तुझी वाट बघता बघता
नेहमी मला हे असेच होते
प्रहरावर प्रहर उलटून जातात
अन दिवसाची रात्र होते
तूझ्या येण्याची चाहुल
रातराणी हलकेच सांगुन जाते
आठवणीने तुझ्या चंद्र शहारतो
अन चांदणीही मोहरुन जाते
नकळत कुठुनसा अल्लड वारा
ओठी गीत तुझे गुणगुणत येतो
उगाच सैरावैरा पळुन वैरी
उरी घालमेल वाढवून जातो
आठवत नाही कितीवेळ मी इथे
एकाकी नि:शब्द बसुन आहे
वेड्यापरी इथे येणार्या वाटांवरती
तुझ्या पाउलखुणा शोधत आहे
रात्र चढता चढत जाते,
मात्र तू काही येत नाही
तुला न भेटता निघण्यास
हे पाउलही मग धजत नाही
तु न आलेली पाहून
चांदणी ही आता हिरमुसली आहे
तिची ती घालमेल पाहुन
पहाटही वेशीवर विसावली आहे
दर रात्री या थडग्यावर
वाट मी तुझी पहातो आहे
"एकदातरी भेटुन जा, सोडव मला"
अशी आर्त विनवणी करतो आहे
तुझी वाट बघता बघता
अजून एक रात्र विझुन जाते
तुझी वाट बघता बघता
नेहमी मला हे असेच होते......
प्रतिक्रिया
14 May 2016 - 1:06 pm | चांदणे संदीप
पु.ले.शु.
Sandy
15 May 2016 - 1:04 am | अभ्या..
कबरस्तानाचा रखवालदार?????
15 May 2016 - 10:08 am | एक एकटा एकटाच
हा हा हा
च्यामायला टायटल चुकल म्हणायच म्हणजे माझ
बाय द वे
हा आय डी पण चांगलाय
कब्रस्तानचा रखवालदार
:-)
15 May 2016 - 10:11 am | एक एकटा एकटाच
@संदीप
अरे हि माझी एकदम सुरुवातीची कविता आहे......
अगदी ट ला ट लावून केलेली.
:-)
15 May 2016 - 3:58 am | एस
कविता आवडली!
15 May 2016 - 10:12 am | एक एकटा एकटाच
धन्यवाद
1 Jul 2016 - 11:35 am | अंतरिचा राजा
कविता खुप् छान आहे
1 Jul 2016 - 4:32 pm | सुंड्या
तुमची कविता माझ्या PoV ने-
तुझी वाट पाहतांना असे वाटून जाते
पळात दिवस, क्षणात रात्र उलटून जाते,
चाहुल तूझ्या येण्याची रातराणी सांगुन जाते
आठवणीने तुझ्या चंद्र काम्पितो, चांदणी मोहरुन जाते,
अजाण अल्लड हवा गीत तुझे गुणगुणते
उगाच स्वैर वाहूनी, वैरी मनी घालमेल वाढवून जाते,
वेळ-काळाचे भान हरपून मी स्तब्ध आहे
माझी वेडी-आशा इथल्या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधून जाते,
--
ही विरहाची रात्र ढळता ढळत नाही तू सुद्धा येत नाही
तुला न भेटता निघण्यास हे मनही धजत नाही,
तु न येता चांदणीही आता हिरमुसली
बघून तिची वेदना पहाटही क्षितिजावरच रुसली,
"एकदाच भेटून मुक्त कर मला" आर्त करतो
रोज याच थडग्यावर मी वाट तुझी पाहतो,
तुझी वाट पाहता पाहता कित्येक नक्षत्रे ओघळून गेले
तुझी वाट पाहता पाहता... सदैव मला असेच वाटून गेले....
..............
7 Jul 2016 - 11:25 pm | एक एकटा एकटाच
तुझी वाट पाहता पाहता कित्येक नक्षत्रे ओघळून गेले
तुझी वाट पाहता पाहता... सदैव मला असेच वाटून गेले....
..............
हे आवडलं