मिपा बाप्पा मोरया

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
7 Jul 2016 - 5:30 pm

नमस्कार मंडळी.
गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात.
मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास बरेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला.
हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः
१) तुम्ही स्वतः काढलेला गणेश. कोणत्याही माध्यमात असु द्या. पेन्टींग असले तर स्कॅन करुन पाठवा. म्युरल/मूर्ती असेल तर फोटो काढून पाठवा. पेन्ट फोटोशॉप मध्ये केलेला असेल तर फाइल पाठवा. फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल(एडीट न केलेली) पाठवा. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी.

आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात.

२) तुम्ही स्वतः रचलेले गणेशाशी संबंधित छोटेसे काव्य/चारोळी पाठवावी. ह्यासाठी मात्र फक्त आठ ओळींची मर्यादा आहे. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी.
.
आता हे कशासाठी?
तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्‍या मिपाकरांकडून सांगून सवरुन बनवून लावायची आहेत. इथून बर्‍याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्‍याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे.
तर मग चला. लागा कामाला.
काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील.
आपल्या एंट्रीज पाठवण्यासाठी मेलआयडी लवकरच कळवला जाईल तोपर्यंत......
होऊ दे चर्चा....

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

चारोळी येत नसेल तर नुसते चित्र काढण्याचा प्रयत्न केला तर चालेल का ?

ते वेगवेगळ्या एन्ट्री हायेत रे. कोणतीही एक पाठवली तरी चालेल. दोन पाठवल्या तर अजून भारी.
तुला काय म्हणा अवघड.

फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल >> तुम्ही एडिटणार का?

अभ्या..'s picture

7 Jul 2016 - 5:39 pm | अभ्या..

हा.
थोडासा. ;)

यशोधरा's picture

7 Jul 2016 - 5:40 pm | यशोधरा

ओके.

मस्त उपक्रम. अनेक शुभेच्छा.

किसन शिंदे's picture

7 Jul 2016 - 5:55 pm | किसन शिंदे

मी ही प्रयत्न करेन चित्र काढण्याचा

अभ्या..'s picture

11 Aug 2016 - 7:42 pm | अभ्या..

ओ प्रयत्न शिंदे,
कुठवर आलाय बप्पा?

मुक्त विहारि's picture

7 Jul 2016 - 6:18 pm | मुक्त विहारि

बाकी चित्रकला म्हटल्यावर आमचा पास.

सूड's picture

7 Jul 2016 - 6:23 pm | सूड

प्रयत्न करतो.

आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं करायचं रे बाबा?

ते बघा नवनास्तिक चित्र काढायचा प्रयत्न करु म्हणतायेत, शिका काहीतरी!!

किसन शिंदे's picture

7 Jul 2016 - 7:11 pm | किसन शिंदे

बघ की.. चित्र काढण्याचा आणि आस्तिक किंवा नास्तिक असण्याचा काय संबंध? येडच्चे ह्ये वल्ली ;)

अभ्या..'s picture

7 Jul 2016 - 7:13 pm | अभ्या..

सहमत.
येडं असण्याला. ;)

राघवेंद्र's picture

7 Jul 2016 - 8:00 pm | राघवेंद्र

:)

नाखु's picture

8 Jul 2016 - 8:41 am | नाखु

तुम्ही चित्र म्हणून काढा आम्ही देव म्हणून सजून घेऊ.. (संदर्भ दिवार सिनेमा आणि शशी-अमिताभ)

नाखु सिनेमावाला

मी-सौरभ's picture

7 Jul 2016 - 7:04 pm | मी-सौरभ

तुम्ही मुहुर्त न बघता पायात जोडे घालुन चित्र काढा नाय्तर कविता करा.

वेरुळातल्या हत्तीचा फोटो दे बाबा.
(च्यायला हे वल्य्याची हार्डडीस्क तपासली तर कमीतकमी ३०० लेण्यातले गणपती निघतील.)

प्रचेतस's picture

7 Jul 2016 - 7:06 pm | प्रचेतस

इतके नाय.
पन्नासेक असतील :)

अभ्या..'s picture

7 Jul 2016 - 7:08 pm | अभ्या..

कसं खरं उत्तर आलं.
दे त्यातला एक चांगला अलंकारीक बघून.

घारापुरीचा फ़्याण्टास्टिक आहे. तो देतो.

स्वच्छंदी_मनोज's picture

7 Jul 2016 - 8:17 pm | स्वच्छंदी_मनोज

माझ्याकडेही काही किल्ल्यांवरचे काही वेगळे गणेश फोटो आहेत.
त्ये चालत्याल काय? की वल्लीसाहेबांसारखे मोठ्या मोठ्या साहेब लोकांचेच घेणार :) :)

वल्ली गडभ्रमणातला राजगड असला तरी तूही रायगड आहेस हे आम्हाला म्हैतेय.
तू काहीही पाठव, ते अनवट आणि अनमोलच असणार.

कवापत्तोर पायजे? नाय, आमास्नी येक गिलास पेंटिंग करायचंय. कवा पायजे सांगशिला तसं पिलान करु!!

अक्खा म्हैनाय बघ. 15 ऑगस्ताचा झेंडा फडकायच्या आत दिलास तर भारी, नंतर मागे लागावे अशी परिस्थिती आणू नकोस फक्त.
आणि तुझे चित्र मस्ट आहे हे लक्षात ठेव.

सुडक्या, वल्ल्या, मनोज आणि किसना ह्या मावळ्यांनी नुसत्या गप्पा मारलेल्या आहेत. कृपया चित्रे आणि फोटो मेल आयडी दिला आहे तिथे पाठवून देण्याची कृपा करावी. मंडळ आपली वाट पाहात आहे.

सूड's picture

3 Aug 2016 - 3:18 pm | सूड

देतो जी, वायच दम धरा.

आपण दोघे प्रसाद फस्त करू.

स्रुजा's picture

7 Jul 2016 - 7:08 pm | स्रुजा

मस्त उपक्रम !

एसमास्टर आणि विरुपाजी कडून सुलेखनातला बाप्पा अपेक्षित आहे हो.

भोळा भाबडा's picture

7 Jul 2016 - 7:20 pm | भोळा भाबडा

कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर कसं ओळखणार??

त्याचं मन त्याला नै खाणार?
असो.
कल्पना झकास.. सच्चे मिपाकर मेजवानीस तयारच आहेत!

चतुरंग's picture

7 Jul 2016 - 9:20 pm | चतुरंग

आम्ही ओळखू! ;)

राजाभाउ's picture

21 Jul 2016 - 6:35 pm | राजाभाउ

गुगलोबा सगळ शोधुन द्येतोय.
https://support.google.com/websearch/answer/1325808?hl=en

मोहनराव's picture

7 Jul 2016 - 7:26 pm | मोहनराव

चांगला उपक्रम!!

रातराणी's picture

7 Jul 2016 - 11:57 pm | रातराणी

मीही प्रयत्न करेन चित्र काढण्याचा!

अभ्या..'s picture

8 Jul 2016 - 4:45 pm | अभ्या..

आयोव.....

ल्ल्लूउउउउ नवचित्रकाराचे असे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या अभ्या.. चा निषेध निषेध निषेध. आता बघच तू. :X

चांदणे संदीप's picture

8 Jul 2016 - 7:08 am | चांदणे संदीप

मै भी कुछ करूंगा! (कुछ म्हणजे चित्र किंवा चारोळी)

Sandy

करनाच पडेंगा रे सॅन्डयीबाबा. अपने घर का काम है.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jul 2016 - 7:59 am | कैलासवासी सोन्याबापु

जल्ला आपल्याला इतकी तरल बुद्धी अन कलाकारी दृष्टिकोन असता तर बहार आली असती! मरू दे आम्ही आपली निरीक्षण भक्ती करू रे अभ्याव!

भक्ती होनाच सोल्जरभावा. उसके बिना बाप्पा आतेच नई.

बापु आम्ही पण तुमच्याबरोबर.

जगप्रवासी's picture

8 Jul 2016 - 12:16 pm | जगप्रवासी

न रंगवलेलं, फक्त बाप्पाचं चित्र काढलेलं चालेल का? मला चित्रात रंग भरता येत नाहीत.

अभ्या..'s picture

8 Jul 2016 - 1:09 pm | अभ्या..

हावो,
अवश्य चालतील, वाटल्यास रंगवून मी देईन एक कॉपी तुम्हाला.

काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करते.

प्रमोद देर्देकर's picture

8 Jul 2016 - 3:39 pm | प्रमोद देर्देकर

एका कागदावर पेन्सिलने रेखाटले गणेश चित्र चालेल काय? पहिल्यांदाच प्रयत्न करेन. बघुया जमतंय काय.

सस्नेह's picture

8 Jul 2016 - 4:04 pm | सस्नेह

'तारें जमीन पर' आठवला !

नीलमोहर's picture

8 Jul 2016 - 8:12 pm | नीलमोहर

बाप्पांसाठी आणि मिपासाठी काहीपण.

चित्र नाय जमणार, ओरिगामी गणेश चालेल का?

अभ्या..'s picture

9 Jul 2016 - 9:45 am | अभ्या..

चालेल, धावेल, नाचेल.
मला वाटले सुधांशू दा ओरिगामी बाप्पा देतील पण तू आहेस मग भारीच.
पिंग्या लेका मला शिकीव कि थोडीसी ओरिगामी.

सुधांशुनूलकर's picture

10 Jul 2016 - 6:45 pm | सुधांशुनूलकर

ओरिगामी बाप्पा तयार आहे.
पण मोदक आणि उंदीर याशिवाय गणपती कसा असेल?
म्हणून बाप्पाबरोबर ओरिगामी बहुरंगी मोदक आणि उंदीरही पाठवतो.
पिंगूनेही जरूर पाठवावा.

पिंग्या लेका मला शिकीव कि थोडीसी ओरिगामी.== थोडासा धिर्धर भावा, या डिसेंबरमध्ये मुंबईत ओरिगामी प्रदर्शन आहे, त्यानिमित्त काही सोप्या ओरिगामी कलाकृतींचे व्हिडिओ बनवून मिपावर टाकणार आहे दिवाळीच्या सुमारास.

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 7:06 pm | अभ्या..

भारीच ओ सुधांशूदा,
येऊ द्या. वाट पाहतो.

सुधांशुनूलकर's picture

10 Jul 2016 - 7:24 pm | सुधांशुनूलकर

बाप्पा साकारायला इतरही काही माध्यमं सुचली ती अशी -
क्विलिंग
फुलांची रांगोळी (calling आत्मूगुर्जी)
रांगोळी
भरतकाम, विणकाम
कागदाचा लगदा (papier mâché)

या माध्यमांतूनही बाप्पा साकारला तर चालेल का? चालणार असेल, तर या कलांमध्ये पारंगत मिपाकरांनी जरूर भाग घ्या.

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 7:30 pm | अभ्या..

चालेल चालेल.
फक्त त्याचा फोटू पाठवावा लागेल.
मूळ कलाकृती मिपाला दिली तर ठेवावी कुठे हा प्रश्न असल्याने मी घरी नेईन याची नोंद घ्यावी. ;)

क्विलिंग ची कल्पना भारी आहे!!

पिशी अबोली's picture

9 Jul 2016 - 12:47 pm | पिशी अबोली

वा:! अजून एक भारी उपक्रम..वाट बघतेय.

बहिणाबाई नुसती वाट बघू नकोस, कोकणी,भटी किंवा मालवणीतल्या गणेशस्तुतीच्या चार ओळी लिहून पाठव. संस्कृत पण चालेल.

पिशी अबोली's picture

9 Jul 2016 - 1:20 pm | पिशी अबोली

येस, प्रयत्न तर होणारच..☺

ह्या उपक्रमात प्रत्येक मिपाकर सामील झाला पाहिजे. या ना त्या स्वरूपाने.
आपले मुटेकाका पण गझल पाठवणारेत. ;)
आता बघा तुम्हीच आणि काय पाठवायचे त्याच्या मागे लागा

माहितगार's picture

9 Jul 2016 - 1:03 pm | माहितगार

सांस्कृतीक समरसता दर्शवण्याच्या दृष्टीने गणपतीबाप्पांनी स्कलकॅप चा मुकुट घातलेलेल्या चित्राची एंट्री चालू शकेल का ?

शिद's picture

9 Jul 2016 - 2:17 pm | शिद

होय, चालेल की.

आणखी समरसता दाखवण्यासाठी गणपतीच्या हातात क्रॉस व कमरेला क्रिपाण/कॄपाण पण दाखवा, कसं? ;)

(ह.घ्या.)

हे सुचलच नव्हतं आयडीया चांगली आहे. :)

लालगरूड's picture

10 Jul 2016 - 7:13 pm | लालगरूड

काय काय केले तर चालेल

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 7:32 pm | अभ्या..

आपणास काय येते गरुडपंत?
कलेतील गणेशाचे कोणतेही स्वरुप पाठवा. ते घेऊ आपण.

लालगरूड's picture

11 Jul 2016 - 2:11 pm | लालगरूड

आपलं काम झाल आहे... :)

चांदणे संदीप's picture

11 Jul 2016 - 7:03 am | चांदणे संदीप

नक्की पिल्यान काय हाय?
:/

अभ्या..'s picture

21 Jul 2016 - 5:43 pm | अभ्या..

नमस्कार मंडळी.
आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात.
.
डिअर सासंमं: कृपया हे धाग्यात अ‍ॅड करा.

सूड's picture

21 Jul 2016 - 6:26 pm | सूड

ओकेज!!

चांदणे संदीप's picture

26 Jul 2016 - 6:00 pm | चांदणे संदीप

आज रात्री माझ्या चार ओळी आणि एक लहानसे चित्र कम नक्षीकाम जीमेलच्या पोस्टात!

हुर्रे!

Sandy

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 9:09 pm | अभ्या..

ह्ये जिगर,
एकच वादा, संदीपदादा.
धन्यवाद भावा.

चांदणे संदीप's picture

26 Jul 2016 - 11:02 pm | चांदणे संदीप

डन डना डन डन!

पद्मावति's picture

21 Jul 2016 - 7:57 pm | पद्मावति

वाह, मस्तं उपक्रम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2016 - 6:30 am | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट उपक्रम !

मूळ कल्पना आणि प्रतिसादातल्या सूचना एक लंबर !!

या वेळेचा मिपा गणेशोत्सव कलेच्या थाटामाटात चमकणार असेच दिसतेय !!!

मुलांनी काढलेले चित्र चालेल का

मितभाषी's picture

29 Jul 2016 - 7:01 am | मितभाषी

एका सदस्याच्या किमान दोन एंट्री घेऊन त्यातुन बेस्ट निवडा.

मुलांनी काढलेल्या एन्ट्र्या आल्या आहेत.
प्लीज, प्लीज ही स्पर्धा फक्त मिपाकरांसाठी आहे. त्यांच्या छोट्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीत सेपरेट आहे स्पर्धा.
तरी बच्चेलोग अभी ठोडा रुकनेका.

माझी वेंट्री पाठवली रे अभ्या :)

थोडे अवांतर करतोय त्याबद्दल क्षमस्वः
१००% शाडुची गणेशमुर्ती कशी ओळखायची याच्या काही टीप्स मिळतील का?
पिंपरी चिंचवडमधे अशी मुर्ती कोठे मिळेल याची माहिती दिल्यास अजुन उत्तम.

चांदणे संदीप's picture

29 Jul 2016 - 11:50 am | चांदणे संदीप

डाखवे बंधू, मूर्तीकार. विठ्ठल मंदिरापासून सेंट उर्सुला शाळेकडे जाताना डाव्या बाजूला एका छोट्या गल्लीत पण चांगल्या मोठ्या जागेत यांचे मूर्तीचे दुकान + घर आहे. मी मागच्याच शनिवारी गेलो होतो. उदया संध्याकाळी परत जाणार आहे. सध्या त्यांच्याकडे १०० ते १२५ शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. शाडू मातीची मूर्ती ही जड असते प्लॅस्टर पेक्षा.

धन्यवाद,
Sandy

सौंदाळा's picture

29 Jul 2016 - 2:28 pm | सौंदाळा

धन्यवाद सँडी
या किंवा पुढच्या आठवडाअखेर नक्की भेट देईन.

नाखु's picture

5 Aug 2016 - 8:51 am | नाखु

माझ्याकडून संदीपला धन्यवाद...

येत्या शनिवारी चक्कर टाकेन (आणि हो तुझे नाव नक्की सांगणार कवीवर्य संदीपभौंनी पाठवले म्हणून)

माझी चित्रकला प्रचंड वाईट आहे त्यामुळे जे काही काढेन त्याला गणपती समजून घ्याल का ?

अभ्या..'s picture

3 Aug 2016 - 2:02 pm | अभ्या..

बिंदास हो, एकदम बिंदास.
मी काही केले तरी त्याला बॅनर म्हणतात लोक. ;)
त्यामुळे घाबरनेका नै. बिंदास भेजनेका.

मिपा बरॊबरची आनंददायी सुरुवात बाप्पाच्या म्युरलचे छायाचित्र पाठवून केली आहे.
धन्यवाद.

अभ्या..'s picture

4 Aug 2016 - 2:06 pm | अभ्या..

दॅटस ईट.

मानले तुम्हाला भौ. एकच नंबर. जिओ.

स्वाती दिनेश's picture

5 Aug 2016 - 1:14 pm | स्वाती दिनेश

उपक्रम छान आहे, आवडला.
स्वाती

पाठवायची लास्ट तारीख़ कधी आहे

अवं पाटील, लास्टंबेस्ट तारीख तर १५ ऑगस्ट आहे की. पाठवा पाठवा लवकर.

अर्धा प्रयत्न झालेला आहे, उरलेला अर्धा लवकरात लवकर करणेत येईल.