जोगव्यानं त्या सकाळी गहिरे रंग भरले होते. मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता. पाणवठ्यालगत गुलाब ताटव्यांचे राज्य होते. मंत्राग्नी पुटपुटत त्याने हवनकुंडात स्निग्ध सोडला. उठून एकवार त्या महान तेजोवलयाकडे पाहिले.
"बस्तीर" कमलपात्राच्या जलधारा हातावर सोडत तो उद्गारला.
सेवकानं वाकून मानाचा मुजरा केला.
"एक ऊफाळता चहा"
समाधीवस्थेत जोगव्याने सिंहासन ग्रहन केले. एक पाय उकिडवा सोडत तो गरजला,
"नाउ"
खलित्यावरील राजमुद्रा उठून दिसत होती. दरबानानं तेजोवलय भडकवले.
"हिकडं येक कटींग.."
काळ गोठावला होता. राजधानीची चारी चक्रे रुतून बसली होती. अमृततीर्थाने भरलेले ते कमंडलू सेवकाने अलगद पकडले.
"टायर पंम्चर झाला कारं गाड्याचा?" तीर्थप्राशन करताना जोगव्यानं कळीचा मुद्दा मांडला.
***
काळंनिळं आभाळ. कपारीतले खेकडे. शेकोटीला लाकडे. "शंभो". दगडाखालची नांगी हातात धरत एकजण ओरडला.
"घावला का इंचू?"
नर्मदेतीरी अखेर निम्नतंद्रीतल्या साधकाला कंठ फुटला.
***
मरणाच्या थंडीत ते बेवडं कुडकुडत जागं झालं. चप्पल पायात घालून कसबसं झोकांड्या खातंच उभं राहीलं. गल्लोगल्लीची कुत्री भुंकत होती. एवढ्या पहाटेचा तो वायझेड माणूस ओढ्यात आंघोळ करत बसला.
"हरी ओम" शेवटची बाटली रिकामी करुन त्याने रस्त्यावर फेकली.
पाय लटपटत होते. बीडी भिजून गेेेली होती.
"हरी ओम माऊली. झोप झाली का?" वस्तादनं त्याला फाट्यावर मारला.
"आराम. राम कृष्ण हरी. कपभर घ्या. हरी ओम." फळकुटावर बसताना ते बेवडं पाय घसरुन पडलं. त्याला सुद नव्हती. काळ्याबिंद्र्या धोतऱ्यानं मटकुळं करुन त्याला खुर्चीत कोंबला.
तीनशेवीस चारशे. बनारस बिगर ईलायची. "एक गिलास हिकडं" तोंडातला मावा थुकत वस्ताद म्हणाला.
"बस्तीर"
पहिल्या धारंचं एंडरेल. काळे बुडबुडे. गावठी. धोतऱ्यानं गिलास भरला.
"टायर पंम्चर झाला कारं गाड्याचा?" दोन पेग झाल्यावर ते बेवडं बराळलं.
प्रतिक्रिया
24 Nov 2016 - 10:10 pm | एस
काय प्रतिभा आहे! धन्य.
24 Nov 2016 - 10:31 pm | प्रचेतस
अगदी
24 Nov 2016 - 10:40 pm | चांदणे संदीप
अगदी २
24 Nov 2016 - 11:02 pm | बोका-ए-आझम
जव्हेरभौ पेटेश!मालक, ते अर्नळगुंडूचं बघा की जरा!
25 Nov 2016 - 8:49 am | नाखु
कुठल्या गिरणीतलं पीठ खातोय ते बघावं लागल एक्डाव.
मिपा गब्बर गँगमधला मेंबर नाखु
24 Nov 2016 - 10:36 pm | मारवा
ते सालं एकशेवीस तीनशे माहीती होत भाऊ.
हे तीनशेवीस चारशे त्याहुन स्ट्राँग असत का ? हे "बाबा" च आहे का ?
मी कधी खाल्ल नाही मित्र खायचे म्हणुन थोडं आठवतय अंधुक अंधुक
24 Nov 2016 - 10:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक तुम्ही हाय मिपावर ज्याचं जरा वाचावं वाटतं.
-दिलीप बिरुटे
25 Nov 2016 - 7:23 pm | टवाळ कार्टा
कोणी समजावेल का मला हे काय आहे
25 Nov 2016 - 7:33 pm | jp_pankaj
+1
मला पण समजला नाही.
25 Nov 2016 - 8:20 pm | Rahul D
25 Nov 2016 - 8:29 pm | Rahul D
26 Nov 2016 - 7:56 am | तुषार काळभोर
26 Nov 2016 - 7:56 am | तुषार काळभोर
26 Nov 2016 - 7:57 am | तुषार काळभोर
पहिली दोन वाक्ये वाचून वाटलं, हा शिंद्यांचा हत्ती असं काय ललित लिहायला लागला?
पुढचं काहीच कळंना, मग खात्री पटली- हे वन अँड ओन्ली जव्हेर हत्तीच लिहू शकतो. ;)
26 Nov 2016 - 11:40 am | खटपट्या
तूम्हाला एकदा भेटण्याची जबर इच्छा आहे...
26 Nov 2016 - 2:55 pm | गामा पैलवान
मन्वंतर जबरदस्त जमलंय. विंचवाचं मात्र कळलं नाही.
-गा.पै.
26 Nov 2016 - 7:56 pm | अश्फाक
विंचुच्या चाव्याने नशा करायची पद्धत आहे
27 Nov 2016 - 1:17 am | गामा पैलवान
अश्फाक, बापरे खरंच की काय! धन्यवाद!!
आ.न.,
-गा.पै.
27 Nov 2016 - 12:25 am | ज्योति अळवणी
खरच अज्जीब्बात कळलं नाही हो जव्हेर भाऊ. समजावून सांगाल का
27 Nov 2016 - 1:50 am | बांवरे
जव्हेर सेहत केलिए तूं तो हानिकारक है.
29 Nov 2016 - 1:54 pm | प्रसाद गोडबोले
काहीही श्ट्ट कळाले नाही .
29 Nov 2016 - 4:42 pm | अत्रन्गि पाउस
हा कि काहीही ना कळलेला मी एकटाच नाही ...
29 Nov 2016 - 5:21 pm | संजय पाटिल
म ला प ण का ही क ळ ले ना ही. . .