लाल इश्क (मराठी चित्रपट परीक्षण)

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 10:00 pm

प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय?? उत्तर आहे होय, जर अनुभव गाठीशी असेल तर बाहेरच्या भाषेतील निर्माताही मराठीत येउन व्यवस्थित सगळं manage करू शकतो........
क अभिनेता आणि त्याची आधीची अर्धवट प्रेमकथा आणि कथेत दुसर्या नायिकेचे आगमन आणि या दोन्ही प्रेमकथांचा वेगवेगळा अन शेवटी एकत्र शेवट अशी एक वेगळीच कहाणी चित्रपटात बघायला मिळते.कहाणीची सुरवातच इतकी जोरदार कि खून अन त्याचा शोध घेणारा पोलिस अधिकारी. मग हि कथा प्रेमकहाणी भोवती दोन कोनानी फिरल्यावर सरतेशेवटी त्या खुनाचा झालेला उलगडा. वास्तविक बघता या कहाणीला दोन नायिका असूनही एक थ्रिलर कहाणी म्हणून मोजणे जास्त संयुक्तिक ठरेल !! पण तरीही पूर्णत: थ्रिलर म्हणता येणार नाही कारण कथेची विविधांगी उठाठेव. खून-खुनाचा हेतू-खुनाची प्रक्रिया-खुनाचा शोध अन खुनाचा उलगडा अन शेवटच्या काही मिनिटात समजलेले खुनाचे कारण असल्या विविध कोनानी फिरणारी कहाणी आपण थ्रिलर या संकल्पनेतच मांडायला हवी.ते काहीही असो एका बाहेरच्या निर्मात्याने मराठीत येउन एक छानशी कहाणी उत्कृष्टरीत्या सादर केलेली आहे.

सुपरस्टार स्वप्नील जोशीने साकारलेला चित्रपट अभिनेता यश पटवर्धन आणि दोन नायिका १. अंजना सुखानी आणि समिधा गुरु आणि सोबतच जयंत वाडकर एका महत्वाच्या भूमिकेत/खलनायकाच्या भूमिकेत. स्वप्नील जोशीने आजवर एक romantic मराठी हिरो अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे पण त्याच्या romantic नसलेल्या अभिनय क्षमतेला वाव देणारी कलाकृती म्हणून भविष्यात लाल इश्क चे नाव घेतले जाइल. अंजना सुखानी हि हिंदी अभिनेत्री खरे पाहता पण मराठीची तयारी तिच्याकडून दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी चांगली करवून घेतलेली आहे हे बरेचदा जाणवते. पण हशा पिकावते समिधा गुरु तिच्या "बाबू" संबोधण्याच्या पद्धतीने. हे "बाबू" संबोधन इनक्लुड कार्यासाठी दिग्दर्शकाचा हेतू काहीही असो पण झालंय ते हास्यास्पद. दोन्ही अभिनेत्र्यांच्या अभिनयातील कमतरतेबद्दल बरेच विशद करता येईल पण सध्या त्यांचे सौंदर्य अन स्वप्नील जोशीचा अभिनय हीच अभिनयाची खासियत.

एक मराठी सिनेमा, एक त्रिकोणी प्रेमकथा आणि उल्लेखनीय नसलेले संगीत अशी एक कथा म्हणजे लाल इश्क. दोनच गाणे आणि त्यातीलही "चांद मातला" हे जरा सुश्राव्य गाणे आणि बाकी सगळाच ठणठणगोपाळ. अर्थात तशी कथेचीच मागणी त्यामुळे सुसह्य.

संजय लीला भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्य दिव्य सेट्स-वजनदार संवाद-उत्तम संगीत आणि शानदार पटकथा असे एक इम्प्रेशन त्याने सोडलेले आहे. पण यावेळेस सगळे व्यवस्थित जुळून आलेले असले तरी संगीताची अनुपस्थिती आणि मंदावलेली पटकथा याने बोर्या वाजवलेला आहे. मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

31 May 2016 - 10:31 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

स्वप्निलमध्ये पोटेंशियल आहे चांगल्या ॲक्टरचे ,त्याने जरा हटके भुमिका करायल्या हव्यात.

सतिश गावडे's picture

31 May 2016 - 10:42 pm | सतिश गावडे

सुपरस्टार स्वप्नील जोशीकडून खुप अपेक्षा आहेत. त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे. (असं तोच कुठल्यातरी मुलाखतीत म्हणाला होता.)

अप्रतिम चित्रपट परीक्षण. पुपशे.

समीर_happy go lucky's picture

31 May 2016 - 10:47 pm | समीर_happy go lucky

पुपशे??

सतिश गावडे's picture

31 May 2016 - 10:51 pm | सतिश गावडे

गलतीसे मिश्टेक हो गया. ते "पुपशु" म्हणजेच पुढील परीक्षणास शुभेच्छा असं लिहायचं होतं.

बोका-ए-आझम's picture

1 Jun 2016 - 1:12 am | बोका-ए-आझम

मी तर उलटं ऐकलं होतं. शाहरुख आणि काजोलची जोडी ही हिंदीतली स्वप्निल आणि मुक्ताची जोडी आहे. ;)

लाल इष्क नावाचा मराठी चित्रपट आहे आणि तो प्रदर्शित झाला आहे आणि तो आपण बघावा अशी प्रेरणा आपल्याला नेमकी का झाली???

समीर_happy go lucky's picture

1 Jun 2016 - 10:03 pm | समीर_happy go lucky

https://www.youtube.com/watch?v=bD1gepaUZms
हे राम लीला मधील गाणे अन त्याचे भन्साळीचे संगीत त्यातल्या डीपीला पदुकोणच्या expressions सकट मला आवडले होते. संगीताची इस्माईल दरबारची छाप हा विषय संगीताची समज नसल्यामुळे मी बाजूला ठेवतो पण गाणे आवडले होते अन फक्त या टायटल मुले बघितला

सतिश पाटील's picture

1 Jun 2016 - 11:41 am | सतिश पाटील

सुपरस्टार स्वप्नील?
शाहरुख खानला कॉपी करण्याव्यतिरीक्त आणखी काय करतो हा?
एके दिवशी बस मध्ये याचा तू हि रे नावाचा सिनेमा अक्षरश सहन केला.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Jun 2016 - 12:20 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

सुपरस्टार स्वप्नील?
शाहरुख खानला कॉपी करण्याव्यतिरीक्त आणखी काय करतो हा?

सहमत,
"तो आओ ना फिर" वगैरे हिंदी डायलाॅग त्याच्या तोंडी शोभत नाहीत,

याचा तू हि रे नावाचा सिनेमा अक्षरश सहन केला.

असहमत,
तू हि रे मला चांगला वाटला.

अनिरुद्ध प्रभू's picture

1 Jun 2016 - 2:28 pm | अनिरुद्ध प्रभू

सहन केला

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2016 - 4:11 pm | मराठी कथालेखक

स्वप्नील शाहरुखला कॉपी करतो यावर सहमत.
शिवाय त्याचे मराठी उच्चार काही वेळा खटकतात (संदर्भ : मितवा)

समीर_happy go lucky's picture

1 Jun 2016 - 10:05 pm | समीर_happy go lucky

असहमत स्वप्नील जोशी एक चांगला अभिनेता आहे आणि हो http://www.misalpav.com/node/३३०२५
या लिंक वर तू हि रे चे मी केलेले परीक्षण तुम्ही बघू शकता वाटल्यास
[संधी आहे तर ad करून घेतो ;)]

"तो आओ ना फिर" इतकं घाण वाटत ते ऐकताना...... ब्यॉक.........

मला पण खुप घाण वाटत ते. आओ ना फिर, लोकांना का आवडत देव जाणे.

सतिश गावडे's picture

1 Jun 2016 - 9:34 pm | सतिश गावडे

हे "आओ ना फिर" काय प्रकरण आहे?

सुपरस्टार स्वजो जेव्हा फार फार वर्षांपूर्वी कृष्णा मालिकेतील कृष्णा होता तेव्हा तो पेन्द्याला "आओ ना फिर" म्हणत असे का?

आदिजोशी's picture

1 Jun 2016 - 2:23 pm | आदिजोशी

हा सिनेमा दणकून आपटणार आहे असं मला वाटतं.

सुपरस्टार स्वप्नील जोशीने

स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्तीमंत उदाहरण आहेत.

हाहाहाहा ख्याख्याख्या

NiluMP's picture

1 Jun 2016 - 9:29 pm | NiluMP

:-)

परिंदा's picture

1 Jun 2016 - 3:19 pm | परिंदा

स्वजो ला सुपरस्टार म्हणण्याचे धैर्य फक्त याच माणसाकडे आहे.

स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्तीमंत उदाहरण आहेत.

अगागा मेलो :)

समीर_happy go lucky's picture

1 Jun 2016 - 9:57 pm | समीर_happy go lucky

असहमत स्वप्नील जोशी एक चांगला अभिनेता आहे आणि हो http://www.misalpav.com/node/३३०२५
या लिंक वर तू हि रे चे मी केलेले परीक्षण तुम्ही बघू शकता वाटल्यास
[संधी आहे तर ad करून घेतो ;)]

तुमचा अभिषेक's picture

1 Jun 2016 - 10:33 pm | तुमचा अभिषेक

त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे.

आणि सई सोबतची जोडी शाहरूख-प्रियांका ..

मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल

अर्थात, शाहरूख असणे म्हणजे काही भारी आहे की नाही यावर हे कौतुक आहे की नाही हे अवलंबून आहे.

मराठी कथालेखक's picture

2 Jun 2016 - 11:19 am | मराठी कथालेखक

मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल

मान्य. पण असं स्थान (म्हणजे आघाडीचा रोमँटिक नायक) त्याने शाहरुखची थेट नक्कल (हावभाव, देहबोली) न करता मिळवलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं.
बाकी इकडे शाहरुखची अधोगती चालू आहे... फॅन अगदीच फसला आहे, चेन्नई एक्स्प्रेस हिट झाला पण होता अगदीच टुकार.

किसन शिंदे's picture

1 Jun 2016 - 11:36 pm | किसन शिंदे

समीरराव नेम्कं किती बड्डे केक कापलं म्हनं तुम्ही?

नाखु's picture

2 Jun 2016 - 9:01 am | नाखु

जस लोकांनी स्वप्नीलला "आप्लं" म्हणलय्म तस यांना पण आपल म्हणा की !!!

एक चतुरस्त्र, अष्टपैलु,साक्षेपी,लालीत्यसम्राट्,भाषाप्रभू, मिपाप्रसिद्ध सिनेपरिक्षकास असे दूर नका लोटु.

मिपा वाचक नाखु

मृत्युन्जय's picture

3 Jun 2016 - 8:14 pm | मृत्युन्जय

काय बघतोय मी हे. संत किसनदेवांकडुन ही कमेंट?

समीर_happy go lucky's picture

4 Jun 2016 - 8:32 pm | समीर_happy go lucky

एक, का हो?? तुमच्यात जास्ती कापतात का?

अकिलिज's picture

3 Jun 2016 - 8:12 pm | अकिलिज

म्हणजे स्वप्निल जोशीचंही वय झालंय का आता ?

स्वप्नील जोशी ३५ वर्षाचा आहे :)

महागुरूं सारखा स्वजो ही डोक्यात जायला लागलाय.त्यांचाच
शिष्य तो.