आशय - प्रस्तावना आणि भाग १

किंबहुना's picture
किंबहुना in जनातलं, मनातलं
10 Aug 2016 - 9:55 am

आशय तसा सुखवस्तू घरातला मुलगा. वडील सधन नसले तरी सुखवस्तु शेतकरी. रत्नागिरीतील एका दुर्गम गावातील वडिलोपार्जित आणि त्यामुळे विभागलेली तरीही एकत्र असलेल्या १५-२० एकर शेतीचे मालक, आणि त्यात स्वकष्टाने पिकवलेली ५-७ एकरावरील आमराई. त्यामुळे चंगळ नसली तरी खाण्यापिण्याची तशी काही ददात नव्हती. बाकी कुटुंबीय त्यांच्या व्यवसायाप्रमाणे शहरात स्थायिक झाले होते. एकंदरीत त्यांचे आयुष्य तसे सुखी होते.

ही गोष्ट तशी म्हटली तर आशयच्या आईवडिलांची नाही, पण आशयची गोष्ट समजून घेताना त्याच्या आईवडिलांना समजून घ्यायलाच पाहिजे ना. गावात तसे काही कमी नव्हते, कमी असलेच तर शिक्षण. आशयचे आई-वडील घर-शेती सांभाळण्यसाठी उच्चशिक्षणानंतर गावी येऊन राहिले होते. त्यामुळे बाकी काही नसले तरी आपल्या मुलांनी शिक्षणात कुठेही कमी पडू नये अशीच त्यांची इच्छा. आशय तसा २ भावंडांनंतरचा, त्यामुळे शेंडेफळ, साहजिकच लाडोबा.

आशयची मोठी भावंडे पाचवीपासून तालुक्याच्या शाळेत जात असत, ती शाळा तशी नावाजलेली होती, आणि आशयच्या सगळ्याच कुटुंबियांचे शिक्षण त्या शाळेत झाले होते,त्यामुळे शाळेमध्ये पण आशयच्या घरच्यांना मान होता. लहानपणापासून आशय अत्यंत हुशार, एकपाठी, अंकगणित आकडेमोड वगैरे मधली त्याची प्रगती पाहून त्याला मात्र लवकरच तालुक्याच्या शाळेत घालायचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे तो आणि त्याचा मोठा भाऊ असे एकदमच तालुक्याच्या शळेत जाऊ लागले. मोठ्या भावाने त्याची जबाबदारी घेतल्यामुळे तसे शिक्षणही व्यवस्थित चालू होते.
अर्थात ही कहाणी त्याच्या शिक्षणाची नाही.
खरे तर कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही. आशय सातवीत गेला तेव्हापासून की वसतीगृहात गेला तेव्हापासून..

खरेतर याची सुरुवात झाली त्याच्या सातवीत.. सातवीत त्याचा मोठा भाऊ उच्चशिक्षणासाठी बाहेरगावी गेला, आणि आशयची रवानगी तालुक्याच्या गावातील एका परिचितांकडे झाली. सातवीची सहामाही होऊन गेली होती. आशयच्या स्वप्नात नाही पण स्वप्नरंजनात वर्गातीलच पर्‍या यायला लागल्या होत्या. म्हणजे काय होत आहे हे समजण्यासारखे ते वय नव्हते, पण त्या पर्‍यांचे आगमन झाले की त्याला बरे वाटायचे. त्यांच्या सहवासाची बालवयानुरूप स्वप्ने तो पहायचा. एक दिवस आशयच्या एका मित्राने त्याला सांगितले "ती वर्गातली रश्मी आहे ना ती तुझ्याकडे चोरून बघते". आशयला प्रचंड राग आला. सरळ जाऊन तिला झापू लागला. अर्थात तिने कानावर हात ठेवले. पण यानिमित्तानी मुले किंवा मुली एकमेकांकडे चोरून बघतात याचा त्याला शोधही लागला.
तशातच एक दिवस वर्गात तास चालू असताना आशयला काहीतरी वेगळे जाणवू लागले, लघुशंकेची तीव्र भावना होतेय असे वाटू लागले. तास संपताच तो सरळ शाळेच्या स्वच्छतागृहात गेला. पण तिथे गेल्यावर त्याला जे बघायला मिळाले ते फारच वेगळे होते. तेव्हढ्यात त्याचा एक मित्र तिथे आला. त्याने पण ते बघितले. "अरे बापरे हे काय झाले तुला, हे फार वाईट असतेय". अर्थात आशय घाबरला नाही, पण घडलेली घटना काहीतरी वेगळी आहे हे मात्र त्याच्या मनाला समजले.
नंतर या गोष्टीचे निरीक्षण करणे हा त्याचा छंदच बनला.

(क्रमशः)
प्रस्तावना:
मुलांचे विशेषतः बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत, आणि त्यातून प्रौढावस्थेत जाताना होणारे बदल आणि आणि तदनुशंगाने घडणार्‍या गोष्टी वगैरेंचा विचार आपल्याकडे साहित्यातून विशेष केला जात नाही. या मुलांचे भावविश्व, त्यांच्या आजूबाजूचे वातावरण, त्यातले धोके या गोष्टी आपण चर्चेचा विषय नाही असे मानतो. किंबहुना मुले गरोदर राहू शकत नाहीत, त्यामुळे आपण सर या गोष्टी निसर्गावर सोडून देतो. पण खरे तर मुलींप्रमाणे मुलांना देखील योग्य वयात योग्य व्यक्तींकडून लैंगिक शिक्षण मिळाले पाहिजे असे वाटते. कथानायकाचे आणि कथेचे नाव आशय असे असते तरी त्या दोघांचा नामसाधर्म्यापलिकडे काहीही संबंध नाही.
अधिक-उणे: हा विषय अत्यंत "बोल्ड" आहे. वाचकांना पहिल्या भागातच कल्पना आली असेल. पुढील भाग याहूनही अधिक "बोल्ड" असतील, शक्यतो सूचक शब्दांचा वापर करून ते सुसह्य करण्याचा माझा प्रयत्न राहील, पण तरीही जर हे धोरणात बसत नसेल तर कृपया संपादक मंडळाने तशी सूचना द्यावी ही विनंती. लेखनाची सवय नसल्यामुळे रंजकपणा थोडा कमी आहे. माझेही हे तसे पहिलेच लेखन आहे तेव्हा सूचनांचे स्वागतच आहे, अगदी कोणाला प्रूफरीडिंग करायचे असेल तरीही मला आनंदच आहे)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

10 Aug 2016 - 10:45 am | आनन्दा

वाचत आहे. विषय थोडा गंभीर दिसतो. अजूनतरी काही अक्षेपार्ह दिसलेले नाही. पुभाप्र.

मार्मिक गोडसे's picture

10 Aug 2016 - 12:42 pm | मार्मिक गोडसे

शक्यतो सूचक शब्दांचा वापर करून ते सुसह्य करण्याचा माझा प्रयत्न राहील

उदाहरणार्थ.

किंबहुना's picture

10 Aug 2016 - 9:54 pm | किंबहुना

उदाहरणे पुढे येतील

अजया's picture

10 Aug 2016 - 12:56 pm | अजया

माझ्या मुलाचे नाव आशय असल्याने उगाच दचकून वाचलं!
पुभाप्र

सस्नेह's picture

10 Aug 2016 - 1:05 pm | सस्नेह

=)))

मुक्त विहारि's picture

10 Aug 2016 - 1:12 pm | मुक्त विहारि

"पण खरे तर मुलींप्रमाणे मुलांना देखील योग्य वयात योग्य व्यक्तींकडून लैंगिक शिक्षण मिळाले पाहिजे असे वाटते."

+ १

ह्यासाठी मराठीत एक फार उत्तम पुस्तक आहे, "बंडू वयात येतो."

किंबहुना's picture

10 Aug 2016 - 9:53 pm | किंबहुना

ओह.. वाचलेच पाहिजे.

गिरिजा देशपांडे's picture

10 Aug 2016 - 1:15 pm | गिरिजा देशपांडे

माझा मुलगा याच वयाचा असल्यामुळे मला उपयोग होणार ह्या लेखमालेचा :)
पुभाप्र

vcdatrange's picture

10 Aug 2016 - 1:23 pm | vcdatrange

वाचतोय ......