लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 6:03 pm

माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये.

२८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची

लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय.
त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी.

1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या...

आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य?

२) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे.
ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला?

अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे.

काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय...

साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव?

असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......

मांडणीविचार

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 9:09 pm | संदीप डांगे

तुम्ही 'लाल' समजा स्वतःला, ;) :)

ट्रेड मार्क's picture

20 Oct 2016 - 9:20 pm | ट्रेड मार्क

अश्या परिस्थितीत ज्यांचे लग्न तर झालेच पण त्याचबरोबर जे नवराबायको एकमेकांबरोबर सुखाने नांदत आहेत यासाठी त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे.

पिशी अबोली's picture

20 Oct 2016 - 9:08 pm | पिशी अबोली

लग्न हा एवढा का इश्यू आहे कधीच समजलं नाही. कधीतरी बस करा ना हा विषय. बरं, स्वतःचं लग्न झालेले लोक दुसऱ्यांना नकार मिळाला म्हणून धागे-बिगे काढतात.. तुमचं झालं ना लग्न? होईल की समस्त मित्रपरिवाराचं.. आता लग्न होणं ही गोष्ट अत्यंत दुर्मीळ आणि अगदी चुकून घडणारी असती तर ठीक होतं. इथे वीट येईल इतक्या संख्येने लग्नं करतात दर हंगामात लोक. इतकं नैराश्य यायला काय झालं?

सामान्य वाचक's picture

20 Oct 2016 - 10:16 pm | सामान्य वाचक

छोट्यात छोट्या गोष्टीला लग्न या शब्दही चा परिस स्पर्श झाला कि संपले
कुटावा तेवढा काथ्या कमीच

लग्न हा एकच इश्यू आहे असं नाहीये बरं.
दुसर्‍यांचं लग्न झालेलं असलं की त्यांनी मूल होऊ द्यावे की नाही, असेल तर त्याची ड्युटी कुणी करावी, त्यांनी मुलांना कसे वळण लावावे, शाळेत डब्बा काय द्यावा हेही विषय आहेत की.

नाखु's picture

21 Oct 2016 - 8:51 am | नाखु

गोळाबेरीज.

  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा धागाकर्त्याची सामाजीक कळकळ
  • केली परदेशवारी तरी त्रिशतकी धाग्याचीच याद भारी (मिपाकरांना)
  • नकार पचवणे एक कला (फक्त तो दुसर्यानेच नेहमी पचवावा)
  • आधी आमच्यावर अन्याय झाला अता आम्ही तुमच्यावर करू (एक सामाजीक क्रांती अशीही )
  • नकारावस्थेतून जायचे नसेल तर प्रेमविवाह करा (अर्थात दोन्ही एकाच स्थळी अनिवार्य .प्रेम एका ठिकाणी व विवाह दुसरीकदे हा मालिकांचा हक्काचा विषय आहे तसे अजिबात करू नये
  • जाहीरातीला भुलू नये ,जाहीरातीतले दावे अवाच्या सव्वा असतातच आपण सजग रहावे आणि भ्रमनिरास करून घेऊ नये.
  • भाकर्या बडविण्याचे कसब पुढे वाया जात नाही. इतर बडविण्यात उपयोगी पडते.
  • वेळेत लग्न होणे आणि टिकणे हे भाग्याचे लक्षण असू शकते पण त्यामुळे नास्तीकांना न्युनगंड येऊ शकतो त्याचे काय? असा विचार प्रतिसादकर्त्याचा कोमल मनास का शिवला नाही?
  • विवाहीत्,विवाहोत्सुक आणि नवविवाहीत अश्या सगळयांना सामावून घेणारा सदाबहार धागाविषय.
अभिजीत अवलिया's picture

22 Oct 2016 - 12:30 am | अभिजीत अवलिया

उत्तम गोषवारा. एखादा कार्यक्रम संपला की कसे सगळ्यांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमातून काय साध्य झाले ते सांगितले जाते तसे वाटले.

ट्रेड मार्क's picture

22 Oct 2016 - 3:03 am | ट्रेड मार्क

वेळेत लग्न होणे आणि टिकणे हे भाग्याचे लक्षण असू शकते पण त्यामुळे नास्तीकांना न्युनगंड येऊ शकतो त्याचे काय? असा विचार प्रतिसादकर्त्याचा कोमल मनास का शिवला नाही?

म्हणजे नास्तिकांची लग्न वेळेवर होत नाहीत किंवा टिकत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं नसेल आशा करतो ;)