हायकू – एक काव्य प्रकार

उल्का's picture
उल्का in जे न देखे रवी...
27 Jun 2016 - 6:24 pm

अचानक पावसाची सर यावी आणि चिब भिजवून जावी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय. वाचनात अचानक एक हायकू आली आणि मला त्यात ओढून घेऊन गेली. हायकू पूर्वी ऐकली/वाचली तेव्हा साहित्य, काव्य ह्यात जेमतेम रस होता. त्यामुळे तेव्हा दुर्लक्षित राहिलेली हायकू आज मात्र वेड लावून गेली.

तीन ओळींचे हे मुळचे जपानी काव्य निसर्गाशी जवळीक साधणारं, मनाला भिडणारं, समजायला खूप सोप्प असं आहे. ते क्लिष्ट नाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेन मी. गुगल राजाला विविध प्रकारे आळवणी केल्यावर खूप माहिती वाचायला मिळाली.

हायकूचे नियम कळले. 'हायकू' ही तीन ओळींची कविता. पूर्वार्धात एक विधान केलेले असते. उत्तरार्धात कलाटणी असते. पहिल्या व तिसर्‍या अथवा दुसर्‍या व तिसर्‍या ओळीत यमक साधलेले असते.

तेव्हा आता प्रयत्न तर करायलाच हवा असे ठरवले.

१. पहिला पाऊस आला
घेऊन मातीचा सुवास
नि एक तृप्त निश्वास

२. झाडावरती सरडा
चढला बदलत रंग
जन त्यासी शोधण्यात दंग

३. पिल्लाने उघडली चोच
आतून होती लाल लाल
कावळा भरवी भुकेचा घास

४. निष्पर्ण झाड
गर्द लाल झालं
गुलमोहोराने बहरून गेलं

५. डांबरी रस्ता अचानक
निळा निळा झाला
जांभळांनी त्याला आपलासा केला

माहित नाही हेच हायकू का ते? जाण्कारांनी प्रकाश टाकावा ही विनंती. त्यासाठीच इथे लिहिले आहे. पहिलाच प्रयत्न आहे. हे रोजचे दिसणारे स्तंभित करणारे माझे अनुभव आहेत हे नक्की. एक स्पष्ट करते की मी काही कवयित्री नाही. तेव्हा लगेच उत्कृष्ट हायकू जमेल असे कसे म्हणू मी?

– उल्का कडले

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

27 Jun 2016 - 6:30 pm | पद्मावति

सिंपल आणि स्वीट!!
१ आणि ५ बेस्ट!!

उल्का's picture

27 Jun 2016 - 7:54 pm | उल्का

धन्यवाद पद्मावति.

हायकूमध्ये फक्त एखादी घटना वर्णिलेली असते. मानवी भावभावना ह्या त्या घटनेतून अप्रत्यक्षरित्या केवळ सूचित केलेल्या असतात. त्यादृष्टीने तुमच्या त्रिवेण्यांना हायकू म्हणता येणार नाही.

मित्सुबिशी बाशो यांच्या हायकू छान आहेत.

एस's picture

27 Jun 2016 - 7:00 pm | एस

*मात्सुओ बाशो.

प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद एसजी.
मी त्याच पद्धतीने करायचा प्रयत्न केलाय.
जमलं नाही तर. :(

चतुरंग's picture

28 Jun 2016 - 1:21 am | चतुरंग

तुमच्याच कल्पनांवरती थोडा फेरबदल करुन हायकू कदाचित असे दिसतील....

१. पहिला पाऊस
मातीचा सुवास
जमिनीचा तृप्त निश्वास

२. रंगवला कुणी?
झाडावरती करडा
आत्ता सरडा!

३. एक घास काऊचा
भुकेली चोच इवली
लाल चिमुकली!

४. निष्पर्ण,
गर्द लाल
मनात गुलमोहोर!

५. डांबरी कुळकुळीत
अचानक निळा निळा
लगडला जांभळांनी!

(हायकूप्रेमी)रंगा

रुपी's picture

28 Jun 2016 - 1:32 am | रुपी

सुंदर!

उल्का's picture

28 Jun 2016 - 6:59 am | उल्का

रंगा भाऊ, खूप छान.
3 नं खूपच आवडली.

शिरीष पै यांचा लेख

ह्या लेखात शिरीष पै म्हणतात त्याप्रमाणे माझ्या त्या तीन ओळींच्या कविता झालेल्या आहेत. :D

अजया's picture

28 Jun 2016 - 8:19 am | अजया

उल्का, मिपावर शरद सरांचे लेख आहेत हायकुवर.नक्की वाच.

उल्का's picture

28 Jun 2016 - 9:49 am | उल्का

लिंक देऊ शकशील का?
आवडेल मला वाचायला.

नाखु's picture

28 Jun 2016 - 8:45 am | नाखु

हायकु प्रेमींनी इथेच आपली कला टंकावी म्हणजे सगळ्यांना वाचता येतील.

चतुरंग यांची फेरजुळवणी म्हणजे तेच घटक ठेऊन केलेली "सुग्रास्+चवीष्ट" पाककृती.

========

देवा मायबापा पांडुरंगा

ऐक लेकराची हाक

कर पावसाचा दंगा
==============
ता.क. आज वारीचे पिंपरी चिंचवडमध्ये आगमन म्हणून माझ्या तमाम शेतकरी बांधवांकडून विठ्ठलचरणी.
मी मिपा वारकरी नाखु

सिरुसेरि's picture

28 Jun 2016 - 1:19 pm | सिरुसेरि

================
रानातला पाचोळा
नकळत पाउल पडले
पाखरु उडुन गेले
=============

बाजीगर's picture

28 Jun 2016 - 3:06 pm | बाजीगर

ह्याचे हायकू करून दे,

मनातील काही
तनातील घाई
पेनातील शाई
संपलेली

अभंगासारखे मी लिहीलयं,
हायकू+अभंग = हायभंग
(रसभंग झाला नाही म्हणजे मिळवली )

अविनाशकुलकर्णी's picture

29 Jun 2016 - 9:50 am | अविनाशकुलकर्णी

पेनातील शाई..संपलेली
अरेरे...मग घ्या..संन्यास

माहितगार's picture

1 Jul 2016 - 1:01 pm | माहितगार

तन-मन सैरभैर लाही लाही
जन-मन रसभंग काहीबाही
मौन-मना कुठे शोधतो, लेखणी नी शाई ?

नाखु's picture

28 Jun 2016 - 3:10 pm | नाखु

एक एकदा केलेला प्रयत्न
चारोळीवाला नाखु

बाजीगर's picture

28 Jun 2016 - 3:17 pm | बाजीगर

माझ्या वरील प्रयत्नांना इतर कुणी म्हणायच्या आत,
"तुम लिखताय कायकू"
असे मीच मला म्हणतो,म्हणजे इतरांना संधी नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

29 Jun 2016 - 9:47 am | अविनाशकुलकर्णी

लालभडक तर्री ..कांदा लिंबू
साथिला मिसळपाव
.
.
लई खाव खाव सुटली राव

सिरुसेरि's picture

29 Jun 2016 - 11:59 am | सिरुसेरि

निष्पर्ण वॄक्षावर ..भर दुपारी
कुठुन हि पालवी फुटली
श्रावणाची चाहुल लागली

चांदणे संदीप's picture

29 Jun 2016 - 1:06 pm | चांदणे संदीप

मुसळधार पाऊस
कारवर बरसला
वायपरचा हात दुखला!

Sandy

जव्हेरगंज's picture

29 Jun 2016 - 6:35 pm | जव्हेरगंज

हे हे हे

कसलं भारी ना!

यशोधरा's picture

29 Jun 2016 - 6:48 pm | यशोधरा

मुसळधार पाऊस
कारवर बरसला
वायपर रुसला!

बोका-ए-आझम's picture

30 Jun 2016 - 12:17 am | बोका-ए-आझम

मस्त!

एस's picture

30 Jun 2016 - 1:47 am | एस

आभाळ भरलेलं
विजेचा लोळ
- एक तावदान थरथरलं

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Jun 2016 - 7:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी

काही आमच्याही त्रिवेण्या इथे

सुनील's picture

30 Jun 2016 - 9:07 am | सुनील

चंदनाचा पाट
सोन्याचे ताट
भाजी अळणी

नाखु's picture

30 Jun 2016 - 9:29 am | नाखु

जरासा सुटलेला
बराच सोडून दिलेला

गुंता काही पाठ सोडेना

सदा धांदरफळे "नाखु"

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2016 - 11:38 am | टवाळ कार्टा

ठेवला तांब्या बाजूला
विसरून गेले वैजूला
गुर्जी काही लिहिनात

नाखु's picture

30 Jun 2016 - 11:46 am | नाखु

असं आहे.

वर्षाव पडता प्रेमाचा
विसर पडे वैजूचा

तांब्या तिथे गौण भासे संध्यासमयी.

अगोबामागे लपलेला नाखु

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2016 - 1:25 pm | टवाळ कार्टा

=))

प्रचेतस's picture

2 Jul 2016 - 9:20 am | प्रचेतस

=))

सिरुसेरि's picture

1 Jul 2016 - 10:50 am | सिरुसेरि

काहि गाजलेली मराठी गीतेही हायकु या प्रकारामधे येत असावीत असा कयास आहे . जसे की -

"गेला गर्दीत मारुन
धक्का धक्का धक्का
द्वाड मवाली दिसतोय पक्का"

"तु तेव्हा तशी
तु तेव्हा तशी
तु बहराच्या बाहुंची"

"शुरा मी वंदिले
धारातीर्थी तप ते आचरती
सेनापती यश यांची बले"

"नभ उतरु आलं
अंग सरसरलं
रान झिम्माड झालं हिरव्या बहरात "

जागु's picture

1 Jul 2016 - 12:42 pm | जागु

उलका छान

चतुरंग बदल खुप छान वाटताहेत.

@ अविनाशकुलकर्णी,'ती'शाई नाही संपली रे बाबा,कुठे संन्यास देतोस.
@माहीतगार, good improvisation,छान सुधारणा केलीत.
@सिरूसेरी,चांगलं निरीक्षण..गाजलेली गीतं खरच हायकू वाटायला लागलीत.

दिनेश५७'s picture

2 Jul 2016 - 11:39 am | दिनेश५७

या काव्यप्रकाराची नेहमीच भुरळ पडते.
मी केलेला एक प्रयत्न:
जडावल्या तिन्हिसांजेला
ओल्या पावसाचा गंध
... झुगारले सारे बंध

ओला पाऊस दाटतो
आभाळात अनवट
... भाळावरी मळवट

चिंब रात्रीच्या उरात
पेटलेली आग आग
... उगा अंधाराला जाग

अंधाराच्या अंगावर
उजेडाचा कवडसा
... पाण्यावर ओल्या रेषा

दिनेश५७'s picture

2 Jul 2016 - 11:41 am | दिनेश५७

या काव्यप्रकाराची नेहमीच भुरळ पडते.
मी केलेला एक प्रयत्न:
जडावल्या तिन्हिसांजेला
ओल्या पावसाचा गंध
... झुगारले सारे बंध

ओला पाऊस दाटतो
आभाळात अनवट
... भाळावरी मळवट

चिंब रात्रीच्या उरात
पेटलेली आग आग
... उगा अंधाराला जाग

अंधाराच्या अंगावर
उजेडाचा कवडसा
... पाण्यावर ओल्या रेषा