लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 6:03 pm

माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये.

२८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची

लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय.
त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी.

1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या...

आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य?

२) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे.
ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला?

अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे.

काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय...

साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव?

असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......

मांडणीविचार

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

17 Oct 2016 - 6:08 pm | आदूबाळ

हजार.

माझीही शॅम्पेन's picture

17 Oct 2016 - 6:23 pm | माझीही शॅम्पेन

सगळा दारुगोळा अगोदरच दुसर्या धाग्यावर ओतला गेला आहे शक्यता कमी आहे :)

माम्लेदारचा पन्खा's picture

17 Oct 2016 - 6:09 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्हाला भरपूर कच्चा माल मिळणार ...पोतं घेऊन तयार रहा...

सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे.

अभिनंदन. पुत्रजन्माबद्दल.

ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय...

फ्रस्टेटेड मिपाकरांना घेवून जावा... ;)

प्रसाद_१९८२'s picture

17 Oct 2016 - 6:29 pm | प्रसाद_१९८२

यात मजेशीर काय आहे ?

कपिलमुनी's picture

17 Oct 2016 - 6:57 pm | कपिलमुनी

कित्ती चांगला आहे तुमचा मित्र !
माझे निर्लज्ज , हलकट मित्र कितीतरी पोरींनी हाकलल्यानंतरसुद्धा बसायला बोलवत नाहीत.
एक ठाणेकर मित्र तर पुणे ते लंडन व्हाया थायलंड नकारघंटा घेउन आलाय पण बसायचे नाव घेइना !

माम्लेदारचा पन्खा's picture

17 Oct 2016 - 9:14 pm | माम्लेदारचा पन्खा

आमालाबी कळूंद्या...

खटपट्या's picture

17 Oct 2016 - 9:28 pm | खटपट्या

नाव सांगा, घेउन येतो त्याला.

लोकं पत्ते काय मागतात... नावं काय विचारतात..

छ्या...

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 9:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

जा पण बुलेटवर जाऊ नका, मित्र कोलून लावेल!
=)) =))

नाखु's picture

18 Oct 2016 - 9:36 am | नाखु

त्या घेतलेल्या पत्यांचे पुढे काय करतात ते कळेना.

आम्च्या कॅटमधून घेतलेल्या किलवर छक्का आणि बदाम गुलामचे काम झाले असेल तर परत देणे .

अखिल मिपा उगा पत्ते नका मागू आणि फुका नावे नका सांगू या संघटनेचा सक्रिय सभासदांकडून मिपा कट्टाहितार्थ जारी

विशुमित's picture

18 Oct 2016 - 5:47 pm | विशुमित

काही लोक तर बळेच दुसऱ्या बिचाऱ्याचा पत्ता देऊ का म्हणतात त्याला न विचारता..

अनिरुद्ध.वैद्य's picture

18 Oct 2016 - 9:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

पण थायलंडमध्येही नकारघंटा? कठीणे.
आपणच घेउन बसायला हव अशावेळी.

चित्रगुप्त's picture

17 Oct 2016 - 7:11 pm | चित्रगुप्त

त्याच्या छातीवर केस आहेत ना ? मिळेल मग मुलगी. (कुणीतरी दुवा द्या रे आधीच्या धाग्याचा).

पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो,

हेच नको असेल पोरिंना.. माझ्या दादासाठी मुली बघत होतो तेव्हा हा अनुभव आलेला. आमचे २ फ्लॅट्स एकत्र आहेत. मुलीला बघायला गेलो तेव्हा मुलीचे वडील सरळ म्हणाले की हां, लग्नानंतर वेगळे करुनच घेऊ.. ओळख पाळख नसताना, पहील्याच भेटीत ते हा निर्णय घेऊन मोकळे झाले. आम्ही हे ऐकुनच चाट पडलो..

विवेकपटाईत's picture

17 Oct 2016 - 8:36 pm | विवेकपटाईत

आपण काय बोलणार, आमच्या (स्वर्गीय) मातोश्रीने अस्मादिकांना न विचारता मुलगी ठरवून टाकली होती. बहुतेक तिला हि विचारले गेले नसावे. अस्मादिक मातृभक्त, एक हि प्रश्न विचारला नाही. होकार / नकार काय प्रकार असतो, याचा अनुभव घ्यायला मिळाला नाही. असो.

इरसाल's picture

17 Oct 2016 - 8:39 pm | इरसाल

मित्राला म्हणावं तिसरी पोरगी बघ !!!!!!

वैभव.पुणे's picture

17 Oct 2016 - 9:25 pm | वैभव.पुणे

मामाची पोरगी नाय का रे!

खटपट्या's picture

17 Oct 2016 - 9:30 pm | खटपट्या

दोन नकारात एवढं निराश होण्यासारखं काये? अजून कीमान एक डझन बघ म्हणाव. काय फरक पडतोय. मागे जे काही झाले ते विसरुन परत तयार रहा.

(हायला मला हा अणुभव नाय मिळाला...:(

महासंग्राम's picture

17 Oct 2016 - 10:03 pm | महासंग्राम

सायबा तुमच्या मित्राच्या दुःखात सहभागी आहे मी ... कधी त्याला म्हणावं घाबरू नको तू एकटा नाहीयेस बसायला.

शंतनु _०३१'s picture

18 Oct 2016 - 10:09 pm | शंतनु _०३१

बैठा कट्टा कधी आहे ते सांगता का ? अशा दुख:द प्रसंगात बसायला आम्हीही येवु

पैसा's picture

17 Oct 2016 - 10:10 pm | पैसा

महाराष्ट्रात स्त्रिया ९२५ प्रति एक हजार पुरुष. तुमच्या मित्राचा नंबर त्या ७५ मधे लागू नये ही सदिच्छा. बाकी मला तर मुलगा बघणे प्रकाराचा अनुभव नाही. कोणाला नकार दिलेला नाही. साहजिकच असली काही कारणे मी सांगू शकणार नाही. इतर अनुभवी लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत पॉपकॉर्न घेऊन फांदी पकडून बसत आहे. आता त्या संस्कृती, भावना, आशा, अपेक्षा, विनोद वगैरे येऊ देत सावकाश.

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर

लग्न न झालेली ७५ मुले वाजपेयी, मोदी, अडवाणी वगैरे बनतात. बाकीचे, ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करतात.

शब्दबम्बाळ's picture

20 Oct 2016 - 1:57 pm | शब्दबम्बाळ

काल पर्वा पर्यंत तरी कलाम सर होते या जोक मध्ये! अडवाणींची एन्ट्री झाली वाटत आता! :D
शतप्रतिशत भाजपा! ;)

अनुप ढेरे's picture

20 Oct 2016 - 2:03 pm | अनुप ढेरे

लालकृष्ण अडवाणींच लग्न झालं आहे.

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 2:20 pm | संदीप डांगे

मोदींचेही

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2016 - 9:09 am | प्रभाकर पेठकर

नांवात काय आहे? असे कोणीतरी म्हणून ठेवले आहेच. (कोणी? ते नांव आठवत नाही) नांवे कोणाचीही लावा ३ शिट्ट्यांचा हिशोब कांही चुकत नाही.

नाही आवडलं तर द्यावा लागणार ना नकार.मग काहीतरी कारणं शोधावी लागतात.म्हणून पत्रिका मागतात लोक! नाही जुळली हे बर्यापैकी मन न दुखवणारे कारण असावे ;)

आदिजोशी's picture

18 Oct 2016 - 1:12 pm | आदिजोशी

आमच्या एका मित्राला घरात कमोड नाही म्हणून नकार मिळालेला आहे :)

वटवट's picture

19 Oct 2016 - 12:53 pm | वटवट

हायला..... कायबी

पाटीलभाऊ's picture

20 Oct 2016 - 2:29 pm | पाटीलभाऊ

लग्नात सासऱ्याकडून कमोड मागायला पाहिजे होता मग :D

असू द्या, नका वाईट वाटून घेऊ. पूर्वी नै का मुलीला गाता येत नाही, स्वयंपाकघरातल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नै म्हणून नकार यायचे तश्यातला प्रकार समजून विसरून जायचं. आता ज्या मुलींना गाता येत असे त्यांनाही असे काय मोठे प्रोत्साहन मिळायचे सासरी? पण आपलं उगीच काहीतरी. स्वयंपाकघरातील प्रश्नाचं उत्तर चुकलं तर आयुष्यभर तसंच राहणारे का? शिकेलच की ती! पण नाही! समदं कसं रेडीमेड पायजे.

गिरिजा देशपांडे's picture

19 Oct 2016 - 11:40 am | गिरिजा देशपांडे

+111

बरखा's picture

20 Oct 2016 - 1:21 pm | बरखा

रेवती यांच्याशी अगदी सहमत. मागील काही काळ असा होता कि मुलं कसलीही शुल्लक कारणं मुलींना देउन नाकारत होते.
त्यावर परत उलट जाब विचारता पण येत नसे. त्या वेळी त्या मुलींची मानसिक स्थिती काय होत असेल?
मुली सुध्धा आता त्यांच्या अपेक्षा स्पष्ट सांगत असतिल तर त्यात नवल का वाटाव?
मुलांनी या गोष्टीचे वाईट वाटून घेउ नये. आज ना उद्या कुणीतरी मिळेलच.

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 2:19 pm | महासंग्राम

अपेक्षा सांगणे वाईट नाहीच, पण त्या काय अवाच्या सव्वा नसाव्यात...

माझ्या एका मित्राला ४ चाकीगाडी, फ्लॅट या बरोबर आई-वडील सोबत रहायला नको अशी अपेक्षा व्यक्त केली. घर, गाडी त्याने सगळं मान्य केलं पण आता त्याच्या आई वडिलांना तो एकटाच मुलगा होता त्यांना कुठे ठेवणार.

तसेही आताचे पालक समंजस झाले आहेत. ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत. आई वडील सोबत नको हि अपेक्षाच चुकीची आहे.

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 2:23 pm | संदीप डांगे

आताचे पालक समंजस झाले आहेत

^^^ असे पालक दुर्मिळ असतात

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 2:32 pm | महासंग्राम

हाहाहा... असतीलही दुर्मिळ पण मग ते सारे दुर्मिळ पालक आमच्या मित्रांचे आईवडील आहेत असं म्हणावं लागेल.

कसला लकीये ना मी ;)

कायम शिंगल मंदार

त्रिवेणी's picture

20 Oct 2016 - 8:57 pm | त्रिवेणी

करेक्ट.

ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत
असं काही नाही. मुलग्यांच्या संसारात त्यांचे आईवडील लक्ष घालतात पण आजकाल मुलींचेही आईवडील यात अ‍ॅडवले आहेत. तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन. मिपाकरीण पिराच्या लाडक्या आहेत त्या! ;)

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 7:28 pm | पिलीयन रायडर

सकाळी सकाळी प्रातःस्मरणीय ताईंची आठवण काढलीस! चला, त्या आनंदात आपल्या डिग्र्या चुलीत घालुन त्यावर इकडच्या स्वारीसाठी भाकर्‍या भाजायला घेऊ!!

रेवती's picture

20 Oct 2016 - 7:35 pm | रेवती

खी खी खी.

धर्मराजमुटके's picture

20 Oct 2016 - 9:16 pm | धर्मराजमुटके

ताई, डिग्र्या चांगल्या भारी आहेत ना ? बीए बीकॉमच्या डिग्र्यांच्या जाळावर भाजलेल्या भाकर्‍या टेस्टी लागत नाहीत म्हणे !

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 9:39 pm | पिलीयन रायडर

डिग्र्या दणदणीत आहेत हो.. अगदी विंजिनेरिंग वगैरेच्या! पण कसंय ना की त्यांना फक्त चुल पेटण्याशी मतलब आहे. तुम्ही शास्त्रज्ञ असा वा प्राध्यापक (का अगदी अंतराळात जाऊन आलेल्या असा..) घरी येऊन नवर्‍यासाठी भाकरी करता आलीच पाहिजे असा सोप्पा नियम आहे. तेव्हा स्वतःला का जाळेनात, भाकर्‍या होण्याशी मतलब!

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 9:41 pm | संदीप डांगे

कोण आहेत ह्या अपूर्ण रॅमतीर्थंकर बाई?

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 9:45 pm | पिलीयन रायडर

https://www.youtube.com/results?search_query=aparna+ramtirthakar+speech

ह्या बाई कोण आहेत नक्की ते मलाही माहिती नाही. सामाजिक कार्यकर्त्या असाव्यात, वकिल आहेत. पण बायकांनी काय करावे आणि काय नाही ह्याबाबत मतं जहाल आहेत. नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने अर्थातच त्या ते सांगत नाहीत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Oct 2016 - 9:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने

अरे वा! सहिये, मी काय म्हणतो ताई आमच्या प्रकरणांस काढून देतो मिपा आयडी, तिला जरा समजावा नवऱ्याने काय करावे ते ठरवायची रीत नसते भारतीय संस्कृतीत म्हणून ! काय सांगू माझा सासुरवास (माझ्यापाशी पदर नाही/नसतो/कधीच नसेल म्हणून नाहीतर आत्ता बोळा तोंडात कोंबून हुंदका काढून दावला असता). ललिता पवारीणीला शरद तळवलकर नवरा मिळणे ह्यालाच कार्मिक न्याय म्हणतात का, असा एक भाबडा प्रश्न मला हल्लीच पडलाय :P :P

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 10:23 pm | पिलीयन रायडर

हीच ती पुरुषांची मुस्काटदाबी!! ह्याच अन्यायाला तोंड फोडतात अपर्णाताई.. उगी उगी.. चला डोळे पुसा!

बापुंसारखा दणकट माणुन तोंडात बोळा कोंबुन हुंदका काढतोय! आमचा पार्वतीच आठवला!! =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Oct 2016 - 10:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

सद्ध्या दणकट बापू टाईम प्लिज घेऊन बसलाय म्हणजे बघा हे आपला पार्वती विग गुडघ्यावर ठेऊन विड्या ओढतोय हो! =)) =))

सुबोध खरे's picture

21 Oct 2016 - 10:07 am | सुबोध खरे

नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने
कोणत्याही बाईला आपल्या नवऱ्याने काय करावे हे "दुसऱ्या" "बाई"ने( किंवा माणसाने सुद्धा पण माणसे दुसऱ्या माणसाला सांगायला जाणार नाहीत) सांगितलेले पटणार नाही.
आणि जरी ते पटण्यासारखे असले तरी ते केवळ "दुसऱ्या बाई"ने सांगितले म्हणून त्यांना मान्य होणार नाही

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2016 - 10:15 am | टवाळ कार्टा

अचूक =))

संदीप डांगे's picture

21 Oct 2016 - 10:22 am | संदीप डांगे

औरतही औरतकी दुष्मन, अजून काय?
दोघींच्या भांडणात तिसऱ्याचा भुगा!

पिलीयन रायडर's picture

22 Oct 2016 - 1:26 am | पिलीयन रायडर

नै तर काय..

पण तरी मिपावर लग्नासाठी मुली आणि त्यांचे नकार ह्यावरचे धागे काही संपत नाहीत.. ;)

पिलीयन रायडर's picture

22 Oct 2016 - 1:25 am | पिलीयन रायडर

बरं आता इतक्यांनी चुकीचा अर्थ लावलाय म्हणुन सांगते..

जितक्या प्रमाणात आपल्याकडे बायकांनी कसे रहावे, काय करावे, काय घालावे इ इ इ इ गोष्टी बोलल्या जातात, त्याच्या १% सुद्धा त्या पुरुषांना सांगितल्या जात नाहीत. बायको म्हणुन कसे असावे हे रामतीर्थकर बाई तास न तास प्रवचन देऊन सांगतात, पण नवर्‍यांनी कसे वागावे ह्या बद्दल अवाक्षरही नसते. सासर आणि माहेर ह्या कन्सेप्ट टेक्निकली पुरुषालाही असतात. लग्न त्याचंही होत असतं. पण अजुनही स्त्रियांना बायको / सुन म्हणुन ठराविक चौकटीत बसवण्याचा अट्टाहास संपत नाही.

तुम्ही सगळे एक बायको आपल्या नवर्‍याला काय बोलते, बोलत नाही ह्यावर बोलताय. मी समाजातला साधारण पद्धतीबद्दल बोलतेय. "बायकांच्या जातीने.." ह्या दोन शब्दांनी सुरु होणारी वाक्य..यु नो..

संदीप डांगे's picture

22 Oct 2016 - 1:41 am | संदीप डांगे

रामतीर्थकर बाई भयाण प्रकरण आहे!

तर, असली प्रवचने ऐकायला उतारवायतल्या बायका मुख्यत्वे जास्त असतात, त्यांना सुख व्हावे असे बोलले कि त्या वक्त्याला भारी मान देतात, सर्व खुश होतात पण घरातल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात.

आमची आत्या देवाच्या गायनाचे कार्यक्रम (मोफत) करते, तिचे एक गाणे आईबापाला विसरू नये, त्यांचा सांभाळ करावा या विषयावर आहे, त्यात मुलाला जाम उपदेश केले आहेत. हे गाणे सुपरहिट आहे, कारण जे लोक हे कार्यक्रम ऐकतात त्यांच्यासाठीच आहे ते! सुनांशी-मुलांशी कसं वागावे ह्याची परखड भाषणे-गाणी केली तर कोण ऐकणार!

समाजाला -ह्यात स्त्रीपुरुष दोन्ही- स्त्रीने टिपिकल वागणे अपेक्षित आहे, चौकटीबाहेर वागले कि संस्कृती बुडेल ना?

बाकी पुरुषकडून अपेक्षाच नसतात असे नाही, वेगळ्या असतात. ज्या अपेक्षा स्त्रीकडून त्याच पुरुषकडून नसतात पण म्हणून पुरुषाचे काही प्रश्नच नाहीत असे समजणे हेही गैर!

पिलीयन रायडर's picture

22 Oct 2016 - 2:06 am | पिलीयन रायडर

पुरुषांचे प्रश्नच नाहीत असं कधी म्हणणंच नव्हतं माझं. त्यांनाही भरपुर स्टिरिओटाईप्सचा सामना करावा लगतो जसे की कमावलेच पाहिजे, रडता कामा नये, अमुक-तमुक केले की बायकी इ इ.

फक्त त्यांना हे इतक्या प्रमाणात ऐकवले जात नाही. शिवाय संस्कृती पासुन ते खनदान की इज्जत असं खुप काही बायकांच्या मागे लावुन दिलंय.

पुरुषांना प्रश्नच नाहीत असं म्हणायचं नाहीचे.. पण बायकांचे प्रश्न बरेच जास्त आणि गंभीर आहेत हे तरी मान्य असायला हरकत नसावी. (मी सास बहु ड्रामाच्याही पलीकडे जाऊन असणारे प्रश्न म्हणतेय.. लग्न आणि त्यातल्या वैतगावाडी भानगडी स्त्री असो वा पुरुष.. कुणालाही चुकत नाहीत.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Oct 2016 - 9:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमची जुन्या अमदानीतली आजी आठवली (आईची आई) अस्सल ग्रामीण म्हातारी! आमच्या वाईफला पहिल्यांदा भेटली तेव्हा पहिला प्रश्न
"भाकरी करायला येते का?"
आमचं प्रकरण हो म्हणताच आईला म्हणाली
"बरी सून शोधलीस गो आक्के राजस्थान भाकरी पण बडवती म्हणजे आक्रीतच आहे"
आमचं प्रकरण फ्लॅट!

महासंग्राम's picture

21 Oct 2016 - 9:38 am | महासंग्राम

तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन.

नको नको एकदाच पहिले होते या आजीचे व्हिडीओज परत पाहणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली . बादवे ठाण्याला असतात ना या आजी

शंतनु _०३१'s picture

18 Oct 2016 - 10:01 pm | शंतनु _०३१

बसल्यावर काय काय घेतलं ते पण सांगा

बाजीप्रभू's picture

19 Oct 2016 - 11:47 am | बाजीप्रभू

पौर्णिमेच्या रात्री घेऊन या तुमच्या मित्राला. एक तावीज देईन बांधायला. मुलगीच काय मुलीची आईसुद्धा तयार होईल लग्नाला.
इति,
तंत्र मंत्र सम्राट, काले इल्म और सिफली इल्म के माहिर,
बाबा अकबर खान थायलंडवाले.

सतिश पाटील's picture

19 Oct 2016 - 12:58 pm | सतिश पाटील

त्याच्याच चुलत भावाचा हा किस्सा ...

शिकलेला शेतकरी, नगर जिल्ह्यात एक मालकीची ईमारत एल आय सि ला भाड्याने दिलेली, थोडक्यात नोकरीची गरज न्हावतीच, परंतु मुलींची अपेक्षा याला नोकरी असयाला पाहिजे होती तर पसंत केला असता.

शेवटी बापाने १३ लाख भरून नगरच्या प्रसिद्ध अश्या मामांच्या ब्यांकेत " चिटकवले".
पोस्टिंग पनवेल.१४ हजार रुपये पगार घेतो, शेवटच्या ज्या मुलीने नोकरी नाही म्हणून नाकारले होते, तिनेच त्याच्याशी लग्न केले. मुलगी घरीच असते.
सास्रयाने राहण्यासाठी 1 RK फ्ल्याट दिलाय स्वतःचा.

शेती संभाळनारा मुलगा शहरात गेल्याने, बापाने २ गडी कामाला ठेवले शेतात पगारावर !!!!!

पाटीलभाऊ's picture

20 Oct 2016 - 2:12 pm | पाटीलभाऊ

नकाराची कारणे काहीही असोत हो...कोणी होकार कसा मिळवावा यावर उपाय सांगा कि राव...!

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 2:21 pm | संदीप डांगे

होकार मिळवू शकणारांचे प्रेमविवाह होतात... ;)

पाटीलभाऊ's picture

20 Oct 2016 - 2:32 pm | पाटीलभाऊ

अच्छा म्हणजे आमच्यासारख्या गरिबांना कोणीच वाली नाही. :(

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 2:34 pm | महासंग्राम

अण्णा, पाटील भाऊ तेच म्हनायले तुम्ही उपाय सांगा कि राव...! ते लगेच पिरेमइवाह करतील

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 2:39 pm | संदीप डांगे

प्यार किया नही जाता, हो जाता है

केल्यावर निभावायची हिम्मत असेल तर नकाराची भीती नाही

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 2:44 pm | महासंग्राम

हांग असशी बरुबर सांगितलात....

पाटीलभाऊ's picture

20 Oct 2016 - 2:47 pm | पाटीलभाऊ

प्यार किया नही जाता, हो जाता है

अहो त्याचीच वाट बघत होतो इतकी वर्ष...पण कसलं काय.. :(

अजून एकटा,
पाटील

शब्दबम्बाळ's picture

20 Oct 2016 - 3:13 pm | शब्दबम्बाळ

आधी होकार देण्यासाठी कोणीतरी शोधा!
शोधली असेल तर आमच्या अति आवडत्या चित्रपटात (रांझना) मुरारी ने सांगितलेल्या स्टेप्स वापरून बघा! ;)
लडकी का सुबह शाम पीछा करो! घर के बाहर, स्कुल के बाहर, सडक पे, सायकल पे, टेम्पो मे, रिक्षा मे, रो दो, खाना खाना छोड दो, वजन घटा दो... और लडकी को इतना थका दो के लडकी थक के हा बोल दे! :P

सतिश पाटील's picture

20 Oct 2016 - 3:17 pm | सतिश पाटील

एवढी डेरिंग नाही त्याच्यात...

पाटीलभाऊ's picture

20 Oct 2016 - 3:22 pm | पाटीलभाऊ

च्या मारी...एवढं सगळं करावं लागेल तर...!
जाऊ द्या मग...बरं चाललंय आमचं...
एकटा जीव सदाशिव :P

मराठी कथालेखक's picture

20 Oct 2016 - 4:27 pm | मराठी कथालेखक

एकटा जीव सदाशिव

आणि 'आपला हात जगन्नाथ' :)

मराठी कथालेखक's picture

20 Oct 2016 - 2:35 pm | मराठी कथालेखक

लग्नाबद्दल अपेक्षा /निकष काहीही असू शकतात, हरकत नाही. पण आपल्या निकषांत समोरची व्यक्ती बसत नाही हे आधीच माहित असताना विनाकारण 'वधू/वर परि़क्षण' करण्यात वेळ वाया घालू नये आणि समोरच्याला मानसिक त्रासही देवू नये उदा: वर लेखकाने सांगितलेला पहिला नकार. मुलाला सरकारी नोकरी नाही हे आधीच माहित होते ना, मग आलेत कशाला बघायला ?

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2016 - 2:59 pm | प्रकाश घाटपांडे

अजून नाडी जुळत नाही हे यायच आहे वाटत!

सतिश पाटील's picture

20 Oct 2016 - 3:18 pm | सतिश पाटील

कसली नाडी ??

स्मिता.'s picture

20 Oct 2016 - 3:32 pm | स्मिता.

अय्या, अजून दोनच मुलींकडून नकार आला आणि एवढं नैराश्य आलं!! किमान डझनभर नकारांनंतर हा लेख वाजवी होता.

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 3:46 pm | संदीप डांगे

असतात हो काही लोक स्वतःला ग्रेट समजणारे, दोन नवीन लेखांना नकारात्मक प्रतिसाद मिळाले तर मिपावर लिहणे सोडणारे,

सतिश पाटील's picture

20 Oct 2016 - 4:56 pm | सतिश पाटील

तरीच म्हटले अजुन लाल डांगे आले कसे नाहीत या धाग्यावर.

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 9:11 pm | संदीप डांगे

उगी उगी हां,

यायला नको होते का? त्रास झाल्याबद्दल क्षमस्व!

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 7:26 pm | पिलीयन रायडर

नै तर काय.. तिकडे लोक वर्षानुवर्ष किल्ला लढवत आहेत. आणि हे पंधरा मिनिटात थकले.. काय राव!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Oct 2016 - 7:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे थोर आहे हो! :D

ट्रेड मार्क's picture

20 Oct 2016 - 7:59 pm | ट्रेड मार्क

ही मुलाने नकार दिलेली दोन्ही माझ्या नजरेसमोर घडलेली उदाहरणे .

माझ्या एका मित्राला परीसारखी बायको पाहिजे होती. आम्ही त्याला किती समजावले की अरे आधी स्वतःकडे बघ. म्हणजे तो काही वाईट नव्हता दिसायला पण गंधर्व किंवा गेलाबाजार राजबिंडा म्हणावा असा पण नव्हता. परीच्या नादात त्याने कितीतरी चांगल्या मुलींना नकार दिला. शेवटी वयाच्या ४० नंतर त्याला शोभेश्या मुलीशी लग्न झाले. गमतीची गोष्ट म्हणजे ती त्याच्या घरापासून ३ किमी वर रहात होती.

अजून एकाचे आईवडील भयंकर संशयी. गुजरातमध्ये स्थायिक असलेले मराठी कुटुंब आणि एकुलता एक मुलगा. संपूर्ण गुजरात, मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या मुली बघून झाल्या. नकाराची काही मजेशीर कारणे, अर्थात वेगवेगळ्या मुलींसाठी -
१. मुलगी येताना scooty वरून गॉगल लावून आली - मग ती फॅशनेबल वाटतेय.
२. कारखानदार वडिलांची एकुलती एक मुलगी - लग्नानंतर घरजावई करून घेतलं तर
३. कार चालवता येते असं मुलीने सांगितलं - लग्नानंतर तिने कार पाहिजे म्हणून हट्ट धरला तर
४. बाकी सगळं ठीक होतं (मुलगी आवडली पण होती) - पण मग अजून तिचं लग्न का बरं झालं नसेल. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि ते सांगत नाहीयेत. हे संभाषण माझ्या समोर चालू होतं तर मी नकळत म्हणलं सुद्धा की या न्यायाने याचे पण अजूनपर्यंत लग्न झालं नाहीये त्याचं काय?

अशी काही मजेशीर तर काही विचित्र कारणे. शेवटी याचे पण लग्न ४० नंतर घरापासून २ गल्ल्या सोडून राहणाऱ्या मुलीबरोबर झालं.

४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या टीम मधला एक मुलगा MPSC ची तयारी करत होता. मी विचारलं त्याला की तुला चांगल्या बहुद्देशीय IT कंपनीमध्ये नोकरी आहे, चांगला पगार आहे, पुढे मागे परदेशी जायला मिळेल मग एकदम सरकारी नोकरीच्या मागे का लागलास?

तो म्हणाला आजकाल मुली IT वाले नको म्हणतात. कामाचे अनिश्चित तास, प्रोजेक्टचे टेन्शन, कंपनी कधी कुठे पाठवेल सांगता येत नाही. त्यापेक्षा सरकारी नोकरी बरी. ९-५ ऑफिसला जायचं त्यात काम केलं तर केलं नाहीतर नाही. ६व्या वेतन आयोगामुळे पगारही IT च्या तोडीसतोड आहेत आणि वरकमाईचे मिळतील ते वेगळेच. सरकारी घर मिळायची पण शक्यता असते. त्यामुळे म्हणे मुली आजकाल IT वाला मुलगा असेल तर आधीच नकार देतात.

रेवती's picture

20 Oct 2016 - 8:41 pm | रेवती

पूर्वी रोहिणी की अश्याच कोणत्यातरी वधुवर मासिकात अपेक्षा असायच्या. आमच्या राजकन्येला शोभेसा राजपुत्र हवा जो तिला प्रेमाच्या पंखांवर बसवून परदेशी नेईल. किंवा मग आमच्या ज्येष्ठ राजकुमाराला अमक्या तमक्या विवाहमंडलाने स्वप्नांची राणी मिळवून दिलीये तश्याच अपेक्षेने कनिष्ठ राजकुमाराला एखादी राजकुमारी मिळावी म्हणून पुन्हा येथे आलोय. जिच्या हसण्याने आमची मंगलप्रभात होईल वगैरे वगैरे. अश्या जाहिराती देऊन किंवा वाचून ज्यांची लग्ने झालियेत ते आता काय करत असतील असे एकदा मनात आले होते.

सुबोध खरे's picture

20 Oct 2016 - 8:47 pm | सुबोध खरे

ओ ताई
त्या रोहिणी मासिकाला नावं ठेवायचं काम नाही. आमचं लग्न पण त्यातूनच झालेलं आहे आणि २४ वर्षं झाली. मागच्या वर्षी तोच हनिमून परत रिपीट करूनही झाला. आता या वर्षी सिमल्याला जातोय.
हि पहा झैरात http://www.misalpav.com/node/33431

मासिकाला नावं ठेवत नाहिये पण स्थळाची माहिती देताना जे लिहितात ते पाहून मजा वाटायची. तुमच्या लग्नावेळीही स्थळाचे वर्णन असेच केले होते काय? ही चेष्टा म्हणून विचारत नाहीये.
सिमल्याची जाहिरात आवडलीच. लग्नाच्या पंचविसाव्या वादीला लोक आवर्जून न ऐकलेल्या, वेगळ्या ठिकाणी जातात. तुम्ही कुठे जाणार आहात?

सुबोध खरे's picture

20 Oct 2016 - 9:24 pm | सुबोध खरे

झैरात मागच्या वर्षी कुणूरला गेलो होतो त्याची होती
सिमल्याला आता जाणार आहे.
आणि पंचविसाव्या वाढदिवसाचे अजून ठरवलेले नाही.
महाबळेश्वर पासून स्वित्झर्लंड पर्यंत कुठेही. तेंव्हा खिशाकडे पाहून

होय. लिहायचं राहिलं. स्वारी.

त्रिवेणी's picture

20 Oct 2016 - 9:03 pm | त्रिवेणी

मला विचार न. आमचे हे पण तिथलच फाईंडिंग.

रेवती's picture

20 Oct 2016 - 10:11 pm | रेवती

हां, मग सांग, त्यांनी जाहिरातीत आमचा राजकुमार, त्याची राणी असं लिहिलं होतं का?

अभिजीत अवलिया's picture

20 Oct 2016 - 8:41 pm | अभिजीत अवलिया

ह्या प्रचंड ब्रह्माण्डात योग्य वेळी जन्म झाला, जवळ स्वतः:चे घर, गाडी, स्मार्टफोन सुद्धा नसताना (घर अजून देखील नाही) देखील लग्न झाले आणी योग्य वेळी निरोप घेईन ह्याबद्दल भाग्यवान समजावे का मी आता स्वतःला ?