मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ढग, पाउस, आठवणी आणि भावना...

सतिश गावडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मन कोरडं कोरडं नाही पाऊस पडत जरी जळालं हे रान नाही मोहर झडत नियतीच्या दरबारात आता मागेन मी दाद आंधळ्या न्यायदेवतेला आता घालेन मी साद आले काळेभोर हे ढग नाही पाऊस हा त्यात गेले कितीक ऋतू असे नाही तिची माझी भेट आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर

वाचने 5181 वाचनखूण प्रतिक्रिया 32

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 20:49
डी.बी.सर सहमत अशासाठी की यात नेहमीचा सगा इफेक्ट दिसला नाही. म्हणजे "तुझ्यासाठी कोसळणारं आभाळ कवेत घेईन" किंवा "आठवण" या कवितांच्या इतके घनव्याकुळ आर्जव यात दिसून येत नाही... पण असहमत अशासाठी की तरी पण एक स्वतंत्र उत्तम काव्य आहे... पण सगाजींचा अगदी दिलोजान ओतून दिलेला इफेक्ट दिसला नाही हे पण खरे :(

In reply to by विजय पुरोहित

विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 21:03
यात एक दुःखभरलं गीतकथन आहे जे कदाचित आपण ओळखू शकत नाही... रचनाकार आणि वाचक यांच्या अनुभव विश्वातला हा फरक आहे... तो फरक संपवणे अवघड असू शकते...

नाखु गुरुवार, 02/25/2016 - 12:42
केला अट्टाहास
आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर
कडक सलाम : स्वगत : कुणाच्याका होईना कोंबड्याने (धन्याशेठ लेखणीला) जाग आली ते बरें झाले.

पैसा गुरुवार, 02/25/2016 - 12:57
सुंदर लिहिली आहेस कविता! तो काहीच्या काही टॅग काढून टाक बघू!

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु Fri, 02/26/2016 - 09:25
म्हणजे बुवा अत्ताही स्माईली देऊ शकतात तर !!! नक्षत्री काकांचा मित्र नाखु

चौकटराजा Fri, 02/26/2016 - 09:06
कविराज , आले काळेभोर हे ढग नाही पाऊस हा त्यात गेले कितीक ऋतू असे नाही तिची माझी भेट आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर एक कडव्यात "तिची" असा उल्लेख आहे तर एका कडव्यात सखे असे 'संबोधन' आहे. मला वाटते आता कवि बरोबर एक सखी आहे व तिला तो आपल्या " तिच्या बद्द्ल सांगतो आहे. हे असेच आहे ना ?? की ती व सखी एकच आहेत ??

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे Fri, 02/26/2016 - 09:42
मला वाटते आता कवि बरोबर एक सखी आहे व तिला तो आपल्या " तिच्या बद्द्ल सांगतो आहे. हे असेच आहे ना ??
नाही.
की ती व सखी एकच आहेत ??
हो. तुम्ही म्हणताय तसं आताच्या सखीला "मी तिच्या उरलेल्या आठवणींचा जागर घालतो" म्हटलं तर याही सखीची "ती" होऊन जागर घालण्यासाठी अजून जास्त आठवणी मिळतील. ;)

In reply to by सतिश गावडे

यशोधरा Fri, 02/26/2016 - 09:46
तुम्ही म्हणताय तसं आताच्या सखीला "मी तिच्या उरलेल्या आठवणींचा जागर घालतो" म्हटलं तर याही सखीची "ती" होऊन जागर घालण्यासाठी अजून जास्त आठवणी मिळतील. ;)
=)) एक जागर पे एक और जागर फ्री! फ्री!! फ्री!!!