मुंबई

अमिता राउत's picture
अमिता राउत in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 9:25 pm

असं म्हणतात मुंबई हि स्वप्नांची नगरी आहे ..... एअरपोर्ट ते CST च अंतर कापत टॅक्सी पहाटेच मुंबई दर्शन घडवत होती . रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उंच उंच इमारती काही नवीन तर काही टॅक्सिच्या आवाजांनी पडतील कि काय अश्या अवस्थेत; चिक्कार धुळीने माखलेली, काळवंडलेली दारं खिडक्या आणि त्यात बाहेर वळत टाकलेले कपडे ; ते कपडे धुतलेले होते कि धुवायचे याचाच प्रश्न होता.

नेहमी बातम्यांमध्ये, सिनेमानं मध्ये बघ्यायला मिळणारी मुंबई प्रत्येक्षात वेगळीच आहे. पहाटेचे ४ वाजले आहेत पण दिवस उजाडल्या गत गर्दी करत लोक आपापल्या कामाला लागली होती . पहाटेच्या अंधारातही घडीच्या काट्यावर धावणारे मुंबईकर वेळेचं महत्व सांगून जात होते . जेवढी लोक रस्त्यावर होती तेवढीच फूटपाथ वर झोपलेली, वास्तवाचा चटका लावणारी होती. भाजीमंडीत ताज्या भाज्यांची पोती घाई घाईने उतरवून त्याची बोली लावणं सुरु होत ; मुंबई २४ तास सुरु असते याचा यावेळी प्रत्येय आला. दिवाळी साठी बाजारपेठ सज्ज झाली होती सगळीकडे आकाशकंदील लावलेले होते काही विकण्यासाठी तर काही सजवण्या साठी . शेवटी आम्ही CST ला पोहचलो आणि २६\११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या, टीव्ही वर दाखवलेल्या चित्रांचा आणि मी पाहत असलेल्या CST चा कुठेच मेळ बसत नव्हता .... कुठेच त्या खुणा नाही, कधी इथे काही झालं होत याचा साधा भासही नाही. सगळं पुरवत झालेलं यासाठी मुंबईकरांचे केले तेवढे कैतुक कमीच आहे.

सगळीकडे चिक्कार गर्दी. लोक स्टेशन वर आपापली बिऱ्हाड थाटून झोपी गेली होती, काही सामानांची पहारी करत डुलकी काढत होते तर काही स्टेशन त्यांच्या मालकीच असल्या प्रमाणे निवांत झोपी गेले होते. जवळच्या मच्छी मार्केटचा घाण वास असह्य होत नाकाला रुमाल लावून काही लोक उभी होती; त्यात मी हि होते. पण त्या सगळ्यांमध्ये हीच माणसं वेगळी दिसत होती, बाकीच्याचे नाक बुजलेली होती कि आम्हीच रिऍक्ट करत होतो हेच कळेना. कारण बाकी सगळे शांत झोपलेले होते आणि काही आपल्या कामात मग्न होती ..... आमच्या अगदी मागे एक मुलगा उभा होता त्याची नजर एकाच दिशेने खिळलेली होती; मी जरा सावध झाले मला आमच्या सामानाची काळजी. मला कळेचना हा असा का बघतोय नंतर जरा त्याच्या नजरेचा मागोवा घेत मी शोध लावला, आमच्या पुढे प्लॅटफॉर्म वर खाली झोपलेल्या कुटुंबा पैकी एक १९ -२० शीतली मुलीची नजर त्याच्या इशाऱ्यांचं उत्तर देत होती. अन मी नकळत त्या दोघांच्या मध्ये आले होते. तो नजरेचा खेळ फार रोमांचक होता. ती तिच्या वडिलांची नजर चुकवत त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत होती; त्यांचं रुसणं मनवन बघून तो मच्छीचा असह्य वासहि मी विसरून गेली. अश्या एक ना अनेक गोष्टी तिथे सुरु होत्या. प्रत्येक जण आपल्या विश्वात मग्न होता. आणि आम्ही गीतांजली सोबत आमच्या घराची वाट धरली. आमचा प्रवास सुरु झाला मी माझी जागा घेऊन एक मस्त झोप काढली. हळू हळू लोक येऊ लागले आमच्या पुढच्या सीट वर एक काका आले फॉर्मल ओळख सुरु झाली. कुठून आले ? कुठे चाले ? `आमच्या ह्यांची आणि काकांची बऱ्या प्रकारे गट्टी झाली. काकांना नाशिकलाच उतरायचे होते तोवर काकांनी जास्त झालेल्या आलू बोनड्या चा आग्रह करून करून आमच्या ह्यांच्या नावी खपवला. पुढे त्यांनी स्वतः हा कसा तिकिट न काढता लांबवर AC प्रवास केला याच्या बाता करून इथले TC कसे एक्सट्रा पैश्यासाठी भ्रष्टाचार करतात सांगून त्यांच्या नावावर बिल काढून मोकळे झाले .

फेरीवाल्यांची डब्यातली ये जा, लहान मुलांच्या आवाजात प्रवास मस्त सुरु होता. शेजारची एक बेंगॉली कुटुंबातली ५ -६ वर्षाची मुलगी अन पुढच्या कॉम्पारमेंट मधली एक सारख्या वयाची मलैयाळी मुलगी दोघींची मस्त जोडी जमली. छान गप्पा मारत त्या खेळत होत्या दोघी पहिल्यांदाच भेटलेल्या पण त्या दोघी जिवलग मैत्रिणीनं सारख्या वागत होत्या. उद्याची फिकीर नाही, जर तर चा अट्टहास नाही मस्त निरागस आयुष्य जगात होत्या. आपापली स्टेशन आलं कि त्या उतरून जातील परत कधी भेटल्या तर एकमेकींना ओळखणार देखील नाही.असं सगळं सुरु असताना आमचं स्टेशन आलं आणि आम्ही आमच्या माय देशी परतलो. मला हा प्रवास आपल्या आयुष्याचा सारांश च असल्या सारखा वाटतो, आयुष्यात बरेचजण भेटतात सगळे आपापल्या वाट्याचा हातभार लावून निघून जातात. माणूस एकटाच आला आणि एकटाच जाणार. आता आपल्याला ठरवायच आहे हा प्रवास रडत इतरांना दुषणे देत करायचंय कि आनंदानी हसून खेळून प्रत्येक क्षण जगायचा.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

8 Dec 2016 - 12:39 am | ज्योति अळवणी

लेखाचे प्रयोजनच कळले नाही

खटपट्या's picture

8 Dec 2016 - 1:49 am | खटपट्या

प्रकटन समजा. अल्पशा काळात त्यांना भावलेली, समजलेली, कळलेली मुंबई...

अमिता राउत's picture

10 Dec 2016 - 10:03 pm | अमिता राउत

अगदी बरोबर .. धन्यवाद !!

अमिता राउत's picture

10 Dec 2016 - 9:59 pm | अमिता राउत

दिवाळी निमित्त्य भारतात आलेले त्यावेळी प्रवासात मला भावलेलं काही क्षण ..

या अगोदर तुम्ही कुठल्या देशात राहत होतात ?
भारतात किती वर्षे होतात ?

एरन्दोल्कर's picture

8 Dec 2016 - 2:09 am | एरन्दोल्कर

छान लीहलैय.

अमिता राउत's picture

10 Dec 2016 - 10:02 pm | अमिता राउत

प्रतिसादा बद्दल आभारी आहे.

बाजीप्रभू's picture

10 Dec 2016 - 10:54 pm | बाजीप्रभू

पण काही प्रश्न पडलेत,

जवळच्या मच्छी मार्केटचा घाण वास असह्य होत नाकाला रुमाल लावून काही लोक उभी होती.

१) हा कोणता मच्छी मार्केट स्टेशनला लागून आहे? नवीन झालाय का? शेवटचा CST ला गेलो होतो त्याला ५ वर्षे झाली.

२) तुम्हाला कोलकाता डायरेक्ट फ्लाईट मिळाली नाही का? बायदवे कोणत्या देशातून रिटर्न आलात?

अमिता राउत's picture

12 Dec 2016 - 1:17 am | अमिता राउत

मी अँस्टरडॅमहुन भारतात परतत होते ,आणि मला मुंबईहुन अमरावतीला जायचे होते. मी फलाट क्रमंक १८ वर उभे होते त्याच्या मागच्या बाजूकडून मच्छीचा वास येत होता , तशी मुंबई मला नवीनच एका शेजारी उभ्या असलेल्या काकांना विचारल्यावर ते म्हणाले बाई मागे मच्छी बाजार आहे.