नवाझ शरीफ और प्रेस नोट

वडगावकर's picture
वडगावकर in जनातलं, मनातलं
3 Dec 2016 - 3:55 pm

प्रत्येक देश बऱ्याच वेळा बर्याच प्रेस नोट्स रिलीज करत असतो.
डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन ह्या गव्हर्मेंट डिपार्टमेंट कडे ते काम असते.
त्यात एखाद्या देशाबरोबर झालेला करार,एखाद्या माननीय परदेशी व्यक्ती चे अभिनंदन वगैरे बातम्या प्रसिद्धीला दिल्या जातात.
ईट्स रुटीन प्रोसिजर,त्या प्रेस नोट मध्ये अगदी संयमित,संतुलित आणी ऑफिशियल भाषा वापरलेली असते.

पण पाकिस्तान गव्हर्मेंट ने ३०-नोव्हेबर-२०१६ ला रिलीज केलेली प्रेसनोट नंबर २९८ तर एकदम धमाकेदार होती.
मूळ घटना अशी होती :पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नवंनिर्वाचित अध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रंम्फ यांचे मिळालेल्या यशाबद्दल टेलिफोन वरून अभिनंदन केलं.बस्स,एव्हडंच

मूळ नोट ईंग्लिश मध्ये आहे,तिचा मराठी अनुवाद बघू.

ट्रम्प यांनी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानची खालील प्रमाणे स्तुती केली....
तुम्ही भन्नाट आहात,उत्कृष्ट असामी आहात, आपण केलेली उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे, आपली लवकरच भेट व्हावी अशी इच्छा आहे, आपण पंतप्रधानांशी बोलत असलो तरी आपला अनेक वर्षांपासूनचा परिचय असल्यासारखे वाटते, आपला चांगला नावलौकिक आहे,

पाकिस्तान हा विस्मयकारक देश असून तेथे प्रचंड संधी उपलब्ध आहेत,पाकिस्तानातील जनता सुज्ञ आणि अत्यंत हुशार आहे.
शरीफ यांनी या वेळी ट्रम्प यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले.तेव्हा आपल्याला या विस्मयकारक देशात,विस्मयकारक जनतेमध्ये येण्यास आवडेल, पाकिस्तानातील ज्यांना आपण ओळखतो ते असामान्य आहेत,असे ट्रम्प म्हणाल्याचे निवेदनात म्हटले आहे....वगैरे वगैरे....

आयला...!!!
ही अशी ऑफिशियल प्रेस नोट?
मला तर वाटतंय की ही प्रेस नोट लिहायला शोले मधला सुरमा भोपाली बसवला होता की काय?

हे म्हणजे आपल्या नाक्या वरच्या गप्पांसारखं झालं.

ये डोनाल्ड ट्रंम्फ तो अपना भौत पुराना यार है...
एक दिन मै उसको बोला,
भाभी और बच्चो के साथ घरपर चिकन दम बिर्याणी खाने के लिये आजाओ....

झालं!,ट्रम्प यांच्या सत्तांतराची व्यवस्था पाहणाऱ्या टीम ने ताबडतोब पाकिस्तान च्या त्या नोट वर स्पष्टीकरण दिलं आणी त्या मनघडंत कहाणी चा ठामपणे इन्कार केला....

त्यांचं निवेदन....
"ट्रम्प आणि शरीफ यांच्यात अमेरिका आणि पाकिस्तान भविष्यात कसे एकत्रित काम करू शकतील याबाबत सकारात्मक चर्चा झाली"
त्या ट्रान्झिशन टीम ने या टेलिफोन स्टोरी बद्दल ट्रम्प यांच्या बाजूने खालील निवेदन ताबडतोब प्रसिद्धीस देण्यात आले.
नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांच्यात,अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध भविष्यात कसे अधिक बळकट केले जाऊ शकतात यावर फलदायी बातचीत झाली.

शरीफ यांच्याशी व्यक्तिगत पातळीवरही जवळचे संबंध जोडण्याची इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली.

भारताशी असलेले वाद सोडविण्यासाठी मदत करण्याची ट्रम्प यांनी तयारी दर्शविली.
घ्या....बसा बोंबलत
अहो शरीफ साहेब,ते ट्रंम्फ अजून अध्यक्ष सुद्धा झाले नाहीत की लगेच नसलेली दोस्ती दाखवायला चालू केलीत.
ह्या वरून एक हिंदी म्हण आठवली....

मंदिर अभी खुला भी नहीं कि खैरात मांगने भिखारी खड़ा

(त्या नोट ची लिंक-)

विनोदबातमी

प्रतिक्रिया

हाहाहा! बाकी पाकिस्तान किती 'नापाक' आहे हे भारतीयांना चांगलेच ठाऊक आहे. ;-)

पैसा's picture

3 Dec 2016 - 9:50 pm | पैसा

विनोदी प्रकार!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2016 - 1:33 am | डॉ सुहास म्हात्रे

पाकिस्तानवर लिहिताना व माध्यमांतही काही तज्ञांनी म्हटले आहे की, "कधी काळी पाकिस्तान चुकून खरे बोलला तरी त्यावर विश्वास ठेवणे कठीण पडेल."

त्यामुळे, आताच्या त्याच्या डेस्परेट अवस्थेत पाकिस्तान काहीही बरळला तरी त्याला फाट्यावर मारावे आणि व्यवहारात त्याने कोणतीही चांगली कृती केली तरी तीही जोखून पारखून मगच तिच्यावर "सावध अर्धा विश्वास" ठेवावा.

पाकिस्तानच्या दाव्याला अमेरिकेने दुजोरा न दिल्याने, आताही त्याचे तोंड जगात अजूनच काळे झाले आहेच :)