मिपा बाप्पा मोरया

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
7 Jul 2016 - 5:30 pm

नमस्कार मंडळी.
गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात.
मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास बरेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला.
हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः
१) तुम्ही स्वतः काढलेला गणेश. कोणत्याही माध्यमात असु द्या. पेन्टींग असले तर स्कॅन करुन पाठवा. म्युरल/मूर्ती असेल तर फोटो काढून पाठवा. पेन्ट फोटोशॉप मध्ये केलेला असेल तर फाइल पाठवा. फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल(एडीट न केलेली) पाठवा. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी.

आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात.

२) तुम्ही स्वतः रचलेले गणेशाशी संबंधित छोटेसे काव्य/चारोळी पाठवावी. ह्यासाठी मात्र फक्त आठ ओळींची मर्यादा आहे. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी.
.
आता हे कशासाठी?
तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्‍या मिपाकरांकडून सांगून सवरुन बनवून लावायची आहेत. इथून बर्‍याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्‍याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे.
तर मग चला. लागा कामाला.
काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील.
आपल्या एंट्रीज पाठवण्यासाठी मेलआयडी लवकरच कळवला जाईल तोपर्यंत......
होऊ दे चर्चा....

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

11 Aug 2016 - 7:41 pm | अभ्या..

सुडूक फास्ट. तुझा रुमाल टाकलेला आहे. ऐनवेळी टांगारुपणा नको.

संजय पाटिल's picture

11 Aug 2016 - 7:36 pm | संजय पाटिल

कोलाज चालेल का?

होय मालक चालेल, इमेज मात्र जेपीइजी अथवा बिटमॅप द्या.
(माझ्या डोसक्यात दोन टाइपचे कोलाज आलेत बरका. एक म्हणजे कागद, तंतू, कापड वगैरे फाडून त्याचे त्तुकडे एकमेकाला लावून केलेला ट्रॅडिशनल कोलाज आणि दुसरा म्हणजे सध्या अ‍ॅप्स मध्ये केला जाणारा वेगवेगळया फोटोंचा संच म्हणजे कोलाज)
तुम्ही कोणता पाठवणार आहात?

अभ्या..'s picture

16 Aug 2016 - 2:33 pm | अभ्या..

नमस्कार मंडली,
ह्या चित्रमालेला गणेशोत्सवाच्या दिवसाइतक्या १० प्रवेशिका येतील का ह्याची चिंता होती पण आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अगदी मला माहीतही नसलेल्या आयडींकडून छान छान अन वेगवेगळ्या माध्यमातली चित्रे आली आहेत. वेळ आहे आता बस्स म्हणायची.
आता मिपाकरांनी कृपया चित्रे अथवा फोटो पाठवू नका.
फक्त ज्यांनी काही तयार करण्यास सुरुवात केलीय त्यांनी उद्या पर्यंत (दि.१७-०८-२०१६) पाठवली तरी चालतील. त्यांची चित्रे एका धाग्यात मांडली जातील.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

16 Aug 2016 - 8:12 pm | चांदणे संदीप

आस नाय दादूस.... आता बास नाय मानायचा!
मिपाकर पेटलेत आता! ;)

सूड's picture

16 Aug 2016 - 8:21 pm | सूड

इतक्या उशिरा?

असा कं करतस बाला, जगू दे ना मना. येवरे दिवस कं बोललो का?