हतबुद्ध

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 10:51 am

गेल्या दोन दिवसात असे वीर भेटले कि ज्याचे नाव ते.
परवा एक गरोदर रुग्ण स्त्री रक्तस्त्राव होत होता म्हणून सोनोग्राफी साठी आली होती. ती अतिशय भयभीत होती आणि तिची सासू आणि नवरा तिला धीर देत होते. तिच्या लग्नाला सात वर्षे झाली होती आणि बर्याच उपचारानंतर ती पहिल्यांदाच गरोदर होती. माझी स्वागत सहायिका तिला आत घेत असताना तिचा नवरा मला "टेचात" म्हणाला डॉक्टर काहीतरी "रिझनेबल" रेट लावा. हे ऐकून माझं डोकं सणकलं. मी त्याला रठ्ठ शब्दात विचारलं म्हणजे माझे रेट "अन रिझनेबल आहेत" असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पाहिजे तेथे तुम्ही जाऊ शकता. किंवा के ई एम किंवा सायन रुग्णालयात जा. सोनोग्राफी "फुकट" करून मिळेल. त्यावर त्याचा आवाज एकदम खाली आला. तो म्हणाला तसं नाही डॉक्टर काही कन्सेशन मिळेल काय? मी पण जरा नरमून म्हणालो हो देऊ कन्सेशन.
मग त्या रुग्ण स्त्रीला सोनोग्राफी च्या खोलीत घेतले आणि सोनोग्राफी चालू केली. सर्वात पहिल्यांदा मी मुलाच्या हृदयाचे ठोके दाखवले आणि ऐकवले. ते पाहून ती थोडीशी शांत झाली. सोनोग्राफी करताना तिच्या वारेच्या ( placenta) मागे रक्त साकळलेले दिसत होतं ते तिला दाखवलं आणि सांगितलं तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. खरं तर बेड रेस्ट्च घ्यायला पाहिजे. प्रवास करायचा नाही आणि वजन उचलायचे नाही. त्यावर तीस्त्री म्हणाली आजच सकाळी आम्ही मालवण हून आलो. मी तिच्या सासूबाईना विचारले कि अहो एवढ्या वर्षांनी गरोदर असताना तिला मालवणला न्यायची काय गरज होती? त्यावर त्या म्हणाल्या गावच्या सगळ्यांना "दाखवायला" पहिजे कि नको आमच्या कडे पण "बातमी" आहे. मी त्यांना विचारले अहो पण एवढा लांबचा प्रवास गरोदरपणात करण्याची काय गरज आहे . एकदा बाळंत झाल्यावर मुल दोन महिन्यांचे झाले कि मुलालाही घेऊन जायचं आणि काय गाववाल्याना "दाखवायचं" ते दाखवा. तिथे जाऊन रक्तस्त्राव सुरु झाला मग उगाच धावपळ करण्याऐवजी असे करायला पहिजे होते.
त्यावर तिचा नवरा परत टेचात म्हणाला कि डॉक्टर आम्ही स्पेशल "क्वालीस" गाडी करून गेलो होतो. आता मात्र मला संताप आला. याला मुंबईतून मालवणला गाववाल्याना "दाखवायला" जायला स्पेशल गाडी करता येते पण डॉक्टरला पैसे द्यायचे म्हटले कि यांच्या जीवावर येतं. पण तरी हि मी काही बोललो नाही.
या दीड शहाण्या माणसाने बाळ व्यवस्थित आहे असे सांगितल्यावर विचारले कि मुलगा आहे कि मुलगी. मी आता मात्र त्याला स्पष्ट शब्दात सांगितले कि मी ते पाहत नाही आणि सहज दिसले तरी सांगणार नाही.
त्या गरोदर स्त्रीला धीर दिला, सर्व काही ठीक आहे सांगितलं आणि काळजी घ्यायला सांगितली. हे लोक गेले. नंतर दवाखाना बंद करताना माझ्या स्वागत सहायिकेने पैशाचा हिशेब दिला तर तिने या माणसाला एक पैसा हि सवलत दिली नव्हती. मी तिला विचारलं कि त्याने काही सवलत मागितली नाही का यावर ती सरळ म्हणाली कि सर एक तर याच्या कडे खास गाडीने मालवणला जाण्यासाठी पैसे आहेत शिवाय आज काल जो कोणी "मुलगा किंवा मुलगी" विचारतो त्याला "सर" सवलत देत नाहीत असे सांगते. मी तिला हसत म्हणालो हे म्हणजे माझ्या खांद्यावरून तू तीर चालवतेस. त्यावर ती म्हणाली सर तुम्ही फार साधे आहात. हे लोक डांबरट आहेत आणि तुमचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न करतात.
माझी हि स्वागत सहायिका गरीब असली तरी चटपटीत आहे. आगरी आहे आणि जवळच राहते. ती दवाखान्याची पूर्ण काळजी स्वतःच्या घरासारखी घेते.
त्याच दिवशी एका माणसाने हिला कन्सेशन मागितले तर हिने त्याला विचारले तुम्हाला कन्सेशन का द्यायचे तुम्ही गरीब नाही. त्यावर तो माणूस म्हणाला आपण इंडियन आहोत प्रत्येक ठिकाणी कन्सेशन मागणे हा आपला स्वभाव असतो. यावर ती म्हणाली बियर बार मध्ये कन्सेशन मागता का?
त्या माणसाने काही न बोलता पैसे काढून दिले. मी हे आतून ऐकत होतो. काही वेळाने मी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा तिला म्हणालो कि तू धडक पणे त्या माणसाला "बियर बार मध्ये कन्सेशन मागता का?" असं कसं विचारलंस.माझी सुद्धा हिम्मत होणार नाही "असे" विचारायला
ती म्हणाली सर हा माणूस आमच्या जवळच राहतो आगरी आहे आणि पैसेवाला आहे. गाड्या उडवत असतो आणि आठवड्यात तीन चारवेळा तरी बियर बार मध्ये जातो. याला कशाला कन्सेशन द्यायचे?

काल संध्याकाळी असाच एक रिक्षावाला "वीर" आला होता. याची बायको २० वर्षाची गरोदर होती आणि तिला पण रक्तस्त्राव होत होता. तिचा चार महिने अगोदर एक गर्भपात झाला होता म्हणून त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने सोनोग्राफी साठी पाठवले होते. वरचीच कहाणी परत चालू होती. वारेच्या मागे रक्तस्त्राव झाला होता. मी त्या मुलीला सांगत होतो कि तुम्हाला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. रक्तस्त्राव पूर्ण बंद होईस्तोवर वजन उचलायचे नाही रिक्षात बसायचे नाही कारण पोटाला हादरा बसतो इ इ.
यावर हे वीर महाशय म्हणाले कि पण डॉक्टर आम्ही रिक्षाने सोलापूरला गेलो तोपर्यंत "काही झाले नाही" तीन दिवसांनी रक्तस्त्राव झाला म्हणून आम्ही परत आलो.
मी त्याला अविश्वासाने विचारले तुम्ही सोलापूरला "रिक्षाने" गेलात ? तो त्यावर हो म्हणाला. मी त्याला म्हणालो कि अहो रिक्षाने जायची काय गरज होती त्यावर तो म्हणाला या सिझनमध्ये गाडीला "गर्दी" असते ना? त्यापेक्षा ठरवलं "आपलीच" गाडी आहे जाऊ आरामात.
मी विचारले परत कसे आलात तर तो म्हणाला रेल्वेने. ती स्त्री म्हणाली सासर्यांनी "रिक्षाने न्यायला मनाई केली म्हणून"
मी हतबुद्ध झालो आणि त्याला म्हणालो "अहो आम्ही इथे दोन किमी रिक्षाने जाऊ नका म्हणून सांगतो आणि तुम्ही तब्बल ३५०-४०० किमी त्यांना रिक्षाने घेऊन गेलात ते सुद्धा त्या गरोदर असताना. धड धाकट माणसाला सुद्धा रिक्षाने इतके अंतर जाऊ नका असेच मी सांगेन " रिक्षाला स्पीडब्रेकर लागतात, खड्डे लागतात यात स्त्रीच्या कंबरेला "हिसका" बसतो. गचकन ब्रेक मारून तुम्ही रिक्षा थांबवता. भसकन वळणं घेता.
रेल्वे मध्ये खड्डा लागत नाही कि स्पीडब्रेकर. शिवाय गचकन ब्रेकही लागत नाहीआणि जोरात सुरु पण होत नाही. ते सोडून तुम्ही त्यांना रिक्षाने सोलापूर पर्यंत घेऊन गेलात ते सुद्धा चार महिन्यापूर्वीच त्यांचा गर्भपात झालेला असताना? रिक्षाने तुम्ही सोलापूरला गेलात तेंव्हा आत मध्ये रक्तस्त्राव झाला होता आणि तो तुम्हाला तीन दिवसांनंतर "दिसायला" लागला. अजूनही आत मध्ये रक्त साकळले आहे. तेंव्हा त्यांना पूर्ण विश्रांती देणे सक्तीचे आहे. परत काही होऊ नये म्हणून काळजी घ्या.
हा वीर बेदरकारपणे आपले पैसे देऊन तेथून गेला.
मुंबई ते सोलापूर रिक्षाने जायच्या "विचारानेच" मला पाठदुखी होते आहे असा भास झाला.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

गावच्या सगळ्यांना "दाखवायला" पहिजे. >>
बिल सोबत डोक्याच्या डॉक्टर ला "दाखवायची " नोट दिली अस्तीत त्या लोकांना . मूर्ख साले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2016 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत ! डॉक्टर साहेब, नमुनेदार व्यक्ती थेट भिडल्या. अशा व्यक्तींच्या उपचारासाठी एक ओला फोकही जवळ ठेवत जा.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

11 Jun 2016 - 11:23 am | किसन शिंदे

मूर्खपणाचा कळस आहेत अशी माणसं.

पैसा's picture

11 Jun 2016 - 11:24 am | पैसा

कोणी असे इतके म्हाहुशार असतील असे वाटत पण नाही! तुमची स्वागतिका मात्र खरी हुशार आहे. आम्ही मिपाकरांनी तिचं कौतुक केलंय हे जरूर सांगा.

टवाळ कार्टा's picture

11 Jun 2016 - 6:58 pm | टवाळ कार्टा

+११११

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2016 - 7:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमची स्वागतिका मात्र खरी हुशार आहे. आम्ही मिपाकरांनी तिचं कौतुक केलंय हे जरूर सांगा.

+१

कोणी असे इतके म्हाहुशार असतील असे वाटत पण नाही!

यांना लाजवतील असेही बरेच नग असतात :)

राजाभाउ's picture

13 Jun 2016 - 4:56 pm | राजाभाउ

+११११११

यशोधरा's picture

11 Jun 2016 - 11:31 am | यशोधरा

स्वागतिका हुशार आहे. तिचे खरेच कौतुक.

नाखु's picture

11 Jun 2016 - 11:33 am | नाखु

हुशार्+चलाख आहे.
मिपावरील काही "डायरीया" लेखकांसाठी रामबाण ऊपाय असेल तर सांगा.

मिपा नितवाचक नाखु

स्त्रीचं शरीर म्हणजे काय लोकांना यंत्रबिंत्र वाटतं काय असा प्रश्न पडतो असे टिंबटिंब लोक बघितले की. बाकी तुमच्या स्वागतसहाय्यिकेचं कौतुक.

सिरुसेरि's picture

11 Jun 2016 - 12:02 pm | सिरुसेरि

अस्वस्थ करणारे अनुभव .
-------याची बायको २० वर्षाची गरोदर होती --- हे बहुतेक असे असावे .
-----याची बायको २० वर्षाची . गरोदर होती -----

तुमची सहाय्यिका एक नंबर आहे. बियर बार डिस्काउंट प्रकरणावर लय हसलो.

अशा मुर्खांची किव येते. छान लेख.

सुधांशुनूलकर's picture

11 Jun 2016 - 1:19 pm | सुधांशुनूलकर

वाचून आम्हीही खरंच हतबुद्ध झालो.

तुमची स्वागतिका मात्र खरी हुशार आहे. आम्ही मिपाकरांनी तिचं कौतुक केलंय हे जरूर सांगा. पैताईंशी सहमत.

आपण इंडियन आहोत. प्रत्येक ठिकाणी कन्सेशन मागणे हा आपला स्वभाव असतो. हे बर्‍याच अंशी खरं आहे. मीही हॉस्पिटलमध्ये काम केलं असल्यामुळे हे पटतं - १५-२० वर्षांपूर्वी, मर्सिडीझमधून आलेल्या माणसांनी पाच-सात हजार रुपयांच्या कन्सेशनसाठी केलेला आटाटोप (आटापिटा + खटाटोप) आठवला.

राजाभाउ's picture

13 Jun 2016 - 4:57 pm | राजाभाउ

आटाटोप : भारी शब्द आहे. :)

सुबक ठेंगणी's picture

14 Jun 2016 - 12:09 pm | सुबक ठेंगणी

आटाटोप ह्या भारी शब्दाबद्द्ल आभारी :)

सस्नेह's picture

14 Jun 2016 - 12:29 pm | सस्नेह

'खटापिटा' कसा वाटतो ? =))

सुबक ठेंगणी's picture

14 Jun 2016 - 12:37 pm | सुबक ठेंगणी

घिसापिटा सारखा वाटतो :)

तिमा's picture

11 Jun 2016 - 1:31 pm | तिमा

अशा सत्यकथा ऐकल्या की मनाला त्रास होतो. अशा नालायक माणसांच्या घरांत नांदणे, हे त्या स्त्रियांचे दुर्दैव आहे. घरातल्या स्त्रीला हे लोक, एखादं वंश वाढवायचं मशीन समजतात.

मुक्त विहारि's picture

11 Jun 2016 - 2:27 pm | मुक्त विहारि

+ १

अगदी हेच लिहायचे मनांत होते.

संदीप डांगे's picture

11 Jun 2016 - 1:48 pm | संदीप डांगे

कहर आहे हे सगळं. :(

(अवांतरः हतबुद्ध शब्दाबद्दल शंका आहे. बद्ध की बुद्ध?)

सुबोध खरे's picture

11 Jun 2016 - 1:51 pm | सुबोध खरे

मी पाहत आलो आहे कि समाजात बहुसंख्य जातीत मुलीना/ बायकांना काहीच किंमत दिली जात नाही. त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीबाबत सुद्धा हीच परिस्थिती आहे. जोवर मामला गळ्याशी येत नाही तोवर त्यांना काही घेणे देणे नसते. मुलगी असेल तर ती गंभीर होईस्तोवर हे लोक थंड बसून राहतात. आणि तोच जर मुलगा असेल तर मात्र लगेच धावाधाव करतात. दुर्दैवच भाग असा कि या मुली सुद्धा मोठ्या झाल्या कि त्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल त्यांना काही वाईट वाटत नाही.( त्याची सवय झालेली असते म्हणून असेल कदाचित)
काही समाजात तर सुशिक्षित आणि सधन लोकांमध्येही हीच परिस्थिती आहे. उदा,. मारवाडी
माझ्या जवळचा एक केमिस्ट ( मारवाडी) बायको गरोदर झाली तर तिचा गर्भपात करण्यासाठी स्वतः च गर्भपाताच्या गोळ्या देत असे. एकदा माझ्याकडे आला असताना त्याच्या पत्नीच्या पोटात पू झाला होता चांगला ४ सेमी आकाराचा गोल गोळा तयार झाला होता. मी त्याला याबद्दल सांगितले असता तो निर्लज्ज पणे म्हणाला कि मागच्या तीन वेळेस गोळ्या घेऊन काहीच त्रास झाला नव्हता. मी संतापाने त्याला म्हणालो कि तू तुझ्या बायकोच्या जीवाशी खेळत आहेस. त्याला त्याबद्दल ना खंत ना खेद दिसत होता. वर त्याने मी केमिस्ट आहे तर कन्सेशन किती देणार ते विचारले.मी त्याला कन्सेशन द्यायला स्पष्ट नकार दिला. उलट त्याच्याकडून माझ्या स्वागत सहायिकेने २०० रुपये जास्त घेतले ( तिने त्याला अगोदरच जास्त पैसे सांगितले होते).
मी लोकांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे कधीच घेत नाही. परंतु या माणसाकडून हे जास्त पैसे घेण्यास मला नक्कीच वाईट वाटले नाही.

मारवा's picture

12 Jun 2016 - 9:01 am | मारवा

काही समाजात तर सुशिक्षित आणि सधन लोकांमध्येही हीच परिस्थिती आहे. उदा,. मारवाडी
माझ्या जवळचा एक केमिस्ट ( मारवाडी) बायको गरोदर झाली तर तिचा गर्भपात करण्यासाठी स्वतः च गर्भपाताच्या गोळ्या देत असे.

वरील मुळ लेखातील क्वालिस वालाही "मारवाडी" च असेल.
मराठी माणुस अस सहसा वागत नाहीत वागलाच वावगा तर त्यामागे कारण असते फक्त त्याची गरीबी किंवा अशिक्षीतपणा.
मराठी माणुस सहसा तत्ववादी असतो.
मारवाडी माणुस सहसा चमडी जाये लेकीन दमडी ना जाए असा असतो.
मारवाडी माणुस अव्वाच्या सव्वा दर लावतो मराठी माणसाने दर वाढवला तरी त्यामागे काहीतरी " तत्व" असत
वरील मुळ लेखातील रिक्षावाला जर मराठी असेल तर त्याने ते आर्थिक कारणांने केले असेल बहुतकरुन तो मारवाडी च असावा.
मारवाडी असेच असतात
फोडुन काढले पाहीजे सर्वांना
चाबकाने

अभ्या..'s picture

12 Jun 2016 - 9:55 am | अभ्या..

अरे अरे अरे
काय हे?
बाकी मारवाडी रिक्षावाला लोलच लोल.

मारवा's picture

12 Jun 2016 - 10:45 am | मारवा

क्वालिस वाला पहीला वीर ही मारवाडीच असेल.
डॉक्टर म्हणतात ते खरच आहे सुशिक्षीत व सधन मारवाडी पण असेच असतात.
थोडी शंका येतेय खरी क्वालिस वाल्या विषयी की
तो मराठी असेल ( कारण नाहीतर डॉक्टरांनी त्याला कंसात वेगळा टाकला असता)
तो सुशिक्षीत असेल ( कारण त्याला रीझनेबल व कन्सेशन दोन्हीतला फरक कळतो वगैरे)
तो सधन असेल ( कारण त्याला क्वालिस परवडते.)
म्हणजे तो मराठी सुशिक्षीत सधन असुनही असे वागतो असे असु शकते.
मराठी बांधव असा असु शकेल या कल्पनेनेच व्याकुळता येते पण नाही नाही तो मारवाडीच असावा
मारवाडी असेच असतात.
फोडुन काढले पाहीजे सर्वांना
चाबकाने
मागे एकदा खुप जुना "लोकप्रभा" या साप्ताहीकाचा अंक बघितला होता त्यात एक जाहीरात होती
"७० रुपयांत गर्भपात करुन मिळेल "
मात्र महाराष्ट्रात बरेच मारवाडी असतात त्यांना मराठी लिहीता वाचता येत. शिवाय "लोकप्रभा" घेऊन वाचण म्हणजे
ते सधन मारवाडीच बहुतकरुन असतील.( मराठींना कुठली परवडते हो असली चैन ) एक अधिकच म्हणजे. ते सुशिक्षीत मारवाडीच "लोकप्रभा" वाचत असणार. डॉक्टर च नाव नव्हत मात्र नक्कीच मारवाडी असावा " लोकप्रभा" ग्रुपचा मालक मारवाडीच आहे की.
सबब
मारवाडी असेच असतात

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2016 - 11:01 am | टवाळ कार्टा

पुण्यातले गुंठामंत्री मराठीच असतात ना? आणि रिक्शावालेपण

सुबोध खरे's picture

12 Jun 2016 - 8:06 pm | सुबोध खरे

मारवा साहेब
तो माणूस मारवाडी नाही तर मराठीच आहे. मुणगेकर आडनाव
आणि तो रिक्षावाला पण मारवाडी नव्हता. त्याचे आडनाव आता आठवत नाहीये.
हलकट पणा हि काही कोणत्या जातीची किंवा समाजाची मक्तेदारी नाही.

मारवाडी समाजात बायकांना किंमत नाही हि वस्तुस्थिती आहे परंतु महाराष्ट्रात हीच स्थिती असंख्य जातीं मध्ये आहे.
जितके सामाजिक उतरंडीत खाली जाल तितकी स्त्रीला कस्पटासमान वागवण्याची वृत्ती वाढत जाते. मला जात काढणे आवडत नाही. हुंड्यासाठी सुनेचा छळ करणं हे ब्राम्हण समाजात अभावानेच आढळते. काही तथाकथित उच्च जातीत मुलीना शिकवले तर मुलगा मिळणे कठीण जाते म्हणून मुलीना जास्त शिकवले जात नाही. जवळ जवळ सगळ्याच जातींमध्ये मुलीना वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा दिला जात नाही. निम्न आणि मागासवर्गीय जातींमध्ये हि परिस्थिती अजूनच वाईट आहे.
"अच्छे दिन" आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतील पण मानसिक स्थिती सुधारणे इतके सोपे नाही.
हातात दारूच ग्लास धरून "आधुनिक" होता येतं. पण बायकोला किंवा मुलीला /सुनेला समान पातळीवर आणण्यासाठी लागणारी आधुनिक मनोवृत्ती बाणवणं हे इतकं सोपं नाही.

स्मिता चौगुले's picture

14 Jun 2016 - 1:35 pm | स्मिता चौगुले

+१

स्मिता_१३'s picture

15 Jun 2016 - 7:44 pm | स्मिता_१३

सहमत !

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

11 Jun 2016 - 2:21 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

हम्म... असतात अशी लोकं समाजात!!
बाकि,स्वागितेकेला मिपावर आयडी घ्यायला सांगा:'(

बाई ह्या जातीला मूलभूत माणूसपणाचे देखील हक्कच नाहीत की काय असे वाटू लागते. :(

डॉक, एक शंका - अशा खरोखर जिवाशी खेळ होत असलेल्या केसेस बघण्यात आल्या तर तुम्ही पोलिसात तक्रार करु शकत नाही का? म्हणजे कायद्याने डॉक्टर म्हणून तुम्हाला काही अधिकार, संरक्षण असे असते का? निदान पोलिसांकडून तंबी मिळाल्याने सुधारणा दिसेल.
अर्थात निर्लज्ज आणि निष्काळजी, गुंड प्रवृत्तीचा मनुष्य असेल तर पोलिसांना कळवतेस काय म्हणून जास्तीच छळ करायला मागेपुढे बघायचा नाही ही दुसरी बाजूही आहे म्हणा....
श्या एकूण औघडच..

नाखु's picture

11 Jun 2016 - 3:07 pm | नाखु

चांगला आहे पण अंगलट येण्याशी १०००% खात्री.
जीच्यावर अन्याय्/हेळसांड झालीय तीचीच काही तक्रार नाही (पुन्हा इथेच जायचे म्हणून ती सत्य सांगणारच नाही) वरून पोलीस डॉ.च्या मागे ससेमिरा लावून "चिरिमिरी" उक्ळणार. पोलिसांच्या नजरेतून प्र्त्येक केस एक (चांगली पैसे) कमवायचा संधी असल्याने मदत मिळणे केवळ अशक्य.

रस्ता अपघातातही (मदतीपेक्षा) चिरिमिरीत गुंतलेला पोलीस पाहिलेला नाखु

सुबोध खरे's picture

13 Jun 2016 - 6:33 pm | सुबोध खरे

+ १००
पोलिस हि अशी जमात आहे कि जिच्याशी सामान्य माणूस
ना मैत्री करू इच्छीतो ना वैर.
आमच्या माहितीतील्या एका दंत वैद्याची हि खरी कहाणी
एके दिवस एक पोलिस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला डॉक्टर तुमच्या एक्स रेच्या फिल्म चोरीला गेल्या आहेत का? डॉक्टर म्हणाले नाही हो मी अशी तक्रार पण केलेली नाही. त्यावर तो म्हणाला जर तपासून पहा बरं. डॉक्टरनी आपले भांडार तपासून पाहिले तर फिल्मचा एक खोका कमी होता. त्यावर तो पोलिस म्हणाला साहेब तुमच्या कडे कामाला असलेल्या एका मुलाने तो चोरला आहे आणि त्याला आम्ही पकडला आहे तेंव्हा तुम्ही आम्हाला तसे लिहून द्या. हे डॉक्टर म्हणाले कि अहो जाऊ द्या त्या मुलाला मी केंव्हाच काढून टाकले आहे आणि आता या प्रकरणाच्या मागे लागण्यासाठी मला वेळ नाही. त्यावर त्या पोलिसाने त्यांना "तुमच्यासारखे सुशिक्षित नागरीक पोलिसांना मदत करत नाहीत तर पोलिस आपले काम कसे करणार" वगैरे भाषण सुनावले. यामुळे त्या डॉक्टरनी एका कागदावर आपली तक्रार लिहून दिली. त्यावर त्या पोलीनानी त्या मुलाला गजाआड केले.
दुसर्या दिवशी सकाळी त्या मुलाची आई यांच्या दवाखान्यात येउन त्यांच्या पाया पडायला लागली कि तुम्ही तक्रार मागे घ्या नाही तर माझ्या मुलाचे आयुष्य बरबाद होईल. त्यांना तिला हाकलून लावले तरीही त्या बाईने रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर येउन रडणे भेकणे मोठ्या आवाजात बडबड करणे करून त्यांना वैताग आणला होता. हा प्रकार तीन चार दिवस चालल्यावर ते डॉक्टर कंटाळले आणि उठून पोलिस स्टेशन वर गेले कि मी माझी तक्रार मागे घेतो. त्यावर त्यांना उत्तर मिळाले अशी तक्रार मागे घेत येणार नाही. दोन चार दिवस खेपा मारून त्या बाईची कटकट सहन करून कंटाळल्यावर शेवटी "रुपये दहा हजार फक्त" मोजून त्यांची तक्रार "मागे" घेतली गेली. आणि अशा रीतीने त्यांची कटकटीतून मुक्तता झाली.
"एफ आय आर" प्रत्यक्ष भरला गेला होता कि नाही ते माहित नाही.

स्मिता.'s picture

11 Jun 2016 - 2:26 pm | स्मिता.

व्यथित करणारे अनुभव आहेत. आपल्या समाजात बर्‍याच ठिकाणी स्त्रियांना केवळ 'वंशवृद्धी-यंत्र' समजले जाते. त्या वंशवृद्धीच्या अनुशंगाने येणारे शारिरीक आणि मानसिक त्रास असू शकतात हेच समजून घेण्यात कोणाला रस नसतो. त्यात भर म्हणून सामाजिक प्रतिष्ठेचे निरनिराळे भ्रम! मग असे महाभाग ठिकठिकाणी दिसतच असतात.

तुमच्या स्वागत सहाय्यिकेचे खरच कौतुक आहे, चंट वाटते :)

गामा पैलवान's picture

12 Jun 2016 - 9:41 pm | गामा पैलवान

अहो स्मिताताई, स्त्रीला वंशवृद्धीचं यंत्र समजले असते तर निदान यंत्राची तरी का होईना म्हणून तरी तिची काळजी घेतली असती. हे असले लोक तिला यंत्रदेखील समजत नाहीत. :चिडका बाहुला:
आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

11 Jun 2016 - 2:28 pm | अभ्या..

सोलापूर डोंबोली त्या हरामखोराला सगळे पसे आणी मोबाइल काढून घेऊन एकट्याला चालत पाठवा. (मी इथून लाथा घालून परत पाठवेन) ;)
.
बाकी डॉक, तुम्हाला असिस्टण चुणचुणीत मिळालीय. स्पष्टपणात तुमच्या पावलावर पाउल आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2016 - 2:53 pm | अत्रुप्त आत्मा

@बाकी डॉक, तुम्हाला असिस्टण चुणचुणीत मिळालीय. स्पष्टपणात तुमच्या पावलावर पाउल आहे. ››› शमत हाय! लैच्च बा हा री.!

वाचून पण डोकं उठलं.त्यावेळी तुमचं काय झालं असेल चांगलीच कल्पना करु शकते.
हुशार स्वागतिका ही लाभणाऱ्या अंगठीसारखी असते.लाभली तुम्हाला! माझीही अशीच आहे.त म्हंटल्यावर ताकभात ओळखणारी!

सुबक ठेंगणी's picture

14 Jun 2016 - 12:28 pm | सुबक ठेंगणी

हुशार स्वागतिका ही लाभणाऱ्या अंगठीसारखी असते.लाभली तुम्हाला!

वाह! मस्त उपमा. आणि अशा हजरजबाबी, स्ट्रीट स्मार्ट स्वागतिकेचं कौतुक.
डॉक्टरसाहेब्, अशाच हाय वैताग कोशंटवाल्या सुशिक्षित माणसांचे पण अनुभव पण असतील नां.
उदा. गुगलपंडित पेशंट, शंकेखोर पेशंट किंवा काल्पनिक आजार झालेले रोगी वगैरे.
तेही सांगा नां.

सुबोध खरे's picture

17 Jun 2016 - 9:51 am | सुबोध खरे

जालीय निदान
येथे लिहिलेला आहे.

सुबक ठेंगणी's picture

17 Jun 2016 - 10:21 am | सुबक ठेंगणी

धन्यु!

याची बायको २० वर्षाची गरोदर होती

हे प्रकरण नीट करा ब्वा !निराळाच अर्थ निघतोय.....

सुबोध खरे's picture

11 Jun 2016 - 8:07 pm | सुबोध खरे

हा हा हा
त्यांची २० वर्षांची बायको गरोदर होती
बायको (२० वर्षांची) गरोदर होती.
असे हवे होते
पण लोक यातून लग्नाला वीस वर्षे झाली असाही अर्थ काढतील.
काढू द्या.

रेवती's picture

11 Jun 2016 - 8:51 pm | रेवती

धन्य लोक आहेत.
तुमच्या स्वागतिकेने बर्‍याच वाकड्या लोकांना अगतिक केले ते आवडले.

चलत मुसाफिर's picture

11 Jun 2016 - 9:27 pm | चलत मुसाफिर

गरोदर स्त्रीला गाडीत बसवून इतका प्रवास करवला? तेही फक्त रिकामटेकड्या नातेवाईकांसमोर फुकटची शेखी मिरवायला? हद्द झाली.

त्यापेक्षा 'ज्यांना खात्री करून घ्यायची असेल त्यांनी (पूर्वसूचना देऊन) येऊन जावे' असा सरळ निरोप धाडायचा. (करुण विनोद समजावा)

सुबोध खरे's picture

12 Jun 2016 - 8:17 pm | सुबोध खरे

मुसाफिर साहेब
थोडासा धीर धरला असता तर नातवालाच घेऊन जाता आले असते सर्वाना दाखवायला शिवाय लोकांना हेही दाखवता आले असते कि आम्ही तुम्हाला खिजगणतीत हि धरत नाही. परंतु लोकांना 'सिद्ध" करून दाखवण्याची खाज बर्याच लोकांना असते. त्याचे काय करणार?

स्वाती२'s picture

11 Jun 2016 - 9:39 pm | स्वाती२

अजूनही किती बिकट परिस्थिती आहे! वाचून अगदी तडफड झाली. :(

पैसा's picture

11 Jun 2016 - 10:58 pm | पैसा

पहिल्या केसमधे गावातल्या लोकाना दाखवायला म्हणजे बायकोला गरोदर केले हा काय आपला पराक्रम समजतो का तो नालायक?

सुबोध खरे's picture

12 Jun 2016 - 8:14 pm | सुबोध खरे

गावातल्या लोकांना दाखवायची हौस तिच्या सासूला होती. गावचे लोक बहुधा कानगोष्टी करता असाव्यात कि मुणगेकरणीची सून नांदत नाही किंवा नवरा बायकोत काहीतरी बिनसलं असावं. सात वर्षं झाली तरी अजून काही हालचाल नाही म्हणजे काय? इ इ त्यांना उत्तर द्यायला हिने सुनेला "स्पेशल" गाडी करून नेलं.आणि मुलाला पण आपण मर्द आहोत हे दाखवायचं असावं
जमाने को दिखाना है साठी लोक काय काय करतील?याचा नेम नाही

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2016 - 6:51 pm | प्रसाद गोडबोले

सून नांदत नाही

नांदणे ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय हे मला अजुनही कळाले नाहीये !!

बाकी भारतात प्रचंड लोकसंख्या झाल्याने माणसाच्या जीवाची किंमत उरली नाहीये , तस्मात वरील अणुभव वाचुन काही विषेष वाटले नाही.
जेव्हा लोकांना 'नांदवायला' बायका मिळेनाशा होतील तेव्हा लोकं बायकोची काळजी घ्यायला सुरुवात करतील.

बाकी ते बीयरशी तुलना काही पटली नाही, तुम्ही एक चांगले डॉक्टर असाल पण बहुतांश डॉक्टर (त्यातही विशेष करुन मॅनेजमेन्ट कोट्यातुन झालेले डॉक्टर) पेशंट लोकांना लुबाडतात ही वस्तुस्थिती आहे . ह्यासंबंधी सरांचा सेकंड ओपीनीयन हा लेख अत्यंत वाचनीय आहे =))))
हे असले अनुभव गाठीशी असल्यावर लोकं डिस्काऊंट मागणारच की ! उडीदामाजी काळे गोरे ! चालायचेच !

भरत्_पलुसकर's picture

12 Jun 2016 - 6:24 am | भरत्_पलुसकर

काय माणसं हैती का हैवान :(

सस्नेह's picture

12 Jun 2016 - 6:44 am | सस्नेह

हतबुद्ध नव्हे संतप्त !
अशा हरामखोरांना जास्तीच्या फीबरोबर चार चाबकाचे फटकेही लगावले पाहिजेत.
बाकी डाॅक तुमचे सरळ सहज कथनसुद्धा भावनेला आवाहन करून जाते.

सुबोध खरे's picture

12 Jun 2016 - 8:42 pm | सुबोध खरे

स्नेहा ताई
चार चाबकाचे फटके लगावून तो माणूस सुधारणार नाही. पुरुष सहज सुधारणार नाहीत (सत्ता कोण सोडून देईल).
स्त्रियांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे कि आपण आपल्या मुलाला लहान पणापासून मुलगा आणि मुलगी सारखीच आहेत हे शिकवायला सुरुवात केली तर पुढच्या पिढीत स्त्रीला समान पातळीत आणणे सुलभ होईल.
दुर्दैवाने मुलगा असलेली स्त्री मी काय मुलाची आई आहे म्हणून टेचात असते मग ती मुलाला काय शिकवणार आणि त्याला समानतेचे धडे काय देणार.
मझ्या आईने माझ्या आणि माझ्या भावाच्या अशा दोन्ही लग्नात वरमाई म्हणून विहिणी कडून पाय धुवून घेण्यास स्पष्ट नकार दिला. दोन्ही लग्नात दोन्ही बाजूनी समान खर्च केला
उपस्थित असलेल्या बर्याच बायका आणि मुलीना आपोआप संदेश दिला गेला कि वरमाई म्हणजे कोणी आकाशातून पडलेली नाही. मुलगा जन्माला घातला यात स्त्रीचे काय कर्तृत्व आहे कि तिने आयुष्यभर शेखी मिरवावी.
असे सामाजिक प्रबोधन झाल्याशिवाय खरी समानता येणार नाही.

रातराणी's picture

12 Jun 2016 - 8:00 am | रातराणी

सुन्न :(

बाकी अनुभव हतबुध्द करणारे आहेत यात शंकाच नाही. आपल्या समाजात अजूनही समाजमान्यतेच्या अनाठायी कल्पना आहेत.

बाळ सप्रे's picture

13 Jun 2016 - 3:41 pm | बाळ सप्रे

गरोदरपणा गावाला 'दाखवणे'
आणि
मुंबई सोलापूर रीक्षा प्रवास..

दोन्ही गोष्टी कहर आहेत..

अशावेळी त्यांच्यावरच्या रागाचा रुग्णावरील उपचारावर परीणाम होउ न देण्यासाठी फार पेशन्सची गरज आहे..

बाळ सप्रे's picture

13 Jun 2016 - 3:44 pm | बाळ सप्रे

रच्याकने..
हतबुद्ध की हतबद्ध ??

माझ्या माहितीप्रमाणे हतबुद्ध (हत-- शक्तिहीन झालेला/ली + बुद्ध ---बुद्धी) म्हणजे बुद्धी काम करेनासा झालेला
उदा. हताहत (हत-- शक्तिहीन झालेला/ली + आहत-- आघातामुळे)
हतवीर्य इ इ
बद्ध म्हणजे बांधलेला. उदा. स्थान बद्ध
भाषातज्ञानी मार्गदर्शन करावे.

बाळ सप्रे's picture

13 Jun 2016 - 6:32 pm | बाळ सप्रे

पटलं..

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jun 2016 - 4:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय काय पण नमुने भेटत राहतात राव तुम्हाला :/

तुमच्या पेशेंस ला सल्यूट! _/\_

स्वामिनी's picture

13 Jun 2016 - 4:15 pm | स्वामिनी

हे सर्व विचित्र प्रकार सुरु असताना MISSION 2020 IMPOSSIBLE.

नगरीनिरंजन's picture

13 Jun 2016 - 5:07 pm | नगरीनिरंजन

आतून उमाळा असतो म्हणून नाही; पण एक पझेशन आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून बहुसंख्य लोकांना पोरं जन्माला घालायची असतात याबद्दल खात्री पटत चालली आहे माझी.

विवेकपटाईत's picture

13 Jun 2016 - 7:53 pm | विवेकपटाईत

आपल्या देशात अशिक्षित तर सोडा चांगले शिकलेले लोक हि खास करून उत्तर भारतात 'उपरच्या शक्तींवर' लोक जास्त विश्वास ठेवतात. डॉक्टरची आठवण अगदी शेवटच्या क्षणी येते. पेशंट दगावला कि मग हाणामारी दिल्लीत तरी हे नित्याचेच आहे (विशेषकरून सरकारी हॉस्पिटल मध्ये). मुलगी झाली कि सासरचे लोक भेटायला हि येत नाही. हे मी डोळ्यांनी बघितले आहे. मला मुलगी झाली होती (चांगले नावाजलेले हॉस्पिटल होते) तेंव्हा एका वृद्ध पंजाबी स्त्री चांगली शिकलेली ने अत्यंत उदास होऊन म्हंटले होते ' काके (मुलगा) कोई बात नहीं अगली बार लड़का हो जायेगा' मला आश्चर्य वाटले. नंतर माझ्या आईने सागितले तिच्या मुलीला दोन दिवस अगोदर मुलगी झाली होती. सासरहून कुणीही भेटायला आले नव्हते. नवरा सुद्धा...

चांदणे संदीप's picture

14 Jun 2016 - 6:52 am | चांदणे संदीप

या लेखासाठी तुम्हांला धन्यवाद, समयसूचकता तसेच व्यवहारिकता अंगी बाळगून असणाऱ्या तुमच्या स्वागत सहाय्यिकेचे कौतुक आणि त्या तीन नररत्नांना अनेक मार!

Sandy

बियर बार मध्ये कन्सेशन मागता का?

एक नंबर!

नंदन's picture

14 Jun 2016 - 10:54 am | नंदन

अवघड आहे! असलं काही नुसतं वाचूनच त्रास होतो; तर प्रत्यक्ष यासारखे अनुभव येणं हे डॉक्टरांना किती मनस्ताप देणारं असू शकेल याची कल्पनाच करू शकतो.

आनंदी गोपाळ's picture

14 Jun 2016 - 7:28 pm | आनंदी गोपाळ

पीसीपीएनडीटी बद्दलच्या आंदोलनाबद्दल शुभेच्छा.

सध्या आम्हीही काळ्या फिती लावून काम करत आहोत.

भंकस बाबा's picture

14 Jun 2016 - 11:18 pm | भंकस बाबा

तुमच्या अनुभवावर अजुन लेख येउद्या.

सौन्दर्य's picture

15 Jun 2016 - 8:10 am | सौन्दर्य

सहज सोप्या भाषेतील कथन आवडले. ह्या काळात देखील काही मंडळी अशी वागतात हे वाचून आश्चर्यच वाटले आणि त्यांच्या मानसिकतेबद्दल कीव.

अभिजीत अवलिया's picture

15 Jun 2016 - 2:31 pm | अभिजीत अवलिया

माझ्या पत्निची कराडला प्रसूती झाली तेव्हा एकदा दवाखान्यात असताना तिथे एक म्हातारी स्त्री माझ्या बाजूला बसली होती. तिथून जाणार्या दुसर्या एका बाईने तिला 'काय झालं गं सुनेला ?'असे विचारताच 'काय हुतयं ह्या **ला. परत पोरगीच झाली' हे अतिशय दु:खाने सांगितले. स्वत:च्या सुनेला चार लोकांत असे बोलणारे लोक आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Jun 2016 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे

आता तरी मुलगा होईल म्हणुन हे लोक तीन तीन चार चार मुली होउ देतात. अशामुळेच भारताची लोकसंख्या वाढली आहे.

कधी सुधारणार भारत देश.

असंका's picture

17 Jun 2016 - 1:32 pm | असंका

हतबुद्ध!! अगदी समर्पक!!

हेमंत लाटकर's picture

18 Jun 2016 - 4:33 pm | हेमंत लाटकर

हतबुद्ध जाहलो!

डाॅक्टर स्वागत सहाय्यिकाच का ठेवतात सहाय्यक का नाही:)

भोळा भाबडा's picture

18 Jun 2016 - 8:42 pm | भोळा भाबडा

ऋ

सुबोध खरे's picture

18 Jun 2016 - 8:00 pm | सुबोध खरे

लाटकर साहेब
भारतीय कायद्या प्रमाणे पुरुष डॉक्टरला स्त्री रुग्ण तपासायचा असेल तर तेथे दुसरी स्त्री सेवक/ परिचारिका(attendant) असणे आवश्यक आहे. त्यामुळे मला स्वागत "सहायिका" ठेवणे आवश्यक आहे.

माझीही शॅम्पेन's picture

18 Jun 2016 - 8:59 pm | माझीही शॅम्पेन

वाह डॉक नेहमी प्रमाणेच भन्नाट लेख !!!

रचाकने आता कोणताही मिपा-कर आता तुम्हाला डिसकाउंट मागायला कचरणार :) नाहीतर त्याचाच किस्सा इकडे यायचा :)

सुबोध खरे's picture

18 Jun 2016 - 10:07 pm | सुबोध खरे

मी मिपाकरां कडून पैसे घेत नाही

पोटापुरतं मिळत आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Jun 2016 - 10:18 pm | टवाळ कार्टा

यामुळे आणखी मिपाकर येतील =))

खटपट्या's picture

19 Jun 2016 - 12:02 pm | खटपट्या

देव न करो कधी सोनोग्राफी करण्याची वेळ येवो. पण कधी आली तर तुमच्याकडेच येणार. :)

तसे असेल तर कधी तुमच्याकडे आलो तर मिपाओळख सांगणार नाही. :-)

शलभ's picture

20 Jun 2016 - 3:58 pm | शलभ

+१
नाहीतर पैसे दिल्यावर सांगेन. ;)

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2016 - 11:59 pm | स्वाती दिनेश

सुन्न, बधिर व्हायला झालं वाचून.. तुम्हाला असे फर्स्ट हँड एक्पिरियन्स मिळताना शॉक बसले असतील सुरूवाती सुरूवातीला..
स्वाती