मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझी वाट बघता बघता........

एक एकटा एकटाच · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते प्रहरावर प्रहर उलटून जातात अन दिवसाची रात्र होते तूझ्या येण्याची चाहुल रातराणी हलकेच सांगुन जाते आठवणीने तुझ्या चंद्र शहारतो अन चांदणीही मोहरुन जाते नकळत कुठुनसा अल्लड वारा ओठी गीत तुझे गुणगुणत येतो उगाच सैरावैरा पळुन वैरी उरी घालमेल वाढवून जातो आठवत नाही कितीवेळ मी इथे एकाकी नि:शब्द बसुन आहे वेड्यापरी इथे येणार्‍या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधत आहे रात्र चढता चढत जाते, मात्र तू काही येत नाही तुला न भेटता निघण्यास हे पाउलही मग धजत नाही तु न आलेली पाहून चांदणी ही आता हिरमुसली आहे तिची ती घालमेल पाहुन पहाटही वेशीवर विसावली आहे दर रात्री या थडग्यावर वाट मी तुझी पहातो आहे "एकदातरी भेटुन जा, सोडव मला" अशी आर्त विनवणी करतो आहे तुझी वाट बघता बघता अजून एक रात्र विझुन जाते तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते......

वाचन 4082 प्रतिक्रिया 0