हायकू – एक काव्य प्रकार
लेखनविषय:
अचानक पावसाची सर यावी आणि चिब भिजवून जावी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय. वाचनात अचानक एक हायकू आली आणि मला त्यात ओढून घेऊन गेली. हायकू पूर्वी ऐकली/वाचली तेव्हा साहित्य, काव्य ह्यात जेमतेम रस होता. त्यामुळे तेव्हा दुर्लक्षित राहिलेली हायकू आज मात्र वेड लावून गेली.
तीन ओळींचे हे मुळचे जपानी काव्य निसर्गाशी जवळीक साधणारं, मनाला भिडणारं, समजायला खूप सोप्प असं आहे. ते क्लिष्ट नाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेन मी. गुगल राजाला विविध प्रकारे आळवणी केल्यावर खूप माहिती वाचायला मिळाली.
हायकूचे नियम कळले. 'हायकू' ही तीन ओळींची कविता. पूर्वार्धात एक विधान केलेले असते. उत्तरार्धात कलाटणी असते. पहिल्या व तिसर्या अथवा दुसर्या व तिसर्या ओळीत यमक साधलेले असते.
तेव्हा आता प्रयत्न तर करायलाच हवा असे ठरवले.
१. पहिला पाऊस आला
घेऊन मातीचा सुवास
नि एक तृप्त निश्वास
२. झाडावरती सरडा
चढला बदलत रंग
जन त्यासी शोधण्यात दंग
३. पिल्लाने उघडली चोच
आतून होती लाल लाल
कावळा भरवी भुकेचा घास
४. निष्पर्ण झाड
गर्द लाल झालं
गुलमोहोराने बहरून गेलं
५. डांबरी रस्ता अचानक
निळा निळा झाला
जांभळांनी त्याला आपलासा केला
माहित नाही हेच हायकू का ते? जाण्कारांनी प्रकाश टाकावा ही विनंती. त्यासाठीच इथे लिहिले आहे. पहिलाच प्रयत्न आहे. हे रोजचे दिसणारे स्तंभित करणारे माझे अनुभव आहेत हे नक्की. एक स्पष्ट करते की मी काही कवयित्री नाही. तेव्हा लगेच उत्कृष्ट हायकू जमेल असे कसे म्हणू मी?
– उल्का कडले
वाचने
14709
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
सिंपल आणि स्वीट!!
In reply to सिंपल आणि स्वीट!! by पद्मावति
धन्यवाद पद्मावति.
हायकूमध्ये फक्त एखादी घटना
In reply to हायकूमध्ये फक्त एखादी घटना by एस
*मात्सुओ बाशो.
In reply to हायकूमध्ये फक्त एखादी घटना by एस
प्रामाणिक प्रतिसादाबद्दल
छान कविता/कल्पना!
In reply to छान कविता/कल्पना! by चतुरंग
सुंदर!
In reply to छान कविता/कल्पना! by चतुरंग
रंगा भाऊ, खूप छान.
छान आहेत कविता.
In reply to छान आहेत कविता. by अजया
लिंक देऊ शकशील का?
चांगला धागा
+१
उल्का ,छान प्रयत्न, आवडले
In reply to उल्का ,छान प्रयत्न, आवडले by बाजीगर
पेनातील शाई..संपलेली
In reply to उल्का ,छान प्रयत्न, आवडले by बाजीगर
तन-मन सैरभैर लाही लाही
असा
कायकू
लालभडक तर्री ..कांदा लिंबू
निष्पर्ण वॄक्षावर
मुसळधार
In reply to मुसळधार by चांदणे संदीप
हे हे हे कसलं भारी ना!
In reply to मुसळधार by चांदणे संदीप
मुसळधार पाऊस
In reply to मुसळधार by चांदणे संदीप
+१
एक हायकू
काही
अळणी
गुंतवळ
ठेवला तांब्या बाजूला
In reply to ठेवला तांब्या बाजूला by टवाळ कार्टा
टक्या ते
In reply to टक्या ते by नाखु
=))
In reply to टक्या ते by नाखु
=))
काहि गाजलेली
उलका छान
तू तेव्हा तशी,तू बहराच्या बाहूंची...वाह सिरूसेरि
हायकू
हायकू