दरवाजा हो तो ऐसा हो!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
5 Oct 2016 - 6:13 pm

साने गुरुजींच्या "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" च्या धर्तीवर "मिपाला पोस्ट अर्पावे" या हेतूने पोटावरती हि एक पोस्ट. डोन्टवरी! यात कुठलेही डायट सल्ले नाहीत, व्रत-वैकल्ले नाही, उपास-तापास नाहीत कि लोखंड उचलायचे प्रकार नाहीत. आहे ते एका "पोटिव्हेशन" बद्दल आयमीन "मोटिव्हेशन" बद्दल.

"पोट" हे श्रीमंतीचे लक्षण असतं हे आजोबांचं वाक्य तर चिकन-मटण खाल्यानंतर कमीत कमी दोन तास झोपलं नाही तर माणूस "नरकात" जातो हे बाबांचं वाक्य. आता असे उपदेश ऐकत मोठा झालेला, कायम तांबडे रस्से आणि जोडीला शंकराच्या पिंडी प्रमाणे अभिषेक होत असलेल्या तुपाच्या धारेवर वाढलेला हा देह काय आकारमानाचा असेल? समुद्रात दुरुन येणाऱ्या बोटीचं 'शीड' प्रथम दिसतं आणि मी घरात येतांना प्रथम पोट आत येतं अशी कमेंट कन्या करते म्हणजे या देहाच्या पोटाचा घेर किती असेल? याची मिपाकरांना कल्पना आलीच असेल.

मागे आपल्या डॉ. सुबोध खरेंच्या एका "दुष्ट" लेखात वाचलं कि "आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे पोट ८६ सेमी (३३.८५ इंच) पेक्षा कमी हवे. हे पोट मोजण्याचे ठिकाण म्हणजे सरळ उभे राहिल्यावर पोटाचा जास्तीतजास्त घेर मोजणे”. आता बसक्या पोटुश्या दूदीला वरून पाहिलं तर जसं दिसेल तद्वतच आपला घेर, त्यामुळे अशी श्रीमंती मोजणारी फुटपट्टी कधी विकतच घेतली नाही. वजन काट्यावर उभा राहिलो तर इक्विपमेंट माल फंक्शन होऊन 'एकावेळी एकानेच उभं राहावं" असं तिकटहि एकदा आलं होतं. लग्न स्थानात गुरु-चंद्र, चतुर्थ स्थानात तुळेचा शनि आणि सप्तम स्थानात मकर राशीचा मंगळ नसल्यामुळे पोट कमी होण्यासाठी "मोटिव्हेशन" हा एकचं उपाय तुम्हाला शोधावा लागेल असं एका ज्योतिषाने सुचवलं.

काय मिस्टर डिलिव्हरी कधी? या प्रश्नांनी मागे एक-दोनदा ओशाळून जाऊन पोट कमी करायचे फेल्ड अटेंप्ट केले होते पण फेविकॉलच्या "पकडे रेहना, छोडना नाही" सारखं एखादं मोटिव्हेशन काही केल्या सापडत नव्हतं. मग एकदा शाहरुख खान ब्यँss ब्यँss करत स्वप्नांत सांगून गेला कि "अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती हय।" आणि झालंही तसंच. थायलंडच्या पटायामधील नवीन घराचा ताबा ६-७ महिन्यांपूर्वी मिळाला आणि पोटाचा घेर कमी व्हायच्या स्टोरीला सुरवात झाली.

नमनाला हे असं घडाभर तेल ओतल्यावर थेट मोटिव्हेशनच्या मुद्दय़ाला हात घालतो. माझं मोटिव्हेशन आहे "एक दरवाजा!!"..... खरं सांगा उडालात ना?, वाटलं ना आश्चर्य? आता बसा सावरून जरा आणि वाचा पुढे,

माझ्या फ्लॅटचा दरवाजा अंगठ्याच्या ठश्याने उघडतो किंवा चावीने. लहानपणापासूनच 'उंगली' करायची आवड असल्याने चावी बाळगण्याचा प्रश्नच नाही. मात्र अपार्टमेंटच्या रिसेप्शन जवळच्या माझ्या विंगच्या एंट्रीसाठी इलेक्ट्रॉनिक "कार्ड-कि" लागते. एंट्रीसाठीहि आणि एक्सिट साठीही. हि नसेल तर पंचाईत. आयदर अपार्टमेंटमधून कोणी येणाऱ्याची नाहीतर दुसरा कुणी शिरणाऱ्याची वाट पहात रिसेप्शनमधे बसावं लागतं. वेळेला जागेवर नसणारे वॉचमन इथेही आहेत. हा झाला एक भाग आणी दुसरा भाग आमच्या दैवी स्मरण शक्तीचा. हमखास हरवेल अश्या ठिकाणी महत्वाच्या वस्तू ठेवायच्या जागा शोधणं हा आमचा पिढीजात व्यवसाय. नाही म्हणायला ऑफिसच्या बॅगेच्या चोरकप्यात एक कार्ड ठेऊन दिलेलं असल्यामुळे ऍटलीस्ट ऑफिसला जातांना वेटिंगची नामुष्की होत नाही. नामुष्की ओढवते ती इतरवेळी, पण परमेश्वर दयाळू आहे माझ्या बाबतीत. आमच्या अपार्टमेंटने एंट्रीसाठी एक 'उपशाप' दिलेला आहे.
Reception

Door

फोटो निरखून पाहिलात तर एंट्रीच्या दरवाजाचे दोन भाग आहेत. एका भागाची रुंदी मोठी आणि दुसरा जेमतेम दोन वितीपेक्षाही कमी रुंदीचा आहे. हा जो कमी रुंदीचा दरवाजा, नेहमीपेक्षा जास्त जोर लावला कि विदाऊट "कार्ड-कि" उघडतो.... का उघडतो? त्याची कारणं खूप वेगळी आहेत पण माझ्या सारख्यांसाठी तो खुष्कीचा मार्ग आहे. इलेक्ट्रॉनिक "कार्ड-कि" विसरलो कि जोर लावून हा दरवाजा उघडायचा आणि मारायची एंट्री नाहीतर एक्सिट. आता इकडे मुख्य अडचण होते ती पोटाची. पंक्चर काढणारा मेकॅनिक कसा ट्यूबचा उरलेला भाग कटवणी घेऊन व्हीलच्या आत भरतो, मोर ऑर लेस तसंच काहीसं करत मला पोट त्या दरवाजातून बाहेर काढण्यासाठी करावं लागतं.

दोनवेळा शर्टाची बटणंहि शाहिस्ते खानच्या वाटेने गेली. कि-कार्डच्या आठवणीसाठी मोबाईलमधे लावलेले अलार्म हटकून दरवाज्याजवळ वाजायचे. शर्टा ऐवजी टि-शर्ट घालायला सुरवात केली, घासून घासून त्याचेही दोरे निघायला लागले. नवीन कार्ड घेऊन-घेऊन बँक करप्ट व्हायची वेळ आली. "भूल न जाना ECE बल्ब लाना... बा बा बा बा बल्ब" च्या चालीवर शेजारीही कार्ड घेतलं का? म्हणून टोमणे मारायला लागले.

अश्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीने दुःखी-कष्टी झालेला मी, एकदा आरशात पोटावरचे ओरखडे मोजत असतांना एक द्रुष्टांत मिळाला. सारे फसाद कि जड असलेले हे पोटच कमी केलं तर? युरेका युरेका!! सारखं वाटून हर्षोल्साने मूठभर मांस अजून चढू नये म्हणून तोही मोह टाळला. आरशासमोर परत उभा राहून उजळणी करून घेतली. आर यु शुअर? अख्या खानदानामधे असा विचार कोणी केलेला नाहीये. आर यु शुअर?... येस एम शुअर!! पोटावरील ओरखड्यातील रक्ताने कपाळावर टिळाहि लावला, नजर कॅलेंडरवर फिरवली. तारीख होती १ एप्रिल.

हि! हि! हि! पण थांबा!!. एप्रिल फुल नाहीये हे. तो फक्त योगा योग होता. निश्चयाचा महामेरू माझा ऑलरेडी झाला होता. एक तो दिवस आणि आजचा दिवस. पोटाचा घेर आता इंच इंच कमी होतोय. कार्ड अजूनही विसरतो, आयडीला साजेशी खिंड आजही लढवतो पण पोटावरच्या ओरखड्यांची संख्या आता कमी झाली आहे. कसं केलं काय केलं यासाठी बरंच मटेरियल मिपावर सापडेल. मिपाकरांचा आशीर्वाद पाठीशी असेल तर लवकरच त्या वितभर दरवाजातून(खिंडीतून) माश्यासारखं सुळकन जायचं स्वप्न पूर्ण होईल.

जीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

शलभ's picture

5 Oct 2016 - 6:36 pm | शलभ

मस्त लिहीलय..

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 10:30 am | बाजीप्रभू

धन्यवाद!!

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 3:29 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!!

नावातकायआहे's picture

5 Oct 2016 - 6:36 pm | नावातकायआहे

मी पहिला...

छोटा दरवाजा मोठा करुन घ्यायचा ना..
आजोबा वडिलांचे सल्ले फुकट गेले... :-))

बाकी प्रवेश द्वार चान चान

सामान्य वाचक's picture

5 Oct 2016 - 6:43 pm | सामान्य वाचक

भारी लिवलंय

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 3:30 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!!

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:05 am | बाजीप्रभू

धन्यवाद!!

आदूबाळ's picture

5 Oct 2016 - 10:12 pm | आदूबाळ

मस्त लिहिलंय!

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 2:00 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:05 am | बाजीप्रभू

धन्यवाद!!

एस's picture

5 Oct 2016 - 10:29 pm | एस

आशीर्वाद असो! ;-)

यशोधरा's picture

5 Oct 2016 - 10:31 pm | यशोधरा

झकास लिहिलंय!

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 3:30 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!!

रातराणी's picture

5 Oct 2016 - 11:06 pm | रातराणी

हा हा खुसखुशीत :)

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:05 am | बाजीप्रभू

धन्यवाद!!

पोटासाठी शुभेच्छा !! बाकी छान लीहीलेय...

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:05 am | बाजीप्रभू

धन्यवाद!!

जयन्त बा शिम्पि's picture

6 Oct 2016 - 7:46 am | जयन्त बा शिम्पि

पोटाचा घेर कमी कमी होत आहे या आनंदाच्या भरात फोटो टाकायचं विसरलात की काय ? जमले तर टाका नाहीतर जाहिरातीत दाखवितात त्याप्रमाणे before आणि After असे पोटाचेच दोन फोटो टाका ! !

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 8:15 am | बाजीप्रभू

हा हा! बिफोर-आफ्टर साठी थोडा थांबीन म्हणतो.

मेन पोस्ट मधील फोटो कालपर्यंत दिसत होते.. अदृश्य कसे झाले कल्पना नाही म्हणून परत डकवतोय,
Entrance
Door

कंजूस's picture

6 Oct 2016 - 8:16 am | कंजूस

मज्जेदार!!
ढेरपोट्यांना सूटकोट चांगला दिसतो.

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:06 am | बाजीप्रभू

धन्यवाद!!...वेशभूषा नोटेड.

नाखु's picture

6 Oct 2016 - 10:38 am | नाखु

अता तुम्ही दिंडी (दरवाजा) लढवताय. बरोबर सोबत एका व्यक्तीला (अर्थात सूळ्ळकन) घेऊन जाऊ शकाल इतके मेदविरहीत व्हा हीच शुभेच्छा.

चालण्यालाच टोलवणारा
प्रयत्न्शील नाखु

हर्मायनी's picture

6 Oct 2016 - 10:42 am | हर्मायनी

पोट कमी करण्यासाठी शुभेच्छा!

हा लेख वाचून मला पुलंच्या 'उपास' लेखाची आठवण झाली..

जाताजाता.. तुमच्या अपार्टमेंट चा इंटिरियर भारी आहे.. आवडलं!

खेडूत's picture

6 Oct 2016 - 11:18 am | खेडूत

आवडले..
क्रमशः लिहून पुढे चालू करा! :)

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:06 am | बाजीप्रभू

धन्यवाद!!.. नक्की नक्की.

सुबोध खरे's picture

6 Oct 2016 - 11:36 am | सुबोध खरे

पोट कमी झाल्याचा अजून एक फायदा म्हणजे जुन्या मित्रांना उदरा --उदरी भेटण्याऐवजी खरोखर उरा-उरी भेटता येते.
बाकी लेख फार सुरेख आहे. अजून येऊ द्या.

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 12:31 pm | बाजीप्रभू

धन्यवाद! डॉक्टर. इनफॅक्ट पोट कमी करण्यासाठी तुम्हीच लिहिलेले लेख पालथे घातलेत... मस्त माहिती दिलीत तुम्ही. डिसेंबर पर्यंत टार्गेट पूर्ण झालं तर एक "पेढ्याचा बॉक्स" घेऊन येणार आहे तुमच्यासाठी.

संजय पाटिल's picture

6 Oct 2016 - 11:39 am | संजय पाटिल

हा हा हा मजेशिर..

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:07 am | बाजीप्रभू

धन्यवाद!! पाटील साहेब.

पद्मावति's picture

6 Oct 2016 - 2:19 pm | पद्मावति

मस्तं लिहिलंय :)

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:07 am | बाजीप्रभू

धन्यवाद!! पद्माताई.

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2016 - 2:47 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत लिहिलय,
स्वाती

पाटीलभाऊ's picture

6 Oct 2016 - 2:56 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय... :)

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 11:08 am | बाजीप्रभू

धन्यवाद!! पाटीलभौ

मदनबाण's picture

6 Oct 2016 - 3:05 pm | मदनबाण

थायलंडच्या पटायामधील नवीन घराचा ताबा ६-७ महिन्यांपूर्वी मिळाला आणि पोटाचा घेर कमी व्हायच्या स्टोरीला सुरवात झाली.
च्यामारी मलापण आता माझ्या पोटाचा तंबोरा कमी करण्यासाठी पटया मधे घर घ्यावे लागणार तर ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

हा तेच म्हणत होतो, हिथ भारतात राहील्यान आमच पोट कमी हुईना झालय.

जयन्त बा शिम्पि's picture

7 Oct 2016 - 7:48 am | जयन्त बा शिम्पि

आत्ता समजले फोटो पाहुन .लगे रहो. धन्यवाद.