शक्तिपात

एच्टूओ's picture
एच्टूओ in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 2:57 pm

फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड
डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी
मी डॉक्टरकडे गेल्यावर
अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा

खदाखदा हसला डॉक्टर
आणि बाहेर घेऊन गेला मला
तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य
जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये
हवा भरलेल्या फुग्यासारखा
आभाळभर मेंदूच-
लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट
तरीही जड वाटेना मला.

अचनाक फुटून मेंदू
त्यातून वहायला लागले लोंढ्यासारखे
सगळे इझम्स,वाद,मंडन,खंडन,
तण्डन,तत्व,धर्म,बीर्म,कर्म,
वर्म,मर्म,इत्यादि इत्यादि -काळ्याशार रंगाचे
जुनाट गटारयुक्त दर्पावासाचे

त्या दर्पाने मळमळून मी ओकलो रक्त
पण डॉक्टर हसतोय खदाखदा वेड्यासारखा

मी चिडून बोलण्याचा प्रयत्न केला,
पण बोलता येतय कुठे?
अगतिकतेने  ओकत राहिलो रक्त अविरत
आणि डॉक्टर पोहत-वाहत राहिला
रक्त आणि गटारांच्या संमिश्र द्रवात.

मेंदू अजून वाढतोच आहे
आता मात्र जाणवतय ओझ
डॉक्टर मात्र केव्हाच गेलाय वाहून

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

30 Mar 2016 - 3:21 pm | विवेक ठाकूर

.

एच्टूओ's picture

30 Mar 2016 - 7:12 pm | एच्टूओ

अगदी अगदी :)

स्पा's picture

30 Mar 2016 - 3:26 pm | स्पा

एकदम फर्मास

त्रास समजून घेतल्याबद्दल खूप खूप आभार !

भाऊंचे भाऊ's picture

30 Mar 2016 - 5:02 pm | भाऊंचे भाऊ

वाटत आहे...! ते समर्थ कुठे दिसत नाहित किंतु ?

एच्टूओ's picture

30 Mar 2016 - 7:15 pm | एच्टूओ

संदर्भ समजला नाही. थोडं विस्ताराने समजावू शकाल का ?

lgodbole's picture

30 Mar 2016 - 10:29 pm | lgodbole

छान

एच्टूओ's picture

31 Mar 2016 - 2:18 pm | एच्टूओ

धन्यवाद :)

वेल्लाभट's picture

31 Mar 2016 - 10:39 am | वेल्लाभट

माझ्या आकलनक्षमतेचे संकुचित रस्ते तुडवत
अगम्यतेचे भाले घेऊन
हे काव्य माझ्या मेंदूच्या झोपडीत घुसलं
एखाद्या श्वापदासारखं
आणि विचारांच्या प्रचंड गदारोळातून घुरासारखा बाहेर पडला....
प्रतिसाद!

एच्टूओ's picture

31 Mar 2016 - 2:17 pm | एच्टूओ

:)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

31 Mar 2016 - 2:36 pm | मम्बाजी सर्वज्ञ

भेजा फ्राय!

एच्टूओ's picture

31 Mar 2016 - 5:59 pm | एच्टूओ

:)