मात्र माझ्या)
संकल्पना अगदी सोप्पीये- कुठल्याही गाण्याच्या धृवपदाची पहिली ओळ (किंवा दोन्ही ओळी) घ्यायची, दुसऱ्या ओळीत असे शब्द घालायचे की गाण्याचा अर्थ पुर्ण बदलून जाईल. शिवाय एक वेगळीच नवीन सुक्ष्मकथा तयार होईल.

उदा चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटावर, मोत्याचा घास तुला भरविते...
ही झाली मु़ळ गाण्यातली पहिली ओळ. दुसऱ्या ओळीत आता आपण फक्त दोन शब्द घालू.पहा अर्थ कसा बदलतोय.
चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटावर, सोन्याचा घास तुला भरविते...
बळी द्यायला

शिवाय ही एक सुक्ष्मकथाही आहे.(कुणीतरी कुणालातरी बळी द्यायला बोलावलंय ही मु़ळ कथा ज्यातून कोण बळी देतय, कोणाचा बळी जातोय, का वगैरे बरेच प्रश्न उपस्थित होतात. ही उत्तरं शोधताना बऱ्याच कथा तयार होतात)

सुक्ष्म गीतकथा लिहतांना दोन गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात –
- वाचकांना धक्का बसायला हवा (सरप्राइज एलिमेंट)
- एक कथा तयार व्हायला हवी.

उदा:
गोरी तेरी आँखे कहे के रातभर सोयी नही,
नवीन लग्न झाल्यावर आसंच असतया

ही सुक्ष्मकथा आहे का? तर नाही. कारण यात कथा नाही, शक्यतेंचे कंगोरे नाहीत. ती का झोपली नाही याचं कारण स्पष्ट दिलंय. बर त्या कारणाचा उलगडा करून कथा लिहण्यासारख काहीच नाही. ( सविता भाभी वर कथा द्यायची असेल तर वेगळी गोष्ट आहे :) )
आता यात जर आपण थोडीशी सुधारणा केली तर ?

गोरी तेरी आँखे कहे के रातभर सोयी नही,
तो परत आला होता का?
ही सुक्ष्मकथा होऊ शकते. कारण तो म्हणजे कोण? तिचा नवरा असू शकतो, भूत असू शकत किंवा अजून कोणी. प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनते.
खाली काही चिजा दिल्या आहेत. त्या चांगल्या वाटत असल्या तरी त्यांना सुक्ष्मकथा म्हणता येणार नाही.

I ) ही चाल तूरूतूरू, उडती केस भूरूभूरू...
टकल्या विग काढ

Ii) हम किस गली जा रहे है अपना कोई ठिकाणा नही,
श्रीमंतांच्या कुत्र्यांचं बरं असतं राव

Iii) (चित्रपट: हाफ तिकीट)
चल चल चल चल चल चल लवकर चल
जोरात आलीये

आता खालील चिजा वाचा. यांना आपण सुक्ष्म गीतकथा म्हणू शकतो-

---------------
१. सुरुवात अजरामर गाण्यापासून-
मन सुद्ध तुझं गोस्ट हाये पृथ्वीमोलाची,
वॉवS मजा येईल रक्त पिण्याची

2. चल चल चल चल चल चल लवकर चल
पोलीस मागं लागलेत

३.म्यानातून उसळे तलवारीची पात वेगात मराठे वीर दौडले सात…
झॉम्बिंना मारायला

४. विठ्ठलाSS कोणता हा झेंडा घेऊ हाती......
सगळेच फाटलेत

५.त्या तिथे, पलीकडे, तिकडे,
माझिया प्रियेचे....थडगे

६. अलबेला सजन आयो रे...
सौ साल बाद

७. हे आलं निळूभाऊचं फेमस गाणं

बाई वाड्यावर या...
धड स्मशानभूमीत ठेवलं तरी चालेल

८. बघू तरी मराठी सुपरहीरो काय करतोय ते (चित्रपट: बाजी)
माझा बाजी आला परतूनी,
टॉवेल घ्यायला

९. सौ साल पहले हमे तुमसे प्यार था, आजभी है कल भी रहेगा.....
एक व्ह्याम्पायर व्हयाम्पायरीन ला बोलला

१०.. (चित्रपट: टाइमपास )
दाटले रेशमी आहे धुके धुके,
बाला, शनीवर आसंच आसतं

११. टॅक्टूर नसलेल्या जमान्यातलं हे जबरा बैलगीत
i) सर्जा राजाची बैलंजोडं S S
या जन्मात पुन्हा बैल बनले

ii)सर्जा राजाची बैलंजोडं S S
ट्रॅक्टर घेऊन पळून गेले

१२. ही वाट दूर जाते... स्मशानात

१३. लावणी नसल त रंग कसा येईल राव. ही घ्या-
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत,
माझी लुचाई

१४.आजुन एक घ्या-
ज्वानीच्या आगीची... दिसला गं बाई दिसला-
आग्यावेताळ

१५. जिंकू किंवा मरु... रोबोट युद्ध

१६.कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे- यंत्रमानवाची व्यथा

१७.हा छंद जीवाला लावी पिसे... सिरियल किलर

१८. (चित्रपट: कॉफी आणि बरंच काही )
रंग हे नवे नवे, दुनिया है नयी नयी,
डेव्हलपमेंट नव्हती यार पण या काळात

१९. (चित्रपट: शिनमा)
असं कसं, जीवनात कुणी चांदणं आणतं रे. असं कसं, रेशमाची सारी स्वप्नही विणंतं रे,
सगळे जादुगार युद्धात मेले होते न?

२०. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा,
चंद्रावरील रॉक स्पर्धा विजेतं गाणं

२१. (चित्रपट: मेजर साब)
अकेली ना बाजार जाया करो,
माझी गांड फाटते घरी

२२.रोजच्या साबणांना सोडून कसं चालेल-

i )माझिया प्रियाला प्रीत कळेना,
रोबोट कुठली

ii) माझिया प्रियाला प्रीत कळेना,
फॉर्म्याट मारावा लागतो
-------------------------------------------------------
तुम्हीबी डोक्याले ताण द्या. पहा गाणं गुनगुनातांना कथायचा पाऊस पडतो का नाही ते
------------------------------------------------------

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

13 Jan 2017 - 6:48 pm | पद्मावति

:) मस्त कल्पना.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jan 2017 - 1:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

खूप छान कल्पना!! हि पण कल्पना फॅमिली गेटटूगेदरला परफेक्ट!
काही प्रयत्न :
गारवा...वाऱ्यावर भिरभिरभिर पारवा...पिसाटलेला!
कशाने अशी हरवली पाखरे - काल रात्री झोपताना पिंजरा मीच तर बंद केला होता!
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही - बोलल्याने मोठं वादळ येईल कि गप्प बसण्याने.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 1:19 pm | अॅस्ट्रोनाट विनय

चांगल्या आहेत. पैकी पहिल्या दोन उत्तम. अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण होतात)
दूसरी आणि तिसरी अजून शॉर्ट करता आली तर उत्तम. तिसरी कळाली नाही.
तिसऱ्या कथेवर माझा एक प्रयत्न :

काही बोलायचे आहे पण बोलणार नाही,
वातावरण नाही न

(बोलण्याचा माहोल नाही असंही म्हणू शकतो किंवा वरील वाक्य बोलणारा अवकाशात आहे. तिथे वातावरण नाही म्हणून ऐकू येतं नाही. किंवा अजून एक शक्यता की आसपासचे सगळे बहरे आहेत )

सिरुसेरि's picture

14 Jan 2017 - 3:56 pm | सिरुसेरि

नाचु मै आज छम छम छम ---- वर्षमची कॉपी करुन का ?
गाडी बुला रहि है सिटी बजा रहि है --- सग़ळेजण बंदुका घेउन तयारीत रहा .
मै तो चला जिधर चले रस्ता -- पत्ता झाडावरच राहिला .
ना है जमीन ना आसमा , लाये कहा हो हमको -- इन्सेप्शन २

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 4:07 pm | अॅस्ट्रोनाट विनय

छान कथा सिरुसेरी