Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...

vrushali n's picture
vrushali n in काथ्याकूट
30 Aug 2014 - 7:04 pm
गाभा: 

नमस्कार,
पुन्हा थोडा त्रास देतीये

आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला

thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx

बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत

PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो)
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत

CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत

हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात?

जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount

पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी?

आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते??

आणी आम्ही आणखी काय करु शकतो?

प्रतिक्रिया

मार्क ट्वेन's picture

30 Aug 2014 - 7:49 pm | मार्क ट्वेन

पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो

How to reach Paytm
Level 1:

You can write to us at care@paytm.com.
You can even reach out to us on Facebook, Twitter or Google+. You can put your grievances on these online pages
You can write to us on Paytm.com/help.
You can also call us on 1800-1800-1234 हे काय आहे??

vrushali n's picture

30 Aug 2014 - 9:18 pm | vrushali n

(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो,live chat करता येत नाही

यापुढे एक वेगळे अका० मध्ये दहा हजार अथवा कमी पैसे ठेवून त्यावर एटीएम काढणे. धोका झाल्यास तेवढीच लहान रकम नुकसानीत जाईल. तुमचे आताचे पैसे परत मिळोत.

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2014 - 9:04 pm | श्रीगुरुजी

लगेच पोलिस कम्प्लेंट दाखल करा. तातडीने ग्राहक मंचाचा सल्ला सुद्धा घ्या.

vrushali n's picture

30 Aug 2014 - 9:21 pm | vrushali n

ग्राहक मंच/NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM मधे पण कम्प्लेंट दाखल केलिये आज

दशानन's picture

30 Aug 2014 - 9:43 pm | दशानन

NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM

ऑनलाईन केली का?

हो हे उत्तर असेल, तर सर्वात आधी सर्व पुरावे घेऊन, पोलिस मध्ये तक्रार करा, लिखित बैन्केत तक्रार द्या, पुरावे जपून ठेवा. बैकिन्ग मधील सर्व पासवर्ड बदला, पीन बदला, जास्त गरज नसेल तर तात्पुरते कार्ड ब्लॉक करुन टाका. शक्य असेल तर सर्वाची तारिख्,वेळ व ज्या ज्या व्यक्तिला तक्रारी दिल्या याची नोंद करा.
तुमच्या शहरातील "ग्राहक न्यायलय शोधून" तेथे लिखित तक्रार द्या, जेवढा वेळ जाईल तेवढे जास्त नुकसान तुमचे होईल. काळजी घ्या,

संजय क्षीरसागर's picture

31 Aug 2014 - 12:30 am | संजय क्षीरसागर

मग काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. कार्ड हॅक झालं तरी पीन नंबर शिवाय मर्चंट-मशीनवर स्वाइप होऊ शकत नाही.

सिस्टममधल्या घोटाळ्यानं तुम्हाला डेबिट आलं असेल तर पैसे उशिरा का होईना, शहानिशा होऊन परत मिळतील.

SBI Card Department ला फोन करुन RM Level च्या ऑफिसरचा फोन नंबर घ्या आणि तक्रार करा, लगेच अ‍ॅक्शन होईल.

आणि (नेहमी प्रमाणे इतरांसारखं) पुढे काय झालं ते लिहीण्याचं टाळू नका.

होकाका's picture

31 Aug 2014 - 1:50 pm | होकाका

Directorate of Public Grievances, Government of India, URL: http://dpg.gov.in/
या साइटवर तुमची तक्रार थोडक्यात लिहा/ पाठवा. आठेक दिवसांत काम होईल.

vrushali n's picture

1 Sep 2014 - 10:12 am | vrushali n

हे फ्रॉड कोणत्या सेक्टर मधे कव्हर होइल? तिथे सायबर क्राइम असा पर्याय दिसत नहिये.बॅंकींग इथे टाकाव काय्?पण बँकेने तर फ्रॉड केल नाहिये.प्लीझ जर माहीती असेल तर सांगाल काय??

अर्थातच बँकींग. यामध्ये एक मुद्दा असा आहे की एका नॅशनलाइझ्ड बँकेने तुमच्या वडिलांच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी त्यांचे पैसे का दुसरीकडे वळवले? मग ते paytm असोत वा आणखी कोंणी...

vrushali n's picture

31 Aug 2014 - 5:28 pm | vrushali n

वाल्यांचा असा मेसेज आला आहे
Dear Vasanta,

We are unable to refund the amount as product has been delivered.

Unfortunately, we can not share the beneficiary details to you unless it is asked by your bank or any cyber cell agency.You can also attach the copy of FIR

आता आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत

संजय क्षीरसागर's picture

31 Aug 2014 - 8:04 pm | संजय क्षीरसागर

तेच तर वर सांगितलं होतं :

SBI Card Department ला फोन करुन RM Level च्या ऑफिसरचा फोन नंबर घ्या आणि तक्रार करा, लगेच अ‍ॅक्शन होईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Sep 2014 - 10:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कार्ड ब्लॉक करा. त्या खात्यावरचे उरलेले पैसे दुसर्‍या खात्यावर जमा करा. बँक ओंबुड्समन कडे तक्रार करा. सायबर क्राईम कडे पण तक्रार करा. म्हणजे बेनेफिसिअरी पर्सन चा थोडा फार पाठपुरावा होऊ शकेल. आणि इथुन पुढे ज्या खात्याचं डेबिट कार्ड असेल त्या खात्यावर फक्त गरजेपुरतेचं पैसे ठेवा. बाकी असं होणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तुमचे पैसे परत मिळोत हिचं अपेक्षा.

बाकी ह्यात बँक दोषी आढळली तर स्यु करायला विसरु नका.

कार्डाची कॉपी मारून आणि पिन नं मिळवणारा फार पोहोचलेला आहे. याअगोदर कुठे कार्ड वापरले ते आठवून त्याठिकाणच्या घटनाच काही सुगावा लागू देतील. हॉटेलात बिल पेमेंट करणयासाठी वेटरने कार्ड नेले होते का? वेटरने पिन विचारला होता का? त्या पेमेँट आणि डल्ला मारला त्या पेमेंटची वेळ जवळपास असेल.

असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

vrushali n's picture

1 Sep 2014 - 12:27 pm | vrushali n

बाबा घरच्या पी.सी वरुन डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करतात , बाकी अजुन ईतर ठीकानी नाही

बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल

असे लिहून द्यायला तयर आहेत का बँकेचे अधिकारी? जर डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही, तर पेमेंट गेटवे ला हा पर्याय कशासाठी असतो. तक्रार कराच!!

आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,

------

असे कोण म्हणाले ? का बुवा नाही करता येणार ?

चौकशी कसली मागे लागेल ?

एटीएम स्किमींगचा प्रकार असू शकेल. हे कार्ड एखाद्या स्किमिंग डिव्हाईस लावलेल्या एटीएममधे वापरले गेले असू शकेल.

किंवा पिन नंबर वेटरला वगैरे दिला असेल तर.

पण तेवढी काळजी जनरली लोक घेतात.

जास्त करुन हा टेक्नोलोजी बेस्ड चोरीचा प्रकार वाटतोय. निष्काळजीपणापेक्षा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Sep 2014 - 1:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणं म्हणालं की डेबिट वरुन ऑनलाईन खरेदी करता येत नाही म्हणुन? एकतर तुमच्या घरच्या संगणकामधे चांगला अ‍ॅंटीव्हायरस आणि फायरवॉल नसेल, की-लॉगर्स वरुन सुद्धा माहिती चोरता येते. फिजिकल कीबोर्ड ऐवजी व्हर्चुअल की-बोर्ड वापरत चला, धोका बराच कमी होईल.

आणि बँक सहकार्य करत नसेल तर तक्रार कराच. कदाचित आतली मिली भगत सुद्धा असु शकेल.

चिगो's picture

2 Sep 2014 - 3:07 pm | चिगो

बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल

हा काय प्रकार? च्यामारी, आता बँकवालेपण सरकारी नोकरांसारखे बिनबुडाच्या धमक्या द्यायला लागलेत का काय? जर असं करता येत नसेल, तर पेमेंट गेटवेत तो पर्याय का असतो? सगळेच बँकवाले" आमचं डेबीट कार्ड घ्या. बघा, य्यंव होतं नी त्यंव होतं".. "अमुकतमुक बँक डेबीट कार्ड धारकांना ह्या-त्या सवलती".. आणि ते कार्डच मागंमागं धावत येतं अस्या जाहीराती कश्या करतात मग? चांगलं झापडा ह्या असल्या धमक्या देणार्‍यांना..

बाळ सप्रे's picture

2 Sep 2014 - 3:46 pm | बाळ सप्रे

धमक्या नसतीलही..
जुन्या पिढीतल्या बँकेलत्या काही लोकांना कार्ड्स, इंटरनेट वगैरे अजुन तितकसं नाही समजत.
अज्ञानातुन आलेला सल्ला असण्याची शक्यता जास्त आहे.

vrushali n's picture

1 Sep 2014 - 1:04 pm | vrushali n

त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?

गवि's picture

1 Sep 2014 - 1:15 pm | गवि

काहीही कळले नाही.

आधीच बरीच transaction 'करुन ठेवली' म्हणजे काय?

आधी बरीच ट्रांझॅक्षंस केलेली असण्याचा या fraud शी काय संबंध ?

त्या अधिका-याच्या पत्नीने अमुक लाख 'बुडवले' ??

..आणि त्या अनुभवावरुन सल्ला दिला म्हणून, चौकशी नको व्हायला म्हणून विसरुन ज?

रिटायरमेंटनंतर चौकशीत अडकणे ? जे कार्डधारक खुद्द फसवले गेलेत ते चौकशीत 'अडकतील' कसे ?

मला वाटते इथे पूर्ण माहिती आणि चित्र कळत नाहीये.

पण असो.

मधुरा देशपांडे's picture

1 Sep 2014 - 2:11 pm | मधुरा देशपांडे

कळले नाही.
केवळ चौकशीत अडकायचे नाही म्हणून किंवा अमुक एक व्यक्ती म्हणते म्हणून गेलेले सगळे पैसे बुडले असे म्हणून सोडून द्यायचे? असे काही विसरून कसे जायचे. उलट पाठपुरावा करायला हवा की नेमके काय झाले आहे. आत्ता असे झाले म्हणजे परत कधीतरी होऊ शकतेच. मग तेव्हा परत हेच प्रश्न येतील.
पेट्रोल पंपावर कार्ड दिल्यानंतर थोड्या वेळाने अशा पद्धतीने पैसे चोरीला गेले असे मध्यंतरी वाचले होते. नेमकी कुठल्या वर्तमानपत्रात ही बातमी होती हे आठवत नाही पण एसबीआयच्याच कार्ड बद्दल होते.
पैसे परत मिळावेत म्हणून शुभेच्छा.

>>मला वाटते इथे पूर्ण माहिती आणि चित्र कळत नाहीये.

+१

प्रसाद१९७१'s picture

1 Sep 2014 - 2:19 pm | प्रसाद१९७१

खरेच काही कळले नाही.

१. डेबिट कार्ड वर खुप ट्रँझक्शन करणे गुन्हा आहे का?
२. डेबित कार्ड ऑनलाईन नक्कीच चालते.

असे तर नाही ना की तुमचे बाबा बरिच ऑनलाईन Transactions करतात म्हणुन हे चुकीचे Transaction पण तुमच्या बाबांनीच केले आहे असा अर्थ काढला जाईल.

बाबा हा विषय पैसे गेलेत असे समजुन टाळत आहेत( बोलुन परत बाबांना बीपी/शुगर चा त्रास होइल म्हणुन टाळत आहोत)

मला हे सगळ माझ्या बहिनीने सांगितलय आज सकाळी ११ वाजता
ती त्या बँक अधीकारी सोबत बोललीये,त्यांच्या स्वताच्या बायकोने असेच transaction केलेत आणी एकुन १.७५ लाख बुडवले ,जे कधीच परत मिळाले नाहीत्,आता त्यांनीच अस सांगीतल्यवर आम्हला फरस काही करता येण्यासारख
नाहिये(त्यांनी कळकळीनी सांगीतल)

बाबांची आता या प्रकरणात पुढे करायची इछा नाहिये...

आता मी पण शांत रहायच ठरवल आहे

पुढे काळजी घेउत

धन्यवाद सगळ्यन्ना

गवि's picture

1 Sep 2014 - 3:24 pm | गवि

:-(

ऋषिकेश's picture

1 Sep 2014 - 3:43 pm | ऋषिकेश

निर्णय दुर्दैवी आहे. असो. ज्याचे प्रश्न त्यालाच माहित

आयुर्हित's picture

1 Sep 2014 - 4:00 pm | आयुर्हित

त्याने त्याच्या बँकेच्या ग्राहक हिताचे संरक्षण कर ण्यास पुढाकार घेतला पाहिजे. पण तो स्वतःची कातडी वाचवतो आहे.त्याने नक्किच काहितरी घोटाळे करुन ठेवले असणार आणि आता तो ते लपवत आहे. आपल्याला भावनिकरित्या गंडवत आहे.

काही झाले तरि आपण तक्रार कराच. जमल्यास आरबीआय गव्हर्नरलाही तक्रार पाठवा व त्यांनाही कळू द्या.

प्रसाद१९७१'s picture

1 Sep 2014 - 4:05 pm | प्रसाद१९७१

:-(

इनिगोय's picture

1 Sep 2014 - 3:35 pm | इनिगोय

म्हणजे वर बर्याच जणांनी वेगवेगळे मार्ग सुचवलेत त्यांचा वेळ वायाच गेला म्हणायचा!

संजय क्षीरसागर's picture

1 Sep 2014 - 4:01 pm | संजय क्षीरसागर

कार्ड होल्डरच्या गहाळपणा शिवाय फ्रॉड होऊ शकत नाही असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

गवि's picture

1 Sep 2014 - 4:05 pm | गवि

-1

त्यांना अडचणीच्या , मनस्तापाच्या वेळी आपल्याशी शेअर करावंसं वाटलं हेच किती चांगलं आहे.

आपण इथे फावला वेळ असतो म्हणूनच येतो.

मनातलं काही मोकळेपणी लिहिताना कोणी इतका विचार करु नये.. अगदी आधी सल्ला मदत मागितली आणि नंतर मन बदलले तरी सर्वांचा वेळ वाया गेला असा formal विचार इथे नकोच.. असे माझे मत.

तर हा प्रश्न आला नसता. एकेक गहन पैलू नंतर उघड करुन, `आम्ही पुढे तक्रार करणार नाही' असं म्हटल्यावर, सल्ला देणार्‍यांचा पोपट होतो. त्यामुळे ज्यांनी मनःपूर्वक मदत केली त्यांना `कशाला घेतला त्रास' वाटणं स्वाभाविक आहे.

सल्ला देण्याच्या त्रासा पेक्षा, खरे काय घडले हे न सांगता नुस्तेच "आता तक्रार करणार नाही " असे विधान करुन चर्चा आटोपती घेणे त्रासदायक आहे.
हे तर सस्पेंस सिनेमा सारखे झाले. खुनी कोण कळायच्या आधीच लाइट गेले.

नक्की काय घडले हे सांगण्याची जबाबदारी पण लेखिकेची आहेच.

vrushali n's picture

1 Sep 2014 - 4:46 pm | vrushali n

मी नगर ला शिकते,सगळ्या बहीनी दुसरी कडे,आई वडील दुसर्या गावाला आहेत

वडीलांनी मी फोन केला तेव्हा जुजबी माहीती दिली,वरुन तुम्ही टेन्शन घेउ नका असेही सांगत होते

मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते

आता सकाळी बहिनीने जितक सांगीतल तितक मि शेअर केलय

ह्या उपर बोलायची वडीलांची इछ्छा नाहीये,तर मी आणखी काय करु शकते

इनिगोय's picture

1 Sep 2014 - 4:39 pm | इनिगोय

+१
आम्हाला हे प्रकरण लावून धरायचं नाही, पण हे हे असं झालं, तुम्ही काळजी घ्या.. असं सांगितलं तर वाचणा-यांना मदतच होईल की. इथे वेगवेगळी विधानं केल्यामुळे 'डेबिट कार्ड आॅनलाईन वापरता येत नाही', 'बरेच व्यवहार केल्यानंतर फसवले गेल्यास तक्रार करणे त्रासाचे ठरू शकते', असे गैरसमज व्हायला वाव आहे.
खाली पैसाताईने दिलंय त्याप्रमाणे इतक्या मोठ्या रकमांना फसवले जाऊनही गप्प का बसावंसं वाटलं असेल हाही प्रश्न आहेच.

मधुरा देशपांडे's picture

1 Sep 2014 - 5:26 pm | मधुरा देशपांडे

सहमत.

पैसा's picture

1 Sep 2014 - 4:19 pm | पैसा

आपल्याकडे अशा गुन्ह्यांशी मुकाबला करायला काहीही यंत्रणा नाही. पोलीस इतक्या जुनाट पद्धती वापरतात की ऑनलाईन कंप्लेंट दिली तरी पोलीस चौकीत जाऊन लेखी कंप्लेंट द्यावी लागते.

मुळात एकदा माझे क्रेडिट कार्ड पर्सबरोबर हरवले तेव्हा क्रेडिट कार्ड कसे वापरायचे यावर मी पोलीस स्टेशनातल्या साहेब लोकांची शिकवणी घेतली होती.

त्यामुळेच लोक नाद सोडून देतात. मात्र ४२००० आणि ४५००० या खूपच मोठ्या रकमा आहेत. आणि बँक अधिकार्‍याचे १.७५ लाख जाऊन तो गप्प बसत असेल तर मला (या केसमध्येही) त्याचाच पहिला संशय येईल.

आणि बँक अधिकार्‍याचे १.७५ लाख जाऊन तो गप्प बसत असेल तर मला (या केसमध्येही) त्याचाच पहिला संशय येईल.

+१००

बरखा's picture

6 Dec 2016 - 1:04 pm | बरखा

अगदी हेच म्हणायचय.

माझ्या मते लेखिकेच्या वडलांनी काहीतरी मोठी खरेदी केली असणार, ती सांगितली नसेल कींवा लपवायची असेल
> ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे

मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले

मला माफ करा,
इथे लिहुन माझी मोठी चुक झाली
ह्या उप्पर मला घरचे धुणे चौकात धुवायचे नाही
धन्यवाद

प्रसाद१९७१'s picture

1 Sep 2014 - 5:15 pm | प्रसाद१९७१

अहो नक्की काय झाले ते तरी सांगा. उत्कंठा वाढवुन असा पळ काढु नका.

प्रतिसाद देताना मूळ लेखकाला एखादी बाब शेअर केल्याचा पश्चात्ताप व्हावा ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांना आणखी प्रश्न विचारणं, क्लॅरिटी मिळवणं हे वेगळं आणि वेगवेगळी कनक्लुजन काढून बळीलाच जबाबदार ठरवणे वेगळे.

खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच.

हे मी माझं मत केवळ सर्वांसमोर म्हणून पाहतोय. बाकी आपण स्वत:चे बेस्ट जज्ज.

गणपा's picture

1 Sep 2014 - 5:51 pm | गणपा

खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच.

शतशः सहमत.

-(तोंड पोळुन घेतलेला) गणा

एस's picture

1 Sep 2014 - 6:04 pm | एस

हजारदा सहमत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कधीकधी बोटांतून कीबोर्डावर काहीही घरंगळतं इथे. असोत.

लेखिकेच्या दु:खात सहभागी आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या यंत्रणांची बेफिकिरी पाहून आश्चर्ययुक्त संताप वाटला. आपणांस इथे बरेच सल्ले मिळाले आहेतच, पण पोलिसांच्या सायबर सेलकडे तुम्ही तक्रार केलीय का? हा विभाग बराच कार्यक्षम आहे असे मी तरी ऐकलंय.

प्रसाद१९७१'s picture

1 Sep 2014 - 7:49 pm | प्रसाद१९७१

@ गवि - एक तर मला काही वाईट बोलायचे नव्हते. एकुणच सर्व गोष्टी गोंधळात टाकणार्‍या होत्या. त्यांच्या बाबांनी नेट वर अमाउंट टाकताना २ शुन्य जास्त टाकली असे नाही का होऊ शकत?

तुम्ही गोष्टी कशा घडल्या त्याचा क्रम लक्षात घेत नाहीयेत.

१.आधी समस्या मांडण्यात आली. त्यात सर्वांनी चांगले सल्ले दिले. माझ्या कडे अधिक काही लिहीण्यासारखे नसल्यामुळे तेंव्हा मी काही लिहीले नव्हते.

२. मग त्या बँक अधिकार्‍याची कथा मधेच आली. त्याच्या बायकोने १.७५ लाख अश्याच Transactions मधे गमवले असे लिहीले होते. ह्या वर लोकांनी शंका व्यक्त केल्या.
३. मग डेबीट कार्ड वापरुन नेट वर खरेदी केली तर चौकशी मागे लागेल असे कोणी तरी सांगीतले अशी कथा आली.
४. ४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का?

हे जे काही सांगितले गेले आहे ते तुम्हाला तरी पूर्ण वाटते का? एका गोष्टीचा दुसर्‍याशी सबंध तरी आहे असे दिसतो आहे का?

एकदा लेखिकेने विषय चालू केल्यावर आणि आधी तरी इतक्या लोकांनी चांगले सल्ले दिल्यावर, अचानक आता काही नाही, मी हा विषय बंद केलाय हे म्हणणे पटते का?

vrushali n's picture

1 Sep 2014 - 11:51 pm | vrushali n

आधीच आम्ही जवळ्पास ८८००० हजार रुपयांनी नुकसनीत असताना
१अशी कथा आली
२ उत्कंठा वाढवुन पळु नका
अशी भाषा वपरने शोभते काय?मी तुमची उत्कंठा वाढवायला इथे पोवाडा सांगते/गाते आहे काय?
इतकी संवेदनहीनतेची नीच पातळी लोक गठु शकतात?
मजजवळ transaction ची कॉपी आहे,पण ती इथे कशी डकवावी हे कळत नाहिये
४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का>>>>जर कोणी प्राध्यापक+lay out buisness+पत्नी माध्यमिक शाळेत शिक्षक असेल आणी त्यांना उगाच हाती काही न लागता वरुन नसत्या पोलीस चौकशीच्या भानगडीत पडायचे नसेल तर?
जो माणुस आपल्या मुलींना ओपन मधुन खासगी महविद्यलयात MD/BDS पुर्ण फीज भरुन शीकवीत असेल तर त्या व्यक्तीला रकमेवर दोन शुन्य जास्त पड्लेत की कमी हे समजत नसेल काय?

माफ करा म्हट्ल तर "उत्कंठा" वाढवुन पळु नका म्हनायचे आणी जे घडल ते सांगीतल कि खुसपट काढायची "ह्या अमकी रक्कम कशी सोडु शकतात्?ढमक्या रकमेची खरेदी केली असेल आणी लपवयची असेल्,कथा सांगत आहेत!!!
मजजवळ transaction चे डीटेल्स आहेत्,ते इथे कसे चढवावेत(m s office picture manager मधे आहेत)

vikramaditya's picture

1 Sep 2014 - 8:32 pm | vikramaditya

आपण फार चांगला मुद्दा मांडलात. तुमच्या प्रतिसादातील प्रत्येक वाक्य आणि शब्द अचूक आहे.

"धागा काढलात तर आता प्रतिक्रिया तर येणार", हा व्यक्तिस्वातंत्र्याचा काढलेला फार मोठा चुकिचा निष्कर्ष आहे.

"म्हणजे आता पोलिस स्टेशन किंवा कोर्टात गेल्यावर मदत मिळो ना मिळो , मानहानी तर होणारच" ह्या गोष्टीचा पुरस्कार केल्यासारखे झाले.

मिपा सारख्या प्रसिद्ध मंचावर (मराठी बांधवांच्या) सहज मनातील विचार मांडावे, अथवा एखादी माहिती विचारावी म्हणून एखादा धागा काढावा आणि नंतर "मदत नको पण प्रतिक्रिया आवर" अशी धागाकर्त्याची अवस्था व्हावी हे केवळ दुर्दैव.

There are some souls (though in minority) here who actually relish the fact that they have ensured through their remarks that the person who started the thread is embarrassed, insulted and vows never to write again on this forum. This , they consider as their victory and declare so on this very forum. They are always on the lookout for such 'victories'

सं.म. : व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या ह्या प्रकारावर आपली काय प्रतिक्रिया आहे?

इनिगोय's picture

1 Sep 2014 - 5:50 pm | इनिगोय

प्रसाद१९७१ यांच्या मूळ प्रतिसादात असा काही निगेटिव्ह टोन असल्याचे जाणवले नाही. लेखिकेने अपूर्ण माहिती दिलीय, ती पूर्ण द्यावी एवढेच तर म्हणणे होते. आणि मुळात इथे 'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.

'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.

याचा अर्थ एखाद्याच्या तिर्थरुपांवर वैयक्तिक हल्ले करावेत का? ते ही काही ओळख-पाळख नसताना.

इनिगोय's picture

1 Sep 2014 - 6:00 pm | इनिगोय

अर्थातच नाही.
मोठी खरेदी करून ती सरप्राईज ठेवायची असेल असा अर्थ काढण्याजोगं वाक्य होतं ते. अर्थात नेमकं काय म्हणायचं होतं ते तेच सांगू शकतील.

vrushali n's picture

1 Sep 2014 - 6:08 pm | vrushali n

पाठीशी उभे रहिल्याबद्दल आभार

गन्पाशी सहमत, इनिगोय कडून अशा प्रतिसादांची अपेक्षा नव्हती, असो

स्पाजोबा, गाडी चुकलीय, गणपाने ज्या प्रतिसादाला उद्देशून ते लिहिलंय, तो उडवला गेलाय, आणि तो माझा नव्हता.
बेटर लक नेक्ष्ट टाइम.

तुमचे सगळे प्रतिसाद वाचतोय इनिआजी , ण उडलेले म्हणतोय

प्रसाद१९७१'s picture

1 Sep 2014 - 7:52 pm | प्रसाद१९७१

अजुन एक गंमत बघा. धागा काढताना लिहीले ४३,३५० चे डेबिट पडले नंतर लिहीले ८८०००

मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते

:-)

vrushali n's picture

1 Sep 2014 - 9:42 pm | vrushali n

३००० हजार bsnl 3g recharge चे कापल्या गेलेत्,अजुन recharge पण झाला नाही आणी रक्कम पण मिळाली नाही,ति किरकोळ अस्ल्याने मी लिहिली नाही

आधी रक्कम कापल्या गेल्याचा मेसेज आल्याबरोबर बँकेत जाउन card block केले आणी बँक अधीकारी लोकांशी बोललेत
paytm वाल्यांशी आधी इमेल आणी नंतर त्यांनी नं दिल्यावर ते लोक बोललेत कि त्या पैशांचे product deliver
झाले आहे आणी FIR/Bank statment दिल्याशिवाय ते लोक आम्हाला काही माहीती देणार नाही
त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात
चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,मग इतका मनस्ताप करुन घेण्यापेक्शा आणी इतर ठीकाणी सांगितलेल्य करणांमुळे बाबा शांत बसुन आहेत्,आम्ही पोलीसांकडे तक्रार करा म्हटल ,पण त्यांची इछ्छा नाहिये
ते त्यांनीच कमवलेले अस्ल्याने त्यांना हव तस करण्यचा पुर्ण अधीकार आहे

आणी तुम्ही कोण सांगणारे लोकांनी किती पैसे बुडल्यावर शांत बसावे आणी किती किती पैसे बुडल्यावर हातपाय मारावेत(कदाचीत त्यांना जे पैसे मिळ्णारच नाहीत्,त्यांच्या मगे लागुन मनस्ताप करुन घेण्यपेक्शा तितकेच पैसे कसे कमवता येतील हा विचार करणे योग्य वाटत असेल)
to each his own right?

फक्त एक गोष्ट क्लिअर कराल का?

त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,

म्हणजे त्या अधिकार्‍याच्या पत्नीचे पैसे असेच कार्ड हॅक होऊन गेलेत (त्याला बुडवले म्हटल्यामुळे आमचा गैरसमज झाला)

आता एक साधी शंका आहे, जर कार्डहोल्डरनं कार्ड वापरलंच नव्हतं तर चवकशीचा ससेमिरा कसा लागेल?

कुणी किती पैसे सोडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, एकदम मान्य! पण कार्ड वापरलं नाही आणि शंभर रुपये जरी डेबिट झाले तरी आम्ही बँकेच्या नाकी नऊ आणतो म्हणून इंटरेस्ट आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तुमच्या स्पष्टीकरणानं आमचं कार्ड प्रोटेक्ट होईल.

vrushali n's picture

2 Sep 2014 - 2:07 pm | vrushali n

debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxx
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत

गंमतच आहे बाइ लोक पुर्ण वाचायचे कष्टही घेत नाहीत

सुहास पाटील's picture

1 Sep 2014 - 5:06 pm | सुहास पाटील

काहितरि गडबड आहे

vrushali n's picture

1 Sep 2014 - 5:51 pm | vrushali n

गडबड असेल तर ती paytm वाल्यांची आहे हे नक्की

बाकी माझे वडील कधीही पोलिस स्टेशन ची पायरी न चढल्याने कींवा त्यांचा पोलीसांवर विश्वास नसल्याने मी समजु शकते,बाकी वडीलांच् पण बिसनेस करतांना कधीकधी नुकसान झाले असल्याने त्यांनी हे प्रकरण फारसे लावुन धरले नाही,आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू

बाकी काही माहीत नसतांना derogatory नाही लिहील तरी चालेल

शिद's picture

1 Sep 2014 - 5:54 pm | शिद

derogatory = मानहानिकारक/अपमानजनक

कवितानागेश's picture

1 Sep 2014 - 6:03 pm | कवितानागेश

बॅम्क सुरुवातीला नेहमीच हात वर करत असते. पण हॅकिन्ग झालेले असेल तर ती बॅन्केचीसुद्धा जब्बबदारी आहे. बॅन्केच्या अजून वरच्या ऑफिसरला भेटा आणि बॅन्केविरुद्धच तक्रार करा ग्राहक मंचाकडे. मग ते मदत करतील.
मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2014 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले

मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.

हजार रुपयेही खूप झाले माऊली ... मी तर एकदा डी मार्ट मधे विकत घेतलेले प्रॉडक्ट हे एक्पायर्ड आहे लक्षात आल्यावर तत्क्षणी परत केले त्याची किम्मत काहीतरी १२३.६० पैसे होत म्हणुन मला तिथल्या सेल्समॅनेजर ने १२३.०० रुपये परत दिले. तेव्हा मी ६० पैशासाठी भांडलो होतो... आपला हक्काची कमाई, कष्टाची कमाई,हलाल कमाई आहे ... मग एक हलाला तरी का सोडा ? *biggrin*

बाकी सदर प्रकरणात आपला एकच सल्ला आहे : तुम्हाला जर तुमच्या बाजुने काहीच चुक नाही ह्याची खात्री असेल तर हे प्रकरण लावुन धरा पोलीसात जा , आर बी आय कडे जा ग्राहक मंचा कडे जा, मीडीयात बोंब ठोका... शेवटी न्याय मिळेलच ... कारण सत्यमेव जयते ! ( अनुभवाचे बोल आहेत हे , मागे एकदा मला १३ हजाराला गंडा बसला होता , जेव्हा पोलीसात जाऊन बोंब ठोकली तेव्हा पै न पै परत मिळाली )

)हां , अर्थात तुम्ही जर गच्छम काळ्या पैशाच्या ईस्टेटीची मालकी बाळगुन असाल तर जाऊन द्या , विषय सोडुन द्या न्याय झाला असे समजुन विसरुन जावा .... कारण कर्मणो गहना गति !! *biggrin*

मंदार कात्रे's picture

15 Sep 2014 - 7:07 pm | मंदार कात्रे

तुम्ही चूक करताय व्रुशालीजी ... तुम्हि भगिनी उच्चपदस्थ अथवा सधन असल्याने ८८,०००/- रुपये भरुन देउ वगैरे मुद्दे विसन्गत आहेत. मूळ प्रश्न पैसे कसे व का गेले ? हा आहे. पोलिस/ सायबर क्राइम अथवा पेटीएम वाले /बॅन्क यांच्या भोंगळ कारभार अथवा त्रुटी याबद्दल नक्कीच चर्चा करणे अथवा दाद मागणे आवश्यक आहे.

कंजूस's picture

1 Sep 2014 - 5:57 pm | कंजूस

शिकलो बरेच.

vrushali n's picture

1 Sep 2014 - 5:59 pm | vrushali n

मानहानिकारक बरोबर आहे

काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले

सुहास पाटील's picture

1 Sep 2014 - 6:30 pm | सुहास पाटील

> काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले

हे वाक्य मी तुमच्या साठी किवा तुमच्या घरच्यान साठी नाही लिहिले ते त्या बँक वाल्या करता होते जो सांगतो कि डेबिट कार्ड ने online purchas केल्यास प्रोब्लेम होतो निव्वळ लबाड पणा आहे हा त्या बँक वाल्याचा

संजय क्षीरसागर's picture

1 Sep 2014 - 9:41 pm | संजय क्षीरसागर

पहिल्यांदा हे ठरवा, लेखिकेला सहानुभूती हवीये का सल्ला? सल्ला हवा असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर द्यायला हव्यात. सहानुभूती हवी असेल तर सल्ल्याचा प्रश्नच येत नाही.

अर्थात, सल्ला घेतला असेल तर शेवटी काय झालं हे इथे कळवणं ही किमान जवाबदारी आहे कारण त्याचा सर्वांना उपयोग होईल. आणि सहानुभूती हवी असेल तर स्वतःची चूक नसतांना फटका बसला इतपत बाजू स्पष्ट असायला हवी.

लेखिकेनं फायनली घेतलेला स्टँड असाय :

ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले

सगळे धाग्यात इंटरेस्टेड आहेत कारण धाग्याचं शीर्षकंच भन्नाट आहे (Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत). आणि अशी वेळ कुणावरही येऊ शकते म्हणून सगळे इथे जमलेत. It is that simple!

आता तो उलगडा करायला, झालेल्या नुकसानाची शहानिशा करायला कार्डहोल्डरच तयार नाही. इथपर्यंत काही हरकत नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. पण ...

त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?

यामुळे धागा गोंधळात गेलायं. इथे व्यक्तीस्वातंत्र्य, धागा काढून पश्चात्ताप वगैरे मुद्दे गैर लागू आहेत.

अगदी साधी गोष्ट आहे, कार्डहोल्डरनं ट्रन्झॅक्शस केली होती का नाही? विषय संपला!

आदूबाळ's picture

1 Sep 2014 - 9:48 pm | आदूबाळ

सहमत आहे. आधी किती का वैध ट्रान्झॅक्शन करेना, त्याचा कार्डच्या अवैध वापराशी काय संबंध? "कर नाही त्याला डर कशाला" या तत्त्वाप्रमाणे चौकशी झाली तर प्रॉब्लेम काय आहे? प्रस्तुत बँक मॅनेजरचा सल्ला - अ‍ॅट बेस्ट - चुकीचा आहे हे वर अनेकांनी लिहिलंच आहे.

इनिगोय's picture

2 Sep 2014 - 10:21 am | इनिगोय

शत प्रतिशत सहमत. मदत करण्याच्या हेतूने आलेल्या प्रतिसादांचा अशा त-हेने वेगळा अर्थ काढून काय साध्य झाले? सुहास पाटील यांच्या प्रतिक्रियेबाबतही तसंच.

जर झालेल्या ट्रान्झॅक्शन्सचे लिखित पुरावे हातात असतील तर नेटाने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवता येतेच. मिळवलेली आहे. नियमित ट्रान्झॅक्शन्स करणा-या व्यक्तीला तर अधिकच जाणीवपूर्वक पाठपुरावा करणे शक्य आहे.

ज्या बँकांचे उल्लेख इथे केलेत, त्या नावाजलेल्या, प्रतिष्ठा जपणा-या नक्कीच आहेत, अशावेळी 'त्यांच्या फेसबुक पेजवर झालेला प्रकार पोस्ट करणे' एवढा साधा उपायसुद्धा लागू पडू शकतो.

संक्षींनी म्हटल्याप्रमाणे सल्ला हवाय, तर तो लागू पडला का, हे सांगणे हे ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांच्यासाठी आवश्यक नाही का? मुदलात लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने, हे तरी मान्य करायला हरकत नसावी..

संजय क्षीरसागर's picture

2 Sep 2014 - 12:17 pm | संजय क्षीरसागर

लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने

जर लेखिका म्हणतेयं त्याप्रमाणे कार्डहोल्डर ट्रॅन्झॅक्शन्स घरच्या डेस्कटॉपवरनं करत असेल आणि हा फटका कार्ड हॅकिंगमुळे (म्हणजे कार्ड त्यांच्या ताब्यात असतांना) बसला असेल तर मी हे काम प्रोफेशनल असाईन्मंट म्हणून घ्यायला तयार आहे! सगळ्या फॅक्टस वर्णन केल्याप्रमाणे असतील तर पैसे नक्की परत मिळतील.

मनिष's picture

2 Sep 2014 - 12:49 pm | मनिष

अगदी. अगदी. पैसे परत मिळालेच पाहिजे!

गवि's picture

2 Sep 2014 - 12:59 pm | गवि

ये ब्बात..

खणखणीत थेट मदतीचा हात.

आवडले.

vrushali n's picture

2 Sep 2014 - 2:08 pm | vrushali n

आपला इमेल मिळु शकेल काय?

vrushali n's picture

2 Sep 2014 - 2:30 pm | vrushali n

याहू वर इमेल केला आहे

तुम्ही काही करु शकलात तर बघा,बाकी व्य.नी तुन बोलुया

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2014 - 5:38 pm | प्रसाद गोडबोले

संक्षी , आपला प्रतिसाद वाचुन उत्सुकता निर्माण झाली ... आपला फायनान्शीयल क्राईम डीटेक्शन मधे काही अनुभव आहे काय ?

मागे , ह्या धीच्या जॉब मधे , मी जॉब / लॉटरी वगैरेंशी संबंधीत फ्रॉड डिटेक्ट/ प्रेडीक्ट करायची मॉडेल बनवत होतो :)

आणि फ्रॉड डिटेक्शनचा अनुभव आर्टिकलशिपपासून आहे.

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2014 - 5:48 pm | प्रसाद गोडबोले

एकदा ह्या विषयावर सविस्तर चर्चा करायला पाहिजे ...

मृत्युन्जय's picture

2 Sep 2014 - 5:45 pm | मृत्युन्जय

ज्जे बात. इस को बोलता हय कान्फिडन्स.

संजय क्षीरसागर's picture

2 Sep 2014 - 6:00 pm | संजय क्षीरसागर

माझ्याकडे पेपर्स आल्यापासनं चार तासाच्या आत ही प्रगती आहे :

पण बाबा relax आहेत, कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना

vrushali n's picture

2 Sep 2014 - 7:58 pm | vrushali n

जरी सायबार क्राइम वाले असे म्हणत आहेत की हॅकींग झाले नाही,तरीही तुम्ही एक बाब बघितली का?बाबांनी जेव्हा जेव्हा रिचार्ज केलेत्,त्याच्या दुसर्याच दिवशी मोठया रकमा काढल्या गेल्यात हा प्रत्येक वेळेस योगयोग असु शकतो की paytm चा कोणी व्यक्ती असु शकतो,अस बाबांनी मला आत्ता फोन वर सांगीतल आहे

(रच्याकने मी मला जितकी तुट्पुंजी माहीती मिळतेय्,मी लगेच इथे क्रिकेट मॅच च्या प्रत्येक ओव्हर सारखी लगेच अपडेट करतेय...मला वाट्तेय मी पुर्ण माहीती निघाल्याशिवाय इथे जास्त काही बोलु नये हे उत्तम)

सुहास पाटील's picture

2 Sep 2014 - 1:46 pm | सुहास पाटील

सहमत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Sep 2014 - 9:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सदर लेखिकेने रीअल टाईम ट्रान्साक्शन रेकॉर्ड्स बँकेकडे मागावेत. म्हणजे पैसे कोणी काढले, कशासाठी काढले ह्या गोष्टींचा उलगडा होईल.

दशानन's picture

2 Sep 2014 - 12:10 am | दशानन

असो!
आमचे काही शब्द वाया गेले, हरकत नाही.
इतर कोणालातरी कामी येतीलच.

पण, हा प्रकार पुन्हा घडू नये ही आशा.

आयुर्हित's picture

2 Sep 2014 - 1:42 am | आयुर्हित

To make online shopping safer, the RBI has made it mandatory, from 1st August onwards, for all online transactions to have an extra level of authentication. The ‘extra’ level, is a password that you will have to enter after entering your credit/debit card details while making online payments. You will require this ‘extra password’ for transacting on any website in India. This new technology is called VBV – Verified by Visa or MSC – MasterCard SecureCode.

All you have to do is log on to your bank’s website, register your card for Verified by Visa (or MasterCard SecureCode) and get your password. Each bank has its own process for card registration. So, hop on to your bank’s website and register now:

आयुर्हित's picture

2 Sep 2014 - 1:45 am | आयुर्हित

Internet Banking Guidelines In India By RBI

Source: Corporate Laws In India.

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2014 - 10:38 am | पिलीयन रायडर

सगळा धागा आणि प्रतिक्रिया वाचल्या.
खरं तर एकंदरीतच कधी कुणी कुणाची उगाच मापं काढु नयेत हा संकेत आहे.. वास्तव जगात..आभासी जगात..कुठेही..
त्यात आपल्याला सगळंच माहिती नसतं हे एक कारण आहे.. आणि माहिती असलं तरी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. त्यामुळे कुणी लेखिकेला / त्यांच्या वडिलांना अर्धवट माहितीवर काही बोलणे चुकच आहे..

पण लेखिकेला एकच मुद्दा सांगावा वाटतो की ही जी काही अर्धवट माहिती लोकांकडे आहे, ती तुम्हीच दिली आहेत.. आधी सल्ला मागितलात तेव्हा तो सगळ्यांनी मनापासुन दिला.. पण मग जेव्हा तुम्ही एक एक माहिती द्यायला सुरवात केलीत त्यामुळे इथे गोंधळाचे वातावरण तयार झाले असे दिसते. लोकांनी गोंधळ उडाल्यास सुद्धा भाषा जपुन वापरावी ही तुमची अपेक्षा गैर नाही, पण अपेक्षा दुहेरी असतात.. तुम्ही सुद्धा गोंधळात पडणारी माहिती द्यायला नको होती ही लोकांची अपेक्षा गैर नाही. (मलाही बँक मॅनेजरच्या बायकोने पैसे "बुडवले" हे समजलेलं नाही. बाकि प्रतिसादात तुमचे मराठी उत्तम आहे असे दिसते.. मग तुम्हाला नक्की "बुडवले" असंच म्हणायचं आहे का? कारण तुमच्या वडीलांच्या ह्या परिस्थितीची तुलना तुम्ही सतत त्या बाईंच्या परिस्थिती सोबत करत आहात.. आणि तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे..)

दुसरं असं की आधी तुम्हाला ८८०००/- ही रक्कम जास्त वाटली आणि स्वतःला वडिल आणि बहीणी कडुन जुजबी माहिती असतानाच वडिलांना काहीतरी मदत व्हावी ह्या हेतुने तुम्ही इथे धागा काढलात. आणि आता तुम्ही "मनस्ताप होण्यापेक्षा जाऊ देत ८८०००/-" असा पवित्रा घेतला आहेत. मुळात ८८०००/- जाऊ देत असे म्हणु शकणारी मंडळी इथे कमीच असतील.. आम्हाला १००/- जरी विनाकारण गेले तरी बँकेत जाउन पाठपुरावा करण्याची सवय आहे.. शिवाय ह्या प्रकरणात तुमच्या वडीलांची काहीच चुक नाही, तुम्हीच म्हणताय त्या प्रमाणे एवढा शिकला सवरलेला माणुस दोन शुन्य जास्त टाकली वगैरे चुका करणार नाही.. तर त्यांना हे ही कळत असेलच की बँकेच अधिकारी जे सांगत आहेत (की चौकशी तुमच्याच मागे लागेल..) ते तद्दन खोटे आहे.. तरीही ते हा सल्ला मान्य करत आहेत हे गोंधळात पाडणारे नाही का? चौकशी मागे केव्हा लागते? जेव्हा तुम्हीच काही तरी गुन्हा केलाय असं पोलीसांना वाटतं.. पण असं मुळात होईलच कशाला? जो माणुस असे काही गफले करेल आणि ट्रान्झॅक्शन लपवु पाहिल, तो पोलीस स्टेशनात जाउन तक्रारी कशाला करत बसेल? शिवाय तुम्ही म्हणताय तसं तुमच्या कडे पुरावे आहेतच.. अशा वेळेस तुमच्या "जाउ देत" ह्या स्टॅण्ड ने लोक हैराण झाले तर नवल काय? { तुम्हाला "चौकशी मागे लागेल" म्हणजे "आपल्यालाच खेटे मारावे लागतील" असे मह्णायचे आहे का? कारण चौकशी मागे लागणेचा अर्थ वेगळा होतो }

मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच (आमची गाडी चोरीला गेली तेव्हा आम्ही पहिल्यांना तक्रार नोंदवुन ठेवली.. कारण गाडी कुठे चोर्‍या करायला वापरल्या गेली तर ती तेव्हा आमच्याकडे नव्हती ह्याचा पुरावा..) अशावेळी मागे हटणे मी समजु शकत नाही..

अर्थातच तुमच्या वडीलांचे पैसे आहेत.. त्यांनी काय करावं हा त्यांचाच प्रश्न आहे... तुम्ही केवळ वडीलांना मदत व्हावी ह्या हेतुने धागा काढलात.. मिपाकरांना तेवढे जवळचे समजलात हे ही चांगलेच आहे.. तुम्हाला नंतर अजुन वेगवेगळी माहिती मिळत गेली आणि सरते शेवटी तुम्ही गप्प बसण्याचा निर्णय घेतलात. त्याचाही आदर आहेच.

मिपा आपलंच आहे... धन्यवाद...

आधीचे व्यवहार, पोलिसांचा ससेमिरा वगैरे लागत नाही. FIR फक्त फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यापुरता असतो. FIR चा अर्थ इतकाच की तक्रार जेन्युईन आहे. पुढची सगळी कामं पोलीस, बँक आणि पेमंट ऑपरेटरच्या मागे लागून करुन घ्यायला बांधिल असतात.

फक्त तीन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात :
१) कार्ड, कार्डहोल्डरच्या ताब्यात होतं
२) कार्डहोल्डरला फोन-पीन आला नाही, आणि
३) रक्कम खात्याला डेबीट झालीये.

बास! मग सगळी जवाबदारी बँक आणि पेमंट गेट वे ऑपरेटरची आहे.

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2014 - 12:55 pm | पिलीयन रायडर

हो मग तेच तर म्हणतेय मी.. ह्यात आपल्याच मागे चौकशी लागली असं कसं होईल?

प्रसाद१९७१'s picture

2 Sep 2014 - 12:34 pm | प्रसाद१९७१

@ पि.रा. - मी जे म्हणालो तेच तुम्ही गोड गोड शब्दात लिहीलेत की !!! :-)

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 12:52 pm | प्यारे१

प्रसादराव,
तुमचा आमचा नि सरांचा प्रॉब्लेम हाच आहे. (एका लायनीत बसवत नाही, शक्यच नाहीये ते ;) )
सांगतो ते 'कसं' सांगतो हे फार फार महत्त्वाचं असतंय.
आपल्या (मी माझं सांगतो) लक्षात येत नाही बर्‍याचदा.

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2014 - 1:00 pm | पिलीयन रायडर

शब्दच तर महत्वाचे असतात ना भाऊ..!! आत्ता त्या टेन्शन मध्ये असणार.. त्यामुळे त्यांच्यावर लोक का शंका घेत आहेत हे लक्षात न घेता त्यांना राग येत असेल.. म्हणुन गोड गोड..! (अर्थात कुणी त्यांच्या वडीलांवर घसरलं तर त्यांना राग येणारच..)

पण ह्या रागा लोभापेक्षा सुद्धा त्यांच्या वडिलांचे पैसे मिळणं आणि असं नेमकी कसं झालं ह्याच उत्तर शोधुन खबरदारी घेणं हे जास्त महत्वाचं आहे..

खरं तर इथे सल्ले देताना लोक "आपल्यासोबत सुद्धा असं होऊ शकतं" ह्या विचारानी जास्तीत जास्त चर्चा घडवुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.. त्यामुळे संभाव्य धोक्यांची माहिती मिळु शकते.. त्यामुळे सिरियसली.. होऊ दे चर्चा...

कोणाच्याही मूळ जेन्युइन मदतीच्या हेतूबद्दल कधीच शंका नव्हती. पिरा यानी संयतपणे लिहून उदाहरणानेच बरेच काही दाखवून दिले.

उत्तम.

मृत्युन्जय's picture

2 Sep 2014 - 1:12 pm | मृत्युन्जय

हो पण आता धागाकर्तीच्या वैयक्तिक प्रश्नांबद्दलची चर्चा खुप झाली. त्यांनी अर्धवट माहिती दिली की खोटी याबद्दल अशी खुलेआम चर्चा करण्यात काही हशील आहे असे वाटत नाही खास्करुन जेव्हा धागाकर्तीने इथे कोणालाही फसवलेले नाही, तिचा कोणाचीही थट्टा करण्याचा अथवा त्याला लुबाडण्याचा हेतु नव्हता, धागाकर्ती स्वतः बास झाले आता सांगत आहेत.

अगदी खरे सांगु का इथे मला काय वाटते आहे? एखाद्या मुलीची अब्रु लुटली गेली आहे आणि गल्लीतले लोक "तिनेच फूस लावली असेल हो" किंवा "दिवसाढवळ्या असे कसे होउ शकते" किंवा " पोलिसात तक्रार केली नाही म्हणजे नक्कीच काहितरी काळेबेरे आहे" किंवा "ती कपडे थोडे असेतसेच घालायची म्हणा" असली काहितरी विधाने करत आहेत.

बास झाले ना आता. गपा की. या विषयाच्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी, काय उपाय असु शकतात यावर चर्च करा वाटल्यास. धागाकर्ती, तिचे वडील, बँक मॅनेजरची बायको या वैयक्तिक गोष्टी कशाला? खासकरुन धागाकर्तीलाच ते आता नको असताना.

सुहास पाटील's picture

2 Sep 2014 - 1:44 pm | सुहास पाटील

इथे मी असतो तर त्या बँक वाल्याला आधी धरला असता ८८००० हि काय फुकट नाही. पण ठीक आहे विषय बन्द.

vrushali n's picture

2 Sep 2014 - 2:17 pm | vrushali n

तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे >तसेच त्या बँके अधिकार्‍याच्या बाइकोसोबत झाले
मला असे म्हणायचे होते(ते काका बाबांचे चांगले मित्र आहेत)

बाकी तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत

मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच

मला हे पटलेले आहे,बाबांना convince करुन तक्रार करा असे सांगणे महत्त्वाचे झाले आहे

आणी सं.क्षी. सर फारश्या कटकटकीतुन न जाता आपले पैसे मिळु शकत असेल तर क्या कहने!!

बाकी कोणाला अधीक उने बोलले गेले असल्यास क्षमस्व

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2014 - 3:25 pm | पिलीयन रायडर

ताई,

तुम्ही सतत त्या बँक मॅनेजरचा उल्लेख करत आहात आणि सांगत आहात की ते तुमच्या वडीलांचे चांगले मित्र आहेत.
पण इथे आलेल्या प्रतिक्रिया वाचुन हे तरी नक्की समजले असेल ना की एक बँक मॅनेजर असुन त्यांनी दिलेला सल्ला अगदी चुकीचा आहे. तुम्ही थोडावेळ मैत्री बाजुला ठेवा आणि विचार करा की एखादा बँक मॅनेजर असा सल्ला का देत असेल? अगदी त्यांच्या बायकोचे १.७५ लाख गेले तरी कुणी स्वस्थ कसं बसु शकतं? आपण स्वतः त्याच बँकेत मोठ्या पदावर असुनही?

ह्यात वरकरणी तुमच्या वडीलांची काहीच चुक, हलगर्जी / निष्काळजीपणा दिसत नाही.. मग नक्की का स्वस्थ बसा?

आणि ८८०००/- ही काही सामान्य रक्कम नाही.. आणि तुम्हाला अर्थात थोडा पाठपुरावा करावा लागणारच.. वडीलांच्या वतीने तो तुम्ही करु शकता. पण संक्षी म्हणतात तसं हे पैसे परत मिळु शकतात.. तुम्ही हा मुद्दा सोडु नये..

मिपावर ह्या प्रश्ना संबधित क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत.. त्यांची मदत जरुर घ्या..

चिगो's picture

2 Sep 2014 - 3:27 pm | चिगो

पिराताईंशी आणि संक्षीजींशी पुर्णपणे सहमत.. प्रश्न "कर नाही त्याला डर कशाला" ह्याचा असावा. ज्यांनीपण सल्ले दिलेत, त्यांनी कळकळीने, मनापासून सल्ले दिलेत. मला अजूनही कन्फ्युअजन आहे ते हे, की त्या बँक अधिकार्‍याच्या पत्नीने पैसे "बुडवले" की तिचे पैसे "बुडले"? जर पैसे बुडले असतील तर एवढे पैसे (१.७५ लाख रुपये) बुडूनही गप्प बसण्याचा निर्णय घेणे आणि तसाच सल्ला दुसर्‍याला देणे, नक्कीच संशयास्पद आहे.. आणखी एक गोष्ट, काहीही कारण नसतांना लोक उगाचच पोलिसांबद्दल गैरसमज करुन बसतात आणि फैलवतात. माझ्या पोलिसांशी आलेल्या संबंधावरुन (पुर्वीचा किंवा आताचा) तक्रारीची बाबतीत मलातरी कधीच वाईट अनुभव आला नाहीये. तेव्हा, आपलं नाणं खणखणीत असेल तर घाबरायची गरज नाही, हेच सांगतो..

vrushali n's picture

2 Sep 2014 - 4:02 pm | vrushali n

नुकतेच बाबांकडुन कळले आहे की आमच्या जावयाने पोलीस तक्रार करा असे सांगीतल्या बरोबर लगेच काल पोलीसांकडे गेलेत( मी डोक फोडुन सांगुनही एकत नव्हते,आणी म्हने जावयाच म्हणन कसटाळायचे?)पुरुष प्रधान संस्कुती ती हीच!!!

असो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही
आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे
घरच्या p c ला access असणारे लोक कमी आहेत,आणी बाबा सगळ्या शकयता पडताळुन बघताहेत

बघु आता काय होइल ते

पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन

एनीवेज थँक्य सगळ्यांना

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2014 - 5:45 pm | प्रसाद गोडबोले

पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन

येवढ्या लगेच रीलॅक्स होवु नका . अ‍ॅपलची अजुन बरीच प्रॉडक्ट आहेत बाजारात *blum3*

बाकी आयफोन हाच सर्व पापांचे मुळ कारण आहे !

आयफोनखिलं पापमुलम ! *biggrin*

प्रसाद१९७१'s picture

2 Sep 2014 - 5:59 pm | प्रसाद१९७१

हा प्रतिसाद वाचुन मनात काही बेसिक प्रश्न आले आहेत, पण आधीच भाषेच्या वापरा मुळे मार खाल्या मुळे आता विचारणार नाही.
पण मला मारणार्‍यांनी तरी विचार करावा की मला जे प्रश्न पडत होते ते चुकीचे होते का?

vrushali n's picture

2 Sep 2014 - 4:03 pm | vrushali n

१ तासाअधी

ऋतुराज चित्रे's picture

2 Sep 2014 - 7:34 pm | ऋतुराज चित्रे

शंभरी पुर्ण झाली. आता १०१ % खात्यात पैसे जमा झाल्याची बातमी येइल.

अकिलिज's picture

2 Sep 2014 - 7:52 pm | अकिलिज

माझ्या बाबांच्या बाबतीत एक प्रकार घडला होता. सांगलीला एटीएम मधून रात्रीचे पैसे काढताना कार्ड आणि पैसे एटीएम मध्येच अडकले. थोड्या वेळ विचार करुन बाबा घरी आले.

दुस-या दिवशी सकाळी बँकेत तक्रार नोंदवायला गेल्यावर बँकवाले 'असे कसे कार्ड सोडून घरी गेलात म्हणून तुमचीच चूक आहे' म्हणून टाळाटाळ करत होते. आता रात्रीच्या वेळी जर एकट्या माणसाला एटीएम बाहेर राखण करत बसणे सोईचेहि नव्हते. मुख्य म्हणजे बँकेला कार्ड आणि पैसेहि मिळाले नव्हते.

शेवटी पोलीस तक्रार केली. थोड्या दिवसांनी (२ महीन्यांनी) पाठपुरावा करून पैसे परत मिळवले. अर्थात पोलीसांना चौकशी करणे, उलटे अर्थ काढणे आणि बँकेने कार्ड वापरायच्या सूचनांची अंमलबजावणी न करणे या आरोपांमूळे थोडा त्रास झाला.

पण यात आपली काही चूक नाही या एका गोष्टीवर बाबांचा आत्मविश्वास टिकून होता.

सरकारी नोकरीत आयुष्या काढणा-या माणसाला उतारवयात संगणक, अ‍ॅन्ड्रॉईड, एटीएम अश्या गोष्टींचा सामना करणं थोडं जडच जातं. पण समजून घेतल्यावर भीड चेपली जाते.

काळजी करू नका. तुमच्या बाबांचेही पैसे बुडणार नाहीत याचा त्यांना विश्वास द्या.

vrushali n's picture

2 Sep 2014 - 8:13 pm | vrushali n

माझे बाबा पण आत्ता इंटरनेट वरुन खरेदी करायला शिकलेत
वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे
आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल?
की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल(एक तर अ‍ॅपल फोन आहे असे सायबर क्राइम वाले पोलीसांना म्हणत आहेत)

किसन शिंदे's picture

3 Sep 2014 - 12:00 am | किसन शिंदे

आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे
आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल?
की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल

हा परिच्छेद वाचून 'पुन्हा' बरेच प्रश्न पडलेत, पण आता विचारत नाही. कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.

कवितानागेश's picture

3 Sep 2014 - 3:55 pm | कवितानागेश

इंटरनेटवर 'one time pin' वापरायची सोय असते. तो नंबर फोनवर येतो आणि १० मिनिटे व्हॅलिड असतो. ही पद्धत सेफ आहे.

एस's picture

3 Sep 2014 - 6:56 pm | एस

सिमकार्ड क्लोन करून तेही बायपास करता येते.

vrushali n's picture

3 Sep 2014 - 7:42 pm | vrushali n

नेट बँकींग नाही,पैसे डिरेक्टली डेबीट कार्ड मधुन वळते झालेत्,त्यात one time pin ची गरज नसते,फोन वर डिरेक्ट transaction च मेसेज येतो

debit card नी online खरेदी करतांना one time password ची गरज नाही

वाचतिये. नस्ते उपद्व्याप मागे लागले की चिडचिड होते अगदी! मलाही माझ्या कार्डांची काळजी वाटायला लागलीये. संक्षीच्या उपायांना यश येवो आणि तुमचे पैसे परत मिळोत.

काळा पहाड's picture

2 Sep 2014 - 11:52 pm | काळा पहाड

वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे
आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल?
की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल

ए अरे हे काय चाल्लंय? कुणीतरी "इस्कटून" सांगेल का नक्की काय चाल्लय ते? डोक्याचं दही झालंय.

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 11:57 pm | प्यारे१

तपास सुरु आहे. योग्य वेळी माहिती देण्यात येईल.

(धागाकर्तीस डिस्क्लेमर: आपली कुठल्याही प्रकारची चेष्टा करण्याचा कोणताही हेतू नाही.)

प्रसाद१९७१'s picture

3 Sep 2014 - 10:34 am | प्रसाद१९७१

४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही
आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे

कोणाला अटक होयची असेल तर होऊ दे की. तुम्ही FIR करणे गरजेचे आहे. त्या शिवाय पैसे परत मिळणार नाहीत.

मौन ठेवा (की जरा) अकरा दिवस!

vrushali n's picture

3 Sep 2014 - 10:57 am | vrushali n

येत्या काही दिवसांत फायनल कळेल ते सांगते

श्री किसन शिंदे धागा असल्या कारणांसाठी द्वीशतकी किंवा शतकी व्हावा,तेही अख्खे घरचे धींडवडे निघुन असे मलातरी वाटत नाही,

जितकी छटाक माहीती होती ती सांगितली ही माझी मोठी चुक होती,आता पुर्ण तपास झाल्यावार इथे माहीती देइल(बाबा पोलीसांकडे आधी जायला इछ्छुक नव्हते,आता झालेत्,सायबर वाल्यांच व्हरडीक्ट काय आहे,ते तपास करत आहेत्,शेवटी पैसे परत मिळतात की नाही हे सांगते नक्की

सुहास पाटील's picture

3 Sep 2014 - 11:18 am | सुहास पाटील

इथे मला वाटत नाही तुमच्या घरचे धिंडवडे निघाले आहेत कदाचित कोणालाच असा वाटत नसावे. पण पैसे मिळाले कि नक्की सांगा. आता प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे कि जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर फार वाइट वाटेल इथे आलेल्या सगळ्यांना

आणी कमाल आहे ,म्हणे
प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे >की लोकांनी आमची इज्जत काढलीये

प्रतीसादक उवाच

१ धागा शतकी झाला की पैसे परत मिळतील अशी बातमी येइल्,

२ कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.

३ ह्यांनीच मोठी खरेदी केली आणी लपवायची आहे

४ कोणी इतके पैसे सोडतात का?

५ कथा सांगत आहेत

६" उत्कंठा" वाढवुन पळुन जात आहेत

अजुन काही राहीले असेल तर सांगा बुवा

काळा पहाड's picture

3 Sep 2014 - 1:05 pm | काळा पहाड

हो. वृषाली काकू, मला वाटतंय की तुम्ही एक्तर खोटं बोलताय किंवा तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे. इथे बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत. पण तुमच्या सगळ्या पोष्ट पाहिल्या तर भडक आणि दुसर्‍यावर सरळ सरळ आरोप वगैरे करणार्‍या आहेत. बाकी लोकाना ष्टोर्‍या ऐकण्यामध्ये ईंटरेस्ट असतो, तुमचे पुरूष प्रधान संस्कृती बद्दलचे उच्च विचार आणि तुमची प्रत्येक पोष्ट्बद्दल होणारी जळजळ आणि किटकिट ऐकण्यात नाही. आणि खरं सांगायचं तर लोकांनी जी काही इज्जत वगैरे काढलीय असं तुम्ही म्हणताय, ते तुमच्या पोष्ट, तुमचं सामान्यज्ञान आणि तुमचा अ‍ॅटिट्युड वगैरे बघता त्यात काही नवल नाही. खरं तर लोकांनी इतकं ऐकून घेतलय हेच नवल. तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत. तुमच्या पोष्टवरून असं दिसतय की तुमच्या घरातीलच कुणी तरी तुमच्या पिताश्रींना चुना लावून आयफोन की काय तो विकत घेतलेला आहे. आणि म्हणूनच तुमचे पिताश्री एफ.आय.आर. करायला का-कू करताहेत. (कारण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे अटक तर होणारच वगैरे). तेव्हा ही सोंगं बंद करा आणि तुमची कापडं तुमच्या घरीच धुवा. तुम्हाला इतके डिटेल पोष्ट लिहायला वेळ आहे, तर घरच्यांच्यावर उपकार करा आणि तो वेळ जरा कारणी लावा आणि अभ्यास करा.

vrushali n's picture

3 Sep 2014 - 2:24 pm | vrushali n

मी एकही वाक्य तुम्हाला उद्देशुन बोललेले नसताना इतक चिडुन बोलयचे काय कारण आहे?
तुम्ही मला अथवा माझ्या वडीलांना ओळ्खता काय?
नाही तर त्यांच्यवर असे आरोप लावायचे कारण कळु शकेल काय?
मिसळपाव वर असे व्यक्तीगत आरोप असलेले वाक्य चालतात काय?

मी आधीच माफ करा,माझी चुक झाली म्ह्ट्ल्यावर ,आमचेपण मागेपुढे असेच नुकसान होउ शकते,ते टाळण्यासाठी अशा बाबी वर चर्चा व्हायला हवी असे का म्हणत होतेत

मी जेव्हा तुमचे पुरूष प्रधान संस्कृती म्हटल तेव्हा ते कौतुकाने म्हटल होत(आम्ही सांगुन एकत नव्हते,रसीक नी एकदा
म्हट्ल्याबरोबर तक्रार करायला गेलेत म्हणुन)

बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत> त्या प्रतीसादांना मी मजकडुन प्रामाणीक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे,मी सं.क्षी सरांना सगळे इमेल पण पाठवलेत्,मग पुढचा तपास सायबर क्राइम का करेनात

तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत >तसेच आम्हीपण इथे कोणाकडे पाणी भरत नाही,मग श्री प्रसाद ह्यांना असे आरोप का करावसे वाटलेत?

बाकी माझ्या अभ्यासाची काळजी घेण्यास मी समर्थ आहे,काळजी नसावी,धन्यवाद्,लक्षात ठेवुन अभ्यासाची काळजी घेतल्यबद्दल

क्रुपया मी तुम्हाला उद्देशुन काहीही बोललेले नसतांना आणी तुम्हाला ह्या केस मधले शेंडा न बुड माहीत नसतांना व्यक्तीगत आरोप टाळावेत

धन्यावाद

किसन शिंदे's picture

3 Sep 2014 - 1:11 pm | किसन शिंदे

कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.

यात तुमच्या घरच्या लोकांची इज्जत काढण्यासारखं काय होतं हे कृपया विस्कटून सांगाल का?

मधुरा देशपांडे's picture

3 Sep 2014 - 1:29 pm | मधुरा देशपांडे

मलाही हेच कळत नाहीये. प्रत्येक प्रतिसादाचा आणि वाक्याचा रोख धागाकर्तीच्या घरच्यांना मानहानीकारक आहे असे का वाटते आहे? कोणी इतके पैसे सोडते का? हा प्रश्न खरंच पडला मला (आणि इतरांनाही). म्हणून तसे सांगितले. यात पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत एवढीच इच्छा होती. इथले अनेक प्रतिसाद तळमळीने फक्त पैसे परत मिळावेत यासाठीच होते. तुम्ही न घाबरता तक्रार करा, पैसे परत मिळतील असा धीर देणारे होते. यात अपमान कुठे केला गेला हे नाही कळले.

त्रिवेणी's picture

3 Sep 2014 - 2:12 pm | त्रिवेणी

+११११

त्रिवेणी's picture

3 Sep 2014 - 2:12 pm | त्रिवेणी

+११११

vrushali n's picture

3 Sep 2014 - 2:46 pm | vrushali n

जर तुम्ही खवट पणे ते नाही वाक्य म्हटलत; तर मी चुकले

योगी९००'s picture

3 Sep 2014 - 1:22 pm | योगी९००

सो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे,
.....
पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन

आता मला सांगा की हे हॅकींग नाहीतर दुसरे काय? बाबांनी स्वतः कोणाला पिन व इतर details तर नाही ना दिले?

vrushali n's picture

3 Sep 2014 - 2:35 pm | vrushali n

मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते,ज्या व्यक्तीला सगळ माहीत आहे,असे लोक कमी असतील सहज सापडु शकतील ना,मग ते त्या paytm चे का असेना

कदाचीत known devil is better than unknown असे त्यांना वाटले असावे आणी बाबांना हे समधान की बाबांनी कुठल्याही suspicious email/phone entertain केले नाही,म्हणजे त्यांची कसलीच चुक नाही,आणी आता अश्या व्यवहारांना अटकाव होउ शकेल ना?

जर त्यांनी suspicious email/phone entertain केले असते तर त्यांच मन त्यांना नक्कीच खात असत अस मला वाटत

बाबांनी अजुन कोणालाही स्वताहुन पिन व इतर details दिले नाहीत

योगी९००'s picture

3 Sep 2014 - 5:12 pm | योगी९००

मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते
जबरदस्तीने जर कोणी तुमचा पासवर्ड / पिन घेतला तर त्याला हॅक म्हणतच नाहीत...

known devil is better than unknown
आम्हाला तर ओळखीचा चोर जीवानिशी मारी हेच माहित आहे. बाकी हॅकर घरचा असो वा बाहेरचा त्याला पोलिसांपर्यंत घेऊनच जा..८८००० ही काही कमी रक्कम नाही आहे. त्यातून आम्हा सर्वांना पिन / पासवर्ड कसे सांभाळावेत हे सुद्धा कळेल.

इरसाल's picture

3 Sep 2014 - 1:47 pm | इरसाल

आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू

हे वाचले असतेत ना आधी तर धपाधप सल्ले पाडले नसतेत तुम्ही.

आणी हो माझ्या मनात तुमच्या सम्स्येविषयी बिलकुलही शंका नाही. जे झाले ते योग्य नाही पण पब्लिक देत आहे ना सल्ले सगळे स्वीकारयलाच हवे असे नाही.११५ प्रतिसादात ५ वाकडे असतील पण ११० तिकडे आहेत त्यांचा मान ठेवा .

vrushali n's picture

3 Sep 2014 - 3:01 pm | vrushali n

मला खरच कळत नव्हत कोण खवट बोलतोय्,कोण ह्या क्या फेक रही म्हणतोय

मला जे genuine वाटलेत्,त्यांना मी खरच प्रमानीक पणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय(अर्थातच मलाच छ्टाक माहीती असताना,त्यामुळे काही कच्चे दुवे नक्कीच राहिले असतील्,हे मी नाकारत नाही)

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2014 - 1:51 pm | पिलीयन रायडर

अरे बापरे.. खुप काही झालय की ह्या धाग्यावर...

कुणी तरी व्यवस्थित प्न नंबर वापरुन खरेदी केली आहे.. आता जर एखाद्या फोल्डर मध्ये सगळी माहिती लिहुन ठेवली असेल तर ती कुणीही वापरु शकतं.. आणि मग हे कसं प्रुव्ह करणार की ती खरेदी तुम्ही केलेली नाही तर कुणा दुसर्‍याने केली आहे..? (हा मी सिरियस प्रश्न विचारत आहे..) परत घरतल्या कॉम्पुटर वरुन ही माहिती चोराला मिळली तर असा अ‍ॅक्सेस कुणाकुणाला आहे.. अर्थातच जवळच्याच व्यक्तिंना.. मग तुमचे वडील रिलॅक्स कसे? उलट जास्तच वैतागले असायला हवेत कारण अशा केस मध्ये डायरेक्ट अटक वगैरे पर्यंत जाता येत नाही..

ऑनलाईन खरेदी केली तर ऑर्डर कुठल्या तरी पत्त्यावर मागवावी लागते ना? मग जो काही अ‍ॅपलचा फोन मागवला आहे तो नक्की कोणत्या पत्त्यावर मागवलाय हे तरी शोधता येईल का? तुमच्या घरच्याच पीसीला वापरुन हे काम केलं असेल तर काही हिस्टरी मध्ये वगैरे जाऊन बघता येईल का की कोणत्या आयडीने खरेदी झाली? समजा दुसरा पीसी वापरला असेल तर त्याचा आयपी वगैरे शोधणे शक्य असते का?

मुळात इअतकी महत्वाची माहिती एका फोल्डर मधे लिहुन ठेवुन तो पीसी बाहेरच्या रुम मध्ये ठेवला.. ती माहिती कुणी तरी घेतली आणि वापरुन मोकळा पण झाला... आता मला ८८०००/- का सोडावे लागणारेत हे समजतय..

आणि हो.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात.. (मलातरी तसं वाटतं.. अर्थात मी जाणकार नाही... योग्य लोक सांगतीलच काय ते..)

प्रसाद१९७१'s picture

3 Sep 2014 - 1:58 pm | प्रसाद१९७१

.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात

नक्कीच असतात त्यांना जो पासवर्ड, पीन वगैरे जातो तो Encrypted असतो, कोणी ऐरागैरा तो शोधु शकत नाही.

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2014 - 2:00 pm | पिलीयन रायडर

हं तेच तर.. नाही तर कशाला लोक ऑनलाईन व्यवहार करतील...

vrushali n's picture

3 Sep 2014 - 2:39 pm | vrushali n

त्या paytm वाल्याच्या जेव्हा लक्षात आले की रक्कम मोठी आहे,तेव्हा त्यांनी नं दिला,तेव्हा तो व्यक्ती बाबांना असे बोलला की " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी"

ह्याचा अर्थ आत्ता आम्ही लावत बसलोत

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2014 - 2:48 pm | पिलीयन रायडर

" सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी"

असं लोक स्वतःच्या कंपनीबद्दल बोलतात? कस्टमर सोबत? डायरेक्ट? आणि केवळ मोठी रक्कम आहे म्हणुन कंपनीमध्ये फ्रॉड आहे असा निष्कर्ष पण काढतात? आणि तो लागलीच बोलुन दाखवतात?

ऐकावं ते नवलच होत चाललय आता...

vrushali n's picture

3 Sep 2014 - 2:56 pm | vrushali n

जेव्हा ४३३५० वाला मेसेज आला,तेव्हा १ तासात आम्ही इमेल केली के तो व्यवहार आमचा नाही थांबवा लगेच,तर हे लोक तीन दिवसांनी इमेल पाठवुन म्हणतात,we are sorry product is delivered,plz sent bank statment or through cyber cell

बाबांनी त्याला काहीतरी माणुसकी ठेवा,तुम्ही लगेच का कार्यवाही केली नाही? फोन न क देत नाहीतल्,फोन असता तर लगेच हे थांबवता आल असत ना?
आम्ही आता काय करायच अस म्हट्ल्यावर तो ओशाळुन असे बोलला

आत्ता त्य वाक्याचा अर्थ शोधत आहोत आम्ही

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2014 - 3:12 pm | पिलीयन रायडर

अर्थ शोधताय? कशाला? अहो काहीही बोलला तो.. तोंडाला येईल ते.. कंपनीत फ्रॉड चालु आहे असं कुणी कस्टमर केअर लेव्हलचा माणुस म्हणले का? बरं म्हणलाच.. तुम्ही तरी काय मनावर घेताय...

त्यांनी ३ दिवस उत्तर दिलं नाही ह्यावर तुम्ही तक्रार करु शकता. मुद्दे बघा.. "माणुसकी" वगैरे भावना सोडा...

मुळात माझा प्रश्न हा आहे की समजा घरातल्या कुणी त्या माहितीचा गैरवापर करुन खरेदी केली असेल तर तुम्ही ते सायबर सेल समोर प्रुव्ह करणार कसं? की ही खरेदी तुमच्या वडिलांनी केलेली नाही... किंवा तो माणूस सापडलाच तर तो असंही म्हणेल की तुमच्या वडीलांनीच मला हे डिटेल्स दिले.. (अर्थात त्यांनी दिलेले नाहीत...पण चोराच्या उलट्या बोंबा..) तरी जवळचा माणूस असेल तर पुन्हा तुम्ही ते सिद्ध करणार कसं? तुम्हीच म्ह्णताय की हे हॅकिंग नाही.. (paytm नी जर तुमच्या माहितीचा वापर केला असेल तर ते हॅकिंगच.. पण ती शक्यता खरंच फार फार कमी आहे.. ते तुम्ही सोडाच..)...

प्रसाद१९७१'s picture

3 Sep 2014 - 3:30 pm | प्रसाद१९७१

FIR करणे हेच ह्या वरचे उत्तर आहे. FIR शिवाय पैसे परत मिळणार नाहीत.

एक तर तो माणुस असा बोलला वरुन बँक स्टेटमेंट असे दाखवत आहे की ज्या वेळेस बाबांनी रीचर्ज केलेत्,अगदी त्याच वेळेस अथवा त्याच्या दुसर्या दिवशी सगळ्या मोठ्या रकमा दुसरीकडे वळवल्या गेल्यात्,एकदा योगायोग असु शकतो,पण तीनदा?पोलीस इन्स्पेक्टर पण ह्या तर्काला पुष्टी देताहेत
आणी आत्ताच श्री धर्मराज ह्यांच्या नातेवाइकांच्या अनुभवान असाच काहीसा आहे

आणी fir दाखल केली आहे,सायबर क्राइम वाले आपले काम करीत आहेत

दोन्ही ठीकाणी अत्यंत ह्दय अनुभव आलेत ,पोलीस इन्स्पेक्टर बाबांसोबत लगेच चन्द्र्पुर च्या सायबर सेल मधे गेलेत
आणी ते बाबांना म्हणत होते की आम्ही काहीही झाले तरीही तुमचे पैसे परत मिळ्वुन देउ,आणी त्यांनी पोलीसांबद्दलचा गंड कमी करा असे इतरांना सांगायला सांगितले आहे

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2014 - 4:55 pm | पिलीयन रायडर

हे तर फारच छान!
नेटाने प्रयत्न करत आहात आणि इथेही उत्तरे देत आहात.. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल..!

आदूबाळ's picture

3 Sep 2014 - 5:49 pm | आदूबाळ

+१

प्रसाद१९७१'s picture

3 Sep 2014 - 6:11 pm | प्रसाद१९७१

हे उत्तम केलेत FIR केलेत ते.

मधुरा देशपांडे's picture

3 Sep 2014 - 2:57 pm | मधुरा देशपांडे

म्हणजे उद्या हीच रक्कम ४०० रुपये किंवा १०००० असती किंवा कदाचित ४ लाख असती तर उत्तर बदलले असते का? बदलायला हवे का? ही रक्कम जास्त आहे हे आता कुणी ठरवले? त्या पेटीएम वाल्याने?
आणि हो, वृषाली ताई, हा प्रश्न खरंच पडलाय. तुमच्या घरच्यांविषयी यात काही नाही.

सध्या आपण काही गोष्टी गृहीत धरतोय असं वाटतंय. गृहीतकं धाग्यावर दिलेल्या माहितीवर आधारित आहेत आणि त्यापेक्षा जास्त आपल्या आपल्या अनुभवांवर नि अकलेवर अवलंबून आहेत.

१. सगळ्यांना इंटरनेट उत्तम समजतं.
२. सगळ्यांना ऑनलाईन व्यवहार जमतात.
३. सगळ्यांना कार्ड आणि पिन नंबर ह्यांची माहिती गुप्त ठेवावी ह्याचं ज्ञान असतं.
४. सगळे जण संगणकाशी तितकेच सक्षमपणं जोडले गेलेले आहेत. (मटामराठी प्रभाव)
५. धागाकर्तीला पैसे महत्त्वाचे नाहीत.
६. धागाकर्तीच्या वडलांची सगळ्या उस्तवार्‍या करण्याची क्षमता आहे.

मागच्या पिढीतल्या एका फार मोठ्या नसलेल्या गावातल्या एका प्राध्यापकांनी थोड्या अपुर्‍या माहितीवर नि कशाला कोण काय करतंय अशा निष्काळजीपणानं (त्यांच्या लेखी ते निष्काळजीपण नाही कारण माहिती कमी आहे) हॉलमध्ये असलेल्या पीसीमध्ये एक फोल्डर ठेवला ज्यात सगळी माहिती होती.

(माझ्या आईकडं एकदा डेबिट कार्ड देऊन पिन नंबर सांगितलेला. आईनं आपल्या टेलिफोन डायरीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवला होता. नसतं माहिती राव. लेट्स अ‍ॅक्सेप्ट.)

कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीनं/ पीसी सर्व्हिसिंग करणारानं हे उद्योग केलेले असण्याची जास्त शक्यता आहे.
तपास तशा प्रकारे करावा असं वाटतं.

vrushali n's picture

3 Sep 2014 - 2:48 pm | vrushali n

असे असेल अथवा

payमधला,कारण तो प्रतीनीधी असा बोलला " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फ्रॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी"

ह्या वाक्याचे अनेक अर्थ निघु शकतात ना?

आजच्या म.टा. मध्ये आलेली ह्याच संदर्भातील बातमी: ‘कार्ड स्वाइप’वर व्हायरसची हॅट्ट्रिक