सिरियस्ली घेऊ नका

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
18 Jun 2016 - 3:52 am

"चॉकलेट नको मला"
"मग पाच रुपये सुट्टे दया"
"नाहीत माझ्याजवळ"
"मग ठेवा ती साखर अण निघा"
-----------------------------------------------------
डायल 198
डायल 3
डायल 9
"हेलो"
"नमस्कार, मी आपली काय सहायता करू शकतो?"
"मी पन्नासचा रिचार्ज मारला. त्रेचाळीस रुपये चा बॅलेन्स आल्याचा मॅसेज आला. दुकानाच्या बाहेर आलो की दोनच मिनिटांत त्रेचाळीस रुपये उडाल्याचा मॅसेज आला"
"तुमचा इंटरनेट ऑन होता"
"दोन मिनिटांत त्रेचाळीस रुपये? माझ्या 2G फोनला तुम्ही 5G सर्विस जोडली होती काय?"
"माफ़ करा पण तुमचा इंटरनेट पॅक नसल्यामूळे मेन बॅलेन्स मधुन डिडक्शन झाले. हवं तर मी तुम्हाला त्याचे डिटेल्स देऊ शकतो"
-------------------------------------------------------------------------
"सतराशे रुपये काउंटरवर भरले का?"
"हो"
"हे घ्या तुमचे रिपोर्ट आणि आंत जाऊन डॉक्टरांना दाखवा"
तो थरथरत्या हातात रिपोर्ट आणि गोळ्यांची कॅरिब्याग घेऊन आंत जातो.
"काळजी करायचे काही कारण नाही. तुमचे सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत."
"डॉक्टरसाहेब! आहो मला साधी सर्दी झाली होती ओ! त्यालाच तुम्ही सतराशे रुपयांच्या कसल्या कसल्या टेस्ट कराव्या लावल्या आणि तिनशेचे मेडिकल लिहुन दिले"
"आहो साधी सर्दीच् झाली होती तर मग मेडिकल मधे जाऊन 'सेट्रिझिन' घ्यायचीना? इकडे कशाला आलात?"
-------------------------------------------------------------------
शाहराबाहेर धो धो वाहत आलेल्या गटाराजवळ लघुशंका करायचा उद्देश् डोळ्यासमोर ठेऊन गाडी उभा केली. एक मोठा सुस्कारा सोडुन तयारीत उभा राहिलो तेवढ्यात गटाराच्या काठावर भप् भप् करणाऱ्या इंजिनावर ध्यान गेले. अख्ख्या शहराने बाहेर काढुन दिलेल्या या सडक्या, घान पाण्याला कोणतरी बहाद्दर इंजिन लाऊन ओढतोय. 'ते कश्यासाठी?' हे पाहण्यासाठी मी इंजिनातून निघालेल्या पाईपच्या कडेने समोर गेलो.
एका भल्यामोठ्या चौकोनी खड्डयात लालजरित टॉमेटोची झाडे, मेथी, पालक, कोथंबीर डुलत होते आणि पायपातुन पडणारे पाणी घटाघटा पीत होते. पोटात उचमळुन आले म्हणुन मटकन खाली बसलो.
मला पाहुन एक भैया जवळ आला;
"साब, दु क्या दो चार किलु टमाटर? मार्केट में सौ से निचे नहीं मिलेगा! अभी अस्सी से लगाता हूँ. बोलो?"
-------------------------------------------------------------------
पंचवीस लीटरच्या दोन क्यानी दुधाने गच्च भरुन ठेवलेल्या. मन्या निरम्याचा पुडा घेऊन आला, सपकन् ब्लेड मारली आणि अर्धा अर्धा पुडा क्यानीत रिचुन दिला. मी धावतच त्याच्याजवळ गेलो.
"मन्या, तु चक्रम झालास काय? त्या क्यानीत दुध आहे"
"पन्नास लीटर दुधात पंचवीस लीटर त् पाणीच् हे"
"अबे गध्या! पाणी हे त् मग निरमा टाकुन कपडे भिजु घालनारेस काय?"
"तस नाय रे! डेरिवर 'फॅट' मोजायचं मशीन हाय. दुधात निरमा असला की त्याची डिग्री सर्र्कान वर जाते अण दुधाला दाबुन भाव भेटतु"
---------------------------------------------------------------
"राम्या, टपरिवर एक कटिंग सांग अन तु खालीच थांब. एक लाल इंडिकावाला साहेब आला की त्याला ही फाइल दी. त्यांच्याकडून एकतीस हजार रुपये घी. एक तुला घी अण तिस माह्या खात्यावर जमा करुन ई"
"पर साहेब, कालच बांधकामवाल्याच्या हाफिसातला घोटाळा पकडिलाय. चायनेलवाले रातभर दाखित हुते"
"गधड्या, आपुण काय हजार कोटीचा घोटाळा नै करुन राहिलो. अण तिस हजाराचा घोटाळा दाखिला तर पब्लिकच पोट धरून हसल अण चायनेलवाल्याला खुळ्यात काढल"
-----------------------------------------------------------------
हवालदार साहेब बराचवेळ पासुन बसस्टैंडवर खोळंबलेले. पिरम्या आणि रवण्याला बसस्टैंड मधे घुसताना पाहुन जवळ आले. पिरम्याने इकडे तिकडे पाहत शंभरच्या दोन नोटा हळूच त्यांच्या खिशात कोंबल्या. साहेब दबक्या आवाजात "फ़क्त एक तास" म्हणुन हळूच बसस्टैंडच्या बाहेर सटकले.
लेट झालेली बस आली तशी ताटकळलेली पब्लिक बसच्या दिशेने पळाली.
पिरम्या पळत जाऊन गर्दीत घुसला. रवण्या हळू हळू निघाला.
बसच्या दाराजवळ चढ़ाणारे आणि उतरणारे एकमेकांना भिडले.
एका चढणाऱ्याची भली मोठी ब्याग मागून येणाऱ्याच्या आणि उतरणाऱ्याच्या मधे गुतली. ब्यागमुळे त्याला वरती जाता येइना आणि आतल्यांना खाली उतरता येइना. पब्लिक खुळी झाली. गोंधळ उडाला. कंडक्टरने शिट्टया मारून तिढा सोडविला. बस खच्चुन भरली. कंडक्टरने जोर लाउन दरवाजा ओढला आणि बेल दिली.
गाडी हळू हळू बसस्टैंडच्या बाहेर निघाली तसा पिरम्या जोराने ओरडला;
"रवण्या, उतर निचे! ये गाडी बम्बई जारी, पूना नै"
गाडी थांबली. बसच्या पार शेवटच्या टोकाला जाऊन उभा राहिलेले दोघेही पब्लिकला दाबत दाबत खाली उतरून मुतारिकडे पळाले. बस निघुन गेली.
दोघे मुतारीच्या माघे आले. पिरम्याने खिशतल्या तिन पाकिटातल्या नोटा काढुन खिशात टाकल्या. पाकिट परत चाचपुन तिथेच फेकुन दिले. रवण्याने हातातल्या मोबाइलला झटक्यात उघडुन ब्याटरी बाजूला केली आणि कुंपनावारून उड्या मारून मागच्या झाड़ित पसार झाले.
---------------------------------------------------------------------------
"अग! हे बघ ना या धाग्यावर कांबीकरने काय लिहलय"
"अहो मी वाचलय! अण तुम्ही ते सिरियस्ली घेऊ नका.... नाहीतर येड़े व्हाल"

मांडणीविनोद

प्रतिक्रिया

सुयोग पुणे's picture

18 Jun 2016 - 4:18 am | सुयोग पुणे

खरं आहे..आणि म्हणूनच काही खरं नाही ...

जेपी's picture

18 Jun 2016 - 9:26 am | जेपी

आवडल..

शाहराबाहेर धो धो वाहत आलेल्या गटाराजवळ लघुशंका करायचा उद्देश् डोळ्यासमोर ठेऊन गाडी उभा केली. एक मोठा सुस्कारा सोडुन तयारीत उभा राहिलो तेवढ्यात गटाराच्या काठावर भप् भप् करणाऱ्या इंजिनावर ध्यान गेले. अख्ख्या शहराने बाहेर काढुन दिलेल्या या सडक्या, घान पाण्याला कोणतरी बहाद्दर इंजिन लाऊन ओढतोय. 'ते कश्यासाठी?' हे पाहण्यासाठी मी इंजिनातून निघालेल्या पाईपच्या कडेने समोर गेलो.
एका भल्यामोठ्या चौकोनी खड्डयात लालजरित टॉमेटोची झाडे, मेथी, पालक, कोथंबीर डुलत होते आणि पायपातुन पडणारे पाणी घटाघटा पीत होते. पोटात उचमळुन आले म्हणुन मटकन खाली बसलो.

सांडपाण्यामुळे फळांवर काही दुष्परिणाम होतो का?

आनंद कांबीकर's picture

18 Jun 2016 - 12:41 pm | आनंद कांबीकर

पाण्यात असलेल्या विषारी घटकांचा परिणाम फळं, भाज्या यांच्या गुणसूत्रांवर होतोच शिवाय त्यात असलेले कीड़े, आळ्या, माश्या यांचा पण परिणाम होतो.

मुक्त विहारि's picture

18 Jun 2016 - 9:46 am | मुक्त विहारि

ज्या गोष्टींवर आपण ताबा ठेवू शकत नाही, त्या गोष्टी जास्त मनावर घेवू नयेत.

पियू परी's picture

18 Jun 2016 - 1:17 pm | पियू परी

नाईलाजाने अनुमोदन द्यावे लागतेय. :(

रातराणी's picture

18 Jun 2016 - 1:51 pm | रातराणी

अवघडे सगळं.

डॉक्टरसाहेब! आहो मला साधी सर्दी झाली होती ओ! त्यालाच तुम्ही सतराशे रुपयांच्या कसल्या कसल्या टेस्ट कराव्या लावल्या आणि तिनशेचे मेडिकल लिहुन दिले"

डॉक्टरला असं विचारताना नक्की काय उत्तराची अपेक्षा होती?

आनंद कांबीकर's picture

18 Jun 2016 - 4:22 pm | आनंद कांबीकर

रिपोर्ट नार्मल आले. काही झालेच नव्हते तर टेस्ट का करायला लावल्या.

समंजस माणूस टेस्ट करायच्या आधी हा प्रश्न विचारतो की डॉक्टरला नक्की कुठली शंका आहे जिचं निरसन ही तपासणी केल्यावर होणार आहे? त्या टेस्टमध्ये चांगलं आणि वाईट काय निष्पन्न होउ शकतं? त्यावर निकालावर मग नंतर काय उपाय योजना करायची ते ठरणार आहे का?

एकदा टेस्ट रीझल्ट त्रासदायक नाही हे कळल्यावर डॉक्टरला हे प्रश्न विचारणे म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" चा शब्दश: नमुना आहे , असं मला वाटतं.

अभ्या..'s picture

18 Jun 2016 - 2:25 pm | अभ्या..

निरम्याने फॅट वाढत नाय ओ. पीएच बॅलन्स करायला घालतेत. ते बी इतका नसतय. मोठ्या चिलिंग प्लॅन्टात एकावेळी उगा आपला १०० ग्राम. नायतर युरीया. सिरियस्ली घीवू नका म्हण्ताय म्हनून शांत आहे कारण प्रत्येक गोष्टीला अंत आहे.

आनंद कांबीकर's picture

19 Jun 2016 - 12:42 am | आनंद कांबीकर

मान्य आहे. निरमा टाकून Ph बॅलेन्स करतात दुध फ्रेश वाटावे म्हणुन.
परंतु मी या ठिकाणी निरमा टाकणाऱ्याचे विचार मांडलेत.गावात दुध न्यायला जो डेरितला माणुस येतो तो 'फॅट' चे परिमाण लाउनच भाव ठरवतो.
तसं पाहिलेतर २५ लीटर दुधामधे २५ लीटर पाणी ही पण आक्षेप घेन्यासारखिच गोष्ट आहे.
बाकी 'सीरियसली नाही घेतले' त्या बद्दल धन्यवाद.

जव्हेरगंज's picture

18 Jun 2016 - 6:52 pm | जव्हेरगंज

भारीच की!!

अजया's picture

19 Jun 2016 - 1:19 pm | अजया

:(
नाही घेतलं सिरियसली.

मराठी कथालेखक's picture

20 Jun 2016 - 1:29 pm | मराठी कथालेखक

"राम्या, टपरिवर एक कटिंग सांग अन तु खालीच थांब. एक लाल इंडिकावाला साहेब आला की त्याला ही फाइल दी. त्यांच्याकडून एकतीस हजार रुपये घी. एक तुला घी अण तिस माह्या खात्यावर जमा करुन ई"
लाचेची रक्कम खात्यावर ?

नाखु's picture

20 Jun 2016 - 2:58 pm | नाखु

अजब तुझे सरकार...

लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार.

हे गाणे आहे शिवसेनाप्रेमींनी वस्सकन अंगावर येऊ नये आणि भाजप्यांनी आनंदाने नाचू नये.

धागा सिरीयसली नाय घेतला तरी हरकर नाही वरची सुचना सीरीयसली (सिरींजमधून) घेणे

सध्या आनंद
वाचकांची पत्रे वाला नाखु

चांदणे संदीप's picture

20 Jun 2016 - 4:25 pm | चांदणे संदीप

लै भारी!
लिखते रहो!

Sandy