पुतळा ( लघु कथा )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
23 Sep 2008 - 6:19 pm

पुतळा
------------------------------------------------------

' साहेब ...'

' बोल ...'

' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? '

' बरं ? मगं ? '

' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? '

' कोणती घोषणा ? '

' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ?

आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्‍यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! '

' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .'

' बरोबर ! '

' या कामात आपण त्यांना मदत करु ! '

' का ? '

' म्हणजे वर्गणीचा काही भाग आपल्या खजिन्यात जाऊ शकेल !'

' हं ! हे ही बरोबर ! '

' पुतळा उभा केल्यानंतर कुणी ना कुणी, कधी ना कधी , पुतळयाची विटंबना करणारच ! '

' अं ...'

'...... आणि तसं नाही झालंच, तर आपण ती व्यवस्था करु ... काय?

' पण का ? '

' त्या निमित्याने शहरात दंगा होईल. जाळपोळ, लुटालुट होईल. मग काय, आपली चांदीच चांदी ... काय ?'

' खरंय साहेब ...'

साहित्यिकसमाजप्रकटन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 6:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीपण झकास जमल्येय कथा! मस्त टोले हाणताय तुम्ही! येऊ द्या अजूनही!

अदिती

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2008 - 6:55 pm | प्रभाकर पेठकर

कथेत विशेष जीवंतपणा आढळला नाही. कथाबिजाच्या अभावाने लिखाण सपक झाले आहे.

पुढील कथेसाठी शुभेच्छा!

प्राजु's picture

23 Sep 2008 - 8:35 pm | प्राजु

जिवंतपणा नाही जाणवला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

23 Sep 2008 - 8:44 pm | धनंजय

पण जरा लांबली आहे.

"यू सेड इट" प्रकारचे मस्तपैकी व्यंगचित्र करण्यालायक कल्पना आहे.

गल्ली-गुंड-छाप पुढारी त्याच्या बावळट पंटरला म्हणत आहे :
"विरोधकाच्या पुतळ्यासाठी चंदा का गोळा करायचा विचारतोस? पुढे त्याला शेण फासायचा ऍडव्हान्स घेऊन ठेवलेलाय!!!"
(मागे म्हटले की कथा फार तोकडी आहे. आता म्हणतो फार लांबली आहे. काहीतरी कुस्पटे काढायची - टीकाकार म्हणून माझे भविष्य उज्ज्वल आहे.)

अमोल केळकर's picture

24 Sep 2008 - 8:37 am | अमोल केळकर

आपल्या चांगल्या / वाईट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बिन्धास्त बबनी's picture

24 Sep 2008 - 10:34 am | बिन्धास्त बबनी

राजनेत्याचा पुतळा म्हणजे नक्की कोणाचा? राजनेते अनेक!राजचा तर नव्हे ना?

बिन्धास्त बबनी's picture

24 Sep 2008 - 10:37 am | बिन्धास्त बबनी

ही अतिलघुकथा आहे कां?