देह / अवयव दान - काळाची गरज

क्रेझी's picture
क्रेझी in जनातलं, मनातलं
31 Aug 2016 - 8:31 am

कालच्या टाईम्स ऑफ इंडिया पेपरमधे मी ऑनलाईन ऑर्गन डोनेशन बद्दल वाचलं.

खाली दोन साईट्स दिल्या आहेत जिथे जाऊन हे करता येईल
www.dmer.org
www.ztccmumbai.org

काही विचारपूस करावयाची असल्यास हेल्पलाईन नंबर्स
helpline numbers: 1800274744, 1800114770

मला ह्याबाबतीत बरंच कुतुहल आहे.

मला माझे डोळे दान करायची इच्छा आहे पण मला चष्मा आहे तरी मी डोळे दान करू शकेन का?
मध्यंतरी मी एके ठिकाणी वाचलं की, माणसाच्या शरिरातला प्रत्येक अवयव म्हणजे हृदय सुद्धा नविन पेशींनी तयार होतं, त्याला बराच काळ लागतो. पण डोळे हा एकच अवयव असा आहे की जो जन्मल्यापासून मरेपर्यंत आहे तसाच, त्याच पेशींनी बनलेला असतो. मग डोळे दान करतात तेंव्हा नविन व्यक्तीला नेमका कोणता भाग दिला जातो डोळ्यातला?

माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दोनही किडन्या निकामी झाल्या होत्या, तिच्या मावशीची किडनी मॅच झाली आणि ट्रान्सप्लांट
केलं गेलं पण जेमतेम एक महिना झाला असेल, मैत्रिणीच्या आईला देण्यात आलेल्या किडनीमधे जबरदस्त इन्फेक्शन झालं आणि केस एकदम सिरीयस झाली त्यांची. मग परत डायलिसीस आणि बरंच काही केल्यावर नविन किडनी शरिरात
स्थिर झाली.

पण, असं बाकीच्या अवयवांबाबतीत होऊ शकतं का? डोळ्यांच्या बाबतीत झालं तर काय पर्याय असतात?

बाकी अवयवांमधे आत्तापर्यंत हृदय आणि किडनी ट्रान्सप्लांट बद्दल वाचलं, बघितलं आहे पण मेंदू चा कुठला भागही ट्रान्सप्लांट केला जातो का? अशा केसेस पुढे नॉर्मल आयुष्य जगू शकतात का?

तुमच्यापैकी कोणी असा डोनर-रिसिपियन्ट आहे का? तुमचे ह्याबाबतीतले अनुभव काय आहेत?

मांडणीप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्रसन्न३००१'s picture

31 Aug 2016 - 10:20 am | प्रसन्न३००१

मला वाटलं कि काहीतरी गूढ, अगम्य आणि अगाध वाचायला मिळेल बट एनिवेज

अवयव दानाबद्दल मला सुद्धा उत्सुकता आहे, मधुमेह असलेल्या व्यक्ती अवयव-दान करू शकतात का ? जाणकारांनी कृपया खुलासा करावा

सामान्य वाचक's picture

31 Aug 2016 - 10:59 am | सामान्य वाचक

Cancer च्या रोग्यांचे अवयवदान चालत नाही

त्यांनी केलेच, तर ते फक्त अभ्यासासाठी वापरता येते

प्रसन्न३००१'s picture

31 Aug 2016 - 3:16 pm | प्रसन्न३००१

धन्यवाद :)

मधुमेह असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत, असं म्हणतात. अवयव-दानाबद्दल पण तोच नियम आहे का ?

ठाण्यात श्री.श्रिपाद आगाशे नेत्रदान व त्वचादाना बद्दल मागील ३३ वर्ष प्रचार करीत आहेत.
अधिक माहीती साठी खालील लिंक्स पहा ..

http://netradaan.blogspot.in/

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=400,92,2222,1646&id=story4&pa...

चांगला धागा, माहिती वाचायला आवडेल.

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 8:37 pm | पिलीयन रायडर

मला जे जे शक्य आहे ते सगळं दान करायचं आहे. नवर्‍यालाही सांगुन ठेवलय की माझं श्राद्ध पिंड वगैरे भानगडी करायच्या नाहीत.

ह्या संबंधी काही विरोधी मते नुकतीच वाचनात आली आहेत. जर मिपावरच्या डॉक्टरांनी त्यांचे अनुभव सांगितले तर आमच्या सारख्या सामान्यांना बरीच मदत होऊ शकेल.

मी व्यक्तिशः असं मानते की आपण मातीतुन आलोय आणि मातीतच परत जाणार आहोत. आपल्या आधी काही नव्हतं आणि नंतरही काही नसणार. जे आहे ते फक्त ह्या क्षणात. आपल्यामागे काही रहाणार असेलच तर त्या फक्त आठवणी. मग मृतदेहाची किंमत ती काय? त्याचा कसला मोह?

सध्या आहे त्याच आयुष्यात गरज नसताना इतक्या मोहमाया जवळ करुन ठेवल्या आहेत, एवढी भावनिक गुंतवणुक केली आहे की कधी तरी हे सोडुन जायचंय ह्या विचारानेही त्रास होतो. पण जाणार हे तर सर्वात मोठं सत्य नाही का? मग एकदा गेलं की गेलं.. पुन्हा मागे काय रहाणार.. कसं रहाणार, ह्याची चिंता कशाला?

माझ्यानंतर निसर्गाने दिलेल्या ह्या शरीराचा शक्य तितका चांगला उपयोग व्हावा. दान दिल्यानंतरही काही उरलं सुरलं तर ते ही पुरुन टाका, त्याचं खत बनवा.. जाळुन टाका..राख बनवा.. काहीही करा.. मला फरक पडत नाही.

माझ्या प्रियजनांच्या आयुष्यात मी चांगली आठवण म्हणुन असेन.. तसंही आपण खरे कुठे असलोच तर एखाद्याच्या मनातच असतो.. शरीर फक्त माध्यम आहे. ते असो वा नसो, माझ्या माणसांच्या मनात मी कायम असणार आहे. बसं, मला तेवढ्याचाच मोह शिल्ल्क ठेवुन जायचंय..

चांगला विषय ! याबद्दल जितकी क्लॅरिटी मिळेल तितकी चांगलीच ... मिपावरच्या डॉ आणि जाणकारांच्या साधक बाधक चर्चेच्या प्रतिक्षेत..

हे चांगलंय. विशेषतः धर्मविधी बाबत.

मिपा वरच्या डाॅ मदत करावी। मी आत्ता ३२ वर्षांची आहे,व गेली १२ वर्षे मला एपिलेप्सी आहे। मी देहदान किंवा रक्तदान करु सकते का? ज्याला माझ रक्त किंवा अवयव मिळतील तो एपिलेप्सीचा शिकार तर होणार नाही न?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

ज्याला माझ रक्त किंवा अवयव मिळतील तो एपिलेप्सीचा शिकार तर होणार नाही न?

नाही. मात्र, अवयवदानापूर्वी आणि रक्तदानापूर्वी तुमच्या आजारांची व चालू असलेल्या औषधांची डॉक्टरांना पूर्ण कल्पना द्या.

दान केलेले अवयव रोपणास योग्य आहेत/असतील की नाही हे तपासून पाहिले जातील. त्याशिवाय त्यांचा उपयोग केला जाणार नाही.

एपिलेप्सीसाठी चालू असलेल्या औषधांचा अंश रक्तात सतत असतो (परिणामकारक उपायासाठी तो असावा लागतो), त्याचे प्रमाण रक्तदानासाठी योग्य आहे की नाही हे ठरविणे जरूर आहे.

चष्मा असताना नेत्रदान करु शकतात बहुतेक.. माझ्या आजीने केले होते.. डोळ्याचा नक्की कोणता भाग दिला जातो हे मला माहीत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेत्ररोपणात केवळ डोळ्याचा सर्वात पुढचा पारदर्शक पडदा (कॉर्निया) वापरला जातो. त्याला आजार नसल्यास (उदा. लक्षणिय सिलिंड्रीकल नंबर असणे, कॉर्निया अपारदर्शक असणे, इ) नेत्रदानात काहीच समस्या येत नाही.

चष्मा असणार्‍यांना बहुतेकांना डोळ्याच्या आकारमानाची (लांबी कमीजास्त असणे) समस्या असते, ज्यामुळे प्रकाशकिरण नेत्रपटलावर (रेटिना) केंद्रित होत नाहीत व त्यामुळे तेथे स्पष्ट प्रतिमा तयार होत नाही. चष्म्याची भिंगे प्रकाश नेत्रपटलावर केंद्रित (फोकस) करायला मदत करतात. अश्या लोकांत कॉर्निया निरोगी असल्यास त्यांचे डोळे नेत्रदानास योग्य असतात.

यक्रुताचा भाग दान करता येतो हे गेल्यावर्षी कळले. मुलाने यक्रुताचा भाग वडीलांना दान केला. वडीलांचे यक्रुत निकामी झाले होते. शस्त्रक्रीयेनंतर दोघांची यक्रुते नंतर शरीराच्या गरजेप्रमाणे पूर्वपदावर येतील असे त्यांचे म्हणणे.
मिपावरील डाक्टर प्रकाश टाकतीलच...

आजच इ-सकाळमध्ये यासंबंधी अजून माहीती आली आहे. हा त्याचा दुवा. किती तासांत अवयव प्रत्यारोपण शक्य आहे याचे काही आकडे पाहून आश्चर्य वाटले, पण मला स्वतःला याबाबतीत काही ज्ञान नाही.

धन्यवाद रूपी लिंक दिल्याबद्दल :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या लेखात स्पष्ट न केलेला एक मुद्दा गैरसमज टाळण्यासाठी फार महत्वाचा आहे.

खालील दोन प्रश्न फार वेगवेगळे आहेत :

१. दान केलेले अवयव मृत्युनंतर किती वेळात शरिरातून काढून घेतले तर ते रोपणास योग्य असू शकतात ?
हा कालावधी जितका लहान तितका जास्त चांगला. हा अवयवांप्रमाणे वेगळा असू शकतो. पण मृत्युनंतर प्रत्येक जाणारे मिनीट अवयवाला रोपणासाठी जास्त जास्त अयोग्य करत असते.

२. "मृत्युनंतर लगेच शरिराबाहेर काढलेल्या व योग्य रितीने साठवलेल्या" अवयवांचे रोपण किती कालावधीपर्यंत करता येते ?
त्या लेखात "...किती तासांत अवयव प्रत्यारोपण शक्य आहे." या मजकूरानंतर दिलेले आकडे, या प्रश्नाचे उत्तर आहे.

माझ्या आईने देहदान केले. तसा फॉर्म आधीच भरून दिला होता आणि त्यांनी एक आयकार्ड दिले होते, त्यामुळे तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये देहदान करताना अजिबात त्रास झाला नाही, असे बाबांनी सांगितले. नाहीतर सर्व मुला/मुलींची लेखी संमती घ्यावी लागते आणि त्यात खूप वेळ जाऊ शकतो, असे ऐकले आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे अवयव इतरांना उपयोगी पडतील, ते वापरले जातात आणि/किंवा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शरीर वापरले जाते. तुम्हाला योग्य वाटेल ते करा, असे बाबांनी त्यांना सांगितले होते आणि मी पण मुद्दामहून काही विचारले नाही. मी साधारण ३० तासानी पोचलो तेव्हा एक्सेप्शन म्हणून मला अंत्यदर्शन घेऊ दिले (त्यांच्या नियमानुसार एकदा देहदान झाले की कुणाही नातेवाईकाला दर्शन देत नाहीत.) डीन माझ्याशी बोलले तेव्हा म्हणाले की आपल्या देशात इतकी लोकसंख्या असूनही देहदान, नेत्रदान किंवा इतरही अवयवांचे दान करायला खूप अनास्था आहे. ही परिस्थिती बदलली तर खूप बरे होईल.

सुबोध खरे's picture

3 Sep 2016 - 9:41 am | सुबोध खरे

माझ्या आईने देहदान केले.
--/\--
--/\--

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

आपण एका कागदावर जरी लिहून ठेवले कि माझे
हे हे अवयव दान करा तरी पुढे सोपे जाते असे रेडीओवर
ऐकले आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

मृत्युनंतर केवळ एका कागदावर लिहीले आहे म्हणून देहदानाची कारवाई आपोआप होणार नाही. त्यागोदर काही कायदेशीर कारवाई जरूर असते.

त्यामुळे, जिवंत असतानाच सर्व सोपस्कार करणे केव्हाही उत्तम. मरणोत्तर कागदी व इतर कायदेशीर कारवाया करताना लागलेल्या वेळात (काही तासांत) अवयव रोपणास नाकाम होण्याची शक्यता असते.

पद्मावति's picture

6 Sep 2016 - 10:42 pm | पद्मावति

उत्तम विषय. धागा वाचतेय.

या धाग्याचे शीर्षक बदलल्यास धाग्यात नक्की काय आहे हे वाचकांना कळेल आणि जास्त लोकांपर्यंत ही चर्चा पोहोचेल.

स्रुजा's picture

6 Sep 2016 - 11:33 pm | स्रुजा

+१, क्रेझी, नाव सुचव. बदल करुन देते.

क्रेझी's picture

7 Sep 2016 - 8:31 am | क्रेझी

देह / अवयव दान - काळाची गरज
किंवा ह्यापेक्षा कुठलं दुसरं चांगलं नाव सुचत असेल तर तेही चालेल.

स्रुजा's picture

7 Sep 2016 - 8:35 am | स्रुजा

हे समर्पक वाटतंय.

बहुगुणी's picture

7 Sep 2016 - 2:22 am | बहुगुणी

अवयव दानाविषयी लेख लिहिण्याचं बरेच दिवस मनात आहे, मी त्यातला तज्ञ म्हणून नाही, तर याविषयी आस्था आहे म्हणून, पण मी वेळ काढण्याआधी कुणी लिहिलं तर वाचायला आवडेलच. तोपर्यंत यासंदर्भातलं एक बोलकं शिल्प-चित्र खाली देतो आहे जे आमच्या कँपस मध्ये ट्रान्स्प्लॅट सेंटरच्या बाहेर लावलं आहे:

In Their Last Hour They Gave a Lifetime

क्रेझी's picture

7 Sep 2016 - 8:34 am | क्रेझी

+१

वेल्हाळ's picture

7 Sep 2016 - 8:32 am | वेल्हाळ

डोळ्याची रचना कॅमेरासारखी असते. बरेचदा फक्त पुढच्या लेन्सला ओरखडा पडुन कॅमेरा खराब होतो; तद्वतच डोळ्याचा सर्वांत पुढचा पारदर्शी गोल भाग म्हणजेच काचपटल (काॅर्निआ CORNEA) याला ईजा झाल्यास तो पांढरा पडुन कायम स्वरुपी अपारदर्शक होतो व हा डोळ्याचा कॅमेरा खराब होतो, धुसर दिसते किंवा बिल्कुल दिसत नाही. खेडवळ भाषेत याला डोळ्यात फुल पडणे म्हणतात..
काॅर्निआ हा अद्भुतच अवयव आहे. या काचेसारख्या पारदर्शी थराला रक्तवाहिन्या नसतात. हवेतला आॅक्सिजन याला पुरतो.. म्हणुनच म्रुत्युनंतरही ६ तासांपर्यंत हा जिवंत असतो. नेत्रदानादरम्यान म्रुतदेहाचा प्रत्यक्ष नेत्रगोल म्हणजे पूर्ण डोळा न काढता, बारीक सर्जिकल ब्लेडने हा १.२ सेंटीमीटर व्यासाचा वर्तुळाकार काॅर्निआ फक्त काढुन संरक्षक द्रवात (Preservative) ठेवतात.. म्हणजेच नेत्रदान ही काही भयानक वा बीभत्स शस्त्रक्रिया नाहीय...

अंधत्वाच्या कारणांत बहुतेकदा काॅर्निआ पांढरा पडणे ( Corneal Opacity) हे कारण असते. हे काचपटल अद्यापपर्यंत तरी क्रुत्रिम रित्या तयार करता आलेले नाही; याउलट म्रुत्युनंतर उपलब्ध नैसर्गिक काचपटल सर्वश्रेष्ठ पर्याय आहे.
अश्या अंध रुग्णांचा हा निरुपयोगी काॅर्निया काढुन तिथे नेत्रदानादरम्यान काढलेला स्वच्छ काॅर्निया बसवतात. शस्त्रक्रियेची स्वच्छता व कौशल्य छान असले की जखमा लवकर भरुन हे नवे काचपटल ( काॅर्निया) पारदर्शी झाल्याने पुन्हा आधीसारखे दिसु लागते.. कॅमेर्याची लेन्स बदलली की पुन्हा चांगले फोटो निघतात तसे..!

मंडळी,
नेत्रदान ही अत्यंत सोपी व सुलभ क्रिया असल्याने प्रत्येकच म्रुत्युनंतर नातेवाईकांनी याचा आग्रह धरायला हवा...

छान माहिती दिली वेल्हाळ आपण, धन्यवाद :)

शलभ's picture

7 Sep 2016 - 2:08 pm | शलभ

खूपच छान माहिती..
अशी प्रत्येक अवयवदाना बद्दल येऊ द्या. ही माहिती धाग्यात अपडेट करून धागा परिपूर्ण होऊ द्या. शेअर करायला बरी पडेल माहिती. जमल्यास ज्यांना इच्छा आहे त्यांना अवयवदाना संबंधी काय करावे लागेल त्याचीही माहिती अ‍ॅड करा.

विशुमित's picture

7 Sep 2016 - 2:36 pm | विशुमित

वेल्हाळ जी,
खूप छान माहिती दिलीत.

सुमेधा पिट्कर's picture

7 Sep 2016 - 2:45 pm | सुमेधा पिट्कर

ज्यांना इच्छा आहे त्यांना अवयवदाना संबंधी काय करावे लागेल त्याचीही माहिती ह्या धाग्यावर मिळू शकेल

रुपी's picture

8 Sep 2016 - 1:11 am | रुपी

वेल्हाळ आणि डॉ.सुहास म्हात्रे यांचे प्रतिसाद नाहितीपूर्ण आहेत.

अवयवदानाबद्दलचा अजून एक व्हिडीओ सध्या पाहायला मिळत आहे. खरे तर तो अवयवदानाबद्दल आहे हे अगदी शेवटी कळते, पण या विषयाशी संबंधित म्हणून इथे लिंक देते :
https://www.facebook.com/HeyIndia/videos/1258333037533656/

बहुगुणी's picture

15 Sep 2016 - 4:02 am | बहुगुणी

दुव्याबद्दल धन्यवाद!