शेवटची भेट - (काल्पनीक)

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
7 Aug 2016 - 11:43 pm

शेवटची भेट - (काल्पनीक)

आज त्याला खुप उदास वाटत होते . त्याच्या गावातील सिनेमा थिएटर आज पाडण्यात येणार होते . थिएटरची इमारत जुनी झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंदच होते . ते थिएटर पाडुन तिथे एक भव्य शॉपिंग मॉल बांधला जाणार होता .

या थिएटरमध्ये पिक्चर्स पाहायला लहान असल्यापासुन ते थिएटर बंद पडेपर्यंत तो बरेचदा गेला होता . कधी आपल्या कुटुंबियांबरोबर , कधी शाळा , कॉलेजातल्या मित्रांबरोबर , तर कधी ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर .

अनेक गाजलेले हिंदी , मराठी चित्रपट त्याने या थिएटरच्या सिनेमा हॉलमध्ये पाहिले होते . इंग्रजी हॉलिवूडपटांच्या अचाट दुनियेशीही याच थिएटरमध्ये त्याची ओळख झाली होती . आज त्या सगळ्या आठवणी त्याच्या मनात येउ लागल्या .

आज थिएटर पाडले जाण्यापुर्वी एकदा त्या सिनेमा हॉलमध्ये जाउन परत थोडा वेळ जुन्या आठवणींमध्ये रमावे असे त्याला सारखे वाटु लागले . लगेच तो थिएटरकडे निघाला .

तो थिएटरच्या आवारात पोचला तेव्हा अजुन सकाळचीच वेळ होती . थिएटर पाडण्याचे काम अजुन सुरु झालेले दिसत नव्हते . चार मजुर तेवढे जमलेले दिसत होते . थिएटरसमोरच्या मोकळ्या जागेत ते मजुर चहा नाश्ता करत एकमेकांशी त्यांच्या कॅडमॅड भाषेत गप्पा मारण्यात गर्क होते . त्याच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही .

तो त्वरेने ENTRY च्या दरवाजातुन आत सिनेमा हॉलमध्ये शिरला . थिएटर आज पाडलेच जाणार असल्यामुळे हॉलचे दरवाजे मोकळेच होते . आत आल्यावर त्याने ते दरवाजे हलकेच सरकावुन घेतले . सिनेमा हॉलमध्ये आता नेहमीसारखा , चित्रपट सुरु होण्यापुर्वी होतो तसा अंधार झाला . सिनेमा हॉलमध्ये जो एक परिचित गंध असतो तोही त्याला आता जाणवु लागला . समोरच्या सिटसच्या रांगेत त्याची एक ठराविक सिट होती . तो बरेचदा त्याच सिटवर बसत असे . तिथुन त्याला पिक्चर व्यवस्थित दिसत असे . आताही यांत्रिकपणे तो त्याच सिटवर जाउन बसला .

सिनेमा हॉलमध्ये नेहमीचे , त्याला माहित असलेले वातावरण जमुन आल्यामुळे तो खुश झाला . हॉलमध्ये समोरच त्याचा आवडता भव्य पडदा दिसत होता . आता तो पडदा किंचीत जुनाट फिकट दिसत होता . परत त्याच्या मनामध्ये त्या हॉलमध्ये , त्या भव्य पडद्यावर आतापर्यंत पाहिलेल्या वेगवेगळ्या चित्रपटांतील लक्षात राहिलेले सिन्स , गाणी रुंजी घालु लागले . तो त्या आठवणींमध्ये रंगुन गेला .

"रंगीला रे....." अचानक त्याच्या आजुबाजुला आवाज घुमला . थरारुन त्याने इकडे तिकडे पाहिले , तर कोणीच नव्हते . आपल्याला भास झाला असावा असे त्याला वाटले . अचानक पडद्यावर फिल्म सुरु होताना येतो तसा खर खर आवाज येउ लागला . पुढच्याच क्षणी पडद्यावर त्याला उर्मिलाचा रंगीला डान्स दिसु लागला .

"चल मेरे संग संग ...ले ले दुनियाके रंग ...हो जा रंगीला रे...रंग रंग रंगीला रे.... "

तो अवाक होउन पाहातच राहिला . हे काय चालले आहे .. हे सत्य आहे कि स्वप्न आहे हे त्याला काहिच समजेना . त्यातच भर म्हणुन आता पडद्यावर अभिनयात मिस्टर परफेक्श्नीस्ट असलेला आमिर खान आपले डान्समधील कौशल्य दाखवताना दिसु लागला . बॅकग्राउंडला ए.आर. रहमानचे टेक्नो म्युझीक आणि खुद्द रहमानचा अतरंगी आवाज ....

"कभी कभी अचानक जाना .. दिल देने दिल देने दिल देने दिल देने का .. सोचो तो....सुनो.. सुनो.. बात मेरी समझो..."

ए.आर. रहमानच्या आधुनीक संगीतातील अशा चिवित्र प्रयोगांवर सगळेच खुश होते . तो काळ असा होता की , "ए. आर. रहमान शिंकला तरी त्याचा एक सुपरहिट म्युझीकपिस बनेल" असे म्हणले जायचे . या थिएटरमध्येच त्याला स्टिरिओफोनिक , डॉल्बी डिजीटल , डीटिस अशा अनेक साउंड सिस्टीम्स अनुभवायला मिळाल्या होत्या .

त्याला हे सगळे आठवे पर्यंत पडद्यावर एक नवीन सिन दिसु लागला होता . तो उत्सुकतेने पाहु लागला.. कारण तेवढेच त्याच्या हातात होते ..आणी त्यालाही ते हवेच होते .

डोंगरांळ प्रदेशातुन चाललेली एक मीटरगेज इंजिनवाली मालगाडी . त्या मालगाडीच्या एका डब्यात बसलेले करारी इन्स्पेक्टर ठाकुर आणि जय , वीरु हे दोन कैदी . इन्स्पेक्टर साहेबांशी कुठुनतरी ओळख काढण्याचा वीरुचा प्रयत्न , आणी त्याला "मुझे तो सभी पुलीसवालोंकी शकले एक जैसी दिखती है" असा जयने दिलेला थंड प्रतिसाद . अचानक मालगाडीवर दरोडेखोर हल्ला करतात . इन्स्पेक्टरनी सुटका केलेले जय आणी वीरु त्या दरोडेखोरांचा निढड्या छातीने प्रतिकार करुन त्यांना पळवुन लावतात . दरोडेखोरांनी रुळांवर अडथळा म्हणुन रचुन ठेवलेले लाकडाचे ओंडके चौफेर भिरकावुन देत मालगाडी पुढे जात राहाते .

७० एम एम सिनेमास्कोप पडद्याची खरी मजा , खरे महत्व त्याला त्या दिवशी कळले होते . पडद्यावरुन त्याला आज परत आठवले . आपल्या टॉकिजचा पडदा सोनेरी , रुपेरी का चंदेरी असा त्याचा मित्रांशी वाद झाला होता .

"आपण 'मेकेन्नाज गोल्ड' बघितला होता .. आठवते का ? त्यातले सोन्याच्या खाणीतले सोने अगदी डोळ्यांना त्रास होइल एवढे चमकते . ते का माहितीय का ? "
"का ?"
"कारण आपल्या आपल्या टॉकिजचा पडदा सोनेरी आहे म्हणुन .." असा त्याने युक्तीवाद केला होता .

हे सर्व आठवुन त्याला सहज हसु आले . तोपर्यंत पुढचा सीन दिसु लागला . हा सीन एका मराठी सिनेमातला होता .

"काय साहेब ..आज कुठल्या माडिवर ? " अशोक सराफचा इरसाल सदा बेरकीपणाने विचारत होता . त्याला तेवढ्याच रगेलपणाने " ए गाववाल्या पावण्या , आम्ही कुठं जातो , काय करतो यामध्ये अजिबात पडायचं नाही . आणि दादालाही यातलं काही सांगायचं नाही . जर सांगीतलस तर आमच्याइतकं वाईट कोण नाही ." असा भेदक दम देणारा सदाशिव अमरापुरकर यांचा काका . या दोन दिग्गजांची अभिनयातील जुगलबंदी या सिनेमामुळे बघायला मिळाली होती .

अचानक पुढच्या सीनमध्ये त्याला बॉक्सिंगची रिंग आणि त्याभोवती उसळलेली गर्दी दिसु लागली . अजस्त्र , राक्षसी प्रतिस्पर्ध्यांचे भयानक ठोसे शांतपणे सहन करणारा , आपल्या घणाघाती पंचेसनी अखेरीस त्यांना लोळवणारा जिगरबाज रॉकी बाल्बोआ त्याला दिसत होता . आपल्या किंचीत बोबड्या आवाजात "यो पॉली .. व्हात अबाउत वन फायनल बाउट .. वन लास्ट फाईट" म्हणत वय आणी शरीर साथ देत नसतानाहि परत परत रिंगमधे उतरणारा धाडसी इटालिअन ब्लॅक स्टॅलिअन .

परत पडद्यावरचा सीन बदलला . शत्रुचा पाठलाग करत एका सगळिकडे आरसेच आरसे असलेल्या दालनात आलेला ब्रुस ली . जिकडे पाहावे तिकडे स्वताचेच प्रतिबिंब पाहुन क्षणभर गोंधळलेला .. त्याच्या या स्थितीचा फायदा घेउन त्याच्या पाठीमागुन दबकत दबकत येउन त्याच्यावर वार करणारा कपटी खलनायक .. अर्थात शेवटी नायकच जिंकतो .

आता पड्द्यावर क्लायमॅक्सचा सीन सुरु झाला होता . मानवजातीच्या रक्षणासाठी मानवांनीच भविष्यातुन पाठवलेला एक अजस्त्र यंत्रमानव रुबाबदार गॉगल घालुन बुलेटवरुन आगीच्या ज्वाळांवरुन येतो . विरुद्ध पक्षाच्या अतीशक्तीशाली यंत्रमानवाशी असंख्य वेळा झुंज घेत काटेकोरपणाने आपले काम , आपले मिशन पार पाडतो . शत्रुचा नायनाट झाल्यावर स्वतालाही उकळत्या पोलादात झोकुन देतो . त्याचे अखेरचे शब्द तर परिचित आहेत -- "आय विल बी बॅक"

पडदा आता शांत झाला होता . त्याचेही मन आता शांत झाले होते . या अनोख्या अनुभवामुळे त्याची उदासी दुर झाली होती . पलिकडचा EXIT चा दरवाजा थोडा उघडला गेला होता . तिथुन बाहेर पडताना तोही आपल्या मनाची समजुत घालत होता . धीर देत होता .

" हे थिएटर जरी पाडले गेले तरी नवीन मॉलमध्ये या थिएटरच्याच नावाचे मल्टीप्लेक्स होणार आहे . त्यामुळे आपले या ठिकाणी पिक्चर पाहायला येणे जाणे होत राहणार आहे . या जागेला , इथल्या आठवणींना आपण कायमचे दुरावणार नाही . तेव्हा हि काही शेवटची भेट नाही . आय विल बी बॅक . आय विल बी बॅक ."

पड्द्यावर क्लायमॅक्सचा सीन सुरु असताना डोअरकीपर ज्या निर्विकारपणे EXIT चा दरवाजा उघडतात त्याच निर्विकारपणे तो हॉलमधुन बाहेर पडला .

"आय विल बी बॅक . आय विल बी बॅक" असे पुट्पुटत तो बाहेर आला तेव्हा तिथे बरेच मजुर हातात फावडी , घमेली घेउन तयारीत होते . दोन बुलडोझरही आलेले होते . तिथला सुपरवायझर मजुरांना कामाच्या सुचना देत होता.

त्याला पाहुन तो सुपरवायझर धावत त्याच्यापाशी आला आणि म्हणाला .

"साहेब , सगळे मजुर आले आहेत . मशिनरीही रेडी आहे . कामाला सुरुवात करायची ना ?"

त्याने परत एकदा मन घट्ट केले . आणी होकार दिला .

----------- समाप्त ---------- काल्पनीक ----------------------------

इतर लेखन

कथालेख

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

7 Aug 2016 - 11:52 pm | अभ्या..

आहहह, परफेक्त.
अबसोल्युट मास्टरपीस.
दि एन्ड तर अल्टिमेट.
सिरुसेरीजी सॅल्यूट.

संदीप डांगे's picture

18 Aug 2016 - 12:36 am | संदीप डांगे

+१

ज्योति अळवणी's picture

8 Aug 2016 - 12:03 am | ज्योति अळवणी

अप्रतिम सुंदर लिहिलं आहे. खरच खूप आवडलं

शेवट अतिशय परिणामकारक! फार छान कथा.

पद्मावति's picture

8 Aug 2016 - 12:46 am | पद्मावति

आहा!!!!! अप्रतिम. अतिशय सुंदर लिहिलंय.

निखिल निरगुडे's picture

8 Aug 2016 - 5:22 am | निखिल निरगुडे

Nostalgic! मस्त!

एक एकटा एकटाच's picture

8 Aug 2016 - 7:31 am | एक एकटा एकटाच

शेवट सुरेख आहे

सर्वसामान्य's picture

8 Aug 2016 - 8:04 am | सर्वसामान्य

असाच किस्सा पुलंनी लंडनच्या नाटकप्रेमी कॉन्ट्रॅक्टर बद्दल लिहीलाय. बहूतेक अपूर्वाईमधे

सिरुसेरि's picture

9 Aug 2016 - 2:09 pm | सिरुसेरि

"असाच किस्सा पुलंनी लंडनच्या नाटकप्रेमी कॉन्ट्रॅक्टर बद्दल लिहीलाय. बहूतेक अपूर्वाईमधे " --

+१०० . पुलंनी लिहिलेली ती आठवण मनात घर करुन जाते .

बोका-ए-आझम's picture

18 Aug 2016 - 7:14 pm | बोका-ए-आझम

अपूर्वाई मध्ये नाही, जावे त्यांच्या देशा मध्ये लिहिलाय. गुडबाय मिस्टर सान फ्रान्सिस्को या लेखात. मला वाटतं आॅर्फियम असं त्या थिएटरचं नाव आहे.
सिरुसेरीजी, मस्त कथा!

नाखु's picture

8 Aug 2016 - 8:52 am | नाखु

हुच्च आणि परिणामकारक...

जगप्रवासी's picture

8 Aug 2016 - 6:22 pm | जगप्रवासी

खूप छान

विप्लव's picture

8 Aug 2016 - 6:39 pm | विप्लव

खुपच सुंदर कथा

विप्लव's picture

8 Aug 2016 - 6:39 pm | विप्लव

खुपच सुंदर कथा

बाबा योगिराज's picture

8 Aug 2016 - 8:01 pm | बाबा योगिराज

क्या बात, क्या बात, क्या बात.

स्रुजा's picture

8 Aug 2016 - 9:47 pm | स्रुजा

अप्रतिम !!

सिरुसेरि's picture

9 Aug 2016 - 2:10 pm | सिरुसेरि

सर्वांना मनापासुन धन्यवाद

खटपट्या's picture

9 Aug 2016 - 9:38 pm | खटपट्या

वा खूप मस्त...

गामा पैलवान's picture

10 Aug 2016 - 12:32 am | गामा पैलवान

सिरुसेरी,

कथा प्रत्ययी आहे. वाचतांना आमचं ठाण्याचं प्रताप टॉकीज डोळ्यासमोर आलं. मी चित्रपटांचा पंखा नाही. पण प्रताप टॉकीज पाडून व्यापारी संकुल उभं राहिलं तेव्हा कित्येकांची अशीच परिस्थिती झाली असणार, हे ताडता आलं.

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद . या कथेची प्रत्येकाच्या मनात स्वतःची अशी एक version / आवॄत्ती असणार याची कल्पना आहे .
आपला अनुभव शेअर केल्याबद्दल मनापासुन आभारी आहे .

क्षमस्व's picture

10 Aug 2016 - 9:15 pm | क्षमस्व

खूपच सुंदर

सिरुसेरि's picture

11 Aug 2016 - 7:11 pm | सिरुसेरि

मनापासुन आभार .

जव्हेरगंज's picture

11 Aug 2016 - 8:21 pm | जव्हेरगंज

खल्लास!
भारी लिहीलंय!!

Cross De Lena's picture

17 Aug 2016 - 9:10 pm | Cross De Lena

Sundar katha. Chan lihilay.

निओ's picture

18 Aug 2016 - 4:56 pm | निओ

आवडली

सिरुसेरि's picture

26 Aug 2016 - 6:53 pm | सिरुसेरि

@निओ - तुमचे नाव वाचुन मॅट्रिक्समधले द वन निओ , मॉर्फिअस , ओरॅकल आठवले .

निओ's picture

9 Sep 2016 - 12:40 am | निओ

ट्रिनिटी राहिली :)

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2016 - 5:18 pm | प्रभाकर पेठकर

कुठल्याही वास्तुशी असलेली भावनिक गुंतणूक अशा प्रसंगी विद्ध करून जाते.

भम्पक's picture

26 Aug 2016 - 8:03 pm | भम्पक

एकदम भारी लिहिलंय....

सिरुसेरि's picture

5 Nov 2020 - 8:15 pm | सिरुसेरि

आजपासुन टॉकिजे सुरु होणार म्हणुन आठवण झाली . ( जाहिरात .... ) .

नीलस्वप्निल's picture

6 Nov 2020 - 11:51 am | नीलस्वप्निल

माधव चित्रमन्दीर, सन्गमनेर नुकतच पाडल... ज्या दिवशी बातमी ऐकली, अगदी ह्याच भावना मनात आल्या होत्या.... त्या शब्दबध्ध केल्या तुम्ही......