बर्याच गोष्टी या त्यांच्या साधेपणामुळेच आवडतात, मनाला भावतात. तो साधेपणा, ती सादगी मनाला कुठेतरी स्पर्श करते. चित्रपटांचही असच असतं. एकाच पठडीतल्या कथा, रंजकतेसाठी वापरलं जाणारं धक्कातंत्र, उगाचच घुसवलेली भडक द्रुश्य हे सगळ कितीही वेगळेपणानं मांडलं तरीही कंटाळा हा येतोच. या सगळ्यामधे एक साधी सरळ, अजिबात धक्का न देणारी कथा, शांत अभिनय असलेली आणि मुख्यातः गल्ला भरणे हाच मुद्दा नसलेली एक चित्रक्रुती जेव्हा समोर येते तेव्हा आपण पाहतोच. ती मनाला कुठेतरी अलवारपणे स्पर्श करते अगदी तो चित्रपट उत्तम वा उत्क्रुष्ट नसला तरीही... 'डिअर डॅड'च्या बाबतीत असच काहीस होतं.
४५ वर्षांचा नितीन स्वामीनाथन आणि त्याचा १४ वर्षांचा मुलगा शिवम ही दोन पात्र या कथेच्या केंद्रस्थानी आहेत. संपूर्ण कथा या दोघांच्याभोवती फिरते. ही कथा एका प्रवासाची आहे. एक असा प्रवास ज्यात बापाला त्याच्या मुलाला काहीतरी सांगायच आहे. एक गुपित....असं गुपीत ज्याचा परीणाम संपूर्ण घरावर होणार आहे. याच मुद्द्यावर तो प्रवास चालु होतो. या प्रवासात ते नितीनच्या आइच्या घरी थांबतात, मधे त्यांना एक टीवी स्टार भेटतो अस बरच काहीकाही होतं. ते गुपित आणि हे दोघं या मार्गावर कथा अगदी सरळ चालते. मग त्या गुपिताचं काय होतं, त्याचा परिणाम काय होतो हे सगळं सांगण्याची ही जागा नाही. त्यासाठी चित्रपट पाहणं उत्तम.
जेवढी कथा साधी आहे तेवढीच पटकथाही शांत आहे. अगदी एकच प्रसंग सोडला तर अगदी शेवट्पर्यंत कथेबाहेर वाटण्यासारखं असं काहिच नाही आणि विशेष म्हणावं असही काही नाही. छायालेखन हि खरतर जमेची बाजु. मुकेश जी न फार सुंदर फ्रेम्स लावल्या आहेत. तो आपल्याला दिल्ली ते मनाली या सफरीच उत्तम दर्शन घडवतो. राघव-अर्जुन आणि उज्ज्वल कश्यप यांच्या गीतांपेक्षा कथेच्या हातात हात घालत जाणारं पार्श्वसंगीत मनाला जास्त आवडतं. हे संगीत ऐकताना 'पिकु'चा संगीत दिग्दर्शक अनुपम रॉयची आठवण होत राहते. तनुज भरमारचा हा पहिलाच चित्रपट. त्याच नवखेपण जाणवत जरी असलं तरीही त्याच्या दिग्दर्शनात एक काहीतरी वेगळेपणा आहे हे ठामपणे लक्षात येतं हे महत्वाचं. पहिल्याच प्रयत्नात एवढी साधी सरळ तरीही वेगळी कथा घेउन चित्रपट करण्याच्या त्याच्या प्रयत्नाच खरच कौतुक करावं तेवढं कमीच. मी हे का म्हणतोय ते वाचकांना चित्रपट पाहिल्यानंतर कळेलच.
अभिनय हा कुठल्याही चित्रपटाचा प्राण असतो. तो जर चांगला असेल तर बाकिच्या बर्याच गोष्टी दुर्लक्षीत होतात किंवा करता येतात. इथे अभिनय हिच चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजु आहे हे मान्य करायला कुठलीही हरकत नाही. तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा पदार्पण करणार्या अरविंद स्वामीचं कौतुक करणं गरजेच आहे कारण एवढ्या मोठ्या सुट्टीनंतर आपल्या अभिनयात फारसा बदल होउ न देणं छान जमलय त्याला. ४५ वर्षांचा बाप अगदी असाच असेल बहुदा असाच असावा इतका चपखल तो भूमिकेत बसतो. हिमांशु शर्मा हा या कथेचा दुसरा नायक. १४ वर्षाचा मुलगा साकारताना जरा वयापेक्षा मोठा वाटतो तरीही अभिनय चोख केलाय. या दोघांबरोबर अजुन एक जण आपली दखल घ्यायला भाग पाडतो तो म्हणजे अमन उप्पल... आपला तथाकथित स्टारपणा आणि त्याचबरोबर एक संवदेनशील माणुस त्यानं व्यवस्थित सांभळलाय. दिग्दर्शकाच विशेष कौतुक त्याच्या या निवडीबद्दल केलच पाहिजे.
या सगळ्या बाबिंसह हा चित्रपट इतरांपेक्षा जरा क होइना पण वेगळा ठरतो. अगदीच उत्तम नसला तरी तो एकदा पाहुन दुर्लक्षीत करण्याएवढा टुकारही नाही हे महत्वाच. अरविंद स्वामीचा अभिनय, उत्तम छयाचित्रण आणि सुंदर पार्श्वसंगीत या तीन महत्वाच्या आणि साधी सरळ अजिबात वेगळेपणा न सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारी कथाइपटकथा या सगळ्यांमुळे हा चित्रपट आपल्या लक्षात राहतो. प्रत्येकाने एकदा तरी जरूर पहावा असा जरी नसला तरीही पहावा हे मात्र नक्की.
प्रतिक्रिया
10 Jun 2016 - 4:51 pm | एस
चित्रपट अरविंद स्वामीसाठी नक्कीच पाहेन.
10 Jun 2016 - 5:09 pm | पिशी अबोली
मस्त! बघायला मिळाला तर बघेन नक्की.
10 Jun 2016 - 6:29 pm | यशोधरा
नवीन आहे का सिनेमा? पाहीन हा सिनेमा मिळाला तर.
10 Jun 2016 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन हे का भो पिच्चर ?
-दिलीप बिरुटे
11 Jun 2016 - 10:06 am | अनिरुद्ध प्रभू
मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाला.
10 Jun 2016 - 7:46 pm | कविता१९७८
१४ वर्षाचा मुलगा हा अनाथ असेल अन सगळ्याच्या नकळत बापाने पाळण्यात आणुन ठेवला असेल असे काहीतरी कथानक असावे असे वाटते
10 Jun 2016 - 7:51 pm | अनिरुद्ध प्रभू
तस काही नाही आहे.
11 Jun 2016 - 10:17 am | संजय पाटिल
सस्पेन्स फोडु नका हो..
बघायचाय मला...
11 Jun 2016 - 10:32 am | शोधा म्हन्जे सापडेल
पुण्यामधुन हा चित्रपट गायब झाला आहे. पण किकास वर टोरेन्ट आलं आहे,
11 Jun 2016 - 1:57 pm | सिरुसेरि
हा सिनेमा मिळाला तर नक्की पाहिन . हा लेख वाचुन प्रकाशराजचा "अभ्युम नानम" हा सिनेमा आठवला .
एरवी जास्त करुन खलनायकी भुमिकांमधल्या प्रकाशराजने यामध्ये मुलीची सतत काळजी असलेल्या वडीलांचा रोल उत्तम केला आहे .
13 Jun 2016 - 1:31 pm | अभ्या..
स्वामी बर्यापैकी तब्येत मेंटेन ठेवलाय की. सिग्नेचर मिशा नसल्यातरी हँडसम दिसतो आहे स्वामी.
13 Jun 2016 - 1:48 pm | अनिरुद्ध प्रभू
फार काही फरक नाही पडलाय त्यात.........रच्याकाने फिल्म पाहिलित का?
13 Jun 2016 - 1:50 pm | अभ्या..
नाही. टेलर बगितलो
13 Jun 2016 - 2:27 pm | अनिरुद्ध प्रभू
अचानक मालवणी?????
14 Jun 2016 - 10:45 am | अभ्या..
न्हवं, सोलापुरी ते बी वरिजिनल.
13 Jun 2016 - 1:51 pm | पद्मावति
मस्तं! बघीन नक्कीच.
14 Jun 2016 - 10:30 am | उल्का
लेखन आवडलं.
उत्सुकता वाढली आहे.
बघेन नक्की.
14 Jun 2016 - 11:03 am | अनिरुद्ध प्रभू
आवर्जुन पहाच! वेगळ्या कथेचा चित्रपट आहे हा.... साधा सिंपल सरळ.....
14 Jun 2016 - 6:35 pm | मराठी कथालेखक
कोणत्या भाषेतला बुवा हा चित्रपट ?
15 Jun 2016 - 9:33 am | अनिरुद्ध प्रभू
हिंदीच आहे राजे...