अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग ३)

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
21 Jul 2016 - 12:25 pm
गाभा: 

यापूर्वीचे लेखनः

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)

नमस्कार मंडळी,

१८ जुलैपासून ओहायो राज्यात क्लिव्हलँड येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात डॉनल्ड ट्रम्प यांची पक्षाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड झाली. आजच डॉनल्ड ट्रम्प यांनी इंडिआना राज्याचे गव्हर्नर माईक पेन्स यांची उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड जाहिर केली.

हे अधिवेशन त्यामानाने बरेच वादग्रस्त ठरत आहे.अशा अधिवेशनांमध्ये पक्षाचे यापूर्वीचे अध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार आवर्जून उपस्थित असतात.पण माजी अध्यक्ष जॉर्ज बुश थोरले आणि धाकले या दोघांनीही या अधिवेशनास उपस्थित राहणे टाळले.२००८ मधील पराभूत उमेदवार जॉन मॅककेन आणि २०१२ मधील पराभूत उमेदवार मिट रॉमनी यांनीही अधिवेशनापासून आपल्याला दूर ठेवले. केवळ १९९६ मधील पराभूत उमेदवार बॉब डोल उपस्थित होते. अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले ओहायो राज्याचे गव्हर्नर जॉन कॅसिक अधिवेशन स्वतःच्याच राज्यात होत असूनही तिथे फिरकले नाहीत.नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांबरोबरच एक तृतीयांश सिनेटच्या जागांसाठीही मतदान होणार आहे.ज्या सिनेटरना मतदारांना सामोरे जायचे आहे त्यापैकी बरेच गैरहजर राहिले.डॉनल्ड ट्रम्पबरोबर खूप जवळीक दाखवली तर त्याचा आपल्या निवडून यायच्या शक्यतेवर परिणाम होईल अशी भिती त्यांना वाटली असे बोलले जात आहे.टेक्ससचे सिनेटर टेड क्रुझ यांनी ट्रम्प यांना उघडपणे 'एन्डोर्स' केले नाही.याबद्दल त्यांचे भाषण चालू असताना काही प्रमाणावर आरडाओरडाही केला.या सगळ्या प्रकारामुळे रिपब्लिकन पक्ष एकत्रपणे निवडणुकांना सामोरा जाणार का हा प्रश्न नक्कीच उभा राहिला आहे.

त्याचप्रमाणे वेल्स फार्गो बँक, मोटोरोला, जे.पी मॉर्गन इत्यादी पारंपारिक प्रायोजकांनीही अधिवेशनाकडे पाठ फिरवली.

भाप्रवे आज सकाळी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून माईक पेन्स यांनी उमेदवारी स्विकारत असल्याबद्दलचे अधिकृत भाषण प्रथेप्रमाणे केले. त्यात त्यांनी इस्लामिक स्टेट प्रणित इस्लामिक दहशतवादाविरूध्द खंबीर पावले उचलणारा अध्यक्ष हवा असेल तर डॉनल्ड ट्रम्प यांना मत द्या असे आवाहन करून 'पोलिटिकली करेक्ट' बोलायची परंपरा मात्र खंडित केली.हे नक्कीच उल्लेखनीय आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डॉनल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिआ ट्रम्प यांचे भाषण झाले.त्यांचे हे भाषण २००८ मध्ये मिशेल ओबामांनी केलेल्या भाषणाचीच कॉपी होती असे अनेक ठिकाणी म्हटले जात आहे आणि त्यात तथ्यही आहे.मेलानिआ ट्रम्प या युगोस्लाव्हियात जन्मलेल्या आहेत.इतकी वर्षे अध्यक्षपदाच्या उमेदवाराबरोबरच त्यांचा 'स्पाऊस' सुध्दा जन्माने अमेरिकन नागरिक असावा लागतो असे मला वाटत होते. पण तसे काही नाही असे दिसते.

भाप्रवे उद्या सकाळी डॉनल्ड ट्रम्प यांचे अध्यक्षपदाची उमेदवारी स्विकारत असल्याचे भाषण होईल.ते नक्की काय म्हणतात याकडे लक्ष लागले आहे.

डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पेन्सिल्व्हेनिया राज्यात फिलाडेल्फिया या ऐतिहासिक महत्वाच्या शहरात २५ ते २८ जुलै रोजी होणार आहे.या अधिवेशनात २६ जुलै रोजी (भाप्रवे २७ जुलै रोजी सकाळी) बिल क्लिंटन यांचे तर २७ जुलै रोजी (भाप्रवे २८ जुलै रोजी सकाळी) अध्यक्ष बराक ओबामांचे भाषण होणार आहे. दोन्ही भाषणे नक्कीच ऐकायची आहेत.

एकूणच या निवडणुका रंगतदार होत आहेत. एकूणच सर्वत्र प्रस्थापित राजकीय व्यवस्थेबाहेरचा कोणी उमेदवार आला की तेवढ्यापुरता तो उमेदवार मोठ्या प्रमाणावर मते घेऊ शकतो.डॉनल्ड ट्रम्प यांना हा फायदा नक्कीच घ्यायची संधी आहे. ते कधी सिनेटर वगैरे सोडाच कुठल्या म्युनिसिपालटीच्या निवडणुकांसाठीही उभे राहिलेले नाहीत.त्यामुळे राजकीय क्षेत्रात पूर्वी केलेली पापे हात धुऊन त्यांच्यामागे लागायची शक्यता नाही.हिलरींंनी इराक युध्दाच्या बाजूने मत दिले आणि सिरियात घोडचूक केली हे मुद्दे लागू शकतात.उद्योगक्षेत्रात ट्रम्प यांचे कारनामे म्हटले तर अमेरिकेत ही गोष्टी तितक्या प्रमाणावर "टॅबू" नाही.तसेच गेल्या काही महिन्यात पॅरिस,ब्रसेल्स, इस्तंबूल, नीस इथे इस्लामिक दहशतवादी हल्ले झालेच पण ते खुद्द अमेरिकेतही ऑरलॅन्डो येथेही असा हल्ला झाला. अशावेळी डॉनल्ड ट्रम्प जर इस्लामिक दहशतवादाविरूध्द उघड भूमिका घेत असतील आणि हिलरी जर "पोलिटिकली करेक्ट" राहायचा प्रयत्न करत असतील तर त्याचा फायदाही ट्रम्प यांना मिळू शकेल. त्यातून पुढील काही महिन्यात असे आणखी हल्ले झाले आणि अमेरिकेतही एखादा अजून हल्ला झाला तर ती शक्यता अजून वाढेल. अशातून २० जानेवारी २०१७ रोजी डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून सुत्रे हाती घेतली तरी फार आश्चर्य वाटू नये.

प्रतिक्रिया

पण, तुमचे ह्या विषयाचे धागे मात्र वरवर चाळतो.

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 4:18 pm | महासंग्राम

उत्तम विश्लेषण , एकुणात किचकट असलेला विषय सोप्या पद्धतीने सांगितलात.

हुप्प्या's picture

21 Jul 2016 - 6:04 pm | हुप्प्या

काही लोकांना वाटते की ट्रंपने येनकेनप्रकारेण प्रसिद्धीत येता यावे म्हणून बायकोकरवी उचलेगिरी केली. हे कितपत खरे ते देवच जाणे!
काही आक्रमक काळ्या संघटना, तथाकथित पुरोगामी गट यांनी ह्या अधिवेशनात हिंसा घडवून आणू वगैरे धमक्या दिल्या होत्या पण क्लिवलंडचे प्रशासन खमके निघाले. आत्तापर्यंत तरी ह्या विध्वंसक लोकांची डाळ शिजलेली नाही.

एकंदर जनमत चाचण्यांत हिलरीचे पारडे जड आहे असेच दिसते आहे. ट्रंप जास्त मवाळ होऊ लागला आहे त्यामुळे कदाचित तो हरेल असे वाटते. अर्थात दोलायमान राज्यात (स्विंग स्टेट्स) मधे जे होईल त्यावरच निर्णय ठरतो त्यामुळे जनमत चाचण्या दिशाभूल करू शकतात.

हिलरी लोकांचा कल बघून त्यांना हवे तेच बोलते. जेव्हा इराक युद्ध लोकांना आवडले तेव्हा तिने समर्थन दिले. आज आवडत नाही तर आज त्याला चूक म्हणते आहे. तिची अशी भूमिका काय हे कधीच कळत नाही. कदाचित असाच नेता अमेरिकेला आवडत असेल.

दुसरे म्हणजे हिलरीची पैशाची हाव. भरपूर पैसे मिळत असतील तर ती कुठल्याही गटाला समर्थन देते. नुकतेच सौदी अरेबियाकडून तिला प्रचंड पैसा मिळाल्याची कुजबूज होती.

एका प्रसिद्ध कॉमेडियनने एक चांगला विनोद केला. ओहायोच्या अधिवेशनात ट्रंप फारसे वलयांकित लोक आणू शकला नाही. कुणी गाजलेला नट, खेळाडू, उद्योजक तिथे बोलायला तयार झाला नाही. ट्रंपने पुरेसे पैसे फेकले असते तर कदाचित तो हिलरीलाही आणू शकला असता!

सुधीर काळे's picture

21 Jul 2016 - 8:13 pm | सुधीर काळे

माझ्या मते आज अमेरिकेला म्याँव-म्याँव करत गुळमुळीत बोलणार्‍या राजकीय नेत्यांपेक्षा एका खणखणीत स्वभावाच्या कार्यकारी संचालकाची (सी.ई.ओ.ची) गरज आहे. माझ्या मते हिलरी क्लिंटन ही एक तिरस्कृत उमेदवार आहे. त्यामुळे 'टोम्या'च (माझे ट्रंपसाठी निवडलेले लाडके उपनांव!) निवडून येणार यात मला तरी शंका वाटत नाहीं!

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2016 - 10:11 pm | श्रीगुरुजी

बॉब डोल अजून आहेत तर. १९९६ च्या निवडणुकीत ते ७३ वर्षांचे होते. सध्या ते ९३ वयाचे असणार. १९९६ च्या निवडणुकीत त्यांचे क्लिंटनबरोबरचे अध्यक्षीय डिबेट पाहिले होते. त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर फारच चांगला होता असे आठवते.

राजाभाऊ's picture

21 Jul 2016 - 10:33 pm | राजाभाऊ

डानल्ड ट्रंप हा अगदी साधा, सरळ, सद्गुणांचा पुतळा वगैरे अजिबात नाहि परंतु हिलरी समोर तो तसा वाटायला लागतो. ;)

हल्लिचंच हिलरीचं ईमेल सर्वर प्रकरण घ्या - एफबिआय त्यांचा अहवाल देण्याच्या आधी बिल क्लिंटन ॲटर्नी जनरलला तब्बल ३९ मिनीटं हवा-पाण्याच्या गप्पा करण्यासाठि भेटतो; काहि दिवसानंतर एफबिआय डायरेक्टर तोलुन-मापुन शब्द वापरुन हिलरीला दोष देतो पण तिच्यावर चार्जेस लावण्याइतपत केस मध्ये दम नाहि, असं हास्यास्पद स्टेटमेंट देतो आणि त्यानंतर ताबडतोब ॲटरनी जनरल केस क्लोज्ड चा स्टॅंप मारते. हा हा, गो फिगर...

हाऊस आॅफ कार्ड्स च्या सिजन ५ ची बीजं आहेत या ड्रामात... :)

विकास's picture

27 Jul 2016 - 7:34 pm | विकास

निवडणूक लढवण्याआधी ट्रंपला हिलरीबद्दल काय वाटायचे हे ऐकण्यासारखे आहे... ;)

पद्मावति's picture

21 Jul 2016 - 11:54 pm | पद्मावति

रोचक आहे. वाचतेय.
डोनाल्ड ट्र्म्प विषयी मला फार सहानुभूती नाही. तो जितके खंबीर पावलं उचलेन असे आत्ता म्हणतोय ते तो प्रेसिडेण्ट झाल्यावर करेलच असे वाटत नाही. त्याची सगळी मतं, convictions फक्त निवडणुकीपर्यंतच असतील असे वाटत आहे. भडक विधानं करणे आणि खंबीरपणा यामधला फरक याला जाणवत नाहीये.अर्थात हे माझे दूर बसून बांधलेले अंदाज आहेत. अमेरिकन स्थानिक मिपाकर यावर अचूक मत देऊ शकतील.

मयुरा गुप्ते's picture

22 Jul 2016 - 1:36 am | मयुरा गुप्ते

रोचक विश्लेषण...वाचतेय.
बील क्लिंट्न जेव्हा सत्तेत होते तेव्हापासुन हिलरी बाई सक्रिय राजकारणात येउन अतिउच्च पदावर अधिभार सांभाळे पर्यंत साधं,सोप्प, सरळमार्गी,निष्कलंक, लोकाभिमुख राजकारण न खेळता बरेच वेळा वादग्रस्त भोवर्‍यात सापडलेले आहेत.
हिलरीची आताची ईमेज ही एका वर्षात तयार झालेली नाही त्यामुळे आता जर कोणी तिला दुषणे देत असेल तर त्यात फार काही वावगं वाटतं नाहि.

डॉनाल्ड ची पाटी त्या मानाने साफ आहे. बेछुट्,बेताल, असंबंध वक्तव्य ही काय त्याच्या एकट्याची मक्तेदारी नाहि. किंबहुना आपल्या अनेक नेत्यांनी त्याच्याशी कधीच सरशी केलीही असेल. प्रत्यक्ष कारभार सांभाळताना बरिचशी आश्वासने गुंडाळुन ठेवतात हा ही अनुभव घेउन झालाय. टाळ्या खेचु भाषणांना चांगली वाईट प्रसिद्धी मिळतेच पण त्याने देशाचा कारभार हाकता येत नाही. आधीच फुट पडलेल्या देशात समंजसतेचं मलम आवश्यक आहे, ते निदान एकने तरी लावावं एव्हढीच अपेक्षा आहे.
बघु काय काय होतयं ते...

--मयुरा

हुप्प्या's picture

24 Jul 2016 - 1:24 am | हुप्प्या

ट्रंप आणि हिलरी दोघांनी आपापले उपराष्ट्रपतीपदाचे जोडीदार जाहीर केले आहेत. माइक पेन्स आणि टिम केन असे ते अनुक्रमे आहेत. हे दोघेही मला तरी अनोळखी आहेत. बहुतांश अमेरिकन लोकांनाही फार परिचित नावे नाहीत. हिलरीबाईंनी एलिझाबेथ वॉरनलाही तपासून पाहिले असावे पण दोघी बायका स्वीकारणे कदाचित अमेरिकन जनतेला जड जाईल म्हणून तिच्याऐवजी केन. कदाचित वॉरन बाई तिच्या आक्रमकपणामुळे नाकापेक्षा मोती जड बनली असती अशीही शक्यता हिलरीदेवींना वाटली असेल!

असो. एकंदरीत हे दोघे उमेदवार फार प्रभाव टाकतील असे वाटत नाही.

हिलरीचा तिटकारा वाटणारे लोक मिपावर आहेत हे पाहून आनंद वाटला. मला ती बाई राष्ट्राध्यक्ष म्हणून नको वाटते. एक प्रस्थापित राजकारणी, स्वार्थी, सरड्यासारखी रंग बदलणारी व्यक्ती सर्वोच्चपदी बसल्याने अमेरिकेचे काही भले होईल असे वाटत नाही. तिचे बहुतेक मतदार नाईलाजाने तिला मत देत आहेत असे वाटते. उत्साह, चैतन्य ह्यांचा हिलरी समर्थकांत पूर्ण अभाव आहे. काहीतरी नवे धोरण बघायला मिळण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ एक स्त्री राष्ट्राध्यक्ष बनली हेच काय ते नाविन्य.

त्यापेक्षा ट्रंप बरा.

हुप्प्या's picture

25 Jul 2016 - 5:30 am | हुप्प्या

हिलरीच्या पाताळयंत्रीपणाचा एक नवा नमुना उघडकीस आला आहे. कुण्या रशियन हॅकरने डेमॉक्रॅटिक पक्षाचा पत्रव्यवहार उघड केला आहे. त्यात असे दिसते आहे की ह्या पक्षाने पद्धतशीरपणे बर्नी सँडर्स ह्या अनपेक्षितरित्या लोकप्रिय ठरलेल्या उमेदवाराचे खच्चीकरण करायचा डाव आखला होता. वास्तविक प्राथमिक निवडीत (प्रायमरी) पक्षाने अशी बाजू घ्यायची नसते. प्रत्येक उमेदवाराला आपली गुणवत्ता मांडण्याचा हक्क मिळावा आणि लोकांनी त्यातला निवडून येऊ शकेल असा उमेदवार निवडावा अशी अपेक्षा असते. पक्षाने तटस्थ राहून व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा असते. पण पाताळयंत्री हिलरीने ह्या तटस्थपणाला सुरुंग लावला आहे. अजून हिलरी ह्या प्रकरणात सापडलेली नाही पण हिलरीच्या कलाने घेण्याची पक्षव्यापी मोहीम असेल तर त्यात हिलरीचा हात नसेल हे शक्य वाटत नाही.

असो. बर्नीने बोंबाबोंब केली त्यामुळे सध्या डेबी वासरमन शुल्ट्झ ह्या डेमो पक्षाच्या अध्यक्षीण बाईला राजीनामा देणे भाग पडले आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर अशी श्रीमुखात बसल्याने पक्षाचे नाव बदनाम झाले आहे. ह्या शुल्ट्झ बाईची भूमिका पूर्वीपासूनच वादग्रस्त होती. ती हिलरीच्या बाजूने पक्षपात करत होती असा आरोप होताच. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले.

बिचारा बर्नी! एक अत्यंत सज्जन, तत्त्वनिष्ठ आणि लोकप्रिय उमेदवार होता पण अशा घरभेदी लोकांमुळे त्याची उमेदवारी धुळीस मिळाली.

हिलरीपेक्षा ट्रंप बरा. सगळा रिपब्लिकन पक्ष विरोधात असताना त्यांच्या नाकावर टिच्चून पुढे आला उलट हिलरी, सगळ्या प्रकारची लबाडी करुन उमेदवारी मिळवायचा प्रयत्न उबगवाणा आहे.

गॅरी ट्रुमन's picture

25 Jul 2016 - 10:08 pm | गॅरी ट्रुमन

हे प्रकरण हिलरींना जड जाईल अशी चिन्हे आहेत किंबहुना तसे व्हावेच असेच वाटू लागले आहे. या प्रकरणामुळे डेमॉक्रॅटिक पक्षात अपेक्षेप्रमाणे अस्वस्थता वाढली आहे. बर्नी सॅंडर्स यांचे एक समर्थक डेलिगेट नॉर्मन सोलोमन यांनी तसे संकेतच दिले आहेत. त्यांनी वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना म्हटले: "The outrage is not just smouldering, it is burning". तसेच स्वत: बर्नी सॅंडर्स यांनीही आपली नाराजी पुढील शब्दात व्यक्त केली आहे:

हा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे यात अजिबात शंका नाही. २००० साली जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे बंधू गव्हर्नर असलेल्या फ्लॉरीडा राज्यात काही हजार आफ्रिकन अमेरिकन मतदारांची नावे मतदारयादीतून ’योगायोगाने’ गायब करण्यात आली होती. पुढे बुश अल गोरपेक्षा एकूण मते कमी मिळूनही अध्यक्ष झाले ते फ्लॉरीडामध्ये काही शे मतांची आघाडी मिळाली म्हणूनच. हा प्रकार लोकशाहीची थट्टा उडविणारा होता यातही अजिबात शंका नाही. पण मग हिलरींनी केले आहे ते काय? जर पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याला असे अखिलाडू वृत्तीने उमेदवारीपासून दूर ठेवले जात असेल तर ती पण लोकशाहीची थट्टा नाही का? या लिंकमध्ये म्हटले आहे की बर्नी सॅंडर्स यांच्या समर्थक मतदारांपैकी ४०% मतदार हिलरींना मत देणार नाहीत अशी एक जनमत चाचणी आली आहे. ही चाचणी कुठची वगैरे माहिती त्यात दिलेली नाही पण इंग्लंडमधील टेलिग्राफ या वर्तमानपत्रात ही बातमी आली आहे तेव्हा त्यात थोडे तरी तथ्य असेल असे वाटते.

एकूणच या निवडणुकीत नक्की काय होईल हे सांगता येणे कठिणच आहे. रिपब्लिकन पक्षात ऐक्य नाही असे म्हणावे तर कदाचित डेमॉक्रॅटिक पक्षही त्याच वाटेने जात आहे. हिलरी नको म्हणून पारंपारिक डेमॉक्रॅटिक उमेदवार रिपब्लिकन पक्षाला तर ट्रम्प नको म्हणून पारंपारिक रिपब्लिकन उमेदवार डेमॉक्रॅटिक पक्षाला मत द्यायची शक्यता आहे. तसेच मिशिगनमध्ये बर्नी सॅंडर्स यांनी प्रायमरीमध्ये विजय मिळवला होता तेव्हा म्हटल्याप्रमाणे हा विजय जर फ्री मार्केटविरूध्द वातावरणामुळे मिळाला असेल तर ते हिलरींना चांगले लक्षण नाही. बिल क्लिंटन यांनी नॅफ्टा करार केल्यानंतर ओहायो आणि मिशिगनमध्ये जो काही थोडाफार मॅन्युफॅक्चरींग बेस होता तो पण कमी झाला.आणि त्याचे लोढणे हिलरींना वागवावे लागेल. मिशिगन हे राज्य डेमॉक्रॅटिक पक्षाने १९९२ पासून अध्यक्षीय निवडणुकांमध्ये गमावलेले नाही. अशा राज्यांमध्ये फटका बसणे हे चांगले लक्षण नसेल.

विकास's picture

25 Jul 2016 - 11:36 pm | विकास

हा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे यात अजिबात शंका नाही.

अयोग्य आहेच आहे. पण दुर्दैवाने आश्चर्य वाटले नाही. पण वरीष्ठ नेते इतके मुर्ख कसे आहेत हे समजत नाहीत की सरळ इमेलमधे वाटेल ते लिहीतात! :)

जर पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याला असे अखिलाडू वृत्तीने उमेदवारीपासून दूर ठेवले जात असेल तर ती पण लोकशाहीची थट्टा नाही का?

हा मुद्दा तितकासा बरोबर नाही. म्हणजे चालूपणा (अखिलाडू वगैरे) बर्‍यापैकी मान्य आहे. पण पक्षांतर्गत हे मान्य नाही! :) सँडर्स हे त्यांच्या जवळपास ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कुठल्याच पक्षाचे सदस्य नव्हते. ते बहुतांशी वेळेस डेमोक्रॅटीक पक्षाच्या बाजूने वॉशिंग्टनला मते देण्यासाठी आणि कमिटीतील जागा मिळवण्यासाठी राहीले असले तरी ते "स्वतंत्र" म्हणूनच राहीले. आधीच्या काळात ते डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवाराला हरवून निवडून आले. पण नंतर डेमोक्रॅटीक पक्षाने त्यांना पाठींबा देऊन स्वतःचा उमेदवार उभा केला नाही हा देखील एक इतिहास आहे.

मात्र सँडर्स यांची जेंव्हा राष्ट्राध्यक्षपदासाठीची महत्वाकांक्षा जागी झाली, तेंव्हा ते स्वतंत्र लढू शकणार नव्हते. अमेरीकेत ते फारच अवघड असते. पण इथे एखाद्याला कधी स्वतंत्र म्हणणे तर कधी रिपब्लिकन - डेमोक्रॅट्स म्हणून स्वत:ची संलग्नता बदलणे शक्य असते. ते उगाच नाकारणे पक्षाला देखील शक्य नसते. तरी देखील सुरवातीच्या काळात ते स्वतःला डेमोक्रॅट म्हणायला तयार नव्हते. शेवटी नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी जाहीर केले की ते आता डेमोक्रॅट आहेत म्हणून!

आता विचार करा की जी व्यक्ती पक्षाशी संलग्नता दाखवायला काचकूच करते त्या व्यक्तीच्या बाबतीत पक्षाधिकार्‍यांचे काय मत असावे? सँडर्स यांचे हे अलिप्तता धोरण हे काँग्रेसचा चार आण्याचा सदस्य देखील नाही म्हणत सगळ्या काँग्रेसच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रकारातलेच वाटते.

अर्थातच वर म्हणल्या प्रमाणे यात पक्षश्रेष्ठींचे समर्थन नाही. पण ज्या प्रकारे अमेरीकन पक्षिय पद्धती आहे त्यात ते जाहीर काही करू शकत नव्हते, जे ट्रंप विरोधी रिपब्लिकन्सच्या बाबतीतही होत आहे.

या लिंकमध्ये म्हटले आहे की बर्नी सॅंडर्स यांच्या समर्थक मतदारांपैकी ४०% मतदार हिलरींना मत देणार नाहीत अशी एक जनमत चाचणी आली आहे.

ही बातमी बरोबरच आहे. ते ४० % ट्रंपला मते देण्याची शक्यता नाही. पण जवळपास ६०% आत्ता तयार आहेत ही मोठी आकडेवारी आहे. अजून आधिवेशन होयचे आहे. त्यामुळे ती वाढेलच. सँडर्स ह्यांनी या इमेलप्रकरणाबाबत खूप मोठ्ठा आवाज उठवलेला नाही. शिवाय हे आधिवेशन चालू होण्याआधी झाल्याने डॅमेज कंट्रोल करून पुढे जाणे त्यामानाने सोपे जाणार आहे. सगळे डेमोक्रॅट्स कधीच एकत्र येण्याची शक्यता नाही. किंबहूना त्यावरून विल रॉजर नामक कलाकाराचे एक मजेशीर जुने वाक्य देखील आहे, "I am not a member of any organized political party. I am a Democrat." :)

बिल क्लिंटन यांनी नॅफ्टा करार केल्यानंतर ओहायो आणि मिशिगनमध्ये जो काही थोडाफार मॅन्युफॅक्चरींग बेस होता तो पण कमी झाला.आणि त्याचे लोढणे हिलरींना वागवावे लागेल.

ती शक्यता मला कमी वाटते. बिल क्लिंटन यांनी नाफ्टाकरारच्या वेळेस क्लिंटन यांनी कार्टर (डेमोक्रॅट) तसेच बुश, फोर्ड (रिपब्लिकन) माजी राष्ट्राध्यक्षांना एकत्र आणले होते. परीणामी रिपब्लिकन पक्षाने देखील नंतर पाठींबा दिला होता.

त्या व्यतिरिक्त आता ही गोष्ट फारच जुनी झाली आहे. त्यामुळे त्याचा फायदा अथवा तोटा काहीच होण्याची शक्यता नाही असे वाटते. मिशिगनमधे सँडर्स जरी निवडून आले असले तरी ते preferred उमेदवार म्हणून असतील हिलरीच्या विरोधात म्हणून शक्यता कमी. त्या व्यतिरीक्त रिपब्लीकन गव्हर्नर च्या धोरणामुळे जे काही पाणी प्रदुषण आणि लेड पॉयजनिंग प्रकरण गेल्या वर्षात घडले आहे त्याचा तोटा हा रिपब्लिकन पक्षाला सहन करावा लागणार आहे असे वाटते.

या आधिवेशनात ओबामा, मिशेल ओबामा, बिल क्लिंटन आणि काही हॉलिवुडी कलाकार यांच्या भाषणांचा वापर करून जनतेत हिलरीच्या बाजूने उत्साही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो काही अंशाने का होईना यशस्वी होईल. नंतर काय होते हे हिलरी आणि ट्रंप त्यांचे त्यांचे कँपेन कसे चालवणार आहेत त्यावरून ठरेल!

नंदन's picture

26 Jul 2016 - 5:10 am | नंदन

किंचित तपशीलः

Bush signs North American trade pact Clinton says he won't renegotiate

(दुवा)

+

येथूनः

In the U.S., Bush, who had worked to "fast track" the signing prior to the end of his term, ran out of time and had to pass the required ratification and signing of the implementation law to incoming president Bill Clinton. Prior to sending it to the United States Senate Clinton added two side agreements, The North American Agreement on Labor Cooperation (NAALC) and the North American Agreement on Environmental Cooperation (NAAEC), to protect workers and the environment, plus allay the concerns of many House members. It also required U.S. partners to adhere to environmental practices and regulations similar to its own.

मराठमोळा's picture

25 Jul 2016 - 9:21 am | मराठमोळा

ट्रंप यांची भूमिका हा जुना फॉर्म्युला आहे आणी बर्‍यापैकी निवडणूक जिंकवणारा आहे. केलेली सर्व विधानं आणी दिलेली सर्व वचने पाळणे निवडणूक जिंकल्यावर आवश्यक नसते. त्यामुळे ट्रंपच्या गर्जना प्रसिद्धीसाठीच असाव्यात. हिलरीच्या तुलनेत हा माणूस हुशार वाटतो आणी कदाचित एक मुरलेला बिझनेसमन म्हणून असेलही. माझ्या मते जगाच्या पाठीवर कुठेही अतिरेकी हल्ला झाला तर तो ट्रंपच्या पारड्यात वजनच टाकेल असे वाटते. लोकांना आक्रमक नेते आवडतात हे नविन नाही. हिलरी एक चांगली व्यव्स्थापक वाटते पण राष्ट्राध्यक्ष म्हणून चांगली ठरेल याबद्दल साशंक आहे.

विकास's picture

25 Jul 2016 - 10:44 pm | विकास

हिलरीच्या तुलनेत हा माणूस हुशार वाटतो ... हिलरी एक चांगली व्यव्स्थापक वाटते

मधे एकदा त्यांची तुलना ऐकताना ऐकले होते: ट्रंप हा सामान्यांना समजेल अशी भाषा वापरतो आणि काही वाक्यांमधे बोलतो तर हिलरीला तीच्या पॉलीसी समजून सांगायला पानेच्या पाने लागतात... या अर्थाने तुमचे निरीक्षण बरोबरच आहे. पण ट्रंपने आजतागायत एकही पॉलीसी सांगितलेली नाही... अमेरीकन राजकारणात स्वतःच्या भुमिका स्पष्टकरणे महत्वाचे असते आणि त्या कशा अस्तित्वात येतील हे देखील सांगणे महत्वाचे असते. पण ट्रंप हे काहीच करत नाही. फक्त, believe me, I love you guys, America is going to be great again, इतकेच बोलून सोडून देत असतो. रिपब्लीकन कन्वेन्शनच्या बाबतीत देखील "या वेळी" तेच झाले आहे. कुठलीही पॉलीसी जाहीर केली गेली नाही. फक्त believe me, I love you guys, America is going to be great again, या ट्रंपच्या शब्दप्रयोगाव्यतिरीक्त हिलरी कशी वाईट यावरच भर दिला गेला. त्याचा परीणाम म्हणून तुर्तास ट्रंप यांची प्रसिद्धी आणि संभाव्य मतदार हे पाच गुणांनी वाढलेले आहेत असे आजच जाहीर झालेल्या सीएनएनच्या सर्वेक्षणावरून ठरले. अर्थात कन्वेन्शननंतर साधारण ५ ते ७ गुण तात्पुरते वाढतात हे यासंदर्भात लक्षात ठेवायला हवे. म्हणजे हेच हिलरीच्या बाबतीत पण होणार आहे.

मराठमोळा's picture

26 Jul 2016 - 4:58 am | मराठमोळा

>>पण ट्रंपने आजतागायत एकही पॉलीसी सांगितलेली नाही

याच्याशी सहमत.

>>अमेरीकन राजकारणात स्वतःच्या भुमिका स्पष्टकरणे महत्वाचे असते आणि त्या कशा अस्तित्वात येतील हे देखील सांगणे महत्वाचे असते

हे विधान सामान्य जनतेला कितपत लागू पडेल अशी शंका आहे. वरील कारणामुळे कॉर्पोरेट जगताने ट्रंपला जाहीर विरोध केलाच आहे. हा दुवा पण एकंदरीत लोकप्रियता पाहता सामान्य मतदात्याला कसं करणार यापेक्षा तो काय करणार हे जास्त महत्वाचे असावे. त्यात इमिग्रेशन हा अमेरीकनांचे मोठे दुखणे आहे (प्रत्यक्षात नसले तरी). भरीस भर म्हणून तो अतिरेक्यांपासून सुरक्षितता देईल असे लोकांना वाटते.

अवांतर : मी काही राजकारणातला तज्ञ किंवा अभ्यासूही नाही. पण यावेळची निवडणूक फार रोचक आहे आणि निकाल फार मोठे बदल घडवू शकतील असे वाटते म्हणून फॉलो करत आहे. :)

अर्धवटराव's picture

25 Jul 2016 - 10:30 pm | अर्धवटराव

अंकल सॅमच्या घरातल्या या लाथाळ्या बघुन आपले राजकारणी फार बरे वाटायला लागले आहेत :)

जयन्त बा शिम्पि's picture

25 Jul 2016 - 11:04 pm | जयन्त बा शिम्पि

ट्रम्प यांनी किती भंपक व मुर्खपणाची विधाने केली आहेत हे जरा कोणी तुनळी ( YouTube ) शोध घेवुन पाहिले तर पटेल कि त्यापेक्षा हिलरी क्लिंटन बरी !! http://www.newsmax.com/jokes/ या पण लिंकवर गेलात तरी त्यावर काय काय जोक्स येथे टिव्ही वर दाखवितात ते पहाता येइल.
ह.मु. न्यू जर्सी .

हुप्प्या's picture

26 Jul 2016 - 7:02 am | हुप्प्या

ट्रंपला झोडपून काढण्याची एक फ्याशन उच्चभ्रू लोकांत रूढ झालेली आहे. सगळे आघाडीचे कॉमेडियन, विश्लेषक ट्रंपवर विनोद करणे हे आपले पवित्र कर्तव्य मानतात. मग त्याचे दिसणे, त्याचे केस हेही टीकेच्या कक्षेबाहेर जात नाही. हिलरी वा ओबामाबद्दल तितकेसे खुले विनोद केले जात नाहीत. कारण ते पॉलिटिकली करेक्ट नाही!

काही मुद्दे असे आहेत ज्यावर डेमॉक्रॅटिक पक्ष, त्यातही हिलरी विशेष एक अवाक्षरही काढू धजत नाही.
१. बेकायदा घुसखोरी.
२. आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवादः ह्या दहशतवादाला इस्लामी मानणे म्हणजे तमाम मुस्लिमांचा अपमान अशी समजूत उराशी बाळगणे.
३. राजकारणावर असणारा उद्योगांचा प्रभाव.

बर्नीने ३ नंबरचा मुद्दा उचलून धरला त्यामुळे त्याची उचलबांगडी झाली.
हे मुद्दे खुलेपणाने चर्चेत आणून ट्रंपने अनेक लोकांचे समर्थन मिळवलेले आहे.

उच्चभ्रू लोक न्यू यॉर्क, लॉस एंजेलिस, बॉस्टन, सॅन फ्रॅन अशा थोडक्या भागात आहेत. उच्चभ्रू लोकांनी उच्चभ्रू लोकांकरता लिहिलेले ट्रंपवरील विनोद वाचून तमाम उच्चभ्रू खो खो हसतात. पण अमेरिकेत एक मोठा वर्ग असा आहे जो बेकायदा घुसखोरी, चीनी मालाची अनिर्बंध आयात, दहशतवादाबद्दल टीका न करणे अशा गोष्टींवर प्रचंड नाराज आहे. अनेक लोक बेकार झालेले आहेत, कित्येक पिढ्या ज्या कामात तरबेज होत्या ती कामे कायमची हद्दपार झालेली असल्यामुळे त्या व्यवसायात कंगाल होत आहेत. ह्या असंतोषाबद्दल डेमोक्रॅट काही म्हणजे काहीही करु इच्छित नाहीत. त्याचा फायदा ट्रंपला होणारच. दोलायमान राज्यात जसे ओहायो, व्हर्जिनिया, पेन्सिल्वेनिया इथे असा असंतोष पुरेसा असेल तर ट्रंप निवडून येऊ शकतो.

डेमोक्रॅट अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मोठा अपशकून झालेला आहे त्यामुळे कदाचित हिलरीला मिळणारा उठाव कमी होणे शक्य आहे.

हिलरीने अनेकदा असे दाखवून दिलेले आहे की तिची मनोवृत्ती ही एखाद्या महाराणीप्रमाणे आहे. ती कायदे जुमानत नाही. सरकारी यंत्रणांना दावणीला जुंपून आपल्याला निष्कलंक ठरवण्याचा पाताळयंत्रीपणा तिला अवगत आहे.

ट्रंप पॉलिसीविषयी बोलत नाही म्हणणार्‍यांनी खालील गोष्टी पॉलिसी ह्या सदरात मोडतात का ते पहावे
१. चीनसारख्या बलाढ्य देशाला आयात करण्याकरता कर लावणे जेणेकरून ते इतक्या सहज स्वस्त माल अमेरिकेत आणून स्थानिक मालाची बाजारपेठ नष्ट करणार नाही.

२. बेकायदा घुसखोरीवर बंदी.

३. बेकायदा घुसखोरी रोखायला भिंत बांधणे.

४. आयकर ह्या प्रकाराचे सुलभीकरण

५. मोठ्या उद्योगांची राजकारणावरील पकड कमी करण्याकरता कायदे.

बाकी उर्मटपणा, अहंकार, अज्ञान ह्या अवगुणांनी युक्त असला तरी ज्याविषयी डेमॉक्रॅट्स बोलणे टाळतात त्याविषयी खुलेपणाने बोलून ट्रंप मोठ्या प्रमाणात पाठिराखे मिळवत आहे.

ट्रंपच्या सुदैवाने इस्लामी दहशतवादी नियमितपणे जगभर विविध अतिरेकी कारवाया करत आहेत. त्या अशाच चालू राहिल्या तर ट्रंपचा फायदा होत रहाणार.

हिलरीत स्फूर्तीदायक असे काहीही नाही. तिचे भाषण अत्यंत कर्णकटू किंवा रटाळ ह्या दोन टोकांमधे मर्यादित असते.

नीसमधे एक मुस्लिम अतिरेकी डझनावारी लोकांना ट्रकखाली चिरडत असतानाची दृष्ये दाखवत होते. ट्रंपची प्रतिक्रिया विचारली तर, "हे जागतिक युद्ध आहे. ९/११ पासून चाललेल्या दहशतवादाचा हा पुढचा अध्याय आहे. सॅन बर्नार्डिनो, ओर्लॅण्डो हे प्रकार आहेतच. आज आपले जे नेते आहेत तसेच नेते मिळत राहिले तर हे आणि असे प्रकार होतच रहाणार. ". मला वाटते जनतेला असे काहीतरी जहाल बोलणे जास्त भावते.

उलट हिलरीची प्रतिक्रिया "फ्रान्स आपला सहकारी आहे. नॅटोचे हात बळकट केले पाहिजेत. आपण सगळ्या सहकारी देशांशी जास्त सहकार्य केले पाहिजे".
अत्यंत रटाळ, अनाकलनीय. नेटो ह्या संघटनेकडे अंतर्गत दहशतवादाबद्दल काही करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे नेटोचा उल्लेख कशाला? दहशतवाद काही आज जन्मला नाही. आत्तापर्यंत फ्रान्स काही शत्रू नव्हता. तेव्हा आता यापुढे नक्की कुठले सहकार्य करणे बाकी आहे? कशाचा काही पत्ता नाही! गुळमुळीत, तोंडदेखले काहीतरी बोलणे.

हिलरीला सौदी अरेबियाकडून कोट्यावधी डॉलर मिळाले आहेत त्यामुळे बहुधा त्याच्याशी इमान राखत ती इस्लामी दहशतवादाविरुद्ध मवाळ भूमिका घेणे पसंत करत असावी. अशाने पैसे मिळतील पण मते मिळणे अवघड!

रंगासेठ's picture

26 Jul 2016 - 5:18 pm | रंगासेठ

या आधीचे धागे नंतर नंतर वाचले नाहीत म्हणून की काय, पण एका प्रश्नाबद्दल माहिती हवी होती.
ट्रंप आणि हिलरी यांच्यापैकी कोण निवडून आलं तर भारत-अमेरिका संबंधात बाधा येणार नाही / सध्या जितपत सहकार्य आहे तितपत तरी राहील?

ट्रंपच्या 'अँटी इम्मिग्रेशन' विधानाबद्दल कसे वातावरण आहे? स्थानिक अमेरिकन्स मधे इमिग्रंट्स मुळे आपल्या नोकर्‍यांवर गदा येते अशी भावना फार वाढीस लागली आहे असं वाचलं.

एस's picture

28 Jul 2016 - 12:23 am | एस

पारंपरिकरित्या पाहिल्यास रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष झाल्यास भारताला अनुकूल अशी भूमिका अमेरिकेकडून घेतली जाते व पाकिस्तानला विरोधी. बुश यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवण्याची तयारी जवळपास केलेली असताना नंतर क्लिंटननी ती प्रक्रिया रोखली. डेमोक्रॅटिक पक्ष मूलतः नॉन-प्रॉलिफरेशन ट्रीटी (अण्वस्त्रप्रसारबंदी करार) चा कट्टर पाठिराखा आणि पाकिस्तानच्या कारवायांकडे काणाडोळा करणारा पक्ष आहे. भारताबद्दल हा पक्ष कायम संशयाच्या दृष्टीने पाहतो. मग भलेही क्लिंटन दांपत्य हे वैयक्तिकरित्या भारतमित्र असल्याची कितीही बतावणी करत असो. ट्रंप असो वा रिपब्लिकनचा इतर कोणी उमेदवार; भारताला तो सत्तेवर येण्याचा फायदाच होईल, असे माझे मत आहे.

गामा पैलवान's picture

26 Jul 2016 - 5:42 pm | गामा पैलवान

हुप्प्या,

हे काय वाचतोय मी !


उच्चभ्रू लोक न्यू यॉर्क, लॉस एंजेलिस, बॉस्टन, सॅन फ्रॅन अशा थोडक्या भागात आहेत. उच्चभ्रू लोकांनी उच्चभ्रू लोकांकरता लिहिलेले ट्रंपवरील विनोद वाचून तमाम उच्चभ्रू खो खो हसतात. पण अमेरिकेत एक मोठा वर्ग असा आहे जो बेकायदा घुसखोरी, चीनी मालाची अनिर्बंध आयात, दहशतवादाबद्दल टीका न करणे अशा गोष्टींवर प्रचंड नाराज आहे. अनेक लोक बेकार झालेले आहेत, कित्येक पिढ्या ज्या कामात तरबेज होत्या ती कामे कायमची हद्दपार झालेली असल्यामुळे त्या व्यवसायात कंगाल होत आहेत. ह्या असंतोषाबद्दल डेमोक्रॅट काही म्हणजे काहीही करु इच्छित नाहीत. त्याचा फायदा ट्रंपला होणारच.

अमेरिकेत सूर्य पश्चिमेला उगवू लागला की काय ! कोणे एके काळी डेमोक्रॅट पक्ष कष्टकऱ्यांचा मानला जात असे. On the other hand, if you are rich and white then you are a republican. आता चक्क रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार गरिबांच्या जिव्हाळ्याचे प्रश्नांवर बोलतो? तो क्या जमाना सचमुच बदल गया है? ;-)

आ.न.,
-गा.पै.

हुप्प्या's picture

26 Jul 2016 - 6:55 pm | हुप्प्या

काळे लोक, लॅटिनो, गे, लेस्बियन, मुस्लिम, स्त्रिया अशा प्रकारच्या वर्गवारीत मोडणारे अल्पसंख्य गरीब असतील तर डेमॉक्रॅट्स त्यांच्या बाजूने असतात. पण श्वेतवर्णीय लोकांची त्यांना पर्वा नाही असे दिसते. आणि ज्यांची आर्थिक स्थिती उत्तरोत्तर खालावत आहे असे शेतकरी, खाणकामगार, छोटे उद्योजक ह्यात गोर्‍या लोकांचा भरणा आहे आणि कदाचित म्हणूनच डेमॉक्रॅटिक पक्ष ह्या गटाला दुर्लक्षित ठेवत आहे. त्यांची दु:खे कमी लेखत आहे असे वाटते.

पुरोगामीत्व वा लिबरलिझ्म हा एक धर्म बनू पाहत आहे. त्यात अशी काही तत्त्वे आहेत जी जणू थेट देवाकडून आलेली आहेत आणि ज्याच्यावर कुठलीही चर्चा, उहापोह होऊ शकत नाही. अशा प्रकारे एखाद्या भूमिकेचा धर्म बनला की विचारशक्ती लयाला जाते.

डेमोक्रॅट असा आव जरूर आणतात की आपण गरीबांचे तारणहार आहोत पण त्यांची धोरणे त्याच्याशी विसंगत आहेत. उदा. हिलरी मोठ्या उद्योगांकडून कोट्यावधी डॉलर्स देणगी म्हणून घेते. आता अशी मदत घेतल्यावर तिची धोरणे उद्योगांचा तोटा होईल अशी असतील का?
रिपब्लिकन पक्ष गरीब तारणहार असल्याचा आव आणत नाहीत. परंतु त्यांच्या काही रोखठोक भूमिकेमुळे त्यांना दुर्लक्षित वर्गाचा पाठिंबा मिळत आहे. त्यात थोडा वांशिक भेदाचा अंश असू शकतो पण निव्वळ रेसिजममुळेच असे होते आहे असे मानणे भोळसटपणाचे आहे.

रिपब्लिकन पक्ष गरीब तारणहार असल्याचा आव आणत नाहीत. परंतु त्यांच्या काही रोखठोक भूमिकेमुळे त्यांना दुर्लक्षित वर्गाचा पाठिंबा मिळत आहे.

थोडीशी दुरुस्ती. ही रोखठोक भुमिका रीपब्लिकन पक्षा ची नसुन ट्रंप ची आहे.

डेम्स मधुन सँदर्स आणि रीपब्लिकन मधुन ट्रंप बाजुला केले तर दोन्ही पक्षात फार काही फरक नाही आर्थिक नितींबद्दल.

मदनबाण's picture

31 Jul 2016 - 9:25 am | मदनबाण
मदनबाण's picture

14 Aug 2016 - 11:52 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho