पाऊस...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 9:00 pm

जडावल्या तिन्हिसांजेला
ओल्या पावसाचा गंध
... झुगारले सारे बंध

ओला पाऊस दाटतो
आभाळात अनवट
... भाळावरी मळवट

चिंब रात्रीच्या उरात
पेटलेली आग आग
... उगा अंधाराला जाग

अंधाराच्या अंगावर
उजेडाचा कवडसा
... पाण्यावर ओल्या रेषा

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2016 - 12:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर