मिपा फिटनेस विकांत-१

कुंदन's picture
कुंदन in जनातलं, मनातलं
9 Dec 2016 - 11:01 am

मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर केला गेला अन म्हटले चला आपणही सहभागी होउ.

९० मिनिटात १० की मी चालणे करुन विकांताचा (दुबैत शुक्र - शनि विकांत असतो ना) शुभारंभ केला गेला आहे.

आता दिवसभर नोट बंदी वर काथ्या कुटायला मोकळा.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

निरनिराळ्या शहरांतला विकांत!

पैसा's picture

9 Dec 2016 - 1:30 pm | पैसा

अभिनंदन! आम्हाला रिपोर्ट करायला अजून दोन दिवस आहेत.

मोदक's picture

9 Dec 2016 - 1:54 pm | मोदक

अरे व्वा.. अभिनंदन..!!!

उद्या दुपारला पवणे होईल, इच्छुक सोबत येऊ शकतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2016 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, विश्वासच बसत नै की कुंदन इतका चालला असेल म्हणून. सरासरी विवाहित माणसं तासाला सहा किमी चालतात. (माझं स्वत:चं संशोधन आहे) कुंदन विवाहित असूनही(अंदाजे हं) दीड तासात दहा किमी चालले, म्हणजे त्यांनी आदर्श उभा केला आहे असेच म्हणावे लागेल. अभिनंदन हो कुंदनसेठ. ;)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

10 Dec 2016 - 12:10 pm | पैसा

मी सकाळी चार किमि केलेत (विथ एअरोबिक्स). आज अजून ४ तरी होतील. उद्या परत तेवढेच. माझे टार्गेट दोन दिवसात १२ होते. नक्कीच क्रॉस करणार. परवा पाय थोडा मुरगळल्याने सूर्यनमस्कार घालायची मात्र रिस्क घेत नाही.

मी आज 16 km चाललो सकाळी.दोन टप्यात.दोन तासात.
मग घरी आलो.थकलो.मग झोपलो.आता जागा झालो .प्रतिसाद दिला.
उद्या एकुण 22 km च लक्ष ठेवलय.गावाकडे जाण्यासाठी.;)

धडपड्या's picture

12 Dec 2016 - 8:42 am | धडपड्या

वजन आटोक्यात आणण्यासाठी रोज 8-9 किमी चालणे होतच होते.. आज म्हटलं थोडं पळून पाहू..

पहीले चार किमी मस्त वाटलं, नंतर डाव्या गुडघ्याने असहकार पुकारला.. घरी पोहचेपर्यंत सुजून टम्म झालेला.. संध्याकाळी डाॅक्टरने लिगामेंट फाटला असल्याची सुवार्ता दिली...

आता आराम..

मी खूप वर्षांपूर्वी जिमला जात होतो , वजन आटोक्यात आले होते. पण नंतर नंतर जिम चा कंटाळा येऊ लागला. पुन्हा वजन वाढले.

शेवटी २ वर्षांपूर्वी मी पोहायला शिकलो. पुन्हा फिट झालो. पण कामाच्या व्यस्ततेमूळे कॉन्टीनुए करणे जमले नाही.

आता पुन्हा घरीच सूर्यनमस्कार आणि शाळेत शिकवलेले व्यायाम चालू केले आहेत. थोड्या दिवसांनी पुन्हा पोहायला चालू करण्याचा मानस आहे.

वजन जास्त असतना चालणे उत्तम आहे. पण पोहणे जास्त एफ्फेक्टिव्ह आहे असा माझा अनुभव आहे. डॉ. खरे साहेब आणि मोदक साहेब या सारखे जाणकार अधिक सांगू शकतील.

.... श्री राम समर्थ.....

या चालण्यावरून एक प्रश्न: काही लोक अतिशय वेगात सहज चालतात याचं कारण -१) उंची /२)तळवे घट्ट असणे/३)/इतर काही?

कंजूस's picture

24 Dec 2016 - 6:55 am | कंजूस

जेपी,कुंदन - भारी चालता!!

आज मुंब्रा हाइक १८० मिटर्स.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Dec 2016 - 5:08 am | निनाद मुक्काम प...

चालण्याने वजन कमी होते का
असे असते तर जगातील एकजात सगळे वेटर सडपातळ असते,
माझ्या पाहण्यात दैनंदिन कामाचा भाग म्हणून ८ ते दहा तास भरभर चालणारे लोकांच्या पोटाची ढेरी व इतर भागावर चरबी आढळते ,
पोहणे हा स्वस्त व सर्वांगाला व्यायाम होणार प्रकार असून ह्यात सांध्यांची झीज होत नाही.

गरम पाण्यात मध टाकून पिण्याने वजन कमी होते.( धोका: फारच भराभर उतरेल ,अतिरेक नको)