द स्टार्क स्टोरी-१

क्षमस्व's picture
क्षमस्व in जनातलं, मनातलं
14 Aug 2016 - 1:16 pm

तीन वर्षात पहिलाच लेख
सांभाळून घ्या

द स्टार्क स्टोरी-१

"जग बदलणार.... आपणही बदलायला हवं.... तुम्ही लोक शांततेचा पुरस्कार करतात, पण शांतता नेमकी काय असते? जर तुमच्या शेजाऱ्याकडे व तुमच्याकडे प्रत्येकी वीस एकर जमीन आहे, तर तुम्ही ती वीस एकरपेक्षा जास्त होण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत....आणि जर तुम्ही एकमेकांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न कराल तर काय होईल? कशाला शांतता उरेल? पण जर माझ्याकडे हजारो एकर जमीन असली आणि समोरील व्यक्तीकडे एक एकर असली तर तो माझी जमीन हडपण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही.... आणि मीही त्याची जमीन क्षुद्र तुकडा म्हणून सोडून देईन..."
टोनी बोलत होता सर्वजण तन्मयतेने त्याच्याकडे बघत होते.
"टोनी स्टार्क सादर करत आहे शांततेचे अमोघ अस्त्र.....द ड्रॉइड्स!!!!!"
क्षणार्धात हजारो मानवी रोबोट त्याच्यामागून उडत व्यासपीठावर अवतीर्ण झाले.....
"आज अमेरिका बनली आहे शांतता राखणारी सर्वात अमोघ शक्ती...."
सर्वजण हरखून जात टाळ्या वाजवत होते आणि टोनी एखाद्या कसलेला नट असल्याप्रमाणे सर्वाना अभिवादन करत होता.....
मागे अमेरिकी सैन्यदलाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यातले काही तर डोक्याला हात लावून बसले होते!
"स्टार्क शिव्या बसवणार आपल्याला..." एकजण स्वतःशीच म्हणाला.
इकडे परराष्ट्र मंत्री प्रेस कॉन्फरन्सद्वारे बाकीच्या देशांशी संपर्क करत होते,
"नाही ती सेना तुमच्या देशाविरुद्ध नाही...
नाही.... बिलकुल नाही.... नाही.... आपले संबंध कायम चांगलेच राहतील."
"सर उत्तर कोरिया अणुहल्ला करण्याची धमकी देतोय."
"जाऊ दे ते नेहमीचंच झालंय. बरं चीनची काय प्रतिक्रिया?"
"टोनी स्टार्कला आमच्या हवाली करा. निम्मी ड्रॉइड सेना द्या, आणि मग इ. इ."
"खरंच तो टोनी स्टार्क चीनला द्या, आपले निम्मे प्रॉब्लेम कमी होतील"
"त्या चिन्यांना असं डोकं मिळालं तर ते आपली डोकी उडवतील"
मंत्री बघतच राहिले....
"आणि टोनी ही गोष्ट म्हणजे काय आहे, हे जगाला तरी कुठे ठाऊक आहे?"
"ते आपल्याला तरी कुठे ठाऊक आहे?" मंत्री हताशपणे म्हणाले.
स्टार्क टॉवरवर जल्लोषात पार्टी चालू होती.
"हैप्पी जर मी एखाद्या मुलीबरोबर एखाद्या एकट्या रूममध्ये जाताना दिसलो तर तू काय करशील?"
"मी त्या मुलीपासून तुम्हाला धोका आहे असे समजेन."
"अरे त्या फक्त गप्पा मारायला येतात माझ्याबरोबर...."
"कपडे काढून कुणी गप्पा मारत बसतं का?"
टोनी आता मात्र हैप्पीपुढे हताश झाला....
"माझ्या हनिमूनला मला एकटा सोडशील?"
"हनिमूनसाठी लग्न व्हायला हवं...."
"लग्न ही ऑप्शनल बाब आहे."
"आणि हनिमून?"
"जीवनावश्यक!"
तेव्हाच पत्रकारांचा गराडा टोनीभोवती पडला.
स्टार्क!
स्टार्क!
स्टार्क!
"एक मिनिट मी निवडतो. ओहो.... हिना खान... कॅनन न्यूज... आणि सर्वात सुंदर न्यूज अँकर... तुम्हीच विचारा."
"अमेरिका संरक्षण साहित्यावर अर्थसंकल्पाच्या किती टक्के खर्च करते स्टार्क?"
"चाळीस टक्के!"
"आणि त्यातला नव्वद टक्के वाटा स्टार्क ग्रुपचाच असतो ना?"
टोनी थोड्यावेळ गप्प बसला
"इथे लोक उपाशी मरतायेत आणि तुम्ही अर्थसंकल्पातील छत्तीस टक्के रकमेवर डल्ला मारतायेत, युद्धाची भीती दाखवून..."
टोनी विचार करत होता.
"हिना तुझा कॅमेरा माझ्या चेहऱ्याजवळ आण."
कॅमेरा टोनीच्या चेहर्याजवळ आला.
"सर्व अमेरिकावासीयांना....ज्या दिवशी सर्व जग शांततेची भाषा बोलेल त्या दिवशी टोनी स्टार्क सर्व सोडून लोकांची धुणीभांडी करेन...."
आणि आपल्या कस्टम ऑडीमध्ये बसून तो भुरर्कन निघून गेला.
मात्र त्याआधी तो हिनाला आपले विसीटिंग कार्ड देऊन गेला होता....
सकाळी हिनाला जाग आली तेव्हा ती टोनीच्या आलिशान महालात होती
"टोनी....टोनी...."ती लडिवाळपणे हाका मारत फिरत होती.
"तुमच्यासाठी नवीन कपडे तयार आहेत."
'पेपर, राईट?"
पेपरने मान डोलावली.
"तुझ्यासारखी स्त्री घरात असल्यावर टोनी बाहेर गर्लफ्रेंड शोधणारच, टोनी तुला फक्त कपडे विकत घ्यायलाच पाठवतो का?"
"नाही मी कधीकधी मानवी कचरा व्यवस्थापन समिती स्थापन करते."
हिनाच्या तोंडावर कपडे फेकून ती टोनीच्या लॅबमध्ये गेली....
"महिन्याचा कोटा पूर्ण झालाय कि अजून बाकी आहे?"
"तिला बाहेर फेकलं का?"
"हो..."
"पेपर तू मला कधीच एखाद्या मुलीबरोबर जास्त वेळ राहू देत नाहीस."
"कारण तुला दुसरी मुलगी शोधायची असते...."
"नाही मला स्त्रियाही चालतात."
तेव्हाच टोनीचा फोन वाजला.
"काय? केव्हा?"
"काय झालं...."
"डॉ. स्टीफन स्ट्रेंज........"

वाङ्मयकथा

प्रतिक्रिया

उत्सुकता वाढवणारं लिखाण... पण का कुणास ठाऊक... लेखन शैली परिचयातील वाटते... ;)

मुक्त विहारि's picture

14 Aug 2016 - 2:38 pm | मुक्त विहारि

आहे का?

संजय पाटिल's picture

14 Aug 2016 - 3:15 pm | संजय पाटिल

द स्टार्क स्टोरी-१ =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Aug 2016 - 5:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

पिक्चरची ट्रांस्क्रिप्ट आहे का ही? मराठीत अनुवादित?

क्षमस्व's picture

14 Aug 2016 - 9:03 pm | क्षमस्व

प्रेरणा मिळाली आहे चित्रपटावरून,

मात्र पुढील भाग पूर्णतः वेगळे असतील।

क्षमस्व's picture

14 Aug 2016 - 8:55 pm | क्षमस्व

हो क्रमशः आहे!

आणि सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद

पुढील भागाच्या प्रतीक्षेत .... हा प्रस्तावनेचा भाग म्हणून छोटा ठीक आहे पण पुढचे भाग थोडे मोठे आले तर वाचायला मजा येईल. :)