लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे.
१. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा.
२. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या.
३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा.
४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं.
५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं.
६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात.
७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला.
८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.
९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी.
१०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं.
११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला.
१२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती.
१३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली.
१४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले.
या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
24 Feb 2016 - 9:44 am | पगला गजोधर
ही लक्शणे आज कुठेतरी हळुहळु दिसायाला लागलीयेत का हो ?
24 Feb 2016 - 11:55 am | काळा पहाड
भारत देशाविषयी बोलताय का? कारण तसं असेल तर ११ वा मुद्दा "विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण" मला कुठेही दिसत नाहीये. उलट या युनिव्हर्सिटीज ना जास्तच स्वातंत्रय दिलं गेलंय. एखादा माणूस जवळच्या नाक्यावर अशा घोषणा देत असेल तर त्याचं काय होईल ते सांगायला नकोच. पण युनिव्हर्सिटीज मध्ये पोलीस पण जावू शकत नाहीत हा स्वातंत्र्याचा किती अतिरेक! बाकी हे विचारवंतच होते ना, पारितोषिकं परत करून मग परत घेणारे? त्यांना आत्तापर्यंतच्या गोष्टी दिसल्या नाहीत आणि मोदी सरकारचं एक वर्ष झाल्याबरोबर त्यांना असहिष्णुतेचा दृष्टांत झाला! तेव्हा सुडो-सेक्युलरांच्या कृत्याच्या मानानं अजून त्यांना बरेच फटके मिळायचे बाकी आहेत. त्यांना बोंबलायचंच असेल तर फटके पडल्यावर ते करायची मुभा आहेच.
24 Feb 2016 - 1:19 pm | नाना स्कॉच
मालक त्यांनी मोदी किंवा भारतीय सरकार असे नावही घेतले नाहीये कुठेच! कश्याला भित्यापाठी ब्रह्मराक्षस करून मोदीजी अन त्यांच्या स्तुत्य कार्याला कमीपणा आणावा म्हणतो मी??
24 Feb 2016 - 1:28 pm | पगला गजोधर
समजा एखाद्याने कुठे,
"Will all great Neptune's ocean wash this blood clean from my hand? No, this my hand will rather the multitudinous seas incarnadine, making the green one red" Macbeth Quote (Act II, Sc. II).
असा मॅक्बेथ मधला संवाद उधृत केला, की लगेच धावत येवून विचारतात, की आमच्या लाडक्या नेत्याला उद्देशूनच म्हटला का संवाद ?
24 Feb 2016 - 2:18 pm | काळा पहाड
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते, तसंच हे समजा. बाकी "आज कुठेतरी हळूहळू" चा दुसरा काही मतितार्थ असेल तर मज पामरास समजावण्याची कृपा करावी.
24 Feb 2016 - 2:20 pm | तर्राट जोकर
दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम
24 Feb 2016 - 2:31 pm | मोदक
24 Feb 2016 - 2:52 pm | तर्राट जोकर
हा हा. माध्यमांनी तयार केलेली प्रतिमा आणि सत्य ह्यात जमिन आस्मानचा फरक आहे मोदकराव. तुम्ही हा विडियो टाकून लोक किती बालिश विचार करतात, त्यांना कसे भडकवल्याजाऊ शकते ह्याचा प्रत्यय दिलात. काळापहाड म्हणतात तसे जर पोलिस डोळे बारिक करुन दाढीधार्यांकडे बघायला लागले तर झाला हो दहशतवादाचा नायनाट.
24 Feb 2016 - 3:26 pm | मोदक
असेल ब्वा.. दहशतवादी मार्गाने का होईना पण शांततेचा प्रसार होतो आहे हे तरी तुम्हाला समाधानकारक वाटत आहे ना?
24 Feb 2016 - 2:36 pm | तर्राट जोकर
आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ
On 29 September 2008, three bombs exploded in Modasa, Gujarat and Malegaon, Maharashtra killing eight persons, and injuring 80. Several unexploded bombs were found in Ahmedabad, Gujarat. Hemant Karkare, as the chief of the state Anti-Terror Squad, led the investigation into the 2008 Malegaon blasts. In late October 2008, the ATS arrested eleven suspects, all Hindu, including a former ABVP student leader Sadhvi Pragya Singh Thakur, Swami Amritananda alias Dayanand Pandey, a retired Major Ramesh Upadhyay and a serving Army officer Lt. Col. Prasad Shrikant Purohit. Most of the accused belonged to a radical Hindutva group called Abhinav Bharat with prior links to Sangh Parivar organisations. Karkare's ATS identified, for the first time, Hindutva organisations as being responsible for terrorism in India, and political commentators began to call it Hindutva terror or Saffron terror.
24 Feb 2016 - 3:58 pm | बोका-ए-आझम
७ वर्षे हे लोक जामिनाशिवाय तुरुंगात आहेत. ह्या बातमीतही suspects असा शब्द वापरलेला आहे. ही बातमी इथे देण्यामागे नक्की काय कारण आहे?
24 Feb 2016 - 4:04 pm | तर्राट जोकर
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते,
>> सस्पेक्ट चा उगम इथे आहे. बाकी जामिनाशिवाय त्या लोकांना आत ठेवलंय तरी त्यांचे साथीदार, त्यांच्या संघटना, हिंदूत्ववादी काहीच करत नाहीत हे आश्चर्य जनक नाही काय? काय कारण असावे ब्रे?
24 Feb 2016 - 4:15 pm | बोका-ए-आझम
बघा, पटतंय का!
24 Feb 2016 - 4:18 pm | अद्द्या
कैच्याकाय अपेक्षा बोकोबा तुमच्या पण
24 Feb 2016 - 4:20 pm | तर्राट जोकर
संशयितांना कुठलेही आरोप निश्चित नसतांना इतकी वर्षे तुरुंगात खितपत ठेवने ह्याविरूद्ध काहीच न्यायालयीन मार्ग नाही का? हा प्रश्न मी एक न्युट्रल सिटीझन म्हणून विचारत आहे. अशाने तर कुणासही संशयित म्हनुन बेमुदत तुरुंगात डांबून ठेवता येते असे दिसते. हे घटनाविरोधी नाही काय?
25 Feb 2016 - 11:57 am | आनन्दा
नाही.. त्यांच्यावर मोक्का लावला आहे. जोपर्यंत मोक्का काढला जात नाही तोपर्यंत ते जामीनपात्र होत नाहीत.
मध्यंतरी सीबीआयने बहुधा मोक्का काढण्याची तयारी सुरू केल्यावर सगळी माध्यमे पेटून उठली होती. पुढे काय झाले हे माहीत नाही.
बाकी पुरावे नाही मिळाले तर ते सुटतील लवकरच. तसेही सरकारला हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करण्याची सध्या तरी गरज नाही.
25 Feb 2016 - 2:52 pm | तर्राट जोकर
सीबीआयने बहुधा मोक्का काढण्याची तयारी सुरू केल्यावर सगळी माध्यमे पेटून उठली होती. पुढे काय झाले हे माहीत नाही.
>> हे चिंताजनक व विचारात पाडणारे आहे. असे होत असेल तर न्युट्रली विचार करता सामान्य नागरिकांसाठी घातक आहे.
25 Feb 2016 - 4:16 pm | निनाद मुक्काम प...
म्हनुन
माझा कि बोर्ड चोरल्याबद्दल निषेध
काही काही गोस्घ्ती आमचे राखीव कुरण असू द्या मालक
24 Feb 2016 - 4:19 pm | मोदक
विमान अपहरण, खेळाडूंची हत्या, बाँबस्फोट वगैरे अपेक्षित आहे का?
त्यांच्या साथीदारांचे मार्ग वेगळे आहेत, इतिहास अभ्यासलात तरी चालेल.
24 Feb 2016 - 4:36 pm | शब्दबम्बाळ
In late October 2008, the ATS arrested eleven suspects, all Hindu,
हे दुसर्या कुठल्या धर्माचे असते तर अशाच अक्षरात लिहिले असते का हो? आरोपींचा धर्म शोधून त्यांना न्याय देण्याची व्यवस्था आपल्या देशात तरी नाहीये.
एखाद्याच्या हातातला झेंडा भगवा असो, निळा असो, हिरवा असो वा आणि कोणता असो जर कोणी देश विघातक कृत्य करत असेल तर त्या कृत्याला अनुसरून शिक्षा झाली पाहिजे!
आणि हल्ली भगव्याला विरोध हि फ्याशन झालीये असे वाटत!
24 Feb 2016 - 4:38 pm | तर्राट जोकर
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते,
>> ही फ्याशन आहे हल्ली. काळा पहाड म्हणतात तसं. तुम्हाला नाय वाटत काय?
असो. आम्ही इथंच थांबतो. धाग्यातल्या मूळ विषयावर चर्चा होऊ द्या.
26 Feb 2016 - 6:18 pm | प्रमोद गवले
बरोबर..
24 Feb 2016 - 9:48 am | बोका-ए-आझम
तर बाकी सगळे सोविएत रशियाला लागू पडतात. ९वा मुद्दा बाकी सगळ्यांसकट चीनला लागू पडतो. पण तरीही त्यांना फॅसिस्ट म्हटलं जात नाही. डाव्यांची जी Holier than Thou अशी मनोवृत्ती आहे ती अत्यंत स्पष्टपणे यात दिसते आहे. यात ज्या राजवटींचा अभ्यास लाॅरेन्स ब्रिट यांनी केलेला आहे, त्या जुलमी होत्या यात वादच नाही. पण स्टॅलिन, माओ, पाॅल पाॅट, किम (उत्तर कोरियाचा शासक. पूर्ण नावात नेहमी गोंधळ होतो म्हणून फक्त नाव देतोय) यांच्या राजवटी त्यातून वगळणं हे जर हेतुपुरस्सर असेल तर लेखक biased आहे आणि जर नसेल तर त्याचा अभ्यास कमी आहे असं म्हणावं लागतंय. त्यामुळे एक अभिनिवेशाने लिहिलेला typical JNU style लेख याशिवाय दुसरं मत व्यक्त करता येत नाही.
( हा अभिप्राय मूळ लेखाला आहे. अनुवाद छानच आहे आणि राजेश घासकडवी यांच्या लिखाणाचा मी फॅन आहे. गैरसमज नसावा म्हणून हे लिहितोय.)
24 Feb 2016 - 10:56 am | सुबोध खरे
कसं बोललात?
एकदम मुद्द्यालाच हात.
+१००
24 Feb 2016 - 11:02 am | गॅरी ट्रुमन
सहमत आहे. हे सगळे मुद्दे वाचल्यावर अगदी हेच लिहायचे होते मला.
24 Feb 2016 - 11:04 am | पगला गजोधर
जुना रशिया, चीन, उत्तर कोरिया यासारखे अतिडाव्या किंवा फॅसिस्ट राजवटीसारखी,जुलमी राजवट,
या लोकशाही देशात कधी येवू नये, किंवा आल्यास रुजू नये, अशीच सदिच्छा मी व्यक्त करतो
24 Feb 2016 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
शिवाय, काही मुद्दे कालपरत्वे (काही कालखंडांत) लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते म्हटले जाणार्या / दावा केला जाणार्या देशांबाबतीतही खरे ठरले आहेत.
प्रत्येक मुद्दा आपल्याला सोईच्या चष्म्यातून पाहिले म्हणजे त्याचा आपल्याला हवा तसा अर्थ काढायला (आपल्या विरोधकाला चिकटवायला) आपण मोकळे असतो... यालाच राजकारण * असेही म्हणतात. :) ;)
******
* संशयाचा फायदा द्यायचा असल्यास त्याला अतिसुलभिकरण असेही म्हणू शकतो :)
24 Feb 2016 - 9:58 am | श्रीरंग_जोशी
उगाच फाफटपसारा नसणारा अन विषयानुरुप नेमकी मांडणी असणारा लेख आवडला.
अनुवाद खूपच चांगला जमला आहे.
24 Feb 2016 - 12:13 pm | नया है वह
+१
24 Feb 2016 - 1:21 pm | स्पा
फुटकळ लेख, शाळेतल्या मुलाने निबंध लिहिल्यागत
24 Feb 2016 - 1:21 pm | जेपी
नुकतीच डॉ.एस.एल.भैरप्पांची "तंतु" कादंबरी हातावेगळी केली.त्याची आठवण आली.
24 Feb 2016 - 1:23 pm | तिमा
चालता येईना डाव्या कडेने अन धुता येईना उजव्या हाताने.
24 Feb 2016 - 1:30 pm | मृत्युन्जय
एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित सगळी लक्षणे कॉम्ग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत दिसत आहेत. म्हणजे काँग्रेसचे सरकार फॅसिस्ट होते की काय असे वाटु लागले आहे, बरे झाले ब्वो फॅसिस्टांच्या तावडीतुन सुटलो.
24 Feb 2016 - 2:07 pm | नाना स्कॉच
हा प्रतिसाद आहे का ट्रैप!! :D :D
आजकाल काही भरोसा नाही कोणाचा!
इतके नोंदवून पास घेतो
24 Feb 2016 - 2:09 pm | बोका-ए-आझम
१२ वा आणि शेवटचा हे मुद्दे लागू होत नाहीत. गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत. गुलाग किंवा मृत्यूछावण्याही बनवलेल्या नाहीयेत.शेवटचा मुद्दा - staged निवडणुकींचा तर अजिबातच नाही. इंदिरा गांधींना पायउतार करणारी १९७७ ची, भाजपच्या इंडिया शायनिंगचा फुगा फोडणारी २००४ ची, जगातलं पहिलं लोकनियुक्त कम्युनिस्ट सरकार आणणारी केरळातली १९५७ ची या staged निवडणुका नव्हत्या. बाकी मुद्दे आहेत. आणीबाणीच्या काळात जर त्याचा प्रतिकार झाला नसता तर देश कदाचित फॅसिझमच्या वाटेने गेला असता कारण एका हुकूमशाही राज्यकर्त्याचे सगळे गुण इंदिरा गांधींमध्ये होते. पण १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली.
24 Feb 2016 - 2:13 pm | नाना स्कॉच
दंडवत!!
ह्याला म्हणतात टाकलेल्या काडेपेटीच्या जळत्या काड़ी वर तर्काचा अन सदसद्विवेकबुद्धीचा टैंकर उपडा करणे!!
मानाचा मुजरा घ्या बोका-ए-आज़म साहेब! खुप कमी उरले आहेत आजकाल तुमच्यासारखे लोक
24 Feb 2016 - 2:20 pm | पगला गजोधर
१९७७ मध्ये काँग्रेसला पाडून, जनतेने या देशातील लोकशाही वाचवली. सहमत
24 Feb 2016 - 2:28 pm | मोदक
ओके, म्हणजे इंदिरा गांधींचे सरकार हुकुमशाहीचे सरकार होते हे तुम्हाला मान्य आहे तर!
24 Feb 2016 - 3:00 pm | पगला गजोधर
त्यावेळची आणीबाणी = हुकुमशाही,
एवढच मी म्हणालो...असो.
24 Feb 2016 - 3:11 pm | बोका-ए-आझम
या हुकूमशाही वृत्तीच्या होत्या हे त्यांच्या चरित्रकारांनीही म्हटलेलं आहेच.(हे जाहीररीत्या बोलल्यावर काँग्रेसवाले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने ते मान्य करतील का हा एक रोचक मुद्दा आहे.)संजय गांधींना त्यांनी दिलेली मोकळीक, विरोधी पक्षनेत्यांना आणीबाणीत झालेली अटक, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्यांना मिळालेली वागणूक, मारुती इंडस्ट्रीजसारखे गैरव्यवहार, जबरदस्तीने केलेल्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया - हा सगळा घडून गेलेला इतिहास आहे. पण हुकूमशाही वृत्ती असणं आणि खरोखर हुकूमशहा बनणं यातला फरक १९७७ च्या निवडणुकीने दाखवून दिला. पुढे जरी जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कर्माने आलेली सत्ता घालवली असली तरी त्यानंतर आणीबाणी आणण्याची हिंमत कोणत्याही राजकीय पक्षाने दाखवलेली नाही.जर १९७७ मध्ये काँग्रेसच जिंकली असती तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही.
24 Feb 2016 - 7:40 pm | नगरीनिरंजन
बरोबर. इंदिरा गांधी व संजय गांधी हुकूमशाही प्रवृत्तीचे होते हे कोणीही मान्य करेल. शिवाय इंदिरा गांधी या राजकीय भ्रष्टाचाराच्या जननी आहेत असे माझे वाचीव माहितीवर मत झाले आहे. असे लोक पाहिल्यावर एखाद्या देशात व्यक्तिपूजा कमी होईल असे एखाद्याला वाटणे स्वाभाविक आहे पण तसे अजून तरी दिसत नाही.
24 Feb 2016 - 2:24 pm | मोदक
गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत.बोकाजी.. तुम्हाला गुन्हेगार म्हणजे नक्की कोणता प्रकार अभिप्रेत आहे?
24 Feb 2016 - 2:54 pm | बोका-ए-आझम
जाणूनबुजून, हेतुपुरस्सर आणि वैयक्तिक फायद्यासाठी कायदेभंग करणारा/री अशी गुन्हेगाराची व्याख्या करता येईल. या लेखाच्या अनुषंगाने म्हणत असाल तर फॅसिस्ट देशांमध्ये एखाद्या धर्मात जन्माला येणं (उदाहरणार्थ नाझी जर्मनीतील ज्यू) हाही गुन्हा अाहे. ख्मेर रुजच्या अंमलाखाली असलेल्या कंबोडियामध्ये सुशिक्षित आणि बुद्धिजीवी असणं हा गुन्हा होता. आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत. खैरलांजी किंवा बिहारमधील बाथे लक्ष्मणपूर यासारखी हत्याकांडं ही सरकारी यंत्रणेने घडवलेली नाहीत आणि कसाब किंवा अफझल गुरु किंवा याकूब मेमन यांना show trial न करता सर्व कायदेशीर पर्याय देऊन मग long drop hanging या तुलनेने वेदनारहित आणि म्हणूनच अमानुष न मानल्या जाणाऱ्या पद्धतीने फाशी दिलं - या लोकांनी या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेलं असूनसुद्धा. हा मुद्दा मला मांडायचा आहे. त्यामुळे मृत्युंजयभौंच्या काँग्रेसची राजवट ही फॅसिस्ट होती या मताशी मी असहमत आहे. ती भ्रष्ट असेल, एका ठराविक धर्माचं लांगुलचालन करणारीही असेल पण फॅसिस्ट नक्कीच नव्हती.
24 Feb 2016 - 3:41 pm | मोदक
आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत.(वादासाठी वाद म्हणून) १९८४ सालचे शीख हत्याकांड किंवा संजय गांधींनी राबवलेले कुटुंबनियोजनाचे अतिरेकी प्रकार किंवा मारूती उद्योगासाठी केलेली एकंदर दडपशाही ही सगळी लक्षणे फॅसिझमचीच होती असे म्हटले तरी चूक होईल का?
तुमचा मुद्दा लक्षात आला, काँग्रेसची राजवट ही १००% फॅसिस्ट होती हे माझेही मत नाही आणि बहुदा मृत्युंजयचेही नसेल.
या धाग्यामध्ये किंवा सर्वत्रच सध्या ज्या पद्धतीने देशात जाणीवपूर्वक असहिष्णुतेचा बागुलबुवा पसरवला जात आहे, विकले गेलेले पत्रकार "मुद्दा असेल/नसेल पण दोष सध्याच्या सरकारचाच" अशा पद्धतीने बुद्धीभेद करत आहेत, आधीचे काँग्रेसचे राज्य म्हणजे रामराज्य आणि आता हुकुमशाहीचा उगम झाला अशा पद्धतीचे प्रतिसाद येत आहेत त्याला वैतागून मीही मृत्युंजयसारखाच प्रतिसाद दिला असता हे ही खरेच.!
बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..!
24 Feb 2016 - 3:49 pm | बोका-ए-आझम
युनियन कार्बाईड सीईओ वाॅरन अँडरसनला भोपाळ दुर्घटनेनंतर भारताबाहेर जाऊ देणं या गोष्टी टाकायला विसरलो. बाकीचे मुद्दे लिहिले आहेतच.
So मुद्दा हा आहे की जर मतदारांचा, विरोधी पक्षांचा आणि प्रसारमाध्यमांचा वचक नसेल तर एखादी राजवट फॅसिझमच्या दिशेने वाटचाल करु लागते. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने (ज्यात काँग्रेस, भाजप, आआप, सपा, बसपा, वगैरे सगळे आले)लोकांना गृहीत धरु नये. त्यामुळे भारतात मतदारांनी एखाद्या पक्षाला फॅसिझम आणू दिला नाही असं म्हणणं जास्त बरोबर ठरेल. पक्षाला असलेलं श्रेय मर्यादित आहे. म्हणजे निवडणुकीत पराभव झाल्यावर तो मान्य करुन जिंकणाऱ्याचं अभिनंदन करुन पुढे जाणं या आणि याच गोष्टीसाठी.
24 Feb 2016 - 3:59 pm | तर्राट जोकर
सहमत. काही पक्षसमर्थकांचा देशाच्या जनतेच्या विवेकबुद्धीवर विश्वास नाही, इथे जनताच सार्वभौम आहे यावर विश्वास नाही. सांप्रत सरकार ने धिरूभाईंचा आदर्श ठेवला तर जास्त बरे होईल. 'वो जितना हमारे खिलाफ लिखे, उतना हमारे टर्नओवरके विग्यापन बढाओ'. खैर. धिरुभाईंकडे तरक्कीचा दणदणीत पुरावा होता तरी. इकडे तो आहे का नाही ह्याचा काहीच मागमूस लागत नाही.
24 Feb 2016 - 4:10 pm | मोदक
बोकाजी.. येथे वेळ घालवण्यापेक्षा मोसादचा पुढचा भाग लिहा असा एक प्रेमळ आग्रह!
24 Feb 2016 - 4:25 pm | तर्राट जोकर
बोकासाहेब निष्पक्ष लिहित आहेत तर ते वेळ घालवणे वाटतंय होय. भाजप, संघाच्या आरत्या ओवाळल्या असत्या तर तेव्हा असा प्रतिसाद आला नसता.
24 Feb 2016 - 4:31 pm | मोदक
न्हाई ब्वा.. आम्ही भक्त नाही. पण झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना उठवण्यात त्यांचा वेळ जाऊ नये असे वाटते.
24 Feb 2016 - 3:49 pm | होबासराव
बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..!
हे तर दिसुनच येतय...
24 Feb 2016 - 2:45 pm | मृत्युन्जय
पण १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली.
याचा अर्थ एवढाच की जनता घाऊकपणे फॅसिस्ट विचारांची नाही . पण सरकार पण नव्हते हे सिद्ध करा. काँग्रेस फॅसिस्ट विचरांची होती किंवा आहे असे मी म्हणत नाही आहे पण सगळी लक्षणे तर वेळोवेळच्या कॉम्ग्रेस सरकारांमध्ये दिसत आहेतच की. ही लक्षणे असणारी सरकारे फॅसिस्ट असतात असा लेखकाचा (म्हणजे गुर्जी नव्हे. त्यांनी तर फक्त जनकल्याणार्थ अनुवाद केला आहे) समज आहे . म्हणुन मी फक्त प्रश्न विचारला की मग कॉम्ग्रेस फॅसिस्ट होते काय?
24 Feb 2016 - 2:13 pm | मोदक
विदा द्या.. अन्यथा रिव्हर्स ट्रोलींग बंद करा.
(बरेच दिवसांपूर्वी भाळी आलेला आळ पुढे सरकवल्याने निश्चिंत झालेला) मोदक.
24 Feb 2016 - 2:49 pm | मृत्युन्जय
विदा काय द्यायचा त्यात? इतकी ढळढळीत उदाहरणे आहेत की. आता डोळ्यांवर कातडे ओढुन बसायचे असेल तर गोष्ट वेगळी. आणि हे रिव्हर्स ट्रोलिंग म्हणजे काय असते आणि माझ्या प्रश्नात तुम्हाला ते कसे म्हणे दिसले?
24 Feb 2016 - 3:22 pm | अन्या दातार
लक्षण क्र. २, ४, ७, १० व १२ ही क्रूर आहेतच यात वाद नाही. पण बाकीची लक्षणेही absolute आहेत का रिलेटिव?
तूर्तास इतकेच.
24 Feb 2016 - 3:55 pm | सुमीत भातखंडे
उत्तम अनुवाद.
(आपल्याकडे आज फॅसीझम नाही हे कळल्यामुळे जीव भांड्यात पडलेला)सुमीत भातखंडे
24 Feb 2016 - 4:06 pm | जयंत कुलकर्णी
मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी लेखमाला लिहावी काय ?
24 Feb 2016 - 4:14 pm | अद्द्या
लिहा कि
माझ्या सारखा नव्वदीच्या दशकात जन्मलेल्यांना कळेल नक्की काय प्रकार होता ते
24 Feb 2016 - 4:14 pm | मोदक
+१ नक्की लिहा.
खरेखुरे वाचक स्वागत करतील आणि डुआयडी हिंदू धर्म, भाजपा, संघ यांवर पुराव्याशिवाय आरोप करत बसतील*
*पुरव्याशिवाय आरोप करणारे सगळेच डुआयडी आहेत असे म्हणायचे नाहीये. "दहशवाद्यांना धर्म नसतो मात्र सगळेच दहशतवादी एकाच धर्माचे..." असे काहीसे वाक्य आहे. समजून घ्यावे.
24 Feb 2016 - 4:16 pm | पैसा
लिहा लिहा!
24 Feb 2016 - 4:20 pm | sagarpdy
कृपया लिहाच. अद्द्याला +१
24 Feb 2016 - 4:40 pm | बोका-ए-आझम
पण ते बार्बारोसा सोडू नका प्लीज!
24 Feb 2016 - 5:02 pm | एस
त्याआधी 'द ग्रेट गेम' अर्धवट सोडलीये ती पूर्ण करा.
24 Feb 2016 - 5:38 pm | धनावडे
आणि अफगानिस्तान पण
24 Feb 2016 - 7:47 pm | राजेश घासकडवी
आत्तापर्यंतची चर्चा वाचली. ऐसीवर गविंनी लिहिलेलं आहे की
तर ताकाला जाऊन भांडं लपवणं, किंवा काहीतरी वैचारिक काडी टाकून कसं पेटलं हे बघत बसण्याचा माझा हेतू नाही. मांडणी मुद्दामच सर्वसाधारण केली होती, पण तरीही या सगळ्या लक्षणांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हावा हाच उद्देश होता. त्यामुळे माझी त्याबाबतची मतं मांडतो.
सर्वप्रथम, इथे अनेकांनी फॅसिस्ट आणि डावी अत्याचारी सरकारं असा भेदभाव केलेला आहे. जणू काही फॅसिस्ट प्रवृत्ती ही केवळ उजव्यांची मक्तेदारी असते. अनेकांनी ही लक्षणं अनेक डाव्या राजवटींना लागू पडतात हे दाखवून दिलेलं आहे. तेही योग्यच आहे. पण पुन्हा तेच, फॅसिस्ट प्रवृत्ती या उजव्या-डाव्या विचारसरणीच्या पलिकडे जातात. म्हणजे वरच्या उदाहरणांत जिथे 'धर्म' म्हटलं आहे तिथे 'कम्युनिस्ट विचारसरणी' असं लिहिलं तर तोच मुद्दा स्टालिनलाही लागू पडतो. (कदाचित 'पोथीनिष्ठता' हा शब्दप्रयोग जास्त व्यापक ठरेल.)
तुलना करायची तर डावे की उजवे अशी न होता फॅसिस्ट राजवट विरुद्ध लोकशाही अशी व्हायला हवी. आणि सर्वसाधारण आदर्श लोकशाहीपासून दूर एकाधिकारशाहीच्या दिशेने किती जवळ जात आहोत याचा अंदाज या लक्षणांवरून यायला हवा. याचा अर्थ कधीकाळी आदर्श लोकशाही होती असा दावा नाही. किंबहुना सर्वच जगात, जिथे लोकशाही ठीकठाक चालू आहे तिथेही सरकारं या सर्व मार्गांचा थोड्या प्रमाणात वापर करतातच. त्यामुळे शून्य फॅसिझम - संपूर्ण लोकशाही असं जगात कुठेच नसावं.
भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'. आणि ही पावलं मला आधीच लोकशाहीपासून दूर असलेल्या भारतीय व्यवस्थेला अजून दूर नेणारी वाटतात.
मात्र इटली, जर्मनीमध्ये त्याकाळी झालं तसं, तितक्या तीव्र आणि हिंस्र प्रमाणात भारतात फॅसिझम पसरेल असं वाटत नाही. तो काळ वसाहतवादाचा होता, आणि या राष्ट्रांना नवीन वसाहती हव्या होत्या, आणि त्या इतर राष्ट्रांकडून लुटायच्या होत्या. भारत त्यामानाने फारच प्रचंड मोठा देश आहे, आणि आसपासचं वातावरणही तिथे होतं तसं नाही. त्यामुळे भारताची घटना फेकली जाऊन हुकुमशाही येईल, भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल, किंवा मुसलमानांसाठी छळछावण्या उघडल्या जातील वगैरे मला बिलकुल वाटत नाही. मात्र आदर्श लोकशाहीच्या जवळ जाण्याऐवजी दूर नेण्याचे प्रयत्न होत आहेत, आणि त्यांना यश मिळतं आहे हे मला काळजी करण्याजोगं वाटतं.
25 Feb 2016 - 4:22 am | अर्धवटराव
तीव्र असहमत.
सध्याच्या राजवटीत असलं काहि घडण्याचं प्रमाण पुर्वीपेक्षा वाढलय असं अजीबात नाहि.
25 Feb 2016 - 11:05 am | गॅरी ट्रुमन
तीव्र असहमतीस तीव्र सहमती :)
25 Feb 2016 - 2:39 pm | सुमीत भातखंडे
.
24 Feb 2016 - 8:05 pm | मोदक
मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.. एखादा तुलनात्मक विदायुक्त लेख.
24 Feb 2016 - 8:41 pm | राजेश घासकडवी
दुर्दैवाने माझा या बाबतीत विदा देऊन मांडणी करण्याइतका, आणि त्यावर मुद्देसूद चर्चा करण्याइतका अनुभव, अभ्यास आणि अधिकार नाही. एक सर्वसामान्य वाचक, नागरिक म्हणून जे कानावर येतं, पेपरात आणि इंटरनेटवर वाचायला मिळतं त्यातून तयार झालेली ही मतं आहेत. त्यामुळे त्यांना तितकंच वजन आहे. त्यामुळे जर कोणी अभ्यासू व्यक्तीने असा लेख लिहिला तर तो वाचून मी माझी मतं बदलायला तयार आहे. याचा अर्थ असा नाही की माझं म्हणणं चूक सिद्ध करण्याची जबाबदारी इतर कोणाचीतरी आहे. मला म्हणायचं आहे की माझी मतं भक्कम पायावर असण्यापेक्षा सर्वसाधारण निरीक्षणं यावर आधारलेली असल्यामुळे ती संपूर्णपणे बरोबर नसण्याची शक्यता आहे हे मी मान्य करतो.
काही मुद्द्यांसाठी मला दिसलेली कारणं देऊ शकतो.
विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण हे पद्धतशीरपणे चालू आहे. एफटीआयआय प्रकरण, जेएनयू प्रकरण, इतर शैक्षणिक संस्थांवर सरकारी पकड घट्ट करण्याचा प्रयत्न, विचारजंत-फेक्युलर-फुरोगामी या शब्दांत हिणवणं, आपल्या धर्मात/समाजात काय त्रुटी आहेत हे दाखवणारांवर होणारी पद्धतशीर घणाघाती टीका, वगैरे गोष्टी त्यात येतात.
धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं धार्मिक भावनांना हात घालणं, बीफबंदी, सर्वच माहौलचं भगवीकरण, वगैरे गोष्टी समाजात घडताना दिसतात. यात प्रत्येक वेळी राजवट प्रत्यक्षपणे त्यात असतेच असं नाही. पण तसंही फॅसिस्ट राजवटींमध्ये काही प्रमाणात जनताही सामील असते/केली गेलेली असते.
शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं हेही होताना दिसतं आहे ते मुख्यत्वेकरून मुसलमान समाजाला ज्या पद्धतीने स्टिग्मटाइज केलं जातं आहे त्यावरून. पाकिस्तानात चालते व्हा असं जागोजागी ऐकू येतं. पुन्हा, सरकार हे सगळं करतं असं नाही, तर समाजातल्या फॅसिस्ट प्रवृत्ती बळावल्याचं ते लक्षण आहे.
तीव्र लिंगभेद सरकारी धोरणांतून हा दिसत नसला, तरी मत्र्यांकडून येणारी विधानं, सरकारी पक्षातल्या लोकांकडून आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या लोकांकडून येणारी विधानं ही पितृसत्ताक पद्धतीचा परिपोष करणारी असतात. हिंदूंनी पाच किंवा दहा पोरं काढावीत असं सहज ऐकू येतं.
गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार/विचार मूळ लेखात याला प्रीऑक्युपेशन विथ क्राइम अॅंड पनिशमेंट असं म्हटलेलं आहे. रस्त्यावर दिसणाऱ्याला तिथल्या तिथे ठोकून काढलं पाहिजे असं कौतुकाने म्हटलं जातं. कोर्टाच्या आवारात कायदा हातात घेणारे काळे डगलेवाले राजरोस मिरवतात आणि शाबासकी मिळवतात. देशद्रोही हा शब्द पाकीटमारसारख्या सहजतेने वापरला जातो.
असो. ही माझी निरीक्षणं आहेत. समाजशास्त्राबाबत अगदी काळं-पांढरं, गणिताने सिद्ध करता येण्यासारखं काही नसतं. तरीही मला जे जाणवलं आहे त्याचं हे वर्णन आहे.
25 Feb 2016 - 12:03 am | विकास
विचारजंत-फेक्युलर-फुरोगामी या शब्दांत हिणवणं,
या वरून हा हलका फुलका विनोद आठवला... कृपाया यात कोणी कुणाला हिणवते आहे असे समजू नये. ;)
25 Feb 2016 - 12:21 am | मोदक
दुर्दैवाने माझा या बाबतीत विदा देऊन मांडणी करण्याइतका, आणि त्यावर मुद्देसूद चर्चा करण्याइतका अनुभव, अभ्यास आणि अधिकार नाही.अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे.
सर्वसाधारणपणे आपण एखादे मत मांडत असलो तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी मतासोबत येतेच अन्यथा ते 'मत' आणि एखाद्या फालतू ट्रोल आयडीने टाकलेली पिंक यात फरक तो काय?
..आणि मत बदलण्याची तयारी असेल तर ते अभ्यासपूर्ण शंका स्वरूपात प्रकट केले जाणे हा सर्वमान्य संकेत पाळावयास हरकत नव्हती.
असो.. एखाद्या (खर्या) अभ्यासू व्यक्तीने तुम्हाला अपेक्षित आहे तसा एखादा लेख लिहून ज्याचे त्याचे मतपरिवर्तन करण्यापेक्षा २०१९ च्या निवडणुकांची वाट पाहणे श्रेयस्कर असावे. विचारवंतांच्या तथाकथीत वैचारिक लेखापेक्षा ती सर्वात मोठी परिक्षा असेल आणि निकालही अजेंडा न राबवणार्यांकडून (किंवा पूर्वग्रहदूषीत नसलेल्या विचारधारेतून) लावला जाईल.
बाकी तुमची विधानांनी निराशाच केली. तुमच्या जालीय वावराच्या आणि इतर ठिकाणी मांडलेल्या मुद्द्यांच्या तुलनेत थोडे परिपक्व मुद्दे अपेक्षीत होते. TRP मिळवण्यासाठी मिथुन बी ग्रेड सिनेमातून सतत काम करत राहिला तसे काहीसे वाटले (ह.घ्या.). :))
एफटीआयआय प्रकरण, बीफबंदी, धार्मिक भावनांना हात घालणं, पाकिस्तानात चालते व्हा हे मुद्दे अजुनही असतील तर अवघड आहे.
असो. ही माझी निरीक्षणं आहेत. समाजशास्त्राबाबत अगदी काळं-पांढरं, गणिताने सिद्ध करता येण्यासारखं काही नसतं. तरीही मला जे जाणवलं आहे त्याचं हे वर्णन आहे.तुमची निरीक्षणे वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला टोचणार्या घटना / प्रकरणाचा वरवरचा किरकोळ (निष्पक्ष!) अभ्यास आणि स्वत:च विशेष अजेंडा राबवणारे मिडीया चॅनल टाळले असते तरी निरीक्षणे बदलली असती. हे माझे निरीक्षण.
पुढील अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. :)
25 Feb 2016 - 11:08 am | गॅरी ट्रुमन
जबराट!!! या प्रतिसादासाठी मोदकरावांना अगदी स्टॅन्डिंग ओव्हेशन!!
25 Feb 2016 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे
चपखल प्रतिसाद !
पूर्वानुभवावरून, शास्त्रिय विचार करणे अपेक्षित असलेल्या लेखकाकडून इतक्या गंभीर विषयावरचे, स्त्रोत माहित नसलेल्या लेखानाचे भाषांतर या स्वरूपात केलेले लेखन, आणि नंतर त्याची जबाबदारी झटकून टाकण्याच्या कृतीचे आश्चर्य वाटले व अँटीक्लायमॅक्स (?मराठी शब्द) वाटून दु:ख झाले ! :(
अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे.आजूबाजूला पाहिले तर यालाच हल्लीच्या भाषेत विचारवंतगिरी म्हणतात असेच दिसते ! अगोदर आपल्याला हवा असलेला निष्कर्श नक्की करून मग त्यासंबंधात असलेला-नसलेला-उत्पादित (मॅन्युफॅक्चर्ड) पुरावा जनतेच्या गळ्यात बांधणे, त्याच्या सत्यतेचा दावा सिद्ध करा म्हटले की "तू बावळट सामान्य आहेस, मी विचारवंत आहे, मी मला हवे तसे हवे तेव्हा बोलेन/लिहेन/वागेन, तो माझा विचारस्वातंत्र्याचा अधिकार आहे, ते बेजबाबदारपणाचे आणि सबळ पुराव्याशिवाय असले तरी त्याबद्दल जाब मागण्याचा तुला अधिकार नाही." असे आक्रस्ताळेपणाने म्हणणे अथवा दुसर्याच्या नावे सरळ हात झटकून मोकळे होणे हे विचारवंताचे लक्षण झाले आहे.
भौतिकशास्त्र असो वा समाजशास्त्र असो, "सबळ पुराव्याशिवाय आणि / अथवा संदिग्ध मत तडक वा आडून देणे म्हणजे असत्याची भलावण करणे होते" हे शास्त्रिय मूलतत्व मागे पडत चालले आहे... शेवटी आपले मत/नेता/पक्ष/बाजू जिंकणे महत्वाचे, सत्याची ऐसी की तैसी ! =)) :(
या सगळ्या पार्श्वभूमीवर "त्या बिचार्या गोबेल्स नीतिचा सतत निषेध का केला जातो बरे ?" असा विचार मनात येतो... पण वरवर एखाद्या गोष्टीचा निषेध करत तीच गोष्ट छुपेपणे करणे, हे गोबेल्स नीतिचे एक वैशिष्ठ्य आहे हे समजल्यावर या सगळ्या वेडेपणामागे एक अर्थ (मेथड इन मॅडनेस) आहे हे ध्यानात येते ! ;) :)
25 Feb 2016 - 1:55 pm | पॉइंट ब्लँक
तुमची काहीतरी गफलत होते आहेत. ही लेखकाची स्टाईल आहे. त्या वि़ज्ञानाच्या लेखनातही हेच केलं आहे. कुठल्या गोष्टीला धड संदर्भ दिलेला नाही, विचारलेल्या प्रश्नांवर टाळाटाळ, सारवासारवी इतकच. उत्तर माहित नाही सांगण्याइतकाही प्रामाणिकपणा दाखवला नाही. कुठली तरी बुरसटलेली किंवा सिद्ध न झालेली थेअरी वापरायची, आणि लेखाच्या शेवटी धर्मावर ताशेरे ओढायचे हीच त्यांची स्टाइल आहे. थोडक्यात सांगायच तर लेखक वि़ज्ञानप्रेमी नाहीत, ते धर्मद्वेष्टे आहेत. Science is the mask he wears to hide his true motives!
25 Feb 2016 - 1:57 pm | प्रसाद१९७१
+१११११११११
तुमचा प्रतिसाद एकदम पॉइंट ब्लँक आहे.
बरोबर ओळखले आहे तुम्ही.
25 Feb 2016 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणालाही आम्ही अगोदर संशयाच्या फायद्याचा लांब बांबू देतो... इतके करूनही नाईलाजच झाला तर मग त्याच बांबूचे फटके :) ;)
25 Feb 2016 - 1:05 pm | मृत्युन्जय
आमच्यातर्फे टाळ्या. उत्तम प्रतिसाद
26 Feb 2016 - 9:45 am | चिनार
मस्त प्रतिसाद !!
अभ्यास आणि स्वत:च विशेष अजेंडा राबवणारे मिडीया चॅनल टाळले असते तरी निरीक्षणे बदलली असती. हे माझे निरीक्षण.
या वाक्यासाठी सलाम स्वीकारावा ..
25 Feb 2016 - 7:19 am | निनाद मुक्काम प...
चला एकेका मुद्याचा विचार करूया
शीत युद्धात जग दोन गटात विभागले गेले तेव्हा साम्यवादी व भांडवलशाही
वरील लेखातील लक्षणे अनेक राष्ट्रांच्या मध्ये आहेत पण त्यावरून निष्कर्ष काढण्या अगोदर त्या राष्ट्रांची सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक स्थिती व तेथील समाजजीवन ह्या बाबी गृहीत धराव्यात
गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार/विचार
ह्याबाबतीत भारतात मी म्हणेन लोकांच्या दैनंदिन जीवनातून ह्या गोष्टी दिसून येतात त्यांना राजवट कोणतीही असली तरीही फरक पडत नाही , उदा रस्त्यावर स्त्री पुरुषाचे भांडण झाले किंवा तिने पुरुषावर आवाज चढवला किंवा पुरुषाने तिच्यावर आवाज चढवला किंवा त्यांनी एकमेकांवर हात उचलले किंवा मुलीची छेड काढली किंवा एखादा लहान मुलगा रस्त्यावरून शुल्लक गोष्ट चोरी करतांना पकडला गेलातर प्रगत भांडवलशाही देशात
पोलिसांना बोलवून त्यांना पुढची कारवाई करायला देतात , मात्र गांधीच्या देशात जमाव पब्लिक धुलाई सुरु करतो येथे गंमत म्हणजे एवरी आपल्याकडे घरात महिलेला दुय्यम स्थान देणारे बाहेर पुरुषाने स्त्री वर हात चालला तर आपल्या मुठी आवळतात पण जर महिलेने पुरुषाला मारले तर नक्की चूक कोणाची अश्या फुटकळ गोष्टींच्या कडे दुर्लक्ष करून पुरुषाला त्याचीच चूक आहे असे गृहीत धरून मारले जाते परदेशात गाड्यांचे एकमेकांवर आपटून अपघात झाला तर पोलिसांना बोलवावे लागते तर भारतात वाहनचालक हिसेंचा शाब्दिक व शारीरिक
वापर करतात म्हणूनच परदेशातील लेखकाने लिहिलेली लक्षणे सरसकट भारतीय समाजाला व राजकारण्याला लाऊ शकत नाहीत. रस्त्यावर पोलिसांनी कोणाला हटकले तर पता हे मेरा बाप कौन हे हे फक्त भारतात पाकिस्तानात प्रामुख्याने ऐकू येते ते प्रगत देशात ऐकू येत नाही , निमुटपणे दंड भरला जातो
आपल्याकडे राष्ट्रध्वजाचे कपडे बनवत नाहीत परदेशात बनवले जातात आपल्याकडे असा कायदा बनवायच्या वेळी आपला स्वातंत्र्य लढा लोकांची बलिदान असे अनेक घटक अंतर्भूत आहेत
माझ्या लहापणापासून दलितांची गावात निर्वस्त्र धिंड हा लज्जास्पद प्रकार घडत आला आहे त्यांचे समूहाने खून करणे सुद्धा वाचले आहे मात्र ह्यास मी राजवटीला संपूर्ण दोष देण्यापेक्ष्य आपल्या समाजाच्या मानसिकतेला दोष देईल ती बदल्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे व त्यास समाजातील घटकांनी साथ दिली पाहिजे ,
अमेरिकेत मुस्लिम समजून शिखांना मारणे किंवा हे प्रकार वाढले आहेत ह्या मी राजवटीला दोषी धरू कि तेथील समाजात जागरुगता व गांधीच्या भाषेत अहिसंक भाव कमी का आहेत ह्यासाठी सरकारला वेठीस धरावे ह्यात वर्ण भेद त्यातून होणारे हल्ले अश्या अनेक गोष्टी आहेत
मुसलमान समाजाला अमेरिकेत सुद्धा टार्गेट केले केले
किंबहुना एखादा समूह जेहा जाणीवपूर्वक स्वताला समाजातील इतर घटकांच्या पासून वेगळा ठेवण्यासाठी धर्म व त्यामुळे वेशभूषा मुल्ये ह्यात वेगळेपणा आणतो जेव्हा आपल धर्म ग्रथ घटनेच्या पेक्ष्या मोठा मानतो तेव्हा त्यंना समाजात टीका सोसावी लागते.
अरब तुर्की पाकिस्तानी सुद्धा माझ्या पाहण्यात योगा करतात.
पाकिस्तानात वीणा मलिक चे योगा करतांना कार्यक्रम आहेत .
मात्र भारतात मुस्लिम योगा हे हिंद्त्वाचे प्रतिक मानून नाकारतात.
लग्न घटस्फोटात धार्मिक कायदे मानतात तेव्हा भारतात कोणाचीही राजवट असो कोणाचेही सरकार असो
उत्तर भारतात गावात मुस्लिम व हिंदूचे प्रेम जुळले तर त्याचा शेवट मृत्यूत होतो भाजप व कोन्ग्रेज नाही तर खाप चा निर्णय मानणारे लोक ह्या देशात कधीपासून आहेत.
धर्माचे व राजकारांचे साटे लोट्याला अमेरिकेत व इतर अनेक देशात घटनेचे कोंदण आहे त्यांना राष्ट्र प्रमुख फक्त विशिष्ट धर्माचा लागतो
बिचारा ओबामा आपण खिर्स्ती आहोत मुस्लिम नाही असे सांगत फिरतो
भारतात समाजावर धर्मनिर्पेषता ही परकीय संकल्पना लादली आहे, इंग्रजाच्या लोकशाहीला सामान्य जनतेने स्व्कारले पण धर्म निर्पेक्षिता पूर्णपणे स्वीकारली नाही पूर्वीपासून प्रांतीय जातीय धार्मिक दबाव गट देशात कार्यरत आहेत जात नाही ती जात
ही उक्ती पूर्वापार आहे .
भारतातील सर्व प्रमुख राजकारणी नेत्यांनी आपले राजकीय नेतृत्व मुलांच्या हाती दिले मुलगा नसला तर ते मुलीकडे येते किंवा नाईलाजाने मुलींच्या कडे द्यावे लागते
पितृ प्रधान समाज पूर्वापार आहेत
५ ते १० मुले हवीत ती हिंदू संख्या टक्का वाढवायला ह्या अर्थी काही हिंदू सनातन नेते बडबडतात त्यात फक्त मुले हवीत
अशी अपेक्षा नसते इंबहुना मुले हवी भ्रूण हत्या इंदिरा काळात सुरु झाल्या असे सत्य मेव जयते मध्ये पाहिल्याचे स्मरते.
भारताचे खरे तर आजच्याकाळात मोदींच्या नेतृत्वाच्या खाली
जगातील प्रबळ सुन्नी कतार यु ऐ इ ते शिया इराण शी चांगले संबंध आहेत अनेक व्यापारी करार झाले आहेत कम्युनिस्ट चीन व रशियाची सुद्धा करार करतांना ख्रिस्ती व भांडवलसहीचा इयु व अमेरिका जपान शी च्नागले संबंध आहेत
२००२ नंतर मौत का सौदागर म्हटले गेलेल्या मोदी सरकार वर अजूनही मुस्लिमांचा गंभीर आक्षेप असा नाही
अकलाख घटनेला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी नुकत्याच कम्युनिस्ट लोकांनी संघाच्या कार्यकर्त्याला मारले त्या बद्दल कोणीच काही जास्त बोलले नाही.
मोदींची मिडिया ट्रायल करणारे त्यांना मौत के सौदागर हे सर्तीफिकीत देणारे आज अचानक उमर व कनैह्या च्या होणार्या मिडिया ट्रायल व देशभक्ती प्रशस्ती प्रत्रक वाटण्यावर आक्षेप घेतात मात्र हे पत्रक वाटांना वाटणार्याच्या फ्री स्पीच च्या अधिकार्याचा येथे विसर पडतो
ज्यंना मोदींचे भक्त म्हणून हिणवले जाते त्या सुजाण सुसंस्कृत लोकांनी याकुब मेनन च्या फाशीवरून एवढी गंमत जमंत चालली असतांना संयम बाळगला कायदा हातात घेतला नाही ,
कमलेश तिवारी तुरुंगात केले तेव्हा त्यांच्या फ्री स्पीच वर बाष्कळ बडबड केली नाही.
कानैह्या साठी त्यांच्या पक्षाचे येचुरी विद्यापीठात आले तेथून गृह मंत्र्यंना भेटले व मग युवराज येउन गेले मात्र हैद्राबाद मध्ये अभाविप च्या मदतीला स्मृतीचे एखादे पत्र आले तर ह्याच लोकांनी बोंबा बॉंब केली.
भारतात आजतागायत धर्म निरपेक्ष सरकार व सरकारी संस्था मध्ये महत्वाच्या पदावर विद्यापीठात डाव्याची वर्णी अशी विभाजनी होती विचारवंत व कलाकार हे सरकारी वळचणीला असायचे त्यामुळे पुरस्कार राज्यसभेवर इतर लाभार्थी पदावर वर्णी लागायच्या , मोदिनी नुसती पंत प्रधान पदाच्या साठी उमेदवारी जाहीर केली तेव्हा ह्या लोकांनी खाल्या मिठाला जागून
मोदींच्या विरुद्ध गरळ ओकली जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले
तो भाग वेगळा
आजही सोशल मिडिया वर सामान्य माणूस अभिव्यक्त होऊ शक्ती ह्यामुळे ह्या विचारवंत ते कलावंत ह्यांची गोची झाली आहे
आता त्यांचे जुने विधान पोस्ट टीवटीव सामान्य लोक आंजा वरून शोधून त्यांच्या तोंडी मारतात , तर्क वितर्क करतात
मुळात माहिती मिळवण्यासाठी पूर्वीच्या जुन्या माध्यमांची जागा नवीन माध्यमांनी घेतली आहे , व नवीन माध्यमांना देशात राजकारणात प्रभावीपणे वापरणारे रुजवणारे व यशस्वी करणारे मोदिनी मिपाच्या भाषेत अनेक जुन्या प्रस्थापित धेन्ड्यांचा
बाजार उठवला आहे
तेव्हा जळजळ होणार वैचारिक मूळव्याधेवर अजून रामबाण इलाज नाही.
हे विचारजंत सामान्य जनतेला तुच्छ समजतात मात्र
लोकशाहीत सामान्य जनता सरकार बनवते त्यांच्या पाठिंबा सरकार ला असेल तर विचारवंताची खेर नसते
तेव्हा लोकांच्या कलाने न वागता आपण आपल्या बुद्धीने लोकांना आपल्या कलाने वागायला लावू असे अनेक विचारवंतांना वाटते असे करण्याचा जेवढ्या जोमाने ते प्रयत्न करतात तेवढे उघडे व केविलवाणे होतात.
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
25 Feb 2016 - 7:36 am | तर्राट जोकर
जर्मनीकर, तुम्हाला हा प्रश्न आधी कोणी विचारला असेलच. मला उत्तर द्या ना. तुम्हाला मराठी लिहिणे जमत नाही का? तुमच्या प्रतिसादात व्याकरणशुद्धी, विरामचिन्हे, परिच्छेद, पूर्ण विधाने, ह्याचा पूर्ण बट्ट्याबोळ असतो. इतके जुने लिहिणारे तुम्ही, तुमचा ब्लॉगही आहे म्हणता. तरी असे. काही समस्या आहे काय?
25 Feb 2016 - 7:52 am | निनाद मुक्काम प...
मिपावर तुम्ही नवे आहात का
अशुद्ध लेखन व्याकरण ह्यामुळे माझ्या अभिव्यक्त स्वातंत्र्यावर मी गदा आलेली येऊ दिली नाही आहे.
मिपा प्रशासनाने मला फ्री स्पीच सारखी फ्री रायटिंग चा अधिकार दिला आहे असे मी मानतो ह्या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे
असो आता मुद्देसूद प्रतिवाद घालायचा नसल्यावर येथे अवांतर न करता व्यनि करावा.
काही दिवसांनी मीच घोषणा देणार आहेत
हमे चाहिये आझादी
व्याकरण से आझादी
शुद्द लेखन से आझादी
सून ले तर्राट जोकर
हमे चाहिये
आझादी
आपले पंचतारांकीत नगरीत स्वागत आहे
25 Feb 2016 - 8:24 am | तर्राट जोकर
अभिव्यक्ती पण स्वातंत्र्याला चर्चेत भाग अनुमोदन घेतांना सभेचे नियम पाळायला लागतात स्वातंत्र्य आहेच, कसे बोलायचे ह्याचे नियम तरी पाळाल काय बोलायचे ह्याचे की नाही त्रासदायक आहे काय लिहिलंय ओ का ठो समजत नाही दुसर्यांना दुर्बोध, तुमचं फ्रीरायटींग सुखी राहा वाचायला वाचायला बसा खुशाल तुमचे कष्टप्रद असणारं लिहायचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसा त्याविरूद्ध पंचतारांकित नगरीत बोलण्याचा डोंबलाची करणार एकतर्फी तुम्ही तुमची आझादी कुरवाळत मलाही आझादी आहे मुद्देच समजले नाही तर चर्चा काय आपल्या आझादीसह.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनुमोदन. पण चर्चेत भाग घेतांना सभेचे नियम पाळायला लागतात. काय बोलायचे ह्याचे स्वातंत्र्य आहेच, कसे बोलायचे ह्याचे नियम तरी पाळाल की नाही. तुमचं फ्रीरायटींग वाचायला त्रासदायक आहे, काय लिहिलंय ओ का ठो समजत नाही. दुसर्यांना दुर्बोध, वाचायला कष्टप्रद असणारं लिहायचा जसा तुम्हाला अधिकार आहे, तसा त्याविरूद्ध बोलण्याचा मलाही अधिकार आहे. तुम्ही तुमची आझादी कुरवाळत बसा खुशाल, तुमचे मुद्देच समजले नाही तर चर्चा काय डोंबलाची करणार. पंचतारांकित नगरीत आपल्या एकतर्फी आझादीसह सुखी राहा.
25 Feb 2016 - 4:22 pm | निनाद मुक्काम प...
आमचे लिखाण वाचायला या असे हळदी कुंकवाचे आमंत्रण दिले नाही .
आमचे विचार लेखन शैली किंवा अशुद्ध लेखन किंवा आम्ही आपणास पसंद नसेल तर दुर्लक्ष करावे
बाकी मिसळपाव च्या नियमावलीत शुद्ध लेखनाचा उल्लेख नाही
तेव्हा नियमबाह्य असे आम्हीच काहीच केले नाही
अभ्यास वाढवा आणि अवांतर करण्यापेश्या मूळ मुद्यांवर या
25 Feb 2016 - 4:32 pm | तर्राट जोकर
आमचं स्वातंत्र्य बोचलं का... स्वारी बर्का, दुर्लक्ष करायची संधी होती, गमावलीत.
पंचतारांकित स्वागतही करता आणि आमंत्रण दिले नाही म्हंटा...ब्वारं ब्वारं.
अभ्यासाचा कंटाळा आहे, उंटावरुन शेळ्या हाकलयाचा अभ्यास करुन काय उपयोग.
तुमच्याकडे शोभतो तो अभ्यास. राहू देत.
25 Feb 2016 - 4:47 pm | नाना स्कॉच
25 Feb 2016 - 5:27 pm | होबासराव
बिरुटे सरांच्या धाग्यावर मिपा संस्थापकाच हा प्रतिसाद बरेच काहि सांगुन जातो.
25 Feb 2016 - 6:01 pm | तर्राट जोकर
बरसचासततच्मिथेइतेथितेलिहिलेल्कुनीकुनीव्याक्रनाबद्दलाम्हालासगळ्यात्बाजूब्ददल्सहानुभूतीआहेअभिव्यक्तीस्वातंत्र्यस्गल्यचेमान्य्व्हाचेअशेइछर्होतीध्न्यव्द
25 Feb 2016 - 1:12 pm | मृत्युन्जय
माफ करा स्पष्ट बोलतो. पण तुमचा लेख हा ताकाला जाउन भांडे लपवण्याच्या प्रकारातलाच होता. पहिल्यापासुन तुमच्या लेखाचा उद्देश सध्याच्या सरकारवर टीका करणारा होता. तो उद्देश साध्य होत नाहिसे दिसुन आणि उलट सर्व लक्षणे पुर्वीच्या कॉम्ग्रेस्स सरकारवर उलटत आहेत हे बघुन तुम्ही हा स्पष्ट प्रतिसाद दिलात.
परत प्रतिसादात सुद्धा काही ठिकाणी "सरकार करत आहे असे नाही तर समाज करत आहे" असे म्हणत आहात. मग समाज जर बदलला असेल तर त्याचा दोष सरकारच्या माथी मारण्याचा खटाटोप म्हणजे पुर्वग्रहदुषित दृष्टिकोनातुन सद्य सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यासारखे वाटते. अगदी स्पष्ट बोलायचे झाले तर "शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं" या फॅसिस्ट प्रवृत्तीकडे झुकणारा बिनबुडाचा आरोप आहे हा. वेगळ्या दृष्टीकोनातुन बघायचे गेल्यास "सरकारला प्रत्येक गोष्टीत उगाच बळीचा बकरा बनवण्याचा" विरोधकांचा प्रयतन चालु आहे आणि हे तुम्हाला पटलेल्या दृष्टीकोनातुन बघायचे झाल्यास फॅसिस्ट मनोवॄत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे सध्या तरी असेच मानायला लागेल की सद्य सरकार फॅसिस्ट नसुन विरोधक मात्र आहेत. हे तेच विरोधक जे या आधी सत्तेत होते आणी फॅसिस्ट होते असे माझ्यासकट बर्याच लोकांनी म्हटलेले आहे.
25 Feb 2016 - 5:15 pm | नया है वह
+१
24 Feb 2016 - 10:16 pm | विकास
मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का?
जेंव्हा अशी भाषांतरे केली जातात तेंव्हा ज्यांच्या लेखनाची ती केली जातात ते कुठेतरी प्रथितयश असतात असा माझा समज आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक माणूस माहीत असेलच असे काही नसते. तेंव्हा वरील "माहितीपूर्ण" लेख वाचत असताना आपल्याला हे ब्रिट साहेब माहीत नाहीत, म्हणजे आपले तोडकेमोडके ज्ञान देखील किती क्षुल्लक आहे असे वाटले. म्हणून मग प्रश्न पडला की हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण की ज्याचे वाक्य ब्रम्हवाक्य, सॉरी आयमीन टू से बुद्धीवादीवाक्य म्हणून घ्यावे?
मी जनरल नॉलेजचा नसेन कदाचीत पण जंक नॉलेजचा नक्कीच भुकेला आहे. (हे असे एक खाद्य आहे, जे जंक असून देखील कॅलरीज वाढवत नाही!)
आता अशावेळेस जे काही अतिसामान्य माणसे करतात तेच मी देखील केले... Laurence W. Britt असे म्हणले आणि गुगलले. काय आश्चर्य! या नावाची व्यक्ती म्हणून काहीच पुढे आले नाही. आला तो फक्त परत परत तोच लेख जो एकाने आधी कुठेतरी टाकला, मग दुसर्याने नवीन पत्त्याने आणि गाडी चालूच राहते... त्यातील काही दुव्यांवरून असे देखील समजले की, हा लॉरेन्स ब्रिट नुसताच नाही तर डॉ. लॉरेन्स ब्रिट आहे. त्यामुळे मी अजूनच दबलो की बापरे हे मोठ्ठे प्रस्थ दिसतयं!
तरी देखील त्यात एक समजले की हा लेख मूळ Free Inquiry Magazine, Vol 22 no 2, [15 July 2003] येथे आला आहे. मग Free Inquiry Magazine गुगलले की मूळ लेख शोधावा... तर Free Inquiry - Council for Secular Humanism याचा दुवा मिळाला... गंमत म्हणजे आमच्या फायरफॉक्स ला कसला तरी वास आला आणि खालील वॉर्निंग मिळाली:

म्हणलं आपल्या संगणकावर असल्याने फायरफॉक्स पण उजवे असेल म्हणून मग गुगलक्रोम वापरले. हुश्श! त्या साईट्चे साईटसिइंग झाले! (आता फाफॉ ने सांगितल्याप्रमाणे त्या साईटवरून काही व्हायरस, माहीती चोरी वगैरे झाले नसले म्हणजे मिळवले!) मग त्यात परत एकदा ब्रिटसाहेबांना त्या संस्थळावर शोधले. मग एक हा लेख दिसला आणि दुसरा "Islamofascism Is a Gross Misnomer" नामक एक लेख दिसला. अर्थातच ते त्यास्थळावर जे वर्गणीदार आहेत त्यांनाच दिसतात. म्हणून मला दिसणे शक्य नव्हते. ;) आता हे नॉन पिअर रिव्ह्यूड आहे. पण त्याने मला खरेच काही फरक पडत नाही, जो पर्यंत लिहीणार्या व्यक्तीबद्दल अधिक माहीती समजू शकते...
म्हणूनच माझी अवस्था कठोपनिषदातील नचिकेतासारखी झाली होती. म्हणजे असे की सगळी उत्तरे हे गुगल देत होते पण परत परत "लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण?" म्हणून विचारले, की यमाप्रमाणे, तेव्हढे सोडून सगळे सांगतो असे उत्तर, असे काहीसे! :( अगदी अॅमेझॉन वर या लेखकाच्या नावाने June 2004 तीन रिव्ह्युअर्सच्या सरासरीने साडेतीन (दिवसारात्री कधिही दिसणारे)तारे असेलेल एक पुस्तक आहे. पण लेखक कोण म्हणून शोधायला गेलो तर, परत तेच... आम्ही नाही जा!
शेवटी एक काहीसा दुवा मिळाला. आता काहीसा म्हणायचे कारण इतकेच की त्यात सर्व संदर्भ बरोबर येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर असे:
यात पुढे हा लेख कसा बरोबर नाही अथवा त्यात सांगितलेली चिन्हे कुठल्याही चळवळीत, सरकारमधे कशी दिसतात वगैरेचा उहापोह आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे. कारण तसेच मुद्दे चर्चाप्रस्तावात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातील प्रतिसादात पण आहेत आणि त्यात काहीजणांनी काही चुका दाखवून दिल्या आहेत. पण मुद्दा तो नाही... हा ब्रिट्स आहे तरी कोण?
त्याव्यतिरीक्त वरील संशोधन करणार्या व्यक्तिमुळे हा दुवा मिळाला...
यात स्वत: ब्रिट्स साहेबांनीच लिहीलेले आहे की:
म्हणजे ते स्वतःला काही डॉ वगैरे म्हणवून घेत नाहीत. पण त्यांचे विचार पसरवणार्यांनी त्याचे महत्व वाढवण्यासाठी त्यांना डॉक्टर केले. वरच्या भाषांतरात (चर्चाप्रस्तावात) तसे नाही आहे पण त्या विचारांचा प्रचार करणार्या जालीय सेक्युलरांमधे नक्की आहे जसे भारतात भाविक लोकं एखाद्याचे तत्वज्ञान आवडल्यास त्याला संत म्हणतात तसे कदाचीत हे पाश्चिमात्य प्रेमाने डॉक्टर म्हणत असतील नाहीतर गेला बाजार इंटलेक्च्युअल म्हणत असतील... अजून एक "मान गये उस्ताद" म्हणावेसे वाटणारी गोष्ट म्हणजे हा लिबरल माणूस स्वतःचे जालीय अस्तित्व मात्र पूर्णपणे खाजगी ठेवतो...
पण एकंदरीत मुद्दा इतकाच, की स्वतःच्या पुस्तकाची अप्रत्यक्ष जाहीरात करण्यासाठी म्हणून एक माणूस काहीतरी एक लेख २००३ मधे लिहीतो आणि मग तमाम बुश विरोधी जनता त्याचा फायदा घेण्यासाठी त्या लेखाला जालावर विविध अनुदिनीमंधे चिकटवत तापवत ठेवते. याला काय संशोधनात्मक जाउंदेत पण विचारात्मक लेखन का ट्रोलात्मक लेखन म्हणायचे? (एक मुद्दा: मी बुश ना झोपेत पण कधी पाठींबा दिला नव्हता!) मग ओबामा आल्यावर ते तिकडे बंद होते. आता भारतात मोदी आले म्हणून चालू होते...
काय राव! हे म्हणजे सनातन प्रभात मधील लेखाचा हिंदू धर्माच्या तत्वज्ञाने लिहीलेला लेख म्हणून दुवा देण्यासारखे झाले. अर्थात मला माहीत असलेले सगळे बरोबर आहे अशी भ्रामक समजूत नाही, म्हणूनच आपल्याला ह्या लेखकाबद्दल अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावीत, ही विनंती...
अजून एक विनंती: स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याऐवजी हे असले कुठल्यातरी उपटसुंभाच्या लेखाचे भाषांतर करणे काही पटले नाही...पण बाकी त्या निमित्ताने, उत्तर म्हणून मला एव्हढे मोठे मुद्दे असलेला लेख आणि बिनचेहर्याचा लेखक आठवत नाही तर मध्ययुगातील इटालियन कवी डांटेचे एक वाक्य आठवते ते सांगून माझे अल्पसे मत संपवतो ;)
24 Feb 2016 - 10:29 pm | राजेश घासकडवी
अरे भाई, आखिर तुम कहना क्या चाहते हो?
१. लॉरेन्स ब्रिट या नावाची व्यक्ती आहे, पण ती डॉक्टर किंवा संशोधक नाही. ठीक आहे. मी या लेखात त्याला डॉक्टर वगैरे काही म्हटलेलं नाही, किंवा त्या माणसाचा महाप्रचंड अभ्यास आहे असं म्हटलेलं नाही. त्यांना जी साम्य दिसली ती त्यांनी लेखात मांडली, मी स्वैर अनुवाद केला.
२. ते लिखाण ट्रोलात्मक निश्चितच नाही. त्यात अत्यंत संयत भाषेत काही मुद्दे मांडलेले आहेत. चुकीचे वाटतील ते खोडून काढायला कोणाचीच हरकत नाही.
३. मुद्दामूनच भारतीय परिप्रेक्ष्यात विचार करायला लावण्यासाठी तटस्थता राहावी म्हणून आधी केवळ भाषांतर केलं. नंतर माझी मतंही खोलवर मांडली. माझी या विषयात थोडं वाचन असलेल्या सामान्य माणसाइतकीच गती आहे हे मानलं.
मात्र लेखक कोणीतरी क्षुद्र, हे लिखाण करायला लायकीचा नाही वगैरे आक्षेप घेण्याचं कारण कळलं नाही. माणसाच्या लायकीनुसार त्याच्या लिखाणाची लायकी ठरवली जात नाही, तर लिखाणाच्या योग्य-अयोग्यतेमुळे लेखकाची लायकी ठरते असं मी मानतो.
मुद्द्यांबद्दल बोला सर. मला अॅड होमिनिम चर्चा करण्यात रस नाही.
24 Feb 2016 - 11:53 pm | विकास
मात्र लेखक कोणीतरी क्षुद्र, हे लिखाण करायला लायकीचा नाही वगैरे आक्षेप घेण्याचं कारण कळलं नाही. माणसाच्या लायकीनुसार त्याच्या लिखाणाची लायकी ठरवली जात नाही, तर लिखाणाच्या योग्य-अयोग्यतेमुळे लेखकाची लायकी ठरते असं मी मानतो.
मी पण!
मात्र तसे टिपकली डावे अथवा डावीकडे झुकलेले करत नाहीत. भारतीय परिप्रेक्ष्यात बोलायचे तर साधे इराणीबाईंचेच उदाहरण घ्याना! त्यांची डिग्री काढतात. हिंदू धर्माची माहिती लिहीण्याची वेळ आली की फक्त डॉनिंजर बाई आणि तत्सम विद्यापिठीय विचारवंतांच्याच म्हणण्याला महत्व दिले जाते. तुम्हाला हे योग्य वाटते का? कळले तर बरे होईल.
त्याही पुढे जाऊन जेंव्हा एखादी व्यक्ती आपले नाव गाव फळ फूल जालावर अत्यंत गोपनीय ठेवते, आणि "विचार" पसरवायला लागते ती व्यक्ती मला स्वतःला काहीतरी गडबड करणारी वाटते. जे ह्या ब्रिट्स साहेबांच्या बाबतीत झाले आहे. त्यामुळे हा लेख माझ्या दृष्टीने काही चांगला नाही. फॅसिजम वर बोलायचे आहे का? मोदी सरकारवर टीका करायची आहे का? अवश्य करा. जमत नसेल तर विचारा, मी देखील सांगेन कशी करता येईल ते! ;) पण हे असले टिपकली जे अंधश्रद्ध उजवे (सगळे नाही!) कशालाही महत्व देत तत्व सांगायला लागतात तशी तुमच्याकडून तरी अपेक्षा नव्हती... असो.
तरी देखील तुमचा हट्टच असेल तर आणि म्हणून त्यातील मुद्द्यांसदर्भात बोलायचेच झाले तर भारतात सध्या स्वार्थी लिबरल लेबल लावलेले तथाकथीत विचारवंत फॅसिस्ट आहेत असे माझे म्हणणे आहे. ते गेले दिड वर्षे अक्षरशः कांगावखोरपणा करत थयथयाट करत आहेत. नजिकच्या भूतकाळातली फासिस्टपणाची काही उदाहरणे खालील प्रमाणे:
#३ "शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं " दहा वर्षे अक्षरशः गरळ ओकली, तरी देखील मोदी सरकार आले आहे. मी काही मोदी भक्त नाही. पण अत्यंत खोटे आरोप करत त्यांना जे काही "मौत का सौदागर" म्हणत केले गेले त्यामुळे सोनीया गांधी पासून ते अमर्त सेन यांच्यापर्यंत (मधे अरुंधती रॉय, बरखा दत्त, वगैरे आलेच) यांनी तुम्ही वर लिहीलेल्या, #३ "शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं " मुद्दा वापरला आणि देशाचे अक्षरशः वैचारीक विभाजन करत वाट लावायचा प्रयत्न केला. खरं म्हणाल तर आत्ता देखील फासिस्ट वगैरे चर्चा करत कुठलाही अभ्यास न करता एकांगीपणे आपण देखील असेच करत नाही आहोत ना, असा प्रामाणिकपणे विचार करायला हवा असे वाटते.
याच काळात तिव्र लिंगभेद (#५) झाला ज्यामुळे स्त्रीयांचे प्रमाण कमी झाले. आता बेटी बचाव - बेटी पढाव योजना आणि त्याही पेक्षा महत्वाचे काही धोरणात्मक बदल घडवले जात आहेत ज्याचा परीणाम या लिंगभेद प्रश्नावर सकारत्मरित्या होईल.
#६ माध्यमांवर दबाव आता सरकारचा येत नसून दोन्ही कडून समर्थक अथवा विचारांचा येतो. याचे क्लासिक उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामीला सध्या वाईट ठरवले जात आहे त्यात पहाता येईल.
आता #४ मधे म्हणलेल्या मिलिटरी बजेट बद्दल. वर्ल्ड बँकेप्रमाणे २०११ साली ते जिडीपीच्या २.६% इतके होते तर २००१४ साली ते २.४% इतके झाले आहे. विकीप्रमाणे ते २००९ मधे २.९% होते तर २०१४ मधे २.६% इतके आहे. म्हणजे ते देखील काही आत्ता वाढलेले नाही.
आता #१० कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं या बद्दल बोलायचे तर, शेतकर्यांचा वीमा वाढवला आहे आणि शेतीक्षेत्रात अधिक सुरक्षा आणण्यात आली आहे. कामगार काय, मधे धंदेच नव्हते. म्हणून तर मेक इन इंडीया करत मोदी सगळीकडे मार्केटींगचा माणूस असल्यासारखे फिरले. तरी देखील लिबरल्स त्यांना तुच्छच लेखत बसले. उद्या धंदे वाढले की जातील युनियनबाजी करायला...
#१३ भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी आधी किती होती आणि आता किती आहे असे वाटते? अर्थातच जर-तर मधे उत्तर देऊ नका. जे दिसते ते सांगा. नसलेले असणे सांगणे म्हणजे माया... आणि मायावाद बुध्दीवाद्यांना मान्य नसतो. युपिएच्या काळात $५०५ बिलियन्स हे केवळ शेवटच्या १-२ वर्षात अनधिकृतपणे भारतातून बाहेर गेले आहेत. म्हणून सुप्रिम कोर्टाच्या चौकशी समितीने अधिक माहिती गोळा करायला सांगितली आहे...
#१४ भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - त्या झाल्या आहेत असे जर सिद्ध झाले तर मग दिल्ली, बिहार मधे सत्तांतर होईल. आणि जर लोकसभेच्या निवडणुका खोट्या होत्या असे म्हणायचे असेल त्या निवडणुका आमलात आणताना सत्तेत असलेल्या काँग्रेसला भ्रष्टाचार आणि खोटे पणा जमत नाही असे म्हणावे लागेल. पण असे वाटणे खोटेच ठरेल! ;)
#१५ विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - आता यातील विचारवंतांची व्याख्या करणे खरेच अवघड आहे. पण आधीच्या सरकारच्या राजाश्रयाखाली निवांत राहून विचार करणारे म्हणजे विचारवंत आणि त्यांनाच काय ते सगळे समजते असे म्हणायचे असेल तर काय सगळे संपलेच! :( उदा. आता मुंबई आय आय टी मधील विचारवंतांना जे एन यु मधे सरकार चुक वाटले तर मद्रास आय आय टी तील विचारवंतांना विद्यार्थ्यांचे वर्तन चुक वाटले. मग नक्की विचारवंत कोण? बरं आता कलावंताच्या बाबतीतच बोलायचे तर तो आमिर काय वाट्टेल ते बरळला. त्याचे काँट्रॅक्ट संपल्यावर केंद्राने नवीन कलाकारांना घेतले त्यात काय चूक. बरं ज्या पक्षाचे राज्य आहे त्यांनी आमिरला आता कोणी घेत नाही हे पाहील्यावर उदार होऊन महाराष्ट्रात कामाला घेतलेच. आता असे कधी आधी झाले होते का?
#९ मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - अहो कोणी कुणाला बळकट करत नसतं. स्वत:च्या कामाने लोकं / कंपन्या बळकट होतात. ते सगळे तुम्हाला - आम्हाला आवडणार नाही (मला देखील खरेच मान्य नाही). पण मला सांगा सत्यम सारखे ज्यांना मुडदूस झालेला आहे त्यांना खोट बाळसे देऊन बळकट करणे झाले आहे का? आता आधीचे सरकार निव्वळ एनजीओंचे ते देखील डाव्या विचारसरणीच्या एनजिओंचे हात बळकट करायचे परीणामी देशातली कामे होत नव्हती, नक्षलता वाढत होती. आता उलट चालू आहे. नक्षलवाद्यांना खोगिरभरती करता येत नाही आहे. सरकार शरणार्थींना सामान्य जीवनात परत येण्यासाठी आर्थिक मदत करत आहे, जमिनीचा तुकडा पण काम-शेती करण्यासाठी देत आहे. (आणि हे मोदी विरोधकांनी लिहीलेले आहे) आता याचा अर्थ काय मोठ्या कंपन्यांचे हातच बळकट होत आहेत. आणि हो ते स्टार्टअप इंडीया विसरलोच की!
#१२ गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - अफझल गुरूची फाशी चोरीचोरी चुपके चुपके अमलात आणली ती युपिए मधील काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी. त्याचे दफन कुठे झाले ते देखील माहीत नाही... त्याउलट मेमनची फाशी आमलात आणली ती जाहीर करून, नातेवाईकांना कळवून, अगदी मध्यरात्रीनंतर कोर्टसुनावणी होऊन (भले ते कोर्टाने स्वतंत्रपणे केले असले तरी) आणि त्याचे पार्थिव जनतेमधे आणून सार्वजनिक कब्रस्तानात दफनास परवानगी देऊन...आता कोर्टाने सर्व विचार करून दिलेल्या रेअरेस्ट ऑफ दी रेअर शिक्षा (पक्षी: फाशी) देणे बरोबर का चूक हा मुद्दा वेगळा आहे. पण त्यांनी केलेले गुन्हे काही कमी नव्हते. त्यातही गंमत म्हणजे निर्भया प्रकरणात बलात्कार्यांना फाशी द्या म्हणणारे लिबरल्स अफझलच्या बाबतीत मात्र गळे काढताना दिसले आहेत.
#८ धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - अच्छा म्हणूनच मोदी सरकार आल्या आल्या, साध्वी प्रग्या झालं काय अथवा आसाराम बापूंसारखे झाले काय तात्काळ मुक्त झाले! बाकी इंदिराजींच्या काळातले धिरेंद्र ब्रम्हचारी आणि नंतर तमाम सर्वपक्षिय नेते जात असलेले सत्यश्री साईबाबा आठवतात का? म्हणजे ते देखील आत्ता चाललेले आहे असे वाटत नाही.
#२ मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - अहो ते मोदी पण मानवच आहेत आणि सगळे संघस्वयंसेवक देखील पण त्यांच्याबद्दल तुच्छता दाखवली गेली ती कुणाच्या काळात? आणि कोणी दाखवली? केवळ सत्ताधार्यांनी? किंबहूना हे विचारवंत समजणार्यांनी जास्त विष पेरले आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते... आत्ता तर केरळ मधे आई-वडीलांसमोर एका तरूण संघस्वयंसेवकाला जीवे मारले. नंतर त्याच लोकांनी तिथल्या संघकार्यालयाची नासधूस केली... तसे म्हणाल तर मोदी सरकारने तिकडे राष्ट्रपती राजवटच आणायला हवी होती नाही का? ते काही झाले नाही. आणि तिथल्या कम्युनिस्ट सरकारने देखील काही कारवाई केली नाही. इतकेच नव्हे तर गळचेपी होत नसलेल्या प्रसिद्धी माध्यमांनीपण यावर आवाज उठवला नाही की असहीष्णुता म्हणत राजाश्रीत विचारवंताने पुरस्कार परत केला नाही...
#१ राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - आपण एक काम करा. ज्या देशात आत्ता रहात आहोत त्या देशाबद्दल वाट्टेल त्या घोषणा करा म्हणजे देश के तुकडे तुकडे वगैरे) आणि त्याचा व्हिडीओ काढून युट्युबवर टाका - विचारस्वातंत्र्य म्हणून. करायला तयार आहात? उत्तर मिळाले तर आभारी राहीन.
असो.
25 Feb 2016 - 10:55 am | हुप्प्या
डाव्या नथीतून तीर मारायचा प्रयत्न उत्तम प्रकारे हाणून पाडला आहे.
तरी मला अशी भीती वाटते आहे की ज्या खर्या खोट्या कारणांचा वापर करुन प्रस्थापित डावे, डाव्या विचारांची माध्यमे ज्या प्रकारे रान उठवत आहेत ते पाहून असे वाटते की मोदी पुन्हा निवडून येणे शक्य वाटत नाही. बिहारनंतर उत्तरोत्तर घसरण चालूच रहाणार असे वाटते. (देव करो आणि तसे न होवो!).
भारताने जे विचारस्वातंत्र्य दिले आहे ते वापरुन त्या स्वातंत्र्यदात्या देशाचे वाटोळे व्हावे असे विचार उघडपणे मांडणे कितपत मान्य केले जावे हा एक प्रश्नच आहे.
संभावितपणाचा आव आणून फॅसिजम हे भाजपालाच कसे तंतोतंत लागू पडते हे दाखवायचा प्रयत्न आपण तोंडघशी पाडलात ह्याबद्दल आभार.
25 Feb 2016 - 11:49 am | गॅरी ट्रुमन
सहमत आहे. विकासरावांचा प्रतिसाद अगदी प्रचंड आवडला आहे.
काल हा लेख वाचला तेव्हाच सुरवातीला फॅसिझमविरूध्द असलेली गाडी शेवटी भारतात सध्याचे मोदी सरकार कसे फॅसिस्ट आहे यावर घसरणार हे कळलेच होते.गरज होती ती गाडी तिथे गेल्यावर ताबडतोब योग्य मुद्द्यांनी ठोकून काढायची. विकासरावांनी ती गरज अगदी १०००% पूर्ण केली आहे.
25 Feb 2016 - 11:13 am | अनुप ढेरे
मुद्दा क्र ६ वर तर खांग्रेस सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड रोचक आहे.
६६ए त्यांनीच आणलं. चेपू, ट्विटरवर बंदी आणायचा प्रयत्न केला.
२जी, कोळसा वगैरे घोटाळ्यांमध्ये उद्योगपतींचे हात कोणी बळकट केले हे देखील उघड आहे.
नरेगामुळे शेतमजूर मिळत नाहीत. किंवा काय्च्या काय मजुरी मागतात असं ऐकलं आहे. म शेतकर्याचं खच्चीकरण कोणी केलं?
25 Feb 2016 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
सद्या "विचारवंत = कांगावाखोर" हे समिकरण ठरावे इतका धडधडीत आचार-विचार-प्रचार चालला आहे. इतका की, जनतेला डोकेच नसते हा या लोकांचा ठाम विश्वास आहे हे पटावे !
२०१४ च्या निवडणूकीनंतर सुरुवातीला भाजपाशी संलग्न असलेल्या/असावेत अश्या काही लोकांनी उच्छाद मांडून "असे लोक असले तर भाजपा शत्रूंची गरज नाही" असे वाटायला लावले होते.
नंतर, भाजपविरोधकांनी स्वार्थी हितसंबंधासाठी ते कोणत्याही टोकाला जावू शकतात, अगदी देशविघातक बोलण्या-करण्याला पाठिंबा देऊ शकतात, याचे उघड प्रदर्शन करून भाजपाला मदत करायला सुरुवात केली आहे.
भविष्यात दिसेलच, जनतेला किती डोके आहे की नाही ते !
25 Feb 2016 - 2:14 pm | मोदक
भाजपविरोधकांनी स्वार्थी हितसंबंधासाठी ते कोणत्याही टोकाला जावू शकतात, अगदी देशविघातक बोलण्या-करण्याला पाठिंबा देऊ शकतात, याचे उघड प्रदर्शन करून भाजपाला मदत करायला सुरुवात केली आहे.चांगले आहे.. बुरखे टराटरा फाटत आहेत. अजेंडा समोर येत आहे.
25 Feb 2016 - 3:41 pm | मृत्युन्जय
धन्यावाद. कष्ट वाचवलेत.
असेही व्यक्तीस्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, माध्यमांची गळचेपी यांच्याबद्दल बोलणारे इंदिरा गांधींना "आयर्न लेडी" वगैरे म्हणतात तेव्हा गंमत वाटते (हे गुर्जींसाठी नव्हते. हे जनरल स्टेटमेंट होते)
25 Feb 2016 - 1:54 pm | मोदक
नंतर माझी मतंही खोलवर मांडली. माझी या विषयात थोडं वाचन असलेल्या सामान्य माणसाइतकीच गती आहे हे मानलं.ही परस्परविरोधी वाक्ये वाटत आहेत. एखादा प्रतिसाद तिकडून इकडे चिकटवायला विसरला आहात का? नसल्यास मला कृपया लिंक द्या.
धन्यवाद.
24 Feb 2016 - 10:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय हे विकाससाहेब ? इतका शिरेस संवाद चालला होता त्याला सुरुंग लावताय ? कुठे फेडाल ही राजकारणात शास्त्रिय उत्खनन करण्याची पापं ? ;) =))
24 Feb 2016 - 11:38 pm | बोका-ए-आझम
हे पटत नाही. कोणताही माणूस स्वतःची मतं अशी बनवत नाही. तो आधी मत बनवतो आणि मग त्याच्यासमोर आलेल्या माहितीनुसार process आणि interpret करतो. आणि हे फक्त लेखकाबद्दलच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाबद्दल खरं आहे. इतका objective विचार करणं अशक्य आहे. त्यामुळे कृपया इतका साळसूदपणा करु नये असं म्हणावंसं वाटतं. आपण एखाद्या गोष्टीबद्दल मत बनवताना सर्वात आधी आपल्या मनात ती गोष्ट visualize करतो आणि मग सर्व आजूबाजूची माहिती त्या मताप्रमाणे process आणि interpret करतो.
हा लेख तुम्हाला निवडावासा वाटणं, त्याचा अनुवाद करावासा वाटणं आणि तो इथे या संस्थळावर टाकावा असं वाटणं या सगळ्यामागे तुम्ही आधीच बनवलेलं मत आहे आणि with that prejudice, तुम्ही तुम्हाला जाणवलेली निरीक्षणं इथे दिलेली आहेत. आणि त्यात काही चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण फक्त ती वाचन आणि श्रवण यातून तयार झालेली आहेत असं म्हणू नका कारण ते खोटं आहे. तुमची मतं आधीच बनली आणि मग तुम्ही त्या दृष्टीने तुमची निरीक्षणं केली त्यामुळे
हे शक्यच नाही. मुळात ती व्यक्ती अभ्यासू आहे की नाही हे तुमच्या मतावर ठरणार असल्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटलं तरच तुमचं मत बदलाल.
25 Feb 2016 - 12:52 am | मोदक
सर्व प्रतिसादाशी सहमत.
25 Feb 2016 - 1:08 am | तर्राट जोकर
शब्दाशब्दाशी सहमत. म्हणजे इथे व्यक्त होणारा प्रत्येक सदस्य आपले मत आधीच बनवतो त्यानंतर त्याला पोषक, सहाय्यभूत ठरतील अशीच माहिती मिळवतो, त्याला आवडेल तसेच इंटर्प्रेट करतो असे मानायला हरकत नाही. म्हणजे भाजप, संघ ह्यांच्या बाजूने बोलणार्या सदस्यांनाही हे तुमचं विवेचन लागु होत असेल ना?
25 Feb 2016 - 6:18 am | बोका-ए-आझम
असा शब्दप्रयोग केलाय माझ्या प्रतिसादात. त्यामुळे अर्थातच हो. त्यामुळे भाजपच्या किंवा काँग्रेसच्या - दोघांच्याही पाठीराख्यांना ते लागू पडतं आणि त्यात काहीही चुकीचं नाही. उलट आपली विचारपद्धती यापेक्षा वेगळ्या प्रकारे चालते असं मानणं हा खोटेपणा अाहे.
25 Feb 2016 - 6:48 am | तर्राट जोकर
म्हणजे ह्यापेक्षा तिसरा प्रकार असूच शकत नाही असे काही असते का?
उदा. मला काँग्रेसचं दहा वर्षांतलं वर्तन आवडलं नाही. लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेसविरूद्ध विकासाच्या, प्रगतीच्या मुद्द्यावर मोदींचा-भाजपचा प्रचार केला, मोदी निवडून आले, मला खुप आनंद झाला. आनंदातिरेकात मी भाजपची मेंबरशीप घेऊन टाकली. पण दोन वर्षात मला प्रॉमिस केले गेलेले रिजल्ट दिसत नाहीत. त्या ऐवजी भलतंच पुढे येतंय. दोन्ही बाजूंनी बातम्या असतात. पण मी आता भाजपने आपल्याला फसवलं असं मानतो. आता मी भाजप सरकारविरूद्ध बोलतो. एक जनता म्हणून मी काय आहे? मी कोणाचाच पाठिराखा नाही की कोणाचा विरोधकही नाही. मग मी असे विचार का बदलत असेल? 'चेंजिग गोल्पोस्ट' ह्या अवस्थेचे विश्लेषण काय?
25 Feb 2016 - 2:15 pm | बोका-ए-आझम
मी म्हणालोय - तुमचं मत तुम्ही स्वतःच बदलू शकता. दुसरं कोणीही नाही. ते फार फार तर उत्प्रेरक (Catalyst) म्हणून काम करु शकतात पण असं कोणीही कोणाचंही मत बदलू शकत नाही. प्रत्येकजण स्वतःचं मत स्वतःच बदलतो आणि मग प्रसंगानुरूप स्पष्टीकरण देतो की याने बदललं किंवा त्याने बदललं.They are at the most only catalysts, nothing else.
25 Feb 2016 - 2:52 pm | तर्राट जोकर
ठिक आहे. विचार करतो, बाकीची चर्चा खफवर करतो.
25 Feb 2016 - 4:08 pm | बोका-ए-आझम
मी म्हणालोय - तुमचं मत तुम्ही स्वतःच बदलू शकता. दुसरं कोणीही नाही. ते फार फार तर उत्प्रेरक (Catalyst) म्हणून काम करु शकतात पण असं कोणीही कोणाचंही मत बदलू शकत नाही. प्रत्येकजण स्वतःचं मत स्वतःच बदलतो आणि मग प्रसंगानुरूप स्पष्टीकरण देतो की याने बदललं किंवा त्याने बदललं.They are at the most only catalysts, nothing else.
25 Feb 2016 - 6:18 am | बोका-ए-आझम
असा शब्दप्रयोग केलाय माझ्या प्रतिसादात. त्यामुळे अर्थातच हो. त्यामुळे भाजपच्या किंवा काँग्रेसच्या - दोघांच्याही पाठीराख्यांना ते लागू पडतं आणि त्यात काहीही चुकीचं नाही. उलट आपली विचारपद्धती यापेक्षा वेगळ्या प्रकारे चालते असं मानणं हा खोटेपणा अाहे.
25 Feb 2016 - 7:44 am | निनाद मुक्काम प...
तुमचा अर्णव आमचा रविश हा सध्याच्या प्रसार माध्यमांच्या परिस्थिती व वर्तनावर वर उत्कृष्ट लेख
मी मराठी वर
‘तुमचा रविशकुमार, तर आमचा अर्णब’
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही कारवाया आणि त्याप्रकरणी कन्हैय्याकुमारला राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली केलेली अटक यांच्यामुळे पत्रकारितेचे विश्वही अंतःर्बाह्य ढवळून निघाले आहे. आतापर्यंत व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्पर्धा करणारया वृत्तवाहिन्या वैचारिक मुद्द्यांवरून परस्परांसमोर उभी ठाकल्याचा समरप्रसंग उभा राहिला आहे. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, रविशकुमार, सागरिका घोष यांच्याविरुद्ध अर्णब गोस्वामी, सुधीर चौधरी, दीपक चौरासिया... हिंदू- मुस्लिम यांच्यासारख्याच ध्रुवीकरणाची लागण पत्रकारितेला झाली आहे. एवढी विखारी वैचारिक तेढ पत्रकारितेत कधी अनुभवाला आलेली नाही......
.......................................
नॅशनल ब्राॅडकाॅस्टिंग असोसिएशन (एनबीए) ही वृत्तवाहिन्यांची मुख्य संघटना आहे. या संघटनेची कर्तीधर्ती पत्रकार मंडळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना निवेदन द्यायला गेली होती. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टामध्ये वकिलांनी पत्रकारांना केलेल्या मारहाणप्रकरणी वकिलांवर आणि बघ्याची भूमिका घेणारया पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ही ज्येष्ठ, प्रसिद्ध पत्रकार मंडळी ‘एनबीए’च्या छत्राखाली एकत्र आली होती. पण ते नावापुरतेच आणि दिखाव्यापुरतेच एकत्र होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) देशविरोधी घोषणा, त्यानंतर विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष कन्हैय्याकुमारला वादग्रस्त राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेली अटक आणि त्याचे आक्रमक वार्तांकन करताना सर्वच चॅनेल्सनी घेतलेल्या परस्परविरोधी टोकांच्या धारदार भूमिकांनी त्यांच्यामध्ये जवळपास उभी फूटच पडली आहे. त्याचे पडसाद राजनाथसिंहांच्यासमोरच उमटले. दोन बड्या चॅनेल्सच्या दोन बड्या महिला पत्रकारांची (दोघीही आपापल्या चॅनेल्समध्ये क्रमांक दोनवर आहेत) राजनाथांच्यासमोरच बाचाबाची सुरू झाली. त्या दोघीही एकमेकांच्या चॅनेल्सच्या भडक, आक्रमक आणि एकांगी वार्तांकनास दूषणे देत होत्या. त्यांच्यातील तू तू मैं मैंने सार्वजनिक सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. अखेरीस दोघींना शांत करण्यासाठी राजनाथांना मध्यस्थी करावी लागली.
पत्रकारांतील भांडणे ही काही नवी नाहीत किंवा त्यांना बातमी मूल्यही नसते. पत्रकारांतील भांडणांचे, गटबाजींचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. एकाच कार्यालयात असूनही परस्परांचे तोंडही न पाहणारी अनेक मंडळी आहेत. पण ही भांडणे प्रामुख्याने व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्पर्धेवरून झाली आहेत. पण सध्या देशाच्या राजधानीतील कथित राष्ट्रीय माध्यमांमध्ये वैचारिक मुद्द्यांवरून थेट दुफळी पडली आहे, उभी फूट पडली आहे. असे कदाचित प्रथमच घडत असावे. टीव्ही स्टुडिओत, रात्रीच्या ‘प्राइम टाइम’वरील चर्चेत आणि एकूणच वार्तांकनात या दुफळीचे प्रतिबिंब स्पष्ट पडले आहे. वातावरण एवढे गढूळ झाले आहे, की पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यामध्ये तर काही पत्रकारांच्या, विशेषतः ‘टाइम्स नाऊ’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या नावाने जाहीरपणे खडे फोडले गेले आणि ते फोडण्यात एकेकाळची त्यांची सहकारी आणि आताची स्पर्धक (अर्थात ‘टाइम्स नाऊ’चा टीआरपी ‘एनडीटीव्ही’च्या कितीतरी पट आहे) बरखा दत्त अग्रेसर होती. त्याचे कारण म्हणजे गोस्वामी मोर्च्यात सहभागी झाले नव्हते. आतापर्यंत पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा गोस्वामी आक्रमकपणे मांडत; पण यावेळी त्यांनी पतियाळा हाऊसमधील पत्रकारांच्या मारहाणीला फारसे महत्व दिले नाही आणि नंतर मोर्च्यातही सहभागी झाले नाहीत. त्यामुळे ते लक्ष्य बनले. शेवटी गोस्वामींचे सहकारी असलेल्या एका पत्रकाराला ट्विट करून खुलासा करावा लागला, की वडिलांवर अचानक हृदयशस्त्रक्रिया करावी लागल्याने ते सहभागी होऊ शकले नाहीत. तरीदेखील गोस्वामींच्याविरोधात पत्रकारांच्या एका गटाचा राग कमी झाला नाही. मुक्त स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी काढलेल्या त्या मोर्च्यातील काही मंडळी गोस्वामी यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करीत होती!
पत्रकारांच्या या गटामध्ये गोस्वामींच्याव्यतिरिक्त, सुधीर चौधरी (झी न्यूज), राहुल शिवशंकर (न्यूज एक्स), दीपक चौरासिया (इंडिया न्यूज), रजत शर्मा (इंडिया टीव्ही) यांच्याविरुद्धही आग धुमसती आहे. ‘जेएनयू’चे खरे वातावरण पेटले ते ‘झी न्यूज’वरील क्लिप्सनी. नंतर हाच मुद्दा गोस्वामींनी आक्रमकपणे उचलला. मग त्यानंतर राहुल शिवशंकर, रजत शर्मा, दीपक चौरासिया आदींच्या आक्रमक वार्तांकनांनी आग भडकत गेली. तोपर्यंत एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, सीएनएन आयबीएन आदी चॅनेल्स गप्प होती. पण कन्हैय्याकुमारविरूद्ध राजद्रोहाचा गुन्हा लावल्यानंतर या तीन चॅनेल्सनी दुसरे टोक गाठले. राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध करण्यासाठी या तीन चॅनेल्सनेही आक्रमक वार्तांकन चालू केले. त्यातच पतियाळा कोर्टातील घटनेने या चॅनेल्सने आयतेच कोलित दिले.
कन्हैय्या देशविरोधी असल्यावर चॅनेल्सच्या पहिल्या गटाने (झी न्यूज, टाइम्स नाऊ, न्यूज एक्स, इंडिया न्यूज) शिक्कामोर्तब केलेच होते. तसेच फरार उमर खलीद हा 9 फेब्रुवारीच्या वादग्रस्त घटनेचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचे घोषित केले होते. तर चॅनेल्सचा दुसरा गट कन्हैय्या हा देशद्रोही नसल्याचे सिद्ध करण्याच्या मागे लागला होता. उमर खलिदला मास्टरमाइंड मानण्यास तो तयार नाही. या सगळ्या प्रक्रियेत एका गटाने प्रतिष्ठित जेएनयूला कायमचे बदनाम केले आणि दुसरयांनी जेएनयू कॅम्पसवरील काही घातक घटकांचे उदात्तीकरण केले! त्यातच ‘इंडिया न्यूज’च्या दीपक चौरासियांनी दाखविलेली कन्हैय्याची क्लिप बनावट असल्याचे ‘आजतक’/ ‘इंडिया टुडे’नी भर स्टुडिओत ‘सिद्ध’ केले आणि संबंधित पत्रकारांना अटक करण्याची मागणीही केली. त्यावरूनही बरेच पाणी वाहून गेले.
कोर्ट प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच चॅनेल्सचे दोन्ही गट अंतिम निकाल सुनावत आहेत. ‘मीडिया ट्रायल्स’ यापूर्वीही झाल्या आहेत; पण एवढ्या विखारीपद्धतीने खचितच झाल्या असतील! आपापल्या स्टुडिओंमधून, आपापल्या वार्तांकनामधून अन्य चॅनेल्सना दूषणे देण्याचा, त्यातील पत्रकारांवर व्यक्तिगत हल्ले करण्याचा प्रकार देश प्रथमच अनुभवत असेल. चॅनेल्स एवढ्या खालच्या पातळीवर उतरतील, असे कोणालाही वाटले नसेल. राजकीय नेत्यांना सदा ना कदा सार्वजनिक सभ्यतेच्या मर्यादांचे धडे शिकविणारी ही मंडळी त्याच लक्ष्मणरेषा धडधडीतपणे पायदळी तुडवित होती.
वृत्तवाहिन्यांतील वैचारिक संघर्षाचे हे लोण मुद्रित माध्यमे आणि न्यूज पोर्टलपर्यंतही पोचले. कोलकात्याच्या ‘टेलिग्राफ’ने तर उघड उघड नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध संघर्षाचा पुकारा केला आहे. त्याची अनेक कारणे येथील राजकीय वर्तुळात सांगितली जातात. ‘इंडियन एक्स्प्रेस’ नेहमीच ‘अँटी इस्टाब्लिशमेंट’ असते; पण यावेळी त्यास अतिकडव्या वैचारिक विरोधाचा वास अधिक येतो आहे. ‘हिंदू’ हे वृत्तपत्र नेहमीच उजव्यांविरुद्ध राहिलेले आहे. अन्य वर्तमानपत्रे तुलनेने कोणाच्याही बाजूने उघडउघड झुकलेली दिसत नाहीत. त्यांचा साधारणतः कल मवाळ आणि दोन्ही गटांना सामावून घेण्याकडे दिसतो आहे. ‘फर्स्ट पोस्ट’, ‘द क्विंट’, ‘द वायर’, ‘द प्रिंट’ ही न्यूज पोर्टल्स सरकारविरोधात तर ‘स्वराज’सारखा अपवाद उजव्या बाजू प्रामुख्याने मांडताना दिसत आहे.
सोशल मीडियावर तर ही वैचारिक उभी फूट अधिक ओंगळवाण्या, बीभत्स पद्धतीने पुढे येत आहे. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, रविशकुमार, अभिसार शर्मा, सिद्धार्थ वरदराजन, संकर्षण ठाकूर, सैकत दत्ता, रोहिणी सिंह, स्वाती चतुर्वेदी, भूपेंद्र चौबे आदींचे ट्विट्स पाहिले तर त्यांच्यातील अस्वस्थतेची, रागाची आणि द्वेषाचीही कल्पना येऊ शकते. ही सारी मंडळी मोदींविरुद्ध, केंद्राविरुद्ध आणि एकूणच संघ परिवाराविरुद्ध सातत्याने लिहित असतात. अनेकवेळा त्यात फक्त विरोधासाठी विऱोध असतो. राजदीप सरदेसाई लिहितात, “मी अभिमानी हिंदू आणि देशविरोधी आहे!” सिद्धार्थ वरदराजन थेट हल्ला चढवितात, पत्रकारांचा एक गट भ्रष्ट आणि कुजलेला आहे. सागरिका घोष या पत्रकारितेच्या धडे शिकवितात, तर बरखा दत्त थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली कळकळ (विरोधी कंपूच्या मते, मळमळ) व्यक्त करतात. या चौघांमध्ये एक धागा आहे : गुजरातची 2002ची दंगल. मोदींविरुद्ध वातावरणात पेटविण्यात हे चौघे सर्वांत आघाडीवर होते, याकडे भाजपचे नेते लक्ष वेधतात. त्यामुळे या सर्वांविरुद्ध तितक्याच त्वेषाने “भक्त” मंडळी तुटून पडतात. अनेकवेळेला अतिशय अश्लील, हिणकस शेरेबाजी (‘प्रेस्टिट्यूट’, ‘बाजारू’, ‘अँटी नॅशनल’) त्यांच्याविरुद्ध केली जाते. ‘एनडीटीव्ही’ हे ‘भक्तां’च्या रागाचे नेहमीच शिकार होते. ‘शटअप एनडीटीव्ही’ हा हॅशटॅग नेहमीच ट्विटरवर येत असतो. हवालाप्रकरणी ‘एनडीटीव्ही’ची चौकशी चालू आहेच. त्याचे पुढे काय होते, याचे अनेकांना कुतुहल आहे. याउलट उजवी बाजू मांडणारया मंडळींची संख्या तशी अगदीच बोटावर मोजता येणारी आहे.
सुप्रीम कोर्टावर काढलेला मोर्चा हा पत्रकारांमधील वैचारिक दुफळीचा उत्तम निदर्शक होता. त्यात सहभागी झालेली बहुतेक मंडळी कडव्या डाव्या विचारांची किंवा स्वतःला उदारमतवादी म्हणविणारी होती. उजव्या विचारसरणीचा शिक्का बसलेली मंडळी जवळपास नव्हतीच. भाजपला विरोध केल्यास पुरोगामीपणाचे, उदारमतवादीपणाचे प्रमाणपत्र सहज मिळते, अशी अवस्था पूर्वीपासून आहेत. आता तर ती अधिक धारदार झाली आहे. राजधानीतील पत्रकारितेवर डाव्या, उदारमतवादी विचारसरणीचा दाट प्रभाव आहे. सामावून घेण्याच्या काँग्रेस संस्कृतीमध्ये या मंडळींचे वैचारिक पालनपोषण झालेले आहे. त्यांच्या वर्चस्वाला, प्रभावाला संख्येने वाढत चाललेल्या आणि उघडपणे समोर येत असलेल्या उजव्या विचारसरणीच्या पत्रकारांकडून धक्के बसू लागले आहेत. त्यातून वैचारिक तेढ वाढू लागली आहे. आतापर्यंत विशिष्ट्य नेत्यांभोवती कंपू असत. उदाहरणार्थ, अरूण जेटलींचा स्वतःचा एक कळप आहे. आता असल्या कंपूंचेही अतिवेगाने वैचारिक ध्रुवीकरण होत आहे. ‘भाजपविरोधी’ आणि ‘संघी’ असे थेट आणि उघडउघड शिक्के मारले जाऊ लागले आहेत. शिवाय स्वतः मोदी यांच्या मनात विशिष्ट पत्रकारांविरुद्ध टोकाची घृणा आहे. ती ते अजिबात लपवित नाहीत. पत्रकारांपासून चार हात लांबच राहण्याची मंत्र्यांना सक्त ताकीद आहे. सरकारी पातळीवरील मिळणारे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ, ‘डायरेक्ट अॅक्सेस’मुळे मिळणारी रसद आता जवळपास बंदच झाली आहे. पत्रकारांच्या परकीय दौरयांवर काटच मारलेली आहे. असल्या प्रतिकूल राजवटीची अनेकांना सवय नाही. या सर्व अंतःप्रवाहांचे राजधानीतील माध्यम व्यवहारांमध्ये स्पष्ट आणि टोकदार प्रतिबिंब पडत आहे. कोणत्या कळपातील पत्रकाराशी तुम्ही बोलत आहात, त्यानुसार, “दिल्ली काय म्हणते?”, या प्रश्नाचे उत्तर मिळेल! हिंदू – मुस्लिमांसारख्या टोकाच्या ध्रुवीकरणाची लागण पत्रकारितेलाही झाली आहे.
Opinions are free; but Facts are Sacred हे पत्रकारितेचे मूलभूत तत्व आहे. म्हणजे मतेमतांतरे असू शकतात; पण वस्तुस्थिती मांडणे हे पत्रकारितेचे परमकर्तव्य असते. त्याचबरोबर निःष्पक्षपातीपणा आणि निर्भिडपणा ही पत्रकारितेची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. या तीन मुख्य तत्वांना तडे जाण्याची प्रक्रिया फार पूर्वीपासूनच सुरू झालेली आहे. ‘जेएनयू’च्या निमित्ताने तर त्यावर प्रहार होऊ लागले आहेत. वस्तुस्थिती मांडण्याऐवजी पूर्वग्रहांवर आधारलेल्या मतांना ठळक महत्व दिले जाऊ लागले आहे. कोर्टाने निकाल देण्याआधीच एखाद्याला ‘देशद्रोही’ किंवा ‘देशप्रेमी’ ठरविण्याची स्पर्धा लागली आहे. या सगळ्या घटनांनी पत्रकारितेचे अवकाशच धूसर झाले आहे. अशा संक्रमण काळात ज्यांनी मार्ग दाखवायचा असतो, तीच राष्ट्रीय माध्यमे एकमेकांची उणीधुणी काढीत आहेत.
या सगळ्या वैचारिक द्वंद्वांतून पत्रकारितेला काही चांगले अमृत मिळू शकेल काय?
अपेक्षाभंग होण्याचीच दाट शक्यता आहे
रशिया व चीन बद्दल बोलायलाच नको +पण खुद अमेरिकेत दहशतवादी उच्चटन करण्यासाठी जो राष्ट्रभक्त कायदा आहे तोच मुळी इतका कडक आहे व त्यातही राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची की व्यक्तीचे नागरी अधिकार ह्यावर लेख उत्तम आला आहे
भारताला उपदेश करणाऱ्या जगातील सर्वात प्रबळ राष्ट्रात निदान लोक तरी ह्या कायद्याविर्रूढ रस्त्यावर आले नाही
आता ह्या कायद्यात अनेक निरपराध म्हणजे मुस्लिम उगाच अडकले अशी आवई इत्ते त्यात काही प्रमाणत तथ्य आहे
कुर्बान शिनेमा आठवा तरीही व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यात अग्रेसर अमेरिकन नागरिक अजून तरी ह्या कायद्याविरुद्ध रस्त्यावर आला नाही
म्हणूनच तेथे दुसरा हल्ला झाला नाही
आपले पंचतारांकीत नगरीत स्वागत आहे
25 Feb 2016 - 1:18 pm | मृत्युन्जय
उत्कृष्ट प्रतिसाद.
25 Feb 2016 - 6:59 pm | सुबोध खरे
बहुसंख्य तथाकथित विचारवंत पत्रकार कोणत्या मातीचे बनलेले आहेत ते मी (नौदलात असताना) फार पूर्वी जवळून पाहिलेले आहेत. स्कॉच पाजली तर भारतीय नौदल अमेरिकन किंवा रशियन नौदलापेक्षा दसपट सरस आहे असे बेदिक्कत पणे लिहितील अशी यांची स्थिती होती. दारू प्यायल्यावर आपसातील लाथाळ्या मी कितीतरी वेळेस पाहिलेल्या आहेत. यात मोठ्या मोठ्या वृत्त समूहाचे बडे पत्रकार होते. आणि एखाद्याला अशी "दारू" पाजली नाही तर भारतीय नौदल पाकिस्तानच काय पण फिजी च्या नौदलापेक्षा भिकार आहे असे लिहिण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते हेही पाहिले होते.( यात पक्षीय राजकारणाचा संबंध नाही हे लक्षात घ्या).
त्यामुळे "पत्रकार" या जमातीबद्दल माझे मत अजिबात चांगले नाही. (तसे हि माझ्या मताला "कुत्र" सुद्धा विचारत नाही हे अलाहिदा).
यामुळेच मोदी साहेबांनी यांचा "रमणा" बंद केल्या मुळे हे पिसाळले आहेत यात शंका नाही. परंतु कोणत्यातरी राजकारण्याने यांना कुंपणाबाहेरच ठेवून त्यांची लायकी दाखवून द्यायला हवी होती हि माझी फार वर्षापासूनची इच्छा मोदी साहेब आल्यावर पूर्ण झाली याचे मला समाधान आहे. त्यावर मोदी साहेबानी "तुमच्या" वाचून माझे काहीही अडत नाही हे दाखवून दिल्यामुळे त्यांची फारच पंचाईत झाली आहे.
असो
26 Feb 2016 - 11:37 pm | अभ्या..
सध्या त्यांंच्यासाठी "ताटली बाटली" हा शब्दप्रयोग वापरतात.
टीपः हा शब्दप्रयोग जुना/ऐकला असल्यास मी गावठी/मागासलेला आहे.
25 Feb 2016 - 10:14 am | प्रसाद१९७१
संघ आणि मोदी द्वेषाचा अजेंडा घेउन पाडलेला लेख.
दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय.
25 Feb 2016 - 1:09 pm | मोदक
किती दुर्लक्ष करणार? विशिष्ट चष्मा घातलेल्या प्रवृत्ती दोन्हीकडून बोलतात आणि ठासून खोटे बोलतात.
दुर्लक्ष केले तर "पहा यांच्याकडे युक्तीवाद नाही" आणि प्रतिवाद केला तर मुद्दे नसल्याने "मुस्कटदाबी होते, असहिष्णुता, धर्माचे ठेकेदार" वगैरे मुद्दे निघतात.
25 Feb 2016 - 1:30 pm | नाना स्कॉच
मुळात लेखकाने भारतीय घटना एकदा सवड़ काढून वाचावी असे सुचवतो! उत्तम पुस्तक आहे ते कोणीही सहजच उठून जय फासीजम म्हणू शकणार नाही भारतात. बाई ने तर बेचाळीस नंबर घटना दुरुस्ती म्हणजे पार मिनीकॉन्स्टिट्यूशन आणले होतेच पण जय जनता जनार्दन अन जय संविधान लगेच चौरेचाळीस नंबर दुरुस्ती आली अन कोर्स करेक्शन झाले!
25 Feb 2016 - 2:17 pm | बॅटमॅन
असा सगळा प्रकार झाला तर, फार वाईट झाले
25 Feb 2016 - 2:36 pm | कपिलमुनी
घासुगुर्जींना कॉर्नर करून जुने स्कोर सेटल करण्यात येत आहेत असे निरिक्षण नोंदवतो
25 Feb 2016 - 3:00 pm | नाना स्कॉच
मिपा वर कंपुशाही काय नवी नाही, आम्ही गरीब आयडी वाचनमात्र होतो तेव्हापासुन पाहतोय हे सगळे! असो. ह्याच निमित्ताने विचार मांडायची भीती वाटते इकडे. आमचे आम्ही स्वतःच आहोत न पक्ष घ्यायला कोणी न तळी उचलायला कोणी, शिवाय काही काही आयडी आहेत जे विचारप्रवर्तक चर्चा अन वादविवाद हे मुद्द्यावर ठेवण्यापेक्षा जो व्यक्ति विरोधी मते मांडतो तोच कसा बेअक्कल राष्ट्रद्रोही फुरोगामी सिक्युलर (अन असलीच शेलकी विशेषणे) वगैरे आहेत हे तारस्वरात कोकलत असतात.
वाली नसलेल्या आमच्या सारख्या आयडी ने गप हात पाय गुंडाळून बसणेच उत्तम मिपावर.
असो.
25 Feb 2016 - 5:32 pm | बोका-ए-आझम
तर असू दे पण गंभीरपणे लिहिलं असेल तर एकच सांगू इच्छितो - जो कुणी तुमच्या वाटेला जाईल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्याचा त्यांना जास्त राग येतो.
25 Feb 2016 - 5:47 pm | नाना स्कॉच
____/\_____
हा सल्ला लक्षात ठेवेन , आम्ही तसेही वझ्याचे बैल आहोत साहेब , परप्रकाशीत का काय म्हणतात तसे ज्ञानकण वेचण्यापुरते येतो इकडे , स्वतः आम्ही अकरा ते पाचवाली कारकुंडी काय लिहिणार ! न वाचन न व्यासंग, साहित्य रसिक म्हणजे रोजचा पेपर चोथा करुन वाचणे अन रद्दी भक्तिभावे गोळा करणे हेच आमचे काम :( तोच पेपर वाचुन काही मते तयार होतात , ती मांडायची गुस्ताखी करावी का नाही इतकाच प्रश्न असतो :)
पण तुमच्यासरखी माणसे विचारती होतात काही सल्ले आस्थेने देतात म्हणून वाचनमात्रचा मेंबरशिप घेता झालो
पुनश्च आभार :)
25 Feb 2016 - 3:03 pm | नाव आडनाव
+१
25 Feb 2016 - 3:37 pm | मोदक
असहमत.
25 Feb 2016 - 4:43 pm | मृत्युन्जय
माफ करा पण इथे असहमती दर्शवतो. विरोधी प्रतिसाद म्हटल्यावर तो लगेच स्कोर सेटलिंग होतो का? हीच का तुमची सहिष्णुता?
असो. विरोधी प्रतिसाद देणार्यात मी पण एक आहे म्हणुन सांगतओ. घासुगुर्जीं बरोबर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रश्नच येत नाही. माझे त्यांच्याबरोबर काहिच भांडण नाही. आजवर एकदाही आमची वादावादी झालेली नाही. आम्ही दोघांनाही एकमेकांचे जे लेख आवडले तिथे पसंतीचे अभिप्राय दिलेले आहेत. गुर्जींच्या विश्वाचे आर्त वर तर मी त्यांना व्यानित जाउन जाउन शंका विचारल्या (आणी धाग्यावर विचारायचे मुद्दाम टाळतो आहे हे देखील सांगितले). मला त्या लेखमालेतल्या कुठल्या गोष्टी पटतात आणि कुठल्या नाहे ते देखील स्पष्टपणे सांगितले/. अर्थात न पटण्यामागे माझे अज्ञान देखील असु शकते हे देखील कबूल केले. त्यांच्या ज्ञानाचा मला आदर आहे. पण त्यामुळे त्यांच्या मताशी मी नेहमीच सहमत होइल असे नाही.
हा प्रतिसाद देण्यामागचे कारण म्हणजे एखाद दुसरा प्रतिसादक स्कोर सेटलिंग करत असेलही. पण बहुसंख्य लोकांचे गुर्जींशी काही वाकडे नाही / नसावे. त्यामुळे माझ्यासारखे इतरही बरेच जेन्युइन विरोधक आहेत / असावेत.
25 Feb 2016 - 9:14 pm | निनाद मुक्काम प...
हो गुर्जी ह्यांची विश्वाचे आर्त आपण वाचतो बुआ
प्रतिसाद देत नाही कारण विषय नवा उगाच आपल्याला काहीतरी कळले आहे म्हणून उगाच खरडणे जमत नाय पण नवीन विषय त्यात त्यांना उत्कृष्ट गती आहे त्याचा सविनय आदर आहे.
25 Feb 2016 - 8:26 pm | गवि
सुदैवाने मी राघांना कितीही वाईट प्रतिसाद दिला तरी त्यामागे वाईट प्रतिसादाच्या पलीकडले काही किल्मिष नाही हे त्यांना सांगावं लागत नाही यातच मजा आहे. काही खवचटपणा केला त्यांच्याशी तरी पुन्हा पुढच्यावेळी पुस्तक चॉकलेटे वगैरे आणतातच.. :-)
25 Feb 2016 - 11:36 pm | राही
जितका वाईट प्रतिसाद तितकी अधिक चॉकलेटे अशी काही मांडवली असते का?
25 Feb 2016 - 5:31 pm | निनाद मुक्काम प...
जुने स्कोर सेटल ......
हे पहा जगात काय चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करून भारतात फक्त काय चालले ह्यावर बोंबा मारायच्या त्यासाठी असे नथीतून तीर मारायचे प्रकार आजकाल ग्लोबल काळात तेथी सोशल मिडीयाच्या काळात खपवून घेतले जात नाही
भारतात रोहित चे दलित असणे उमर व कनैह्या चे विद्यार्थी असणे ह्यावर जेव्हा भर देऊन ही प्रकरण मोदींच्या विरोधक राजकीय शस्त्र म्हणून वापरायला जातात तेव्हा त्यांची फटफजिती होते.
सर्व मुस्लिमांना अमेरिकेतून चालते व्हा असे म्हणणाऱ्या ट्रम ला आज अमेरिकेत पाठिंबा मिळत आहे
दहशतवादाला उत्तेजन देणाऱ्या इमान ला तत्काळ इटली मधून हाकलले जाते.
कांगारूंच्या देशात एका विद्यार्थिनीला राहत्या घरातून दहशतवादाच्या गुन्ह्या अंतर्गत पकडले जात तेव्हा तिचे वय विद्यार्थी असणे ह्यावरून विरोधक सरकारची गचांडी पकडायला जात नाही ,दहशतवादाच्या ह्या युद्धात सर्व राजकीय पक्ष समान भूमिका घेतात ,
डाव्यांच्या फाशीला विरोध आणि चीन मध्ये दरवर्षी रेकोर्ड ब्रेक दिल्या जाण्या फाशीच्या शिक्षा हा मोठा विरोधाभास आहे.
आपल्याकडे दळभद्री विचारवंत जगात काय चालले आहे ह्याची खबरबात इतरांना जशी सोशल मिडिया ची क्रांती होई पर्यंत माहिती नव्हती तेव्हा आपली वैचारिक जळजळ समाजात ओकत होते आता ते अशक्यप्राय झाले आहे.
खुद युरोपात युके ला इयु मधून बाहेर पडायचे आहे त्यामागील प्रमुख कारण इंग्लंड चा राष्ट्रवाद स्वताचे अस्तित्व व जर्मन लोकांचे आधिपत्य नाकारणे ही आहेत.
फ्रीडम ऑफ स्पीच वर मर्यादा हवी का ह्यावर जगभरात चर्चा झाडतात एवढेच कशाला जगातील सर्वात जुन्या लोकशाहीत अनेक विख्यात विद्यापीठात ह्या भाषा स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत.
अनेक विख्यात विद्यापीठात ह्या भाषा स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत.
आपल्याकडील काही विचार्जंत हे भारतात फक्त मोदी सरकारच्या येण्याने झाले आहे व होणार आहे अशी बालिश बडबड करतात. जगभरात एखादा ट्रेंड येतो व तो जगभर प्रस्थापित होतो तेव्हा असे का होत आहेह्याकडे लक्ष दिले पाहिजे आता ह्या लेखानुसार इंग्लड सुध्दा फेसी स्ट समजायचा का
जेव्हा शशी थरूर सारखा विचारवंत भाषा स्वातंत्र्यावर बंधने ह्यावर थोबाड पुस्तकात गळे काढतो तेव्हा माझ्या सारखा सामान्य वाचक त्याला त्याच्या चार्ली हेब्रो च्या वेळी फ्री स्पीच विथ ,..... अश्या टीवटीव ची आठवण करून देऊन
त्याच्या सोयीनुसार विचार बदल्याच्या वृत्तीची जाणीव करून देतो अश्या विसंगती शोधून त्यांच्यातील विरोधाभास फोटो शोप करून सोशल मीडियात येतात तेव्हा अनेक थोर विचारवंत बिथरतात त्याला इलाज नाही.
विद्यार्थ्यांच्या फ्रीडम ऑफ स्पीच वर भाष्य करणारा हा लेख पहा
25 Feb 2016 - 5:38 pm | होबासराव
.
25 Feb 2016 - 6:39 pm | राजेश घासकडवी
पुढची चर्चाही वाचली. यात मूळ विषयाशी संबंध नसलेला 'प्रत्येक माणसाचं मत ठरलेलं असतं. ते बदलत वगैरे नाही.' असा विचार आलेला दिसला. मला तो पूर्णपणे पटत नाही. हे टोकाला नेलं तर प्रत्येक माणूस आपले विचार घेऊनच जन्माला येतो असा अर्थ निघेल. अर्थातच इतका टोकाचा युक्तिवाद त्यातून अपेक्षित नसावा. मला त्याचा लागलेला अर्थ असा की वय पुरेसं वाढल्यानंतर मतं घट्ट होतात, आणि ती सहज बदलत नाहीत. हे बऱ्याच प्रमाणात खरं आहे. मात्र ते त्रिकालाबाधित सत्य नाही. अनेक लोकांचं मतपरिवर्तन - म्हणजे एकशेऐशी डिग्रीमध्ये बदल या अर्थाने नाही - तर दिशेमध्ये, विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला पाहिला आहे.
मूळ लेखकाच्या क्वालिफिकेशन्सवर शंका घेणं, घासकडवींच्या हेतूवर शंका घेणं, नंतर या लेखावर टीका करणारांच्या हेतूवर शंका घेणं - हे सगळंच अॅड होमिनिम आणि म्हणून त्याज्य आहे.
नंतर 'माहिती नसलेल्या विषयावर कुठल्यातरी उपटसुंभाचा लेख भाषांतरित करणं आवडलं नाही' हेही एक मत म्हणून बाळगायला हरकत नाही, पण प्रत्येकच लेखकाने आपला ज्यात १०० टक्के अभ्यास आहे अशाच विषयावर लेख लिहिणं शक्य नाही. वेगवेगळ्या विषयांबाबतीत आपला अधिकार वेगवेगळा असतो. त्यामुळे खात्रीलायक किंवा कमी खात्रीची विधानं करता येतात.
उदाहरणार्थ 'उंचावरून चेंडू खाली सोडला तर तो एका सेकंदात ४.९ मीटर खाली जाईल' या विधानाबद्दल मला प्रचंड खात्री आहे. ते तसं का, आणि काही वेळा ३ मीटर काहीवेळा ६ मीटर का जात नाही याबद्दल मी वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या आधारे चर्चा ठामपणे करू शकेन. पण 'फॅसिझमची ही ही लक्षणं आहेत' यासारख्या समाजशास्त्रीय सत्यांबद्दल मी केवळ मांडणी करून चर्चा करायचं आवाहन करू शकतो. यातून मला इतरांकडून काही शिकायला मिळेल आणि चर्चेतून सर्वांनाच काही शिकायला मिळेल अशी आशा असते. ती आशाही गैरच कारण कोणी काही विचार बदलत नाहीच, आणि केवळ हमरीतुमरी करण्याची खुमखुमी जिरावी म्हणून चर्चा करतात आणि वाचतात हे मला मान्य नाही.
असो. या सर्व चर्चेला अवांतर मुद्द्यांबाबतची माझी ही मतं आहेत. त्यामुळे या सर्व अवांतर/अॅड होमिनिम विषयांवर आणखीन काही लिहू इच्छित नाही.
25 Feb 2016 - 7:11 pm | मोदक
लेखाखालच्या पहिल्या प्रतिसादातला तुमचा आवेश किंवा वाक्यरचना चुकली आहे असे तुम्हाला वाटत आहे का?
26 Feb 2016 - 11:03 am | बाळ सप्रे
खरतर फॅसिझम, लोकशाही, साम्यवाद या पातळीवर लेखन असेल तर त्यात चूक बरोबर असं ठरवता येणं कठीण असतं असतो तो प्रत्येकाचा दृष्टीकोन. आणि तसही कुठलिही राजवट पूर्णपणे फॅसिस्ट अथवा लोकशाही असू शकत नाही. there is nothing black or white. It's always shade of grey.. म्हणून मला व्यक्तिशः सरकारवर टीका अथवा सरकारचे कौतुक करण्यासाठी कुठलेही मुद्दे गोळा करण्याऐवजी मुद्द्यावर टीका अथवा भलामण करणे योग्य वाटते.
26 Feb 2016 - 3:09 pm | मोदक
खरतर फॅसिझम, लोकशाही, साम्यवाद या पातळीवर लेखन असेल तर त्यात चूक बरोबर असं ठरवता येणं कठीण असतंमुळात जर तरच्या गोष्टी कशासाठी करायच्या? आणि फॅसीझम, लोकशाही, साम्यवादासंदर्भात लेखन करायचे असेल तर थोडे तरी विश्वासू संदर्भ असावेत.
येथे लेख लिहिला आहे, आवेशपूर्ण प्रतिसाद दिला आहे आणि मतप्रदर्शन केले आहे. मग जर तर असे कशला? आहे ते आहे.
असतो तो प्रत्येकाचा दृष्टीकोन.हेही मान्य. दृष्टीकोन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक रहावे. "राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीची झेप मला थक्क करते आणि मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे. या धाग्यावर अनेक ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे ताकाला जावून भांडे लपवणे वगैरे प्रकार कशाला? (तसेच या दृष्टीकोनावर कोणी योग्य मुद्द्यांसह बुद्धीवादी(?) प्रतिवाद केला तर असहिष्णुतेची कोल्हेकुई करायला कारणही मिळेल.)
आणि तसही कुठलिही राजवट पूर्णपणे फॅसिस्ट अथवा लोकशाही असू शकत नाही. there is nothing black or white. It's always shade of grey..सहमत.
म्हणून मला व्यक्तिशः सरकारवर टीका अथवा सरकारचे कौतुक करण्यासाठी कुठलेही मुद्दे गोळा करण्याऐवजी मुद्द्यावर टीका अथवा भलामण करणे योग्य वाटते.सहमत.
मात्र हा सर्व प्रकार करताना निदान स्वत:शी आणि स्वत:च्या उद्देशाशी प्रामाणिक असणे आणि निघालेले निष्कर्ष मान्य करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
26 Feb 2016 - 3:31 pm | प्रसाद१९७१
मोदक राव - झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येते का हो?
आणि झोपेचे सोंग घेण्याच्या बदल्यात काही मिळत असेल तर कोण जागे होइल.
26 Feb 2016 - 5:05 pm | गॅरी ट्रुमन
जबरदस्त. खतरनाक. जबराट. पूर्ण पटले विशेषतः ताकाला जावून भांडे लपवणे हा प्रकार.
मोदकराव पूर्ण फॉर्ममध्ये आहेत सध्या :)
26 Feb 2016 - 6:23 pm | प्रसाद१९७१
अहो त्यांना ताकाला जाऊन भांडे लपवावे लागतेच.
कारण हे लोक कधी पल्टी मारतील सांगता येत नाही. आणि कधी पल्टी मारुन मोदी भक्त होयची वेळ आली ( जी येइल च ५ वर्षात )तर आत्ता स्पष्ट आरोप करुन कसे चालेल?
26 Feb 2016 - 5:47 pm | मूकवाचक
+१
29 Feb 2016 - 2:56 pm | बाळ सप्रे
मोदींवर अथवा सरकारवर एखाद्या अथवा अनेक मुद्द्यांवर टीका झाली म्हणजे त्याला मोदी आवडत नाहीत असे सरसकट दृष्टीकोन ठेवायची गरज नाही. टीका करणार्या सर्वांनाच सरकार पाडायचेच आहे अशी भिती बाळगून अति डिफेन्सिव होण्याचीही गरज नाही. चुका सर्वांकडून होतात. छोट्यामोठ्या चुका स्वीकार करून पुढे जाणे एवढे केले तरी पुरेसे आहे. भाजप अन मोदींना इतका मोठा विजय मिळवून देउनही विरोधी पक्षांवर टीका करणे आणि त्यांच्या गेल्या ६०-७० वर्षांच्या कारकीर्दीतली मढी उकरत रहाणे यातच धन्यता मानत रहाणे हे कुठेतरी खटकतं.
एका ठीकणी फेसबुकवर वाचलेली एक ओळ खूप मार्मिक आहे.. रागा आणी सोनिया यांची काँग्रेसला जेवढी गरज नाही त्यापेक्षा भाजपला जास्त गरज भासतेय. They are low hanging fruits.
इतक्या टीकेनंतरही मी असेच म्हणेन की सध्यातरी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप हाच सर्वात सक्षम राजकीय पर्याय आहे.
पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही.
29 Feb 2016 - 3:03 pm | तर्राट जोकर
प्रतिसाद आवडला. आपले मत पटले.
29 Feb 2016 - 5:07 pm | मोदक
मी इतकेच म्हणत आहे की "तुमचा जो काही दृष्टीकोन आहे त्याच्याशी प्रामाणिक रहावे"
आपण मारे एखादे तज्ञ असल्याचा आव आणून एखादे मत व्यक्त करायचे आणि कोणत्या आधारावर मत मांडले हे विचारले की माझा अभ्यास नाही, त्यातले कळत नाही वगैरे लिहायचे. हे कशाला? मत व्यक्त करण्याचे कळते तर ते सिद्ध करण्याचे कळत नाही का? मोदी सरकारच्या नावाने खडेच फोडायचे आहेत तर थोडा निष्पक्ष अभ्यास करावा, प्रमाणित माहिती मिळवावी आणि योग्य व सत्य पुराव्यांसह लेख लिहून जी काय आहे ती बाजू मांडावी.
(तितके अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्कीच आहे, आणि हवे ते लिहिलेले प्रसिद्ध करण्याचीही सहिष्णुताही आहेच आहे!)
निष्पक्षपातीपणाचा खोटा आव कशासाठी..? ("ताकाला जावून भांडे लपवणे" वगैरे वगैरे)
वरचे तुम्ही लिहिलेले वाक्य हे मी फक्त उदाहरणादाखल दिले होते. त्यामुळे त्या वाक्यावर तुम्ही मांडलेले मुद्दे खरे असतीलही पण ते माझ्या प्रतिसादाला अनुसरून आहेत असे मला वाटत नाही. त्यामुळे त्यावर पास.
पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही.टीका पॉझीटिव्हली घेण्याबाबत कसे असते.. हिंदू धर्म, भारत देश यांच्यावर टिका करण्यासाठी फारशी पात्रता लागत नाही आणि तसेही हिंदू लोक्स संघटित उपद्रवमूल्य बाळगून नाहीत. त्यामुळे इतके दिवस "मी म्हणते तोच मौत का सौदागर" आणि "मी म्हणतो तोच हिंदू कम्युनल" अशी परिस्थिती होती. आता अशा अन्याय्यपणे होणार्या टिकेला थोडेफार प्रत्युत्तर* मिळाले की असहिष्णुता, विचारांची गळचेपी, हुकुमशाही वगैरे कोल्हेकुई सुरू होते.
..आणि उदो उदोचा प्रश्न सगळीकडेच अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे त्यामध्ये काहीही नवीन नाही.
सध्या परिस्थिती अशी आहे की..
ऐतवडे बुद्रुकमध्ये एखादा माजी उपसरपंच काही बोलला की ते विधान भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीकडून आल्यासारखे न्यूज चॅनल दिवसरात्र दाखवत बसतात आणि त्यावर विश्वास ठेवून तथाकथीत विद्वान विचारवंत संस्थळांवरती मतप्रदर्शन करतात.
*प्रत्युत्तर न्याय्य आहे की नाही ते त्या त्या घटनेवर अवलंबून आहे. "मोदींवर टीका करणार्यांनी पाकिस्तानात जावा", "राम मानत नाही म्हणजे हराम" हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निषेधार्हच.
29 Feb 2016 - 6:56 pm | बाळ सप्रे
तो कायमच "मला मोदी आवडत नाही" असा नसतो.
तर तो "या या गोष्टी चुकतायत" असा असू शकतो असा विचार करून बघा..
मग "मारे तज्ञ असल्याचा आव आणतोय" असं न वाटता काय चुकतय याकडे लक्ष जाण्याची शक्यता जास्त आहे. सगळं चुकतच असेल असं नाही, पण सगळं बरोबरच चालू आहे हा पवित्रा थोडा नक्की बदलेल.. आणि जे चुकतय ते मान्य करण्याची थोडीशी शक्यता निर्माण होइल.
सांगणार्याचा पुरेसा अभ्यास नसला तरी त्याचा मुद्दा खोडून काढता येइल. सांगणार्यालाच निकालात काढण्याने मुद्द्यावरून वैयक्तिक भांडणाचे रूप जास्त येते.
29 Feb 2016 - 7:00 pm | मोदक
अहो पण मुळात खोडून काढायला मुद्दे असायला नकोत का? आणि जे मुद्दे दिले आहेत ते इतके हास्यास्पद आहेत की त्यावर येथे आणि सर्वच ठिकाणी भरपूर चर्चा झाली आहे.
..असो आपल्यात गैरसमज होण्या आधी थांबतो. :)
25 Feb 2016 - 6:43 pm | तर्राट जोकर
मोदीस्तुती करणारे लेख लिहा. कोणीच किस पाडणार नाही.
25 Feb 2016 - 8:13 pm | sagarpdy
१००० च्या वर प्रतिसाद आलेले आहेत. कदाचित मोदी पंतप्रधान आहेत तोवर चालूच रहाणारे बहुधा.
25 Feb 2016 - 8:30 pm | तर्राट जोकर
तिकडे मोदीभक्त गिरे तो बी टांग उपर आवेशात असतात. डोन्ट टेल्मी. ;-)
25 Feb 2016 - 10:12 pm | गामा पैलवान
राजेश घासकडवी,
लेखाच्या शीर्षकात व्यवच्छेदक लक्षणांचा उल्लेख आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यास इंग्रजीत distinguishing characteristics म्हणतात. व्यवच्छेदक म्हणजे इतरांपासून वेगळेपण दर्शवणारी.
तुम्ही दुवा दिलेला मूळ लेख बघितल्यास लॉरेन्स ब्रिटला हा अर्थ अभिप्रेत नसावासं दिसतंय. तुम्हाला हा अर्थ अभिप्रेत आहे का? उत्तर हो असेल तर इतर राज्यव्यवस्थांची चर्चा देखील व्हायला हवी. जेणेकरून फ्यासिझम कसा वेगळा आहे ते ठळकपणे उठून दिसेल.
आ.न.,
-गा.पै.
25 Feb 2016 - 10:32 pm | राजेश घासकडवी
बरोबर. कदाचित व्यवच्छेदक लक्षणांऐवजी नुसतीच लक्षणं म्हणणं अधिक योग्य ठरलं असतं. किंवा प्रत्येक लक्षणाच्या शेवटी 'आदर्श लोकशाहीत हे होताना दिसत नाही किंवा कमी प्रमाणात होताना दिसतं.' असं अध्याहृत वाक्य वाचलं तरी ठीक होईल.
मला वाटतं मूळ लेखात एक त्रुटी आहे ती म्हणजे उजव्या एकाधिकारशाहीलाच फॅसिस्ट म्हटलं आहे, डाव्या एकाधिकारशाहीचा उल्लेख नाही, आणि लोकशाही अध्याहृत आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या सहा राजवटींत जे दिसतं ते इतर एकाधिकारशाही किंवा लोकशाही राजवटींत कसं दिसत नाही हे सांगण्यासाठी त्यांनी काही ओळी खर्च करायला हव्या होत्या. आणि त्यामुळेच वरच्या चर्चेत अनेकांनी स्टालिन, चीन वगैरे उदाहरणं देऊन तिथेही हेच कसं होतं हे दाखवलेलं आहे. हे सुयोग्य आहे.
माझ्या मनात डावी आणि उजवी एकाधिकारशाही यातले फरक महत्त्वाचे नाहीत. कारण पोथी कुठची आहे हे ठरलं की वागणूक बहुधा सारखीच असते - उडदामाजी थोडंसं काळंगोरं करण्याइतपतच फरक.
म्हणून मी लोकशाही आणि फॅसिस्ट प्रवृत्ती अशा दोन टोकांमध्ये तुलना करण्याचा प्रयत्न करतो. लोकशाहींमध्येही सरकारं यातले बरेच मार्ग वापरतात. मात्र किती जास्त प्रमाणात किती जास्त मार्ग वापरले जातात यावरून लोकशाही की फॅसिझम हे ठरत असावं.
25 Feb 2016 - 11:01 pm | गामा पैलवान
राजेश घासकडवी,
हे विधान महत्त्वाचं वाटलं :
>> मात्र किती जास्त प्रमाणात किती जास्त मार्ग वापरले जातात यावरून लोकशाही की फॅसिझम हे ठरत असावं.
जी दोन प्रमुख फ्यासिस्ट उदाहरणं आहेत त्यांत दोन्ही राज्यकर्ते (हिटलर आणि मुसोलिनी) लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले होते. त्यामुळे राज्यकर्त्याच्या वर्तनावरून लोकशाही कुठे संपली आणि फ्यासिझम कुठे सुरू झाला हे नेमकं ठरवणं अवघड आहे. किंबहुना लोकशाही हे फ्यासिस्ट हुकूमशहाचे केवळ सत्ताप्राप्तीचे साधन आहे. तुम्ही जी दोन टोकं म्हणता आहात त्यातलं दुसरं टोक लोकशाही नसून अराजक (वा निर्नायकी) आहे. असं आपलं माझं मत. निदान जर्मनी अन इटलीमध्ये तरी फ्यासिस्ट हुकूमशहा अराजकातूनच उत्पन्न झालेले आहेत.
आ.न.,
-गा.पै.
26 Feb 2016 - 12:05 am | बोका-ए-आझम
पण मुसोलिनी नाही. फॅसिस्ट पक्षाच्या ३०,००० स्वयंसेवकांनी रोमवर मोर्चा नेला आणि राजा व्हिक्टर इमॅन्युअल यांनी मार्शल लाॅ लागू करायला नकार दिला. त्याचा निषेध म्हणून पंतप्रधान लुइगी फॅक्टा यांनी राजीनामा दिला आणि तेव्हा राजाने या स्वयंसेवकांचा नेता बेनिटो मुसोलिनीला सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं आणि असा तो पंतप्रधान बनला आणि नंतर २ वर्षांनी त्याने फॅसिस्ट पक्षाची हुकूमशाही चालू केली.
26 Feb 2016 - 2:52 am | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
अगदी सुयोग्य निरीक्षण. माझं थोडं चुकलंच.
मुसोलिनी हा लोकशाही मार्गाने नसला तरी राजाची रीतसर परवानगी घेऊन सत्तेवर आलेला होता. अर्थात, राजाला वाटलं की तो सावळागोंधळ दूर करेल. मात्र प्रत्यक्षात साहेबांनी एकेकाला गुंडाळायला सुरुवात केली. या घडामोडींची पार्श्वभूमी निर्नायकीची आहे. वायमर जर्मनीतही असाच गोंधळ माजला होता जो हिटलरने दूर केला.
सांगायचा मुद्दा होता की जर्मनी व इटली इथल्या फ्यासिस्ट राजवटी दृढ होण्यास अगोदरच्या निर्नायकीचा बराच वाटा आहे.
आ.न.,
-गा.पै.