मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६

मोदक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
. नमस्कार मंडळी. मी आज केलेला व्यायाम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. नोव्हेंबर महिन्यात मिपाकरांनी केलेला एकूण व्यायाम पुढीलप्रमाणे

सायकलिंग - ८०१० किमी

रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.

(वरील अंतर धाग्यावर दिलेली माहिती आणि मिपाकरांचा स्ट्रावा ग्रूप यावरून काढली आहे - पोहण्याचे अंतर कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

सर्व व्यायामपटू मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..!!!

डिसेंबर महिन्यातील व्यायाम या धाग्यावर टाकत राहूया..

वाचने 31778 वाचनखूण प्रतिक्रिया 72

खेडूत गुरुवार, 12/01/2016 - 09:44
छान! पण रनिंग/ वॉकिंग २४८ किमी हे काय झेपलं नाही.या ग्रुपात किती लोक्स आहेत? मी एकटाच दरमहा दोनशे किमी चालतो.

In reply to by खेडूत

मोदक गुरुवार, 12/01/2016 - 10:24
हे पूर्वीच्या धाग्यात दिलेले + मिपाकरांच्या ग्रूपवरचे आकडे आहेत. तुम्ही नियमितपणे मिपावर दिलेत तर आम्हाला ट्रॅक ठेवणे सोपे जाईल.

In reply to by मोदक

साधा मुलगा गुरुवार, 12/01/2016 - 11:04
धन्यवाद एवढे कष्ट घेतल्याबद्दल,उत्तम उपक्रम आहे हा. एखादी मॅरेथॉन / स्पर्धा असेल ज्यात मिपाकर सहभागी होऊ शकतात, त्याचे रेजिस्ट्रेशन वगैरेंच्या लिंक हि द्याव्यात या धाग्यावर.

In reply to by साधा मुलगा

पक्षी Fri, 12/02/2016 - 10:51
हेच म्हणतो, स्थानिक मॅरेथॉन स्पर्धांची माहिती मिळाली तर सहभाग घ्यायला सोपं जात, बहुतेक वेळा असल्या स्पर्धा झाल्या नंतर कळतं. पुढच्या महिन्यात स्टॅंडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन आहेत मुंबईत, पण तिचा ६ किलोमीटर रन केव्हाच फुल्ल झाला. आणि २१ किलोमीटर साठी अगोदरच अनुभव हवा होता.

अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 12/01/2016 - 16:52
सायकलींग धराल काय? ;) आज ५ किमी स्टेशनरी साकलींग, अपर बॉडी अन मग १० मिनिटे एलिप्टीकल (३०० कॅलरीज हे मशिन १० मिनिटात खातं त्यामुळं माझ लैच जीव!!! ) अन हो, ५० जोर.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक गुरुवार, 12/01/2016 - 17:23
हा हा.. धरूया की. आपल्याला कुठे मिपाकरांच्यात स्पर्धा लावायची आहे. एकमेकांना प्रोत्साहन देवून शक्य होईल तितका व्यायाम करायचा आहे बस्स..! :)

In reply to by मोदक

नितीन पाठक Sat, 12/03/2016 - 15:10
सर्व प्रथम उत्तर द्यायला उशीर झालाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. होय. आमच्या ग्रुपचा एक ठराविक मार्ग ठरला आहे. वेळ सुध्दा ठरलेली आहे. आम्ही सर्व जण त्याच मार्गावर दररोज फिरत असतो. त्यामुळे माझे घर टू घर एकूण अंतर ६.५ किमी निश्चितच (स्ट्रावा वर मोजले आहे). कधीतरी काही कारणास्तव जाणे जमत नाही, उदा. गावी जाणे, प्रकृती बरी नसणे.

हा उपक्रम मस्त आहे राव. माझं रोजचं १२ किमी चालणं होतं (मॉर्निंग वॉक - टू अँड फ्रो - नेरेगाव ते लोणिवली वाडी ) शनिवार - रविवार सुटी असते त्यामुळे त्या दिवशी मुडवर अवलंबून असतं. मुड असेल तर कधी १५-१६ किमीसुद्धा होते. शनिवार - रविवार शक्यतो चालण्यापेक्षा पळण्याचा प्रयत्न करतो. अगदी संपूर्ण नाही जमले तरी ८-९ किमी पळणे होतेच. अर्थात गॅप घेत-घेतच.

एस Fri, 12/02/2016 - 11:12
एक कल्पना सुचली आहे, सर्व मिपाकरांनी एकाच दिवशी एक मॅरेथॉन पूर्ण करायची. ज्यांना जितके शक्य होईल तितके. मॅरेथॉन घ्या किंवा सायकलिंग किंवा चालणे किंवा पोहणे; काहीही. इथे किंवा स्वतंत्र धाग्यावर सर्वांनी येऊन अपडेट द्यायचे आणि शक्य झाल्यास फोटो डकवायचे. एकाच दिवशी टार्गेट ठेवून.

आजपासुन थ्री डे स्प्लीट सुरु केलंय. आज लेग्स होते. बॉडी वेट स्क्वॅट्स, बारबेल स्क्वॅट्स, डंबेल लंजेस, लेग प्रेस, एक्स्टेंशन, कर्ल, काफ रेझ, अ‍ॅडक्टर, अ‍ॅब्ड्क्टर सगळ सग्ळ करवुन घेतलंय. त्यामुळे पायांना मस्त रग लागलीय!

In reply to by मोदक

प्रशांत Mon, 12/05/2016 - 13:57
मागच्या आठवड्यात स्ट्रावा वापरल नाही म्हणुन हि शिक्षा. तुला आज ५० किमि करायचे ना? घरी जाताना ७ किमि जास्त चालवा.. हा का ना का

In reply to by प्रशांत

मोदक Wed, 12/07/2016 - 13:50
काल १०० किमीचा कंटाळा आला म्हणून ४० किमीच झाले. ..आणि आज कंटाळ्याचा हँगओव्हर झाल्याने ० किमी. :'( बिर्याणीची ऑफर किती दिवस आहे..? ;)

In reply to by मोदक

गणामास्तर Wed, 12/07/2016 - 17:53
व्यायामात जरी सहभागी होऊ शकत नसलो तरी बिर्याणी खाण्यात होऊ शकतो. कुठशीक आहे हे गीतांजली ? अवांतर : मी गेल्याच्या गेल्या आठवड्यात रोज पोहण्याचा नियम करून सलग ३ दिवस पोहायला गेलो. परत आल्यावर सपाटून भूक लागायची म्हणून सकाळी डब्बल का नाश्ता झाला, ३ दिवसात १ किलो वाढले. पोहणे बंद झाले आता वजन स्थिर आहे :)

In reply to by गणामास्तर

मोदक Wed, 12/07/2016 - 18:26
सातारा रोड, ट्रेजर पार्क जवळ. लै भारी बिर्याणी असते. (खूप पॉश हॉटेल नाही त्यामुळे वातावरणाकडे बघून जाणार असाल तर एकदा चक्कर मारून ठरवा.)

मोदक Tue, 12/06/2016 - 12:00
आज नेहमीच्या रूटचा कंटाळा आला म्हणून शॉर्टकटने 24 किमी सायकल चालवून हाफिसात पोहोचलो ;) बाबा योगीराज ढेपाळले का? का संध्याकाळी सायकल हाणताय? :D

In reply to by मोदक

बाबा योगिराज Wed, 12/07/2016 - 18:43
काल जरी ढेपाळलो, तरी आज परत धमाका करण्यात यशस्वी झालेलो आहे. आजची सायकल 34 किलोमीटर. ह्या रविवार पर्यंत 225 चा आकडा जरूर पार होणार.

गवि Wed, 12/07/2016 - 11:12
एकमेकांच्या नादाने चांगल्या आरोग्यदायक सवयी लावणारे असे धागे हे सर्वात सुंदर ऑनलाईन कट्टे आहेत. असेच सर्वांना मनाची उभारी, निर्धार आणि मानसिक सोबत देणारे धागे येऊन मिपा आणखी समृद्ध होत चाललंय.

In reply to by अरिंजय

बाबा योगिराज Wed, 12/07/2016 - 17:52
लगे रहो. मानसराव चंद्रात्रेसाह्येब, तुम्हाला आणि वाहिणीसाहेबांना लग्नाच्या वाड्डदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा योगीराज.