अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
9 Mar 2016 - 10:51 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन.

तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे.

मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन.

क.लो.अ
गॅरी ट्रुमन

यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक

प्रतिक्रिया

मंगळवार ८ मार्च रोजी दोन्ही पक्षांच्या मिशिगन आणि मिसिसीपी राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या. तर रिपब्लिकन पक्षाची आयडॅहो आणि हवाईमध्ये प्रायमरी झाली.

या प्रायमरीचा सगळ्यात अनपेक्षित निकाल मिशिगनमध्ये डेमॉक्रॅटिक प्रायमरीचा लागला आहे.सर्व जनमतचाचण्यांमध्ये हिलरी क्लिंटन आरामात जिंकणार असे कल आले होते.पण प्रत्यक्षात बर्नी सँडर्स यांनी सुमारे २% मते अधिक घेऊन ही प्रायमरी जिंकली. असे म्हटले जात आहे की बिल क्लिंटन अध्यक्ष असताना त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोबरोबर North American Free Trade Agreement केले होते.त्यामुळे अमेरिकेत जो थोडाफार मॅन्युफॅक्चरींगचा बेस मिशिगन-ओहायोमध्ये होता त्याला धक्का लागला.त्याचा तोटा हिलरींना होताना दिसला.तसेच हिलरींनी केवळ डिट्रॉईटमध्येच प्रचार केला पण बर्नी सँडर्स यांनी मिशिगनच्या इतर भागांमध्येही सभा घेतल्या.एकेकाळी जगाची Automobile Capital असलेल्या डिट्रॉईट आणि डिअरबॉर्नमध्ये हिलरींना मोठी आघाडी मिळाली आहे. कदाचित या भागात पूर्वी नोकरीला असलेले कर्मचारी आता डिट्रॉईटमध्ये राहात नाहीत त्यामुळे त्यांच्या मतांचा फटका हिलरींना खुद्द डिट्रॉईट आणि डिअरबॉर्नमध्ये न बसता राज्याच्या इतर भागात बसला. तसेच डिट्रॉईटमध्ये आफ्रिकन अमेरिकनची संख्या लक्षणीय आहे.हे मतदार हिलरींचे समर्थक आहेत त्याचाही फायदा हिलरींना त्या भागात होताना दिसत आहे.

भाप्रवे सकाळी सी.एन.एन वर बघितले की मिशिगनमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांचा तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांचा विजय होणे हे डेमॉक्रॅटिक पक्षासाठी फार चांगले लक्षण नाही.हे दोन्ही उमेदवार फ्री-ट्रेडच्या विरोधात आहेत.जर या कारणामुळे हे मतदार अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह उमेदवारांना मत देत असतील तर त्याचे परिणाम देशाच्या इतर भागात (विशेषतः कॅलिफॉर्निया आणि न्यू यॉर्क या परदेशी लोकांची संख्या लक्षणीय असलेल्या भागात) बघायला मिळतील.विशेषत: हिलरी विरूध्द ट्रम्प ही लढत असेल तर या दोन महत्वाच्या राज्यांमधून फ्री-ट्रेडची झळ बसलेले मतदार ट्रम्पच्या दिशेने झुकतील ही शक्यता आहेच.

आतापर्यंत लागलेले निकाल पुढीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

    
  रिपब्लिकन पक्ष  
 मिसिसीपीमिशिगनआयडॅहोआतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प242510446
टेड क्रुझ131714347
मार्को रूबिओ000151
जॉन कॅसिक017054
इतर00015
एकूण3759241013
     
  डेमॉक्रॅटिक पक्ष  
 मिसिसीपीमिशिगन आतापर्यंत
हिलरी क्लिंटन2958 1221
बर्नी सँडर्स465 571
एकूण33123 1792

तर डेमॉक्रॅटिक पक्षात पुढील चित्र आहे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण
हिलरी क्लिंटन4617601221
बर्नी सँडर्स25546571
एकूण48613061792

रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांची घोडदौड थांबविण्यात टेड क्रुझ यांना या प्रायमरीमध्ये अपयश आले.जॉन कॅसिक यांची कामगिरी या प्रायमरीमध्येही निराशाजनकच राहिली.मिशिगन हे त्यांच्या ओहायोच्या शेजारचेच राज्य असल्यामुळे मिशिगनमधून त्यांची कामगिरी त्या मानाने चांगली होईल अशी अपेक्षा होती.पण तसे झालेले नाही.

रिपब्लिकन पक्षाच्या कॉकसेसमध्ये हवाईमध्ये भाप्रवे प्रमाणे मतदान उशीरापर्यंत चालू होते (मिशिगन आणि हवाईच्या स्थानिक वेळेत ५ तासांचा फरक आहे).मतमोजणी सुरू झाली आहे.आतापर्यंत ८% मते मोजून झाली आहेत. त्यात डॉनल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. तिथले निकाल आले की पोस्ट करेनच.

गॅरी ट्रुमन's picture

9 Mar 2016 - 6:27 pm | गॅरी ट्रुमन

हवाई कॉकसेसचा निकाल हाती आला आहे.

हवाईमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी ४२.४% मते घेऊन १० प्रतिनिधी तर टेड क्रुझ यांनी ३२.७% मते घेऊन ६ प्रतिनिधी मिळवले आहेत. मार्को रूबिओ आणि जॉन कॅसिक यांचा या राज्यातही फारसा प्रभाव दिसलेला नाही.

भाप्रवे सकाळी रिपब्लिकन पक्षातील प्रतिनिधींचे आकडे पोस्ट केले होते.त्यानंतर हवाईमधील कॉकसेसचे निकाल हाती आले. बहुदा मधल्या काळात अनबाऊंड डेलिगेटमध्ये (डेमॉक्रॅटिक पक्षातील सुपरडेलीगेटना समकक्ष) काही बदल झाले असावेत.सध्याचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत--

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
 आतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प458
टेड क्रुझ359
मार्को रूबिओ151
जॉन कॅसिक54
इतर15
एकूण1037

हुप्प्या's picture

9 Mar 2016 - 10:08 pm | हुप्प्या

हा शब्द मला बुचकळ्यात टाकत आलेला आहे. हा एकवचनी वापरायचा का नाही की कायम अनेकवचनीच? काही लोक त्याचे अनेकवचन कॉकाय असे करतात ते बरोबर आहे का?
हवाईचा कॉकस का हवाईचे कॉकसेस?
अत्यंत विचित्र शब्द आहे हा!

बोका-ए-आझम's picture

9 Mar 2016 - 10:28 pm | बोका-ए-आझम

नुसार Caucuses हा शब्द आहे. काॅकाय म्हटल्यावर Coci हा एका जातीच्या जीवाणूंसाठी वापरला जाणारा शब्द सापडला.

गॅरी ट्रुमन's picture

10 Mar 2016 - 12:18 pm | गॅरी ट्रुमन

कॉकस म्हणजे पक्षाने राज्यात स्वखर्चाने आयोजित केलेले मेळावे. अर्थातच राज्याचा आकार लक्षात घेता हे मेळावे एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आयोजित केले जातात.त्यामुळे अनेकवचनी या अर्थी कॉकसेस असे लिहिले आहे. कॉकाय हा उच्चार ऐकलेला नाही.अमेरिकेत सर्व जगातून लोक येतात आणि प्रत्येक माणूस आपल्या मुळच्या ठिकाणची इंग्रजीची छाप घेऊन येतो.त्यामुळे काही लोक कॉकाय हा उच्चार करत असतीलही. (माझे अमेरिकन विद्यापीठातील अ‍ॅडव्हाजर दक्षिण भारतीय आहेत.ते अमेरिकेत कित्येक वर्षे राहत असूनही 'एम' ला 'यम' आणि 'एन' ला 'यन' आणि 'सर्किट' ला 'सर्क्युट' म्हणतात. असे उच्चार दक्षिण भारतात सर्रास ऐकायला मिळतात).

गॅरी ट्रुमन's picture

12 Mar 2016 - 10:55 pm | गॅरी ट्रुमन

गेल्या काही दिवसांमधील घडामोडी:

१. डॉ. बेन कार्सन यांनी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यापासून माघार घेतली आहे. अर्थातच बेन कार्सन हे रिपब्लिकन पक्षाचे फार आघाडीचे दावेदार आहेत असे नाही त्यामुळे त्यांनी माघार घेतल्यामुळे फार उलथापालथ होईल अशातला भाग नाही. तरीही आणखी एक उमेदवार आता कमी झाला आहे. १५ फेब्रुवारीला महत्वाच्या राज्यांमध्ये प्रायमरी/कॉकसेस झाली की बहुदा जॉन कॅसिक आणि (कदाचित) मार्को रूबिओ हे सुध्दा माघार घेतील आणि शेवटी डॉनल्ड ट्रम्प आणि टेड क्रुझ हे दोन उमेदवार राहतील. बेन कार्सन यांना माघार घेतल्यानंतर डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहिर केला आहे.

२. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांची शुक्रवारी ११ मार्चला मायामी, फ्लॉरीडा येथे चर्चा झाली. एकूणच रिपब्लिकन पक्षाचा क्लायमेट चेंजवर विश्वास नाही. त्या चर्चेतही हेच प्रतिबिंब उमटले. विशेषत: डॉनल्ड ट्रम्प यांचा तर क्लायमेट चेंज या कल्पनेलाच विरोध आहे. जर क्लायमेट चेंजमुळे समुद्राची पातळी वाढली तर फ्लॉरीडा राज्याला विशेषत: मायामीला धोका उत्पन्न होऊ शकतो. नेमक्या त्याच ठिकाणी बोलताना क्लायमेट चेंजविरोधी भूमिका त्यांनी घेणे हे विशेष.

अध्यक्ष बराक ओबामा पुढच्या आठवड्यात क्युबाच्या ऐतिहासिक भेटीवर हॅवानाला रवाना होणार आहेत. ही क्युबाला दिलेली गेल्या ८८ वर्षातील पहिली अमेरिकन अध्यक्षाची भेट असेल. डॉनल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक शैलीला अनुसरून त्यालाही विरोध केला आहे.

३. डॉनल्ड ट्रम्प यांच्या शिकागोमधील सभेच्या वेळी ट्रम्प विरोधक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात हाणामारी झाली आणि त्यातून ट्रम्प यांना आपली सभा रद्द करावी लागली.

आनन्दा's picture

13 Mar 2016 - 11:48 am | आनन्दा

डॉनल्ड ट्रम्प यांच्या शिकागोमधील सभेच्या वेळी ट्रम्प विरोधक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात हाणामारी झाली आणि त्यातून ट्रम्प यांना आपली सभा रद्द करावी लागली.

हे ऐकून जरा गंंमत वाटली.

हुप्प्या's picture

16 Mar 2016 - 2:48 pm | हुप्प्या

रिपब्लिकन लोकांचे असे म्हणणे आहे की हवामान हे नित्य बदलत असते. त्यात नवीन काही नाही. गेली लाखो वर्षे हवामान बदलाची चक्रे फिरत आहेत. अनेक हिमयुगे आली आणि गेली. सध्याचा हवामान बदल हा तसाच आहे. त्यामागे मानवाचे कर्तृत्त्व नाही.

प्रदूषण वगैरे गोष्टींमुळे हवामानावर परिणाम होतो. निदान स्थानिक पातळीवर तरी होतोच. त्याबाबतीत अमेरिकेने प्रयत्न करुन परिस्थिती सुधारली आहे. वाहने जास्त स्वच्छ, कमी प्रदूषण करणारी बनवली आहेत. मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. ह्या आणि अशा देशांच्या चुकीची शिक्षा अमेरिकेला का?

जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. आणि एवढे करुन समुद्राची पातळी न वाढण्याची खात्री कोण देणार?

म्हणून आमचा त्याला विरोध आहे असे रिपब्लिकन मत आहे.

निशदे's picture

16 Mar 2016 - 11:02 pm | निशदे

<< मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. >>
याला काही विदा आहे का? मी आजपर्यंत जितके वाचले आहे त्यात चीन काही बाबतीत अमेरिकेच्या पुढे असला (total emissions) तरी अमेरिका अनेक बाबतीत आघाडीवर आहे(emissions per capita). भारत यात पहिल्या तिनातही(अजून तरी) नाही.
<<जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. आणि एवढे करुन समुद्राची पातळी न वाढण्याची खात्री कोण देणार? >>
याबाबतीत अंशतः सहमत. सरकारचा सहभाग आणखी वाढवणे हा यावरचा मार्ग अर्थातच नाही.

"" मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. ""
याला काही विदा आहे का? मी आजपर्यंत जितके वाचले आहे त्यात चीन काही बाबतीत अमेरिकेच्या पुढे असला (total emissions) तरी अमेरिका अनेक बाबतीत आघाडीवर आहे(emissions per capita). भारत यात पहिल्या तिनातही(अजून तरी) नाही.
"" जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. ""
याबाबतीत अंशतः सहमत. सरकारचा सहभाग आणखी वाढवणे हा यावरचा मार्ग अर्थातच नाही.

बोका-ए-आझम's picture

22 Apr 2016 - 10:01 am | बोका-ए-आझम

वाया गेलेल्या अन्नापासून होणारं प्रदूषण (वाया जाणारी ऊर्जा, नंतर विल्हेवाट लावताना खर्च होणारी ऊर्जा हे सगळं धरून) हे अमेरिका आणि चीनच्या खालोखाल ग्रीनहाऊस वायू वाढवणारा घटक आहे. लिंक मिळाली नाही. हा report कितपत खरा मानायचा ते माहित नाही. पण खुद्द अमेरिकेत अन्न वाया घालवण्याचं प्रमाण बरंच असावं असं वाटतं. आपण प्रदूषण म्हणजे फक्त खनिज किंवा जीवाष्म इंधन जाळण्याने होणारं प्रदूषण जर म्हणत असू, तर ती व्याख्या अजून व्यापक करायला हवी.

१२ मार्चला रिपब्लिकन पक्षाच्या डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबिया (डी.सी) आणि वायोमिंग राज्यात प्रायमरी झाल्या. त्याचे निकाल खालीलप्रमाणे

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 रिपब्लिकन पक्ष 
 डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियावायोमिंग
डॉनल्ड ट्रम्प01
टेड क्रुझ09
मार्को रूबिओ101
जॉन कॅसिक90
इतर00
एकूण1911

डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियामध्ये मार्को रुबिओ आणि जॉन कॅसिक या उमेदवारांना यश मिळाले. एका अर्थी डी.सी ने इतर देशाविरूध्द कौल रिपब्लिकन प्रायमरीमध्ये दिला. अर्थातच डी.सी ने वेगळा कौल द्यायची ही पहिलीच वेळ नाही. इलेक्टोरल कॉलेजमध्ये प्रतिनिधित्व मिळाल्यापासून प्रत्येक वेळी डी.सी ने डेमॉक्रॅटिक पक्षाच्याच उमेदवारांना अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजयी केले आहे-- अगदी १९७२ मध्ये रिचर्ड निक्सन आणि १९८४ मध्ये रोनाल्ड रेगन आणि बर्‍याच अंशी १९८८ मध्ये थोरले जॉर्ज बुश या रिपब्लिकन उमेदवारांना लॅन्डस्लाईड विजय मिळालेला असतानाही.

काल १५ मार्चला इतर काही राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी झाल्या.त्याचे निकाल इथे थोडया वेळात पोस्ट करेन.

बोका-ए-आझम's picture

16 Mar 2016 - 11:32 am | बोका-ए-आझम

दिल्लीने देशाच्या बरोबरीने लोकसभेत आणि एकदम विरूद्ध प्रकारे विधानसभेत कौल दिला. त्याची आठवण झाली हे वाचून.

निशदे's picture

16 Mar 2016 - 11:05 pm | निशदे

with a small difference............
दिल्लीच्या उदाहरणात संपूर्ण रा॑ज्याने मत दिले होते. इथे रिपब्लिकन्सने दिलेल्या मताचे निकाल आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

16 Mar 2016 - 10:57 am | गॅरी ट्रुमन

काल १५ मार्चला फ्लॉरीडा, इलिनॉय, मिसॉरी, नॉर्थ कॅरोलायना आणि ओहायो या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी झाल्या. त्यापैकी मिसॉरी राज्यात रिपब्लिकन प्रायमरीमध्ये जबरदस्त चुरस चालू आहे.हे लिहिताक्षणी डॉनल्ड ट्रम्प ०.१% मतांनी आघाडीवर आहेत. दुसर्‍या क्रमांकावर टेड क्रुझ आहेत. अजूनही काही मते मोजली जायची आहेत.आणि या राज्यात रिपब्लिकन पक्षाचा विजयी उमेदवार सर्व प्रतिनिधी मिळवत असल्यामुळे (विनर टेक्स ऑल) हे राज्य महत्वाचे आहे. इतर राज्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली नाही तरी आतापर्यंत मोजल्या गेलेल्या मतांवरून विविध न्यूज चॅनेल विजयी उमेदवार प्रोजेक्ट करतात.पण मिसॉरीमध्ये अजून कोणत्याही चॅनेलने नक्की कोण विजयी होणार हे प्रोजेक्ट केलेले नाही. तेव्हा तिथली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच निकाल पोस्ट करतो. इतर राज्यांमधील निकाल पुढीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

    
  रिपब्लिकन पक्ष  
 फ्लॉरीडाइलिनॉयनॉर्थ कॅरोलायनाओहायो
डॉनल्ड ट्रम्प9924290
टेड क्रुझ00260
मार्को रूबिओ0050
जॉन कॅसिक00966
इतर0000
एकूण99246966
     
     
  डेमॉक्रॅटिक पक्ष  
 फ्लॉरीडाइलिनॉयनॉर्थ कॅरोलायनाओहायो
हिलरी क्लिंटन124685975
बर्नी सँडर्स60644254
एकूण184132101129

मार्को रुबिओ यांचा त्यांच्याच फ्लॉरीडा राज्यात डॉनल्ड ट्रम्प यांनी पराभव केला.आणि तो पराभव १५% पेक्षा अधिक मतांनी केला. म्हणजे रूबिओ यांना त्यांच्याच राज्यात फारशी लढत देता आलेली दिसत नाही.या पराभवानंतर मार्को रूबिओ यांनी अध्यक्षीय निवडणुकांच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. ओहायोचे गव्हर्नर जॉन कॅसिक यांनी त्यांच्या राज्यात विजय मिळवला आहे.

दोन्ही पक्षांमधील डेलिगेटची आकडेवारी मिसॉरीचे निकाल आल्यानंतर त्याबरोबरच पोस्ट करतो.

गॅरी ट्रुमन's picture

17 Mar 2016 - 6:39 pm | गॅरी ट्रुमन

मिसॉरी राज्यात दोन्ही पक्षांच्या प्रायमरीमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. दोन्ही पक्षांच्या विजयी उमेदवारांनी (डेमॉक्रॅटिक हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन डॉनल्ड ट्रम्प) यांना अगदी थोडक्यात (सुमारे ०.२% मतांनी) विजय मिळाला.

फॉक्स न्यूजने या राज्यातील निकाल खालीलप्रमाणे दिले आहेत (त्याबरोबरच एकूण प्रतिनिधीसंख्याही त्याच कोष्टकात देत आहे)

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8988;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 रिपब्लिकन पक्ष 
 मिसॉरीआतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प25673
टेड क्रुझ5411
मार्को रूबिओ0169
जॉन कॅसिक0143
इतर015
एकूण301411
   
   
 डेमॉक्रॅटिक पक्ष 
 मिसॉरीआतापर्यंत
हिलरी क्लिंटन321606
बर्नी सँडर्स32851
एकूण642457

तर डेमॉक्रॅटिक पक्षात प्रायमरीमधून आलेले डेलिगेट आणि इतर डेलिगेट यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण
हिलरी क्लिंटन46711391606
बर्नी सँडर्स26825851
एकूण49319642457

सध्याची परिस्थिती अशी आहे की डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यांना उमेद्वारी मिळायला फारसे जड जाऊ नये. अजून न्यू यॉर्क आणि कॅलिफॉर्निया या दोन मोठ्या राज्यांमधील प्रायमरी व्हायच्या आहेत.हिलरी स्वत: न्यू यॉर्क राज्यातून सिनेटवरही निवडून गेल्या होत्या आणि कॅलिफॉर्निया गेल्या अनेक निवडणुकांपासून डेमॉक्रॅटिक पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे.या दोन राज्यांमधून हिलरींना मात देणे सँडर्स यांना कठिणच जाईल.

रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांनी आघाडी घेतली असली तरी सध्याचे चित्र असे आहे की ते ५०% डेलिगेटपेक्षा थोडे मागे आहेत. त्यांना ५०% पेक्षा जास्त हक्काची मते मिळणार नसतील तर मात्र रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात मतदान घ्यायची वेळ येऊ शकेल.

विजुभाऊ's picture

17 Mar 2016 - 6:56 pm | विजुभाऊ

हे असे पक्षांतर्गत निवडणूक घेणे कोणत्याच भारतीय राजकीय पक्षांबाबत का होत नाही?

नन्द्या's picture

18 Mar 2016 - 4:46 am | नन्द्या

inenews
हे काय आहे? त्यात कुणि प्रशांत कुमार याने लिहीले आहे की अमेरिकेतील भारतीय, ज्यात हिन्दू बहुसंख्य आहेत, त्यांचा ट्रंप ला पाठिंबा आहे.

भारतातील भारतीयांचे काय मत आहे?

प्रशांत कुमारच्या लेखात काहीतरी गैर वाटते. कारण माझ्या ओळखीचे कुणीच भारतीय किंवा अमेरिकन ट्रंपच्या बाजूचे नाहीत, अगदी रिपब्लिकनसुद्धा. शिवाय अगदी आवर्जून बहुसंख्य हिंदू लिहिण्याची काय गरज?

जो माणूस सरसकट मुसलमान व मेक्सिकन लोकांविरुद्ध आहे, जो एच वन बी व्हिसा मर्यादित करण्याच्या विरोधात आहे, जो आपल्या सभांमधे विरोधकांना ठोसे मारा, हाकलून द्या इ. बोलतो, तो भारतीयांना कसा पसंत असेल? अगदी अमेरिकन सुद्धा या मुद्द्यांशी सहमत नाहीत.

आज मुसलमान, मेक्सिकन उद्या सरसकट चिनी जपानी भारतीय नकोत असे म्हणणार नाही कशावरून? लक्षात ठेवा, त्याने केकेके चा पाठिंबा नको असे म्हंटले पण तो केकेके विरोधी आहे असे स्पष्ट म्हणत नाही!

गॅरी ट्रुमन's picture

18 Mar 2016 - 1:42 pm | गॅरी ट्रुमन

माझे अमेरिकेतील काही मित्र ट्रम्पच्या बाजूचे आहेत आणि काही ट्रम्पच्या विरोधात आहेत.

ट्रम्प आम्ही अमुक करू, तमुक करू वगैरे बोलत असले तरी त्यापैकी किती गोष्टी प्रत्यक्षात करू शकतील हा प्रश्न आहेच. मेक्सिकोबरोबरच्या सीमेवर भिंत बांधू, अमेरिकन उद्योगांना अमेरिकेतच मॅनुफॅक्चरींग करायला सांगू वगैरे गोष्टी बोलायला सोप्या असल्या तरी करायला तितक्याच कठिण होतील. अगदी बराक ओबामाही बंगलोरमध्ये नाही तर बफेलो (न्यू यॉर्क राज्यातील शहर) मध्ये नोकर्‍या आणा असे म्हणालेच होते. त्याला अमेरिकन उद्योगांनीही विरोध केला होताच.

हुप्प्या's picture

19 Mar 2016 - 12:30 am | हुप्प्या

एच १ बी हा व्हिसा वापरून उच्चशिक्षित परदेशस्थ अमेरिकेत येऊन नोकरी करू शकतात. यथावकाश ग्रीन कार्ड मिळवू शकतात. नागरिकही बनू शकतात. ट्रंपने ह्यावर काही काळ बंदी असावी असे मत व्यक्त केले आहे. माझे मत
१. राजकारणी जी आश्वासने देतात विशेषत: प्रचारादरम्यान ती सगळी पाळली जातात असे नाही.
२. ह्या व्हिशाच्या नावाखाली अनेक गैर प्रकार वेळोवेळी उघडकीस आले आहेत त्यामुळे हा मार्ग १००% सोवळा पवित्र नाही.
३. उच्च तंत्रज्ञानावर आधारित अनेक उद्योग अशा बंधनांना विरोध करतील ह्यात शंका नाही. कारण अशा बंदीमुळे ह्या उद्योगांची अडचण होईल. कुठलाही नेता अशा श्रीमंत लोकांना दुखावू इच्छित नाही.
४. ह्या दोन्ही टोकांच्या मधे कुठेतरी उपाय निघू शकेल. ह्या व्हिशावर पूर्ण बंदी न घालता त्यावर जास्त कठोर बंधने येणे शक्य आहे. जसे येणार्‍या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता जास्त तपासली जाणे शक्य आहे. नोकरी देणारा खरोखरच स्थानिक उमेदवार मिळवण्याचा प्रयत्न करतो का ते जास्त काटेकोरपणे तपासले जाईल.

हुप्प्या's picture

18 Mar 2016 - 11:56 pm | हुप्प्या

>> जो माणूस सरसकट मुसलमान व मेक्सिकन लोकांविरुद्ध आहे, जो एच वन बी व्हिसा मर्यादित करण्याच्या विरोधात आहे,

हा अपप्रचार आहे. अत्यंत खोटा आहे. ट्रंप जे बोलला ते फक्त बेकायदेशीररित्या अमेरिकेत शिरणारे (मुख्यत:) मेक्सिकन लोकांविरुद्ध. कायदे पाळून येणार्‍यांविषयी तो काही बोललेला नाही. विरोधकांना घुसखोर लोकांकरता पायघड्या घालायच्या असतील तर आधी परदेशी लोकांना अमेरिकन सीमा कायद्याने खुल्या करून द्या. जोवर ह्या सीमा ओलांडण्याकरता कायदे, नियम आहेत तोपर्यंत ते पाळण्याचा आग्रह धरणार्‍याला चूक म्हणणे ही त्याहून मोठी घोडचूक आहे.

मुसलमान लोकांबद्दल तो असे म्हणाला की परराष्ट्र खात्याचा कारभार नीट ठिकाणावर येईपर्यंत मुस्लिम लोकांना अमेरिकेत येऊ देऊ नका. हे सॅन बर्नार्डिनोच्या अतिरेकी हल्ल्यामुळे तो म्हणाला. हल्लेखोरातील स्त्री ही अत्यंत जहाल अतिरेकी विचाराची असून तिला व्हिसा का मिळाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अब्जावधी डॉलर्स अमेरिकेच्या सुरक्षेवर खर्च होत असताना असे होत असेल तर कुठेतरी गडबड आहे. ही गडबड ठीक होईपर्यंत काहीतरी कठोर उपाय केले पाहिजेत ह्या दृष्टीने हा विचार मांडला गेला. हा टोकाचा वाटला तरी अनेक अमेरिकन लोकांना तो पटला होता.

गॅरी ट्रुमन's picture

18 Mar 2016 - 2:10 pm | गॅरी ट्रुमन

मार्क डाईस हा अमेरिकेतील पत्रकार रस्त्यावर जाऊन लोकांना प्रश्न विचारतो आणि त्यातून अनेक लोकांना काहीच माहिती नसते ही गोष्ट लक्षात येते. मध्यंतरी त्याने एके ठिकाणी जाऊन काहींना "हिलरी क्लिंटन अध्यक्षपदी आल्यास त्या अमेरिकेत शरीया कायदा आणणार आहेत त्याला तुमचे समर्थन आहे का" असा प्रश्न विचारला. अर्थातच हिलरींनी असे काही आश्वासन दिलेलेच नाही. तरीही काही मतदारांनी "हो आमचे समर्थन आहे" किंवा "हिलरी असे काही करणार असतील ते योग्यच असेल" अशा स्वरूपाचे उत्तर दिले. त्याने हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला आहे. व्हिडिओवरून हे ठिकाण एखादे पर्यटनस्थळ वाटत आहे. अर्थातच सर्व मतदार अशा स्वरूपाचे अज्ञानी असतात असे नाही तेव्हा या व्हिडिओला मनोरंजक व्हिडिओ म्हणून बघणे अधिक योग्य आहे.तरीही काही भारतीयांना अमेरिकेतलेही सर्वसामान्य मतदार फार वेगळे नाहीत का हा प्रश्नही नक्कीच विचारावासा वाटेल.

आनन्दा's picture

18 Mar 2016 - 2:26 pm | आनन्दा

ठ्ठो!! बिचारे.

आनन्दा's picture

18 Mar 2016 - 2:29 pm | आनन्दा

तरीही काही भारतीयांना अमेरिकेतलेही सर्वसामान्य मतदार फार वेगळे नाहीत का हा प्रश्नही नक्कीच विचारावासा वाटेल.

ह्म्म.. मोदी म्हणतायत म्हणजे चूक नसणारच.. किंवा बाबाजी म्हणतायत म्हण्जे बरोबरच.. शेवटी सामान्य माणसाला त्या राजकारणाशी काहीही घेणेदेणे नसते.

जाताजाता - मला खटकेलेली गोष्ट म्हणजे एकाही माणसाने शरीय लॉ म्हणजे काय हे विचारलेले नाही.. फक्त हिलरी करणार म्हणजे चांगलेच करणार असे समजून प्रश्न चक्क "उडवून" लावला गेलेला आहे. इतके आंधळे समर्थक वाईटच.

गॅरी ट्रुमन's picture

18 Mar 2016 - 6:10 pm | गॅरी ट्रुमन

यापुढे ८-१० दिवस बाहेरगावी जाणार आहे.त्यामुळे यानंतरचे अपडेट परत आल्यानंतरच देईन.

दरम्यानच्या काळात पुढील घडामोडी होणार आहेतः

मंगळवार, २२ मार्चः अ‍ॅरिझोनामध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी आणि युटा मध्ये दोन्ही पक्षांची कॉकसेस तर आयडॅहोमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची कॉकसेस
शनीवार, २६ मार्चः अलास्का, हवाई आणि वॉशिंग्टन राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची कॉकसेस

जाताना लॅपटॉप घेऊन जाणार आहे तेव्हा अगदीच काही महत्वाचे घडले तर त्याचे अपडेट देता येतील.तसेच फोनवरूनही मिपावर लॉगिन होणारच आहे.पण फोनवरून टाईप करणे कठिण असल्यामुळे केवळ नवे मुद्दे आल्यास वाचण्यापुरताच त्याचा उपयोग करेन.

हुप्प्या's picture

19 Mar 2016 - 12:36 am | हुप्प्या

बेकायदा घुसखोरी, जिहादी अतिरेकी ह्या समस्या आहेत हे कुणी नाकारू नये. पण बहुतेक अमेरिकन पुढारी ह्या नसल्यासारखे वागतात. ओबामा, हिलरी वगैरे अतिरेकी इस्लामी नाहीतच वगैरे छान छान बोलून त्या अतिरेकाच्या धार्मिक पैलूकडे दुर्लक्ष करणे आपले कर्तव्य समजतात. बेकायदा घुसखोरी थांबवली पाहिजे असे स्पष्ट म्हणतही नाहीत. ज्यांचे बोलणेच इतके बोटचेपे असेल त्यांच्याकडून कारवाईची काडीचीही अपेक्षा करता येत नाही.

ट्रंपसारखे लोक निदान आक्रमक भूमिका मांडतात तरी. अनेक अमेरिकन नागरिकांना ह्या समस्यांचे शर्करावगुंठन करणे नको झाले आहे. ह्या विरुद्ध आक्रमक बोलणारे बोलतात त्याच्या १००% टक्के नाही तरी निदान १०% तरी काम अशी आशा लोकांना वाटत आहे. ज्यांच्या आडातच असे विचार नाहीत त्यांच्या पोहर्‍यात कुठून येणार?

Republican donors finally unite, against Trump
http://timesofindia.indiatimes.com/world/us/Republican-donors-finally-un... via @timesofindia

विशाखा पाटील's picture

22 Mar 2016 - 6:23 pm | विशाखा पाटील

ट्रम्पकडे स्वत:चाच खूप पैसा आहे भाऊ :) पण रिपब्लिकन पक्षात अस्वस्थता आहे. उद्या चार राज्यांचे निकाल येतील.

धर्मराजमुटके's picture

25 Mar 2016 - 1:03 pm | धर्मराजमुटके

मला वाटले असे प्रकार फक्त भारतातच होतात की काय ?

मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी म्हणून रिपब्लिकन पक्षातील राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. पक्षात उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ या दोघांच्याही समर्थकांची एकमेकांवर चिखलफेक सुरू असून आता तर ट्रम्प यांची पत्नी मलेनिया यांचा मॉडेलिंग करत असतानाचा १६ वर्षांपूर्वीचा न्यूड फोटो 'व्हायरल' करण्यात आला आहे. या प्रकाराने ट्रम्प चांगलेच भडकले आहेत.

(CNN)Republican presidential front-runner Donald Trump called Monday for barring all Muslims from entering the United States.

"Donald J. Trump is calling for a total and complete shutdown of Muslims entering the United States until our country's representatives can figure out what is going on," a campaign press release said.

हे ट्रंप कार्ड डोनाल्ड ट्रंप खेळले आहेत. अतिरेक्यांना धर्म नसतो हे वाक्य टाळ्या घेऊन जाते पण आपले नातेवाईक अतिरेक्यांच्या कारवाईत मारले गेले म्हणजे समजते की अतिरेकी कोणत्या धर्माचे आहेत.

मला वाटत हा मुद्दा कदाचित अमेरीकेच्या सार्वत्रीक निवडणुकात कळीचा ठरावा.

DEADPOOL's picture

25 Mar 2016 - 4:18 pm | DEADPOOL

गॅरी ट्रुमन सर
ट्र्म्प ला उमेदवारी न मिळण्याचे किती चान्सस आहेत?

गॅरी ट्रुमन's picture

29 Mar 2016 - 9:03 pm | गॅरी ट्रुमन

ट्र्म्प ला उमेदवारी न मिळण्याचे किती चान्सस आहेत?

जर सगळ्या प्रायमरी आणि कॉकसेसमध्ये मिळून डॉनाल्ड ट्रम्प यांना ५०% पेक्षा कमी प्रतिनिधींचे समर्थन असेल तर पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी मतदान घ्यायची वेळ येऊ शकते.

ओहायोचे गव्हर्नर जॉन कॅसिक अजूनही शर्यतीत आहेत. त्यांना १४३ प्रतिनिधींचे समर्थन मिळाले आहे.तर फ्लॉरीडाचे सीनेटर मार्को रूबिओ यांना त्यापेक्षा जास्त प्रतिनिधींचे समर्थन असूनही त्यांनी माघार घेतली आहे. मला वाटते की जॉन कॅसिक अजूनही शर्यतीत आहेत याचे कारण इतर राज्यांमधून जितके मिळतील तितके प्रतिनिधी मिळवायचे आणि ते प्रतिनिधी ट्रम्प यांना जाऊ द्यायचे नाहीत. पक्षाच्या अधिवेशनात मतदानाची वेळ आल्यास हे प्रतिनिधी ट्रम्पविरोधी मते द्यायला हाताशी येतील.मार्को रूबिओ यांचा तर त्यांच्याच राज्यात, फ्लॉरीडात पराभव झाला.त्यामुळे त्यांना शर्यतीत टिकून राहणे प्रशस्त राहिले नाही आणि माघार घेणे भाग पडले.पण जॉन कॅसिक यांनी त्यांच्या ओहायो राज्यात विजय मिळवला आहे त्यामुळे त्यांना या कारणासाठी अधिक काळ शर्यतीत टिकून राहायला अडचण नसावी. सध्याचे प्रायमरीचे गणित असे आहे की कॅसिक यांनी अजून मतदान न झालेल्या सगळ्या राज्यातील सगळे प्रतिनिधी जिंकले तरी ते ५०% पर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशावेळी खरे तर त्यांनी माघार घ्यायला हवी. तरी ते शर्यतीत टिकून आहेत याचा उद्देश ट्रम्प यांचे समर्थन जितके कमी करता येईल तितके करावे हा असावा असे दिसत आहे.

१९६८ च्या रिपब्लिकन प्रायमरीमध्ये रिचर्ड निक्सन (ज्यांना पुढे उमेदवादी मिळाली) आणि रॉनाल्ड रेगन यांच्यात अगदी अटीतटीचा सामना होता. रेगन थोडेसे आघाडीवर होते पण कोणत्याच उमेदवाराला ५०% समर्थन नव्हते. अशावेळी पक्षाच्या मायामी बीच, फ्लॉरीडा येथील अधिवेशनात मतदान झाले. तिसरे उमेदवार नेल्सन रॉकफेलर आणि रेगन या दोघांचाही उद्देश निक्सनना रोखणे होता. पण या दोघांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आणि त्यातून दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असे होऊन रिचर्ड निक्सन यांनाच उमेदवारी मिळाली. २०१६ मध्ये समजा तशीच वेळ आली तर टेड क्रुझ यांचा उमेदवारीवरचा दावा जॉन कॅसिक यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रबळ आहे त्यामुळे निक्सनप्रमाणे ट्रम्प उमेदवारी पटकावतील असे वाटत नाही.

पुढे १९७६ मध्येही रॉनाल्ड रेगन यांचा पक्षाच्या कॅन्सस सिटी, मिसॉरी येथील अधिवेशनात परत एकदा थोडक्यात पराभव झाला आणि उमेदवारी अध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांना मिळाली. तरीही रेगन यांनी हिंमत न हारता १९८० मध्ये परत एकदा प्रायमरीमध्ये उडी घेतली आणि उमेदवारी आणि त्यानंतर ८ वर्षे अध्यक्षपदही मिळवले.

DEADPOOL's picture

29 Mar 2016 - 9:25 pm | DEADPOOL

THANK YOU

एकदम सनी लिओनि सारखा बिंधास्त अन वास्तविकतेची प्रांजळपणाशी उघड सांगड राखणारा... हां सत्तेवर आला तर मजाच येइल. हिलरी न बोलूं शाहणी आहे... विशेषता भारताबाबत

२२ मार्चला अ‍ॅरिझोना, आयडॅहो आणि युटा राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षांच्या तर अ‍ॅरिझोना आणि युटा राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षांच्या प्रायमरी झाल्या. तर २६ मार्चला डेमॉक्रॅटिक पक्षांच्या अलास्का, हवाई आणि वॉशिंग्टन राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या.

या प्रायमरीचे निकाल पुढीलप्रमाणे लागले--

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

       
   डेमॉक्रॅटिक पक्ष    
 अ‍ॅरिझोनायुटाआयडॅहोअलास्काहवाईवॉशिंग्टनआतापर्यंत
हिलरी क्लिंटन44653891712
बर्नी सॅंडर्स3026171317251004
एकूण7432221625342716
        
   रिपब्लिकन पक्ष    
 अ‍ॅरिझोनायुटा    आतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प580    739
टेड क्रुझ040    465
जॉन कॅसिक00    143
इतर00    181
एकूण5840    1528

तर डेमॉक्रॅटिक पक्षात डेलिगेटची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 सुपर डेलीगेटअन्य डेलीगेटएकूण
हिलरी क्लिंटन46912431712
बर्नी सॅंडर्स299751004
एकूण49822182716

डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांनी या ६ पैकी ५ राज्यांमधील प्रायमरी जिंकल्या.असे असले तरी सँडर्स यांनी जिंकलेली राज्ये त्या मानाने विरळ लोकसंख्येची आणि म्हणून निवडणुकांमध्ये कमी महत्वाची आहेत (अलास्का, हवाई, आयडॅहो इत्यादी).

सँडर्स यांनी म्हटले की देशाच्या दक्षिण भागातील अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह राज्यांमध्ये पराभव होणार याची कल्पना होती पण वॉशिंग्टन, अलास्का सारख्या पश्चिमेकडील उदारमतवादी राज्यांमध्ये विजय होणे हे त्यांच्यासाठी चांगले चिन्ह आहे. सध्या तरी हिलरी क्लिंटन सुपरडेलीगेटच्या समर्थनामुळे चांगल्याच आघाडीवर आहेत.पण अर्थातच सुपरडेलीगेटना पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी आपले मत बदलायचा अधिकार आहे. जर सँडर्स यांनी कॅलिफॉर्निया, न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया सारखी मोठी (आणि दक्षिणेतील त्यांच्यासाठीच्या कमकुवत क्षेत्रात नसलेली) राज्ये जिंकली तर मात्र सँडर्स या प्रायमरीमध्ये अजून रंगत आणू शकतील. रिपब्लिकन पक्षात मात्र टेड क्रुझ यांनी युटा राज्य जिंकून रंगत आणली आहे.जर ट्रम्प यांना ५०% पेक्षा कमी प्रतिनिधींचे समर्थन मिळाले तर मात्र पक्षाच्या अधिवेशनात मतदान घ्यायची वेळ येऊ शकते.

एप्रिलमध्ये न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, मेरीलँड, विस्कॉन्सिन आणि कनेक्टिकट या अधिक मोठ्या राज्यांमध्ये प्रायमरी आहेत. एप्रिलअखेरपर्यंत चित्र आणखी स्पष्ट व्हायला हवे.

थोडेसे अवांतरः

डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी अधिक चांगली असते असा दावा केला जातो. हिलरी क्लिंटन यांनीही तोच दावा केला . याविषयी प्रिन्सटन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक अ‍ॅलन ब्लाईंडर आणि मार्क वॉटसन यांनी एप्रिल २०१६ च्या American Economic Review या जर्नलमध्ये "Presidents and the US Economy: An Econometric Exploration" हा पेपर लिहिला आहे. या पेपरसाठी त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा १९४७ पासून ओबामांच्या पहिल्या टर्मपर्यंतचा अभ्यास केला आहे.

हा सगळा पेपर वाचून आणि समजून झालेला नाही कारण त्यातील Econometrics च्या सगळ्या संज्ञा मला माहित नाहीत आणि त्या गोष्टी समजावून घ्यायला वेळ लागत आहे. पण जे काही वाचले आहे त्यावरून गोषवारा समजला की डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेचा वाढीचा सरासरी दर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असताना असलेल्या अमेरिकन अर्थव्यस्थेचा वाढीच्या सरासरी दरापेक्षा तब्बल १.७९% ने जास्त आहे (४.३३% विरूध्द २.५४%). यामागचे कारण काय असावे याचा अभ्यास लेखकांनी केला. त्यांच्या अनुमानातील मला समजलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे:

१. डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना तेलाचे भाव कमी राहिले आहेत. त्याचा फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला झाला. १.७९% फरकापैकी सुमारे ०.५०% म्हणजे जवळपास २८% फरक यामुळे पडतो.

२. डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना Total Factor Productivity मध्ये झालेली वाढ रिपब्लिकन अध्यक्ष असताना झालेल्या वाढीपेक्षा जास्त होती. यामुळे १.७९% फरकापैकी आणखी ०.५% म्हणजे जवळपास २८% फरक पडतो. (यावर माझी टिप्पणी: या वाढीमागे अध्यक्षांच्या धोरणांचा हात असेलच असे नाही. ही वाढ शास्त्रीय प्रगती किंवा अमेरिकेत ज्याला disruptive technology म्हटले जाते त्यामुळे होते.)

३. या काळात अमेरिकेचा कोरिया, व्हिएटनाम, पहिले आणि दुसरे इराक युध्द आणि अफगाणिस्तानमधील युध्द याच्यात प्रत्यक्ष सहभाग होता. युध्दाच्या वेळी सरकारचा संरक्षणावरील खर्च वाढतो आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते तर युध्द थांबले की हा संरक्षणावरील सरकारी खर्च कमी होतो आणि अर्थव्यवस्था मंदावते. कोरिअन युध्द हॅरी ट्रुमन (डेमॉक्रॅटिक) अध्यक्ष असताना सुरू झाले तर ड्वाईट आयसेनहॉवर (रिपब्लिकन) अध्यक्ष असताना संपले. व्हिएटनाम युध्द लिंडन जॉन्सन (डेमॉक्रॅटिक) अध्यक्ष असताना अधिक भडकले तर रिचर्ड निक्सन (रिपब्लिकन) अध्यक्ष असताना संपले. पहिले इराक युध्द इतके मोठे नव्हते त्यामुळे त्याचा इतका फरक पडायला नको. इराकमधील अमेरिकन सैन्याची बरीचशी involvement रिपब्लिकन जॉर्ज डब्लू बुश अध्यक्ष असतानाच संपली होती तर अफगाणिस्तानातील चालू होती. सांगायचा मुद्दा म्हणजे मोठ्या युध्दांची समाप्ती रिपब्लिकन अध्यक्ष असताना अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली. १.७९% पैकी आणखी ०.२१% फरक (जवळपास १२%) यामुळे पडतो.

४. मोनेटरी पॉलिसी ठरविणारे अमेरिकन फेडचे चेअरमन रिपब्लिकन अध्यक्ष असताना थोडे hawkish होते आणि व्याजाचे दर जास्त ठेवण्याकडे त्यांचा कल होता. त्याचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. डेमॉक्रॅटिक अध्यक्ष जिमी कार्टर यांनी नियुक्त केलेले पॉल व्होल्कर हे त्यातील सर्वात hawkish होते. किंबहुना त्या कारणासाठी रिपब्लिकन अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांचे त्यांच्याशी संबंध फार चांगले नव्हते. या कारणामुळे १.७९% पैकी साधारण ०.२३% ते ०.३२% म्हणजे आणखी १३-१४% फरक पडतो. (तर इतर काही संशोधनाप्रमाणे या घटकाचा विशेष फरक पडत नाही)

तेव्हा एकूण १.७९% फरकापैकी किमान ६८% फरक या कारणांमुळे पडतो. म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली असली तरी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली होते असे म्हणता येणार नाही असा या पेपरचा आशय वाटला.

या पेपरचे २०१४ मधील जुने व्हर्जन National Bureau of Economic Research च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पण या संकेतस्थळावरील बहुसंख्य पेपरचे formating चांगले नसते त्यामुळे शक्यतो मी तिथून पेपर वाचणे टाळतो. American Economic Review च्या संकेतस्थळावरून पेपर वाचायचा असेल तर मात्र subscription असणे गरजेचे आहे.

यापुढील माझी टिप्पणी:

२००८-०९ च्या संकटासाठी रिपब्लिकन जॉर्ज डब्लू बुश यांचे प्रशासन पूर्णपणे जबाबदार होते का? खरे तर Fannie Mae आणि Freddie Mac वर सबप्राईम कर्जांनाही securitization मध्ये समाविष्ट करावे हा दबाव डेमॉक्रॅटिक बिल क्लिंटन अध्यक्ष असतानाही होता. इतकेच नव्हे तर विविध आर्थिक संस्थांना एकाच छत्राखाली असायला बंदी असलेला Glass-Steagal Act क्लिंटन अध्यक्ष असताना रद्द केला गेला होता. वाढत्या विषमतेविरूध्द लोकांनी तक्रार करू नये यासाठी सामान्य लोकांना गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून देऊन स्वत:चे घर होणे--अर्थातच American dream जगता येणे ती अफूची गोळी (palliative) बुश यांनी दिली तशी बिल क्लिंटन यांनीही दिलीच. बाकी CDO, Credit Default Swaps वगैरे भानगडींसाठी सरकारपेक्षाही खाजगी क्षेत्राची अधिक जबाबदारी होती. या सगळ्या प्रकाराचे परिणाम बुश अध्यक्ष असताना दिसले तरी त्यासाठी बुश हेच १००% जबाबदार होते असे म्हणता येईल असे मला तरी वाटत नाही.

अर्धवटराव's picture

30 Mar 2016 - 2:19 am | अर्धवटराव

तुमचा व्यवसाय काय म्हणायचा ? नोकरी वगैरे करत असाल तर ताबडतोब राजीनामा देऊन स्वतःचा बिझनेस सुरु करा.

नंदन's picture

30 Mar 2016 - 5:54 am | नंदन

म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली असली तरी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली होते असे म्हणता येणार नाही असा या पेपरचा आशय वाटला.

बव्हंशी सहमत आहे.

रिपब्लिकन पक्षाची धोरणं एरवी कितीही रेसिस्ट, मिसॉजनिस्ट (स्त्री-द्वेष्टी), होमोफोबिक, आक्रस्ताळी असली; तरी त्यांची आर्थिक धोरणं अधिक सरस आहेत; असा एक बचावात्मक पवित्रा काही लोक घेताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर हे आकडे आणि विवेचन उल्लेखनीय आहे. ओबामाच्या दुसर्‍या टर्ममधले आकडे यात धरले, तर टक्केवारी डेमोक्रॅट्सच्या बाजूने अजून झुकेल.

इतकेच नव्हे तर विविध आर्थिक संस्थांना एकाच छत्राखाली असायला बंदी असलेला Glass-Steagal Act क्लिंटन अध्यक्ष असताना रद्द केला गेला होता. वाढत्या विषमतेविरूध्द लोकांनी तक्रार करू नये यासाठी सामान्य लोकांना गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून देऊन स्वत:चे घर होणे--अर्थातच American dream जगता येणे ती अफूची गोळी (palliative) बुश यांनी दिली तशी बिल क्लिंटन यांनीही दिलीच

+१
'बिल क्लिंटन वॉज द बेस्ट रिपब्लिकन प्रेसिडेंट एव्हर!' या विनोदात तथ्य आहेच ;)

मदनबाण's picture

5 Apr 2016 - 5:02 am | मदनबाण

अपडेट :-

Bernie Sanders Continues To Dominate Caucuses, But He’s About To Run Out Of Them
Sanders: 'We are going to win New York'

आता एक प्रश्न :- Why the major media fail to see how Bernie Sanders can win

या प्रश्नाचे "खरे" उत्तर इथे मिळेल :- These 6 Corporations Control 90% Of The Media In America

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कधी कधी का नजर भिजते... :- इरादा पक्का

एक लिंक ध्यायची राहिलीच की...

Clinton, Trump both losing to Sanders and Cruz in Wisconsin – polls

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का

गॅरी ट्रुमन's picture

5 Apr 2016 - 5:00 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद मदनबाण.

एकूणच अमेरिकेत आपला पक्ष सत्तेत नसताना कॉर्पोरेटमध्ये जायचे आणि पक्ष सत्तेत आल्यावर सरकारमध्ये जायचे हे प्रकार अगदी सर्रास चालतात. उदाहरणार्थः

१. हेनरी पॉलसन: जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या मंत्रीमंडळातील २००६ ते २००९ या काळातील अर्थमंत्री त्यापूर्वीची ७ वर्षे गोल्डमन सॅक्सचे सी.ई.ओ होते. २००८ च्या संकटात लेहमन ब्रदर्सला बुडीतखाती जाऊन देऊन आर्थिक संकट त्यांनी अधिक गंभीर केले असा आरोप केला जातो. आणि लेहमन बुडायला हेनरी पॉलसनला का हवी होती? कारण इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगमध्ये गोल्डमन सॅक्स आणि लेहमन ब्रदर्स या कंपन्या प्रतिस्पर्धी होत्या. खरेखोटे तो भगवंत, बुशबाबा आणि हेनरी पॉलसनच जाणोत.

२. डॉनल्ड रम्सफेल्डः इराक युध्दामुळे बदनाम झालेले डॉनल्ड रम्सफेल्ड हे १९६२ ते १९७७ या काळात सरकारमध्ये होते. जेराल्ड फोर्ड यांच्या मंत्रीमंडळात ते संरक्षणमंत्री होते. पुढे १९७७ ते २००० या काळात कॉर्पोरेटमध्ये होते.या काळात ते जी.डी.सर्ल या औषधकंपनीचे सी.ई.ओ होते.२००१ ते २००६ या काळात ते जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या मंत्रीमंडळात परत एकदा संरक्षणमंत्री होते.

३. डिक चेनी: डिक चेनी हे जेराल्ड फोर्ड यांच्या कारकिर्दीत चीफ ऑफ स्टाफ, थोरल्या जॉर्ज बुश यांच्या मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री आणि जॉर्ज डब्लू बुश यांचे उपाध्यक्ष होते. मधल्या काळात बिल क्लिंटन अध्यक्ष असताना हॅलीबर्टन या तलकंपनीचे सी.ई.ओ होते.या कंपनीला फायदा व्हावा म्हणून इराकवर हल्ला करण्यात आला असाही आरोप केला जातो.

४. लॉईड बेन्टसेनः बिल क्लिंटन यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होण्यापूर्वी हे विविध विमा आणि तेल कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर होते.

असे इतरही अनेक व्यक्तींविषयी लिहिता येईल. त्यामुळे सरकारवर कॉर्पोरेटचा प्रभाव असणे ही गोष्ट ओघाने आलीच.

अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ } मिलेटरी सिक्युरिटी कॉप्लॅक्स आणि ३ री आणि सर्वात पॉवरफुल असलेली इजरायल लॉबी यावेळी कोण्याचा मागे आहे ?

Here's Why AIPAC and the Israel Lobby Will Be Critical to 2016 Elections

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का
भिजते...
:- इरादा पक्का

मदनबाण's picture

5 Apr 2016 - 6:51 am | मदनबाण

Jewish Son-in-law Kushner Guided Trump's Triumphant AIPAC Speech

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का

विशाखा पाटील's picture

5 Apr 2016 - 9:07 am | विशाखा पाटील

वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन यांच्या मागे आहे, असे बर्नी सॅंडर्स म्हणतात. ते खरेही असावे.

गॅरी ट्रुमन's picture

5 Apr 2016 - 5:16 pm | गॅरी ट्रुमन

बर्नी सँडर्स यांचा वॉल स्ट्रीटला विरोध आहे त्यामुळे वॉल स्ट्रीटचा त्यांना विरोध आहे.

मी आर्थिक दृष्ट्या बराच उजवा असलो तरी वॉल स्ट्रीटवरील पैशाच्या मागे धाऊन जे किळसवाणे प्रकार चालतात त्याला मात्र माझा विरोधच आहे.माझ्या काही मित्रांनी २०१० मध्ये बार्कलेजच्या इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगच्या कॅपिटल मार्केट्स डिव्हिजनमध्ये न्यू यॉर्कमध्ये समर इंटर्नशीप केली होती.बार्कलेजने लेहमन ब्रदर्सचा अमेरिकेतील कारभार टेक-ओव्हर केला होता त्यामुळे माझ्या मित्रांच्या डेस्कवर मुळातले लेहमन मधले ट्रेडर्स होते.त्यातले अनेक त्या सीडीओ आणि तत्सम प्रकारांमध्येही होतेच. मान्य आहे की २००८-०९ च्या संकटाला कोणी एक व्यक्ती किंवा संघटना जबाबदार नव्हती. सरकारपासून फेड (विशेषतः ग्रीनस्पॅन), रेटिंग एजन्सीज इत्यादी इत्यादी अनेक पातळ्यांवर अपयश आले होते.पण जर अपयश अनेक पातळ्यांवर आले असेल तर त्याची जबाबदारीही अनेक पातळ्यांवरच स्विकारली गेली पाहिजे. प्रत्येक माणूस/संस्था एकदुसर्याकडे बोट दाखवायला लागले तर ते योग्य नाही. असो. तर सांगायचा मुद्दा हा की या मुळातल्या लेहमनमधील ट्रेडर्सना जगाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले त्यात आपलाही काही वाटा होता याची अजिबात खंत नव्हती. वॉल स्ट्रीटवरील मनी माईंडेडनेसच्या अनेक कहाण्या माझ्या मित्रांकडून मी ऐकल्या आहेत.जिथे कुठे पैसे दिसतील तिथे हे लोक हात घालतात. सगळे जग खड्ड्यात गेले तरी चालेल, मला गलेलठ्ठ बोनस हवा, मला भरपूर पगार हवा असा काहीसा शिसारी आणणारा दृष्टीकोन यांचा असतो. २००८ मध्ये करदात्यांच्या पैशातून यांना बेल आऊट दिले आणि इतके मोठे संकट आलेले असतानाही त्याच करदात्यांच्या पैशातून बोनस घेण्यातही त्यांना काही गैर वाटले नव्हते.

बर्नी सँडर्स यांच्या काही योजनांमुळे (विशेषतः मिनिमम वेज वाढविणे) तोटा होईल असे मला वाटते.पण ते किंवा जो कोणी अध्यक्ष बनेल त्या/तीने या वॉल स्ट्रीट वाल्यांच्या माजाला काही प्रमाणात तरी अटकाव घालावा असे फार वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

5 Apr 2016 - 4:27 pm | गॅरी ट्रुमन

नेवाडा राज्यातील कॉकसेसमधून डेमॉक्रॅटिक पक्षाचे फिलाडेल्फियातील जुलैमधील अधिवेशनासाठी प्रतिनिधी निवडायची प्रक्रीया थोडी गुंतागुंतीची आहे. राज्यातून एकूण ४३ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्यापैकी २३ प्रतिनिधी फेब्रुवारीमधील कॉकसेसमधून निवडले गेले. या प्रतिनिधींना डिस्ट्रीक्ट लेव्हल डेलिगेट म्हणतात. या डिस्ट्रीक्ट लेव्हल डेलिगेटपैकी १३ हिलरींनी जिंकले तर १० सँडर्स यांनी जिंकले.उरलेल्या २० प्रतिनिधींपैकी ८ सुपर डेलीगेट आहेत (आजी-माजी सिनेटर आणि हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हजचे सदस्य). तर १२ प्रतिनिधी आणखी दोन पातळ्यांमधून निवडले जातात.

फेबुवारीतील कॉकसेसमध्ये सहभागी झालेल्या मतदारांनी त्यांच्यातून १२,२३३ प्रतिनिधी निवडले. हे प्रतिनिधी काऊंटी लेव्हल संमेलनासाठी एकत्र येतात. या प्रतिनिधींमधून आणखी लहान गट निवडला जातो आणि हा गट मे महिन्यातील राज्यस्तरीय संमेलनासाठी निवडला जातो. हे राज्यस्तरीय संमेलनासाठी निवडले गेलेले प्रतिनिधी शेवटी उरलेले १२ प्रतिनिधी निवडतात जे जुलैमध्ये फिलाडेल्फियातील पक्षाच्या अधिवेशनात हिलरी किंवा बर्नी सँडर्स यांच्या बाजूने मतदान करतील. एकूणच नेवाडा राज्यातील कॉकसेसची प्रक्रीया बरीच गुंतागुंतीची आहे.

यातील मेख अशी की काऊंटी लेव्हल संमेलनासाठी निवडले गेलेले १२,२३३ प्रतिनिधी या काऊंटी लेव्हल संमेलनात आपले मत बदलू शकतात. या १२,२३३ पैकी हिलरींनी जिंकलेले बहुसंख्य प्रतिनिधी परवा झालेल्या काऊंटी लेव्हल संमेलनासाठी गैरहजर राहिले. त्यातून झाले असे की काऊंटी लेव्हल संमेलनात बर्नी सँडर्स यांच्या बाजूचे २,९६४ तर हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे २,३८६ प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्यामुळे मे महिन्यातील राज्यस्तरीय संमेलनासाठी बर्नी सँडर्स यांच्या बाजूचे १,६१३ तर हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे १,२९८ प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. शक्यता आहे की यातून नेवाडा राज्यातील बर्नी सँडर्स यांना हिलरींपेक्षा एखाद-दोन प्रतिनिधी जास्तही मिळू शकतील.

सध्या तरी हिलरींची आघाडी बरीच मोठी आहे.त्यामुळे एखाद दोन प्रतिनिधी सँडर्स यांच्या बाजूला गेल्यामुळे फार फरक पडायचा नाही. तरीही हिलरींच्या बाजूचे बहुसंख्य प्रतिनिधी अनुपस्थित राहणे हे हिलरींच्या प्रचारातील उणीवा नक्कीच दर्शविते. २००८ मध्येही हिलरींना हाच अनुभव आला होता. फेब्रुवारीतील कॉकसेसमध्ये जास्त मते मिळूनही शेवटी बराक ओबामांना अधिक प्रतिनिधी मिळाले.हा अनुभव लक्षात घेता हिलरींनी थोडी अधिक काळजी घ्यायला पाहिजे होती असे दिसते.

एप्रिल महिन्यात पुढील राज्यात प्रायमरी होणार आहेतः

५ एप्रिलः विस्कॉन्सिन
९ एप्रिलः वायोमिंग (फक्त डेमॉक्रॅटिक पक्षाची प्रायमरी)
१९ एप्रिलः न्यू यॉर्क
२६ एप्रिलः कनेक्टिकट, डेलावेअर, मेरीलँड, र्‍होड आयलंड आणि पेन्सिल्व्हेनिया

भाप्रवे उद्यापर्यंत विस्कॉन्सिन प्रायमरीचे निकाल येतील. निकाल आल्यावर इथे पोस्ट करेनच. सध्या तरी जनमत चाचण्यांप्रमाणे डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यास रिपब्लिकन पक्षात आणखी चुरस निर्माण होईल. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र हिलरींची आघाडी बरीच जास्त आहे तसेच न्यू यॉर्क आणि पेन्सिल्व्हेनिया या पूर्वेकडील राज्यांमधून त्यांचा पराभव होणे कठिण वाटत आहे त्यामुळे डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरीच असतील असे चित्र या क्षणी तरी आहे.

विस्कॉन्सिन राज्यातील प्रायमरीचे निकाल--

या राज्यात दोन्ही पक्षांमध्ये आघाडीवर असलेल्या (डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. तर डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ यांचा विजय झाला आहे.दोन्ही विजयी उमेदवारांनी १३% चे घसघशीत मताधिक्य घेतले आहे. इथे दिलेल्या नकाशावरून कळेल की डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांनी राज्याच्या सर्वच भागात विजय मिळवला आहे.राज्यात अधिक लोकसंख्येची शहरे दोन---मिलवॉकी आणि मेडिसन.त्यापैकी मिलवॉकीमध्ये हिलरींना ४% ने म्हणजे त्यामानाने थोडक्यात विजय मिळाला आहे तर मेडिसन मध्ये सॅंडर्स यांना २५% ने आरामात विजय मिळाला आहे. राज्याचे इतर भाग तुरळक लोकवस्तीचे आहेत.तिथेही सँडर्स यांनी विजय मिळवला आहे.

डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांना ४५ आणि हिलरींना ३१ तर रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ यांना ३३ तर डॉनल्ड ट्रम्प यांना ३ प्रतिनिधी मिळाले आहेत. आतापर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 रिपब्लिकन पक्ष 
 विस्कॉन्सिनआतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प3740
टेड क्रुझ33514
जॉन कॅसिक0143
इतर0188
एकूण361585
   
   
 डेमॉक्रॅटिक पक्ष 
 विस्कॉन्सिनआतापर्यंत
हिलरी क्लिंटन311743
बर्नी सँडर्स451056
एकूण762799

तर डेमॉक्रॅटिक पक्षात सुपर डेलीगेट आणि अन्य डेलीगेट यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण
हिलरी क्लिंटन46912741743
बर्नी सँडर्स3110251056
एकूण50022992799

निवडून गेलेल्या प्रतिनिधींमध्ये हिलरींची आघाडी आता बरीच कमी झाली आहे.पण त्यांच्यामागे डेमॉक्रॅटिक पक्षाची संघटना आणि सुपरडेलीगेट आहेत असे सध्याचे चित्र आहे.तिथे बर्नी सँडर्स बरेच मागे आहेत.पण सुपर डेलीगेट आपले मत बदलू शकतात त्यामुळे जर बर्नी सँडर्स यांनी न्यू यॉर्क, कॅलिफॉर्निया यासारखी मोठी राज्ये जिंकली तर कदाचित काही सुपरडेलीगेट त्यांच्या बाजूला जाऊ शकतील. रिपब्लिकन पक्षात मात्र टेड क्रुझ यांनी बरीच रंगत आणली आहे.

आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षातील चित्र कसे आहे हे पुढे दिलेल्या नकाशांवरून समजून येईल. सर्व नकाशे विकिपीडीयावरून घेतले आहेत.

१. डेमॉक्रॅटिक पक्षातील निवडून गेलेले प्रतिनिधी

Democratic Pledged

By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348440

२. डेमॉक्रॅटिक पक्षातील एकूण प्रतिनिधी (निवडून गेलेले + सुपरडेलीगेट)

Democratic Total

By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348438

३. डेमॉक्रॅटिक पक्षातील काऊंटीनिहाय मतदान (काऊंटी म्हणजे जिल्ह्याला समकक्ष)

Democratic Countywise

By See #filehistory - This file was derived from:  USA Counties.svg, CC0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=46732374

या काऊंटीनिहाय नकाशावरून समजेल की हिलरींनी देशाच्या दक्षिण भागात अगदीच स्वीप केला.पण आपण जसेजसे उत्तरेकडे जातो त्याप्रमाणे परिस्थिती बदलते.उदाहरणार्थ ओक्लाहोमामध्ये सँडर्स यांची कामगिरी बरीच चांगली झाली आहे.कॅन्ससमध्ये तर सँडर्स यांनी सगळीकडेच विजय मिळवला आहे. नेब्रास्कामध्येही कामगिरी चांगली आहे. अर्थातच ही राज्ये तुरळक लोकवस्तीची आहेत त्यामुळे प्रतिनिधीसंख्येमध्ये सँडर्स यांना या विजयाचाही फार फायदा होणार नाही. पण मिशिगन, मिन्नेसोटा या उत्तरेकडील राज्यांमध्येही त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. स्वतःचे व्हरमॉन्ट आणि त्या शेजारचे मेन ही राज्ये तर त्यांनी अगदी स्वीपच केली आहेत.तीच गोष्ट युटा, आयडॅहो आणि वॉशिंग्टन या राज्यांचीही. आता न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, न्यू जर्सी, मेरीलँड यासारख्या दाट लोकवस्तीच्या राज्यांवर बर्नी सँडर्स अधिक लक्ष देतील.त्यांनी म्हटल्याप्रमाणे दक्षिणेत पराभव होणार हे अपेक्षितच होते आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रायमरी आधी झाल्या आहेत.यापुढे उत्तरेतील महत्वाच्या राज्यांमध्ये प्रायमरी आहेत आणि त्या राज्यांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा सँडर्स यांना आहे असे दिसते. आणि म्हणूनच ते पिछाडीवर असले तरी अजूनही स्पर्धेत टिकून आहेत.

वर डेमॉक्रॅटिक पक्षातले आतापर्यंतचे चित्र दर्शविणारे नकाशे दिले आहेत. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षातील चित्र दर्शविणारे नकाशेही देत आहे.

१. रिपब्लिकन पक्षातील प्रतिनिधींची स्थिती

Republican total

By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348439

२. रिपब्लिकन पक्षातील काऊंटीनिहाय मतदान
Republican countywise

By Ali Zifan, JCRules, Magog the Ogre, Nizolan, & Spesh531 - This file was derived from:  USA Counties.svg, CC0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=46732339

यावरून समजते की डॉनल्ड ट्रम्प आणि टेड क्रुझ या दोघांनीही ज्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे ती राज्ये अगदीच स्वीप केली आहेत. इथे दिल्याप्रमाणे जनमत चाचण्यांप्रमाणे न्यू यॉर्कमध्ये ट्रम्प चांगल्यापैकी आघाडीवर आहेत तर कॅलिफॉर्नियामध्ये पूर्वी अधिक चुरस होती पण आता ट्रम्प यांनी आघाडी मिळवली आहे असे चित्र आहे.तसेच पेन्सिल्व्हेनियामध्येही ट्रम्पच आघाडीवर आहेत. जर ट्रम्प यांनी ही महत्वाची राज्ये जिंकली तर मात्र टेड क्रुझ यांना उमेदवारी मिळवणे कठिणच जाईल.

गॅरी ट्रुमन's picture

21 Apr 2016 - 11:05 am | गॅरी ट्रुमन

भाप्रवे प्रमाणे काल दुपारी न्यू यॉर्क प्रायमरीचा निकाल आला. या प्रायमरीमध्ये दोन्ही पक्षातील आघाडीच्या उमेदवारांनी (डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प) अगदी आरामात विजय मिळवला. रिपब्लिकन प्रायमरीमध्ये ट्रम्प यांना जवळपास ६०% मते मिळाली तर डेमॉक्रॅटिक प्रायमरीमध्ये हिलरी क्लिंटन यांना ५८% मते मिळाली.या विजयामुळे नोव्हेंबरमधील निवडणुक हिलरी विरूध्द ट्रम्प होणार असे जवळपास नक्की झाले असे म्हणायला हरकत नसावी. आता कॅलिफॉर्निया आणि पेन्सिल्व्हेनिया या दोन मोठ्या राज्यांमध्ये प्रायमरी व्हायच्या आहेत.पण या राज्यांमध्ये विजय मिळवला तरी प्रतिस्पर्ध्यांना (डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ) आपली पिछाडी भरून काढणे कठिणच जाईल असे दिसते.

तसेच ९ एप्रिलला वायोमिंग राज्यात डेमॉक्रॅटिक कॉकसेस झाली.त्यात मतांमध्ये बर्नी सँडर्स पुढे होते पण प्रतिनिधींच्या संख्येत बर्नी सँडर्स आणि हिलरी क्लिंटन यांच्यात बरोबरी झाली.

आतापर्यंतचे आकडे खालीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 डेमॉक्रॅटिक पक्ष  
 न्यू यॉर्कवायोमिंगआतापर्यंत
हिलरी क्लिंटन13971930
बर्नी सँडर्स10671189
एकूण245143119
    
 रिपब्लिकन पक्ष  
डॉनल्ड ट्रम्प89 845
टेड क्रुझ0 559
जॉन कॅसिक4 148
इतर93 187
एकूण186 1739

तर डेमॉक्रॅटिक पक्षात सुपरडेलीगेट आणि इतर डेलीगेट यांचे आकडे पुढीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8988;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 सुपरडेलीगेटइतर डेलीगेटएकूण
हिलरी क्लिंटन50214281930
बर्नी सँडर्स3811511189
एकूण54025793119

गेल्या आठवड्यात आणि आज काही महत्वाचे बदल घडले आहेत.गेल्या मंगळवारी पेन्सिल्व्हेनिया, कनेक्टिकट, डेलावेअर,मेरीलँड आणि र्‍होड आयलंड या राज्यांमध्ये तर कालच्या मंगळवारी इंडियाना राज्यात प्रायमरी झाल्या. गेल्या मंगळवारी ज्याला 'न्यू इंग्लंड' भाग म्हटला जातो त्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात प्रायमरी झाल्या आणि एका अर्थी गेला मंगळवार प्रायमरींमध्ये निर्णायक होता. अमेरिकेतील रेल्वे कंपनी अ‍ॅमट्रॅकची 'असेला एक्सप्रेस' या भागातून जाते म्हणून या प्रायमरींना 'असेला प्रायमरी' असेही म्हटले जाते.

असेला प्रायमरीमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांनी जोरदार विजय मिळवला.हिलरींनी या राज्यांमधील आकारात, लोकसंख्येत आणि प्रतिनिधीसंख्येत सगळ्यात पेन्सिल्वेनिया राज्यात १२% ,मेरीलँडमध्ये तब्बल ३०%, डेलावेअरमध्ये २०% तर कनेक्टिकटमध्ये त्यामानाने कमी म्हणजे ५% ची आघाडी मिळवली. तर बर्नी सँडर्स यांनी केवळ र्‍होड आयलंडमध्ये सुमारे १२% मते जास्त मिळवून विजय संपादन केला. आतापर्यंतचा कल बघितला तर असे लक्षात येत आहे की वरकरणी बर्नी सँडर्स यांनी अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे असे दिसत असले तरी त्यांनी विजय मिळवलेली राज्ये त्या मानाने आकाराने, लोकसंख्येने आणि प्रतिनिधीसंख्येने लहान राज्ये आहेत (उदाहरणार्थ अलास्का, हवाई, आयडॅहो, कॅन्सस, नेब्रास्का, न्यू हॅम्पशायर, वायोमिंग इत्यादी). केवळ मिशिगन या एकाच मोठ्या राज्यात त्यांना विजय मिळाला आहे. आणि विजय मिळाला तो ही ३०-४०% अशा घसघशीत आघाडीने नाही तर ५-१०% च्या मताधिक्याने. त्यामुळे प्रतिनिधीसंख्येमध्ये या राज्यांमधून त्यांना हिलरींपेक्षा थोडीशीच आघाडी मिळाली. त्याउलट हिलरींनी न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, टेक्सस, जॉर्निया, फ्लॉरीडा इत्यादी मोठ्या राज्यांमध्ये आरामात विजय मिळवला.कालच्या इंडियाना प्रायमरीमध्येही बर्नी सँडर्स यांनी विजय मिळवला पण तो ५% मताधिक्याने. त्यामुळे तिथूनही प्रतिनिधीसंख्येत त्यांना फार आघाडी मिळालेली नाही.

असेला प्रायमरीमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी सगळी राज्ये जिंकली.टेड क्रुझ यांचा असेला प्रायमरीमध्ये अजिबात निभाव लागला नाही. बहुसंख्य राज्यांमध्ये उमेदवारी मिळायची अजिबात शक्यता नसलेल्या जॉन कॅसिक यांनी टेड क्रुझ यांच्यापेक्षा जास्त मते घेतली.कालच्या इंडियाना प्रायमरीमध्येही डॉनल्ड ट्रम्प यांनी टेड क्रुझ यांचा १७% मताधिक्याने आरामात पराभव केला.

त्यानंतर झालेली सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे टेड क्रुझ यांनी उमेदवारी मिळवायच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता डॉनल्ड ट्रम्प यांच्यापुढे केवळ जॉन कॅसिक आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळायची शक्यता शून्य आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प हेच उमेदवार असतील हे आता स्पष्ट झाले आहे.

डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र हिलरींकडे आता सुपरडेलीगेट मिळून २२०२ प्रतिनिधी आहेत आणि त्यांना गरज आहे एकूण २२८३ प्रतिनिधींची. तेव्हा सुपरडेलीगेटनी मत बदलले नाही तर हिलरींची उमेदवारी पण पक्कीच असे धरायला हरकत नसावी.तरीही बर्नी सँडर्स अजूनही माघार घ्यायला तयार नाहीत. भाप्रवेप्रमाणे आजच सकाळी सी.एन.एन वर बघितले की बर्नी सँडर्स यांची अपेक्षा आहे की त्यांनी प्रायमरीमध्ये ज्या राज्यांमधून विजय मिळवला होता त्या राज्यांमधील सुपरडेलीगेट त्यांना मत देतील.पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी विजय मिळवलेली राज्ये आकाराने लहान आहेत.आणि त्यापैकी बर्‍याच राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षापेक्षा रिपब्लिकन पक्षाचा जोर जास्त आहे (उदाहरणार्थ कॅन्सस, नेब्रास्का, आयडॅहो इत्यादी). तेव्हा या राज्यांमधून डेमॉक्रॅटिक पक्षाचे किती सुपरडेलीगेट असणार आणि त्यापैकी किती मते बदलणार हा पण प्रश्नच आहे.

तेव्हा ८ नोव्हेंबरला हिलरी क्लिंटन विरूध्द डॉनल्ड ट्रम्प अशी लढत होईल असे जवळपास नक्की झाले आहे.

रिपब्लिकन पक्षात मात्र असेला

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 11:29 am | गॅरी ट्रुमन

कालच्या मंगळवारी वेस्ट व्हर्जिनिया राज्यात दोन्ही पक्षांच्या तर नेब्रास्कामध्ये रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी झाली.

डेमॉक्रॅटिक पक्षात वेस्ट व्हर्जिनियामध्ये बर्नी सँडर्स यांनी हिलरींचा १५% मताधिक्याने पराभव केला.सँडर्स यांना १६ तर हिलरींना ११ प्रतिनिधी मिळाले. रिपब्लिकन पक्षात वेस्ट व्हर्जिनिया आणि नेब्रास्का या दोन्ही राज्यात डॉनल्ड ट्रम्प यांनी जोरदार विजय मिळवला आहे. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प हेच उमेदवार असणार हे नक्की झाले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र बर्नी सँडर्स अजूनही माघार घ्यायला तयार दिसत नाहीत.

आता १७ मे रोजी केंटकी आणि ऑरेगन या राज्यांमध्ये तर ७ जूनला कॅलिफॉर्निया या सगळयत मोठ्या राज्यात प्रायमरी आहेत. मला वाटते की कॅलिफॉर्नियात पराभव झाल्यास सँडर्स माघार घेतील (त्यांच्यापुढे दुसरा पर्याय राहणार नाही). या घडीला हिलरींना ५६% तर सँडर्स यांना ४२% मते मिळाली आहेत. ४२% हा आकडाही तसा कमी नाही.त्यामुळे नंतर उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपला दावा बळकट रहावा या कारणामुळे सँडर्स माघार घेत नसतील हे कारण आहेच.

डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पारंपारिक रिपब्लिकनपेक्षा थोडे वेगळे आहेत. म्हणजे पारंपारिक रिपब्लिकन फ्री ट्रेडला समर्थन देतात तर ट्रम्प हे त्याच्या विरोधात आहेत. अर्थातच हे निवडणुकपूर्व र्‍हेटॉरीक आहे आणि ते अध्यक्षपदी आल्यास नंतर ते बदलेल ही शक्यता आहेच. पण सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेत मतदारांमधील काही गटाला फ्री ट्रेडचे चटके बसले आहेत. असे मतदार ट्रम्पकडे वळायची शक्यता आहे.आणि डेमॉक्रॅटिक पक्षात सँडर्स यांची भूमिकाही फ्री ट्रेडविरोधी आहे. मिशिगनमध्ये त्यांना अनपेक्षित विजय मिळाला त्यामागे हे एक मोठे कारण होते असे म्हटले जात आहे. फ्री ट्रेडविरोधी डेमॉक्रॅटिक मतदार ट्रम्पकडे जाऊ नये म्हणून सँडर्स यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार केले जाईल ही शक्यता आहेच.

फ्री ट्रेडविरोधी डेमॉक्रॅटिक मतदार फ्री ट्रेडच्या समर्थक रिपब्लिकन पक्षाचे फ्री ट्रेडचे (निदान वरकरणी) विरोधक असलेल्या उमेदवाराच्या बाजूने जायची शक्यता आहे. आणि डॉनल्ड ट्रम्प न आवडणारे रिपब्लिकन पक्षाचे अनेक पारंपारिक मतदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकायची शक्यता आहे. त्यातून पॅरीस, ब्रसेल्ससारखा आणखी एखादा हल्ला युरोपात झाला तर ते ट्रम्पच्या पथ्यावर पडेल ही पण शक्यता मोठी.

एकंदरीत चित्र रोचक असेल असे वाटते.

हा इशारावजा धोका किंवा धोकावजा इशारा आहे काय ?

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 11:50 am | गॅरी ट्रुमन

हा इशारावजा धोका किंवा धोकावजा इशारा आहे काय ?

दोन्ही नाही. तर केवळ एक शक्यता :)

पारंपारिक भूमिकेपेक्षाही जास्त उजवीकडे झुकलेले आहेत. मला वाटतं ते निव्वळ एक तडजोड म्हणून रिपब्लिकन पक्षात आले, कारण स्वतंत्र उमेदवाराला अमेरिकन राजकारणात स्थान आणि भवितव्य नाहीये.राॅस पेराॅट यांच्यानंतर स्वतंत्र उमेदवार असा कुणी उभा राहिलेलाच नाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत. ट्रम्प हे apparatchik नसल्यामुळेच ते अशी बेछूट विधानं करताहेत.

ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होणार आणि ते अध्यक्ष व्हायची शक्यता आहे हे स्पष्ट झाल्यावर इतर देशांच्या नेत्यांनी त्यांची ट्रम्पविरोधी भूमिका नमती घेतलेली दिसते. या नेत्यांमध्ये ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांचा समावेश आहे. याविषयी http://edition.cnn.com/2016/05/09/politics/world-leaders-react-trump-pre... हा लेख वाचनीय आहे.

दुर्दैवाने लिंक मिळत नाहीये. त्यानुसार या निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नकारात्मक मतदान होण्याची शक्यता आहे. मला ट्रम्प नकोय म्हणून मी हिलरीला मत देणार किंवा हिकरी नकोय म्हणून ट्रम्पला मत देणार - असं होण्याची शक्यता या निवडणुकीत भरपूर आहे. मला स्वतःला Democratic पक्षाला म्हणजे हिलरी क्लिंटन यांना या नकारात्मक मतदानाची आणि anti-incumbency ची झळ लागेल असं वाटतंय.

काल रिपब्लिकन पक्षात नॉर्थ डॅकोटा राज्यातील अनबाऊंड डेलिगेटनी (डेमॉक्रॅटिक पक्षातील सुपरडेलीगेटना समकक्ष) डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहिर केला आणि त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प यांनी १२३७ हा जादूचा आकडा (मॅजिक फिगर) ओलांडला आहे. रिपब्लिकन पक्षात आता डॉनल्ड ट्रम्प हे उमेदवार असणार हे नक्की झाले आहे.

डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र बर्नी सँडर्स यांना उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य असले तरी ते अजूनही माघार घ्यायच्या मनस्थितीत नाहीत. बर्नी सँडर्स यांची ट्विटरवरील पुढील ट्विट त्याचेच द्योतक आहे--

आणि त्यातून बर्नी सँडर्स यांना कॅलिफॉर्निया हे मोठे राज्य जिंकणे अवघडच आहे.तेव्हा ७ जूनला कॅलिफॉर्निया प्रायमरी झाली की त्यानंतर सँडर्स माघार घेतील असे वाटते.

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:59 am | नाईकांचा बहिर्जी

ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर लैच धिंगाणा होईल असे वाटते, ट्रूमन सरांचे विचार ह्यावर वाचण्यास उत्सुक आहे मी !

गॅरी ट्रुमन's picture

27 May 2016 - 2:12 pm | गॅरी ट्रुमन

ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर लैच धिंगाणा होईल असे वाटते,

तसे व्हायची शक्यता कमी आहे असे मला वाटते. ट्रम्प बोलत काहीही असले तरी प्रत्यक्षात काय करतील आणि किती करतील हा प्रश्नच आहे. ट्रम्प अमुक एखादी गोष्ट करतील असे वाटत आहे त्याच्या बरोबर उलटी गोष्ट त्यांनी अध्यक्षपदी आल्यावर केली तरी आश्चर्य वाटायला नको.

रिचर्ड निक्सन अध्यक्षपदी येण्यापूर्वी चीनविरोधी समजले जात असत.पण अध्यक्षपदी आल्यावर चीनला मान्यता देणारे आणि भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष तेच होते. याचे कारण (मला वाटते) एखाद्या गोष्टीवर टोकाची भूमिका सुरवातीला घेतली तर नंतर निर्णय घेताना तीच गोष्ट केली तरी ती गोष्ट करताना देशाच्या हितसंबंधांना धोका निर्माण झालेला नाही असे चित्र उभे करता येणे सोयीचे होते. भारतातील उदाहरण द्यायचे झाले तर पारंपारिकपणे भाजप हा विरोधी पक्षात असताना पाकिस्तानविरोधी कडक भूमिका मांडणारा पक्ष राहिला आहे.त्याउलट काँग्रेस हा पाकिस्तानवर त्या मानाने कमकुवत भूमिका घेणारा पक्ष असे चित्र होते. त्यामुळे वाजपेयींनी पुढाकार घेऊन १९९९ मध्ये लाहोर डिक्लेरेशनवर सही केली तेव्हा वाजपेयी भारताच्या हितसंबंधांशी तडजोड करून असे काही करणार नाहीत असे चित्र निदान वरकरणी फार काही प्रयत्न करायला न लागता उभे राहिले. तीच गोष्ट काँग्रेस पक्षाच्या सरकारला करणे तितके सोपे गेले नसते कारण काँग्रेसच्या सरकारने असे कोणतेही पाऊल उचलले तर 'कशावरून हे भारताचे हितसंबंधांना धक्का पोहोचवत नाहीत' या प्रश्नाला सामोरे जाणे गरजेचे पडले असते. वाजपेयींना त्यावेळी तरी या प्रश्नाला सामोरे जावे लागले नव्हते. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर बोलताना (एप्रिल १९९९ मध्ये-- याच ठरावावरील मतदानात वाजपेयी सरकार एका मताने पडले होते) अडवाणींनी हा मुद्दा मांडला होता.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की राजकारणी सत्तेवर येण्यापूर्वी कितीही काहीही बोलत असले तरी प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना त्या सगळ्या गोष्टी गाऊंड रिअ‍ॅलिटी लक्षात आल्यावर करता येतातच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) असे नाही. त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरूध्द 'ते अमुक करतील ते तमुक करतील' इत्यादी बोलले जात असले तरी ते प्रत्यक्षात किती गोष्टी करू शकतील याविषयी शंकाच आहे.

रॉनाल्ड रेगन यांच्याविषयी 'ते तिसरे महायुध्द सुरू करतील' अशी भिती व्यक्त केली जात होती. अर्थातच त्यांनी तसे काही केले नाही. पण त्यांनी अशी पावले उचलली की त्यातून सोव्हिएट रशियाच पुढे कोलमडला आणि रशियाविरूध्द तिसरे महायुध्द सुरू करायची गरज (त्यावेळी) राहिली नाही.

हुप्प्या's picture

27 May 2016 - 9:20 pm | हुप्प्या

ट्रंपचे विचार हे जागतिक पातळीवर उलथापालथी करण्याचे आहेत असे वाटत नाही. मेक्सिकोतून होणारी घुसखोरी थांबवली तर जागतिक पातळीवर काय धिंगाणा होणार डोंबल?
चीनशी व्यापार करताना अमेरिकेच्या फायद्याचे धोरण ठरवले, समजा चीनमधून येणार्या मालावर कर लावला तर चीनवर परिणाम होईल पण जगावर का?
ट्रंपबद्दल अकारण बाऊ करणे ही क्रेझ बनली आहे.

श्रीगुरुजी's picture

27 May 2016 - 8:00 pm | श्रीगुरुजी

निर्वासित, स्थलांतरीत, भारतीय, मुस्लिम इ. विरूद्ध ट्रम्प कितीही बोलत असले तरी ते जर प्रत्यक्षात निवडून आले तर त्यांना आहे तीच धोरणे पुढे चालवावी लागतील. वरील प्रश्नांवर त्यांचे धोरण पूर्वीच्या अध्यक्षांसारखेच असेल.

समजा नोव्हेंबर मध्ये ट्रम्प निवडून आले तर, अमेरिकेत कट्टर उजव्या विचारांचे ट्र्म्प आणि भारतात तथाकथित फॅसिस्ट मोदी अशा परिस्थितीत जगभरातील 'पुरोगामी, उदारमतवादी, मानवतावादी आणि निधर्मी विचारवंताचे' काय होणार? त्यांची अवस्था 'न घरका ना घाटका' अशी होईल.

विकास's picture

27 May 2016 - 9:53 pm | विकास

(खालील प्रतिसाद हा हिलरी क्लिंटनच्या बाजूचा प्रतिसाद म्हणून धरून वाचू नये. कारण तसा तो नाही. केवळ ट्रम्प इतकाच मुद्दा आहे. हिलरीबद्दल नंतर कधीतरी).

ट्रम्प आता रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात प्रायमरी निवडणुकांमधे सगळ्यात जास्त मते ट्रम्प यांना मिळाली आहेत आणि अजून १० राज्यातील निवडणुका झालेल्या नाहीत!

काल रात्री सीएनएन वर मायकल रेगन यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी काही चांगले मुद्दे मांडले... सगळ्यांना आशा आहे की ट्रम्प आता जरा गिअर्स बदलतील आणि जरा नीट बोलायला लागतील. त्यात हे मायकल रेगन देखील आले. पण त्यांच्या मते रेगन यांनी शत्रूंमधून मित्र तयार केले तर ट्रम्प हे मित्रांमधे (स्वपक्षियात) शत्रू तयार करत आहेत. त्यांचे दुसरे म्हणणे होते की, त्यांना ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही, पण तसे आवडणारे बहुसंख्य असणे हे काळजीचे कारण आहे.

अजून एक महत्वाचा भाग - ट्रम्प यांचा विचार करताना आपण साहजिक रेगन यांच्याशी कळत-नकळत तुलना करतो कारण रेगन देखील आधी कलाकार होते (अर्थात राजकारणी नव्हते). ते जरी खरे असले तरी राष्ट्राध्यक्ष होण्याआधी रेगन हे दोन वेळेस म्हणजे ८ वर्षे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते आणि एकदा रिपब्लिकन प्रायमरीत हरलेले देखील होते. हे महत्वाचे का, कारण त्यांना राजकारणाचा आणि राज्यशासनाचा अनुभव होता. हे अगदी नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते. बुश हे गव्हर्नर होते तर चेनी हे मला वाटते, प्रेसिडंट फोर्ड, रेगन आणि मोठ्या बुश यांच्या राज्यात कसले न कसले सेक्रेटरी होते.

ट्रम्प यांची आपण नकळत मोदींशी तुलना करतो. कारण मोदींना पण असाच विरोध झाला होता असे वाटून. पण त्यात जमिन अस्मानाचे अंतर आहे. दुसरा भाग असा की. मोदी आधी संघप्रचारक होते. त्यांना ८०च्या दशकाच्या शेवटास भाजपामधे पाठवले गेले. तेथे त्यांनी विविधपातळीवर कामे केली. त्यातून अनुभवी झाल्यावर आणि योग्य वाटल्यावर त्यांना मुख्यमंत्री केले गेले. पुढचा सर्व इतिहास आहे.

ट्रम्प यांना यातील काहीच नाही आहे. ट्रम्प हे काही वाटत असले तरी उजवे नाहीत. ते डावे देखील नाहीत. हिलरी क्लिंटनच्या सिनेट निवडणुकीच्या निधीसाठी त्यांनी भरपूर मदत केली आहे. चेलसी क्लिंटन आणि ट्रम्प यांची मुलगी या मैत्रिणी आहेत. (अथवा होत्या) क्लिंटन दांपत्य ट्रंप यांच्या इस्टेटीवर (मला वाटते युरोपमधे देखील) पाहूणे म्हणून जाऊन आलेले आहे. म्हणून असे सुरवातीस म्हणले गेले होते की क्लिंटन दांपत्यानेच त्यांना प्रोत्साहन दिले, जेणे करून रिपब्लिकन पक्षात गोंधळ होईल. जर ते खरे असले तर हा आता त्यांच्यासाठी तो भस्मासूर ठरला आहे.

गंमत म्हणजे ट्रम्प यांच्या मुलांनी न्यूयॉर्क प्रायमरीमधे (जेथे ते मतदान करू शकले असते तेथे) मतदार म्हणून नोंदवणी न करता मत देण्याचे टाळले असेच म्हणावे लागेल.

ट्रम्प हे यशस्वी उद्योगपती आहेत असे म्हणण्याऐवजी उद्योगी आहेत असे म्हणणे जास्त योग्य ठरेल! :) अर्थात त्यामुळे काही फरक पडत नाही. विशेषतः अमेरीकेत हे नक्कीच चालू शकते आणि चालले पाहीजे देखील. वर चर्चेत दोन्ही बाजूने आलेला मुद्दा जो इतरत्र देखील वाचला ऐकला आहे, तो म्हणजे ट्रम्प निवडणून आल्यावर काय होईल - युद्ध, मुसलमानांवर आणि त्याच लाईनीत सर्वच अल्पसंख्यांकांवर अन्याय वगैरे... मला नाही वाटत तसे काही होईल.

पण तरी देखील ते या सत्तापदासाठी योग्य नाहीत असेच वाटते. त्याचे कारण म्हणजे एकंदरीतच त्यांचे वर्तन आणि वक्तव्ये. (त्यात एकदा स्वतःच्या मुलीच्या रुपाचे विचित्र कौतुक देखील ऐकायला मिळाले). ट्रम्प यांना असलेला अंतर्गत म्हणजे रिपब्लिकन पक्षातला विरोध, हा मोदींना झालेल्या भाजपांतर्गत (अडवाणी वगैरे) विरोधासारखा नाही. येथे खरेच तत्वाचा प्रश्न तयार झाला आहे. एका अधिकृत रिपब्लिकन ब्लॉगरने म्हणल्याप्रमाणे हिलरी कुणालाच (रिपब्लिकन्सना) नको आहे. पण म्हणून अण्वस्त्रांच्या चाव्या ट्रम्पच्या हातात देणे बरोबर ठरणार नाही.... अर्थात हे केवळ उदाहरण म्हणून तो म्हणत होता. पण मुद्दा आहे तो राजकीय नेतृत्व गुणांचा. म्हणूनच अजूनही अनेक रिपब्लिकन नेते हे पाठींबा जाहीर करायला तयार नाहीत. किंबहूना काल ऐकल्याप्रमाणे अनेक जण कन्व्हेंशनला जाणार देखील नाही आहेत.

इतके सगळे असले तरी एक नक्की वाटते - अमेरीकन लोकशाही व्यवस्था (त्यातील गुणदोषांसहीत) खूपच प्रौढ आहे. त्यामुळे जगबुडी होईल असे काही मला वाटत नाही. तसेच क्लिंटन येवोत अथवा ट्र्म्प, ते एक टर्म राष्ट्राध्यक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे.

-------------

जाता जाता विरंगुळा... :)

ज्यांनी कोणी स्पिलबर्गची "बॅक टू द फ्युचर" चित्रपटमालीका पाहीली असेल त्यातील विनोदी खलनायक "बिफ" (Biff) ची कॅरेक्टर ही स्पिलबर्ग आणि त्याच्या टिमने ट्रंपवर रेखाटली आहे. या चित्रपटाच्या भाग दोन मधे वर्तमानात जाताना गडबड होते आणि सगळा काळ आणि वर्तमान बदलले असते. त्याला An alternative time line 1985 A - Paradox म्हणले आहे. कॅसिनोज आणि गुंडगिरी वाढलेली असते. ते विशेष करून ट्रम्प कॅसिनोवर आधारीत होते...

Marty: "I don't get it, Doc. I mean, how can all this be happening? It's like we're in hell or something."

Doc: "No, it's Hill Valley. Although I can't imagine hell being much worse!"
-----

नंदन's picture

28 May 2016 - 12:32 am | नंदन

ट्रम्प हे काही वाटत असले तरी उजवे नाहीत. ते डावे देखील नाहीत.

नेमकं! असलाच तर त्याची धोरणं/मतं (प्रायमरीत बदलण्यापूर्वी) डावीकडे झुकलेली वाटतात - बहुतेक 'न्यू यॉर्क व्हॅल्युज'च्या प्रभावामुळे.

वर चर्चेत दोन्ही बाजूने आलेला मुद्दा जो इतरत्र देखील वाचला ऐकला आहे, तो म्हणजे ट्रम्प निवडणून आल्यावर काय होईल - युद्ध, मुसलमानांवर आणि त्याच लाईनीत सर्वच अल्पसंख्यांकांवर अन्याय वगैरे... मला नाही वाटत तसे काही होईल.

सहमत. शिवाय, अमेरिकन व्यवस्थेतल्या चेक्स अँड बॅलन्सेसमुळे कुणाही एका व्यक्तीला (किंवा ब्रँचला) हटवादीपणे आपलं घोडं पुढे दामटणं सोपं नसतं.

गॅरी ट्रुमन's picture

28 May 2016 - 11:23 am | गॅरी ट्रुमन

अजून एक महत्वाचा भाग - ट्रम्प यांचा विचार करताना आपण साहजिक रेगन यांच्याशी कळत-नकळत तुलना करतो कारण रेगन देखील आधी कलाकार होते (अर्थात राजकारणी नव्हते). ते जरी खरे असले तरी राष्ट्राध्यक्ष होण्याआधी रेगन हे दोन वेळेस म्हणजे ८ वर्षे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते आणि एकदा रिपब्लिकन प्रायमरीत हरलेले देखील होते. हे महत्वाचे का, कारण त्यांना राजकारणाचा आणि राज्यशासनाचा अनुभव होता. हे अगदी नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते. बुश हे गव्हर्नर होते तर चेनी हे मला वाटते, प्रेसिडंट फोर्ड, रेगन आणि मोठ्या बुश यांच्या राज्यात कसले न कसले सेक्रेटरी होते.

रॉनाल्ड रेगन पूर्वी राजकारणी नव्हते त्याचप्रमाणे आयसेनहॉवरही पूर्वी राजकारणी नव्हते तर ते सैन्याचे प्रमुख होते. तरीही आयसेनहॉवर हे वाईट अध्यक्ष होते असे कोणी म्हणेल असे वाटत नाही. रेगन तर अलीकडच्या काळातील चांगलेच लोकप्रिय अध्यक्ष होते. ओबामांचे म्हणाल तर त्यांनाही कितपत अनुभव होता? राष्ट्रीय पातळीवर केवळ साडेतीन वर्षांचा-- इलिनॉयचे सिनेटर म्हणून जानेवारी २००५ ते २००८ च्या निवडणुकीपर्यंत एवढाच राष्ट्रीय पातळीवरील अनुभव त्यांना होता. त्यापूर्वी ७ वर्षे ते इलिनॉय राज्यातील हाऊसचे सदस्य होते. त्याउलट उपाध्यक्ष जोसेफ बायडेन ३६ वर्षांपासून सिनेटचे सदस्य होते म्हणजे त्यांना राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव ओबामांपेक्षा बराच जास्त होता.

प्रशासनाचा आणि राजकारणाचा पूर्वानुभव असणे हा थोडासा ओव्हररेटेड मुद्दा आहे का?

विकास's picture

29 May 2016 - 5:46 am | विकास

प्रशासनाचा आणि राजकारणाचा पूर्वानुभव असणे हा थोडासा ओव्हररेटेड मुद्दा आहे का?

माझ्या मते कसलातरी अनुभव असणे महत्वाचे आहे अगदी एका टोकाच्या विचारसरणीचे राज्य करायचे असले तरी. म्हणजे किमान प्रशासनाचा तरी अनुभव असावा अथवा सत्तेच्या राजकारणाचा तरी... असा विचार करा, इतरत्र म्हणल्याप्रमाणे, मल्या ला सोडा (आय मीन या चर्चेतील वादातून! ;) ) पण उद्या अंबानी बंधू अथवा रतन टाटा पंतप्रधानपदी जाऊन बसले तरी त्यांना अवघड जाऊ शकते. सरकार चालवणे आणि धंदा चालवणे हे जरी वरकरणी समांतर वाटले तरी त्यात जमिन अस्मानाचा फरक आहे. याचा अर्थ असा नाही की टाटा-अंबानींना चालवता येणार नाही पण त्याला वेळ द्यावा लागेल आणि काही अंशी का होईना पण धंदेवाईकाची वस्त्रे बाजूला ठेवावी लागतील...

ट्रम्पच्या बाबतीत लफडे असे आहे की ते बोलतात इतकेव ते काही धंद्यात पण यशस्वी नाहीत. शिवाय आत्तापर्यंत सर्वांनाच दुखावण्याचा चंग बांधला आहे.

ट्रंपना फक्त डावेच विरोध करत आहेत असे नाही तर स्वपक्षिय पण विरोध करत आहेत हे आधी सांगितले आहेच. बरं त्यातील प्रत्येकजण काही politics as usual म्हणणार्‍यातला आणि तसे वागणार्‍यातला नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे अमेरीकन काँग्रेसचा सभापती (स्पिकर) पॉल रायन जो अत्यंत कडक उजवा आहेच, रॉमनी बरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उभा होता. हा शेवटी त्याला पाठींबा देईल ही कदाचीत पण अजूनही ट्रम्पबद्दलचे रिझर्वेशन्स जाहीरपणे सांगत आहे. असे का व्हावे, ह्याचा विचार करायला हवा असे वाटते.

हुप्प्या's picture

27 May 2016 - 11:40 pm | हुप्प्या

(हा प्रतिसाद हिलरीच्या विरुद्ध समजला जाऊ नये. अनुभवी राजकारणी हाच विषय आहे. हिलरीबद्दल नंतर कधीतरी!)
देशाची धुरा संभाळताना राजकारणाचा अनुभव असणे, सरकार चालवण्याचा अनुभव असणे ह्याचा अकारण बाऊ केला जात आहे.
बुश आणि चेनी ह्यांचे अमाप, अफाट, अगाध अनुभव विचारात घेऊनही असे म्हणता येईल की त्यांनी अमेरिकेकरता घातक, दीर्घकाळ मारक ठरणारे, अमेरिकेला दिवाळखोरीकडे नेणारे, अमेरिकेची प्रतिमा काळीकुट्ट करणारे निर्णय घेतले. इराकचे युद्ध हा त्यातला सगळ्यात घातक निर्णय. बुश चेनीची कारकीर्द ही अमेरिकेतील सगळ्यात वाईट राजवट समजली जाते. असे असेल तर प्रशासनाचा अनुभव काय कामाचा? आपल्या मूर्खपणाचे असे दूरगामी घातक परिणाम होतात हे कळण्याची अक्कल नसेल तर निव्वळ त्यांच्या अनुभवाचे काय लोणचे घालायचे आहे का?

हिलरीही अत्यंत अनुभवी, कसलेली मुत्सद्दी वगैरे समजली जाते. तिनेही इराक युद्धाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. जर तिलाही आपल्या निर्णयाची घातकता समजत नसेल तर असल्या राजकारणाच्या पोकळ अनुभवाचा काय उपयोग?

जर व्यावसायिक राजकारणी अशी वाट लावत असतील तर राजकारणापासून अलिप्त असणारे लोक सत्तेवर आणून बघू असा विचार लोकांनी केला तर चूक काय?
शिवाय ओबामाला असा काय सत्तेचे शकट हाकायचा प्रचंड अनुभव होता?

लोकशाहीत लोकांमधून नेता निवडायचा असतो हे आपण विसरता कामा नये. केवळ राजकारणी कारकीर्द असणारेच (करीयर पॉलिटिशियन्स) ह्या पदाला लायक आहेत असा प्रवाद रुजवणे हे घातक आहे.

जर व्यावसायिक राजकारणी अशी वाट लावत असतील तर राजकारणापासून अलिप्त असणारे लोक सत्तेवर आणून बघू असा विचार लोकांनी केला तर चूक काय?
म्हणूनच आपण राहूल गांधींना पंतप्रधान करायला हवे होते! ते व्यवसायाने राजकारणात असून पण अलिप्त राहू शकतात!

विनोदाचा भाग सोडा, ट्रंपला पाठींबा देणारी लोकं ही बहुतांशी त्यांच्या भडक विधानात आपल्याला हवे असलेले ऐकणारी आहेत. म्हणून त्याच्या बाजूने आहेत. मग त्यात कधी मुस्लीम विरोध असतो तर कधी अल्पसंख्य-स्थलांतरीत-मेक्सिकन्स विरोध असतो. कधी गन्स च्या बाजूने बोलणे असते तर बर्‍याचदा स्त्रीयांच्या विरोधात बोलणे असते. आत्ताच्या काळात ज्याला सभ्यतेने बोलणे समजले जाऊ शकेल असे बोलणे ट्र्म्प करत नाहीत. त्यामुळे आपल्याला जे बोलायचे असते तो हा माणूस पब्लिकमधे बोलतो यावर जनता खूष होते.

बुश चेनीची कारकीर्द ही अमेरिकेतील सगळ्यात वाईट राजवट समजली जाते.

म्हणूनच माझ्या प्रतिसादात, "नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते." असे म्हणले होते. पण गंमत माहीत आहे का? या बुश-चेनींनीच परत यावे असे तमाम भारतीयांना - विशेष करूण भारतातील देखील भारतीयांना वाटत होते. कारण त्यांच्या कारकिर्दीत भारतातल्या कंपन्यांना येथे काँट्रॅक्ट्स मिळणे सोपे गेले त्यामुळे आउटसोअर्सिंग वाढले म्हणून...त्या वेळेस देखील असे अनेक डेमोक्रॅटीक अमेरीकन्स होते ज्यांना केरी आवडत नव्हते. पण बुश-चेनी पण नको होते. आज काही वेगळे चाललेले नाही.

देशाची धुरा संभाळताना राजकारणाचा अनुभव असणे, सरकार चालवण्याचा अनुभव असणे ह्याचा अकारण बाऊ केला जात आहे.

प्रश्न नुसत्या राजकारणाचा अनुभवाचा नाही. ट्रम्प यांचे एअरलाईन्स, व्होडका, कॅसिनो, आदी उद्योग बुडीत खात्यात गेले आहेत. कौटूंबिक गोष्टी काढायच्या ठरवल्या तर त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या लग्नांना ग्रीनकार्ड मॅरेजेस म्हणले जाते. ते जर क्वालीफिकेशन असले तर मग आपल्याकडे विजय मल्यांनाच पंतप्रधान करायला हवे. ट्रम्प आज स्वतःचे टॅक्सफॉर्म्स अजून जाहीर करायला तयार नाहीत आणि नुसतेच मी श्रीमंत आहे आणि कुणाकडून पैसे घेणार नाही म्हणत टिमकी वाजवत होते. आता पैसे मागायला लागलेत....

म्हणूनच भारतीय संदर्भ देऊन उदाहरण देयचेच असेल तर इतकेच म्हणेन की, देव न करोत, पण उद्या फक्त आपल्याला दोनच पर्याय असतील - मल्या विरुद्ध केजरीवाल, तर काय करायचे? आज अमेरीकन निवडणुकीची ही अवस्था आहे.

तरी देखील वरील प्रतिसादात म्हणलेले परत लिहीतो, "अमेरीकन लोकशाही व्यवस्था (त्यातील गुणदोषांसहीत) खूपच प्रौढ आहे. त्यामुळे जगबुडी होईल असे काही मला वाटत नाही. तसेच क्लिंटन येवोत अथवा ट्र्म्प, ते एक टर्म राष्ट्राध्यक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे."

असो.

गॅरी ट्रुमन's picture

28 May 2016 - 10:37 am | गॅरी ट्रुमन

या बुश-चेनींनीच परत यावे असे तमाम भारतीयांना - विशेष करूण भारतातील देखील भारतीयांना वाटत होते. कारण त्यांच्या कारकिर्दीत भारतातल्या कंपन्यांना येथे काँट्रॅक्ट्स मिळणे सोपे गेले त्यामुळे आउटसोअर्सिंग वाढले म्हणून..

२००४ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश विरूध्द जॉन केरी अशी लढत होती त्यावेळी भारत सरकारलाही बुशच निवडून यावेत असे वाटत होते असे वाचल्याचे आठवते. तसेच २००८ मध्ये बराक ओबामा विरूध्द जॉन मॅककेन अशी लढत होती तेव्हाही ओबामांचे भारताविषयी धोरण कसे असेल हे स्पष्ट नसल्यामुळे जॉन मॅककेन हे बुश यांचेच भारताविषयीचे धोरण चालू ठेवतील या अपेक्षेने २००८ मध्येही भारताचा कल ओबामांपेक्षा मॅककेन यांच्याकडे होता असेही वाचल्याचे आठवते. याक्षणी याचे संदर्भ लगेच देता येणार नाहीत पण अशा स्वरूपाचे त्यावेळी वाचले होते हे आठवते हे नक्कीच.

एकूणच आधीच्या अध्यक्षांपेक्षा बुश हे भारतासाठी चांगले होते. सप्टेंबर २००८ मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी वॉशिंग्टनला भेट दिली होती त्यावेळी बुश यांच्याविषयी खालील उद्गार काढले होते---

When history is written, it will be recorded that Bush played a historic role in bringing our democracies closer.

The credit for ending India’s nuclear apartheid goes to you.

People of India love you

तसेच मनमोहन आणि बुश यांची ही मिठी प्रसिध्दच आहे---

Bush

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बुश अमेरिकेसाठी आणि इतर जगासाठी कसेही असले तरी भारतासाठी ते चांगले असतील तर भारतातील सरकारला आणि सामान्य नागरिकांना बुशविषयी अधिक आत्मीयता वाटली तर त्यात फार काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही.

त्याचप्रमाणे हिलरी आणि डॉनल्ड ट्रम्प या दोघांमध्ये जर डॉनल्ड ट्रम्प अध्यक्ष होणे भारताला अधिक चांगले असेल तर (हा तर फार महत्वाचा आहे) भारतीयांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला तर त्यात काय चुकले?

पण उद्या फक्त आपल्याला दोनच पर्याय असतील - मल्या विरुद्ध केजरीवाल, तर काय करायचे? आज अमेरीकन निवडणुकीची ही अवस्था आहे.

बापरे!!

विशाखा पाटील's picture

28 May 2016 - 12:37 pm | विशाखा पाटील

याच बुश यांनी मुशर्रफ यांनाही जवळ केले होते. पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड पैसा त्यांच्याच काळात दिला गेला. तो कुठे खर्च होतोय, याकडे मात्र लक्ष नव्हते. पुढे ओबामांच्या काळात केरी- लुगर बिलाने त्यावर नियंत्रण आले.

विकास's picture

29 May 2016 - 6:26 am | विकास

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बुश अमेरिकेसाठी आणि इतर जगासाठी कसेही असले तरी भारतासाठी ते चांगले असतील तर भारतातील सरकारला आणि सामान्य नागरिकांना बुशविषयी अधिक आत्मीयता वाटली तर त्यात फार काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही.

अगदी पूर्णपणे सहमत. तसा असण्यात गैर काहीच नाही. पण म्हणून बूश काही चांगला राज्यकर्ता ठरत नाही. याच अर्थाने वरील कुठल्यातरी प्रतिसादात मॅकेन बद्दल पण आले होते. ओबामा विरुद्ध मॅकेनच्या लढतीच्या वेळेस अनेकांनी ओबामाच्या काश्मिर धोरणावरून साशंकता व्यक्त करत मॅकेनला पाठींबा दिला होता. त्या अर्थाने तो योग्य देखील होता.

पण माझा मुद्दा किंचीत वेगळा आहे. बुश अथवा नंतर ओबामा या दोघांनीही भारताशी असलेले संबंध वृध्दींगतच केले आहेत. केरी हे काही भारताचे सुहृद म्हणता येतील असे नाहीत तरी देखील आजच आलेल्या बातमीनुसार स्टेट डिपार्टेमेंटने पाकीस्तानला सुनावले आहे. मोदी समर्थक म्हणून विचार करायचा झाला तर बुशच्या काळात मोदींचा व्हिसा रद्द केला गेला होता तर ओबामाच्या काळात (आता) पायघड्या घालण्यात येणार आहेत...

हे कशामुळे होते? अर्थातच कृशे कशास्ती सौहृदम न्यायाने दुर्बळाला मित्र नसतो पण जसे आपण आपले स्थान बळकट करतो तसे आपल्या बाजूने सगळे होत जातात. तेंव्हा अमेरीकेतला राष्ट्राध्य़क्ष कोण होणार या पेक्षा आपण कोण होत आहोत हे महत्वाचे आहे. हे केवळ तात्विक अर्थाने म्हणत नाही तर व्यावहारीक अर्थाने म्हणत आहे. म्हणूनच केवळ अमेरीकेवर भर देणे योग्य नाही हे मोदी जाणून आहेत आणि एकीकडे या एकमेव महासत्तेशी मैत्री करत असताना जगात इतरत्र आपले बस्तान बसवत आहेत.

हुप्प्या's picture

28 May 2016 - 7:20 am | हुप्प्या

मल्ल्या आणि ट्रंपची तुलना हास्यास्पद आहे. (राहुल गांधी आणि ट्रंपची तर दखलही न घ्यावी इतकी हास्यास्पद आहे.)
मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. कोर्टाने त्याच्याविरुद्ध जप्तीची नोटीस काढली आहे. ब्रिटनसरकारकडे हस्तांतराची मागणी केलेली आहे. ह्यापैकी कुठली गोष्ट ट्रंपबाबत केली आहे? उद्योग बुडीत गेले असतील. १००% यशस्वी उद्योजक असल्याचा त्याने दावा केलेला नाही. टक्केटोणपे खात त्याची कारकीर्द चालली असेल तर माझी काही हरकत नाही. उद्योगात निर्भेळ यश मिळवणारे दुर्मिळच असतात.

बाकीचे राजकारणी मेक्सिकोतून होणार्‍या घुसखोरीविरुद्ध चकार शब्द काढणे हे आपल्या पुरोगामीत्वाला काळिमा फासणे समजतात. एखाद्या देशात प्रवेश करताना तिथले कायदे मोडणे हे कसे समर्थनीय आहे हे माझ्या आकलनाबाहेर आहे. ट्रंपने त्याविरुद्ध आवाज उठवताच त्याला वर्णद्वेष्टा, वंशद्वेष्टा अशी खास ठेवणीतली दूषणे दिली जातात. बेकायदा कृत्याला विरोध करणे हे चूक का आहे?

मुस्लिम इमिग्रेशनबद्दल ट्रंप नक्की काय म्हणाला होता हे जाणायची तसदी घेतली आहे का? तमाम माध्यमांनी नवा हिटलर जन्माला आला की काय अशा थाटात राळ उडवली आहे. पण तो इतके भयंकर बोलला का? आजिबात नाही.

ट्रंप हा समस्त स्त्री जातीच्या विरोधात आहे हा एक असाच लाडका, माध्यमांनी पोसलेला गैरसमज. त्याने एखाद्या स्त्रीबद्दल गैर उद्गार काढले तर त्यामुळे तो तमाम स्त्रीवर्गाशी असाच वागतो हे कसे ठरवले?

अमेरिकन लोक जाणते, प्रगल्भ आहेत असे वाटत नाही. मूर्ख, अज्ञानी लोक प्रचंड संख्येने आहेत (डावे, उजवे दोन्ही बाजूला). बुशला दोनदा निवडून देणारे अमेरिकनच होते.
पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्‍या बाजूला चान्स मिळेल ही आशा. देव करो आणि हिलरीची पीडा टळो!

नंदन's picture

28 May 2016 - 10:18 am | नंदन

१००% यशस्वी उद्योजक असल्याचा त्याने दावा केलेला नाही.

खरंच? ट्रम्पच्या अनेक भाषणांत तर याच्या उलट चित्र दिसतं.

बाकीचे राजकारणी मेक्सिकोतून होणार्‍या घुसखोरीविरुद्ध चकार शब्द काढणे हे आपल्या पुरोगामीत्वाला काळिमा फासणे समजतात. एखाद्या देशात प्रवेश करताना तिथले कायदे मोडणे हे कसे समर्थनीय आहे हे माझ्या आकलनाबाहेर आहे. ट्रंपने त्याविरुद्ध आवाज उठवताच त्याला वर्णद्वेष्टा, वंशद्वेष्टा अशी खास ठेवणीतली दूषणे दिली जातात. बेकायदा कृत्याला विरोध करणे हे चूक का आहे?

गेल्या आठ वर्षांत २० लाखाहून अधिक बेकायदेशीर निर्वासितांना देशाबाहेर पाठवलं गेलं. सीमेवर तैनात असलेल्या बॉर्डर पेट्रोल एजंट्सची संख्या ही आजमितीस सर्वाधिक आहे. २०१३ मध्ये, सिनेटने (रिपब्लिकन्स + डेमोक्रॅट्स असे ६८ सिनेटर्स मिळून) कॉम्प्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन रिफॉर्म पास केला तेव्हा दोन्ही बाजूंच्या सिनेटर्सची वक्तव्यं ऐकायला हवी होती. मेक्सिकोतून होणारी घुसखोरी ही बेकायदेशीर असून ती रोखायला हवी, याच मंगलाचरणाने सुरूवात करून ओबामानेही या रिफॉर्मवरील चर्चेला तोंड फोडलं होतं, आणि त्यात सीमेवरील सुरक्षा अधिक वाढवण्यासाठी तरतूदही होती. (रिपब्लिकन बहुसंख्या असलेल्या हाऊसने हा रिफॉर्म काही कडव्या मेंबरांच्या आग्रहामुळे साध्या चर्चेसही घेतला नाही.)

याचा अर्थ, सारं काही आलबेल आहे असं नव्हे - पण याविरुद्ध कुणी चकार शब्द काढत नाही वा पुरोगामी त्याच्या आड येतात, किंवा ट्रम्प हाच याविरुद्ध आवाज उठवणारा कुणी क्रांतिकारी आहे (असं तुम्ही म्हटलेलं नाही, पण अनेक ट्रम्पसमर्थकांचा दावा आहे) हा जावईशोध झाला.

शिवाय, इल्लिगल इमिग्रंट्स हे केवळ मेक्सिकोतून येत नाहीत. क्युबातून येणारे निर्वासित आहेतच (ज्यांना 'पॉलिटिकल असायलम' म्हणून स्वीकारलं जातं), पण 'टूरिस्ट व्हिसा' घेऊन येणारे आणि त्याची मुदत संपली तरी इथेच राहणारे इल्लिगल इमिग्रंट्स मोठ्या संख्येने आहेत. विशेषतः इस्ट कोस्टवर, या पद्धतीने, फिलिपिनो कुशल/अकुशल कामगार पुरवठ्याची सुनियोजित साखळी अस्तित्वात आहे. (आपल्याच शेजारी राज्यातून वा उत्तरेतूनही, हा मार्ग चोखाळून आलेले आणि इथे इल्लिगली राहिलेले लोकही आहेत.) भिंत बांधून यांची विमानं कशी अडवणार? दुसरं म्हणजे, हे इल्लिगल इमिग्रेशन बरीच दशकं चालू असल्याने, कित्येकांची पुढली पिढी अमेरिकेत जन्मली - शिकली - सैन्यात वा अन्यत्र नोकरी करू लागली. अमेरिकन भूमीवर जन्म झाल्याने त्यांना नागरिकत्व बहाल करायचं की त्यांच्या पालकांनी वीस-तीस वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना देऊन, त्यांना हाकलून लावायचं - या दोन टोकाच्या भूमिका झाल्या. थोडक्यात, इल्लिगल इमिग्रेशनच्या प्रश्नाला अनेक पैलू आहेत.

ट्रंपवर होणारी टीका ही 'मेक्सिकोतून इथे येणारे लोक हे बहुसंख्येने गुन्हेगार, रेपिस्ट्स असतात' यासारख्या विधानांमुळे होते आहे, इल्लिगल इमिग्रेशनबद्दल तर १७ पैकी प्रत्येक रिपब्लिकन उमेदवार बोंबा मारत होता की.

ट्रंप हा समस्त स्त्री जातीच्या विरोधात आहे हा एक असाच लाडका, माध्यमांनी पोसलेला गैरसमज. त्याने एखाद्या स्त्रीबद्दल गैर उद्गार काढले तर त्यामुळे तो तमाम स्त्रीवर्गाशी असाच वागतो हे कसे ठरवले?

एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल, मेगन केली, हिलरी क्लिंटन, हायडी क्रुझ (टेड क्रुझची पत्नी), कार्ली फिओरिना अशी उज्ज्वल परंपरा आहे की अलीकडची. शिवाय गर्भपाताबद्दल स्त्रियांना शिक्षा व्हायला हवी, हेही आहेच. (नंतरचं खास राजकारणी घूमजावही मजेदार होतं). अर्थात, अशा बेलगामी विधानालाही वैट्ट, वैट्ट, दूश्ट मीडियाच कारणीभूत असेल ना?

पण, ट्रम्प हा स्त्रीद्वेष्टा किंवा स्त्रीजातीच्या विरोधात आहे, असं मलाही वाटत नाही - तो कुणाबद्दलही जेंडर-न्यूट्रल गैरउद्गार काढू शकतो! :)

चतुरंग's picture

28 May 2016 - 10:43 am | चतुरंग

इल्लीगल इमिग्रंट्स हे अनेक सीनेटर्स आणि काँग्रेसमन्सच्याच आशीर्वादाने शेतीशी संबंधित आणि अन्नौद्योगाशी संबंधित उद्योगधंद्यांमध्येच अतिशय स्वतातले अकुशल कामगार म्हणून राबवले जातात हे सत्य आहे. इथल्या मिनिमम पे रेटने हे कामगार लीगली आणायचे म्हंटले तर अमेरिकेतले उरलेलेही सगळे छोटेमोठे उद्योग बाहेर हाकलून लावायची वेळ येईल अशी परिस्थिती आहे. कोणी कितीही बोंबा मारल्या तरी लोक येत राहणार त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कॄप्त्या लढवून भाषणबाजी होत राहणार यापेक्षा जास्ती काही शक्य आहे असे दिसत नाही. आणि याला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोघेही जबाबदार आहेत.
हा ट्रंप नुसता दिसला तरी माझी तळपायाची आग मस्तकाला जाते बुवा! :(

(अवांतर - कधी नव्हे ते चक्क नंदनलाही, प्रतिसाद का होईना, लिहिण्यास भाग पाडले म्हणजे हा ट्रंप किती डोक्यात जात असेल बघा!! ;) )

हुप्प्या's picture

29 May 2016 - 2:21 am | हुप्प्या

घुसखोरी थांबव़ली तर अमेरिकन अर्थव्यवस्था रसातळाला जाईल हा एक बिनबुडाचा जावईशोध आहे. तसे काहीही होणार नाही. दर वर्षी लाखो बेकायदा लोक घुसतात. आणि ते अमेरिकेतच रहातात. शेतकामगारांची गरज ही अशी नित्य वाढती आहे का? कामाकरता व्हिसा मिळवणे सोपे करावे इतके अमेरिकन सरकारला करणे शक्य नाही का? केवळ घुसखोरीचाच पर्याय उपलब्ध आहे हा गोड गैरसमज माध्यमांनी जोपासलेला आहे.
ट्रंपला अकारण एक काळाकुट्ट खलनायक म्हणून रंगवले जात आहे. बेकायदा घुसखोरीबद्दल आक्रमक असणे मला तरी आवडते. अशा बेकायदा कृत्याला डोक्यावर घेऊन कौतुकाने नाचले की माझी तळपायाची आग मस्तकात जाते बुवा!

चतुरंग's picture

30 May 2016 - 7:27 am | चतुरंग

आहे असं कोण म्हणालंय? त्याबद्दल आक्रमक असू नये असेही म्हणणे नाही. परंतु घुसखोरी आणि त्याविरुद्ध यंव करु अन त्यंव करु अशी टोकाची भूमिका घेणे यांच्यापासून सद्यस्थिती ही कोसो दूर असली तर शहाणा माणूस विचार करेल ना की बाबा हे आरडाओरड करताहेत तसं खरंच शक्य आहे का? का यात राजकारण जास्त आणि प्रत्यक्ष कार्यवाही नाममात्र असे असणार आहे? मी वरती म्हंटलेच आहे की याला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत त्यामुळे वरकरणी वाटते त्यापेक्षा या प्रश्नाची पाळेमुळे भलतीच खोल गेलेली आहेत. असो यापेक्षा जास्त चर्चा शक्य नाहीये मला.

हुप्प्या's picture

29 May 2016 - 2:44 am | हुप्प्या

>>एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल, मेगन केली, हिलरी क्लिंटन, हायडी क्रुझ (टेड क्रुझची पत्नी), कार्ली फिओरिना अशी उज्ज्वल परंपरा आहे की अलीकडची. शिवाय गर्भपाताबद्दल स्त्रियांना शिक्षा व्हायला हवी, हेही आहेच. (नंतरचं खास राजकारणी घूमजावही मजेदार होतं). अर्थात, अशा बेलगामी विधानालाही वैट्ट, वैट्ट, दूश्ट मीडियाच कारणीभूत असेल ना?
<<
टेड क्रुझने ट्रंपच्या बायकोचा उत्तान फोटो प्रकाशित केला होता. रोझी आणि ट्रंपचे जुने वैर आहे. (रोझीला स्त्री म्हणावे का नाही हा वादाचा विषय आहे. पण ते जाऊ द्या!) हिलरीबद्दल स्त्री म्हणून काय अनुदार उद्गार काढले आहेत? ही यादी तमाम स्त्रीवर्गाचे प्रतिनिधित्व करते का?
गर्भपाताबद्दलचे विधान मागे घेतले आहे. तेवढे माझ्या लेखी पुरे आहे. ज्या प्रकारे ख्रिस मॅथ्युजने ट्रंपकडून वदवून घेतले होते ते पहाता ते ट्रंपचे खरे मत नव्हते असे माझे मत आहे.

इलिगल इमिग्रेशनबद्दल खणखणीत आवाजात बोलणारा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा माझ्या आठवणीत ट्रंप हाच आहे. बाकी लोक बोलतात ते एक उपचार म्हणून बोलतात. बहुतेक वेळा बेकायदा लोकांना कायदेशीर बनवण्यापूर्वी एक बोलाचीच कढी बोलाचाच भात इतपत बेकायदा घुसखोरीला विरोधी बोलतात.
बाकी मार्गाने बेकायदा इमिग्रेशन होते म्हणून मेक्सिकोतून होणारेही गोड माना हा काय मूर्खपणा आहे? कुठूनही बेकायदा स्थलांतर होता कामा नये.

मेक्सिकोतून बेकायदा घुसणार्‍यात अगदी १ टक्का जरी गुन्हेगार असतील तरी ते अनिष्टच आहे. अमेरिकेत पुरेसे गुन्हेगार असताना ही आणखी विकतची डोकेदुखी कशाला हवी आहे? मेक्सिकन सरकारला त्यांची डोकेदुखी संभाळू दे. शिवाय सॅक्चुअरी सिटी सारखे विकृत प्रकार सॅन फ्रॅन्सिस्कोत बनले आहेत जे इमिग्रेशनच्या कायद्याला सरळसरळ धाब्यावर बसवतात. गेल्या वर्षी सॅन फ्रॅन्सिस्कोत अशा घुसखोर गुन्हेगाराने एका निरपराध तरूण स्त्रीला गोळी घालून मारले. तिच्या आईबापासमोर बेकायदा घुसखोरीचे समर्थन करता येते का पहा!
मेक्सिकोतून येणारे घुसखोर हे काही हार्ट सर्जन, ब्रेन सर्जन, नॅनो टेक्नोलॉजी तज्ञ असे नसतात. अशिक्षित, अर्धशिक्षित, हातावर पोट असणारे लोकच अमेरिकेत बेकायदा घुसतात. अशा लोकांना पोसायची जबाबदारी अमेरिकेवर का?

नंदन's picture

30 May 2016 - 5:48 am | नंदन

बाकी मार्गाने बेकायदा इमिग्रेशन होते म्हणून मेक्सिकोतून होणारेही गोड माना हा काय मूर्खपणा आहे? कुठूनही बेकायदा स्थलांतर होता कामा नये.

मी असं विधान कुठं केलंय? असो, चर्चा आता ताशेरेबाजीवर उतरली असल्याने माझ्याकडून पूर्णविराम.

विकास's picture

29 May 2016 - 2:21 am | विकास

पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्‍या बाजूला चान्स मिळेल ही आशा.

इतका मनस्ताप होण्याचे कारण कळेल का?

रॉनाल्ड रेगन यांनी १९८० मध्ये मेक्सिकन घुसखोरांविषयी काय म्हटले होते याविषयीचा एक अ‍ॅन्करींग पॉईंट मिळावा म्हणून हा व्हिडिओ डकवत आहे.

रेगनही त्याच रिपब्लिकन पक्षाचे आणि दोन सलग टर्म अध्यक्ष होते (१९८१ ते १९८९) आणि अत्यंत लोकप्रियही होते.

जज Gonzalo P. Curiel -

जन्म - इस्ट शिकागो, इंडियाना राज्य, इ. स. १९५३
शिक्षण - बी.ए. + Juris Doctor, इंडियाना युनिव्हर्सिटी, इ. स. १९७९

अनुभव -
१९७९ ते १९८९ - प्रायव्हेट प्रॅक्टिस
१९८९ ते २००६ - असिस्टंट यू.एस. अ‍ॅटर्नी, कॅलिफोर्निया (*१९८९ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.)
२००६ ते २०१२१ - जज ऑफ सुपिरियर कोर्ट, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया (*२००६ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.)
२०१२ ते आतापर्यंत - जज, यू.एस. डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया (*यू.एस. सिनेट ज्युडिशियरी कमिटी आणि संपूर्ण सिनेटकडून मान्यता)

. . .

गेली सहा वर्षं (२०१० पासून - म्हणजे ट्रम्पने अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलं, त्याच्या कितीतरी आधी), ट्रम्प युनिव्हर्सिटीच्या विरोधात खटला चालू आहे. या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीतून ट्रम्पने भरपूर फी घेऊन ($३५,००० च्या घरात), त्या बदल्यात जाहिरात केलेल्या गोष्टी/कोर्सेस शिकवले नाहीत, असं त्याचं स्वरूप आहे. सध्या ही केस जज गोन्झालो क्युरिअल यांच्यासमोर असून, तिची सुनावणी नोव्हेंबरमध्ये (२०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर) आहे.

आज सॅन डिएगो शहरात एका सभेत बोलताना, ट्रम्पने जज क्युरिअल यांच्याबद्दल खालील भाष्य केलं:

Trump leveled a series of blows against Curiel. He called him “a hater of Donald Trump” and “very hostile” person who had “railroaded” him.....“I think Judge Curiel should be ashamed of himself. I think it’s a disgrace that he’s doing this.” Trump brought up Curiel’s ethnicity: “The judge, who happens to be, we believe, Mexican…

डॉनल्ड ट्रम्प एका अर्थी आतापर्यंतच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांपेक्षा वेगळे आहेत. रिपब्लिकन पक्ष हा "फ्री मार्केट" वाला म्हणजे उजवा पक्ष समजला जातो. रॉनाल्ड रेगन अशा उजव्यांपैकी सर्वात आघाडीचे अध्यक्ष होते असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक विजेते मिल्टन फ्रिडमन हे एकंदरीतच रिपब्लिकन पक्षाच्या जवळचे समजले जात. याचे कारण मिल्टन फ्रिडमन हे "फ्री मार्केट" चे आघाडीचे पुरस्कर्ते होते.

युट्यूबवर कोणीतरी डॉनल्ड ट्रम्प यांनी परदेशांशी केलेल्या व्यापाराविरूध्द एका मुलाखतीत काय बोलले आहे आणि नेमक्या त्याच मुद्द्यांवर मिल्टन फ्रिडमन यांनी काय म्हटले आहे याचा खाली दिलेला व्हिडिओ बनविला आहे:

१. ट्रम्प म्हणत आहेत की ते अध्यक्ष झाल्यास परदेशातून आयात केलेल्या मालावर आयातकर लावतील. त्यावर फ्रिडमन म्हणतात-- ट्रेड डेफिसिट ही वाईट गोष्ट अजिबात नाही. फ्रिडमनच्या काळात जपानचा प्रचंड ट्रेड सरप्लस होता. पण जपानने अमेरिकेत निर्यात करून जमा केलेले डॉलर जमा करून त्याचा उपयोग काय केला? तर अमेरिकेतच शेअर/प्रॉपर्टी विकत घेतली. ते वाईट कसे? फ्रिडमनच्या मते फ्री ट्रेड "benefits large group at the expense of small group. However small group is always politically more influential".

२. ट्रम्प परत चीनमधून आयात केलेल्या मालावर आयातकर लावतील असे म्हटले. त्यावर फ्रिडमन म्हणतात की लोकांचा फ्री ट्रेडला विरोध का करतात? त्याचे एक कारण म्हणजे उत्पादकांचा दबाव असतोच पण त्याचबरोबर दोन देशांमधील चलनांच्या Floating Exchange Rate चा नक्की काय परिणाम होईल हे बहुसंख्य लोकांना समजत नाही. तसेच फ्रिडमनने म्हटले आहे की जपानचा ट्रेड सरप्लस जास्त का? कारण जपानचा saving rate अमेरिकेपेक्षा जास्त आहे. आणि एवढ्या सेव्हिंगचे पुढे काय करायचे? तर त्यातून निर्यात वाढते. अर्थातच मिल्टन फ्रिडमन म्हणत आहेत ते एक अर्थशास्त्रीय तथ्य आहे. फ्रिडमनने पुढे हेनरी जॉर्ज या अभ्यासकाने फ्री ट्रेडविषयीचे मत मांडले---"It is a very interesting thing in time of war we blocade our enemies in order to prevent them getting goods from us. In time of peace, we do it to ourselves by tarrif what we do to ourselves in peace what we do to our enemies at the time of war"

आणि अर्थातच डॉनल्ड ट्रम्प यांचे आताचे धोरण रिपब्लिकन पक्षाच्या धोरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने डॉनल्ड ट्रम्प यांना हर्बर्ट हूव्हर (१९२९ ते १९३३ या काळातील अध्यक्ष) यांच्यानंतर फ्री ट्रेडच्या सर्वात जास्त विरोधात असलेला अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असे म्हटले आहे.

तसेच मेक्सिकन घुसखोरांविषयी मिल्टन फ्रिडमन (आणि वर दिलेल्या व्हिडिओत रॉनाल्ड रेगन) यांच्या मताच्या पूर्ण वेगळे मत ट्रम्प यांचे आहे. फ्रिडमन म्हणतात की immigration नोकरीसाठी होणे आणि वेलफेअरसाठी होणे (सोशल सेक्युरिटी इत्यादी) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर मेक्सिकन घुसखोर अवैधपणे येत असतील तर त्यांना वेलफेअर नक्कीच मिळणार नाही आणि अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात. त्यातून त्या लोकांचे आणि अमेरिकेतील लोकांचेही हितच होते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे immigration जर बेकायदा असेल तरच ही गोष्ट फायदेशीर ठरेल. जर का त्या लोकांना सोशल सेक्युरिटी आणि तत्सम फायदे मिळायला लागले तर ते फायदेशीर ठरणार नाही.

एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर फ्रिडमन यांनी उत्तर दिले---हे मेक्सिकन लोक अमेरिकेत यायला इतकी धडपड करतात याचाच अर्थ त्यांना तिथे मिळेल त्यापेक्षा अधिक चांगले जीवन अमेरिकेत जगायला मिळेल ही खात्री आहे. आणि अमेरिकेत जा म्हणून त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली नाही. त्यांच्यापुढे मेक्सिकोत राहणे आणि अमेरिकेत जाणे हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी त्यांच्या मते चांगल्या पर्यायाची ते निवड करतात. बेकायदापणे घुसखोरी करणे हा पण फार चांगला पर्याय आहे असे नाही पण तो मेक्सिकोत राहण्यापेक्षा अधिक चांगला आहे (म्हणूनच ते अमेरिकेत जायला धडपडत असतात). आणखी दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकन लोकांच्या पूर्वजांनी युरोपातून immigration केल्यानंतर ज्या आव्हानांना तोंड दिले त्याच टप्प्यातून मेक्सिकोतून आलेले लोक जात आहेत.

याविषयी पुढील व्हिडिओ रोचक ठरेल. साधारण तीन मिनिटांनंतर हे सगळे मुद्दे येतील.

म्हणजे डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाची आतापर्यंतची भूमिका होती त्यापेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या पारंपारिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हायची शक्यता नक्कीच आहे. आणि त्यामुळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे काही मतदार रिपब्लिकन पक्षाच्या बाजूला वळतील ही पण शक्यता आहे. आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्या रॅश पध्दतीमुळे काही रिपब्लिकन मतदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूला वळतील ही पण शक्यता आहेच.

एकूणच ही निवडणूक रोचक होणार आहे हे नक्कीच.

Dportation

वरील आलेख हा होमलँड सिक्युरीटीच्या अधिकृत विदाचा वापर करून Pew Research Center ने तयार केला आहे. जरी आलेख हा सुस्पष्ट असला तरी, थोडक्यात - ओबामाच्या काळात सर्वाधिक बेकायदेशीर घुसखोरांना परत पाठवले गेले आहे. म्हणून त्यांना उपरोधाने, "डिपोर्टर-इन-चीफ" असे म्हणू लागले आणि लॅटीनो समाजात त्यांच्याबद्दल नाराजी तयार झाली होती. पण ओबामाने त्याला भिक घातलेली नाही. तेच ओबामाने दहशतवाद्यांना मारण्याच्या बाबतीत केलेले आहे, अगदी परदेशी सीमेच्या आत हल्ले करून, जे बुश सरकारने पण केलेले नव्हते (अर्थात जाहीर युद्ध सोडून).

मला वाटत नाही की तुमचा तसा उद्देश असावा, पण ट्रम्प हे एकोहं द्वितियोनास्ती आहेत. ;) (एकमेवाद्वितीय अर्थाने नाही!) मेक्सिकन जज संबंधात वर नंदन ने आधी लिहीले आहेच. सध्या त्याच प्रकरणावरून म्हणजे ट्रंप विद्यापिठातील गैरव्यवहारावरून ज्यांच्या अख्त्यारीत हे प्रकरण चालवले जात आहे त्या न्यायमुर्ती गोन्झॅलो क्युरिएल यांना ट्रंप मेक्सिकन म्हणून हिणावत आहेत. थोडक्यात ट्रंप हे काही केवळ बेकायदेशीर घुसखोरांना विरोध करत नसून वांशिकतेला पण खतपाणि घालत आहेत. गेल्या आठवड्यातील कॅलिफोर्नियातील एका सभेत तेच त्यांनी एका कृष्णवर्णियाला उद्देशून केले:

Donald Trump clumsily sought to tout his support among African-Americans on Friday by pointing out a black man in the crowd at a rally and calling him “my African-American.”

Sounding like a plantation owner more than a presidential candidate, Trump pointed at the man and said: “Oh, look at my African-American over here!”

“Are you the greatest?” he added. “You know what I’m talking about? OK.”

त्यामुळे ट्रंप यांची असली विधाने आणि त्याहूनही अधिक वर्तने ही भारतीयांच्या मागे पण लागू शकतात...

--------

फ्रिडमनच्या काळात जपानचा प्रचंड ट्रेड सरप्लस होता. पण जपानने अमेरिकेत निर्यात करून जमा केलेले डॉलर जमा करून त्याचा उपयोग काय केला? तर अमेरिकेतच शेअर/प्रॉपर्टी विकत घेतली. ते वाईट कसे? फ्रिडमनच्या मते फ्री ट्रेड "benefits large group at the expense of small group. However small group is always politically more influential".

जपानने केले तेंव्हा अमेरीकेस भिती नव्हती. पण तेच आता चीन करत आहे आणि ते भितीदायक वाटत आहे. कारण चिनी आणि इतरही राष्ट्रे केवळ शेअर/प्रॉपर्टीच घेत आहेत असे नाही तर ते युएस बाँड्स पण घेत आहेत. त्यासगळ्याचे कारण अमेरीकन अर्थ आणि एकूणच व्यवस्थेबद्दल असलेला विश्वास. पण त्याचे परीणाम हे देश म्हणून (अर्थशास्त्र म्हणून नाही) धोकादायक ठरू शकतात असे म्हणणारा पण विचारप्रवाह आहे. माझ्या लेखी ह्या दोन्ही विचारपद्धती किंचीत टोकाच्या आहेत. उत्तर कुठेतरी मधे आहे. असो.

गॅरी ट्रुमन's picture

6 Jun 2016 - 11:03 am | गॅरी ट्रुमन

जपानने केले तेंव्हा अमेरीकेस भिती नव्हती. पण तेच आता चीन करत आहे आणि ते भितीदायक वाटत आहे. कारण चिनी आणि इतरही राष्ट्रे केवळ शेअर/प्रॉपर्टीच घेत आहेत असे नाही तर ते युएस बाँड्स पण घेत आहेत. त्यासगळ्याचे कारण अमेरीकन अर्थ आणि एकूणच व्यवस्थेबद्दल असलेला विश्वास.

याचे अर्थशास्त्रीय उत्तर इथे देतो आणि राजकीय उत्तर याच प्रतिसादात खाली देतो.

एका मर्यादापुढे ट्रेड imbalance (deficit/surplus) असणे वाईट. याचे कारण एखादा देश फार प्रमाणावर निर्यातीवर अवलंबून असेल आणि ज्या देशांमध्ये निर्यात केली जात आहे त्या देशांमध्ये मंदी आली तर त्याचे परिणाम त्या देशावर होतात. चीनने इतकी वर्षे निर्यातीवर आधारीत अर्थव्यवस्था ठेवली आहे आणि देशांतर्गत consumption वाढवायचा तितका प्रयत्न केलेला नाही. पूर्वी चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेपुढे लहान होती तेव्हा ते चालून गेले. पण मधल्या काळात अमेरिका आणि युरोपमध्ये मंदी आल्यामुळे तिथून मागणी कमी झाली. चीनमध्ये स्लोडाऊन आला आहे त्यात हे पण एक कारण आहेच. त्यामुळे झाले असे की २०१२-१३ च्या काळात जगाची गाडी पूर्वीप्रमाणे रूळावर आणायला इंजिन म्हणून अमेरिका सक्षम नव्हती, युरोप तर नाहीच. चीनमध्ये ती क्षमता होती पण या कारणामुळे चीनही ते काम करू शकले नाही आणि याचा सगळ्यांवरच परिणाम झाला.

नोव्हेंबर २००८ मध्ये आर्थिक संकटावर उपाय शोधायच्या दृष्टीने पिट्सबर्गमध्ये जागतिक नेत्यांची (जी-२०) परिषद भरली होती. त्यावेळी मनमोहनसिंगांनी हेच मत मांडले होते. रघुराम राजन यांनीही एका मर्यादेपुढे ट्रेड imbalance (deficit/surplus) असू नये असेच म्हटले आहे. पण फ्री ट्रेडला विरोध करणारे (ट्रंप, सँडर्स इत्यादी) या कारणामुळे विरोध करत नाहीत. वर दिलेल्या व्हिडिओत तर ट्रंप म्हणत आहेत-- अमेरिका चीनला श्रीमंत व्हायला हातभार लावत आहे आणि अमेरिकेतून पैसे बाहेर जात आहेत म्हणून फ्री ट्रेड वाईट.

एक उदाहरण म्हणून असे समजू की अमेरिकन ग्राहकांनी वॉलमार्टमधून १ लाख डॉलरच्या मेड इन चायना वस्तू खरेदी केल्या. हे १ लाख डॉलर चीनमध्ये गेले. त्याचे चीन काय करेल?

१. १ लाख डॉलरच्या अमेरिकन उत्पादनांची खरेदी करेल (डेल कॉम्प्युटर, फोर्ड- जी.एम इत्यादी गाड्या, जी.ई किंवा रोल्स रॉईस इत्यादी कंपन्यांची इंजिनिअरींग उपकरणे इत्यादी) किंवा १ लाख डॉलरच्या अमेरिकन सेवांची खरेदी करेल (सॉफ्टवेअर लायसन्सेस इत्यादी)
२. १ लाख डॉलरचे शेअर किंवा बाँड अमेरिकेत खरेदी करेल

यापैकी (१) मध्ये ट्रेड डेफिसिट शून्य असेल कारण जेवढी वस्तूंची/सेवांची आयात तेवढीच निर्यात असेल. (२) मध्ये ट्रेड डेफिसिट १ लाख डॉलर असेल कारण १ लाख डॉलरचे शेअर/बाँड घेतले तर ते आयात/निर्यातीच्या करंट अकाऊंटमध्ये नाही तर कॅपिटल अकाऊटमध्ये गणले जातात. मग १ लाख डॉलरची आयात तितकी वाईट आहे का?

दुसरे म्हणजे चीनने अमेरिकन सरकारचे बाँड मोठ्या प्रमाणावर घेतले आहेत त्याचा अमेरिकेला काहीच फायदा झाला नाही का? त्यातून बाँडची मागणी वाढून किंमती वाढल्या आणि अमेरिकन सरकारला बाँडवर व्याज कमी द्यावे लागले. अमेरिकन लोक एकूणच बचत वगैरे करायच्या फार भानगडीत पडत नाहीत. हा त्यांचा स्वभाव झाला.एका अर्थी चीन किंवा इतर देशांनी घेतलेल्या बाँडमुळे अमेरिकन लोकांच्या भरमसाठ consumption ला हातभार लागला नाही का? त्याउलट चीनमध्ये इतकी वर्षे लोक मोठ्या प्रमाणावर बचत करत होते (यापुढे काही वर्षे देशात वृध्दांचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे हे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी राहिल). एवढे वाचलेले पैसे घेऊन चीन काय करत होते? तर त्यातून निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेन्ट करत होते आणि निर्यात वाढवत होते.

तेव्हा मिल्टन फ्रिडमनचा हाच दावा आहे. त्यावेळी जपानमध्ये (आणि नंतर चीनमध्ये) बचतीचा दर जास्त होता आणि अमेरिकेत तो कमी होता हे ट्रेड डेफिसिटचे मोठे कारण आहे.तेव्हा चीनमधील आयातीवर आयातकर लावू, याच्यावर बंदी टाकू, त्याच्यावर बंदी टाकू इत्यादी म्हणणे म्हणजे साप साप म्हणून जमीन धोपटण्यासारखे झाले. जे काही होत आहे त्याचे कारण अन्यत्र नाही तर आपल्यातच दडलेले आहे हे यांना कोण आणि कसे समजावणार?

त्यासगळ्याचे कारण अमेरीकन अर्थ आणि एकूणच व्यवस्थेबद्दल असलेला विश्वास. पण त्याचे परीणाम हे देश म्हणून (अर्थशास्त्र म्हणून नाही) धोकादायक ठरू शकतात असे म्हणणारा पण विचारप्रवाह आहे. माझ्या लेखी ह्या दोन्ही विचारपद्धती किंचीत टोकाच्या आहेत. उत्तर कुठेतरी मधे आहे. असो.

पण तसा धोका निर्माण करताना चीनला स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारावी लागेल त्याचे काय? इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्यात अमेरिकेत होत असल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या सशक्त असण्यातच चीनचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळेच २००८-०९ मध्ये चीनच्या सॉव्हरीन वेल्थ फंडने मॉर्गन स्टॅनले सारख्या संस्थांमध्ये गुंतवणूक करून त्या संस्थांना एका अर्थी हात दिला. कारण त्यावेळी अमेरिकेत आणखी संकट गडद होणे चीनलाही परवडणारे नव्हते. आणि स्वतःला दुप्पट नुकसान झाले तरी दुसर्‍यांना थोडेतरी नुकसान करायचे ही मनोवृत्ती चीनची असेल असे वाटत नाही. (ती मोनोपॉली पाकिस्तान, इसिस आणि तत्सम प्रवृतींकडे).

हुप्प्या's picture

9 Jun 2016 - 1:31 am | हुप्प्या

एखाद्या बोटीला एक मोठे भोक पडले असेल तर बोटीतले पाणी उपसणे महत्त्वाचे आहे पण तितकेच किंवा त्याहून जास्त महत्त्वाचे ते भोक बंद करणे आहे. कितीही जोरात पाणी उपसले तरी जोवर ते भगदाड बुजत नाही तोपर्यंत त्या पाणी उपसण्याचा हवा तो परिणाम होणार नाही.
बोटीला पडलेले भोक हे बोटीचे भूषण आहे असे मानणारे लोक फार असल्यामुळे भगदाड बुजवण्याच्या विचाराला नाके मुरडली जातात! ट्रंपला तसे वाटत नाही आणि बहुतांश लोक त्याच्या मागे आहेत.

विकास's picture

9 Jun 2016 - 2:00 am | विकास

अजून तुम्ही मला या प्रतिसादाला उत्तर दिलेले नाही. थकले रे डोळे माझे अशी अवस्था झाली आहे हो! ;)

पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्‍या बाजूला चान्स मिळेल ही आशा.

इतका मनस्ताप होण्याचे कारण कळेल का?

हुप्प्या's picture

9 Jun 2016 - 9:41 pm | हुप्प्या

ओबामा अनेक पातळीवर निराशाजनक ठरला आहे. ग्वांटानमो बे चा बेकायदा तुरुंग बंद करायचे आश्वासन पाळले नाही. ओसामाला ठार केल्यावर अतिरेकी इस्लामचे लांगूलचालन करायचा सपाटा लावला. बेनगाझी प्रकरण हे त्याचे मोठे उदाहरण. कायद्याच्या कचाट्यात कोणी सापडेल का नाही ते नंतर पाहू. पण अमेरिकन सरकारचे वागणे नैतिकदृष्ट्या अत्यंत चूक होते. मुस्लिम दहशतवाद मुस्लिम नाहीच असे म्हणायचा आडमुठेपणा आणि ढोंगीपणा. हा अत्यंत घातक आहे.
सिरियातून अमाप संख्येने निर्वासित घेण्याचा ओसंडून जाणारा उत्साह. ह्यातले ०.००१ टक्के जरी अतिरेकी असतील तरी मला तो धोका पत्करावासा वाटत नाही. उलट सौदी अरेबियासारख्या तथाकथित मित्रराष्ट्राला त्यांना मदत करावी म्हणून दबाव आणायला हवा होता. इथेही ओबामा बेजबाबदार आहे.
बेकायदा घुसखोरीचे तर विचारूच नका. कुठल्याही प्रकारे ह्या प्रकाराला आळा घालायचे धोरण आखले जात नाही. घुसखोर हे अमेरिकन नागरिकांपेक्षाही श्रेष्ठ आहेत की काय अशी शंका येत आहे.
पुरुष स्त्री ह्यांची स्वच्छतागृहे वेगळी असू नयेत ह्या करता कायदा बदलणे हे पॉलिटिकल करेक्टनेसचा अतिरेक करण्याचे उदाहरण. अमेरिकेपुढे बाकी प्रश्न नाहीत का की हा इशू उकरुन काढावा? किती लोकांना ह्या धोरणाचा फायदा होणार आहे आणि किती लोकांना त्रास होणार आहे ह्याचा विचार केला आहे का?

अल्पसंख्यांकाचे लांगूलचालन हेही डोईजड वाटू लागले आहे. अनेक अल्पसंख्य संघटना ज्यांचे वागणे, विचार हे हिंसक, घातक आहेत त्यांच्याशी वागताना बोटचेपेपणा केला जात आहे.

मलातरी ह्यात बदल झालेला आवडेल. पण एकंदरीत तसे होणे अवघड दिसते आहे. हिलरीचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.

विकास's picture

9 Jun 2016 - 2:14 am | विकास

कितीही जोरात पाणी उपसले तरी जोवर ते भगदाड बुजत नाही तोपर्यंत त्या पाणी उपसण्याचा हवा तो परिणाम होणार नाही.

तुम्ही कुठं राहता याची मला कल्पना नाही. पण इतका तळतळाटाने बोलणे चालले आहे म्हणून कदाचीत अमेरीकेत राहत असाल असे गृहीत धरतो. अर्थातच अधिकृतपणे रहात असाल असेच समजतोयं, कल्जी नसावी! पण टाईम्समधील बातमीनुसार २०१२ च्या आकडेवारीनुसार जवळपास ४५०,००० बेकायदेशीर भारतीय रहात आहेत. म्हणजे मग आता ते कसे बंद करायचे म्हणे?

तुम्ही जे भगदाड वाटतयं ते खालील माहितीप्रमाणे कमी झालयं हो!

Mexican immigration

हा तर ग्राफ अजूनच गंमतशीर आहे!

Net Mexican immigration

अर्थात तुम्हाला हिटलरशाहीच हवी असली तर गोष्ट वेगळी.

आणि हो, डाव्यांना विरोध असला तर समजू शकतो. तो तसा माझा पण असतो पण आंधळा व्देष करणे मला तरी जमत नाही. त्यांच्याकडून जे काही घेता येते ते मी घेयचा प्रयत्न करतो. असो.

हुप्प्या's picture

9 Jun 2016 - 9:48 pm | हुप्प्या

मुद्दे संपले की विरोधकांना हिटलरशाही हवी आहे वगैरे कांगावा करायचा शॉर्टकट चांगला आहे! मीही वापरून बघीन कधीतरी! असो.

बेकायदा घुसखोरी ही कमी होते आहे का जास्त. शून्य आहे का लाखात हा मुद्दा गौण आहे. सीमेचे रक्षण करणे ही अमेरिकन सरकारची जबाबदारी आहे. घुसखोरांची संख्या आपोआप कमी होते आहे का नाही हे न बघता सीमा सुरक्षित केली गेलीच पाहिजे. मग भिंत बांधा वा कुंपण. जे येणार ते कायदा पाळूनच आले पाहिजेत. कुणीतरी किती लोकांची गरज आहे, काय प्रकारचा अनुभव पाहिजे, जे येत आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळे तपासून मगच त्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे. कुणीही यावे आणि अमेरिकेत घुसावे ह्याला विरोध म्हणजे हिटलरशाही अशी आपली व्याख्या असेल तर आपण एकदा हिटलरचा आणि त्याच्या नाझी संघटनेचा नीट अभ्यास करावा असा माझा अनाहूत सल्ला आहे.

बेकायदा भारतीय अमेरिकेत येत असतील तर त्यावरही उपाय केलाच पाहिजे. दंड, तुरुंग, हकालपट्टी जे काही उचित आहे ते. पण बेकायदा मेक्सिकनचा मुद्दा असताना बेकायदा भारतीयांकडे बोट दाखवून बेकायदा मेक्सिकन घुसखोरीचे समर्थन करणे हे मला पटत नाही. दुसरया चुकीमुळे पहिली बरोबर ठरत नाही. उघडी सीमा ही जास्त धोकादायक आहे. विमानाने वा बोटीने येणारे घुसखोर आवरणे तुलनेने सोपे आहे असे माझे मत (बहुधा ही हिटलरशाही नसावी!).

हुप्प्या's picture

5 Jun 2016 - 12:46 am | हुप्प्या

फ्रिडमनने बेकायदा घुसखोरीचे समर्थन करायचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत दयनीय आणि केविलवाणा आहे.

>>अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात.

हा एक आवडता गैरसमज. तमाम मेक्सिकन लोक जे लाखोंच्या संख्येने दरवर्षी घुसतात ते सगळे "अमेरिकन लोक ज्या पगारावर काम करणार नाहीत" त्या पगारात काम करण्याच्या निश्चयाने कटिबद्ध होऊनच घुसतात ह्याला काय आधार आहे? काही लोक तसे करत असतील. काही हतबल लोक गुन्हेगारी करतात. काही सोशल वेल्फेअरचा गैरफायदा घेऊन सरकारला (म्हणजे अमेरिकन करदात्यांना) लुटतात. अनेक वर्षे कामे केल्यावर ते धंदे करतात आणि अशाच असहाय लोकांना नोकरीवर ठेवतात. अनेक बांधकाम व्यावसायिक तक्रार करतात की मेक्सिकन लोकांनी एक रॅकेट बनवले आहे आणि अन्य कोणाला त्या व्यवसायात शिरणे अवघड होत चालले आहे.

मेक्सिकन लोकांना बेकायदा अमेरिकेत घुसायला आवडते म्हणून ते अमेरिकन लोकांना त्यांचे येणे आवडलेच पाहिजे हे तर्कट माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. आयसिसच्या लोकांना अमेरिकन लोकांनी इस्लाम कबूल केलेला आवडेल म्हणून अमेरिकन लोकांनी तेही करावे की काय?

आता नवनवे रोग जे दक्षिण अमेरिकेत निर्माण होतायत ते हळूहळू अमेरिकेत येऊ लागले आहेत. बेकायदा घुसखोरीत कुठलीही वैद्यकीय तपासणी होत नाही त्यामुळे हे घातक रोग येतच रहाणार.

ह्या आणि असल्या ढुढ्ढाचार्यांचे मत काहीही असले तरी ठोस व्यावाहारिक कारणामुळे सामान्य अमेरिकन लोकांना बेकायदा घुसणे साफ नापसंत आहे. म्हणूनच ट्रंपसारखा उमेदवार जोरदार आघाडी घेताना दिसतो आहे.

गॅरी ट्रुमन's picture

6 Jun 2016 - 11:21 am | गॅरी ट्रुमन

ह्या आणि असल्या ढुढ्ढाचार्यांचे मत काहीही असले तरी ठोस व्यावाहारिक कारणामुळे सामान्य अमेरिकन लोकांना बेकायदा घुसणे साफ नापसंत आहे. म्हणूनच ट्रंपसारखा उमेदवार जोरदार आघाडी घेताना दिसतो आहे.

ठिक आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी मुंबईतल्या मराठी अनेक माणसांनीही राज ठाकरे सारख्या गुड फॉर नथिंग माणसालाही भरभरून समर्थन दिलेच होते.समजा सगळ्या 'भय्यांना' हाकलून दिले असते तर त्याच राठा समर्थकांना इस्त्रीवाले, दूधवाले, भाजीवाले आणि अन्य अनेक वाले कमी पडले असते. मेक्सिकन लोकांच्या बाबतीत अमेरिकेत तीच परिस्थिती आहे का? मला माहित नाही. याविषयी तिथे राहणारेच मिपाकर अधिक सांगू शकतील. पण नन्द्या यांच्या या प्रतिसादावरून तसे वाटत आहे खरे.

बाकी मिल्टन फ्रिडमनना त्यांच्या काळातच प्रचंड विरोध झाला होता. १९७६ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावेळीही त्याविरोधात निदर्शने झाली होती.पण ते जे म्हणत होते त्यातला बहुतांश गोष्टी लोकांना बर्‍याच काळाच्या गॅपनंतर कळल्या. असो.

हुप्प्या's picture

8 Jun 2016 - 7:05 pm | हुप्प्या

आपला गोंधळ होतो आहे का? राज ठाकरे आणि भैय्या विरोध ह्यात आणि ट्रंप आणि मेक्सिकन घुसखोर ह्यात एक मोठा फरक आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये भारताचा अविभाज्य घटक आहेत. मी शेवटचे बघितले तेव्हापर्यंत मेक्सिको हे स्वतंत्र राष्ट्र होते. आपल्याला असे वाटते का की मेक्सिको हे अमेरिकेचे राज्य आहे? तसे ते नाही. हा मोठा फरक आहे. त्यामुळे भय्या लोकांना कायद्याचे पाठबळ आहे. बेकायदा मेक्सिकन घुसखोरांना ते नाही. बेकायदा मेक्सिकन लोकांना हाकलले तर अमेरिकेचा बट्ट्याबोळ होईल हे गृहितक अत्यंत खोटे आहे. जर बेकायदा घुसखोरी इतके सोन्याच्या मोलाचे वरदान असते तर कुणीतरी अमेरिका मेक्सिकोच्या सीमा पूर्णपणे उघडून द्याव्यात. सध्या गुंडांच्या टोळ्या लाच घेऊन लोकांना सीमा ओलांडायला मदत करतात. त्यात असहाय बायका मुले ह्यांच्यावर अत्याचारही होतात. आणि अमेरिकेत आल्यावर शोषणही होते.

आजही अगदी डेमोक्रॅटही असा कायदा आणू धजत नाही की कुणीही या आणि घुसा अमेरिकेत आणि करा अमेरिकेची भरभराट! कारण तसे केले तर पुढची निवडणूक हरणार हे नक्की. त्यामुळे बेकायदा घुसखोरीकडे दुर्लक्ष करून आपण लॅटिनो लोकांचे तारणहार असल्याची टिमकी वाजवायची! ट्रंप ती वाजवत नाही म्हणून तो रेसिस्ट! छान.

नोबेल पारितोषिकाचा दाखला देऊन फ्रिडमन म्हणाला ते खरे असणार असे म्हणत आहात का? अहो, ओबामाला नोबेलचा शांतता पुरस्कार मिळाला होता म्ह्णून तो ८ वर्षात शांतिदूत झाला का? नोबेल हा काही मापदंड नाही की जो मिळाल्यावर आपण जे बोलू ते खरेच ठरावे. त्याऐवजी ठोस मुद्दे मांडून बेकायदा घुसखोरी ही अमेरिकेकरता सोन्याची खाण कशी आहे आणि त्यामुळे अमेरिकेत लक्ष्मीची पावले कशी उमटत आहेत ते सांगा. नोबेलचे दाखले नकोत.

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 9:24 pm | गॅरी ट्रुमन

नोबेल पारितोषिकाचा दाखला देऊन फ्रिडमन म्हणाला ते खरे असणार असे म्हणत आहात का?

छे हो. नोबेलचा उल्लेख इथे का आला? कारण तुम्हीच मिल्टन फ्रिडमनना ’ढुढ्ढाचार्य’ की काहीतरी म्हणाला होतात. त्यावर म्हणणे इतकेच की फ्रिडमनच्या हयातीतच त्यांना प्रचंड विरोध झाला होता आणि त्याचे एक उदाहरण म्हणून नोबेल पारितोषिक द्यायच्या समारंभाच्या वेळी बाहेर निदर्शने झाली होती.

त्याऐवजी ठोस मुद्दे मांडून बेकायदा घुसखोरी ही अमेरिकेकरता सोन्याची खाण कशी आहे आणि त्यामुळे अमेरिकेत लक्ष्मीची पावले कशी उमटत आहेत ते सांगा. नोबेलचे दाखले नकोत.

मी बेकायदा घुसखोर हे सोन्याची खाण आहे आणि त्यांच्यामुळे लक्ष्मीची पावले उमटत आहेत वगैरे काहीही म्हटलेले नाही. उगीच काहीतरी चिकटवायचा प्रयत्न करू नका. माझे म्हणणे इतकेच की लो पेईंग नोकऱ्यांसाठी जर पुरेसे अमेरिकन मिळत नसतील तर तिथे मेक्सिकन लोक कामाला येतात. आणि जर का त्या कामासाठी पुरेसे अमेरिकन मिळत असतील तर त्यांना खुशाल हाकलून द्या किंवा मेक्सिकन लोक गुन्हेगारी/दहशतवादामध्ये सामील असतील तर त्यांना अमेरिकेतूनच नव्हे तर पृथ्वीतलावरूनच नाहिसे केले तरी काही म्हणायचे नाही हे लिहिलेले वाचले नाहीत का?

असो. २००७ मध्ये ऍरिझोना राज्याने घुसखोरांविरूध्द कडक कायदा पास केला. याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामधील सारा बॉन आणि इतर दोघांनी या कायद्यामुळे मेक्सिकन लोक त्यांच्या देशात हाकलले गेले त्यावर नक्की काय परिणाम झाला यावर एक पेपर लिहिला आहे. त्यातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे: "Our results suggest that contrary to its intent, the Legal Arizona Workers Act does not appear to have improved labor market outcomes of competing legal low-skilled workers. In fact,we find some evidence of diminished employment and increased unemployment among legal low-skilled workers in Arizona. These findings are concentrated on the largest demographic group of workers – non-Hispanic white men. While they are less likely to find employment, those who do have on average higher earnings as a result of LAWA". म्हणजे काय की या कायद्यामुळे आर्थिक व्यवहार घटले त्यामुळे लो पेईंग नोकऱ्या कमी झाल्या. ज्या काही थोड्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना पगार जास्त मिळाला. एकूणच काय की या प्रकारामुळे मिनिमम वेज वाढविल्यामुळे होईल तो परिणाम झाला (माझा निष्कर्ष). आणि असा परिणाम होणे चांगले आहे का? हा पेपर https://gspp.berkeley.edu/assets/uploads/research/pdf/p82.pdf वर आहे. इतरही अभ्यास झाले आहेत पण त्यासाठी त्या जर्नलचे subscription घ्यावे लागेल त्यामुळे ते पेपर मी इथे देऊ शकत नाही.

आता हा ठोस मुद्दा नाही असे म्हणायला तुम्ही मोकळे आहातच. पण निदान या बाबतीत I rest my case.

बाकी राज ठाकरेचा मुद्दा समकक्ष नाही हे मान्य. तो पण मुद्दा का आला? कारण तुम्हीच म्हटले आहे की फ्रिडमनसारख्या ’ढुढ्ढाचार्यांचे’ म्हणणे काहीही असले तरी सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर ट्रम्पना पाठिंबा देत आहेत. त्यावर माझा मुद्दा हा की सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत हा मुद्दाही तितकासा योग्य नाही. कारण सामान्य लोक अनेकदा अशा डेमॉगॉगना भरभरून पाठिंबा देत असतात. राज ठाकरेंचे नाव लिहिण्याच्या आधी मी केजरीवाल लिहिले होते. पण त्यामुळे केजरू समर्थक अंगावर येऊन चर्चा भरकटू नये म्हणून ते नाव काढले.

म्हणजे मजा बघा. नोबेल पारितोषिक हा एखाद्याचे म्हणणे बरोबर आहे याचा मापदंड नाही हे तुम्ही म्हणता.त्याविषयी मतभेद असायचा प्रश्नच नाही. पण मग त्याबरोबरच सामान्य लोकांचे मतही डोळे झाकून न घेता pinch of salt ने घेणे योग्य नाही का?

हुप्प्या's picture

9 Jun 2016 - 1:24 am | हुप्प्या

>>
म्हणजे मजा बघा. नोबेल पारितोषिक हा एखाद्याचे म्हणणे बरोबर आहे याचा मापदंड नाही हे तुम्ही म्हणता.त्याविषयी मतभेद असायचा प्रश्नच नाही. पण मग त्याबरोबरच सामान्य लोकांचे मतही डोळे झाकून न घेता pinch of salt ने घेणे योग्य नाही का?
<<

लोकशाही मग ती अमेरिकन वा भारतीय कुठलीही असो. सामान्य लोकांच्या मतावरच सरकार बनते. सामान्य लोकांना डावलून चालत नाही. नोबेल पुरस्कार विजेत्यांचे तसे नाही. जर सामान्य लोकांनी झुंडशाही करुन कुणाच्या हक्काची पायमल्ली केल्यास त्यावर दाद मागायला न्यायालये आहेत. जर बेकायदा घुसखोरीवर बंदी घालून कुणाच्या मूलभूत, सांविधानिक हक्कावर गदा येते असे म्हणणे असल्यास न्यायालये आहेत. पण कुणी तसे केलेले दिसत नाही. निव्वळ एक रिसर्च पेपर, निव्वळ एका नोबेल पुरस्कार विजेत्याचे मत ह्याच्या जोरावर सीमा पुसून टाका, देश ही संकल्पना पायदळी तुडवा, कुणीही यावे आणि अमेरिकेत वसावे असा खुलेपणा दाखवावा हा खुळचटपणा आहे.

जर बेकायदा घुसखोरी हे अमेरिकेकरता एक अनमोल वरदान आहे आणि त्यातूनच अमेरिकेची अफाट भरभराट होणार आहे असा विश्वास असेल तर ते लोकांना पटवा, त्या मुद्द्यावर निवडणुका लढा व जिंका व नवी धोरणे राबवा वा खटले लढा , ते जिंका आणि कायदे बदला.

गंम्बा's picture

6 Jun 2016 - 12:43 pm | गंम्बा

अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात.

ट्रुमन साहेब, हे लॉजिक कधी अमेरीकेसाठी चांगले असेल जेंव्हा मध्य पूर्वे सारखे त्यांना काम संपले की पुन्हा मेक्सीको मधी जायला लागेल, आयुष्यात कधीही त्यांना आणि त्यांच्या मुलांना सिटीझनशिप मिळणार नाही.

फक्त आर्थिक बाजु बघितली की असे होते, त्याचा सामाजिक परीणाम नको बघायला? पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा. आसामचे / बंगालचे उदाहरण आहे ना. ते दाखवा फ्रीडमन साहेबांना.
आता कोकणात पण बांधकाम मजुन बांग्लादेशी आहेत, ते काय परत जाणारेत?

गॅरी ट्रुमन's picture

6 Jun 2016 - 12:55 pm | गॅरी ट्रुमन

आसामचे / बंगालचे उदाहरण आहे ना. ते दाखवा फ्रीडमन साहेबांना.आता कोकणात पण बांधकाम मजुन बांग्लादेशी आहेत, ते काय परत जाणारेत?

कसं दाखवणार हो? फ्रिडमनसाहेब २००६ मध्येच गेले की!!

असो. बांगलादेशातील भारतात होणारी घुसखोरी आणि मेक्सिकन लोकांची अमेरिकेत होणारी घुसखोरी याच्यात तुलना कशी करता येईल? एक तर अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील आर्थिक सुबत्तेत कित्येक पटींनी फरक आहे तेवढा फरक भारत आणि बांगलादेशात आहे का? त्यामुळे होते असे की काही प्रकारची कामे करायला अमेरिकन लोक तयार होत नसतील तर ती कामे करायला मेक्सिकन लोक मिळू शकतात.भारतातील परिस्थिती लक्षात घेता अशा कामांसाठी बाहेरच्या देशातील कोणाचीही गरज भारतात नाही. आणि जर का त्या रेटमध्ये अशी कामे करायला स्थानिक अमेरिकन लोक तयार असतील तर मेक्सिकन लोकांनाही हाकला की. काय फरक पडतो? मी पूर्वी अमेरिकेत काही वर्षे राहिलो आहे आणि भविष्यात परत तिथे जाईन याची फार शक्यता नाही.त्यामुळे मला सध्याची परिस्थिती माहित नाही.पण नन्द्यांसारखे ४५ वर्षांपासून अमेरिकेत राहात असलेले मिपाकर जर म्हणत असतील की अशी कामे करायला अमेरिकन लोक तयार होत नाहीत तर त्यात तथ्य असले पाहिजे असे मला पामराला वाटते.

दुसरे म्हणजे भारतात घुसलेले बांगलादेशी अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया, दहशतवाद इत्यादींमध्ये सामील असतात (आठवा दिल्लीतील डॉ. पंकज नारंग यांची हत्या). तसे मेक्सिकन लोक करत असतील तर त्यांना अमेरिकेतूनच नव्हे तर पृथ्वीतलावरूनच नाहिसे करा.काहीही म्हणणे नाही.

फक्त आर्थिक बाजु बघितली की असे होते, त्याचा सामाजिक परीणाम नको बघायला? पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा

हे वाक्य पण बघा की साहेब.

गॅरी ट्रुमन's picture

6 Jun 2016 - 1:38 pm | गॅरी ट्रुमन

फक्त आर्थिक बाजु बघितली की असे होते, त्याचा सामाजिक परीणाम नको बघायला? पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा

हे वाक्य पण बघा की साहेब.

अमेरिकेला मेल्टिंग पॉट की काहीतरी म्हणतात ना?संस्कृती वगैरे गोष्टी अमेरिकेत कधीपासून महत्वाच्या झाल्या?

आणि खुद्द अमेरिकेचेच बोलाल तर नेटिव्ह लोकांचे शिरकाण करूनच गोर्‍यांनी अमेरिका स्थापन केली ना? अमेरिकेचा मोठा भाग १८४८ मध्ये अमेरिकेने मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. टेक्सस, न्यू मेक्सिको, अ‍ॅरिझोना, कॅलिफॉर्निया, नेवाडा, युटा, कोलोरॅडोचा अर्धा भाग आणि इतकेच काय तर वायोमिंगसारख्या उत्तरेकडील राज्याचाही दक्षिणेतला थोडा भाग १८४८ मध्ये मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. त्या भागातील मेक्सिकन ओरिजीनच्या लोकांचे काय झाले? याविषयी कोणाला माहित आहे का? ते अमेरिकन झाले की मेक्सिकोत हाकलले गेले की त्यांचेही शिरकाण झाले? अशावेळी भिन्न संस्कृतीचे लोक घुसल्यामुळे बदल झाले नव्हते वाटते? पूर्वीच्या गोष्टी परत परत उगाळण्यात अर्थ नाही हे ठिक आहे पण मग अमेरिकेत मेक्सिकन घुसत असतील तर तो निसर्गाचा न्याय म्हणायचा का? असो.

नंदन's picture

6 Jun 2016 - 1:56 pm | नंदन

पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा

'Then they came for me—and there was no one left to speak for me.' ही ओळ किती फिट्ट बसते ना इथे?

अमेरिकेचा मोठा भाग १८४८ मध्ये अमेरिकेने मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. टेक्सस, न्यू मेक्सिको, अ‍ॅरिझोना, कॅलिफॉर्निया, नेवाडा, युटा, कोलोरॅडोचा अर्धा भाग आणि इतकेच काय तर वायोमिंगसारख्या उत्तरेकडील राज्याचाही दक्षिणेतला थोडा भाग १८४८ मध्ये मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. त्या भागातील मेक्सिकन ओरिजीनच्या लोकांचे काय झाले?

जॉर्ज लोपेझ या एका अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनचा प्रसिद्ध किस्सा आठवला:
प्रश्नः George, what part of Mexico are your ancestors from?
उत्तरः LOS ANGELES, #&*@$!

अनुप ढेरे's picture

6 Jun 2016 - 1:57 pm | अनुप ढेरे

a

हुप्प्या's picture

8 Jun 2016 - 7:13 pm | हुप्प्या

आज अमेरिकेत कायद्याचे राज्य आहे. तेव्हा जर मेक्सिकन लोकांना मुक्तद्वार द्यावे असे कुणाला पोटतिडिकीने वाटत असेल तर तसा कायदेबदल करून मेक्सिकन लोकांना अमेरिकेत खुला प्रवेश द्या. उगाच इतिहासाची पाने उलगडून पूर्वीच्या चुकांची शिक्षा आजच्या लोकांना द्या वगैरे तर्कदुष्ट कल्पना नकोत.
भारतात उच्चवर्णीयांना काही पिढ्या अस्पृश्याप्रमाणे वागवले तर "निसर्गाचा न्याय" मिळेल का? शेकडो वर्षापूर्वी काही लोकांनी अत्याचार केले म्हणून त्याची शिक्षा आजच्या पिढीला देणे कितपत योग्य आहे? जर्मनीतील नाझीच्या वंशजांना आज ओव्हनमधे घालून जाळा असे म्हणाल का?
घड्याळ उलटे फिरवून काही साध्य होत नाही. गोर्या लोकांनी स्थानिक मूळ अमेरिकन लोकांवर केले ते अत्यंत घृणास्पद होते पण आज तसे होत नाही.
अमका भाग पूर्वी मेक्सिकोचा होता वगैरे प्रकारही साफ गैरलागू आहेत. पाकिस्तान भारताचा भाग होता. बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता. पण आज त्यातले काहीही लागू नाही तसेच मेक्सिकोचे आहे. आजच्या सीमा, आजचे कायदे हे बघणे योग्य आहे.
अमेरिका मेल्टिंग पॉट आहेच. (बहुतांशी) सर्व कायदे पाळून येणारे भारतीय आणि चिनी लोक पहा. निमूटपणे एच वन, ग्रीन कार्ड वगैरे चक्रातून वर्षानुवर्षे जातात आणि अमेरिकेत रहातात. अमेरिकेच्या अनेक भागात ते सुखाने रहातात. आपली भाषा, आपली संस्कृती टिकवतात, वाढवतात. तेव्हा बेकायदा घुसखोरीला विरोध हा वर्णद्वेष नव्हे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 10:45 am | गॅरी ट्रुमन

हिलरी क्लिंटन आता डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार झाल्या आहेत. अध्यक्षीय निवडणुकांमध्ये उतरणार्‍या त्या पहिल्या स्त्री उमेदवार ठरतील.

काल कॅलिफॉर्निया, न्यू जर्सी, न्यू मेक्सिको, मॉन्टाना, नॉर्थ डॅकोटा आणि साऊथ डॅकोटा राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या. सर्व ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली नाही.पण केवळ मॉन्टाना आणि नॉर्थ डॅकोटामध्ये बर्नी सँडर्स यांनी थोडीशी आघाडी मिळवली आहे. सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्वाच्या कॅलिफॉर्नियामध्ये हिलरींनी बरीच मोठी आघाडी घेतली आहे.

दिसताना असे दिसत आहे की बर्नी सँडर्स यांनी सुध्दा बरीच राज्ये जिंकली आहेत. पण त्या राज्यांमध्ये मिशिगन सोडून फार मोठी राज्ये नाहीत. भारतात समजा एखाद्या उमेदवाराने मणिपूर, नागालॅंड, मिझोराम, त्रिपुरा इत्यादी राज्ये जिंकली तर दिसताना दिसेल की त्याने चार राज्ये जिंकली आहेत. पण त्यापेक्षा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र असे मोठे राज्य जिंकणारा उमेदवार कितीतरी पटींनी पुढे असेल. तसेच काहीसे सँडर्स यांच्याबरोबर होत आहे.

आता दोन्ही प़क्षांची फिलाडेल्फिया आणि क्लिव्हलँड येथे होणारी अधिवेशने म्हणजे औपचारिक ठरतील. तरीही डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात बिल क्लिंटन यांचे भाषण ऐकणे ही माझ्यासाठी तरी पर्वणी असेल.ते मला नक्कीच चुकवायचे नाही.

विकास's picture

8 Jun 2016 - 5:17 pm | विकास

अध्यक्षीय निवडणुकांमध्ये उतरणार्‍या त्या पहिल्या स्त्री उमेदवार ठरतील.

ह्यात फक्त "प्रमुख पक्षाकडून" असे सुरवातीस म्हणायला हवे. मला जीन स्टाईन ही मॅसॅच्युसेट्स मधून ग्रीन पार्टीकडून २०१२ साली लढली होती. पण विकीवरील रोचक दुव्याप्रमाणे सगळ्यात पहील्यांदा व्हिक्टोरीया वुडहल नावाच्या स्त्रीने १८७२ मध्ये इक्वल राईट्स पार्टीकडून उमेदवार होती. तिला शून्य मते मिळाली - हे पार्टी नाँइनेशन बद्दल. सगळ्यात पहील्यांदा १९४० मधे "सर्प्राईज पार्टी" कडून ग्रेसी अ‍ॅलन नावाच्या स्त्रीने निवडणूक लढवली (रुजवेल्ट अध्यक्ष म्हणून निवडून आले होते).

१९६८ मधे कम्युनिस्टपार्टीने शार्लीन मिचेल नावाच्या स्त्रीस उमेदवार केले होते. अर्थात मला वाटते कम्युनिस्टांवर त्यावेळेस (कदाचीत आत्ता देखील) बॅन असल्याने तीने निवडणू़क लढवली नव्हती.

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 5:21 pm | गॅरी ट्रुमन

"प्रमुख पक्षाकडून" असे सुरवातीस म्हणायला हवे

हो बरोबर. प्रमुख पक्षाकडून असे सुरवातीला म्हणायला हवे. दुरूस्तीबद्दल धन्यवाद.

विकास's picture

8 Jun 2016 - 5:34 pm | विकास

तसेच काहीसे सँडर्स यांच्याबरोबर होत आहे.

खरे आहे. काल कुठेतरी चर्चा ऐकताना/पहाताना असे देखील म्हणल्याचे आठवते की सँडर्स हे प्रामुख्याने इन्डेपंडट मतदारांमुळे जिंकत होते. म्हणजे रजिस्टर्ड डेमोक्रॅटीक व्होटर्स हे हिलरच्या बाजूनेच होते. फक्त जिथे जिथे इन्डेपन्डंट मतदार मते देऊ शकत होते तेथे सँडर्स यांची मते वाढली अथवा ते जिंकले. कदाचीत सांख्यिकी कसरत असेल असे विधान करण्यात, पण त्यात तथ्य नक्की आहे.

काल ट्रंप ने सँडर्सच्या मतदारांना आता आपणच कसे तुमचे तारणहार असू (म्हणजे हिलरी नसेल) असे सुचवणे चालू केले आहे. ट्रंपचा खरा प्रॉब्लेम आहे तो आता हिस्पॅनिक मतदार. आताच्या काळात अमेरीकन निवडणूक ही हिस्पॅनिक मतदारांचा सपोर्ट असल्याशिवाय जिंकता येणार नाही इतके त्यांचे प्रमाण आहे.

हिलरी कडून याबाबतीत एक शक्यता आहे म्हणजे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून ती कदाचीत, Julian Castro या सॅन अ‍ॅन्टोनियो, टेक्सास च्या तरूण महापौरास घेईल. तसे जर सर्वार्थाने होऊ शकले* तर ते ट्रंपला प्रचंड आव्हान राहील. (*होऊ शकले तर, असे म्हणायचे कारण म्हणजे इथल्या प्रत्येक व्हिपी कॅन्डीडेट आणि नंतर कॅबिनेट मेंबरला, न्यायाधिश निवडीतील उमेदवारांना अत्यंत कडक परीक्षणातून जावे लागते. ती vetting process जर बरोबर झाली आणि काही भानगड बाहेर आली नाही तसेच ते त्यानंतर राजकारणाच्या अर्थाने योग्य ठरले तर ते पुढे जाऊ शकेल.)

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 5:42 pm | गॅरी ट्रुमन

प्रत्येक व्हिपी कॅन्डीडेट आणि नंतर कॅबिनेट मेंबरला, न्यायाधिश निवडीतील उमेदवारांना अत्यंत कडक परीक्षणातून जावे लागते.

म्हणजे कॅबिनेट सदस्यांच्या नेमणुकीचे सिनेटकडून रॅटिफिकेशन व्हावे लागते हे माहित होते. पण उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांनाही तशाच परिक्षणातून जावे लागते हे माहित नव्हते. असे परिक्षण कोण करते आणि कोणाचे? म्हणजे दोन प्रमुख पक्ष असले तरी ग्रीन पक्ष आणि इतर पक्षही निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करत असतात.जर दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे परिक्षण होत असेल तर या इतर उमेदवारांचेही परिक्षण व्हायला हवे. तसे होते का?

विकास's picture

8 Jun 2016 - 9:04 pm | विकास

मला वाटते (माहीत नाही) पण कॅबिनेट सदस्यांचे रॅटीफिकेशन हे अधिकृत (सरकारकरवी) होते. पण उपध्यक्षपदासाठीचे रॅटीफिकेशन हे अंशतः सिक्युरीटी क्लिअरन्स सारखे होत असावे. त्याच बरोबर राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे सगळे जीवन हे इथल्या जनतेसाठी उघड करावे लागते. त्यामुळे ते इतरांनी करण्याआधी आधी बघून सगळे कन्फर्म करावे लागते. उदा. काही आर्थिक गडबडी, उमेदवाराची तब्येत, इतर काही कायद्याच्या गोष्टी वगैरे बघाव्या लागतात.

याचे एक गंमतीशीर उदाहरणः ओबामाने जेंव्हा प्रेसिडंन्सीसाठी उभे राहण्याचा प्लॅन केला, तेंव्हा त्याने ८०-९० च्या दशकात हार्वर्ड विद्यापिठ असलेल्या केंब्रिज शहरात जाऊन त्यावेळी न दिलेले पार्किंग व्हायोलेशनचे पैसे दिले!

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 9:34 pm | गॅरी ट्रुमन

काही आर्थिक गडबडी, उमेदवाराची तब्येत, इतर काही कायद्याच्या गोष्टी वगैरे बघाव्या लागतात.

जॉर्ज डब्लू बुशना १९७६ मध्ये दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल अटक झाली होती. ही गोष्ट महत्वाची कशी ठरली नाही हे समजत नाही. DUI हा त्या मानाने बराच गंभीर गुन्हा समजला जातो. उमेदवाराच्या तब्येतीवरून आठवले. जॉन केनेडींना पाठीचे प्रचंड दुखणे होते. दिवसातून अनेक पेन किलर घेऊन ते काम करू शकत असत.अन्यथा त्यांना उभे राहणेही शक्य झाले नसते असे वाचल्याचे आठवते.

पण एका अर्थी अशा गोष्टी तपासून बघितल्या जात असतील तर ते योग्यच आहे.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

8 Jun 2016 - 9:39 pm | ईश्वरसर्वसाक्षी

क्लिंटन माफ करा एक्झॅक्ट नाव त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच आठवत नाहिये बहुधा निक्सन असावेत, हे जास्त चालु नाहि शकायचे, ह्यांच्या करिता त्या वेळेस एक स्पेशल रेल्वे असायचि. असलाच एक एपिसोड हिस्टरी चॅनल वर बघितला होता.

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 9:46 pm | गॅरी ट्रुमन

त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच आठवत नाहिये बहुधा निक्सन असावेत, हे जास्त चालु नाहि शकायचे,

ते फ्रॅन्कलीन डी. रूझवेल्ट होते. त्यांना पोलिओ होता त्यामुळे ते व्हिल-चेअर वर असत.

विकास's picture

8 Jun 2016 - 9:49 pm | विकास

जॉर्ज डब्लू बुशना १९७६ मध्ये दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल अटक झाली होती.

बरोबर. पण ती माहिती वेळीच पब्लिक केली गेली होती. त्यामुळे त्याची हवा पद्धतशीर पणे गेली होती.

अशा अनेक कथा आहेत. परत कधीतरी! :)

निशदे's picture

8 Jun 2016 - 10:24 pm | निशदे

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हाइस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट यांचे अतिशय कडक पूर्वपरीक्षण होत असते. पैकी दोन्ही पक्षांच्या मुख्य उमेदवारांचे पूर्वपरीक्षण (vetting) वृत्तपत्रे व इतर माध्यमांकडून (news channels) इ. करत असतात. हे vetting करायचे राहिले की काय होते याचे अलीकडचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे John McCain यांच्या व्हाईस प्रेसिडेन्शिअल उमेदवार सारा पालीन.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी

भा.प्र.वे. प्रमाणे आज नक्की किती वाजता पंतप्रधान मोदी अमेरिकन संसदेच्या सभागृहात भाषण करणार आहेत?

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2016 - 6:42 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ८:३० वाजता पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात भाषण करणार आहेत.

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीच्या संदर्भात काल हे बोलके चित्र पहायला मिळाले! :)

Problem with election result

शेंच्युर निमीत्त श्रीमती. हिलरी क्लिंटन यांचा सत्कार साडीचोळी देऊन आणी श्री.डोनाल्ड ट्रंप यांचा सत्कार धोतरजोडी देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक- जेपी आणी अनिवाशी भारीतय कार्यकर्ते

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 5:57 pm | गॅरी ट्रुमन

आणि नारळ (सॉरी श्रीफळ) कोणाला देणार?

विकास's picture

8 Jun 2016 - 8:22 pm | विकास

रिपब्लीकन पक्षात जवळपास १६ जणांना तर डेमोक्रॅटीक पक्षात (सँडर्स सहीत) चौघांना श्रीफळ मिळालेले आहे. ;)

माध्यमे ह्या जजला स्वच्छ पांढर्या रंगात आणि ट्रंपला काळ्या वर्णद्वेष्टी रंगात रंगवण्यात मग्न आहेत.
पण वस्तुस्थिती काय आहे? हा जज आपल्या हिस्पॅनिक वारशाचा अभिमान बाळगून आहे (आणि त्यात काहीही चूक नाही). विविध हिस्पॅनिक संघटनांचा तो सदस्य आहे. उदा. हिस्पॅनिक नॅशनल बार असोसिएशन. ह्या संघटनेने पूर्वीच ट्रंपवर बहिष्कार घाला वगैरे आंदोलने सुरु केली होती. ही पार्श्वभूमी आहे म्हणून मला हा जज नको असे ट्रंप म्हणाल तर तो वर्णद्वेष्टा? काय विचित्र तर्कट आहे! खरे तर त्यानेच आपणहून स्वत: रजा घेऊन दुसरा जज पहा असे म्हणायला हवे होते. तेव्हा त्याचे निव्वळ मेक्सिकन मूळ असणेच नव्हे तर त्याची कृतीही अशीच दिसते आहे ज्यात पूर्वग्रह असणे शक्य आहे. तेव्हा अश्या संशयाला वाव असू नये म्हणून जज बदलला तर काय बिघडले?

नंदन's picture

9 Jun 2016 - 2:46 am | नंदन

ह्या संघटनेने पूर्वीच ट्रंपवर बहिष्कार घाला वगैरे आंदोलने सुरु केली होती.

अहो, दोन्ही संघटना वेगळ्या आहेत.

Some Trump supporters have incorrectly linked La Raza Lawyers to the National Council of La Raza, a 50-year-old civil rights group that has been strongly critical of Trump's proposals on immigration, as well as his idea to temporarily ban Muslims from entering the United States.

The NCLR's non-profit designation bars it from engaging in political campaigns, and the group's website describes it as a "nonpartisan voice for Latinos."

फक्त 'La Raza' हा शब्दसमूह कॉमन आहे. (हे म्हणजे केवळ 'तामिळ' हा शब्द कॉमन आहे म्हणून लिट्टे आणि पुण्यातला तामिळ संघम् सारखेच आहे, असं म्हणण्यासारखं झालं!)

ही पार्श्वभूमी आहे म्हणून मला हा जज नको असे ट्रंप म्हणाल तर तो वर्णद्वेष्टा?

ट्रम्प तसं म्हणाला नाही, त्याने जजच्या मेक्सिकन वंशाकडे वारंवार निर्देश केला. रिपब्लिकन पॉल रायन, गिंगरीच, नेब्रास्का, मेन आणि इलिनॉयचे रिपब्लिकन सिनेटर्स या सार्‍यांनी या 'टेक्स्टबुक डेफिनेशन ऑफ रेसिझम'चा निषेध केला आहे.

तेव्हा त्याचे निव्वळ मेक्सिकन मूळ असणेच नव्हे तर त्याची कृतीही अशीच दिसते आहे

कृतीबद्दलच बोलायचं तर या जजने मेक्सिकन तस्करांच्या विरोधात निर्णय देऊन त्यांचा रोष अनेकदा ओढवून घेतला आहे. अगदी नेव्हल बेसवर फेडरल मार्शल्सच्या संरक्षणात रहावे लागण्याची पाळी येण्याइतपत.

पण ट्रंपने ह्या लोकांचा वंश काढला नाही. हे दोघे हिस्पॅनिक आहेत म्हणून ते राष्ट्राध्यक्ष बनायला नालायक आहेत असे तो म्हणाला नव्हता. बाकी अनेक सवंग उखाळ्यापाखाळ्या काढूनही तो त्यांच्या वंशावर उतरला नाही त्यामुळे तो सरसकट वर्णद्वेष्टा आहे असे म्हणवत नाही.

हे म्हणजे, चोरीचा आळ असलेल्या माणसावर त्याने यापूर्वी अनेकवेळा संधी मिळूनही चोरी न केल्याने त्याला चोर म्हणता येईल यासारखं तर्कट झालं.

विकास's picture

9 Jun 2016 - 3:47 am | विकास

सुप्रिम कोर्टाचे आत्ताच स्वर्गवासी झालेले अ‍ॅन्थनी स्कलीया हे स्वतःच्या इटालीयन वंशाचा अभिमान बाळगून होते. ते मला वाटते पहीले इटालीयन जज होते. मग काय त्यांनी इटालीयन केसेस घ्यायच्याच नाहीत?

सुप्रिम कोर्टाच्या न्या. सोनिया सोडोमायोर या हिस्पॅनिक आहेत. मग त्यांनी उद्या जेंव्हा ट्रंपचा खटला सुप्रिम कोर्टात जाईल तेंव्हा स्वतला: काय लांब ठेवायचे? का स्त्री हक्कावरून अनेक पेंडींग खटले आहेत त्यात स्त्री म्हणून लांब रहायचे?

रिपब्लिकन पॉल रायन, गिंगरीच, नेब्रास्का, मेन आणि इलिनॉयचे रिपब्लिकन सिनेटर्स या सार्‍यांनी या 'टेक्स्टबुक डेफिनेशन ऑफ रेसिझम'चा निषेध केला आहे.

आता ट्रंप म्हणतो की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. (वरील प्रतिक्रीयेत तसे केले आहे असे मह्णलेले दिसलेले नाही ते वेगळे! ;) ) आणि नंतर (ट्रंप) म्हणतो की आता माझ्यासाठी हा विषय संपला म्हणून. आता का संपला? जर बरोबर बोलला होता तर अजून का ठाम रहात नाही?

हुप्प्या's picture

9 Jun 2016 - 4:21 am | हुप्प्या

ट्रंपचे वाक्य पाहिलेत तर त्याने असेच म्हटले आहे की हा जज मेक्सिकन आहे आणि तो कुठल्याशा संघटनेचा सदस्य आहे जिचा बेकायदा घुसखोरीला पाठिंबा आहे . त्यात निव्वळ मूळचा मेक्सिकन आहे म्हणून असे म्हटले नाही. मेक्सिकन असणे आणि बेकायदा मेक्सिकन घुसखोरांना सहानुभूती असणे हे दोन्ही कारणीभूत आहे. हा त्याच्या मते कॉन्फ्लिक्ट ओफ इंटरेस्ट आहे. जज काही आकाशातून पडलेला नाही की त्याचे निष्पक्ष असणे हे वादातीत असावे!
एखादा श्वेतवर्णी न्यायाधीश बेकायदा घुसखोरीचा समर्थक असता तरी ट्रंपने त्याच्याबद्दल हेच म्हटले असते ह्याची खात्री आहे.

आणि प्रत्येक आरोपीला आपली केस निष्पक्ष लढली जावी हे बघण्याचा अधिकार आहे. तो अधिकार वापरून त्याने ते मत मांडले.

लोकांनी नेहमीप्रमाणे त्याच्या विधानाचा विपर्यास केलाच आहे. तो जे म्हणाला होता ते आणि माध्यमे जे आरोळ्या ठोकून बोलत आहेत त्यात तफावत आहेच आहे.

नंदन's picture

9 Jun 2016 - 4:54 am | नंदन

ट्रंपचे वाक्य पाहिलेत तर त्याने असेच म्हटले आहे की हा जज मेक्सिकन आहे आणि तो कुठल्याशा संघटनेचा सदस्य आहे जिचा बेकायदा घुसखोरीला पाठिंबा आहे . त्यात निव्वळ मूळचा मेक्सिकन आहे म्हणून असे म्हटले नाही.

चूक. सॅन डिएगोत झालेल्या या मूळ भाषणाचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे. त्यात साधारण त्रेचाळिसाव्या मिनिटाला ट्रम्पचं विधान आहे. त्यात ट्रम्पने सरळ जजला 'मेक्सिकन' म्हटलं आहे. मेक्सिकन हेरिटेजचा किंवा संघटनेचा त्यात उल्लेख नाही. त्या नंतरही अनेक इंटरव्ह्यूजमध्ये त्याने याचा पुनरुच्चार केला आणि ते पुरेसं वाटलं नाही म्हणून मुस्लिम जजेसनाही यात ओढलं. हे उघडउघड रेसिस्ट आहे.

आणि तो कुठल्याशा संघटनेचा सदस्य आहे जिचा बेकायदा घुसखोरीला पाठिंबा आहे .

हा ट्रम्पभक्तांनी नंतर लावलेला जावईशोध आहे. याचं वर नावानिशी खंडन केलेलं आहेच.

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 7:54 am | हुप्प्या

सॅन डिएगोच्या व्हिडियोत तो प्रथम असे म्हणाला की "हा जज माझा तिरस्कार करतो. तो माझा खरोखर तिरस्कार करतो". नंतर तो म्हणाला की हा जज माझ्या माहितीप्रमाणे मेक्सिकन आहे. तसे असण्यात काही प्रॉब्लेम नाही. वगैरे.
नंतर सीएनेनला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्टीकरण दिले होते की जज मेक्सिकन आहे केवळ म्हणूनच नव्हे तर तो एका क्लबचा सदस्य आहे ज्याची मेक्सिकोला सहानुभूती आहे.
ही लिंक् पहा

ज्या संघटनेचा क्युरियेल सदस्य आहे तिचे पत्रक वाचा. त्यात त्यांनी बेकायदा घुसखोरीचे समर्थन केल्याचे दिसते. बेकायदा घुसखोर लोकांना भाड्याने जागा द्यायला नाकारण्याविरुद्ध संघर्ष असा एक उल्लेख त्यात आहे.

अशा संघटनेचा सदस्य असणारा न्यायाधीश असेल तर तो ट्रंप ज्याने उघड घुसखोरीला विरोध केला आहे त्याला निष्पक्ष न्याय मिळण्याविषयी नक्कीच शंका निर्माण होईल. त्यामुळे ट्रंपचा संशय अगदीच गैर नाही.

जाता जाता, राझा ह्या स्पॅनिश शब्दाचा अर्थ वंश (रेस) असाच आहे.

>>> सॅन डिएगोच्या व्हिडियोत तो प्रथम असे म्हणाला की "हा जज माझा तिरस्कार करतो. तो माझा खरोखर तिरस्कार करतो". नंतर तो म्हणाला की हा जज माझ्या माहितीप्रमाणे मेक्सिकन आहे.
--- म्हणजे त्या भाषणात, ह्या संघटनेचा काही उल्लेख नव्हता हे तुम्हांला मान्य आहे तर. धन्यवाद. (सीएनएनवरची मुलाखत या भाषणानंतर एका आठवड्याने होती. त्यातही ट्रम्पने वारंवार जजला 'मेक्सिकन' असंच संबोधलं. संघटनेचा उल्लेख एखादवेळेलाच केला.) वर म्हटल्याप्रमाणे, त्याने पुढे जाऊन मुस्लिम जजेसनाही यात ओढलं. हे तरी तुम्हांला रेसिस्ट वाटतं की नाही? का हेदेखील नेहमीप्रमाणे मीडियानेच वदवून घेतलेलं वक्तव्य आहे? आणि अजूनही तुम्हांला याबाबत मीडियाच दोषी वाटत असेल, तर असा लेचापेचा अध्यक्ष ज्याच्याकडून मीडिया इतक्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल (अ‍ॅबॉर्शनबद्दल महिलांना शिक्षा, न्युक्लिअर प्रॉलिफरेशन, रेसिस्ट विधानं) काहीही वदवून घेऊ शकते, तो काय कामाचा?

>>> ज्या संघटनेचा क्युरियेल सदस्य आहे तिचे पत्रक वाचा. त्यात त्यांनी बेकायदा घुसखोरीचे समर्थन केल्याचे दिसते. बेकायदा घुसखोर लोकांना भाड्याने जागा द्यायला नाकारण्याविरुद्ध संघर्ष असा एक उल्लेख त्यात आहे.
--- पत्रकात बेकायदा घुसखोरीचे समर्थन कुठेही आढळले नाही. तुम्ही ज्या संघर्षाचा उल्लेख केला आहे, तो कायदा कधीच अस्तित्वात आला नाही - त्याविरुद्ध आवाज उठवणार्‍यांमागे स्थानिक श्वेतवर्णीय लोकही होते. स्थानिक नगरपालिकेच्या कार्यकक्षेबाहेर तो असल्याने, तो कुठल्याही न्यायालयात टिकला नसता.

पण, मुख्य मुद्दा म्हणजे ट्रम्पने किंवा त्याच्या कॅम्पेनने ज्या संघटनेकडे निर्देश केला ती ही संघटना नव्हेच.

When Trump began his public tirade against Curiel, Trump campaign spokeswoman Katrina Pierson and other supporters conflated the two groups, which both use “La Raza.” But now, even conservative groups have acknowledged that they are separate organizations.

वर म्हटल्याप्रमाणे, आधी आरोप करायचा की जज 'लिट्टे'चा मेंबर आहे आणि मग तो पुण्यातल्या 'तामिळ संघाचा' आहे असं समजल्यावर त्यांच्या पत्रकातल्या एका निदर्शनाकडे लक्ष वेधायचं - असा हा प्रकार झाला. कॉन्स्पिरसी थिअरींचा भांडेफोड करणारी स्नोप्स.कॉम (http://www.snopes.com/judge-curiel-la-raza-kkk/) किंवा फॅक्ट-चेकिंग साईट्स (https://www.washingtonpost.com/news/fact-checker/wp/2016/06/07/trump-sup...) काय म्हणतात ते पहा.

जाता जाता, राझा ह्या स्पॅनिश शब्दाचा अर्थ वंश (रेस) असाच आहे.

La Raza (उच्चारः 'रासा') चा संदर्भाने अर्थ -

Many people incorrectly translate the name, “La Raza,” as “the race.” While it is true that one meaning of “raza” in Spanish is indeed “race,” in Spanish, as in English and any other language, words can and do have multiple meanings. As noted in several online dictionaries, “La Raza” means “the people” or “the community.”

Translating our name as “the race” is not only inaccurate, it is factually incorrect. “Hispanic” is an ethnicity, not a race. As anyone who has ever met a Dominican American, Mexican American, or Spanish American can attest, Hispanics can be and are members of any and all races.

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 9:24 am | हुप्प्या

तरीही ट्रंप हा वंशद्वेष्टा नाही, नाह, नाही.
१. जर ट्रंपने चुकीचा समज केला असेल तर ती एक चूक आहे त्यात वर्णद्वेष कुठून आला? एक हॉनेस्ट मिस्टेक म्हणून मानायची माझी तरी तयारी आहे. आपली दिसत नाही आहे. तेव्हा तुम्हाला हवे तसे समजा.

२. ह्या संघटनेचे पत्रक आपला प्रो मेक्सिकन पवित्रा स्पष्ट करत आहे. जर तसे असेल तर जजने आपणहून रजा घ्यायला हवी होती. हा सरळ सरळ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. जजला इतकाही सद्सद विवेक नसेल तर धन्य आहे!

पुण्याचा तमीळ संघ आणि लिट्टे ह्यांची इथे तुलना साफ गैरलागू आहे. ह्या जजची संघटनाही बेकायदा घुसखोरीचे समर्थन करते असेच ध्वनित होते आहे. तुम्हाला मान्य नसेल तर ठीकच आहे. पण मला तरी ह्या पत्रकातील मजकूरावरून ह्याची खात्री पटली आहे.

राझाचा एक अर्थ रेस असा आहे हे मान्य केलेत त्याबद्दल धन्यवाद!

नंदन's picture

10 Jun 2016 - 9:40 am | नंदन

मी पुन्हा एकदा विचारतो: 'एखादा जज मुस्लिम धर्मीय आहे, म्हणून तो बायस्ड् आहे' हे ट्रम्पचे (रेसिझमची मूर्तिमंत व्याख्या असणारे) विधान तुमच्या मते, रेसिस्ट आहे की नाही?

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 10:12 am | हुप्प्या

जर मी मुस्लिम धर्माच्या कट्टरपणाविरुद्ध जाहीर भूमिका मांडली असेल आणि जज जर उघड उघड अत्यंत धार्मिक मुस्लिम असेल तर मी अशा जजच्या भानगडीत पडण्याचा धोका न पत्करता जज बदलण्याची मागणी करेन. खरे तर जजनेच आपणहून समजूतदारपणा दाखवून माझ्या केसमधे कुठलीही भूमिका न बजावण्याचे ठरवले पाहिजे अशी मी एका सभ्य जजकडून अपेक्षा करेन.

अशा वेळेस जजने आपणहून प्रकरणातून अंग काढून घेणे उचित आहे असे आपणास वाटत नाही का? उगाच निर्णयाबाबत संशय यायला नको म्हणून तरी जजने बाहेर पडणेच उचित आहे. जर जज निष्पक्ष असेल तर त्याच्या जागी दुसरा जज आल्याने निर्णय वेगळा होणार नाही. आणि नसेल तर अशा जजने त्या प्रकरणात न गुंतणेच उत्तम आहे. अशा भूमिकेत असताना संशयाला ०.०००००१ टक्काही जागा रहाता कामा नये.

>>> जर मी मुस्लिम धर्माच्या कट्टरपणाविरुद्ध जाहीर भूमिका मांडली असेल आणि जज जर उघड उघड अत्यंत धार्मिक मुस्लिम असेल
--- ही स्पेशलाईज्ड केस झाली. माझा मूळ प्रश्न अद्यापही कायम आहे.

>>> उगाच निर्णयाबाबत संशय यायला नको म्हणून तरी जजने बाहेर पडणेच उचित आहे. जर जज निष्पक्ष असेल तर त्याच्या जागी दुसरा जज आल्याने निर्णय वेगळा होणार नाही. आणि नसेल तर अशा जजने त्या प्रकरणात न गुंतणेच उत्तम आहे.
--- ही सेल्फ-फुलफिलिंग प्रोफेसी झाली. ट्रम्प सुमारे ३५०० खटल्यांत गुंतला आहे. सगळीकडेच असं करत बसणार का? आणि मग स्त्री/पुरुष, कॅथलिक/प्रॉटेस्टंट, इस्ट कोस्टावरचा/वेस्ट कोस्टावरचा असले अनंत भेद आहेत.

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 7:14 pm | हुप्प्या

एक हाय प्रोफाईल व्यक्तिमत्त्व आहे. त्याची भूमिका अनेकांना वादग्रस्त वाटते आहे. अशा माणसाला जज निवडताना कष्ट होणारच.
एखाद्या गाजलेल्या केसकरता ज्यूरी निवडणे हे प्रचंड कष्टाचे, वेळखाऊ काम असते. ते कशासाठी? निष्पक्ष ज्यूरी निवडणे अवघड होते. केसच्या प्रसिद्धीमुळे लोकांचे मत आधीच बनलेले असते. तसे न बनलेले लोक शोधणे अवघड असतेच.

तीच परिस्थिती ट्रंपबाबत आहे. काहीही फरक नाही. वलयांकित केसमधे ज्यूरी निवडताना होणारी दिरंगाई ही तुम्हाला तितकीच खटकते का?

न्यायाधीश काही आकाशातून पडत नाही. तोही माणूसच असतो. त्यालाही पूर्वग्रह असू शकतात. तेव्हा एखादा जज सकारण बदलण्याचा आग्रह केला तर काही आकाश कोसळत नाही.

>>हे म्हणजे, चोरीचा आळ असलेल्या माणसावर त्याने यापूर्वी अनेकवेळा संधी मिळूनही चोरी न केल्याने त्याला चोर म्हणता येईल यासारखं तर्कट झालं.

अहो, एक म्हणजे चोरी हा कायद्याने गुन्हा आहे. पण चोरीच्या बाबतीतही एखादा जज हा पहिल्यांदा गुन्हा करणार्‍याला शिक्षा देताना कमीच देतो. निर्ढावलेल्या गुन्हेगाराला जास्त कठोर शिक्षा होते असा जगभरात नियम आहे. त्यामुळे ह्या कृत्यामागे वंशद्वेष आहे का हे पहाताना ट्रंपला वंशद्वेष्टी पार्श्वभूमी आहे का ते तपासून पाहिले. ह्यात तर्कदुष्ट काय आहे? एखादा माणूस खोटारडा आहे असे सिद्ध करायचे असल्यास त्याने मागे अनेक वेळा खोटे बोललेले आहे हे सिद्ध केले तर आपल्या दाव्याला वजन येते. तसेच यापूर्वी त्याने खोटे बोललेले आढळत नाही असे सिद्ध झाले तर हा दावा कमजोर होतो. हा साधा कॉमन सेन्स आहे.

तरीही, असे बोलणे हा फौजदारी वा दिवाणी खटला गुदरयाला पुरेसे कारण असेल तर ट्रंपविरोधकांनी तसे का बरे केले नाही अद्याप?

समजा ट्रंपने ह्या जजच्या कुठल्याशा संघटनेशी असणारा संबंध चुकीचा लावून चुकीचा निष्कर्ष काढला आहे, तरी तो वंशद्वेष्टा कसे बरे म्हणता येईल? फारतर त्याने (जाणूनबुजून वा चुकून) चुकीची माहिती वापरून चुकीचे निष्कर्ष काढले म्हणता येईल.

नंदन's picture

10 Jun 2016 - 9:30 am | नंदन

>>> त्यामुळे ह्या कृत्यामागे वंशद्वेष आहे का हे पहाताना ट्रंपला वंशद्वेष्टी पार्श्वभूमी आहे का ते तपासून पाहिले. ह्यात तर्कदुष्ट काय आहे?
---

पार्श्वभूमी -

क्र. १) Donald Trump Was Once Sued By Justice Department For Not Renting To Blacks (दुवा)

Trump responded in characteristic fashion — holding a press conference to call the charges “absolutely ridiculous.” He told the New York Times: “We never have discriminated and we never would. There have been a number of local actions against us and we’ve won them all. We were charged with discrimination and we proved in court that we did not discriminate.”

He later took the uncommon step of suing the Justice Department for defamation, seeking $100 million in damages. His lawyer was Roy Cohn, the infamous former Joseph McCarthy aide, who was known for his hard-ball tactics.

Cohn called up the federal official in charge of the case — J. Stanley Pottinger, the head of DOJ’s Civil Rights division — to demand that the lawyer handling the lawsuit be fired. (हे टॅक्टिक्स ओळखीचे वाटताहेत का? :)) Pottinger told The Huffington Post that his reaction at the time was “I don’t think so. That’s up to me and that’s not going to happen. I called [lawyer] Donna [Goldstein] into my office and said, ‘Keep up the good work.’” The suit, which Pottinger called a “media gimmick done for local consumption,” was dismissed and the judge criticized Cohn for “wasting time and paper from what I consider to be the real issues” - discriminating against blacks in apartment rentals.

Two years later, Trump Management settled the case, promising not to discriminate against blacks, Puerto Ricans and other minorities. As part of the agreement, Trump was required to send its list of vacancies in its 15,000 apartments to a civil-rights group, giving them first priority in providing applicants for certain apartments, according to a contemperaneous New York Times account. Trump, who emphasized that the agreement was not an admission of guilt, later crowed that he was satisfied because it did not require them to “accept persons on welfare as tenants unless as qualified as any other tenant.”

But the company didn’t sufficiently fulfill its promise, because three years later, the Justice Department charged Trump Management with continuing to discriminate against blacks through such tactics as telling them that apartments were not available.

क्र. २) Here Are 10 Examples Of Donald Trump Being Racist (http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-racist-examples_us_56d4...)

क्र. ३) The Sept. 11 attacks — "Thousands and thousands" of Muslims cheering in the streets (दुवा)

Campaigning in Alabama last November, Trump claimed that Muslims in New Jersey celebrated the attacks on the World Trade Center on Sept. 11, 2001:

"Hey, I watched when the World Trade Center came tumbling down. And I watched in Jersey City, N.J., where thousands and thousands of people were cheering as that building was coming down. Thousands of people were cheering. So something's going on. We've got to find out what it is."
Trump repeated the claim multiple times over the following days, repeating an Internet rumor that has circulated since the attacks despite comprehensive reporting from that time that debunked the claims.

FactCheck.org ran down Trump's various claims and concluded:

"What's clear to us — and should be to Trump — is that there were no widespread televised celebrations in New Jersey on 9/11. In fact, what Trump described would have been big news, and the reporters at the Daily News, Star-Ledger and elsewhere who tried and failed to track down rumors of 9/11 celebrations could have just turned on the TV to get their story."

क्र. ४) Trump retweets apparent neo-Nazi for the second time this year (दुवा)

क्र. ५) Shocking. Another White Nationalist Trump Delegate (दुवा)

बाकी वर विकास यांनी उद्धृत केलेलं भाषण हाही एक ताजा मासला आहेच.

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 10:21 am | हुप्प्या

आरियाना हफिंग्टन ह्या बाईला ट्रंपबद्दल कमालीचा तिरस्कार आहे हे उघड आहे. तेव्हा निव्वळ हफिंग्टन पोस्टची साक्ष देणे म्हणजे मोदीविरुद्ध मणी शंकर अय्यर वा दिग्विजय सिंगाची साक्ष करण्यासारखे आहे. हफिंग्टन पोस्टचा प्रत्येक दावा हा कमालीचा पूर्वग्रहदूषित आहे असे मला वाटते. गेल्या वर्षभरात ट्रंपबद्दल वाईटात वाईट गरळ ओकण्यात हे प्रकाशन आघाडीवर आहे.

अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन ह्या गोष्टीचा ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग अनेकदा केला गेला असेल. ट्रंपची कंपनी अशा प्रकाराला बळी पडून प्रकरण वाढू नये म्हणून लाच देऊन मोकळे झाले असतील. जेसी जॅक्सन हा काळ्या लोकांचा नेता अशा प्रकारे शेकडाऊन करण्यात वाकबगार आहे.

ओबामाला पाठिंबा देणार्‍यात अनेक काळे लोक हे अत्यंत वर्णद्वेष्टे होते. अल शार्प्टन वगैरे आहेतच. शिवाय अन्य काळ्या संघटनांचे लोक त्याहून जास्त कडवे आहेत जे गोर्यांचा तीव्र द्वेष करतात. त्यांच्या विरुद्ध हिंसा करणे ह्यात त्यांना काही गैर वाटत नाही. ह्या सगळ्यांचा पाठिंबा मिळवणार्‍या ओबामाला अशा लोकांच्या वर्णद्वेष्टेपणाचा कलंक लागतो का?

नंदन's picture

10 Jun 2016 - 10:29 am | नंदन

अपेक्षित प्रतिवाद.
Everyone is entitled to his own opinion, but not his own facts - हे वाक्य आठवलं. चालू द्या.

विकास's picture

10 Jun 2016 - 4:36 pm | विकास

खरं म्हणजे तुमचा ट्रंपबाबत त्यांच्या बोलण्या-वागण्यावरूनचा विरोध स्पष्ट दिसत आहे. म्हणून तुम्ही या चर्चेतून स्वतःला recuse करून घेतले पाहीजे.

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 7:23 pm | हुप्प्या

९/११ झाल्यावर न्यू जर्सीत हजारो मुस्लिम लोक आनंद व्यक्त करत होते हे ट्रंपचे विधान अतिशयोक्त आहे पण पूर्ण खोटे नाही. काही न्यू जर्सी पोलिसांच्या रिपोर्टमधे असा उल्लेख आहे की तिथल्या अनेक भागात छोट्या छोट्या संख्येने मुस्लिम लोक आनंद साजरा करत होते. लोक अल्लाहू अकबर च्या आरोळ्या ठोकत होते.
अशा लोकांची शिरगणती केलेली नाही तेव्हा ते हजारो होते का शेकडो हे माहित नाही पण ह्या भयंकर घटनेच्या इतक्या जवळ असणार्‍या लोकांना आनंद व्यक्त करावासा वाटला हे जास्त भयंकर आहे!

विकास's picture

10 Jun 2016 - 8:22 pm | विकास

इंदिरा गांधींना मारले तेंव्हा पंजाबमधे फटाके उडवण्यात आले. आता याचा अर्थ सगळे शिख वाईट ठरतात का? आणि म्हणून मग जे काही दिल्लीत हत्याकांड झाले ते समर्थनीय ठरते का?

मुस्लीम समुदायात अधिक धर्मांधता आहे, धार्मिक मुलतत्ववाद आहे असे म्हणले तर गैर नाही. पण सरसकट समुदायाला नावे ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यातून हिटलरशाही तयार होते. अर्थात, (या संदर्भात) केवळ मुसलमान म्हणल्यावर त्या व्यक्तीवर संशय घेणे जितके चूक आहे तितकेच केवळ मुसलमान (पक्षी: अल्पसंख्य वगैरे) आहे म्हणून संशयाचा अतिरेकी फायदा देणे पण चुकीचे आहे. म्हणून त्यातून असे लेबलिंग काढणे महत्वाचे आहे आणि मग जे काही आहे त्याला त्या अनुसरून कायदेशीर प्रतिक्रीया देणे योग्य ठरते.

ह्या भयंकर घटनेच्या इतक्या जवळ असणार्‍या लोकांना आनंद व्यक्त करावासा वाटला हे जास्त भयंकर आहे!
ह्या संदर्भात अधिक - एकंदरीत मुस्लीम समाज कसा वागला हे काही मी जवळून पाहीलेले नाही. त्यामुळे त्यावर बाजूने अथवा विरोधात भाष्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण बर्‍याचदा अशा घटनांच्या वेळेस राईचा पर्वत कसा होऊ शकतो याचे आता मजेशीर वाटेल असे एक उदाहरण गांधीहत्येच्या वेळचे आहे.

आचार्य अत्र्यांच्या "अशा गोष्टी अशा जमती' मधे त्यांनी ही आठवण सांगितली आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे पण येथे नुसता गोषवारा: ३० जानेवारी १९४८ला सातारला पत्रकार संमेलनासाठी जाण्याच्या रस्त्यावर अत्रे आणि अजून काही तत्कालीन पत्रकार हे वाईला तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्र्यांच्या घरी उतरले होते. आता तर्कतिर्थ हे यशवंतरावांच्या आणि तत्कालीन काँग्रेसनेत्यांच्या जवळचे. पक्षि: संघ अथवा इतर "हिंदू" संघटना-विचारवंतापैकी ते नव्हते. हे केवळ पुर्वपिठीका म्हणून सांगितले. तर्कतिर्थांच्या कार्याबद्दल आदर आहे!

तर्कतिर्थांच्या घरात सगळे जरा कुठे स्थिरस्थावर झाले तर अचानक बाहेर गडबड गोंधळ ऐकायला आला. (परत, याचे वर्णन, अत्र्यांच्या शब्दांमधे वाचण्यासारखे आहे). हे सगळे पण बाहेर जाऊन बघू लागले काय झाले. मग आधी नुसतीच कुणकुण लागली मग खात्री झाली की दुर्दैवाने गांधी हत्या झाली आहे. पुढचा भाग माझ्याकडे चित्ररुपात आहे तो खाली डकवतो. वाचल्यावर काय म्हणायचे आहे ते समजेल! :)
Acharya Atre

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 8:43 pm | हुप्प्या

गांधी मेले म्हणून मेजवानी केली नव्हती. मेजवानी आधीच नियोजित होती. ती रद्द केली नाही इतकेच.
न्यू जर्सीतील मुस्लिम नेहमीच अल्ला हू अकबरच्या आरोळ्या ठोकत रस्त्यात वावरतात आणि ९/११ झाल्यावर ह्या आरोळ्या रद्द झाल्या नाहीत असे काही म्हणणे असेल तर कदाचित गांधीहत्येच्या वर्णनाशी मिळतेजुळते होईल. पण इथे तसे झाले नाही. अल्ला हू अकबर हे विजयोत्सव साजरा करणे होते आणि ते ९/११ ची थेट प्रतिक्रिया म्हणून होते.

अर्थातच सगळे मुस्लिम तसे करत नव्हते. पण काही लोकांचे जल्लोष करणे हे धोक्याची घंटा आहे.
=====
इंदिरा गांधींना मारले तेंव्हा पंजाबमधे फटाके उडवण्यात आले. आता याचा अर्थ सगळे शिख वाईट ठरतात का? आणि म्हणून मग जे काही दिल्लीत हत्याकांड झाले ते समर्थनीय ठरते का?
===
ह्या प्रश्नाचा ट्रंपच्या विधानाशी काय संबंध? ट्रंपने कुठले हत्याकांड घडवून आणले आहे?

==
मुस्लीम समुदायात अधिक धर्मांधता आहे, धार्मिक मुलतत्ववाद आहे असे म्हणले तर गैर नाही. पण सरसकट समुदायाला नावे ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यातून हिटलरशाही तयार होते. अर्थात, (या संदर्भात) केवळ मुसलमान म्हणल्यावर त्या व्यक्तीवर संशय घेणे जितके चूक आहे तितकेच केवळ मुसलमान (पक्षी: अल्पसंख्य वगैरे) आहे म्हणून संशयाचा अतिरेकी फायदा देणे पण चुकीचे आहे. म्हणून त्यातून असे लेबलिंग काढणे महत्वाचे आहे आणि मग जे काही आहे त्याला त्या अनुसरून कायदेशीर प्रतिक्रीया देणे योग्य ठरते.
==
दुसरे टोक असे आहे की बिन लादेन वगैरे मंडळी मुस्लिम नाहीतच अशी ढोंगी हाकाटी पिटवणे. आयसिसचा इस्लामशी संबंध नसल्याचा मूर्ख दावा करणे. शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून संकट नाहीसे होईल अशी आशा करणे.

इस्लामचे तत्त्वज्ञान वापरून अतिरेक, दहशतवाद करणारे अनेक आहेत. त्यांना कमी अधिक सहानुभुती देणारे खूप जास्त आहेत. शरिया सारखे कायदे आणावेत, धर्मनिंदा, प्रेषितनिंदा करणार्‍यांना मृत्यूदंड दिला जावा असे म्हणणारे तर प्रचंड संख्येने आहेत. इजिप्त, पाकिस्तान, बांगला देश, ट्युनिशिया, इंडोनेशिया ह्या देशात अशा लोकांची संख्या ५० टक्क्याहून कितीतरी जास्त आहे. हे सगळे धर्मामुळे, धर्मात सुधारणा न करण्याच्या अट्टाहासापायी होते आहे. आणि डेमोक्रॅट्स हे नाकारण्यात धन्यता मानत आहेत त्यामुळे ट्रंपसारखे रोखठोक बोलणारे लोकांना जास्त आवडत आहेत.

विकास's picture

10 Jun 2016 - 9:13 pm | विकास

दुसरे टोक असे आहे की बिन लादेन वगैरे मंडळी मुस्लिम नाहीतच अशी ढोंगी हाकाटी पिटवणे. आयसिसचा इस्लामशी संबंध नसल्याचा मूर्ख दावा करणे. शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून संकट नाहीसे होईल अशी आशा करणे.

अहो पण मग मी, "तितकेच केवळ मुसलमान (पक्षी: अल्पसंख्य वगैरे) आहे म्हणून संशयाचा अतिरेकी फायदा देणे पण चुकीचे आहे. " हे काय कानडीत लिहीले होते का? तसे वागले गेल्यानेच तर त्याचा अतिरेकी फायदा घेऊ शकले आणि लाडोबाचे अतिरेकी आणि अतिरेक्यांचे दहशतवादी झाले. असो.

अल्ला हू अकबर हे विजयोत्सव साजरा करणे होते आणि ते ९/११ ची थेट प्रतिक्रिया म्हणून होते.
ह्यात कुणाची बाजू घेण्याचा उद्देश नाही, पण ही ऐकीव माहिती आहे का कुठे आलेली माहिती आहे? बरं मला वाटते महम्मद आटा का त्याच्या दहशतवादी पथकातील इतर न्यू जर्सीत रहात होतेच त्यामुळे तिथे त्यांचा अड्डा होताच. त्यातील कोणी म्हणले असले तर नवल काय? पण म्हणून संपूर्ण समाजाने म्हणले असे म्हणणे चुकीचे आहे. त्याचा परीणाम देखील मग उलट होतो असो... म्हणून लेबलींग करू नये असे म्हणले आणि त्यावरून "गांधीहत्येचा तो दिवस" मधला भाग सांगितला. त्याच अर्थाने दिल्लीतल्या शिख हत्याकांडाबद्दल लिहीले. राजीव गांधींनी पण कुणाला स्वतःच्या हाताने मारले नाही. पण "वटवृक्ष कोसळला तर जमीन हादरतेच", असे म्हणत अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच दिले असे म्हणावे लागेल. कदाचीत त्यांना पण ते कळले असेल असे नाही, पण त्याचा फायदा नक्कीच हिंसाचारात झाला. तेच ट्रंप पण करू शकतात कारण ते तर प्रत्यक्षच सगळ्यांच्या विरोधात बोलत आहेत.

डेमोक्रॅट्स हे नाकारण्यात धन्यता मानत आहेत
हे कशाच्या जीवावर बोलत आहात? हा प्रश्न इतरत्र विचारूनही तुम्ही अजूनही मला उत्तर दिलेले नाही (कारण तुमच्याकडे उत्तर नाही आहे. ट्रंपसारखे चालले आहे झालं!) त्यामुळे तुमचे हे अज्ञान असे म्हणावे लागत आहे. जर अज्ञान नसले तर ते सिद्ध करा...

ओबामाच्या काळात ३०००० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. पाकीस्तानात प्रत्यक्ष हल्ले करून ओबामाकाळात जवळपास ३००० दहशतवादी मारले गेलेत (नागरीक मारले गेले ते वेगळे). बुशच्या काळात या उलट स्वतःचे सैनिकच ९/११ पेक्षा अधिक संख्येने मारले गेले. ओसामा ला मारले ते तर वेगळेच.. बरं हिलरीने बुश इराक युद्धाला पाठींबा दिला तर ती तेंव्हा चूक तेंव्हा डेमोक्रॅट नाकारतात असे म्हणणार नाही!

हे म्हणताना डेमोक्रॅट्सची बाजू घेत नाही. पण एक अमेरीकन वृत्ती दाखवायचा प्रयत्न करत आहे. पण ते तुम्हाला समजतय का ते माहीत नाही... म्हणून आपला प्रकोप शांत करू शकत नाही आहे. असो.

हुप्प्या's picture

10 Jun 2016 - 9:47 pm | हुप्प्या

https://www.youtube.com/watch?v=pwp8qKvE-0g
https://www.youtube.com/watch?v=YWYNFh-9hD8

ओबामा आणि हिलरीची विधाने पहा. ही पुरेशी आहेत का? कुठल्याही अतिरेकी कृत्यामागे इस्लाम असू शकत नाही हे ठासून सांगणे हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?

ट्रंपने काहीही न करताच त्याच्यावर कत्तली, शिरकाणाचा आरोप करणे मोठे गंमतीचे आहे. मग काय त्याला फाशीची शिक्षाही सुनावता येईल नाही का? इस्लामविरुद्ध बोलले तरी ते शिखांच्या कत्तलीइतके मोठे गंभीर कृत्य आहे असे वाटते का?

ड्रोन हल्ले करून हजारो लोक मारण्याचा प्रकार मला आवडत नाही. सरकार आपल्याला हवे तितकीच माहिती त्यातून देते. त्यात निरपराधी लोक मरत असले तर अमेरिका नवनवीन शत्रूच जन्माला घालत आहे. कुठेतरी व्हर्जिनियात बसून अफगाणिस्तान वा पाकिस्तानात बाँब टाकायचे निर्णय घेतले जातात आणि त्यातून होणारी निरपरध्यांची हत्या ही सोपी बनत आहे. अरब स्प्रिंग सारख्या सुरवातीला छान छान वाटणार्‍या प्रकाराला ओबामा व हिलरीने उत्तेजन देऊन नंतर त्याचे घातक रुप झालेले पाहिले आहे. ड्रोन हल्ल्यांऐवजी अशा आंदोलनाबद्दल हेरगिरी करुन सी आय ए वापरून जास्त माहिती घेतली असती तर हा भस्मासूर फोफावला नसता. बेनगाझी प्रकरण झाले नसते.

विशाखा पाटील's picture

11 Jun 2016 - 8:59 am | विशाखा पाटील

वरची चर्चा वाचतेय.
ओबामा आणि हिलरी यांनी जे म्हटलेय त्याचा अर्थ इसीस इस्लामच्या तत्वाला धरून नाही असा आहे.
ड्रोनहल्ला करण्याच्या आधी हेरगिरी केलेली असतेच. पाकिस्तानच्या हद्दीत किंवा येमेनमध्ये सैन्य घुसवणे शक्य नाही, अशावेळी ड्रोन हल्ल्याशिवाय पर्याय नसावा. तसे हल्लेही केले नाहीत, तर तळ अजून फोफावतील. आणि बेनगाझीतही हल्ला झाला त्या कम्पाउंडजवळच सी आय ए चा तळ होता.

जन्मभर कुराण कुराण करणारे बिन लादेन सारखे अस्खलित अरबी बोलणारे लोक इस्लाम जाणत नाहीत मात्र हिलरी आणि ओबामासारखे अमेरिकन कुराण आणि इस्लामचे मोठे ज्ञानी अभ्यासू आहेत ह्याच्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे.
आयसिसला इस्लाम कळत नाही हे कसे ठरवले? कदाचित शांततेने जगणारे मुस्लिम इस्लामच्या जालीम वचनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत नसतील हे कशावरून? शब्दशः इस्लाम पाळू इच्छिणारेच कट्टर अतिरेकी बनत नसतील हे कशावरून?
कुराण आणि हदिस हे ईश्वरदत्त साहित्य आहे. त्यात काडीचाही बदल वा सुधारणा संभवत नाही ह्याविषयी सगळ्या इस्लामिक जगताचे एकमत आहे. अशा आडमुठेपणामुळेच अतिरेकीपणाला खतपाणी मिळत आहे.

दहशतवादामागे इस्लाम नाहीच असे ठासून म्हणणे हे एक तर ढोंगीपणा आहे किंवा अडाणी मूर्खपणा आहे. दोन्ही पर्याय सामान्य लोकांकरता वाईटच आहेत.

ओबामाने ड्रोन डागून अनेक लोक मारले असतील. त्यातले खरोखर अतिरेकी किती होते ते कळायला काहीही मार्ग नाही. जसे बुशने विमानाने बाँब टाकून इराकमधे लाखो लोक मारले त्यातले खरोखर अतिरेकी किती होते? मुळात सद्दामचा काय दोष होता? दुसर्‍या देशात जाऊन उपद्व्याप करताना जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बुशने केले नाही ह्याची खात्री आहे. ओबामाने ते केले की नाही ह्याची मला तरी खात्री नाही.
अरब स्प्रिंग व बेनगाझी प्रकरणी अमेरिकन सरकारची इंटेलिजन्स ग्यादरिंगची यंत्रणा कमकुवत असल्याचे उघड झाले आहे. तथाकथित फ्रेंडली मिलिटंट कोण आणि शत्रू कोण ह्याची गफलत झाल्यामुळे आणि एकंदरीत गलथानपणा झाल्यामुळे राजदूतासकट अनेक अमेरिकन मारले गेले. त्यानंतर घाईघाईने कुठल्याशा व्हिडियोवर ह्या प्रकाराचे खापर फोडणे तर अत्यंत संतापजनक होते.

विकास's picture

12 Jun 2016 - 8:43 am | विकास

दहशतवादामागे इस्लाम नाहीच असे ठासून म्हणणे हे एक तर ढोंगीपणा आहे किंवा अडाणी मूर्खपणा आहे.

दहशतवादामागे इस्लाम आहे म्हणजे सगळे मुसलमान हे दहशतवादी आहेत असे म्हणायचे आहे का?

ओबामाने ड्रोन डागून अनेक लोक मारले असतील. त्यातले खरोखर अतिरेकी किती होते ते कळायला काहीही मार्ग नाही. जसे बुशने विमानाने बाँब टाकून इराकमधे लाखो लोक मारले त्यातले खरोखर अतिरेकी किती होते?

मला वाटते, आधी आपले म्हणणे होते की ओबामा नुसताच पॉलिटीकली करेक्ट वागतो आणि काहीच अ‍ॅक्शन घेत नाही म्हणून. आता अ‍ॅक्शन सांगिज्या नंबर्सवर रिपब्लीकन असलेले अमेरीकन काँग्रेस अथवा सिनेट शंका घेत नाही किंबहूना त्यातील काही जणांना जास्तच अतिरेकी मारले आहेत असे वाटते. पण अर्थात ट्रंपपंथीयांची गोष्ट वेगळी असू शकते. असो.

अरब स्प्रिंग व बेनगाझी प्रकरणी अमेरिकन सरकारची इंटेलिजन्स ग्यादरिंगची यंत्रणा कमकुवत असल्याचे उघड झाले आहे.

९/११ ला पण आणि अगदी पर्ल हार्बरला पण. जेंव्हा हल्ला होतो तेंव्हा तेथे यंत्रणा कमकुवत असते म्हणूनच होतो.

हुप्प्या's picture

12 Jun 2016 - 10:50 am | हुप्प्या

>>दहशतवादामागे इस्लाम आहे म्हणजे सगळे मुसलमान हे दहशतवादी आहेत असे म्हणायचे आहे का?

आजिबात नाही. दहशतवादामागे इस्लाम आहे म्हणजे इस्लामचे ताठर, कालबाह्य तत्त्वज्ञान दहशतवादाकरता सुपीक जमिन आहे. व्यवहारी मुस्लिम इस्लामचा जहालपणा सौम्य करतात. पण ह्याचा अर्थ ते मूळ तत्त्वज्ञान जहाल नाही असे नाही. ते नाकारणे हा ढोंगीपणा आहे. हा जहालपणा अनेक प्रकारे व्यक्त होतो. निव्वळ कंबरेला बाँब बांधून तो फोडून स्वतः मरणे आणि अन्य लोकांना मारणे अशी त्याची एकमेव अभिव्यक्ती नाही. उदा. प्रेषिताची निंदा केल्यास मृत्युदंड, धर्मत्याग केल्यास मृत्युदंड, धर्मनिंदा केल्यास मृत्युदंड हे जहाल विचार मुस्लिम जगतात भीती वाटेल इतके लोकप्रिय आहे. ७० टक्के, ८० टक्के लोक ह्याला पाठिंबा देतात असे जनमतचाचणीत उघड झाले आहे. हा दहशतवाद नसला तरी तितकाच भीतीदायक आहे. आणि तो इस्लामच्या तत्त्वज्ञानामुळे आहे.

ओबामा हा बोलताना नको इतका बोटचेपेपणा दाखवतो पण दुसरीकडे ड्रोनहल्ल्यासारखा बेजबाबदारपणाही. दोन्ही चूक आहेत. जमिनीवर हेरांचे जाळे विणून त्यातून माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे आहे. ते होते का नाही हे कळायला मार्ग नाही. बेनगाझी प्रकरणाकडे बघून वाटते की होत नसावे. ड्रोनमधे किती लोक मारले आणि त्यातले किती अतिरेकी होते ह्यापेक्षा बेनगाझी आणि तत्सम प्रकरणे न होणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. मी शुद्ध रिपब्लिकन नाही त्यामुळे सिनेट काय म्हणते, काँग्रेस काय म्हणते ह्याच्याशी मला देणे घेणे नाही. त्यांच्याशी १००% सहमत असणे हे माझे ध्येयच नाही. तेव्हा ते मुद्दे गैरलागू आहेत.

>>९/११ ला पण आणि अगदी पर्ल हार्बरला पण. जेंव्हा हल्ला होतो तेंव्हा तेथे यंत्रणा कमकुवत असते म्हणूनच होतो.

दुसर्‍या चुकीकडे बोट दाखवून पहिली चूक ठीक ठरत नाही. पर्ल हार्बरचे उदाहरण तर पूर्ण गैरलागू आहे कारण ते स्वच्छ सैनिकी आक्रमण होते. इस्लामी दहशतवादाचे रूप पूर्ण वेगळे आहे.

९/११ हल्ल्यच्या पूर्वसूचना बुश सरकारने दुर्लक्षिल्या. पण म्हणुन ओबामाचे दुर्लक्ष क्षम्य होत नाही. ओबामा सत्तेवर आला तो बुशच्या चुकांचे भांडवल करून. तेव्हा त्याच्याच चुका ओबामाही करणार असेल तर त्याने बुशवर का बरे टीका केली?

विकास's picture

13 Jun 2016 - 8:29 pm | विकास

नशिब! ;)

व्यवहारी मुस्लिम इस्लामचा जहालपणा सौम्य करतात.

अहो व्यवहारी कम्युनिस्ट पण तेच करतात, ख्रिश्चनपण तेच करतात आणि हिंदूंमधील गैरपरंपरा निकालात काढणारे हिंदू पण तेच करत असतात (नुसते नावाने हिंदू आणि व्यवहारात डावे असलेले म्हणत नाही).

मुद्दा तो नाही. जर कायदा समान वापरला तर बहुतांशी कुठल्याही समुदायाला नियंत्रणात ठेवणे शक्य होते. भारतात ते न करण्याची सवय लावल्याने सगळे चुकले. पण अमेरीकेत तसे होत नाही. स्वतः जॉर्ज बुश पण इस्लामला शांततेचा धर्म म्हणून सारखे म्हणायचाच. असो.

ओबामा हा बोलताना नको इतका बोटचेपेपणा दाखवतो पण दुसरीकडे ड्रोनहल्ल्यासारखा बेजबाबदारपणाही. दोन्ही चूक आहेत. जमिनीवर हेरांचे जाळे विणून त्यातून माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे आहे.

मी काही येथे ओबामाभक्त म्हणून लिहीत नाही आहे. पण तुम्हाला काय वाटते, कुठल्याही देशात ड्रोन हल्ले करून असेच साडेतीन-चार हजार दहशतवाद्यांना मारले? बरं ट्रंप झाला काय आणि आता शर्यतीत नसलेला क्रूज झाला काय, दोघांनीही बेजबाबदार बाँबिंगवरून विधाने केली आहेतच...

९/११ हल्ल्यच्या पूर्वसूचना बुश सरकारने दुर्लक्षिल्या.

त्या कुठल्या म्हणे? काही संदर्भ आहे का याला? एकंदरीतच तुम्ही जी ठाम विधाने इतरांवर टिका करताना करत आहात त्याला संदर्भ दिलेत तर बरे होईल. असो.

हुप्प्या's picture

14 Jun 2016 - 1:00 am | हुप्प्या

इस्लाममधे दोन समस्या आहेत
१. कालबाह्य मार्गदर्शक तत्त्वे
२. धर्माच्या शिकवणीत काडीचाही बदल होऊ शकत नाही अशी अत्यंत आडमुठी भूमिका.

बाकी धर्मांनी आपापल्या परीने आपली कालबाह्य तत्त्वे बदलली. इस्लाममधे ते अधिकृतरित्या होत नाही. काही लोक व्यवहारापुरते तसे करतात. त्यामुळे धर्मनिंदेकरता मृत्युदंड सारखे विचार आजही टिकून आहेत. चार्ली हेब्दो, डॅनिश कार्टून, सॅटेनिक व्हर्सेस, सबमिशन लोकांच्या अभिव्यक्तीला उत्तर म्हणून खरोखर जीवघेणी हिंसा करणारे कशामुळे उद्युक्त झाले? धर्माच्या वचनांमुळे. आणि ओबामा, हिलरीसारखे लोक हे खोटारडेपणा करुन नाकारताना दिसतात.

९/११ ची पूर्वसूचना. मला वाटले की ह्या गोष्टीला एव्हाना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे की अशा सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ गोष्टीकरता पुराव्याची गरज नसावी. पण तरी हे बघा:
http://www.cnn.com/2004/ALLPOLITICS/04/10/august6.memo/
https://en.wikipedia.org/wiki/Bin_Ladin_Determined_To_Strike_in_US

सी आय ए ने बुश सरकारला ६ ऑगस्ट २००१ रोजी बिन लादेन अमेरिकेवर हल्ला करण्याची तयारी करत आहे अशा शीर्षकाचा मेमो दिला होता. ९/११ कमिशनच्या चौकशीच्या वेळेस तो सर्व जनतेला खुला केला गेला. त्यावर काहीही कारवाई झालेली नाही हा इतिहास आहे. काँडी राईसने सिनेट हियरिंगच्या वेळेस त्याचा केविलवाणा प्रतिवाद केला होता. यू ट्युबवर ह्याचीही ट्युब मिळेल. हा एक नमुना पहा:
https://www.youtube.com/watch?v=DIpEwGmSsmM

ड्रोनहल्ले करून लोक मारणे ह्या प्रकाराचा मी चाहता नाही. मला वाटते की त्याचे घातक परिणाम जास्त होतात. त्या ऐवजी हेरांचे जाळे विणून अद्ययावत माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे आहे. येमेन देशात अन्वर अल अवलाकी ह्या अतिरेक्याला मारणे मला पटले नव्हते. कुठलिही कायदेशीर प्रक्रिया नाही, कोर्टाची कार्यवाही नाही. युद्ध म्हणावे तर जिनिव्हा कन्वेन्शनसारखे नियमही नाहीत. हा एक घातक पायंडा आहे. उद्या कुणी राष्ट्रपती परदेशात गेलेल्या आपल्या विरोधकाचा असा काटा काढणार नाही हे कशावरून?

हुप्प्या's picture

8 Jun 2016 - 7:44 pm | हुप्प्या

ट्रंप आणि रुबियो, ट्रंप आणि क्रुझ. अनेक रिपब्लिकन उमेदवार रिंगणात होते तेव्हा अशा अनेक खडाजंग्या उडाल्या.
ट्रंप आणि रुबियो ह्यांच्यात "हातघाईची" लढाई झाली. ट्रंपचे हात छोटे आहेत त्यावरून त्याचे अन्य कुठले अवयव छोटे असतील हे तर्क कुतर्क. ट्रंप आणि क्रुझची बायकामुलांवरून शेरेबाजी झाली. पण ट्रंपने ह्या लोकांचा वंश काढला नाही. हे दोघे हिस्पॅनिक आहेत म्हणून ते राष्ट्राध्यक्ष बनायला नालायक आहेत असे तो म्हणाला नव्हता. बाकी अनेक सवंग उखाळ्यापाखाळ्या काढूनही तो त्यांच्या वंशावर उतरला नाही त्यामुळे तो सरसकट वर्णद्वेष्टा आहे असे म्हणवत नाही.

अर्धवटराव's picture

9 Jun 2016 - 11:56 am | अर्धवटराव

मोदि साहेबांचं भाषण ऐकलं थोडं. भाषणात त्यांनी 'डी' डे आणि राज्यसभेच्या गोंधळाचा उल्लेख का केला कळलं नाहि... पटलं तर अजीबात नाहि.