लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
4 Dec 2016 - 9:13 am

(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच).

सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता. दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची. शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा. पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव काही अंशी कमी झाला असेल.

अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता. नव्हते फक्त सुट्टे. अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.

घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे. कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती. श्रीमंत होण्याची जाणीव झाली. आजीने सांगितलेली एक कहाणी आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली. अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला. त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो.

रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो:

स्वामी तिन्ही जगाचा
आट्या बिना उपाशी.

टीप: घरी मेक इन महाराष्ट्र आटा चक्की आहे. तरीही कधी कधी बाजारातून आटा आणावेच लागतो. पुरोगाम्यानो प्रसन्न होऊ नका, अस्मादिक पक्के देशभक्त आहोत. गोष्ट वाचल्यावर भारत माता कि जय आणि वंदे मातरम अवश्य म्हणावे.

विनोदविचार

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2016 - 1:33 pm | टवाळ कार्टा

तिथे सुपरमार्केट नाहीत जी कार्डाने पेमेंट घेतील?

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2016 - 1:35 pm | टवाळ कार्टा

आणि जर त्या दुकानदाराकडे सुट्टे नाहीत म्हणुन ग्राहकाना परत पाठवत असेल तर एक दिवस त्याचाही धंदा बसेल कि

नही, शन्का आली म्हणुन विचारले.

पैसा's picture

4 Dec 2016 - 2:08 pm | पैसा

कार्ड घेणारे काहीच दुकान नाही का जवळपास? काहीतरी आयडिया काढायची ना! माझ्या भावाने दुकानदाराला २००० रु ठेवून घे म्हटले. आता रोज काय काय आणतो ते एका अ‍ॅपमधे नोंद करून ठेवतो. तो दुकानदार महिनाभर कॅशलेस आता!

मृत्युन्जय's picture

4 Dec 2016 - 3:21 pm | मृत्युन्जय

माफ करा पण या धाग्याचा एकमेव उद्द्श म्हणजे काँग्रेसच्या काळात किती आणि कश्या लायनी होत्या बघा हे सांगणे हा दिसतो.

बाकी किराणा दुकानदार अगदी आनंदाने ५०० / १००० च्या नोटा घेतात. त्या त्यांना देउ नये या मताचा मी आहे कारण करंसी आता बॅन आहे. पण तितकाच पिराब्लेम असेल तर दुकानदार नक्की घेत आहेत. अन्यथा आजकाल शहरातल्या तरी सगळ्या दुकानांमध्ये कार्ड घेतात. दिल्लीत तर नक्कीच घेत असतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Dec 2016 - 6:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

+१११११

संदीप डांगे's picture

4 Dec 2016 - 3:27 pm | संदीप डांगे

बहुतेक तरुणांची पहिलीच वेळ लायनीत उभं राहायची....

^^^

ह्या तरुणांचं वय अडीच वर्षे असेल.... =))

कहानीमे कुछ दम दिख्या नही.
साईराम

ज्योति अळवणी's picture

4 Dec 2016 - 5:34 pm | ज्योति अळवणी

तुम्ही राहात असलेल्या गल्लीतला वाणी म्हणजे नेहेमीचाच असणार. मग ओळखीवर उधार नाही का घेता आला आटा? आमच्या इथे तर अनेक भाजीवाले आणि फळवाले पण म्हणाले भाभीजी अभी लेके जाईये. जब छुटा होजाएगा तो हिसाब कर लेंगे.

सर्वात गंमत म्हणजे तुमच्या पत्नी नव्हत्या तर परत त्या येईपर्यंतची घरातल्या वस्तूंची सोय तुम्ही दोघांनी बघून ठेवली नव्हती..... मस्तच!

राजेश घासकडवी's picture

4 Dec 2016 - 10:59 pm | राजेश घासकडवी

दिल्लीसारख्या शहरात राहून, पैशांची कमतरता नसतानाही आटा मिळवण्यासाठी जे कष्ट पडले अशा अनुभवावर लोक 'पटाइतकाका, तुम्हाला आटा मिळवता आला नाही, यात तुमचंच काहीतरी चुकलं' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहून वाईट वाटलं. पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा मिलोचा गहू खावा लागत होता तेव्हा खरोखरच भयंकर परिस्थिती होती. अन्नाचा प्रचंड तुटवडा होता. त्यानंतर हरितक्रांती झाली आणि तुटवडा नाहीसा झाला. पण त्याच आस्मानी परिस्थितीच्या रांगांची आजच्या काळात आठवण यावी यावरून सध्याची सुलतानी अवस्था किती वाईट आहे हेच दिसून येतं. माझ्या मते लेखकाला किमान सहानुभूती मिळायला हवी.

संदीप डांगे's picture

5 Dec 2016 - 12:13 am | संदीप डांगे

सहमत आहे!

विवेकपटाईत's picture

6 Dec 2016 - 7:39 pm | विवेकपटाईत

गुरुजी जाउद्या. अधिकांश लोकांना लेख समजला नाही.सामान्य लोक २००० नोट खिश्यात टाकून फिरत होते. सुट्टे नसल्यामुळे खरीदारी करणे अशक्य होत होते. नगदी अभावी लग्न-कार्य पुढे ढकलल्या गेले. पैसा असूनही लोक खर्च करू शकत नव्हते. या वरून मला जुनी लोक कथा आठवली.
बालपणीच्या राशनच्या दुकानातल्या रांगा आणि आज बँकासमोरच्या रांगा त्यात साम्य दिसले.

काही स्पष्टीकरण. मला चांगला स्वैपाक बनविता येतो. सौ. नसेल तर भरपूर प्रयोग करतो. मला कसला हि त्रास नव्हता. आमची सौ. म्हणते तुम्हाला स्वैपाकी व्हायला पाहिजे होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2016 - 11:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वामी तिन्ही जगाचा
आट्या बिना उपाशी.

असं म्हणून... पटाईतकाकांनी त्यांची नेहमीची मोदींची बाजू सोडून, विनोदासाठी का होईना, रु२००च्या नोटेने त्यांची झालेली अडचण सांगून, एक प्रकारे मोदीविरोधकांची बाजू घेतली आहे. तरीही, केवळ काकांचा मुद्दा आहे म्हणून डिमॉनेटायझेशनचे विरोधक त्यांना विरोध करताना पाहून मजा वाटली !

अरेरे, असे असतात काय, "माणूस न बघता, केवळ मुद्दे बघून मारलेले गुद्दे ?!" ;) :) =)) =)) =))

(हे खरे असले तरीही, मुळात हा धागा विनोदी आहे तेव्हा सर्वांनीच हघ्या ;) )

संदीप डांगे's picture

5 Dec 2016 - 12:21 am | संदीप डांगे

पटाईत काका, तुमची गोष्ट खरी सांगितली मात्र भारी!

बाकी, कुठे मारले कि कातडी कुठे थरथरवावी हे कळलं नाही म्हणजे बैलाला सोंग जमलं नाही हे समजावे असं बिरबल सांगून गेला. मिलोच्या आठवणी सांगणारे विवेककाका एकटेच आहेत भौतेक! =))

आता नाहीच मिळत आटा तर जाऊ द्या काका, पण शेवटी जेवलात काय? दाल चावल तरी खाल्लेत की नाही?

विवेक पटाईतांचा आटा बिना उपाशी
न मिळे असूनही नवीन नोट हाताशी

चक्की फ्रेश पांढरा मिल वाला विदेशी
भुरे रंग का आणि नौ अनाजी स्वदेशी

सुट्टे पैसे नसती गल्लीतल्या वाण्यापाशी
कॅशलेस सिस्टम अन कार्डं त्याला नकोशी

नोटा रद्द करण्याची नमो युक्ती खाशी
विवेक पटाईतांचा आटा बिना उपाशी

विवेकपटाईत's picture

8 Dec 2016 - 7:10 pm | विवेकपटाईत

नोटा रद्द करण्याची नमो युक्ती खाशी
विवेक पटाईतांचा आटा बिना उपाशी

मस्त. कविता आवडली. अजूनही एकुलती एक नवीन नोट बटव्यातच आहे.

लीना कनाटा's picture

10 Dec 2016 - 8:37 am | लीना कनाटा

पटाईत काका,

केवळ कवितेच्या मीटर मध्ये बसवण्यासाठी तुमचा एकेरी उल्लेख करावा लागला. क्षमस्व.

चांदणे संदीप's picture

8 Dec 2016 - 9:20 pm | चांदणे संदीप

तुमच्या सोन्याच्या गोष्टीतल्या "युरेका"साठी lol!

Sandy

गणामास्तर's picture

9 Dec 2016 - 9:56 am | गणामास्तर

दिल्लीत पण भर डिसेंबर मध्ये एसी लावायला लागतोय म्हणजे अवघड झालंय कि.