तेव्हा मला तू फार फार आवडतेस...!

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
24 Apr 2016 - 8:04 pm

तिचं म्हणणं..
मी तुम्हाला मुळीच आवडत नाही..
अन माझा मुद्दा..
तु मला कधी आवडत नाहीस ते सांग..!

बोलताना असे बोलुन गेलो..
तु जशी घरात आवडतेस.. तशी तू प्रवासातही आवडतेस..!

ती मग अडुनच बसली... घरातले नंतर पाहु..
प्रवासात कशी आवडते हे सांगा..!

-------------------------------------------------------------------------------
प्रवास १ :
विमानप्रवासात कधी
मी मध्यमवर्गीय संकोचाने
एखादी टंच हवाईसुंदरी
दुर्लक्ष केल्यागत
न्याहाळीत असतो....
तु अचानक तिला
आपल्याकडे बोलावतेस..
मुद्दामुन तिला गॉसिपिंग केल्यासारखे
कानात काही सांगायला..
खाली वाकवतेस..
उन्न्त तिचे उरोज पाहुन
माझा मध्यमवर्गीय संकोच अजुनच संकोचतो..
अन तिरक्या केलेल्या डोळ्यातुन डोकावतो...
आणि माझ्या मग कानावर येते..
"अ‍ॅक्चुअली माय हजबंड इज अ प्रीडायबेटीक.
वुड यु प्लीज ऑफर ओन्ली ग्रीन सालाड टू हिम इफ अवेलेबल!"
क्षणात त्या हवाई सुंदरीची तू दवाई सुंदरी करतेस.. (आभार पु.ल)
ती ही तिथुन "अ‍ॅट सो यंग एज.." म्हणत
माझ्याकडे एक सहानुभुतीपूर्ण कटाक्ष टाकुन
चुचकारत निघुन जाते..
(ती हसल्याचा मला उगाचच भास होतो.)
अन हे झाल्यावर तु सहजपणे
माझ्याकडे वळून पाहत म्हणतेस
काय टंच मुलगी होती ना.!
फिगर पाहीली का तिची?
मला आवडली...
तुम्हाला?
हवेत माझी फिरकी घेणारी तू...
मला तेव्हा तिथे खरोखरच...
आभाळाच्या उंचीइतकी जाम आवडतेस....

- कानडाऊ योगेशु

<strong>(टू बी कंटीन्युड....)</strong>

प्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

हेहेहेहेहेहे.
मस्तच. आवडली ;)

विजय पुरोहित's picture

25 Apr 2016 - 1:04 pm | विजय पुरोहित

हेच्च म्हणतो...
कहरच...

तुषार काळभोर's picture

24 Apr 2016 - 10:19 pm | तुषार काळभोर
जव्हेरगंज's picture

24 Apr 2016 - 10:30 pm | जव्हेरगंज

नादच खुळा !!

नाखु's picture

26 Apr 2016 - 12:18 pm | नाखु

हाय !!!

कानडाऊ योगेशु's picture

25 Apr 2016 - 11:56 am | कानडाऊ योगेशु

धन्यवाद अभ्या,पैलवान आणि जव्हेरगंज!

रातराणी's picture

25 Apr 2016 - 12:06 pm | रातराणी

भारीये!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2016 - 12:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

>>> आभाळाच्या उंचीइतकी जाम आवडतेस..
असेच म्हणतो. :)

-दिलीप बिरुटे

अन हे झाल्यावर तु सहजपणे
माझ्याकडे वळून पाहत म्हणतेस
काय टंच मुलगी होती ना.!
फिगर पाहीली का तिची?
मला आवडली...
तुम्हाला?
हवेत माझी फिरकी घेणारी तू...
मला तेव्हा तिथे खरोखरच...
आभाळाच्या उंचीइतकी जाम आवडतेस....

भारी आवडलं... मस्त लिहीलय.

चांदणे संदीप's picture

25 Apr 2016 - 1:02 pm | चांदणे संदीप

लय भारी! और आंदो!

Sandy

बाबा योगीराज's picture

25 Apr 2016 - 1:22 pm | बाबा योगीराज

आवड्यास.

कानडाऊ योगेशु's picture

25 Apr 2016 - 8:07 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद रातराणी,प्रा.डॉ,पल्लवी,संदीप व बाबा योगीराज!

वैभव जाधव's picture

25 Apr 2016 - 9:01 pm | वैभव जाधव

मस्त च! बायका हुशार असतातच. ;)

निशांत_खाडे's picture

26 Apr 2016 - 12:27 pm | निशांत_खाडे

एकच नंबर...
और आंदो..

अपरिचित मी's picture

26 Apr 2016 - 12:34 pm | अपरिचित मी

भारी!!!

पथिक's picture

26 Apr 2016 - 2:01 pm | पथिक

मस्त! खूप आवडली!

कानडाऊ योगेशु's picture

26 Apr 2016 - 2:39 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद वैभव,निशांत,अपरिचित आणि पथिक.!

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2016 - 2:54 pm | पिलीयन रायडर

नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली तर आवर्जुन नवर्‍याला दाखवण्या इतपत मी सुद्धा पुढारलेली आहे पण खास एखाद्या बाईला वाकायला लावुन नवर्‍याला वर "कसली टंच बाई आहे ना" असा लुक देण्या इतपत प्रगत बाई मला अजुन भेटायची आहे. काय आहे ना की बर्‍याच पुरुषांच्या नजरा बाय डिफॉल्ट चेहर्‍याच्या वीतभर खाली सेट असतात. तर एकंदरित त्याचा भयानक वीट आलेला असल्याने असं दुसर्‍या बाईकडे एका पुरुषाला बघायची संधी निर्माण करुन देणं जर्रा अवघडच. जुनाट विचार.. पण लोक वर म्हणत आहेत तर असेलही बुवा ग्रेट!

अवांतरः- आम्ही जसं नवर्‍यांना सुंदर मुली दाखवतो तसं नवरे लोक्स बायकोला चिकणे पुरुष दाखवतात का? माझा नवरा दाखवत नाही म्हणुन विचारते..

कानडाऊ योगेशु's picture

26 Apr 2016 - 5:28 pm | कानडाऊ योगेशु

दुसर्‍या बाईकडे एका पुरुषाला बघायची संधी निर्माण करुन देणं जर्रा अवघडच. जुनाट विचार..

तुम्हाला ह्यात संधी दिसली मला तर नवर्याला विमानातच जमीनीवर आणण्याची तिची युक्ती दिसली.आणि त्यामुळेच ती त्याला आवडते.

नवर्‍याला जमिनीवर आणण्यासाठी एका बाईने दुसर्‍या बाईचा उपयोग करावा म्हणजे ग्रेटच!

मराठी कथालेखक's picture

26 Apr 2016 - 7:51 pm | मराठी कथालेखक

आम्ही जसं नवर्‍यांना सुंदर मुली दाखवतो तसं नवरे लोक्स बायकोला चिकणे पुरुष दाखवतात का?

हो प॑ण क्वचितच ..!! शिवाय तो देखणा आहे आणि आवडला आहे असं बायका सहसा मान्य करत नाहीत , त्यामुळे कालांतराने पुरुषांचा उत्साह कमी होतो.

पण एकंदरीतच स्त्रियांच्या सौंदर्याने पुरुषच नाही तर स्त्रियाही प्रभावित होतात. अनेकदा स्त्रियांना मी दुसर्‍या स्त्रियांच्या /मुलींच्या सौंदर्यांने भारावून कौतुक करताना ऐकलंय. (म्हणजे विशेष असूया नसल्यास स्त्रिया दुसर्‍या स्त्रियांचं कौतुक करतात :) पण पुरुषांच्या बाबत असं होत नाही. ते कधी दुसर्‍या पुरुषांच्या देखणेपणाने भारावून जात नाही.

नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली तर आवर्जुन नवर्‍याला दाखवण्या इतपत मी सुद्धा पुढारलेली आहे पण खास एखाद्या बाईला वाकायला लावुन नवर्‍याला वर "कसली टंच बाई आहे ना" असा लुक देण्या इतपत प्रगत बाई मला अजुन भेटायची आहे.

=)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2016 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

पां..... .. .

http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

प्रचेतस's picture

27 Apr 2016 - 2:58 pm | प्रचेतस

=))

नाखु's picture

27 Apr 2016 - 3:50 pm | नाखु

ध्वनी-प्रतीध्वनी !!!

सस्नेह's picture

26 Apr 2016 - 4:09 pm | सस्नेह

चांगला कल्पनाविलास !
बाकी, एक स्त्री कोणत्या प्रसंगी कशी वागेल याची कल्पना पुरुष आपल्या कल्पनेप्रमाणेच करतात, हे पाहून गंमत वाटली !!

पैसा's picture

26 Apr 2016 - 4:28 pm | पैसा

+१

अजया's picture

27 Apr 2016 - 9:43 am | अजया

स्नेहा =))
+१००

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2016 - 4:37 pm | पिलीयन रायडर

=))

रेवती's picture

26 Apr 2016 - 6:19 pm | रेवती

खिक्क!

स्रुजा's picture

26 Apr 2016 - 6:25 pm | स्रुजा

लोल .. तसंच झालं असावं.

बायकोने नवर्‍याच्या मनातली चलबिचल ओळखुन त्याला कानकोंडं करुन मजा घेण्याचा प्लान असु शकतो पण त्यात टंचपणा अधोरेखित करण्याचा भाग मात्र पोएटिक लिबर्टी आहे ! नवर्‍याची फजिती होण्यातली गंमत कळली आणि आवडली पण तपशीलात जरा गणित चुकलं असं मला ही वाटलं :)

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 12:33 am | कानडाऊ योगेशु

पण त्यात टंचपणा अधोरेखित करण्याचा भाग मात्र पोएटिक लिबर्टी आहे ! नवर्‍याची फजिती होण्यातली गंमत कळली आणि आवडली

बॅंंग ऑन!

तपशीलात जरा गणित चुकलं
इथे गणित सोडवायच्या पध्दतीला महत्व आहे तपशीलाला/उत्तराला नाही... त्यामुळे गणित चुकले तरी नो प्रोब्लेम. ;)

वैभव जाधव's picture

26 Apr 2016 - 6:43 pm | वैभव जाधव

अब काहे बाल कि खाल निकाल रहे हो?

नवरा बोलतोय हे लक्षात घ्या की मातांनो! बाकी एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या स्रीयांबाबत वाईट वाटतं. लै पळावं आणि ऐकावं लागतं बिचाऱयांना

वैभव जाधव's picture

26 Apr 2016 - 6:43 pm | वैभव जाधव

अब काहे बाल कि खाल निकाल रहे हो?

नवरा बोलतोय हे लक्षात घ्या की मातांनो! बाकी एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या स्रीयांबाबत वाईट वाटतं. लै पळावं आणि ऐकावं लागतं बिचाऱयांना

मन१'s picture

26 Apr 2016 - 7:10 pm | मन१

काही दिवसांपूर्वी ह्याच लायनीवरचा किस्सा अनुभवला. ( पूर्वप्रकाशित प्रतिसाद )
.
.
तुम्हाला मी कितीही सांगितलं तर पटणार नाही. मी आताच एक सुंदर ....निखळ नितांत सुंदर मुलगी पाहिली.
मधुबालेहून सुंदर. हो. पुन्हा सांगतो. मधुबालेच्या सर्वात सुंदर फोटोत ती दिसत असेल ना, त्याहून अधिक सुंदर.
.
.
मी शिरेसली सांगतो आहे.
.
.
इथे " नॅचरल्स " नावाची मोठी आइस्क्रीम चेन आहे. जरा महागडी आणि पॉश असते . ( सी सी डी सारखं वातावरण असतं.) पण तिथली आइस्क्रीम्स भन्नाट असतात. काही कारणानं तिथं गेलो होतो. (खरं तर त्याच्या शेजारच्या "गणेश भेळ " ला जायचं होतं.) तिथे ही नितांत सुंदर स्त्री नजरेस पडली. तिच्यावर नजर खिळून राहिल आणि तिला कदाचित ते विचित्र वाटेल, संकोच वाटेल ; म्हणून मुद्दाम प्रयत्न पूर्वक इकडं तिकडं पहावं लागत होतं.
.
.
जबरदस्त गोरापान रंग. हार्ड कोअर काश्मिरी नैतर जम्मुचे नैतर उत्तर पंजाबतले लोक असतात ना, तसा गोरा. पण त्याहूनही खरं तर खूप खूप भारी. लाल चुटुक ओठ. बरोब्बर गोल चेहरा. पण त्यातही थोडी मानवी गोलाई चेहर्‍यावर. अगदिच गोल गरगरित असला तर जरा भंकस वाटतो. तर सांगायचं म्हणजे बरोब्बर हवा तितकाच गोल; हनुवटीपाशी किंचित निमुळता. साधे सरळ निरागस दोळे. टोकदार नाक. आणि चेहर्‍यावर मेकपचा एक थेंबही नाही. फाउंडेशन वगैरे असेल तर सहज जाणवून येतं राव. हिचं तसं काहीही नव्हतं. लिपस्टिकही नसावच..
आणि चेहर्‍यावर खूच साधे सरळ शालीन, ग्रेसफुल भाव. कोजागिरीचं निरलस मधाळ शीतल दूध असतं ना, तसं.
भारतात अजून समोरच्या व्यक्तीच्या सौंदर्यास दाद देणं उचित दिसत नाही. नाहीतर ग्यारंटेड बोललो असतो. कौतुक केलं असतं.
.
.
ती अतिबारिक नव्हती. फार जाडही नाही. नेमका अचूक, शोभेलसा बांधा होता. आणि चेहर्‍यावरुनच आरोग्य दिसतं म्हणतात व्यक्तीचं. तसा आरोग्याचा तजेलाही होता चेहर्‍यावर. डोळ्यात निरागसता आणि हसू. आणि सहज नजरानजर झालेल्या मलाही तिने दोन मिनिटात नजरेनं खलास केलं. तिनं सहजच पाहिलं. पण त्यात खूपच साधेपणा , निरागसता होती. ती माझ्याकडे पहात नव्हती ते ठाउक होतं. माझ्या मागच्या काउंटरकडे ती पहात होती. पण....
पण...
तेवढ्या दोन घटकांत नुसत्या नजरेतनच जे काय आम्ही बोल्लो असू ते भन्नाट होतं.
.
.
म्हणजे ...
मी तो असा सगळा प्रकार इतक्या जवळून पाहून जरा गोंधळून गेलो होतो; ते तिला समजत असावं. तिला ह्या गोंधळलेल्या लोकांची सवयही असावी. तिने नजरानजर झाल्यावर एक हल्कसं, कळत-नकळत स्माइल दिलं. म्हणजे "हो, मला समजतय" अशा अर्थाचं ; ओळखीचं, प्रसन्न असं जे स्माइल देतो ना, तसं हसू होतं चेहर्‍यावर. किंवा एखादे डॉक्टर बावचळलेल्या पेशण्टला धीर द्यायला जे धीराचं, पण प्रसन्न स्मित आणतात ना चेहर्‍यावर तसं. किंवा एखादी स्त्री चिमुकल्या पोराला थोपटताना असतं ना ते तसलं स्मित. मी गोंधळलोय, हे तिला समजलं असावं असं मला वाटलं. मी अलगद काउंटरवरुन बाजूला झालो...तरंगत.
.
.
बायको शेजारीच होती. काय प्रकार होतोय ; त्याचा तिला अंदाज होताच. बाजूला झाल्यावर मी जरा खजील झाल्यासारखा होतो. बायकोनं सहज कोपरानं टोकलं आणि हल्कासा हिसका देउन पुढे नेलं. बहुतेक "चल्ता है बॉस" असं तिला ते कोपरानं धक्का देउन म्हणायचं असावं.
.
.
मी तरंगतोही आहे, गोम्धळलोही आहे आणि थोडा खजीलही आहे.
.
.
प्रॉब्लेम असाय की शब्द कमी पडताहेत. एखादी गोष्ट कितीही छान असली, तरी किती छान म्हणता यावं, ह्यावर आम आदमीला मर्यादा येतात.विशेषण्म फारशी आठवत नाहित नि सुचतही नाहित चटकन. तुम्ही सेशेल्स, लक्षद्वीप अशा एकाहून एक भारी ठिकाणी गेलात, अगदि जिथे फार कमी दाटी आहे, आणि एकदम स्वच्छता आहे; तर त्या ठिकाणांचं वर्णन करताना "निळाशार समुद्र" इतकच करावं लागतं. तो प्रकार नक्की किती मधाळ, मायावी, हरखून जावा असा आहे; हे प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजतं. तो स्वर्गीय अनुभव असतो.
.
.
अगदि फक्कड जमलेल्या पुरणाच्या पोळीलाही फक्त "गोड" म्हटलं तर तो त्या पोळीचा अपमान असायला हवा. नुसतीच गोड चव घ्यायची असेल तर माणूस चमचाभर साखर खाउन खुश होइल. पण पुरणाच्या पोळीत त्या चमचाभर साखरेच्या गोडव्याहून जास्त काहीतरी असतं. तो साखरेचा/गुळाचा गोडवा, हा एकूण चवीचा फक्त एक सबसेट/भाग असतो.
.
.
शब्द खूप कमी पडतात राव.
मी आत्ता तरंगतोही आहे, गोम्धळलोही आहे आणि थोडा खजीलही आहे.

मराठी कथालेखक's picture

26 Apr 2016 - 7:46 pm | मराठी कथालेखक

नॅचरल्स शेजारी गणेश भेळ ? म्हणजे प्राधिकरणातले भेळ चौक , हो ना ? जायला पाहिजे एकदा :)
अजून आहे का ती सुंदरी तिथेच ?

बाकी मलाही अलिकडेच काही महिन्यांपुर्वी असा मस्त अनुभव आला icicidirect च्या माझ्या RM (relationship manager) ने मला भेटायचं आहे म्हणून फोन केला. मी घरचा पत्ता दिला, ती एका पुरुष सहकार्‍यासोबत आली (हे अपेक्षितच होतं) पण ती तिशितली एक अत्यंत सुंदर होती (होती म्हणायच कारण आता तिने icicidirect सोडली). तुमच्या नॅचरल सुंदरीपेक्षा कमीच असेल म्हणा , म्हणून सविस्तर वर्णन नाहि करत.
पुढे आणखी दोन वेळा एकटीच आली. इतक्या सुंदर तरुणी एकट्याच एखाद्या ग्राहकाच्या घरी जायला कशा धजावतात कोण जाणे.
सुमारे तीन वर्षापुर्वी अशीच घरी एक अगदी तरूण (बावीस-तेवीसची) अतिशय सुंदर तरुणी एअरटेल चा कसलासा इंटरनेट प्लान विकायला आली होती. प्लान अगदीच बकवास होता नाहितर नक्कीच घेतलाही असता :)

मन१'s picture

26 Apr 2016 - 7:57 pm | मन१

यप्स . भेळ चौकच.
बाकी icicidirect , एअरटेल बद्दल -- :)

रेवती's picture

26 Apr 2016 - 8:46 pm | रेवती

असू द्या, असू द्या.........खजील होताय म्हणून चाम्गल्या अर्थी हसू आले.
कोणतीही स्त्री किंवा पुरुष सुंदर्/ह्यांडसम असायला हरकत नाही (आम्ही कोण हरकत घेणारे?) व त्यांच्याकडे सारखं लक्ष (जिथे जायला हवं तिथे) जायलाही हरकत नाही, आपला नवरा किंवा बायको एखाद्या सौंदर्याला दाद देतोय/ देतिये हे जोडीदाराच्या लक्षात यायलाही हरकत नाही पण म्हणून जोडीदारानेच मनातले कित्ती कित्ती ओळखले हे डोळे मिचकावून, किंवा हलकासा धक्का मारून किंवा हसून जाणवून देणे (खेळीमेळीतच) आणि जवळ बोलावून अंगप्रत्यंगाबद्दल उल्लेख करणे हा यातील सूक्ष्म फरक आहे. माझ्या नवर्‍याला एखादी बाई, हिरवीन आवडली तर लग्गेच भांडणे करण्याची जरुरी नाही, अगदी डोळे किती बोलके आहेत किंवा केस सुंदर आहेत असे म्हणणे वेगळे आणि वर उल्लेख केलेली गोष्ट म्हणणे वेगळे.
माझीही एक ओळखीची भारतीय महिला अतिसुंदर आहे. त्या फ्यामिलीची आणि कोणाची घनदाट मैत्री होऊ शकेल का? हा प्रश्न पडण्याइतकी सुंदर आहे. त्यांच्या घरात लावलेले लग्नातले तिचे फोटू हे जीवघेणे आहेत. पण म्हणून मी तिच्या शरिराचे वर्णन करणे योग्य आहे का? तिची फिगर सुरेख आहे असे म्हणणे योग्य आहे का? जे आहे ते दिसतेय, बोलून दाखवण्याने काय वेगळे होणारे? मला तर कसेसेच वाटले असते.

वपाडाव's picture

27 Apr 2016 - 10:44 am | वपाडाव

अगं आजकाल चालत असेल गं...
मी तर खुअशाल सांगत अस्तो...
माझ्या हपिसात्ल्या पोरींना... ती तुझ्यापेक्शा चांगलिइ दिसत आहे... किंवा आज तुझा ड्रेस छान आहे वेग्रे वेग्रे... त्यासाठी मुलीपण तितक्याच स्पोर्टी असायला हव्यात

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2016 - 1:31 pm | पिलीयन रायडर

पण तितकंच बोलत असशील रं दादा.. जास्त तपशीलात शिरलास तर र्‍हाशिल का?!! ;)

रेवाक्का म्हणतेय तसंच.. अमुक छान दिसते वगैरे म्हणण्यात आणि अजुन खोलात जाण्यात "सुक्ष्म" फरक आहे!

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 11:30 am | मराठी कथालेखक

डोळे , केस हे शरीराचे भाग आहेत आणि त्यांच्या सौंदर्याचे कौतुक होवू शकते तर इतर भागांचे का नाही ? :)

सभ्यतेचे आणि सुसंस्कृततेचे संकेत पाळून कशाचेही कौतुक करा ना ! सर्व जण अगत्याने साथ देतील.

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 3:17 pm | कानडाऊ योगेशु

मिस वर्ल्ड/युनिवर्स सारख्या तत्सम स्पर्धात एक बिकिनी राऊंड ही असतो आणि त्यात प्रत्येक स्पर्धकाच्या फिगर्स चे आकडे दाखवले जातात. ऐश्वर्या/सुश्मिता जेव्हा ह्या स्पर्ध जिंकल्या तेव्हा घराघरात हा प्रोग्रॅम कौतुकाने पाहीला गेला होता आणि ह्या राऊंड मध्ये त्या आकड्यांचे अ‍ॅनालिसिस हे केले जात होते व फिगर चे रेटींगही दिले जात होते.तेव्हा तो प्रकार कोणालाच असभ्य अथवा असंस्कृत वाटला नाही.

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 3:34 pm | मराठी कथालेखक

सभ्यतेचे निकष बदलतात.
कधी एखाद्या सुंदर मुलीला "छान/सुंदर दिसतेयस" इतकंही म्हणता येत नाही कारण संबंध तितके अनौपचारिक नसतात. आणि औपचारिक संबंधात असे म्हणणे आपल्याकडे सभ्यतेचे समजले जात नाहीत. दुसर्‍या कुठल्या संस्कृतीत ते सभ्यतेचे समजले जातही असेल.

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 3:52 pm | कानडाऊ योगेशु

अगदी अगदी.
कंपनीमध्ये एक सुंदर दिसणारी कलिग आहे.चांगली मैत्री आहे पण संबंध फक्त व्यवसायापुरतेच असल्याने तिला कधी तू फार सुंदर आहे असे म्हणालो नाही.पण एका ट्रॅडिशनल डे च्या वेळेला साडी नेसुन आली व इतर वेळी पाळत असलेल्या औपचारिकतेला टाळुन मला विचारले कशी दिसते आहे मी? अर्थात हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात व इतर बाकीचे कलिग असतानाच विचारले. तेव्हा मी ही फार सुंदर दिसते आहेस बाहेर जाऊ नकोस ट्रेफिक जाम करशील असे म्हणालो.तिनेही ते खेळकरपणे घेतले व इतरांनीही.(अर्थात त्यावेळच्या त्या मूडमध्ये असेच अनौपचारिक उत्तर अपेक्षित होते.) पण नंतर पुन्हा नेहेमीसारखे व्यावसायिक औपचारिकता पाळु लागलो.

एखादा उपक्रम जाहीरपणे होतो म्हणजे तो सभ्यतेच्या/सुसंस्कृततेच्या निकषांना धरून आहे हे सिद्ध होते का ?
सौंदर्यस्पर्धा किंवा एकूण पुरुषप्रधान संस्कृतीत जे जे उपक्रम चालतात ते सर्व सभ्य आणि वेल-कल्चर्ड आहेत असे म्हणत असाल तर उत्तर देण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न सौदर्याचा नसून त्याचे जाहीर प्रदर्शन.चर्चा करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मान्यतेचा आहे.
एखादी सिने-तारका अंगप्रदर्शन करत असेल तरी इतर एखाद्या सुसंस्कृत स्त्रीला ते अपमानास्पदही वाटत असेल. म्हणून, परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या अपरोक्ष पुरुषानेच नव्हे, तर स्त्रीनेसुद्धा मोजणे हे चूक आहे.

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 4:08 pm | मराठी कथालेखक

परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या अपरोक्ष पुरुषानेच नव्हे, तर स्त्रीनेसुद्धा मोजणे हे चूक आहे

ओके.
म्हणजे "कसला उंच आहे तो. पाच दहा तरी असेल ना?" "छे ग.. पुर्ण सहा फुटच असेल"
असा संवाद पण सभ्यतेच्या निकषांत न बसणारा व्हावा.

सस्नेह's picture

27 Apr 2016 - 4:12 pm | सस्नेह

वरच्या कवितेत उंची का मोजली आहे त्या सुंदरीची ?
मला वाटलं.... =))

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 4:21 pm | मराठी कथालेखक

उंची हे ही एक मापच आहे ना ?

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2016 - 4:59 pm | पिलीयन रायडर

अहो जगात सभतेचे काय निकष आहेत आणि कोणकोणत्या अवयवांची मापे आणि वर्णने चर्चिली जाउ शकतात हा विषय नाहीच्चे!!

बायको फार तर सुंदर मुलगी दाखवेल. स्वतःची तिची मापं काढुन दाखवणार नाही नवर्‍याला. आता वर तेच बोलताएत ना की बायका मुळात तसं पहातच नाहीत. म्हणुन तर स्नेहाताई म्हणतेय की बायको कशी वागेल ह्याची कल्पना पण पुरुष आपल्या कल्पनेप्रमाणेच करत आहेत. बायका दुसर्‍या बायकांना खास "नवर्‍यानी पहावं" म्हणुन वाकायला लावत नसतात. कोणतीही टिपीकल बायको नवर्‍याला "ह्या" गोष्टी दाखवत नसते.. एक पाऊल पुढे जाउन असंही म्हणु शकतो की बघु सुद्धा देत नसते.. पोएटीक लिबर्टी ठिक आहे.. पण हे जरा जास्तच झालं.. तुम्ही खरंच जाऊन आपापल्या बायकोला विचारा सगळे की ती असं करेल का.. ट्राय!

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 5:23 pm | कानडाऊ योगेशु

बायका दुसर्‍या बायकांना खास "नवर्‍यानी पहावं" म्हणुन वाकायला लावत नसतात. कोणतीही टिपीकल बायको नवर्‍याला "ह्या" गोष्टी दाखवत नसते.. एक पाऊल पुढे जाउन असंही म्हणु शकतो की बघु सुद्धा देत नसते.. पोएटीक लिबर्टी ठिक आहे.

.

वाकायला लावणे हा नायकाचा गैरसमज आहे. (इंफरंस हा शब्द ठिक आहे.) तिने तिला मुद्दामुन वाकायला ह्यासाठी लावले कि नवरा प्रीडायबेटीक आहे हे तिच्याव्यतिरिक्त अजुन कुणाला ऐकायला येऊ नये. पण नायकाने त्याचा "मुद्दामुन माझ्यासाठी केले" असा सोयिस्कर अर्थ काढला.

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 5:26 pm | मराठी कथालेखक

अहो वर कुणीतरी 'हे योग्य आहे का ?" अशी तात्विक चर्चा चालू केली होती.

पण म्हणून मी तिच्या शरिराचे वर्णन करणे योग्य आहे का? तिची फिगर सुरेख आहे असे म्हणणे योग्य आहे का? जे आहे ते दिसतेय, बोलून दाखवण्याने काय वेगळे होणारे? मला तर कसेसेच वाटले असते.

मग तीवर काथ्या कुटून झाला.
बाकी घरी आपापल्या बायकांना विचारण्यात काय अर्थ आहे, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही पाहात राहतोच :)
हो पण कधी कधी बायकोचा सपोर्ट मिळतो बरे .. म्हणजे पाहण्यापलिकडे गाडी जाणार नाही , मुख्य म्हणजे समोरुन सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही याची खात्री असते तेव्हा.
उदा: आमच्या सोसायटीत एक सुंदर स्त्री आहे (अतिशय सुंदर नाही..फक्त सुंदर) ,मला ती सुंदर वाटते , आवडते हे बायकोला माहित आहेच. त्या स्त्रीने एकदा बायकोला घरगुती कार्यक्रमाला बोलावले, तेव्हा ती बरीच सजली होती. बायकोने तेव्हा तिचा फोटो काढला , मलाही पाठवला :)
तसेच या स्त्रीचे एक कपड्याचे दुकान आहे म्हणून आम्ही दोघे (बायको आणि मी) बायकोसाठी काही कपडे घ्यायला तिथे गेलो.. अर्थात तिच्याकडचे महागडे कपडे (ते ही नेहमीप्रमाणे घासाघीस न करता) घेवून बायकोने केलेली मदत वसूल केली :(

ईश्वरसर्वसाक्षी's picture

27 Apr 2016 - 5:43 pm | ईश्वरसर्वसाक्षी

बायकोने तेव्हा तिचा फोटो काढला , मलाही पाठवला :)

ज्जे ब्बात :)

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 5:32 pm | कानडाऊ योगेशु

पण हे जरा जास्तच झालं.. तुम्ही खरंच जाऊन आपापल्या बायकोला विचारा सगळे की ती असं करेल का.. ट्राय!

बायकोलाच असे नाही पण आजकाल सर्रास कित्येक स्त्रियांना कर्व आणि क्लिवेजेस ह्या टर्मिनोलॉजित बोलताना ऐकले आहे. इन फॅक्ट काही टी.वी चॅनेल्स वरही काही नायिकेबाबतच्या चर्चेत शी हॅज द मोस्ट ब्युटीफुल कर्व्स आणि क्लिवेजेस इन द इंडस्ट्री असे ऐकल्याचेही आठवते. माझ्यामते तुम्ही म्हणता तितकासा हा अब्राम्हण्यम प्रकार नसावा.

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 5:14 pm | कानडाऊ योगेशु

परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या अपरोक्ष पुरुषानेच नव्हे, तर स्त्रीनेसुद्धा मोजणे हे चूक आहे

ओक्के. समजा कवितेतले नायक नायिका तुम्ही दोघे आहात. आणि समोरून किंगफिशर कॅलेंडर गर्ल्स मधली एखादी मादक नवयौवना ( कंट्रोल कानडाऊ कंट्रोल.. रच्याकने. हा शब्द तरी वापरायला हरकत नसावी.) हवाईसुंदरी म्हणुन आली. समजा आमचे भाओजी अगदीच ह्याss म्हणजे ह्याs नाही आहेत.(ह्याss म्हणजे समोरून अशी एखादी मुलगी येते आहे आणि ते थांबलेल्या विमातातुन पंख्यासाईडच्या विंडोमधुन खाली पाहत आहेत.) आणि तुम्हाला हे माहीती आहे म्हणजे तुमचे हे नक्की ह्याss नाही आहेत. तर तुम्हाला स्त्रीसुलभ टेम्प्टेशन प्रमाणे भाओजींना काहीतरी सांगायचेच आहे.अगदी मस्ट.तर काय सांगाल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हवाई जहाज शुरु होने से पहले अपनी कुर्सी कि पेटी बांधके रखो!"
(कृ.ह.घ्या. पी.जे करण्याचा मोह नाही टाळता आला.)

सस्नेह's picture

27 Apr 2016 - 5:23 pm | सस्नेह

=))

रातराणी's picture

27 Apr 2016 - 12:31 am | रातराणी

प्रतिसाद आवडला!

चंद्रनील मुल्हेरकर's picture

27 Apr 2016 - 2:41 pm | चंद्रनील मुल्हेरकर

अवांतरः- आम्ही जसं नवर्यांना सुंदर मुली दाखवतो तसं नवरे
लोक्स बायकोला चिकणे पुरुष दाखवतात का? माझा नवरा
दाखवत नाही म्हणुन विचारते..

निसर्गाने gene spreading चे काम फक्त पुरुषांकडे दिलेले आहे,या बाबतीत स्त्रीया फक्त अपत्य जन्माला घालणे या पुरत्याच असतात.निसर्गाने स्त्रीला फ्लर्ट करणे ,पुरुषाकड् आकर्षीत होणे ह्या बाबतीत इनर्ट ठेवले आहे .सुंदर मुलीकडे स्त्रीकडे बघण्याचा लाळगाळूपणा फक्त पुरुषच करु शकतात.उत्क्रांतीने पुरुषांना तसे बनवले आहे.स्त्रीया मात्र जनरली सेक्सुअली इनर्ट असतात.त्यामुळेच त्या पुरुषांकडे बघत नाहीत ,पण पुरुष मात्र सुंदर स्त्रीकडे रोखून बघतात.

पथिक's picture

27 Apr 2016 - 2:52 pm | पथिक

+१

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2016 - 3:05 pm | पिलीयन रायडर

पुरुष स्त्रियांकडे बघतात अगदी तितकं आणि तेवढं नसलं तरी बायकाही पुरुषांकडे बघतात ;)

पण येस.. पुरुष जसल्या इटेन्सिटीने बघतात.. तेवढा जीव ओतुन निश्चितच नाही!!

चंद्रनील मुल्हेरकर's picture

27 Apr 2016 - 3:13 pm | चंद्रनील मुल्हेरकर

ती इंटेन्सीटी म्हणजे फक्त वासना असते ,असली अघोरी कामवासना स्त्रीयांना मिळाली नाही हे आपले नशीबच ,नाहीतर वासनेचा हैदोस सगळीकडे पाहायला मिळाला असता.निसर्गाने स्त्रीयांना सेक्सुअली इनर्ट ठेवले आहे त्यामुळेच विवाहसंस्था,मुलांचे संगोपन इत्यादी गोष्टी टीकून आहेत.

स्पा's picture

27 Apr 2016 - 3:14 pm | स्पा

वासनेचा हैदोस

=))

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 3:45 pm | विजय पुरोहित

शृंगारपुरे सरांचे लेखन आठवले...

गणामास्तर's picture

27 Apr 2016 - 3:57 pm | गणामास्तर

मला डॉ.श्रीराम दिवटे आठवले :)

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 3:41 pm | मराठी कथालेखक

निसर्गाने स्त्रीयांना सेक्सुअली इनर्ट ठेवले आहे त्यामुळेच विवाहसंस्था,मुलांचे संगोपन इत्यादी गोष्टी टीकून आहेत.

मुख्य म्हणजे लोकसंख्या आटोक्यात आहे :)

पण तरीही स्त्रिया अगदी 'इनर्ट' असतात हे अमान्य. फक्त तीव्रता कमी असते इतकंच. खेरीज स्त्रियांची कामेच्छा बहुधा भावनिकतेशी बांधलेली असल्याने ज्या पुरुषांवर प्रेम आहे बहुतेकरुन त्याच्याबद्दलच स्त्रियांना उत्कट आकर्षण असते. इतर पुरुष आकर्षक वाटले तरी त्या आकर्षणात उत्कटता सहसा नसते.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

27 Apr 2016 - 5:10 pm | चंद्रनील मुल्हेरकर

@मराठी कथालेखक ,स्त्रीया या बाबतीत इनर्ट् असतात हे मी अनेक स्त्रीयांकडूनच ऐकलेले आहेत,आमच्या कॉलेजमध्ये असताना मुली म्हणायच्या की तुम्ही पुरुष ईतके डोळे फाडून काय बघत असता? यावर आम्ही म्हणायचो ,तुम्हीही एखादा देखण्या पुरुषांकडे डोळे फाडून बघा,त्यावर मुली म्हणायच्या ," आम्हाला असली घाणेरडी सवय नसते.यावरुन काय अर्थ घ्यायचा? नंतर मला आलेल्या अनुभवातूनही हे मत बनत गेले की स्त्रीयांना पुरुषाच्या एक ट्क्काही सेक्सुअलीट इंटरेस्ट नसतो,त्यांचे आकर्षंण पुरुष कीती कमावतो,आपल्याला प्रोव्हाईड करु शकतो या बाबतीत असते,अनेक सुंदर स्त्रीया अत्यंत खराब दिसणार्या पुरुषांशीच लग्न करतात यावरुन सेक्सुअलीटी ऐवजी पुरुषाच्या खिश्याकडे त्या आकर्षीत होतात हे सत्य आहे.

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 5:38 pm | मराठी कथालेखक

त्यावर मुली म्हणायच्या ," आम्हाला असली घाणेरडी सवय नसते

मुली मुलांकडे फारशा बघत नाहीत हे एक वेळ मी मान्य करतो, पण याचा अर्थ आकर्षण नसतेच असे नाही. एक तर ते असून दाखवायचे नसते, किंवा मनात नानाविध भिती असतात.

त्यांचे आकर्षंण पुरुष कीती कमावतो,आपल्याला प्रोव्हाईड करु शकतो या बाबतीत असते,

मोठाच गैरसमज झाला आहे तुमचा. असं असत तर कधीच एखाद्या श्रीमंत मुलीने गरीब (वा कमी श्रीमंत) मुलाशी लग्न केले नसते.
स्वतः सहा आकडी पगार कमवणार्‍या मुली मुलात काय बघतात ?
याउलट काही वेळेस चांगले करियर असूनही देखणेपणाचा अभाव असल्याने (खासकरुन कमी उंची मुळे) मुलांना लग्नासाठी सुंदर मुलगी मिळत नाही असे अनेकदा पाहिले गेले आहे आणि उंच , देखण्या , रुबाबदार मुलाला सुंदर व श्रीमंत मुलीही पसंत करतात. त्यातून तो मुलगा बोलण्यात स्मार्ट असेल, मुलींना आवडेल असं काही बोलण्यात पटाईत असेल तर अशा मुलाला चुटकीसरशी मुली पटतात.

टवाळ कार्टा's picture

14 May 2016 - 6:51 pm | टवाळ कार्टा

स्वतः सहा आकडी पगार कमवणार्‍या मुली मुलात काय बघतात ?

सातवा आकडा

पथिक's picture

16 May 2016 - 12:26 pm | पथिक

लोल

वपाडाव's picture

27 Apr 2016 - 5:39 pm | वपाडाव

अनेक सुंदर स्त्रीया अत्यंत खराब दिसणार्या पुरुषांशीच लग्न करतात यावरुन सेक्सुअलीटी ऐवजी पुरुषाच्या खिश्याकडे त्या आकर्षीत होतात

अगदी सर्व स्त्रिया अशा नसतही असतील. माझ्या मयतरीणी तरी अशा नाहीत (मोस्ट ऑफ देम - ९०%).
मुलींना नवरा (कमीत कमी) रुबाबदार तरी हवा. Haute नस्ला एक वेळ तरी चालेल.

वपाडाव's picture

27 Apr 2016 - 3:59 pm | वपाडाव

सुंदर मुलीकडे/स्त्रीकडे बघण्याचा लाळगाळूपणा फक्त पुरुषच करु शकतात. उत्क्रांतीने पुरुषांना तसे बनवले आहे.

कित्येक झैरातींमधली कुत्री ड्वळ्यासमोर तरळुन गेली...
आम्ही मराठवाड्यातील असल्याने इतका माज (लाळगाळूपणा) करु शकत नाही...

अभ्या..'s picture

27 Apr 2016 - 4:27 pm | अभ्या..

वप्या लेका. तूच रे जिगर.

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2016 - 5:02 pm | पिलीयन रायडर

आम्ही मराठवाड्यातील असल्याने इतका माज (लाळगाळूपणा) करु शकत नाही...

मान्य!! हे माझेही निरीक्षण आहे की मराठवाड्यातली पोरं पोरींना लाजाळु वाटतील एकवेळ पण लाळघोटेपणा करताना कधी दिसत नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2016 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेला इतके कसे प्रतिसाद आले म्हणून बघायला आलो तर नेहमीचेच कलाकार दिसले, छान चालू द्या. :)

-दिलीप बिरुटे

नेहमीचेच ______ कलाकार दिसले

यशस्वी शब्द राहिला ;)

नाखु's picture

27 Apr 2016 - 5:07 pm | नाखु

माहीती झाली..

(उगा) अंगावर घेऊन दंगा करणे

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Apr 2016 - 5:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

कविता म्हणुन किंवा कल्पनारंजन म्हणुन ठिक आहे.

माझ्या विमान प्रवासांच्या अनुभवा मध्ये अशा प्रकारचे पोशाख घातालेल्या हवाई सुंदर्या कधीच पहाण्यात आल्या नाहीत.

त्यांचे प्रवाश्यांबरोबरचे वागणे देखील सभ्य सुसंस्कृत आणि मर्यादेच्या सर्व निकशांमधे बसणारे असते.

पैजारबुवा

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 5:39 pm | मराठी कथालेखक

किंगफिशर बंद झाली हो :)

वपाडाव's picture

27 Apr 2016 - 6:10 pm | वपाडाव

मी जर एखादी विमानकंपनी सुरु केली तर "राम तेरी गंगा मैली" सिनेमातल्या "मंदाकिनी" सारखा पोशाख परिधान करण्यास देईन.

वैभव जाधव's picture

27 Apr 2016 - 6:17 pm | वैभव जाधव

बाकी सगळं जाऊ दे हा
'उन्न्त'
शब्द कसा लिहिला?

लिहायला जमला नाही, म्हणून कॉपी पेस्ट केला आहे.

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 6:19 pm | विजय पुरोहित

u+n+n+t
असे टाईप करा...

वैभव जाधव's picture

27 Apr 2016 - 6:27 pm | वैभव जाधव

उंट येतोय. असो! बदलीन.

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 6:53 pm | मराठी कथालेखक

उन्नत (unnat)
( Ö Ö )

:)

ईश्वरसर्वसाक्षी's picture

27 Apr 2016 - 6:36 pm | ईश्वरसर्वसाक्षी

उंट येतोय :)