हरवले ते गवसले का ? व कसे ? भाग - 8 लक्षाधीशाचा भिक्षाधीश!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
27 May 2016 - 12:13 am

हजारो रूपये डोळ्यासमोरून धडाघडा जाताना पाहण्याचे भाग्य (?) कपाऴी आले!!!

मित्रांनो, खालील धागा वाचला आणि मला माझ्या विदेशातील प्रवासात बसलेला हिसका आठवला...!
Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत..

आणि माझ्या जीवनातील हरवलेल्या गोष्टींत या कथानकाची भर पडली! आता काळ जखमाभरून काढणारे 'मलम' म्हणतात ते खरे आहे याची प्रचीती आली. पण आज 'पैसै परस्पर काढले गेले' हा धागा वाचला आणि त्या जखमेची खपली निघाली आणि आता ती कहानी सादर करायचे ठरवले असो.
त्याचे झाले असे की मी पत्नीसह अमेरिकेची सफर करायला गेल्या वर्षी उत्साहाने निघालो. इस्ट कोस्ट संपवून वेस्ट कोस्टसाठी जेएफके विमानतळावर जायसाठी निघालो. तेथील नातलगांनी तिथे पोहोचायला बरेचदा तारांबळ उडते असा अनुभव सांगितल्याने सकाळची फ्लाईट असेल तर त्या विमानतळाच्या आसपास आदल्यादिवशी रात्री पोहोचावे असा सल्ला दिला. तो मानून आम्ही आदल्या रात्री न्यूजर्सी भागातून ट्रेनने पेन स्टेशनात उतरून एका टॅक्सीने 'जेएफके इन' नावाच्या हॉटेलात उतरलो. नंतर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी विमानातून 8 तासाचा एक हॉल्ट करत करत सॅन फ्रँन्सिस्कोला उतरलो आणि नातलगाच्या गाडीतून मिलपिटास येथील ग्रेट मॉल जवळच्या त्याच्या घरी पोहोचलो. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही एक दिवस सोडून लगेच एल-ए, लास वेगास, ग्रेट कॅनियन वगैरे साठी 7-8 दिवसासाठी जाण्याची तयारी करून होतो. भाचा विनय करमरकरने आम्हाला जवळच्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधे नेऊन तो रात्र पाळीला निघून गेला. आम्ही दुसऱ्यादिवशी आरामात उठून लंच खायला पुन्हा इडली-डोश्याचा समाचार घेऊन क्रेडिटकार्डाने तेथील बिल चुकते केले व परतलो. तोवर मी वायफाय एक्टिव्हेट करून मोबाईलशी चाळे करत होतो. मेसेज आल्याच्या घंटा टऩटनायला लागल्या म्हणून कोणी कोणी मला आठवले ते पहायला उत्सुकतेने न्याहाळायला लागलो. पैकी एक मी आदल्यादिवशीपासून केलेल्या क्रेडिटकार्डाच्या उलाढालींचे एसएमएस एकामागून एक येताना पाहून माझे डोळे गरगरायला लागले. डॉलरची राशी हा हा म्हणता कमी कमी होत होत ती फक्त 2 डॉलर व काही सेंट्स उरलेली पाहून माझ्या दिल की धडकने वाढली. थंड वातानुकूलित हवेत घामाची जाणीव झाली. डोळ्यासमोरून हजारो पैसे काढल्याचे पहाण्याचे भाग्य भाळी आले...! आणि डोशांच्या बिलाने सांगता होऊन 'लक्षाधीशाचा भिक्षाधीश' झाल्याचे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मी पुन्हा पुन्हा क्रेडिट कार्ड खिशातून काढून पाहिले. तरीही डॉलर कसे काय पळवले गेले? असा माझ्याशी मीच बोलत होतो...
अन मग माझ्यातला 'कमांडर' जागा झाला...

पैसे परत मिळाले की नाही? भाग 2 चालू...

मांडणीविरंगुळा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

27 May 2016 - 1:31 am | चित्रगुप्त

हा प्रसंग घडल्याचे तुम्ही अमेरिकेत असताना समजले होते, परंतु त्यापुढे काय घडले, पैसे परत मिळाले की नाही हे समजले नाही, ती उत्सुकता आता पुढील भागात शमणार. क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेचे होते, कुठून घेतले होते वगैरे सविस्तर माहिती द्यावी, म्हणजे इतरांना सावध राहता येईल.

आता आमची धडकन किती दिवस रोखून ठेवणार?लवकर सांगा पुढे काय?

शशिकांत ओक's picture

29 May 2016 - 10:39 am | शशिकांत ओक

कंजूस जी,
आपल्या उत्सुकतापूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बाकीची व्यवधाने सांभाळून लेखन घडत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2016 - 7:04 am | डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकेत हे सहज शक्य आहे. कारण पॉइंट ऑफ सेलला कार्ड स्वाईप केल्यावर (भारताप्रमाणे किंवा इतर अनेक देशांप्रमाणे) मशिनमध्ये पिन टाकावा लागत नाही. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पॅडवर सही करा म्हणतात तर काही ठिकाणी तेही करावे लागत नाही... आणि इलेक्ट्रॉनिक पॅडवरची सही कशीही केली तरी ट्रान्झॅक्शन पास होते ! त्यामुळे ज्याच्या हाती कार्ड तो मालक अशी अवस्था आहे ! तेव्हा आपले कार्ड सांभाळून ठेवणे फार महत्वाचे असते.

मात्र, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर २४ तासांत कार्ड हरवल्याचे बँकेला कळवल्यास बर्‍याचदा पैसे परत मिळतात.

शशिकांत ओक's picture

27 May 2016 - 12:22 pm | शशिकांत ओक

आपण म्हणता ते. पण माझे कार्ड माझ्या खिशात होते. ते हरवलेच नव्हते! फक्त पैसे गायब झाले होते! आता बोला!

आदूबाळ's picture

27 May 2016 - 2:38 pm | आदूबाळ

काय छपरी लोक आहेत! असं का म्हणे?

शशिकांत ओक's picture

28 May 2016 - 1:21 am | शशिकांत ओक

जे निष्पन्न झाले ते ऐकून लठ्ठंभारती छपरी अमेरिकन पोलीसही चक्रावला...!

mahesh d's picture

27 May 2016 - 2:09 pm | mahesh d

horrible experience, loosing the hard earned money this way is really horrible,

वेऴेवर धावाधाव केली अन नातलग मदतीला धावून आले म्हणून बरं...

मुक्त विहारि's picture

29 May 2016 - 10:48 am | मुक्त विहारि

उत्कंठा वाढली आहे.

अनिरुद्ध प's picture

29 May 2016 - 9:49 pm | अनिरुद्ध प

+१११११

अनिरुद्ध प's picture

29 May 2016 - 9:45 pm | अनिरुद्ध प

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

शशिकांत ओक's picture

31 May 2016 - 12:12 pm | शशिकांत ओक

अनिरुद्ध प,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पुढील भाग आपण पाहिलात का? तो कसा वाटला ते वाचायला आवडेल...