अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६
| आयोवा कॉकस | १ फेब्रुवारी २०१६ | |
| डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| हिलरी क्लिंटन | 49.9% | 23 |
| बर्नी सँडर्स | 49.6% | 21 |
| मार्टिन ओ'मॅली | 0.6% | 0 |
| आयोवा कॉकस | १ फेब्रुवारी २०१६ | |
|---|---|---|
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| टेड क्रुझ | 27.6% | 8 |
| डॉनल्ड ट्रम्प | 24.3% | 7 |
| मार्को रुबिओ | 23.1% | 7 |
| बेन कार्सन | 9.3% | 3 |
| रॅन्ड पॉल | 4.5% | 1 |
| जेब बुश | 2.8% | 1 |
| न्यू हॅम्पशायर प्रायमरी | ९ फेब्रुवारी २०१६ | |
| डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| बर्नी सँडर्स | 60.4% | 15 |
| हिलरी क्लिंटन | 38.0% | 9 |
| न्यू हॅम्पशायर प्रायमरी | ९ फेब्रुवारी २०१६ | |
|---|---|---|
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| डॉनल्ड ट्रम्प | 35.3% | 11 |
| जॉन कॅसिच | 15.8% | 4 |
| टेड क्रुझ | 11.7% | 3 |
| जेब बुश | 11.0% | 3 |
| मार्को रुबिओ | 10.6% | 2 |
| नेवाडा कॉकस | २० फेब्रुवारी २०१६ | |
| डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| हिलरी क्लिंटन | 52.6% | 19 |
| बर्नी सँडर्स | 47.3% | 15 |
| नेवाडा कॉकस | २३ फेब्रुवारी २०१६ | |
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| डॉनल्ड ट्रम्प | 45.9% | 12 |
| मार्को रुबिओ | 23.9% | 5 |
| टेड क्रुझ | 21.4% | 5 |
| बेन कार्सन | 4.8% | 0 |
| जॉन कॅसिच | 3.6% | 0 |
| साऊथ कॅरोलायना प्रायमरी | २० फेब्रुवारी २०१६ | |
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| डॉनल्ड ट्रम्प | 32.5% | 50 |
| मार्को रुबिओ | 22.5% | 0 |
| टेड क्रुझ | 22.3% | 0 |
| जेब बुश | 7.8% | 0 |
| जॉन कॅसिच | 7.6% | 0 |
| बेन कार्सन | 7.2% | 0 |
In reply to \/ by खालीमुंडी पाताळधुंडी
Reasons to vote Trump
A handy list of all the reasons to vote Trump. Show America who to vote for!In reply to आपल्यासाठी कोण चांगलं आहे? by बोका-ए-आझम
In reply to हिलरी क्लिंटन मोदींना व्हिसा by होबासराव
In reply to त्यामुळे आपल्या देशात डावी by होबासराव
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by होबासराव
In reply to भावना अन त्याची तीव्रता by नाना स्कॉच
In reply to (एकाच पुर्ण आइडियोलॉजीची by होबासराव
In reply to भावना अन त्याची तीव्रता by नाना स्कॉच
In reply to ह्या विचारसरणी खुद्द by निनाद मुक्काम …
नाना तुम्ही जर्मन नागरिक दिसताय! हे असले काहीतरी बोलताय ते विचार करून का आपले उगाच ? हा बघा "ट्रम" काय म्हणतो तुमचा ते हे जमंना की हो दादा! नोकऱ्या नेल्या काढून म्हणजे? तुम्हाला त्रास नसेल पण आम्ही काय करावे? पोराबाळांची माती होईल आमच्या.ट्रम आलाच पाहिजे.
In reply to ट्रम आलाच पाहिजे. by नाना स्कॉच
In reply to भारतीयांना अमेरिकन सरकार कडून by निनाद मुक्काम …
In reply to +/- by विकास
चकाकणारे सारेच सोने नसते आणि सतत बकबक करणारे खरेच कोणी ग्रेट असतात असे नाही.हे वाक्य यूनिवर्सल का? नाही एकाची बकबक दुसऱ्यासाठी "बौद्धिक" "विद्वत्ताप्रचुर" "मन की बात" वगैरे पण असू शकते न? (माझ्यासाठी आहे असा निष्कर्ष काढू नये, विधान फ़क्त "सापेक्षता" दाखवायला केले आहे)
In reply to +/- by विकास
याच्या बुडीत खात्याची यादी टाईम मॅगझिन मधे बघता येईल.यालाच अमेरिकन वे ऑफ लाईफ म्हणता येईल का? अमेरिकेत स्वतः दिवाळे जाहीर करून नंतर यश मिळवलेले कित्येक लोक आहेत.आणि अशा मंडळींमध्ये माजी अध्यक्ष अॅब्रॅहॅम लिंकन आणि विलिअम मॅकिन्ली, डॉनल्ड डक आणि मिकी माऊसला लोकप्रिय बनवलेले वॉल्ट डिस्ने, हर्शीज चॉकलेटचे मिल्टन हर्शी, हाईन्झ केचप बनविणार्या कंपनीचे संस्थापक एच.जे.हाईन्झ अशा दिग्गजांचा समावेश होतो. तेव्हा स्वतः दिवाळे जाहीर करून इतरांची देणी बुडविणे हा प्रकार भारतात जितका वाईट समजला जातो तितका वाईट अमेरिकेत समजला जात नसावा. अर्थातच एनरॉनमध्ये झाले त्याप्रमाणे फ्रॉड झाला असेल तर तो अर्थातच गुन्हा आहे.पण कोणतेही वाईट उद्देश न ठेवता जर बिझनेसमध्ये झालेल्या चढउतारांमुळे कोणी दिवाळे जाहीर केले तर ते अमेरिकेत तरी तितकेसे वाईट समजले जात नसावे. ट्रम्प यांचा प्रकार नक्की कोणत्या प्रकारात मोडतो हे बघायला हवे.
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ आहे असे आपले मत आहे का?का, कारण तो मुळ मानवी स्वभावाच्या पूर्ण पणे विरुद्ध आहे. तो पुस्तका मध्ये जरी छान छान वाटत असला तरी प्रत्येक्षात खरा उतरत नाही ह्याचे कारण तेच आहे. मानवाला मुळातच स्वार्थ साधायला, संग्रह करायला, मालकी हक्क असणे हवे असते. कोणताही विचार जर त्याच्या विरुद्ध वागा असे सांगत असला तर तो नक्की फसणार. "डीझाइंड टू फेल" असे काहीतरी म्हणता येइल. त्यापेक्षा उजवा विचार त्याच मानवी स्वभावाला वापरतो, त्यामुळे कॉन्फ्लिक्ट होत नाह सहकाराचा विचार पण असाच चुकीचा आहे. लाखो लोकांचा पैसा एका माणसाच्या हातात आल्यावर त्यात गैर प्रकार होणारच. कुठलीही व्यवस्था माणुस सज्जन आहे असे धरुन डीझाइन करता येत नाही. कारण अश्या व्यवस्थेचा ताबा दुर्जन घेतात.
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by प्रसाद१९७१
In reply to उजवा विचार मानवी स्वभावाला by नाना स्कॉच
उजवा विचार उत्तम वाटत असल्यास तो का हे तुम्ही समजवु शकता काय??उजवा विचार उत्तम नसेल पण त्याच्या पेक्षा चांगला विचार आत्ता तरी दिसत नाही. असला तर तो नक्कीच स्वीकारु ना.
In reply to मानवी स्वभावाला धरुन म्हणजे by प्रसाद१९७१
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by प्रसाद१९७१
कारण तो मुळ मानवी स्वभावाच्या पूर्ण पणे विरुद्ध आहेसहमत आहे. याविषयी मिपावर मागे हा प्रतिसाद दिला होता.विषयांतर नको म्हणून प्रतिसादाचा दुवाच देत आहे आणि प्रतिसाद इथे पेस्ट करत नाही.
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ आहे असे आपले मत आहे का?नाही. स्त्रीपुरुष समता, जातीयवादाला विरोध असे काही मुद्दे डाव्या विचारांच्या विचारवंतांनी अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहेत. आणि भारतासारख्या देशात आत्यंतिक गरिबी जोवर आहे तोपर्यंत डावा विचार पूर्णपणे कालबाह्य होणारही नाही. पण डाव्या फालतूगिरीला विरोध आहे. आणि उजव्याही. उदाहरणार्थ शिवसेनेच्या. २००९ च्या निवडणुकीत मी काँग्रेसला मत दिलं होतं कारण डाव्यांनी आणि भाजपनी एकत्र येऊन अमेरिकेबरोबरच्या अणुकरारासंदर्भात मनमोहन सिंग यांचं सरकार पाडण्याचा जो घाट घातला होता तो माझ्या डोक्यात गेला होता. ही डावी आणि उजवी फालतूगिरी. डाव्या आर्थिक विचारात बाजारपेठ आणि मुक्त अर्थव्यवस्थेला कधीकधी विरोधासाठी विरोध असतो. तुम्ही जर Economic and Political Weekly वाचलंत तर तुम्हाला कळेल की डाव्या आर्थिक विचाराचं equality obsession हे किती आहे आणि त्यापायी आपल्या देशाचं किती नुकसान झालं (उदाहरणार्थ MRTP सारख्या कायद्यांमुळे बेकारी वाढणं).शिवाय डाव्या विचारात नफा हा वाईट किंवा किमान problematic मानला जातो. पण कंपन्या नफा न कमावता कामगारांना दरवर्षी पगारवाढ कशी देणार या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोणीही डावा देत नाही. राजकीय दृष्ट्या आपल्या देशातले डावे हे बहुतांशी कामगार चळवळीतून आलेले आहेत आणि त्यातली दंडेलशाही आणि arm twisting त्यांच्यात पुरेपूर भिनलेलं आहे. मला स्वतःला महाविद्यालयीन शिक्षकांच्या युनियनचा अत्यंत वाईट अनुभव असल्यामुळे मी ट्रेड युनियन या गोष्टीच्या पूर्ण विरोधात आहे. आपल्या देशात आयटी क्षेत्रात काही चांगलं होण्याचं एक कारण तिथे युनियनला थारा नसणं हे आहे असं माझं मत आहे. कुटुंबातील काहींची १९८२ च्या मिल संपानंतर झालेली वाताहत पाहिलेली आहे. त्यामुळे ट्रेड युनियन या प्रमुख डाव्या संघटनेबद्दल माझ्या मनात फक्त तिटकारा आहे. So, मी डावा विचार टाकाऊ मानतो का? नाही. उजव्यांच्या लाथा खाण्यासाठी तरी किमान डावे असायलाच हवेत.
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by बोका-ए-आझम
In reply to बोका-ए-आझम सर by नाना स्कॉच
In reply to इथे मिपावर डाव्यांच्या by बोका-ए-आझम
In reply to एकच वाटते by विकास
In reply to मला नेहमी पडणारा प्रश्न या by सतिश गावडे
In reply to सोशॅलिझम by विकास
In reply to इथे मिपावर डाव्यांच्या by बोका-ए-आझम
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
In reply to आम्हि ना होसाबराव, ना बोकासाहेब by अर्धवटराव
In reply to +१ by बोका-ए-आझम
In reply to आम्हि ना होसाबराव, ना बोकासाहेब by अर्धवटराव
In reply to उत्तम introductory लेख. वाचतो by निशदे
minority voters(मराठी प्रतिशब्द?)अल्पसंख्यांक मतदार ? आमच्याकडे लै फेमस आहे हा शब्द ! ;-)
In reply to minority voters(मराठी by उगा काहितरीच
आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात (सुपरडेलिगेट मिळून) हिलरी क्लिंटन ५०३ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर बर्नी सॅन्डर्स ७०इथे ५०३ च्या ऐवजी १०३ पाहिजे का? एकुणात खूप माहितीपूर्ण लेख आहे. धन्यवाद.
In reply to आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात by प्रसाद१९७१
In reply to ५०५ by विकास
In reply to त्या ५०५ मधे सुपर डेलिगेट चा by प्रसाद१९७१
त्या ५०५ मधे सुपर डेलिगेट चा वाटाच ४००+ असावा.हो.आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रायमरी/कॉकस झाले आहेत त्या राज्यांमधून १०२ प्रतिनिधीच निवडले गेले आहेत (आयोवामधून ४४, न्यू हॅम्पशायमधून २४ आणि नेवाडामधून ३४). तेव्हा हिलरींना सध्या ५०५ प्रतिनिधींचे समर्थन आहे याचाच अर्थ त्यात सुपरडेलीगेटचाही समावेश असणार.
हे सुपरडेलिगेट कोणाच्या बाजुनी आहेत हे आधीच ठरले आहे का?हे सुपरडेलीगेट नक्की कोणाला समर्थन देणार हे आधीच ठरलेले आहे की त्या सुपरडेलीगेटने जाहीर वक्तव्ये केली असतील त्याप्रमाणे त्यांचे समर्थन नक्की कोणाला आहे याचे आडाखे बांधून प्रसारमाध्यमांनी ५०५ हा आकडा जाहीर केला आहे हे तपासून बघायला हवे.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to ५०५ by विकास
फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर मार्को रुबिओमार्को रुबिओ हे नावाने हिस्पानिक वाटत आहेत! आश्चर्य वाटले जरासे (अर्थात आमच्या मर्यादित ज्ञानाच्या आधारावर बेतलेले आश्चर्य) रिपब्लिकन लोक हिस्पैनिक लोकांना जवळ करतात? बाकी भारतीय मार्केटला नाराज करुन भागणार नाही हे मान्य तरीच ट्रम्प ह्यांनी सुद्धा भारताला दहशतवादाचा प्रचंड त्रास असल्याचे नमूद अन कबुल केले होते बहुदा (बाकी हे बोलतील लाख तरी पाकड्यालोकांना मदत अव्याहत ठेवतील असे वाटते दुर्दैवाने) रिपब्लिकन पक्ष जास्त पाकिस्तानधर्जिणा आहे असे ही ऐकले होते.
In reply to फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर by नाना स्कॉच
मार्को रुबिओ हे नावाने हिस्पानिक वाटत आहेत! आश्चर्य वाटले जरासे (अर्थात आमच्या मर्यादित ज्ञानाच्या आधारावर बेतलेले आश्चर्य) रिपब्लिकन लोक हिस्पैनिक लोकांना जवळ करतात?हो.मार्को रुबिओ हे क्युबन ओरिजिनचे आहेत.त्यांचे आई-वडिल १९५६ मध्ये क्युबातून अमेरिकेत स्थलांतरीत झाले.काळे आणि हिस्पॅनिक्स हे डेमॉक्रॅटिक पक्षाचे पारंपारीक मतदार आहेत.तरीही मेल मार्टिनेझ सारखे इतर रिपब्लिकन सिनेटरही या समुदायातून आले आहेत. मार्को रूबिओ बरोबरच टेड क्रुझ हे दुसरे रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवारही क्युबन ओरिजिनचे आहेत.त्यांचा जन्म कॅलगरी म्हणजे कॅनडामधला.माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकन अध्यक्षपदासाठी अमेरिकेत जन्माने अमेरिकन नागरिकत्व मिळालेले असणे गरजेचे आहे आणि या कारणामुळे मॅडेलाईन ऑलब्राईट (झेकोस्लाव्हाकियातील जन्म) आणि आरनॉल्ड श्वार्झनॅगर (ऑस्ट्रीयातील जन्म) हे अध्यक्षपदाची निवडणुक लढवायला पात्र नाहीत.मग त्याच न्यायाने टेड क्रुझही अपात्र व्हायला हवेत.पण तसे दिसत नाही.या नियमाला कॅनडाचा अपवाद केला आहे का हे तपासून बघायला हवे.
रिपब्लिकन पक्ष जास्त पाकिस्तानधर्जिणा आहे असे ही ऐकले होते.शीतयुध्दाच्या काळात असे चित्र उभे राहिले होते.मला वाटते की त्या त्या अमेरिकन अध्यक्षांनी त्या त्या वेळी त्यांच्या देशाचे हितसंबंध लक्षात घेता तसे तसे निर्णय घेतले होते.त्याचप्रमाणे भारताच्या नेत्यांनीही भारताच्या तत्वांना आधारून (भले ती तत्वे स्वप्नाळू असली तरी) निर्णय घेतले होते.त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वितुष्ट कोणताही पक्ष अमेरिकेत सत्तेत असता तरी आलेच असते.त्यामुळे रिपब्लिकन पक्ष हा पाकिस्तानधार्जिणा आहे किंवा डेमॉक्रॅटिक पक्ष हा त्यामानाने भारताला चांगला आहे यापेक्षा त्यावेळी दोन देशांचे हितसंबंध एकमेकांना अनुकूल नव्हते त्यामुळे भारत आणि अमेरिकेत वितुष्ट आले असे म्हणणे अधिक योग्य ठरेल असे वाटते.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to > by निशदे
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to >> by हुप्प्या
आईबाप अमेरिकन असतील तर मग देशाबाहेर जन्म झाला असला तरी तो अमेरिकनच समजला जावा असा त्या कायद्यातील कलमाचा अर्थ लावला गेला आहे. (अर्थात त्यावर वाद होऊ शकतो. ह्या मुद्द्यावर १०० % एकमत नाही)टेड क्रुझ यांचे वडिल राफेल क्रुझ हे १९७० पर्यंत क्युबाचे, १९७० ते २००५ पर्यंत कॅनडाचे आणि त्यानंतर अमेरिकेचे नागरीक आहेत/होते असे त्यांच्यावरचे हे विकिपिडीया पेज म्हणते. टेड क्रुझचा जन्म डिसेंबर १९७० मधला.म्हणजे त्यावेळी त्यांचे वडिल बहुदा कॅनडाचे नागरीक असावेत. तर त्यांची आई मात्र जन्माने अमेरिकन नागरीक आहे.तेव्हा कॅनेडिअन (किंवा क्युबन) वडिल आणि अमेरिकन आईच्या कॅनडात जन्मलेल्या मुलाला हा नियम लागू होतो असे दिसते.
मॅकेन जो गेल्या वेळेस रिपब्लिकन उमेदवार होता त्याचा जन्म पनामा इथे झालेला आहे.जॉन मॅककेन यांचा जन्म पनामातील कोको सोलो या अमेरिकेच्या नाविकतळावर झाला होता. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने या अमेरिकेच्या नाविकतळाला अमेरिकेचाच भाग समजले जात होते असे दिसते.
In reply to टेड क्रुझ by गॅरी ट्रुमन
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to हिलरी क्लिंटन यांना by विशाखा पाटील
In reply to एक निरीक्षण by विकास
पण डेमोक्रॅटीक पक्षातील आणि काही इंडेपेन्डंट पण लेफ्ट ऑफ सेंटर असलेले तरूण हे वयोवृद्ध सँडर्सच्या (७४) मागे जात आहेत. रिपब्लीकन्स हे त्या पक्षातील सगळ्यात मोठ्या म्हणजे ट्रंपच्या (६९) मागे जाताना दिसत आहेत.बर्नी सॅंडर्स आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्यामागे तरूणाई वळताना दिसत आहे त्याची मला वाटते कारणे वेगळी आहेत. बर्नी सॅंडर्स हे समाजवादी विचारांचे आहेत आणि त्यांच्या प्रचारातील एक मुद्दा आहे स्टेट युनिव्हर्सिटीमधील शिक्षण हे फुकटात ठेवणे आणि अशा युनिव्हर्सिटीमधील फी हा प्रकार काढणे.अमेरिकेत बहुतांश लोकांवर विद्यार्थी असताना घेतलेल्या शिक्षणकर्जाचा मोठा बोजा असतो आणि ते कर्ज फेडेपर्यंत त्यांचा जीव अगदी मेटाकुटीला येतो.त्यामुळे अशा मतदारांना बर्नी सॅंडर्स नक्कीच अधिक जवळचे वाटतील.अर्थातच सॅंडर्स हे नक्की कसे साध्य करणार आहेत याची कल्पना नाही.पण हा मुद्दा तरूण मतदारांना भावणारा आहे हे नक्कीच.एकूणच सॅंडर्स यांना डेन्मार्क किंवा इतर स्कॅन्डेनेव्हिअन देशांमधील मॉडेल अधिक भावते असे दिसते. भाप्रवे प्रमाणे आजच सकाळी सी.एन.एन वर रिपब्लिकन पक्षाच्या संभाव्य उमेदवारांमधील ह्यूस्टनमध्ये झालेली चर्चा बघत होतो.त्यातील डॉनल्ड ट्रम्प यांच्या पुढील वाक्यावर अगदी भरपूर टाळ्या मिळाल्या--"I am a businessman. I have dealt with lot of politicians.All I can tell you is politicians means all talk and no action" अशा स्वरूपाचे काहीसे.राजकारणी लोकांविषयीचे हे मत अगदी जगभर असते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. हे आणि असे थोडे आक्रमक, थोडे रॅश विचार मध्यमवयीन किंवा त्याहून जास्त वयाच्या मतदारांपेक्षा तरूणांना अधिक आकर्षित करतात.ट्रम्पना तरूणांचा इतका पाठिंबा मिळत आहे त्याचे हे एक कारण आहे का?
यानंतर १ मार्चला अलाबामा, अलास्का, अरकॉन्सॉ,कोलोरॅडो,जॉर्जिया,मॅसॅच्युसेट्स,मिन्नेसोटा,ओक्लाहोमा,टेन्नीसी, टेक्सास, व्हरमॉन्ट आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये प्रायमरी किंवा कॉकस असतील. या मंगळवारला सुपर ट्युजडे म्हणतात.यात एक लहानशी सुधारणा हवी आहे. Super Tuesday या दिवशी अलाबामा, अरकॉन्सॉ,जॉर्जिया,मॅसॅच्युसेट्स,ओक्लाहोमा, टेन्नीसी, टेक्सास, व्हरमॉन्ट आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी तर मिन्नेसोटा राज्यात दोन्ही पक्षांची कॉकस असतील. त्याव्यतिरिक्त रिपब्लिकन पक्ष अलास्का राज्यात तर डेमॉक्रॅटिक पक्ष कोलोरॅडो राज्यात आणि अमेरिकन सॅमोआ या प्रदेशात कॉकस (किंबहुना कॉकसेस--अनेकवचनी) घेईल ( संदर्भ ). सर्वसाधारणपणे दोन्ही पक्षांच्या प्रायमरी आणि कॉकस एकाच दिवशी होतात पण काही राज्यांमध्ये या दोन पक्षांच्या प्रायमरी आणि कॉकसेस मध्ये काही दिवसांचे अंतर असू शकते.साऊथ कॅरोलायना राज्यात रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी आधीच झाली आहे तर डेमॉक्रॅटिक पक्षाची प्रायमरी २७ फेब्रुवारी रोजी आहे.त्याप्रमाणेच कोलोरॅडोमध्ये रिपब्लिकन पक्षाची आणि अलास्कामध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची कॉकसेस नंतर होतील. आता डेमॉक्रॅटिक पक्षाच्या २७ तारखेच्या साऊथ कॅरोलायना प्रायमरीची वाट बघत आहे.निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
In reply to वा! छान माहिती, रोचक चर्चा by मयुरा गुप्ते
हिलरी बाई जेव्हा सेक्रेटरी ऑफ स्टेट ह्या एव्हढ्या मोठ्या पदावर होत्या तेव्हा त्यांनी बिनदिक्कत पर्सनल इमेल्स चा वापर केला होता. काय झालं त्याचं पुढे?हा प्रकार खरोखरच धक्कादायक होता.एक गोष्ट कळत नाही.अनेक खाजगी कंपन्यांमध्येही लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर वैयक्तिक ई-मेल (गुगल वगैरे) ब्लॉक केलेले असतात.आणि कामाशी संबंधित ई-मेलसाठी कटाक्षाने कंपनीच्याच ई-मेलचा वापर केला जातो.असे असताना अमेरिकेच्या परराष्ट्रखात्यासारख्या महत्वाच्या ऑफिसेसमध्ये स्वतः त्या खात्याच्या प्रमुखाला वैयक्तिक ई-मेलचा वापर करता येणे हेच मुळात अतिधक्कादायक आहे.स्टेट.जीओव्ही सोडून अन्य कुठलेही ई-मेल सर्व्हर (clintonemail.com सारखे) त्या नेटवर्कमधून जाऊच कसे गेले?बरं असे ई-मेल पाठवता येत असले तरी त्या खात्याच्या प्रमुखानेच स्वतःच ते पाठविणे हे आणखी धक्कादायक आहे.हा सगळा प्रकारच मोठे गौडबंगाल आहे.हिलरींनी त्या सर्व्हरवरून पाठविलेले ३१,००० ई-मेल खाजगी म्हणून डिलीट केले होते.जर आपण काहीच गैर केले नाही असा त्यांचा दावा असेल तर त्यांना हे ई-मेल डिलीट करायची गरज का पडली असावी? याविषयी आणखी चौकशी होणार आहे. हे प्रकरण हिलरींना जड जाऊ शकेल.
टेडी (टेड क्रुझ) तर राजरोस गन व गन लॉबीच्या प्रेमात आहे.गन कंट्रोलमुळे काही प्रमाणात बर्नी सँडर्ससुध्दा अडचणीत येऊ शकतात. बेछूट गोळीबाराच्या घटनांबद्दल बंदुक बनविणार्या कंपनीला जबाबदार धरू नये अशा स्वरूपाच्या २००५ मधील कायद्याला बर्नी सँडर्स यांनी ते हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये असताना पाठिंबा दिला होता.त्यावेळी सॅडर्स यांनी म्हटले होते--"जर असे इतरांचे प्राण घेणार्याने हातोडा उचलून दुसर्याच्या डोक्यात घातला तर हातोडा बनविणार्याला त्यासाठी जबाबदार धरणे जितके चुकीचे आहे तितकेच चुकीचे अशा घटनांसाठी बंदुक बनविणार्यांना जबाबदार धरणे आहे". तसेच १९९३ मधील ब्रॅडी बिललाही सँडर्स यांनी विरोध केला होता.या बिलाअंतर्गत बंदुक विकत घेण्याआधी बॅकग्राऊंड चेक करणे बंधनकारक ठरविले होते.आता हिलरी साऊथ कॅरोलायनामध्ये प्रायमरीसाठी प्रचार करताना अशा बेछूट गोळीबाराला बळी पडलेल्या मुलांच्या आयांना बरोबर घेऊन प्रचार करत आहेत. एकूणच असा बेछूट गोळीबार होणे ही अमेरिकेपुढची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणार आहे हे नक्की. मी ऑगस्ट २००२ ते जानेवारी २००८ दरम्यान अमेरिकेत होतो तेव्हा मला अमेरिका खूपच सुरक्षित देश वाटायचा.मी अगदी कॅन्सस आणि नेब्रास्कासारख्या राज्यातही राहिलेलो होतो.अशा ठिकाणी अशी घटना घडणे शक्यच नाही असे त्यावेळी वाटायचे.परवाच कॅन्ससमध्ये हेस्टन येथे असा बेछूट गोळीबार झाला.मुळात कॅन्सस हे तुरळक लोकसंख्येचे राज्य.त्यातून हेस्टन म्हणजे अजूनच लहान ठिकाण.अशा ठिकाणीही ही घटना घडलीच.फ्लॉरिडामध्ये टॅल्लाहास्सीमध्ये विद्यापीठातील स्ट्रोझिअर लायब्ररीमध्येही काही महिन्यांपूर्वी गोळीबार झाला होता.त्याच लायब्ररीमध्ये मी अनेकदा अभ्यासाला जायचो.अमेरिकेत परत जायला मिळाले तर खूप चांगले होईल असे मला नेहमी वाटायचे--काही प्रमाणात अजूनही वाटते.पण या घटना बघितल्या तर अमेरिका राहायला तितका चांगला देश राहिला आहे का हा प्रश्न पडतोच.
ट्रंप आता जेव्हढ्या बाता मारतोय त्यातील एक टक्का ही गोष्टी प्रत्यक्षात करु शकेल की नाही खात्री नाहीये. सत्तेच्या बाहेर राहुन बोलणं आणि एकदा निवडुन येऊन खुर्ची वर विराजमान झाल्यावर बेछुट बेताल वक्तव्य करणं हे कठीण असावं.हो अगदी असेच. ट्रम्प कितीही बोलत असले तरी प्रत्यक्षात त्यांना त्याच्यापैकी फारसे काही करता येईल असे वाटत नाही. मला वाटते की ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे पारंपारिक मतदार असलेल्या कॉन्झर्व्हेटिव्ह लोकांना आपल्यामागे खेचायचा प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची 'प्रो-चॉईस' ही भूमिका सोडून गर्भपाताला विरोध करायच्या 'प्रो-लाईफ' या भूमिकेत त्यांनी ३-४ वर्षांपासूनच जाणीवपूर्वक बदल केला आहे.यामागे पण कॉन्झर्व्हेटिव्ह मतदारांना आकर्षित करायचा उद्देश दिसत आहे.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to ख्रिस ख्रिस्ती by विकास
In reply to फ्लोरिडामध्ये ट्रंप रुबिओला by निशदे
सुपर ट्युसडे मध्ये ट्रंप आता सगळ्यांनाच मात देणार यात फार शंका नाही.हो असे वाटत आहे हे खरे. डॉनल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविणे फार जड जाऊ नये असे दिसते.रूबिओने फ्लॉरिडा गमावले तर त्यांना उमेदवारी मिळायची शक्यता अगदीच कमी होईल. तरीही रूबिओ किंवा क्रुझ लगेच माघार घेतील असे नाही.कदाचित थोडा अधिक काळ हाताबाहेर चाललेली लढाई जरी लढवली तरी नंतर रनिंग मेट म्हणून (जसे थोरले जॉर्ज बुश यांनी १९८० मध्ये आणि जॉन एडवर्डस यांनी २००४ मध्ये केले) किंवा हिलरीप्रमाणे नंतर एखादे चांगले पद मिळवायला स्वतःचा दावा ठेवावा हा पण उद्देश असू शकतो.
In reply to फ्लोरिडामध्ये ट्रंप रुबिओला by निशदे
In reply to ट्रंप विरुद्ध ट्रंप by विकास

In reply to बाकी या स्पर्धेचा आढावा by निशदे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :- DeewanaIn reply to चर्चा वाचतो आहे... by मदनबाण
In reply to बेनगाझी प्रकरणाची तर by निशदे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :- DeewanaIn reply to आत्ताच जालावर बेनगाझी प्रकरणा by मदनबाण
In reply to व्हिडिओ पाहिला. रिपब्लिकन अ by निशदे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :- DeewanaIn reply to ओके.... by मदनबाण
In reply to अहो हे सगळं मान्य आहे आणि हे by निशदे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :-DeewanaIn reply to चर्चा वाचतो आहे... by मदनबाण
In reply to १००% सहमत by हुप्प्या
In reply to स्वार्थ कशा स्वरूपाचा? by बोका-ए-आझम
In reply to १००% सहमत by हुप्प्या
देव करो आणि ही बाई सत्तेवर न येवो. ती कैकेयी, आनंदीबाई (राघोबाची बायको) ह्या पंथातली आहे.म्हणजे माझे मिपावरचे नाव बदलायचा निर्णय किती योग्य होता याची खात्री मला आता पटायला लागली आहे :) जोक्स अपार्ट, इराक युध्दासारख्या प्रश्नांवर इतरही अनेक महत्वाच्या डेमॉक्रॅटिक सिनेटरनी आपली मते बदलली आहेत. ऑक्टोबर २००२ मध्ये जेव्हा इराकमध्ये युध्दाचा विषय सिनेटमध्ये आला तेव्हा हिलरी क्लिंटन यांनी इराक युद्धाला समर्थन दिलेच होते.पण त्याबरोबरच सध्याचे उपाध्यक्ष जोसेफ बायडेन आणि सध्याचे परराष्ट्रमंत्री (हिलरींचे उत्तराधिकारी) जॉन केरी यांनीही इराक युध्दाचे समर्थनच केले होते. त्याचबरोबर २०१३ ते २०१५ या काळातील संरक्षणमंत्री चक हॅगेल यांनीही त्यावेळी सिनेटमध्ये इराक युध्दाच्या बाजूनेच मत दिले होते. तरीही हीच सगळी मंडळी इराक युध्दविरोधी बराक ओबामांच्या मंत्रीमंडळात होतीच की.
In reply to इराक युध्दावरील मत by गॅरी ट्रुमन
In reply to इराक युध्द समर्थन by हुप्प्या
In reply to सहमत! हिलरी क्लिंटन यांनी by विशाखा पाटील
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
In reply to किंवा अमेरिकन प्रसारमाध्यमांचा by बोका-ए-आझम
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
हा Pro-Democratic Party bias बर्याच अंशी भारतातील पुरोगाम्यांमध्येही जाणवतोडेमोक्रॅट हे लिबरल आणि त्यातल्या त्यात सोशलिस्ट असतात म्हणून असेल. भारतात पुरोगामी म्हणवून घेणारे लोक हे बर्यापैकी समाजवादी असतात असं निरिक्षण आहे.
म्हणजे चार पैकी तीन कार्डिनल सीन्समध्ये डेमॉक्रॅटिक अध्यक्षांचा हात होता.तरीही भारतातील पुरोगाम्यांची त्यातल्या त्यात सहानुभूती त्या पक्षाला.पुरोगामी म्हणवणार्यांकडून कंसिस्टंसीची अपेक्षा ठेवणं जरा अतीच होतय असं वाटत नाही का तुम्हाला?
In reply to हा Pro-Democratic Party bias by अनुप ढेरे
पुरोगामी म्हणवणार्यांकडून कंसिस्टंसीची अपेक्षा ठेवणं जरा अतीच होतय असं वाटत नाही का तुम्हाला?हो बरोबर. फारच अवास्तव अपेक्षा ठेवली की :)
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
In reply to इझराईलसाठी अमेरिकेला जबाबदार धरणे by बोका-ए-आझम
In reply to अजून एक by विकास
तरी देखील आज पर्यंत अमेरीकेतील कुठल्याच पक्षाच्या राष्ट्राध्यक्षाने जेरूसलेमला राजधानी म्हणायची तयारी दाखवलेली नाहीडॉनल्ड ट्रम्प मात्र अमेरिकेची वकीलात तेल अविवमधून जेरूसलेमला न्यायचे आश्वासन देत आहेत. म्हणजे जेरूसलेम ही इजराएलची राजधानी आहे अशी औपचारिक मान्यता ट्रम्प प्रशासन देणार असे दिसते.
बिल क्लिंटनच्या काळात ह्या संदर्भात समेट घडवून आणण्याचे प्रचंड प्रयत्न झाले. तत्कालीन पंतप्रधान रॅबीन आणि यासर अराफत यांना एका मंचावर आणून शेकहँड करायला लावला. पण दुर्दैवाने रॅबिन यांची हत्या झाली आणि पुढे सर्व बिघडत गेले...याला यासर अराफात यांचाही धसमुसळेपणा जबाबदार आहे असे म्हणता येईल.१९९६ ते १९९९ या काळात हार्डलाईन बिन्यामिन नेतान्याहू पंतप्रधान होते.पण १९९९ मध्ये मवाळ एहूद बराक पंतप्रधान झाले असताना समेट होऊ शकला असता.२००० साली जून-जुलै मध्ये बिल क्लिंटन यांनी परत एकदा अराफात आणि बराक यांना कॅम्प डेव्हिडला चर्चेसाठी आमंत्रित केले होते.त्यावेळी अराफात यांनी ताठर भूमिका घेतली आणि ती चर्चा अर्ध्यातच सोडून अराफात निघून आले असे वाचल्याचे आठवते.इतकेच नाही तर ऑगस्ट महिन्यापासून इजराएलविरूध्द दुसरा 'इंतिफादा' सुरू केला.त्याचे तात्कालिक कारण काय तर अरिएल शेरॉन यांनी टेंपल माऊंटला भेट दिली हे. वास्तविकपणे टेंपल माऊंटला ज्यू धार्मिय लोक भेट देतातच.यित्झॅक राबीनही तिथे गेले होते असेही वाचल्याचे आठवते.आणि टेंपल माऊंटला लागूनच अल-अक्सा मशीद आहे (थोडासा अयोध्येसारखा प्रकार). तेव्हा शेरॉन टेंपल माऊंटला गेले आणि त्यांनी अल-अक्सा मशीदीच्या पावित्र्याचा भंग केला (desecrate) असे म्हणत पी.एल.ओ ने दुसरा इंतिफादा सुरू केला.मग इजराएलच्या सैनिकांवर दगडफेक करणारे पॅलेस्टिनी तरूण आणि त्यांना गोळ्या घालणारे इजराएली सैनिक हे चित्र न्यूज चॅनेलवरून अगदी कंटाळा येईपर्यंत दाखवले जात होते. त्यातूनच झाले असे की २००१ मध्ये निवडणुका झाल्या त्यानंतर अरिएल शेरॉनच पंतप्रधान झाले आणि मग समेट होण्याची शक्यता पूर्ण मावळली.त्यानंतर अराफात पॅलेस्टिनी लढ्यापासून थोडे हद्दपारच झाले आणि ती जागा मग हमासने व्यापली. त्यावेळी अराफात यांनी थोडी तरी लवचिकता दाखवायला हवी होती असे हिंडसाईटने म्हणावेसे वाटते.
In reply to ट्रम्प by गॅरी ट्रुमन
In reply to हा मुद्दा थोडा पटला नाही गॅरीभौ. by बोका-ए-आझम
In reply to ट्रम्प by गॅरी ट्रुमन
In reply to इझराईलसाठी अमेरिकेला जबाबदार धरणे by बोका-ए-आझम
हे वड्याचं तेल वांग्यावर काढणं आहे.हो बरोबर. पण इजराएलच्या स्थापनेसाठी अमेरिकेला जबाबदार ठरविणे हा पुरोगाम्यांचा आवडता हायपोथिसिस आहे. एक गोष्ट तितकीच खरी की अध्यक्ष फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांच्यापेक्षा हॅरी ट्रुमन हे इजराएलच्या स्थापनेसाठी जास्त अनुकूल होते. पण म्हणून सगळा दोष अमेरिकेवर कसा काय ढकलता येईल (विशेषतः रशियानेही २९ मे १९४७ च्या ठरावावर यु.एन मध्ये अनुकूल मत दिले असताना) हे मला अजूनही कळलेले नाही.
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
म्हणजे चार पैकी तीन कार्डिनल सीन्समध्ये डेमॉक्रॅटिक अध्यक्षांचा हात होता.तरीही भारतातील पुरोगाम्यांची त्यातल्या त्यात सहानुभूती त्या पक्षाला.यात फारशी विसंगती आहे, असं मला वाटत नाही. व्हिएतनाम युद्ध/सिव्हिल राईट्स इ. पूर्वी (साधारण १९६५ पूर्वी) डेमोक्रॅटिक पक्ष हा प्रामुख्याने सेंट्रिस्ट- कन्झर्व्हेटिव्ह होता; तर रिपब्लिकन पक्षावर लिबरल विचारधारेचा प्रभाव अधिक होता. तेव्हा आपण उल्लेखलेली चारपैकी तीन कार्डिनल सिन्स ही तत्कालीन कन्झर्व्हेटिव्हांची आहेत (= तत्कालीन डेमोक्रॅट्सची) आणि चौथे कार्डिनल सिन हे सद्यकालीन कन्झर्व्हेटिव्हांचे आहे (= सध्याच्या रिपब्लिकन्सचे). हिलरी क्लिंटन ही साठच्या दशकात रिपब्लिकन समर्थक होती, कट्टर कन्झर्व्हेटिव्ह रिक पेरी हा १९८० पर्यंत डेमोक्रॅट होता. दक्षिणेतले श्वेतवर्णीय जे डेमोक्रॅटिक पक्षाचा आधारस्तंभ होते, ते रिपब्लिकन पक्षाकडे वळले आणि आजमितीला सुमारे ९०% मतं हमखास रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मिळतात. (त्यातले अनेक अजूनही कागदोपत्री रजिस्टर्ड डेमोक्रॅट्स आहेत.) असं होण्याची शक्यता फारच कमी आहे, पण समजा - भाजपा आणि काँग्रेसच्या भूमिकांची पुढील दहा वर्षांत संपूर्ण अदलाबदल झाली; आणि परिणामी जर आताच्या भाजपसमर्थकांनी काँग्रेसला मतं दिली (आणि डावे भाजपकडे वळले), तर ती केवळ वरवरची विसंगती असेल. पक्षांची लेबलं बदलली, तरी मूळ विचारधारेशी मतदान/सहानुभूती सुसंगत असेल.
In reply to सुसंगत by नंदन
In reply to रोचक by विकास
The first Republican that I knew was my father John Rice. And he is still the Republican that I admire most. My father joined our party because the Democrats in Jim Crow Alabama (= कन्झर्व्हेटिव्ह्ज्) of 1952 would not register him to vote. The Republicans (=लिबरल) did.
In reply to रोचक by विकास
डेमॉक्रॅटिक पक्ष फार श्रीमंतांचा झाल्यामुळे रिपब्लिकन पक्ष काढलारिपब्लिकन पक्षाला Grand Old Party (GOP) म्हणतात. या पक्षाची स्थापना १८५० च्या दशकात झाली. म्हणजे त्यापूर्वी डेमॉक्रॅटिक पक्ष हा श्रीमंतांचा झाला असा याचा अर्थ घेता येईल का? आता रिपब्लिकन पक्ष हा श्रीमंतांचा पक्ष समजला जातो. याविषयी २००० सालच्या डेमॉक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन मध्ये (ज्या कन्व्हेन्शनमध्ये अल गोर हे २००० सालचे पक्षाचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले) बोलताना बिल क्लिंटन म्हणाले होते--"If you want to live like a Republican, vote for a Democrat"!!
In reply to सुसंगत by नंदन
In reply to रोचक प्रतिसाद. काही प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to रोचक प्रतिसाद. काही प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to An idea whose time has come... by नंदन
रिपब्लिकन पक्ष दोन्ही खेपेला, ऐतिहासिकदृष्ट्या चुकीच्या बाजूला होता हे पाहून बिचार्या लिंकनला काय वाटत असेल?हे तितकेसे समजले नाही. बिल ऑफ सिव्हिल राईट्सला डेमॉक्रॅटिक प्रशासनाने पाठिंबा दिला असला तरी अमेरिकन हाऊस आणि सिनेटमध्ये जेव्हा मतदानाला हा विषय आला तेव्हा त्या बिलला पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकनची टक्केवारी डेमॉक्रॅटपेक्षा जास्त होती. त्यावेळी दोन्ही सभागृहांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे तगडे बहुमत होते त्यामुळे निव्वळ आकड्यांचा विचार करता डेमॉक्रॅटचा आकडा दोन्हींमध्ये (पाठिंबा आणि विरोध) रिपब्लिकनपेक्षा जास्तच होता त्यामुळे आकडेवारी बघणे अधिक सयुक्तिक ठरेल. किंबहुना त्यापूर्वी १०० वर्षांपूर्वी यादवी युध्दात झाले त्याप्रमाणे उत्तरेतील बहुसंख्य सिनेटर आणि हाऊसचे सदस्य (दोन्ही पक्षांचे) या बिलाला पाठिंबा देत होते तर दक्षिणेतले सदस्य (दोन्ही पक्षांचे) या बिलाला विरोध करत होते. लिंकनला दु:ख कसले झाले असेल तर आपला रिपब्लिकन पक्ष चुकीच्या बाजूला मत देतो याचे नाही तर यादवी युध्दाच्या वेळची मानसिकता १०० वर्षांनंतरही कायमच होती त्याचे असे मला वाटते. टप्पा ३ आणि ४ यावेळी सिव्हिल राईट्समुळे श्वेतवर्णीय लोक दुखावले गेले आणि ते रिपब्लिकन पक्षामागे उभे राहिले हे शक्य आहेच. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीविषयी मला फारशी माहित नाही. पण अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्रीय अॅन्गल लिहितो. रेगन निवडून आले त्यामागेही आर्थिक परिस्थितीचा हातभार मोठा होता. १९७० च्या दशकात Stagflation अनुभवायला मिळाले. Stagflation म्हणजे Stagnation (मंदी) आणि Inflation (महागाई) या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस अनुभवायला मिळणे. केन्शिअन अर्थशास्त्राप्रमाणे या दोन्ही गोष्टी एकदम अनुभवायला मिळणे शक्यच नाही. पण एकतर १९६० च्या दशकातील व्हिएटनाम युद्धावरील खर्चांमुळे Aggregate Demand वाढलेली होती त्यामुळे महागाई वाढलेली होती.आणि त्यातच १९७३ मध्ये मध्यपूर्वेतील युध्दामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्यामुळे Aggregate Supply कमी झाला. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून Stagflation आले. त्यावेळी मिल्टन फ्रिडमन यांनी दिलेल्या Prescription नुसार मनी सप्लाय (अर्थपुरवठा) कमी करणे गरजेचे होते. म्हणजे दोन्ही गोष्टींवर उत्तर मिळविण्यासाठी सुरवातीला मंदी induce करणे आणि तो कडू घोट घेणे गरजेचे होते. तत्कालीन फेड चेअरमन विलिअम मिलर आणि पॉल व्होल्कर यांनी नेमके तेच केले. त्यामुळे १९८० च्या निवडणुका येईपर्यंत डेमॉक्रॅटिक अध्यक्ष जिमी कार्टर यांची स्थिती डळमळीत झाली.त्यातच इराणमधील hostage crisis झाला. त्यामुळे रॉनाल्ड रेगन यांचा १९८० मध्ये अगदी सहज विजय झाला. रेगन यांच्यावर आर्थर लाफर यांच्या Supply side economics चा प्रभाव होता. त्याअंतर्गत त्यांनी करसवलती दिल्या. पण त्यामुळे देशाची वित्तीय तूट (budget deficit) वाढली. थोरले बुश अध्यक्ष झाल्यावर १९९० पर्यंत ही तूट आणखी वाढली. थोरल्या बुशवर Supply Side Economics वाल्यांचा नाही तर Neo-classical economics (रॉबर्ट लुकॅस) वाल्यांचा प्रभाव होता. त्या मतानुसार (वर उल्लेख केलेल्या Classical Economist प्रमाणे) सरकारला फारसे काही करायची गरज नाही आणि ही प्रक्रीया self-correcting आहे!! त्यामुळे थोरल्या बुशने त्याविषयी फार काही पावले उचललीच नाहीत. किंबहुना थोरल्या बुशच्या कारकिर्दीच्या शेवटी recovery सुरू झाली पण होती.पण त्याचे परिणाम लोकांना दिसले नव्हते.त्याचाच परिणाम म्हणून (आणि रॉस पेरॉ यांच्या उमेदवारीमुळे) थोरल्या बुशच्या पराभव झाला. बिल क्लिंटन अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सुरवातीलाच त्यांचे प्रशासन वित्तीय तूट कमी करण्यावर भर देईल असे म्हटले (थोरले बुश त्याविषयी फारसे काही बोलत नसत). म्हणजे क्लिंटन प्रशासन तूट कमी करण्याबाबत गंभीर आहे हा clue मार्केटला मिळाला आणि त्यातून १९९१-९२ ची मंदी मागे पडली.म्हणजे बिल क्लिंटननीही १९९३ चा बजेट डेफिसिट ऍक्ट (जो ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आला आणि त्यापूर्वीच बऱ्यापैकी परिस्थिती सुधारली होती) सोडून परिस्थिती सुधरवायला फार केले नव्हते.थोरल्या बुशच्या कारकिर्दीच्या शेवटी ज्या recovery ला प्रारंभ झाला होता त्याचा फायदा बऱ्याच अंशी बिल क्लिंटन यांना मिळाला. मला वाटते की तुम्ही दिलेल्या सामाजिक बदलांबरोबरच या आर्थिक बदलांचाही सर्व टप्प्यांमध्ये मतदारांवर परिणाम झाला. बिल क्लिंटनचे सल्लागारच म्हणाले त्याप्रमाणे: "It's economy, stupid!!" मला सामाजिक बदलांची बाजू तितकी माहित नव्हती. ती इथे दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
े. पण लाखो सैनिकांनिशी पूर्ण ताकदीने एखाद्या देशात दाखल होणे आणि छुपा पाठिंबा देणे , पैसे वा अन्य पाठबळ देणे ह्यात फरक आहे. आणि ओबामाने तो केला आहे. हे निदान पहिले पाऊल म्हणून स्वागतार्हच आहे.असे पाऊल अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये मुजाहिदीनांना मदत करण्याच्या वेळीही उचलले होते. त्याचे पुढे काय झाले ते दिसलेच.
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्याझाल्या हुरळून त्याला नोबेलचे शांततेचे पारितोषिक बहाल केले गेले. कुठलेही काम केले नसताना असले पारितोषिक देण्याचा आतताईपणा का केला गेला? ओबामाने शांततेकरता फारसे काही केलेले नाही. एक काळा माणूस पहिल्यांदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटणार्या नोबेल समितीने हे उतावीळ कृत्य केले. ते साफ चूक होते असे माझे मत आहे.पूर्ण सहमत.अध्यक्षपदी आल्यानंतर ७-८ महिन्यातच ओबामांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहिर झाले.त्या काळात त्यांनी नक्की काय केले होते की ज्यामुळे शांततेचे नोबेल पारितोषिक त्यांना दिले गेले? बहुदा (अर्धा) आफ्रिकन अमेरिकन समाजातील एक माणूस प्रथमच अध्यक्षपदी आला हा भावनिक मुद्दा सोडला तर त्यामागे दुसरे कारण दिसत नाही.
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
प्रायमरीमध्ये सगळे मतदार मतदान करायला जात नाहीत (जरी ते मत द्यायला पात्र असले तरी).प्रायमरीसाठी मतदानाला गेलेल्या मतदारांपैकी ६१% मतदार आफ्रिकन अमेरिकन होतेहे जर असे असेल तर हिलरी ला मुख्य निवडणुकीत त्या राज्यातल्या गोर्यांची मते कमी पडणार असे वाटते. आणि गोरे जर लोकसंख्येने भरपूर बहुमतात असतील तर रिपब्लिकन उमेदवाराला त्याचा चांगलाच फायदा होणार.
In reply to प्रायमरीमध्ये सगळे मतदार by प्रसाद१९७१
हे जर असे असेल तर हिलरी ला मुख्य निवडणुकीत त्या राज्यातल्या गोर्यांची मते कमी पडणार असे वाटते. आणि गोरे जर लोकसंख्येने भरपूर बहुमतात असतील तर रिपब्लिकन उमेदवाराला त्याचा चांगलाच फायदा होणार.गोरे भरपूर बहुमतात नसले तरी काही राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे--अगदी अलाबामा आणि जॉर्जिया सारख्या राज्यांमध्येही. साऊथ कॅरोलायनामध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रायमरीमध्ये ३ लाख ६७ हजार मतदारांनी तर रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीमध्ये सुमारे ५ लाख ७० हजार मतदारांनी मते दिली . अर्थातच याचा अर्थ रिपब्लिकन पक्षाला राज्यात जास्त समर्थन आहे हा निष्कर्ष काढायला हे आकडे अपुरे वाटू शकतील (कारण प्रायमरीमध्ये कोणीही मत देऊ शकतो).पण गेल्या काही अध्यक्षीय निवडणुकांमधले निकाल बघितले तर साऊथ कॅरोलायनामध्ये हिलरी प्रायमरीत जिंकल्या तरी अध्यक्षीय निवडणुकांमध्ये या राज्यात जिंकणे तितके सोपे नाही हे समजून येईलच.या राज्यात आफ्रिकन अमेरिकन समाजाची लोकसंख्या ३०% च्या आसपास आहे.आणि हा समाज डेमॉक्रॅटिक पक्षाचा पारंपारिक मतदार आहे.तरीही या राज्यात रिपब्लिकन पक्षाने गेल्या ५० वर्षातील १९७६ चा अपवाद वगळता प्रत्येक अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. तीच गोष्ट अलाबामा आणि मिसिसीपी या आफ्रिकन अमेरिकनांची लोकसंख्या लक्षणीय असलेल्या राज्यांविषयीही आहे. जॉर्जिया या आफ्रिकन अमेरिकन मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या दुसर्या राज्यात १९९६ पासून रिपब्लिकन पक्षाच्याच उमेदवारांनी अध्यक्षीय निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे. एकूणच गेल्या काही निवडणुकांमधले कल बघितले तर दोन्ही कोस्टवर डेमॉक्रॅटिक पक्षाचे तर मधल्या भागातील बहुसंख्य राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असते.पश्चिम कोस्टवरील कॅलिफॉर्निया, ऑरेगन आणि वॉशिंग्टन तर पूर्वेकडील कनेक्टिकट, डेलावेअर, मेन, मेरीलँड,मॅसॅच्यूसेट्स,न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, र्होड आयलंड आणि व्हरमाँट या राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाने गेल्या अनेक अध्यक्षीय निवडणुकांमध्ये पराभव बघितलेला नाही.तर मधल्या भागातील बहुसंख्य राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व राहिले आहे (इलिनॉय आणि मिशिगनचा अपवाद वगळता). दोन्ही कोस्टवरील राज्यांबरोबर मध्यभागातील काही राज्य जिंकता आली तर डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष होतो. उदाहरणार्थ १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी अरकॉन्सॉ, जॉर्जिया, केंटकी,लुईझियाना,मिसॉरी,मोन्टाना अशी रिपब्लिकन वर्चस्व असलेली राज्ये जिंकली. तीच गोष्ट काही प्रमाणात बराक ओबामांची २००८ मध्ये.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
प्रायमरीमध्ये सगळे मतदार मतदान करायला जात नाहीत (जरी ते मत द्यायला पात्र असले तरी).प्रायमरीसाठी मतदानाला गेलेल्या मतदारांपैकी ६१% मतदार आफ्रिकन अमेरिकन होतेमाझा प्रश्न थोडा गंडला असावा. ह्या विदावरुन असे वाटते की काळ्या ( पॉलिटेकली इनकरेक्ट ) लोकांना हिलरी हवी आहे. डेमोक्रॅटीक मधल्या गोर्यांना पण हिलरी बद्दल फारसा उत्साह नाही. म्हणजे जर हिलरी डेमोरेटेक उमेदवार झाली तर ह्या स्टेट मधले गोरे डेमोक्रेट एकतर मतदान करणार नाहीत आणि कुंपणावरचे गोरे रीपब्लिकन उमेदवाराला मत देतिल.
In reply to प्रायमरीमध्ये सगळे मतदार by प्रसाद१९७१
माझा प्रश्न थोडा गंडला असावा. ह्या विदावरुन असे वाटते की काळ्या ( पॉलिटेकली इनकरेक्ट ) लोकांना हिलरी हवी आहे. डेमोक्रॅटीक मधल्या गोर्यांना पण हिलरी बद्दल फारसा उत्साह नाही.थोडे गणित करू. समजा ६१% मतदार आफ्रिकन अमेरिकन असतील तर ३९% मतदार इतर (गोरे, हिस्पॅनिक) असतील. ६१% आफ्रिकन अमेरिकन्सपैकी ८४% म्हणजे एकूण सुमारे ५१%. हिलरींना ७३% मते मिळाली असतील तर याचा अर्थ गोरे आणि हिस्पॅनिक समाजातून ७३% वजा ५१% = २२% मते हिलरींना मिळाली. ३९% पैकी २२% म्हणजे या समाजातून सुमारे ५६% मतदार हिलरींच्याच मागे उभे राहिले. म्हणजे गोरे आणि हिस्पॅनिक समाजातूनही बहुसंख्यांचा पाठिंबा हिलरींनाच मिळाला. अर्थातच हा निष्कर्ष साऊथ कॅरोलायनामध्ये डेमॉक्रॅटिक प्रायमरीमध्ये मतदान करणारे मतदार या सॅम्पल स्पेसमधून काढला आहे.संपूर्ण अमेरिकेतील सर्व मतदारांविषयी ते कितपत लागू पडेल हे सांगता येत नाही.
In reply to थोडे गणित करू by गॅरी ट्रुमन
In reply to मी फक्त साऊथ कॅरोलायना बद्दल by प्रसाद१९७१
गोर्यांना हिलरी बद्दल प्रेम नसल्या मुळे ते मतदानाला बाहेरच पडले नाहीत हा एक अर्थ.गोरे मतदानाला बाहेर पडले नाहीत त्यामागे हेच एक कारण असेल तर तुमचे अनुमान अर्थातच योग्य आहे.पण हेच एक कारण आहे का हे सांगता येणार नाही.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
एकूणच गेल्या काही निवडणुकांमधले कल बघितले तर दोन्ही कोस्टवर डेमॉक्रॅटिक पक्षाचे तर मधल्या भागातील बहुसंख्य राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असते....दोन्ही कोस्टवरील राज्यांबरोबर मध्यभागातील काही राज्य जिंकता आली तर डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष होतो.हा मुद्दा खाली दिलेल्या दोन नकाशांवरून स्पष्ट करतो. पहिला नकाशा आहे २००४ च्या निवडणुकांचा तर दुसरा नकाशा आहे २००८ च्या निवडणुकांचा. २००४ मध्ये जॉर्ज डब्ल्यू. बुश (रिपब्लिकन) आणि २००८ मध्ये बराक ओबामा (डेमॉक्रॅटिक) निवडून आले होते. २००४ च्या निवडणुकांचे निकाल (नकाशाचा स्त्रोतः विकिपीडीया)
In reply to डेमॉक्रॅटिक विरूध्द रिपब्लिकन by गॅरी ट्रुमन
In reply to साउथ कॅरोलिना प्रायमरीबद्दल थोडेसे.... by निशदे
आफ्रिकन अमेरिकन समाज हा पारंपारिकरीत्या(गेले काही दशके) डेमोक्रॅटिक पक्षाचा मतदार समजला जातो.याचे नक्की कारण काय आहे याविषयी मला विशेष माहिती नाही.पण १९६० च्या दशकात डेमॉक्रॅटिक लिंडन जॉन्सन अध्यक्ष असताना सिव्हिल राईट्स अॅक्ट आणि व्होटिंग राईट अॅक्टला मान्यता दिली गेली आणि आफ्रिकन अमेरिकन समाजाला भेदभाव टाळणे, मताधिकार मिळवून देणे अशी महत्वाची कामे केली गेली.त्यामुळे आफ्रिकन अमेरिकन समाज डेमॉक्रॅटिक पक्षाचा पारंपारिक मतदार असावा असा माझा तर्क.
रिपब्लिकन पक्षाची अनेक धोरणे यासाठी कारणीभूत आहेत.त्यातच डॉनल्ड ट्रम्प यांनी नवा वाद निर्माण केला आहे. केकेके या श्वेतवर्णीयांच्या वंशवादी संघटनेचा नेता डेव्हिड ड्युक याने डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहिर केला आहे.त्याविषयी परवा रविवारी घेतलेल्या एका मुलाखतीत एक प्रश्न विचारला गेला. त्यावेळी ट्रम्प यांनी हा पाठिंबा नाकारला नाही.यावर ट्रम्प यांनी lousy earpiece असे काहीसे न पटणारे स्पष्टीकरण दिले. यामुळे व्हायचे ते नुकसान तर झालेच आहे. यातून आफ्रिकन अमेरिकन समाज अधिक जोमाने हिलरींच्या मागे उभा राहिल ही शक्यता आहे. याविषयी विविध रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशी नाराजी व्यक्त करणार्यांमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी टेड क्रुझ, मार्को रूबिओ हे तर आहेतच.पण त्याबरोबरच पक्षाकडून २०१२ मध्ये बराक ओबामांविरूध्द निवडणुक लढविलेले मिट रॉमनी यांचाही समावेश आहे.
Really sad. @realDonaldTrump you're better than this. We should all agree, racism is wrong, KKK is abhorrent. https://t.co/dn2D74c5dl
— Ted Cruz (@tedcruz) February 28, 2016
A disqualifying & disgusting response by @realDonaldTrump to the KKK. His coddling of repugnant bigotry is not in the character of America.
— Mitt Romney (@MittRomney) 29 February 2016
In reply to ट्रम्प उवाच by गॅरी ट्रुमन
In reply to गॅरी आपल्या या धाग्यावरुन एक by हाडक्या
In reply to छान by मिहिर
ह्या सगळ्या उमेदवारांपैकी तुमचा कोणाला पाठिंबा ?सध्या तरी कोणालाच नाही. आतापर्यंतचे असे चित्र आहे की हिलरी क्लिंटन अध्यक्षपदी येणे भारतासाठी चांगले नसेल (नंतर ते चित्र बदलले तर फारच उत्तम) आणि डॉनल्ड ट्रम्प प्रचंड रॅश वाटत आहेत.तेव्हा त्यांना पाठिंबा देणे सध्या तरी शक्य नाही. मला माहित आहे की माझ्या पाठिंब्याची व्हाईट हाऊसमधील लॉनवर पळणार्या खारीलाही दखल घ्यावीशी वाटणार नाही. तरीही... :)
In reply to सध्या कोणालाच नाही by गॅरी ट्रुमन
आतापर्यंतचे असे चित्र आहे की हिलरी क्लिंटन अध्यक्षपदी येणे भारतासाठी चांगले नसेलहे असं का वाटावं, याबद्दल कुतूहल आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार आलं, तरी अमेरिकेचं परराष्ट्रधोरण आमूलाग्र बदलत नाही असं एकंदरीत चित्र आहे. संरक्षणक्षेत्राच्या दृष्टीनेही तसंच (ओबामाचा डिफेन्स सेक्रेटरी चक हेगल हा रिपब्लिकन होता.)
In reply to भारतविषयक धोरण by नंदन
In reply to भारतविषयक धोरण by नंदन
| राज्य | रिपब्लिकन पक्ष | डेमॉक्रॅटिक पक्ष |
| जॉर्जिया | डॉनल्ड ट्रम्प | हिलरी क्लिंटन |
| व्हर्जिनिया | डॉनल्ड ट्रम्प | हिलरी क्लिंटन |
| व्हरमॉन्ट | डॉनल्ड ट्रम्प | बर्नी सँडर्स |
| अलाबामा | डॉनल्ड ट्रम्प | हिलरी क्लिंटन |
| मॅसॅच्यूसेट्स | डॉनल्ड ट्रम्प | हिलरी क्लिंटन |
| मिन्नेसोटा | मार्को रूबिओ | बर्नी सँडर्स |
| ओक्लाहोमा | टेड क्रुझ | बर्नी सँडर्स |
| टेन्नीसी | डॉनल्ड ट्रम्प | हिलरी क्लिंटन |
| टेक्सास | टेड क्रुझ | हिलरी क्लिंटन |
| अरकॉन्सॉ | डॉनल्ड ट्रम्प | हिलरी क्लिंटन |
| अलास्का | मतमोजणी सुरू व्हायची आहे | |
| कोलोरॅडो | बर्नी सँडर्स |
| रिपब्लिकन पक्ष | ||||||||||||
| जॉर्जिया | व्हर्जिनिया | व्हरमॉन्ट | अलाबामा | मॅसॅच्यूसेट्स | मिन्नेसोटा | ओक्लाहोमा | टेन्नीसी | टेक्सास | अरकॉन्सॉ | अलास्का | आतापर्यंत | |
| डॉनल्ड ट्रम्प | 36 | 17 | 6 | 28 | 22 | 8 | 12 | 30 | 20 | 13 | 11 | 285 |
| टेड क्रुझ | 14 | 8 | 6 | 2 | 4 | 12 | 14 | 12 | 57 | 9 | 11 | 160 |
| मार्को रूबिओ | 11 | 16 | 0 | 0 | 8 | 12 | 11 | 2 | 0 | 6 | 5 | 87 |
| जॉन कॅसिक | 0 | 5 | 0 | 0 | 8 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 25 |
| बेन कार्सन | 0 | 3 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 8 |
| इतर | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 7 |
| एकूण | 61 | 49 | 12 | 30 | 42 | 32 | 37 | 44 | 77 | 28 | 27 | 572 |
| डेमॉक्रॅटिक पक्ष | ||||||||||||
| जॉर्जिया | व्हर्जिनिया | व्हरमॉन्ट | अलाबामा | मॅसॅच्यूसेट्स | मिन्नेसोटा | ओक्लाहोमा | टेन्नीसी | टेक्सास | अरकॉन्सॉ | कोलोरॅडो | आतापर्यंत | |
| हिलरी क्लिंटन | 66 | 61 | 0 | 37 | 45 | 24 | 16 | 40 | 122 | 18 | 24 | 1001 |
| बर्नी सँडर्स | 23 | 32 | 10 | 4 | 43 | 42 | 20 | 22 | 48 | 7 | 33 | 371 |
| एकूण | 89 | 93 | 10 | 41 | 88 | 66 | 36 | 62 | 170 | 25 | 57 | 1372 |
जब हम साथ मिलकर जातिवाद, नफरत और कट्टर्ता से इनकार करते हैं, अमेरिका एक बेहतर राष्ट्र बन जाता है। #AmericaTogether
— Bernie Sanders (@BernieSanders) February 19, 2016
In reply to जरा गमंत. by नन्द्या
बेकायदेशीर मेक्सीकन लोकांना हा़कलून देणार!डॉनल्ड ट्रम्प यांनी एक आश्वासन दिले आहे आणि ते म्हणजे मेक्सिकन लोकांची अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखायला अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधायचे!! इथे टेक्सासमध्ये प्रायमरीमध्ये काऊंटी (जिल्हा) प्रमाणे कसे मतदान झाले हे बघता येईल. त्यात समजेल की डॉनल्ड ट्रम्प यांनी ज्या काही थोड्याफार काऊंटीमध्ये विजय मिळवला त्या काऊंटी दक्षिणेत मेक्सिको सीमेजवळ आहेत. अर्थातच तिथे प्रायमरीमध्ये झालेले मतदान फारच थोडे आहे. ह्यूस्टनमध्ये प्रायमरीमध्ये सुमारे २ लाख मतदारांनी मतदान केले तर 'झपाटा' या दक्षिणेतील काऊंटीमध्ये ट्रम्प यांना विजय मिळाला त्या काऊंटीमध्ये अवघ्या ८६ मतदारांनी मतदान केले (आणि त्यापैकी ३४ मते ट्रम्पना आणि ३२ मते क्रुझ यांना मिळाली). म्हणजे दक्षिणेत ट्रम्प यांना विजय मिळाला याचा अर्थ तिथले लोक मेक्सिकन घुसखोरांविरोधात ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत असे म्हणता येईल असा विदा आपल्याकडे नाही.पण तुम्ही अमेरिकेत बघितले आहे त्यावरून लोकांचा या भूमिकेला पाठिंबा आहे की नाही याविषयी काही लिहिता येईल का? अॅरिझोनामध्ये प्रायमरीचे काय निकाल येतात त्यावरून चित्र अधिक स्पष्ट होईल असे वाटते.
कुणिहि निवडून आले तरी श्रीमंत अधिक श्रीमंत नि मध्यमवर्गीय, गरीब आणखी गरीब असे निदान या अमेरिकेत तरी मी गेली ४५ वर्षे बघतो आहे.शक्य झाले तर तुमच्या अमेरिकेतल्या इतक्या प्रदिर्घ अनुभवात अध्यक्षीय निवडणुकांमध्ये कसे वातावरण होते, लॅन्डस्लाईङ निवडणुकांमध्ये (उदा. १९८४) रेगन आरामात जिंकणार हे जाणवत होते का वगैरे मिपावर नक्कीच लिहा ही सर्व मिपाकरांतर्फ आग्रहाची विनंती.
मॅसॅच्यूसेट्सचे गव्हर्नर आणि नेब्रास्काचे सिनेटर यांनीही ट्रम्प यांना विरोध केला आहे.रिपब्लिकन पक्षाच्या काही पारंपारीक समर्थकांनी ट्रम्प उमेदवार असतील तर पक्षाला मत देणार नाही असेही जाहीर केले आहे.अशा प्रकारचा विरोध ट्विटरवर होताना दिसत आहे. भाप्रवे प्रमाणे आजच सकाळी सी.एन.एन वर एक चर्चा बघत होतो. त्यात असा सूर दिसला की रिपब्लिकन पक्षातील ट्रम्पविरोधी नेत्यांचा टेड क्रुझ आणि मार्को रूबिओ यांना स्पर्धेत टिकून राहायचा आग्रह असेल.म्हणजे ट्रम्प यांना जितके कमी प्रतिनिधी मिळतील तितके कमी करायचे आणि डॉनल्ड ट्रम्प यांना ५०% पेक्षा जास्त प्रतिनिधींचे समर्थन मिळाले नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या संमेलनात अन्य कोणी उमेदवार (२०१२ च्या निवडणुकांमधील मिट रॉमनी यांचे रनिंग मेट पॉल रायन किंवा अन्य कोणी) पुढे करून त्याच्या गळ्यात उमेदवारीचा हार घालायचा असाही प्रयत्न होऊ शकेल. असे काही झाले तर मात्र रिपब्लिकन पक्ष दुभंगून हिलरी क्लिंटन यांचा मार्ग मोकळा होऊ शकेल ही शक्यता आहे. १९१२ च्या निवडणुकांमध्ये १९०१-१९०९ या काळात अध्यक्ष असलेले थिओडोर रूझवेल्ट यांनी अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्याविरूध्द तिसर्या टर्मसाठी निवडणुक लढवली.त्यात रिपब्लिकन पक्ष उभाउभा दुभंगला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार वुड्रो विल्सन यांना निवडणुक खूपच सोपी गेली.त्याच इतिहासाची पुनरावृत्ती २०१६ मध्ये होणार का हाच प्रश्न आहे.I was with Mitt every time he saw @realDonaldTrump and guarantee Mitt never begged Trump. Wish I would've recorded Trump kissing Mitt's ass
— Garrett Jackson (@dgjackson) March 4, 2016
In reply to रिपब्लिकन पक्षात ट्रम्पविरोधी वारे by गॅरी ट्रुमन
In reply to रिपब्लिकन पक्षात ट्रम्पविरोधी वारे by गॅरी ट्रुमन
In reply to रॉमनी-हिलरी-ट्रंप (गिल्ट बाय असोसिएशन) by विकास
In reply to ट्रंप यांचे कैसे बोलणे आणि कॉन्स्पिरसी थिअरी by विकास
In reply to +१ by बबलु
In reply to +१ by बबलु
In reply to ट्रंप यांचे कैसे बोलणे आणि कॉन्स्पिरसी थिअरी by विकास
माझ्या जुन्या धाग्यांची जाहिरात