सोयीचं प्रेम की प्रेमाची सोय ?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
16 Nov 2016 - 5:12 pm

----------------------------------------------------------------------------------------
ती: अहो, आता हा वर्षाचा होईल, बघता बघता दिवस निघून गेले ..मी तरी किती दिवस घरी राहणार अजून ? आपण लगेच पाळणाघर बघायला हवं ! मी एक दोन ठिकाणी चौकशी करून ठेवली आहे. त्यातल्या त्यात शेजारच्या बिल्डिंगमधल्या काकू बऱ्या आहेत, आपल्यालाही बरे पडेल......
तो : बरं , उद्याच जाऊन चौकशी करू ....
दुसऱ्याच दिवशी काही रंगीत खेळणी, थोडा खाऊ , औषधं आणि छोटं गोड पार्सल काकूंकडे रवाना.....

----------------------------------------------------------------------------------------

ती : अहो हा बघा ना ... सारखा हट्ट करतोय आज ऑफिसला जाऊ नकोस म्हणून .... तरी ४ वर्षांचा झालाय, काही लहान नाही आता...
तो : बाळा हे बघ आता आईला जाऊ दे हां ऑफिसला ... संध्याकाळी ती तुला खाऊ आणेल ....शहाणा आहेस कि नाही तू ? चल काकूंकडे !

----------------------------------------------------------------------------------------
अमोघ : आई आज आमच्या शाळेत पालकांना बोलावलंय... तू चल माझ्याबरोबर... सगळ्या नववीच्या विद्यार्थ्यांचे आईबाबा येणार आहेत...
ती : अरे आजच कुठे ठेवली पालक सभा? काही घोळ नाही ना घातलास शाळेत ? त्यांना सांग घरी कोणी नाही म्हणून ....बाबांना पण आज नेमकं महत्वाचं काम आहे ... प्रगतीपुस्तक बाबांकडून सही करून घे आणि देऊन टाक...पुढच्यावेळी नक्की येऊ म्हणावं !

----------------------------------------------------------------------------------------

ती आणि तो (रात्री)

ती : अहो अमोघ सारखा उठसूट काकूंकडे जातो .... घरी बस म्हटलं तरी थांबत नाही .... आज मला सुट्टी होती तरीही तो दिवसभर काकूंकडे होता... घरी असला तरीही माझ्याशी जास्त बोलत नाही .... सतत काकूंच्या घरचं कौतुक आणि तिथलेच संदर्भ आणि उल्लेख .... आपण कोणीच नाही का त्याचे ? सगळे लाड पुरवतो आपण त्याचे.... काहीही कमी पडू देत नाही पण त्याला किंमतच नाही त्याची .... काय करूया?

तो : तरी मी तुला सांगत होतो त्याच्याकडे लक्ष दे.... पण तुला नोकरीचीच काळजी जास्त .... आता त्याला वेगळ्या पद्धतीने समजवायला हवं...बघतो मी ...

----------------------------------------------------------------------------------------

अमोघ : आई मी काकूंकडे जातोय ...
तो : अमोघ इकडे ये ....
अमोघ : काय?
तो: अरे जरा कधीतरी आमच्याशी बोलत जा काहीतरी .....आज रविवार आहे ... सारखा काकूंकडे का जातोस ? आम्हालाही तुझ्याबरोबर राहावंसं वाटतं ...
अमोघ : तुम्हीच सवय लावली ना .... त्यावेळी ते गरजेचं होतं मग नाईलाजाने घेतली मी सवय करून, न करून सांगतोय कोणाला ?... आता अजून काय हवंय तुम्हाला ?
तो : जास्त शहाणपणा करू नकोस .... सांगतोय तेवढं एक .... तू कुठेही जायचं नाहीस.. आज घरीच थांबायचं !काकूंनी तुला फुकट नाही सांभाळलं ... पैसे देत होतो आम्ही त्यांचे दर महिन्याला....
अमोघ : तुमच्या वाटेकडे रोज डोळे लावून एक एक दिवस मी ढकलत होतो तेव्हा हा विचार नाही आला कधी तुमच्या मनात ? नुसता खाऊ, खेळणी,कपडे दिले कि झालं? मी किती वेळा विनवणी केली की एक दिवस माझ्यासाठी द्या, पण तुमच्याकडे तोही नव्हता....आजी आजोबा कसे असतात ते कधी पाहिलंही नाही कारण नशिबातच नाही...इतरांसारखं भावंडं नसल्यामुळे तोही प्रश्न नाही .... शाळेच्या प्रत्येक सुट्टीला प्रश्न ठरलेलाच ...."करू तरी काय मी ?"
ती : अरे पण आम्हीही तुझ्याच चांगल्या भविष्यासाठी नोकरी करतोय .... तुझंच भलं होणार आहे त्यातून...
अमोघ : माझा वर्तमानकाळ नासवून कसलं आलंय भविष्य ? ज्या वयात जे हवं होतं तेच दिलं नाहीत तुम्ही ....त्याची भरपाई खाऊ आणि खेळणी कधीच नाही करू शकत ....आता मला आजही आणि यापुढेही काकूच जवळच्या वाटणार... तुम्ही आजपर्यंत सोयीने प्रेम केलंत ... त्या प्रेमाने माझी सोय बघतात ... हाच फरक...येतो मी ... आज तिथेच जेवण करेन..बाय !

दरवाजाचा मोठ्ठा आवाज ..... धडाड ...

ती आणि तो निःशब्द !

मुक्तकजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

16 Nov 2016 - 5:14 pm | माझीही शॅम्पेन

वाह वाह एकदम दवणीय :)

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Nov 2016 - 5:17 pm | माम्लेदारचा पन्खा

ते पन पैलेच...नोटा संपवल्या काय जुन्या ;-)

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2016 - 5:57 pm | टवाळ कार्टा

लाटकर काकांची उणीव भरून काढतोय तो =))

कपिलमुनी's picture

16 Nov 2016 - 6:07 pm | कपिलमुनी

अगदी दवणीय !

मराठी कथालेखक's picture

16 Nov 2016 - 6:43 pm | मराठी कथालेखक

दवणीय म्हणजे ? प्रवीण दवणे छाप का ? कुठे असतात हो ते आजकाल ? नाव पण नाही ऐकल बर्‍याच काळात. पुर्वी लोकसत्तात बरंच (म्हणजे खूप.. दूसरा अर्थ नाही :) लिहायचे.

साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत बहुदा.

पुंबा's picture

17 Nov 2016 - 6:49 pm | पुंबा

नुसते आहेत नाही चांगले आघाडीवर आहेत म्हणे..

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2016 - 5:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

अमोघच्या लहानपणी १२/लिटर असणारे दूध तो मोठा झाल्यावर ४२/लिटर झाले असेलच, आता अमोघ अन मिसेस अमोघ नोकरी करणार (त्याचा अन तिचा नात/नातू पाळणाघरात ठेऊन) का कसं हे स्पष्ट झालं तर एकंदरीत पूर्ण प्रकारावर मत देता येईल असं वाटतंय :)

शरभ's picture

17 Nov 2016 - 1:07 pm | शरभ

मला नाही वाटत की अमोघ नोकरीवाली बायको करेल. :)
तो ज्याच्यातुन गेलाय त्याच्यातून तो मुलाला नाही जाउन देणार. हा आता बायकोची निवडच चुकली तर गोष्ट वेगळी.. :)

- श

धोणी's picture

16 Nov 2016 - 5:19 pm | धोणी

किती लाडिक ,लेडीज

कंजूस's picture

16 Nov 2016 - 5:32 pm | कंजूस

काटेरी गारवा!

निरंजन._.'s picture

16 Nov 2016 - 6:05 pm | निरंजन._.

1980 च्या मुक्तपीठ मधलं लिखाण वाटतंय.

प्रसाद गोडबोले's picture

16 Nov 2016 - 7:42 pm | प्रसाद गोडबोले

ॐ दवणेय नमः ||

असेच बायका पोराच्या ऐवजी नवर्‍याला शेजारच्या बिल्डींग मधल्या आंटींकडे सोडत असत्या तर जग कित्ती सुंदर झाले असते !

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2016 - 8:02 am | कैलासवासी सोन्याबापु

एक नंबर हो प्रगो!! =)) =))

नाखु's picture

17 Nov 2016 - 8:27 am | नाखु

न सोडताही जातात(च) त्याचे काय हे पोपशास्त्रींनी गुलदस्त्यात ठेवले आहे हे आम्हाला ठाऊक आहे.

पोपोशास्त्रींच्या पुढील प्रवचनांची वाट पाहणार्यांपैकी एक

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2016 - 12:28 pm | प्रसाद गोडबोले

सोडणे आणि हळुच स्वतःहुन जाणे ह्या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे नाखु !
हे म्हणजे गोव्यात बीचवर बसुन बीयर पिणे अन चिंचवडात गांधीपेठेतल्या बार मध्ये बसुन घाबरत घाबरत बीयर पिणे इतका टोकाचा फरक आहे !

=))))

टवाळ कार्टा's picture

17 Nov 2016 - 1:09 pm | टवाळ कार्टा

तुमची धाव गोव्यापर्यंतच का?

सतिश गावडे's picture

17 Nov 2016 - 10:58 pm | सतिश गावडे

कंपनीच्या पैशाने लंडनला जाण्यापेक्षा स्वतःची पैशाने गोव्याला जाणे हीच खरी श्रीमंती.

किसन शिंदे's picture

18 Nov 2016 - 10:57 am | किसन शिंदे

कंपनीच्या पैशाने लंडनला जाण्यापेक्षा स्वतःच्या पैशाने गोव्याला जाणे हीच खरी श्रीमंती.

वा वा !! फेबू, व्हॉट्सअपवर फॉरवर्डेड सुविचार म्हणून सहज खपून जाईल. =))

फक्त खाली गावडे सरांचा कॉपीराईट असायला हवा.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 6:02 pm | टवाळ कार्टा

गोव्याला पर्याय म्हणून लंडनचा विचार केल्याने तुमचे लॉजीक अंमळ गंडलेले आहे असे खेदाने नमूद कर्तो =))

अभिजीत अवलिया's picture

17 Nov 2016 - 9:22 am | अभिजीत अवलिया

त्यासाठी बायकोने नेऊन सोडायची गरज काय ?

गामा पैलवान's picture

17 Nov 2016 - 7:00 pm | गामा पैलवान

अअ,

बायकोनं न सोडता स्वत:हून गेलं तर जग रागीट होतं ! माहित नाही तुम्हाला? ;-)

आ.न.,
-गा.पै.

अभिजीत अवलिया's picture

18 Nov 2016 - 2:10 am | अभिजीत अवलिया

हां. हे पण बरोबर आहे म्हणा.

याॅर्कर's picture

17 Nov 2016 - 11:59 am | याॅर्कर

बरं

माम्लेदारचा पन्खा's picture

17 Nov 2016 - 12:18 pm | माम्लेदारचा पन्खा

ही नम्र विनंती !

केस मागे घेताय? आपसात मिटवा मिसळ देऊन.

संदीप डांगे's picture

17 Nov 2016 - 7:05 pm | संदीप डांगे

मा प, क्या हुई?

चांगलं लिहिलंय, उलट सुलट प्रतिक्रिया येणारच!

माम्लेदारचा पन्खा's picture

17 Nov 2016 - 7:46 pm | माम्लेदारचा पन्खा

किंवा चुकीच्या वेळी मांडलंय.....असो...!

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2016 - 7:57 pm | प्रसाद गोडबोले

मग त्यात काय राव मा.पं ,
थोडे दिवसांनी पुनर्प्रकाशित करा अन खाली फक्त टॅग लावा अस्सा
_________________
(अलिकडुन पलिकडे पुनर्प्रकाशित)

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

(अवांतर : चला दिवाळीत आणलेले फटाके संपले , आता सारायला काड्या शोधायला गेले पाहिजे . टाटा =)) )

माम्लेदारचा पन्खा's picture

17 Nov 2016 - 8:18 pm | माम्लेदारचा पन्खा

असाच लोभ ठेवा....

स्रुजा's picture

18 Nov 2016 - 5:37 am | स्रुजा

खिक !

पैसा's picture

18 Nov 2016 - 11:30 am | पैसा

विषय आणि मटेरियल बरोबर आहे. फक्त ९ वी दहाव्वीतला मुलगा इतके बोलणार नाही. याऐवजी सरळ काथ्याकूट टाकला असतात तर पाश्शे नक्की झाले असते!

इट्स ओके. दोन्ही बाजूने बरोबर आहे. या जगात सगळं काळं किंवा गोरं असं काही नसतं. चलता है. कोण लेकाचा इथे अमरपट्टा घेऊन आलाय. सगळं इथेच टाकून जायचंय एक दिवस. सगळे पैसे, नातीगोती आणि अनुभव सुद्धा.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 6:03 pm | टवाळ कार्टा

ओ...आता पाश्शेला किंमत नाय =))

पैसा's picture

18 Nov 2016 - 10:28 pm | पैसा

सध्याचे वातावरण फक्त "मोदी" आणि "मोडी"ला ट्यार्पी द्यायचं आहे ना, म्हणून पाश्शे म्हटलं. डिमोनेटायझेशनचा धुरळा खाली बसला की पुन्हा आपल्या फेव्हरिट विषयांकडे वळू. काय म्हन्तांव?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 11:03 pm | टवाळ कार्टा

वळू की =))

मराठी भाषा आहे हो श्याम! वळू दे हवी तशी! =))

हे ज्ञान नवीन आहे...

भलतेच शिस्तशीर झालेत सगळे...खी खी खी....