अवधूत (भाग-७)

प्रभास's picture
प्रभास in जनातलं, मनातलं
10 Aug 2016 - 4:57 pm

दुपार आता उतरत आलेली होती. दिवसभर चांगलंच ऊन तावल्याने सगळं कसं कोरडं ठणठणीत झालेलं होतं. वाटेत एका घरातून त्याला मूठभर फुटाणे आणि रेवड्या मिळाल्या होत्या. रात्री खाता येतील… सध्या थंडीचे दिवस… थोड्याच वेळात अंधारुन येईल. रात्रीपुरता मुक्काम कुठे करायचा? वाटेत कुठे निवारा मिळेल का? रात्री खूप थंडी असणार. नाहीच निवारा मिळाला तर? त्याला थोडी भीतीच वाटली. काल तर केवढा ताप होता! आज तरी सुरक्षित रहावं निदान! इतर वेळी कुठे फारसा विचार करतो आपण?

पाय झपाझप चालतच राहिले. सूर्य एव्हाना मावळलेला होता. वेगानं अंधारुन येऊ लागलं होतं. जवळच्याच एका छोट्याशा टेकडीवर दिवे लुकलुकताना दिसले तसं त्याला हायसं वाटलं. अगदी छोटीशी टेकडी! शंभर एक पावलात वर पण पोहोचला. वर वारा चांगलाच भणाणत होता. स्वच्छ मोकळ्या आकाशात चांदण्या नुसत्या ओसंडून वाहत होत्या. टेकडीच्या मधोमध एक छोटंसं खोपट उभं होतं. आत्ता या क्षणाला तरी खूप श्रीमंत दिसणारं! आतल्या दिव्याचा अंधुक प्रकाश बाहेर येत होता. दरवाज्यातच कुणीतरी मनुष्य उभा राहून त्याच्या दिशेने पाहत होता. जवळ जसा पोहोचला तसा त्याला त्याच्या चेह-यावर बराच तणाव दिसला.

“मी त्र्यंबकेश्वरला चाललोय. आज इथे रहायला मिळालं तर बरं होईल. थोडा आजारीच आहे मी.”

हे ऐकताना त्या मनुष्याच्या चेह-यावरील हावभाव बदलत गेले. थोडा तणावमुक्त झाला चेहरा. मग त्याने लगेच त्याला आपल्या सोबत आत येण्याची खूण केली. तो अलगद वाकून आत खोपटात शिरला. खोपट आत बरंच मोठं दिसत होतं. दोन तीन दिव्यांनी मस्तपैकी उजळून निघालेलं. शेणानं भिंती छान सारवलेल्या. अजूनही शेणाचा तीव्र सुगंध दरवळत होता. एका कोप-यात चुलीपाशी एक स्त्री बसून स्वयंपाक करीत होती. भाक-या थापल्याचा आवाज येत होता. आत एक आगंतुक आलेला पाहून ती काम थांबवून उत्सुकतेने पाहू लागली.

एका कोप-यात मोठंसं देवघर मांडलेलं. वेगवेगळ्या देवतांच्या मूर्तींनी आणि अनोख्या वस्तूंनी भरलेलं. शेजारीच पुस्तकांचं एक छोटसं फडताळ उभं होतं. धार्मिक ग्रंथ असावेत. त्या माणसाने घाईघाईने एक जुनाट मळकट सतरंजी अंथरली. त्याला पेल्यातून थोडं पाणी प्यायला पुढे ठेवलं. मग स्वतःचा परिचय द्यायला सुरुवात केली.
“मी रंगनाथ. मूळचा इथला नव्हे. कोकणातील एका सुखवस्तू कुटुंबातील आहे मी. मुलं कमावती झाल्यावर मग हिला घेऊन घर सोडलंय मुद्दाम. स्वतःचा शोध करायचा म्हणून.”
“मग तर छानच आहे. योगायोगानेच भेट झाली म्हणायची तुमच्याशी.”

तेवढ्यात चहा आला कोरा. बिनदुधाचा.
“आत्ता दूध शिल्लक नाहीये.”
“चालेल की. त्यात काय एवढं!”
“चला बाहेरच बसूया.” तो मनुष्य हातातील विडी शिलगावत म्हणाला.

दोघेही बाहेर आले. मोकळा वारा अगदी भणाणत होता. खूप थंड वाटत होतं. रंगनाथने घरापासून थोडीशी दूरच सतरंजी अंथरली. मग हातात चहाचे पेले घेऊन दोघेही तसेच निवांत बसून राहिले. खूप सुंदर चांदणं पडलेलं होतं. चंद्र बहुतेक चतुर्दशीचा असावा. सगळीकडे चंद्रप्रकाशाची बासुंदी सांडलेली होती. जवळच एक छोटंसं पिंपरणीचं झाड होतं. वा-याबरोबर जोरदार पानांची सळसळ करीत मजेत खेळत होतं.

अचानक रंगनाथने शांततेचा भंग केला. “तुमचे गुरु कोण?”
“अद्याप तरी मिळाले नाहीत. त्यांच्याच शोधात निघालोय त्र्यंबकेश्वरला.”
“अहो असे थोडेच ठरवून भेटणार आहेत गुरु?” रंगनाथला जोरात हसू फुटले.
“मला एका व्यक्तीनं सुचवलं जायला. एका बैराग्यानं. मग मी विचार केला की जाऊन पाहूया तरी काय होतंय! कदाचित हा एक ईश्वरी संकेत पण असू शकतो.”
“हं… तू म्हणतोस ते पण बरोबर आहे. पण मला तरी हे नाही पटत. असं ठरवून या गोष्टींचा शोध थोडाच घेतला जातो?”
“मग काय करू? तुम्हीच सांगा. तुम्हाला कदाचित जास्त माहिती असावी यामध्ये.”

रंगनाथ थोडा विचारात पडला.
“असं करुया. मला देवाला कौल लावता येतो. आपण प्रश्न विचारून पाहूया.”
त्याला थोडी गंमत वाटली. काय असेल हा प्रकार? बघूया तर खरं! विचारून पहायला काय हरकत आहे?
पण हा माणूस तरी असा कोण लागून गेला? याला तरी झालं असेल का ईश्वरदर्शन? याचा सल्ला मी का म्हणून मानायचा? शंभर प्रश्न डोक्यात घोळू लागले.
पण एव्हाना रंगनाथ भराभर खोपटाकडे चालू देखील लागला होता. त्याला फार उत्साह आलेला असावा. मग त्याला देखील नाईलाजानं मागे मागे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

बाहेरच्या थंड हवेतून आत आल्यावर त्याला एकदम बरं वाटलं. रंगनाथची पत्नी स्वयंपाक उरकून आता आपल्या पतीची हालचाल कौतुकाने न्याहाळत बसलेली होती. रंगनाथने तिथेच कोप-यात मोरीत जाऊन हातपाय धुतले. मग एक सोवळ्यातलं वस्त्र नेसून देवापुढे मृगचर्म अंथरून त्यावर बसला. त्यातल्याच एका मूर्तीची त्याने पंचोपचाराने पूजा केली. पण लांबून ती देवता कोणती हे दिसत नव्हतं. मग जवळच्याच धूपपात्रात थोडासा धूप टाकला. क्षणार्धात सगळं खोपट त्या सुगंधी धुराने भरून गेलं. रंगनाथ डोळे मिटून आता देवापुढे काहीतरी पुटपुटत स्थिरपणे बसला.

बराच वेळ गेला. काहीच घडत नव्हतं. मग रंगनाथने बायकोला टाळी मारुन जवळ बोलवलं व तिच्या कानात काहीतरी सांगितलं. लगोलग तिने स्वयंपाक घरातील डब्यातून काहीतरी वस्तू काढली व आपल्या पतीला दिली. रंगनाथने ती वस्तू लगेच तोंडात टाकली. काही वेळ गेला. रंगनाथ आता थोडा-थोडा झुलू लागला. वातावरणात का कुणास ठाऊक? पण एकदम तणाव निर्माण झाल्यासारखं वाटू लागलं. बाहेरचा भणाणणारा वारा पण अचानकच थांबला. काहीतरी खूप शक्तिशाली अस्तित्व त्या लहानशा खोपटात प्रकट झालेलं जाणवू लागलं. क्षणाक्षणाला घुसमट वाढू लागली. आपण कशाला या फंदात पडलो असंच त्याला आता वाटू लागलं.

इतक्यात अचानक रंगनाथ, झोपेतून मनुष्य खडबडून जागा होतो, तसा जागा झाला. त्याच्या चेहे-यावर भय दाटलेलं होतं. अंगावरुन घामाचे ओघळ वहात होते. पण खोलीतील वातावरण मात्र अचानक निवळलं. ते काहीतरी जे होतं ते निघून गेलं होतं.
“काय झालं? इतकं काय पाहिलं?”
“मी तुझा शिरच्छेद होताना पाहिला. फार भयानक होतं ते. रक्ताचे लोटच्या लोट उसळत होते.” रंगनाथ अद्याप त्या भयानक दृश्याच्या परिणामातून बाहेर आला नसावा. त्याचे भेदरलेले डोळेच सांगत होते…
“काही तरी चुकीचा संदेश मिळाला असेल. माझा कोण शिरच्छेद करील आणि का? मी कोणी अपराधी थोडाच आहे.”

रंगनाथ आता त्याच्याकडे निरखून पाहू लागला.
“खरं सांग. तू कोण आहेस? काहीतरी भयानक अपराधी कृत्य करून पळतो आहेस का जगापासून? ही संन्याशाची वस्त्रे लोकांना फसवू शकतील. माझ्या देवाला नाही.”

हे खूप अपमानकारक होतं. त्याचा प्रतिवाद केलाच पाहिजे. उगाच नको ते आरोप का सहन करायचे?
“मूर्ख आहात तुम्ही. मी सप्तशृंगावर गेली अकरा वर्षे रहातोय. त्या पंचक्रोशीतलं माणून अन माणूस ओळखतं मला. मी कुणी चोर-दरोडेखोर नक्कीच नाहीये. पाहिजे तर माझ्या परस्पर जाऊन चौकशी करा. लोक देतील तुम्हाला माहिती. तुम्ही आता शांत व्हा. मी निघून जातोय इथून. खूप त्रास दिला तुम्हाला. क्षमस्व!”

तसाच ताडकन उठून तो खोपटाबाहेर पडला…

संस्कृती

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

10 Aug 2016 - 5:54 pm | सिरुसेरि

छान लेखन . "नर्मदे हर " ची आठवण झाली . मागील भागांच्या लिंक ?

प्रभास's picture

10 Aug 2016 - 10:57 pm | प्रभास

शाम भागवत साहेब... कृपया जुन्या भागांच्या लिंक्स देऊ शकाल? मला देता येत नाहीत... so requesting you...

आपले याआधील भाग खालील लिंकमध्ये मिळाले .

http://www.misalpav.com/user/26730/authored

कुणा एकाची भ्रमण गाथा वाचायला घेतलंय, वाचतांना पदोपदी अवधूत आठवत होतं,

पद्मावति's picture

10 Aug 2016 - 6:21 pm | पद्मावति

आहा, मस्तं! खूप वाट बघायला लावलीत. पण इट्स worth इट. हाही भाग केवळ अप्रतिम.

प्रभास's picture

10 Aug 2016 - 8:19 pm | प्रभास

धन्यवाद... खरे तर तुमच्याच प्रोत्साहनाने पुन्हा एकदा लिहू लागलोय... तुमचे ऋण मान्य करावेच लागेल...

अभ्या..'s picture

10 Aug 2016 - 6:49 pm | अभ्या..

मस्त.

वेल्कम बॅक

लालगरूड's picture

10 Aug 2016 - 7:32 pm | लालगरूड

आपण मांत्रिक ना?

प्रभास's picture

10 Aug 2016 - 8:17 pm | प्रभास

होय...

क्षमस्व's picture

10 Aug 2016 - 8:01 pm | क्षमस्व

अत्यंत सुंदर लेखन!
शब्द नि शब्द काळजात भिडतोय!
दण्डवत घ्या!

धन्यवाद नीमो, सिरुसेरी, अभ्या.., क्षमस्व आणि पद्मावती...

एक एकटा एकटाच's picture

10 Aug 2016 - 9:17 pm | एक एकटा एकटाच

देर आए दुरुस्त आए

मस्त भाग झालाय

पुढचे भाग आता पटापटा टाका बघु

प्रभास's picture

10 Aug 2016 - 9:20 pm | प्रभास

धन्यवाद अमोल...

रुस्तम's picture

10 Aug 2016 - 10:51 pm | रुस्तम

रच्याकने तुम्ही मांत्रिक आय डी चालू असताना वेगवेगळ्या आय डी ने लेख का लिहिता? तुमची ही लेखमाला आवडते म्हणून सहज विचारले.

त्या आयडीचा पासवर्ड हरवलाय... :)

अमितदादा's picture

11 Aug 2016 - 2:03 am | अमितदादा

आवडली कथा

शित्रेउमेश's picture

11 Aug 2016 - 10:56 am | शित्रेउमेश

हा ही भाग मस्त जमलाय...

पुढचे भाग लवकर येवुदेत प्लीज.....

पैसा's picture

11 Aug 2016 - 1:20 pm | पैसा

छान लिहिताय.

नाखु's picture

11 Aug 2016 - 2:19 pm | नाखु

आवेग आणि लेखन संगत राखून ठेवलाय.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

प्रभास's picture

11 Aug 2016 - 5:26 pm | प्रभास

धन्यवाद रुस्तम, अमितदादा, उमेश, पैसाताई व नाखुकाका...

भम्पक's picture

11 Aug 2016 - 5:39 pm | भम्पक

साधि, सोपि अनि ओघवति शैलि.....

प्रसन्न३००१'s picture

11 Aug 2016 - 6:04 pm | प्रसन्न३००१

जबरदस्त लिहिलं आहेत. सगळे भाग वाचून काढतोय एका पाठोपाठ एक.
भाग १ - ५ वाचून झालेत. भाग ६ मिळत नाहीये कुठे, त्याची लिंक देता का प्लीज

भम्पक's picture

11 Aug 2016 - 6:12 pm | भम्पक

६ व्या भागाचि लिन्क द्या हो क्रुपया

सिरुसेरि's picture

11 Aug 2016 - 6:23 pm | सिरुसेरि

६ व्या भागाचि लिन्क

http://www.misalpav.com/node/35804

प्रसन्न३००१'s picture

12 Aug 2016 - 9:54 am | प्रसन्न३००१

धन्यवाद सिरुसेरी (का श्री श्री ?) :D

जव्हेरगंज's picture

11 Aug 2016 - 9:46 pm | जव्हेरगंज

कसदार शब्द!
वेलकम ब्याक!!

धन्यवाद जव्हेरभौ... इतर सर्व वाचक व प्रतिसादकर्ते यांना ही धन्यवाद...

अभ्या..'s picture

13 Aug 2016 - 3:48 pm | अभ्या..

राका पण तुमचाच आयडी काय?
धन्य आहात. सहस्त्रनाम श्लोक घ्या एक रचायला आता.

प्रभास's picture

13 Aug 2016 - 4:49 pm | प्रभास

लोल...
अरे माझा प्रभास आयडी बरेच दिवस अॅप्रूव्ह झाला नाही... म्हणून राका आयडीने पुन्हा रिक्वेस्ट टाकली... तर दोन्ही रिक्वेस्ट एकदमच मंजूर झाल्या... असो... संपादकांनी राका आयडी ब्लाॅक करावा ही विनंती...

अक्षय१'s picture

11 Aug 2016 - 10:01 pm | अक्षय१

लवकर अपडेट करा ..मी हि कथा विसरलोच होतो प्लिज लवकर अपडेट करा

बाबा योगिराज's picture

13 Aug 2016 - 1:55 pm | बाबा योगिराज

पासवर्ड हरवला तर हरवला. लगेच नवीन मागवून घेता येतो.

ते जाऊ द्या. आता लिखाण बंद करू नका.जबरदस्त भाग आहे हा सुध्दा. मस्त. पुलेशु, पुभाप्र.

मिपा वाचक मंडळ सदस्य,
बाबा योगीराज.

प्रभास's picture

13 Aug 2016 - 4:50 pm | प्रभास

धन्यवाद बाबाजी... :)