अवजार

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
22 Nov 2016 - 3:45 pm

याआधी : मैथिली , माकडीचा माळ , शिट्टी

________________________________________

संध्याकाळ होत आली तसं हरी गाढाव जोंधळ्यात शिरलं. आत शिरल्यावर बऱ्याच वेळानं दोनदा खिकाळलं. मग बाहेर आलं. इकडं तिकडं बघितलं. जाग्यावरंच दोन उड्या हाणल्या. आन पुन्हा एकदा जोंधळ्यात शिरलं. यावेळेस मात्र जरा बेतानं खिकाळलं.

समोरच्या झुडपात बसलेलं भानूकुत्रं भेदरुन गेलं. त्यानं थोडं बाहेर येऊन मान खाली घालत त्या जोंधळ्यावर बारीक नजर ठेवली. हा प्रकार त्याला कळण्या पलिकडचा होता. त्याची शेपटी थरथर कापत होती.

अखेर हरी गाढव बाहेर आलं. दबकत दबकत बांधावरुन खाली उतारलं. चिच्चपशी जाऊन जरावेळ ऊभारलं. मग उधळतंच डोगरपायथ्याच्या दिशेनं पळालं.

*****

'उं...... हा....!' . गाढवानं श्वास घेतला. डबक्यातलं पाणी पिल्यावर त्याला पुन्हा तरतरी आली. पळून पळून धाप लागली होती. माळावरच्या खोबणीत त्यानं वाकून बघितलं. तिथं पुन्हा एकदा खिकाळलं. मग झाडपाला कुरताडत पुढे चालू लागलं.

"ये झौन्या, आरं आसा का पिसाळ्यावाणी करतूय?" पळून पळून दमलेल्या भानू कुत्र्यानं अखेर त्याच्यापुढे लोटांगणच घातलं.
"च्यायला भान्या, आज तू गावात कसा काय?" एखाद्या जिगरी दोस्ताला बोलाव तसं गाढाव बोललं.
"काय नाय बे, तू कुठं काशी कराय लागलाय बघाय आलतो" भानूकुत्र्यानं उठून गुरकावत त्याच्याकडं बघितलं.
"तुला चम्या लांडगा म्हायीत्येय?"
"कुठला चम्या? त्यो मधल्या आळीतला, आपला चम्या?"
"हा आरं त्योच, दुपारी भेटला हुता. म्हणला ये गावात. आलो. म्हादा हाल्याकडं जायचयं म्हणला"
म्हादा हाल्या म्हणल्यावर भानूचं डोळं चमकलं. रंगा बोकडानं शालीचं लगीन जवा म्हादा हाल्या बरोबर लावलं. तवापस्न गाठभेटीचं लय मुश्किल झालतं. भानूला कुण्या एकेकाळी उपटलेलं गवत आठवलं.

सवंदडीपशी आल्यावर हरी गाढाव पुन्हा एकदा खिकाळलं. तसा चम्या लांडगा "आलू आलू.." म्हणत आळोखेपिळोखे देत बाहेर आला.

"डॉन्कीसम्राट, किती वाट बघायची?" डोळे चोळत चम्यानं गाढवाच्या खांद्यावर थाप टाकली.
"रामराम चमनलाल " भानूकुत्र्यानं मध्येच तोंड खुपसलं.
"अबे, ह्याला कशाला आणलाय सोबत?" चम्या लांडगा खवाळला.
"चम्या साल्या इज्जतीत बोल, कांडकाच पाडीन न्हायतर" भानूकुत्रं गुरकावलं.

"च्यायला या कुत्र्यांनी पार डोकं उठवलंय माझं. चलंय हाऱ्या, आपुन जाव हाल्याच्या घरी. "

"अबे दोस्त हाय माझा, येऊदी की त्याला" गाढवानं रिक्वेस्ट केली.

तसं चम्या म्हणाला,
"भान्या, यायचं तर ये, पण तिथं बघितलेलं कुणाला सांगितलं तर दातंच घशात घालीन"

"च्यायला, आसं हाय तरी काय तिथं" भानूकुत्रं चुकून हसत हसत भुंकलं.

******

"वैनी, हायतं का भाव घरात?" म्हादाच्या घरी आल्यावर गाढवानं दरवाजा ठोठावला.
खुराड्यात झोपलेलं शालन करडू तिथूनंच म्हणालं, "औताला जुपायला गेल्यात हो, तिकडंच मुक्काम हाय आज"

"च्यायला, हाल्याला कधीपस्नं जुपाय लागली रं..!" भान्यानं तेवढ्यात पण दबक्या आवाजात जोक हाणला.

"बरं हाय आमी हितं पटांगणात, बसतू जरावेळ" गाढव म्हणालं तशी समदी पटांगणात आली.

"काय च्यापाणी करायचं का तुमास्नी?" शालीनं बाहेर येऊन गाढवाला विचारलं. पटांगणात बसलेला भानू तिला दिसला. लाजून चूर झाली. भानू गालात बेरकी हसला. मनातल्या मनात त्यानं थोडं गवतपण उपाटलं.

"काय गरज न्हाय वैनी, जेवण करुन आलूय आमी, तुमी लवंडा निवांत." गाढव निर्धास्तपणे म्हणालं.
तशी शाली आत जाऊन गुडूप झोपली.

*****

"मग भान्या, कधी कुणाला घोडा लावलाय का त्वा?" चम्या लांडगा अगदी आरामात पाय हालवत भानू कुत्र्याला म्हणाला.
"चम्या, साल्या, तुझं हितं काय काम हुतं कळलं न्हाय बरका मला" भानू कुत्रं खडकाला टेकून बसलं. रातकिड्यांच्या अंधारात चांदणपण चांगलं पडलं होतं.
"आरं तिच सांगुतय तुला. आमी हितं यीऊन रोज घोडा लावतू. म्हादापण आसतू आमच्यासंगं. आयघाला आज कुठं उलथलाय कुणाला म्हायीत" चम्या लांडगा आता रंगात आला होता.

"आण आज चांदणपण रगील पडलंय" हरी गाढव दबकं खिकाळलं.
"मजी?" भानूकुत्रं गोंधळूनंच गेलं होतं. त्याला कशाचाच काही थांगपत्ता लागेना.
"कळंल जरा वेळानं" चम्या डोळा मारत म्हणाला.

काळभोर अंधारात चिडीचूप शांतता. घोंघावतं वारं. वटवाघळं. घुबडं.
बऱ्याच वेळानं समोरच्या लिंबाला एक हिसडा बसला.
"झाला बग गेम सुरु" चम्यानं सगळ्यांना अलर्ट केलं. तसं गाढव डोळे फाडून बघू लागलं. भानू कुत्रं सावध झालं. त्यानं लिंबाखाली बघितलं तर खरंच तिथं एक घोडा आला होता. सोबतीला एक घोडीपण होती. त्यांनी एक झाड सोडलं नाही. पार झुडपं उध्वस्त केली. त्यांच्या जाम खंग्री गेम्बाटात परिसर दणाणून गेला. खरंच तिथं एक घोडा लागला होता.

"च्यामारी, लयच खतरी हाय ह्यो लाईव्ह शो" भानूकुत्रं जाम खूश होऊन म्हणालं.

अखेर गेम्बाट संपलं. सगळी, "आहाहा, हूहूहू..!" करत झोपी गेले.
पुन्हा एकदा चिडीचूप शांतता. घोंघावतं वारं. वटवाघळं. घुबडं.
भानू आज स्वप्नात नुसता गवतंच उपटत होता.

*****

"हीहीही... बस ना आता... अजून किती... गवत संपत आलंय...हीहीही!" मध्यरात्री जेव्हा भानू जागा झाला तेव्हा त्याच्या कानावर असले विचित्र आवाज पडत होते. त्याने तडक कान टवकारले. लिंबाखाली तर सामसूम होती. झोपलेल्या गाढवाकडे त्याने फार लक्ष दिले नाही. उडी मारुन तो अंगणात आला.
आवाज खुराड्यातून येत होता. बहुतेल म्हादा हाल्या परत आला असावा. जिभल्या चाटत तो आडोश्याला गेला. थोडं पुढं जाऊन त्याने खुराड्यात बघितले आणि धक्काच बसला. चम्या लांडगा आणि शालन करडू मिळून गवत उपटत होते. मिशनरीची पार वाट लावली होती त्यांनी.
भानूनं फार विचार केला नाही. थक्क होऊन तो झुडपात बसून राहीला.

बरंच गवत सफाचट केल्यावर अखेर चम्या लांडगा बाहेर आला. पटांगणात जाऊन निवांत पसरला. चमचम चांदण बघत घोराय लागला.

तसा हळूचकन झुडपातनं भानू बाहेर आला. खुराड्यात झोपलेल्या शालीसमोर तो दत्त म्हणून उभा राहिला. शाली गडबडून उठून बसली.

"त्याचं कायेय शाले, तुमचं चालू द्यात, पण आडचणच आशी हाय की,......"

"ए हाडय कुत्र्या.." शाली ताडकन उठत म्हणाली. आत जाऊन तिनं दरवाजा दाणदिशी आपटला.

भानू कुत्रं भेदरुनंच गेलं. गपचिप पटांगणात येऊन जरावेळ पडलं. विचार करुन करुन ते जास्तंच बावचळून गेलं. त्यादिवशी त्याला कळालं की घोडा लागणे म्हणजे काय आसतं.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

एस's picture

23 Nov 2016 - 5:06 am | एस

भारी.

= )) =)) =))
मेलो =)) =))

दंडवत स्विकारा जव्हेरभौ __/\__

नाखु's picture

23 Nov 2016 - 2:48 pm | नाखु

खतरनाक.

पाटीलभाऊ's picture

23 Nov 2016 - 2:53 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय.

किसन शिंदे's picture

23 Nov 2016 - 5:20 pm | किसन शिंदे

गवत उपटणे??

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2016 - 6:19 pm | टवाळ कार्टा

गवत = शष्प

जव्हेरगंज's picture

23 Nov 2016 - 6:31 pm | जव्हेरगंज

तसं नाय ओ,
हे वाचा = शिट्टी

विस्तृत माहिती मिळेल ;)

jp_pankaj's picture

23 Nov 2016 - 5:38 pm | jp_pankaj

मिशनरी वाट ...=))
=)=)===
)=))
=))=))
=))
मेलो..
लै भारी..मैथिली नंतर आजच इतक हसलो.

वरुण मोहिते's picture

23 Nov 2016 - 6:25 pm | वरुण मोहिते

सही

हा सर्वात भारी डायलाॅग आहे! बाकी या जव्हेरगंजाला या कथा कुठल्या नॅशनल पार्कात बसून सुचतात ब्रे?

प्रचेतस's picture

24 Nov 2016 - 6:20 pm | प्रचेतस

जव्हेरटच.

रांचो's picture

23 Mar 2017 - 10:19 pm | रांचो

डोमकावळा म्हणनार का?