सगळं कस साधं सोप्प

अबोली२१५'s picture
अबोली२१५ in जे न देखे रवी...
30 Sep 2016 - 12:49 pm

सगळं कस साधं सोप्प
एक घर, एक गाडी
आई बाबा आहेत ना फ्रेम मध्ये
एक मुलगी पण मुलगा पाहिजेच
आणि बायको अन मी...
सगळं कस साधं सोप्प
बॉस तिरका असला तरी
आपलं डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर
मग काय प्रमोशन आपलच
सगळं कस साधं सोप्प
गाडीतून भुर्र जाव
गाडीतला AC खाऊन गार व्हावं
भिकाऱ्याने काचेवर टुक - टुक केलं का
तोंड वाकड करून १ रु फेकावा
सगळं कस साधं सोप्प
च्याआईला असं का होतंय
आतून आतून काहीतरी खाताय
असं कस होतंय, जीव का घुसमतोय
दोन दिवसाची सुट्टी घ्यावी
सगळं कस साधं सोप्प
सुचत नाहीय, सगळं का साधं आणि सोप्पं
काहीतरी सुटतंय, सांगता येत नाहीय
आणि सापडतच नाहीय
काय सापडायच
सगळं कस साधं सोप्प
का बघतोय असा तो
वारा संथच का वाहतोय
भे*** हातातला ग्लास पण संपत नाहीय
किती रिचवितोय, कुठे जातोय
सगळं कस साधं सोप्प
किती दिवस असाच पडून आहे
समुद्र आठवतोय, किती अंधार झालाय
वाल्या कोळाची गोष्ट आताच का आठवतेय
गार झालाय, ऊब हवीय
सगळं कस साधं सोप्प
साधं सोप्प तर होत सार
मग झोपेच्या गोळ्याची काय गरज होती.....
आता आई, बाबा मी फ्रेममध्ये
सगळं कस साधं…..
-अबोली

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

राजेंद्र देवी's picture

30 Sep 2016 - 3:37 pm | राजेंद्र देवी

आवडली...साधं सोप्प