अझहर...

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
4 Jun 2016 - 10:34 am

कथाकथनाचं सगळ्यात प्रभवी माध्यम कोणतं असेल तर नक्किच चित्रपट हेच आहे यात दुमत नाही. मात्र चित्रपटातुन कथाकथन करताना बर्‍याच गोष्टिंच्या अनुशंगान, त्यांच्या ढंगानं कथेत आणि कथनाच्या पद्धतीत बदल करायचे असतात आणि ते आवश्यकही असतच. म्हणजे चित्रपटात फक्त कथाच उत्तम असुन चालत नाही तर त्याबरोबर पटकथा, संवाद, छायाचित्रण, संगीत, अभिनय, या सगळ्याच व्यवस्थित संकलन आणि या सगळ्याला जोडनारा दुवा म्हणुन दिग्दर्शन.
या सगळ्यांची भट्टी जर एकत्रित जमली तर आणि तरच चित्रपटातुन कथा ही व्यवस्थितरित्या पोचते, परिणामकारक होते.
निश्चितच या सगळ्याचा पाया हा कथा आणि पटकथा हाच आहे, तोच जर धड बांधला नसेल तर पुढच्या इमारतीच काय होतं हे सांगायची गरज नाही. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित चित्रपट 'अझहर' च्या बाबतीत नेमक हेच झालाय.

"मै अझहर...सिर्फ तीन बातों के लिये फेमस हूं ....एक खूदा को मानता हूं, दो शादियॉ हुइ है मेरी और अपने पहले तीन मचेस मे सेंचुरी बनानेका रेकोर्ड है.."

चित्रपट सुरु होतो तो मनोजच्या खेळी दाखवत. मग सावकाशपणे चित्रपट आपली पकड बनवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या वीस मिनिटांमधे कथानकाची दिशा आणि पद्धत आपल्या लक्षात येते आणि मध्यांतरपर्यंत आपण आरामात जांभया देउ लागतो. रजत अरोरा सारख्या कथाकाराकडुन हे कथानक लिहिलं गेलय याच आश्चर्य वाटत राहतं. खरतर चित्रपटाच्या नामावलीत पटकथाकाराच नाव नमूद नाही पण ति सुद्धा रजत अरोरा यांनीच लिहिली अस वाटत नाही. टॅक्सी नो.९२११ असेल किंवा वन्स अपोन अ टाइम सिरिज असेल, रजतच लेखन नेहमीच उजव राहिलय. चित्रपटाचा हुकुमाचा एक्का राहिलय. पण तेच इथे कुठेतरी हरवलय हे जाणवतं. पटकथेवर खरतर अजुन बरच काम करण्याची गरज होती, रजतसारख्या लेखकाकडुन अस लेखन अपेक्षीत नाही. भूतकालातुन उलगडत जाणारा वर्तमान तोही थेट नायाकाच्याच तोंडातुन..हेच कथेच मुख्य प्रमाण आहे कथा सांगण्याचं, त्यामुळे पटकथा योग्य नसल्यानं कथेचा वेग आणि इप्सित परिणाम दोघांवरही फरक पडतो.कथा कितीही चांगली असेल तरीही जर पटकथा जर नीट नाही झाली चित्रपट कसा फसतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट ठरतो. टोनी डिसुझाच दिग्दर्शन नवखं आहे हे सुद्धा जाणवत राहतं.
हा चित्रपट म्हणजे एका खर्‍या व्यक्तीच्या संघर्षाची कहानी आहे त्यामुळे चित्रपटात असणारी पात्र रंगवताना घेतली गेलेली मेहनत जाणवते हा जमेचा मुद्दा. इम्रान हाश्मीचा अभिनय 'हमारी अधुरी कहानी' पासुन सुधरत चाललाय अस म्हणायला
हरकत नाही. त्याचा आणि अझहरचा चेहरा थोड्याफार प्रमाणात जुळतो हे अजुन एक. प्राची देसाइचा अभिनय काही उत्तम नसला तरीही नूरीनच्या भूमिकेत ती चपखल बसते. तिचा साधेपणा , अझहरवर असलेलं प्रेम तिच्या डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसत. रवीच्या भूमिकेत गौतम गुलटी, सिद्धूच्या भूमिकेत मन्जोत, कपीलच्या वरून बदोला आपापलं काम चोख बजावतात. अ‍ॅड. रेड्डिच्या भूमीकेत कुणाल रोय कपूर भाव खाउन जातो. त्याच ते केसांवरुन फनी फिरवणं असेल किंवा बोलण्याची ढब आपल्या बराच वेळ लक्षात राहते. मीराच्या भूमीकेत असलेली लारा दत्ता उगाचच करारा स्वभाव दाखवण्याच्या नादात हातातले सगळी द्रुष्य गमावून बसते. केस संपल्यानंतर जेव्हा अझहरने तिच्यासाठी ठेवलेली चिट्ठी तिला मिळते तो प्रसंग अधिक चांगला होउ शकला असता. सगळ्यात एक मुख्या पात्र दुय्यम स्थानी असुन लक्षात राहत नाही ते म्हणजे संगीता. तिला सोडुन बाकी सगळ्यांच्या निवडीबद्दल दिग्दर्शकाचं कौतुक व्हायला हव पण त्याने संगीता साठी नर्गीसची निवड करवी हे पटत नाही. ति एक उणी बाजु आहे.
चित्रपताच संगीत लक्षात ठेवाव अस जरी नसल तरीही सगळी गाणी योग्य त्या जागी येतात हेही नसे थोडके. कथा-पटकथा, संवाद, दिग्दर्शन या सगळ्याच बाबींवर चित्रपट उत्तम नसला तरीही अगदीच टाकाऊ हि नाही. काही प्रसंग-संवाद सोडले तर चित्रपटातलं काहीही लक्षात राहत नाही हे शेवटी..
थोडक्यात हा चित्रपटसुद्धा वन टाइम वंडर ठरतो.....

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2016 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजहर बद्दलच परिक्षण जमलंय. कथा थोडक्यात आली असती तर परिक्षण अजून खुललं असतं असं वाटल. बाकी, क्रिकेटमधे अजहरची छबी फिक्सर म्हणून झाली आणि अजहर नजरेतून जो उतरला तो उतरलाच आता कोणतंही स्पष्टीकरण कथानक त्यातून त्याची निर्दोष मुक्तता करु शकत नाही. आणि हा पूर्वग्रह असल्यामुळे चित्रपट आणि वास्तव जीवन हे वेगवेगळे असतात तरीही चित्रपट पाहण्याची अजिबात शक्यता नाही.

लिहित राहा. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

वस्तुस्थीती मांडण्यापेक्षा अझर कसा परिस्थीतीचा शिकार झाला वगैरे मुलामा देण्याचा प्रकार करण्यासाठी झालाय हेच (रवी शास्त्री,श्रीकांत्,ई प्रभुतींनी जाहीर नापसंती व्यक्त करून ) सोदाहरण दाखविले आहे.

मुळात ज्या अझरवर तो कोण मुस्लीम का हिंदु हे न पाहता निर्वाज्य प्रेम केले त्यानेच "फिक्सींग" प्रकरणात मी मुस्लीम असल्यानेच गोवले असा कांगावा करावा हेच मोठे कांगावाखोर वरतन होते.

असल्या सफाईपटाला लोकांनीच (सुपडा)साफ केले ते बरे झाले.

सुपडा साफ पिटातला नाखुस सिनेमावाला

४. क्षेत्ररक्षण

बोका-ए-आझम's picture

4 Jun 2016 - 10:46 pm | बोका-ए-आझम

चित्रपट सुरु व्हायच्या आधीच disclaimer दाखवला आणि माझा सगळा interest संपला. मुळात दिग्दर्शकालाच हा चित्रपट नीट पेलवला नाही. शिमित अमीन (चक दे इंडिया), राकेश ओमप्रकाश मेहरा (भाग मिल्खा भाग), आशुतोष गोवारीकर (लगान) आणि सर्वात भारी म्हणजे मन्सूर खान (जो जीता वही सिकंदर) यांनी जशी क्रीडाक्षेत्रावर आधारित चित्रपटा उत्कंठा आणि नाट्यमयता आणली होती ते काहीही टोनी डिसूझाला जमलेलं नाही. मुळात जसे फरहान अख्तर किंवा शाहरुख खान किंवा आमीर खान खेळाडू वाटले तसा इम्रान हाश्मी खेळाडू वाटत नाही. कोर्टरुममधलं नाट्यही पकड घेत नाही. एकंदर पैसे वाया.

पैसा's picture

5 Jun 2016 - 9:59 pm | पैसा

अझरवर सिनेमा? उद्या दाऊद इब्राहिमवर पण काढतील.

गामा पैलवान's picture

5 Jun 2016 - 10:15 pm | गामा पैलवान

पैसाताई,

दाऊद इब्राहीमवर सिनेमा काढलेला आहेच आगोदर कुणीतरी. त्यात ऋषी कपूर दाऊदभाई म्हणून दाखवलाय. एकदोन संवाद मराठीतसुद्धा आहेत.

आ.न.,
-गा.पै.

किसन शिंदे's picture

5 Jun 2016 - 10:37 pm | किसन शिंदे

डी डे! अप्रतिम चित्रपट आहे तो.

पैसा's picture

5 Jun 2016 - 10:52 pm | पैसा

हरे राम

किसन शिंदे's picture

5 Jun 2016 - 11:03 pm | किसन शिंदे

इतक्यात डोक्याला हात नको पै, आधी चित्रपट पहा मग बोला.

चित्रपट दाऊदवर नसून राॅ ने त्याला भारतात आणण्याच्या केलेल्या प्रयत्नावर आहे, ज्यात ऋषी कपूरसहीत इतरांचेही काम खरेच खूप सुंदर झालेय.

अभ्या..'s picture

5 Jun 2016 - 11:40 pm | अभ्या..

दाऊद तर अलीकडं झाला, हाजीमस्तान, वरदराजन मुदलियार वर पण पिक्चर होऊन गाजून गेलेत.
शेम टू शेम नामक मराठी चित्रपटात लकश्याने डॉन चा रोल केलाय, गॉगल लावून तो जवळपास दाउदच दिसतो.

किसन शिंदे's picture

5 Jun 2016 - 10:41 pm | किसन शिंदे

बाकी परीक्षण प्रचंड आवडले. चित्रपटाची समिक्षा योग्य शब्दात कशी करावी याचा वस्तूपाठ घालून देणारा लेख!

पुलेशु

चलत मुसाफिर's picture

5 Jun 2016 - 11:48 pm | चलत मुसाफिर

या इसमाने एका हिंदू अभिनेत्रीशी विवाह केला व तिला स्वधर्म सोडून मुसलमान होण्यास भाग पाडले. या एका कारणासाठी हा चरित्रात्मक चित्रपट पहायचा नाही असे ठरवले. चित्रपट सुमार असणार याचीही खात्री होती, हा वेगळा मुद्दा.

सदर अभिनेत्रीचे चित्रपट (उपग्रह वाहिनीवर अथवा मोठ्या पडद्यावर) पहाणेही केव्हाच सोडले आहे.

सिंधी लोक्स स्वतःला हिंदू म्हणवतात का?

चलत मुसाफिर's picture

6 Jun 2016 - 11:26 am | चलत मुसाफिर

जर हिंदू समाजाचे घटक स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला कचरत वा संकोचत असतील, तर तो दोष अन्य कुणाचा नसून हिंदू समाजाचाच आहे.

अभ्या..'s picture

6 Jun 2016 - 11:30 am | अभ्या..

100 200 करायचे का?
बादवे ज्वाला गुट्टा दाखवलीय का? निदान अझर्ची हैदराबादेतली आलिशान जिम तरी? लै ऐकलंय त्याबद्दल

अनिरुद्ध प्रभू's picture

6 Jun 2016 - 11:32 am | अनिरुद्ध प्रभू

चित्रपट २०११ लाच संपतो, परिणामी आपली इच्छा अपूर्ण....

अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र,
नको जायला मग

अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र,
नको जायला मग

अनिरुद्ध प्रभू's picture

6 Jun 2016 - 12:09 pm | अनिरुद्ध प्रभू

आपल्याला वाटत आहे अभ्याशेठ कि अजुन चित्रपट आहे तिथे?

अनिरुद्ध प्रभू's picture

6 Jun 2016 - 11:20 am | अनिरुद्ध प्रभू

डॉ.साहेब, किसनराव प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद, कारण प्रतिक्रियाच ऊर्जा देतात, चुका सांगतात, उत्साह देतात..

बाकी आझमसाहेब,

मुळात दिग्दर्शकालाच हा चित्रपट नीट पेलवला नाही.

\१००% सहमत

पण इम्रान खेळाडु वाटत नसला तरी त्याचा अभिनय सुधारत चाललाय हे ही नसे थोडके.....

वेल्लाभट's picture

6 Jun 2016 - 12:17 pm | वेल्लाभट

बघावासा कधीच वाटला नाही,
पण परीक्षण छान. चोरीचं उदात्तीकरण गैरच.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

6 Jun 2016 - 12:19 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

बाकि काय नाय!!
अझहरची धार्मिक कट्टरता तेवढी खटकते.

चलत मुसाफिर's picture

6 Jun 2016 - 1:02 pm | चलत मुसाफिर

सदर इसमाच्या धर्मांधतेपेक्षा अधिक संतापजनक आहे ती संबंधित अभिनेत्री व तिच्या कुटुंबाची धर्मप्रतारणा. लग्नाला संमती हवी असेल तर सदर इसमाला हिंदू झाले पाहिजे अशी अट त्यांना सहज घालता आली असती. परंतु त्यांनी मध्ययुगीन राजपूत राजघराण्यांचा लाजिरवाणा वारसा पुढे चालवणे पसंत केले आणि मुलीला स्वहस्ताने परधर्मात ढकलली.

अनिरुद्ध प्रभू's picture

6 Jun 2016 - 1:20 pm | अनिरुद्ध प्रभू

जाउ द्या हो.... आता बोलुन काही उपयोग आहे का? नाही! जे झालं ते झाल.

मराठी कथालेखक's picture

6 Jun 2016 - 4:34 pm | मराठी कथालेखक

ती संबंधित अभिनेत्री व तिच्या कुटुंबाची धर्मप्रतारणा

तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न नाही का ? तसही कुणी कोणता धर्म आचरावा याची मुभा घटनेने सगळ्या नागरिकांना दिलेली आहेच. स्वेच्छेने धर्मांतर करणार्‍याबंद्दल राग नसावा असे मला वाटते.

पेशवा भट's picture

6 Jun 2016 - 1:41 pm | पेशवा भट

माई मोड ऑन...
रे अनिरुद्ध परिक्षण चांगले लिहतोस हो. बाकी अझर जेव्हा फॉर्मात होता तेव्हा त्याच्याबद्दल "कोळश्याचा खाणीत हिरा मिळाला" असं शिवसेना म्हणत असे हे मला परवा म्हणत होते.
माई मोड ऑफ.

अनिरुद्ध प्रभू's picture

6 Jun 2016 - 2:03 pm | अनिरुद्ध प्रभू

वेल्लाशेठ आणि पेशवे भट दोघांचेही आभार!!

पद्मावति's picture

6 Jun 2016 - 3:29 pm | पद्मावति

परीक्षण खूप छान केलंय.
मात्र सिनेमा बहुतेक नाहीच बघणार. अझहर चं ग्लॉरिफिकेशन बघवणार नाही.

अनिरुद्ध प्रभू's picture

6 Jun 2016 - 3:41 pm | अनिरुद्ध प्रभू

पण एक सांगु अर्थातच हलकेचं घ्या....
चित्रपट हा समाज मनाचा आरसा आहे वगैरे सगळं ठिक आहे पण जेव्हा एखद्या गोष्टीचं अस्तित्व असलेली कथा कलाक्रुती बनुन आपल्या समोर येते तेव्हा तिच्या बद्दल कितिही पूर्वग्रह असले तरिही ती पहावी. कारण कदाचित आपलीच मतं, आपलेच ग्रह वेगळ्या नजरेनं, वेगळ्या अर्थांसह समोर येण्याची शक्यता असते. कधी आपली मत बदलूही शकतात. स्वतःला पडताळता येतं. म्हणुन आपली ज्याच्या विषयी मत वा ग्रह आहेत तेच सर्वप्रथम पहावं अगदी आवर्जुन....मग ते चांगलं असो वा वाईट.