लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे.
१. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा.
२. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या.
३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा.
४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं.
५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं.
६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात.
७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला.
८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.
९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी.
१०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं.
११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला.
१२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती.
१३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली.
१४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले.
या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.
वर्गीकरण
वाचने
29134
प्रतिक्रिया
174
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही लक्शणे आज कुठेतरी हळुहळु दिसायाला लागलीयेत का हो ?
भारत देशाविषयी बोलताय का?
In reply to ही लक्शणे आज कुठेतरी हळुहळु दिसायाला लागलीयेत का हो ? by पगला गजोधर
मालक त्यांनी मोदी किंवा
In reply to भारत देशाविषयी बोलताय का? by काळा पहाड
जाऊ द्या हो नानाजी….
In reply to मालक त्यांनी मोदी किंवा by नाना स्कॉच
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची
In reply to जाऊ द्या हो नानाजी…. by पगला गजोधर
दाढीधारी पाठीवरची पिशवी
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by काळा पहाड
(No subject)
In reply to दाढीधारी पाठीवरची पिशवी by तर्राट जोकर
हा हा. माध्यमांनी तयार केलेली
In reply to (No subject) by मोदक
असेल ब्वा.. दहशतवादी मार्गाने
In reply to हा हा. माध्यमांनी तयार केलेली by तर्राट जोकर
आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by काळा पहाड
अजूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाहीये.
In reply to आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ by तर्राट जोकर
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची
In reply to अजूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाहीये. by बोका-ए-आझम
न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ न करणे?
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by तर्राट जोकर
कैच्याकाय अपेक्षा बोकोबा
In reply to न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ न करणे? by बोका-ए-आझम
संशयितांना कुठलेही आरोप
In reply to न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ न करणे? by बोका-ए-आझम
नाही.. त्यांच्यावर मोक्का
In reply to संशयितांना कुठलेही आरोप by तर्राट जोकर
सीबीआयने बहुधा मोक्का
In reply to नाही.. त्यांच्यावर मोक्का by आनन्दा
म्हनुन
In reply to संशयितांना कुठलेही आरोप by तर्राट जोकर
विमान अपहरण, खेळाडूंची हत्या,
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by तर्राट जोकर
In late October 2008, the ATS
In reply to आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ by तर्राट जोकर
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची
In reply to In late October 2008, the ATS by शब्दबम्बाळ
बरोबर..
In reply to भारत देशाविषयी बोलताय का? by काळा पहाड
९वा मुद्दा सोडला
कसं बोललात?
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
सहमत आहे
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
अतिशय योग्य व सत्य परीक्षण बोकोबा …
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
+१
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
एकदम नेमकं
छान अनुवाद!
फुटकळ लेख, शाळेतल्या मुलाने
अनुवाद जमलाय..
डाव्या
एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित
हा प्रतिसाद आहे का ट्रैप!! :D
In reply to एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित by मृत्युन्जय
असहमत.
In reply to एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित by मृत्युन्जय
____________/\_____________
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
सहमत
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
ओके, म्हणजे इंदिरा गांधींचे
In reply to सहमत by पगला गजोधर
आणीबाणी = हुकुमशाही
In reply to ओके, म्हणजे इंदिरा गांधींचे by मोदक
इंदिरा गांधी
In reply to ओके, म्हणजे इंदिरा गांधींचे by मोदक
बरोबर. इंदिरा गांधी व संजय
In reply to इंदिरा गांधी by बोका-ए-आझम
गुन्हेगारांना क्रूर शिक्षा
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत.बोकाजी.. तुम्हाला गुन्हेगार म्हणजे नक्की कोणता प्रकार अभिप्रेत आहे?तशी
In reply to गुन्हेगारांना क्रूर शिक्षा by मोदक
आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण
In reply to तशी by बोका-ए-आझम
आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत.(वादासाठी वाद म्हणून) १९८४ सालचे शीख हत्याकांड किंवा संजय गांधींनी राबवलेले कुटुंबनियोजनाचे अतिरेकी प्रकार किंवा मारूती उद्योगासाठी केलेली एकंदर दडपशाही ही सगळी लक्षणे फॅसिझमचीच होती असे म्हटले तरी चूक होईल का? तुमचा मुद्दा लक्षात आला, काँग्रेसची राजवट ही १००% फॅसिस्ट होती हे माझेही मत नाही आणि बहुदा मृत्युंजयचेही नसेल. या धाग्यामध्ये किंवा सर्वत्रच सध्या ज्या पद्धतीने देशात जाणीवपूर्वक असहिष्णुतेचा बागुलबुवा पसरवला जात आहे, विकले गेलेले पत्रकार "मुद्दा असेल/नसेल पण दोष सध्याच्या सरकारचाच" अशा पद्धतीने बुद्धीभेद करत आहेत, आधीचे काँग्रेसचे राज्य म्हणजे रामराज्य आणि आता हुकुमशाहीचा उगम झाला अशा पद्धतीचे प्रतिसाद येत आहेत त्याला वैतागून मीही मृत्युंजयसारखाच प्रतिसाद दिला असता हे ही खरेच.! बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..!शीख हत्याकांड किंवा
In reply to आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण by मोदक
सहमत. काही पक्षसमर्थकांचा
In reply to शीख हत्याकांड किंवा by बोका-ए-आझम
बोकाजी.. येथे वेळ
In reply to सहमत. काही पक्षसमर्थकांचा by तर्राट जोकर
बोकासाहेब निष्पक्ष लिहित आहेत
In reply to बोकाजी.. येथे वेळ by मोदक
न्हाई ब्वा.. आम्ही भक्त नाही.
In reply to बोकासाहेब निष्पक्ष लिहित आहेत by तर्राट जोकर
मोदक ह्यांच्या पुर्ण प्रतिसादाशी बाडिस
In reply to आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण by मोदक
पण १९७७ मध्ये काँग्रेसला
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
विदा द्या.. अन्यथा रिव्हर्स
In reply to एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित by मृत्युन्जय
विदा काय द्यायचा त्यात?
In reply to विदा द्या.. अन्यथा रिव्हर्स by मोदक
लक्षण क्र. २, ४, ७, १० व १२
धन्यवाद
मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी
लिहा कि
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
+१ नक्की लिहा.
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
लिहा लिहा!
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
कृपया लिहाच. अद्द्याला +१
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
दणकून अनुमोदन!
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
त्याआधी 'द ग्रेट गेम' अर्धवट
In reply to दणकून अनुमोदन! by बोका-ए-आझम
आणि अफगानिस्तान पण
In reply to त्याआधी 'द ग्रेट गेम' अर्धवट by एस
आत्तापर्यंतची चर्चा वाचली.
भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात.
In reply to आत्तापर्यंतची चर्चा वाचली. by राजेश घासकडवी
तीव्र असहमतीस तीव्र सहमती
In reply to भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. by अर्धवटराव
+१
In reply to भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. by अर्धवटराव
मात्र काही गोष्टी अधिक
मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.. एखादा तुलनात्मक विदायुक्त लेख.दुर्दैवाने माझा या बाबतीत
In reply to मात्र काही गोष्टी अधिक by मोदक
हिणवणं
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
दुर्दैवाने माझा या बाबतीत
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
दुर्दैवाने माझा या बाबतीत विदा देऊन मांडणी करण्याइतका, आणि त्यावर मुद्देसूद चर्चा करण्याइतका अनुभव, अभ्यास आणि अधिकार नाही.अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे. सर्वसाधारणपणे आपण एखादे मत मांडत असलो तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी मतासोबत येतेच अन्यथा ते 'मत' आणि एखाद्या फालतू ट्रोल आयडीने टाकलेली पिंक यात फरक तो काय? ..आणि मत बदलण्याची तयारी असेल तर ते अभ्यासपूर्ण शंका स्वरूपात प्रकट केले जाणे हा सर्वमान्य संकेत पाळावयास हरकत नव्हती. असो.. एखाद्या (खर्या) अभ्यासू व्यक्तीने तुम्हाला अपेक्षित आहे तसा एखादा लेख लिहून ज्याचे त्याचे मतपरिवर्तन करण्यापेक्षा २०१९ च्या निवडणुकांची वाट पाहणे श्रेयस्कर असावे. विचारवंतांच्या तथाकथीत वैचारिक लेखापेक्षा ती सर्वात मोठी परिक्षा असेल आणि निकालही अजेंडा न राबवणार्यांकडून (किंवा पूर्वग्रहदूषीत नसलेल्या विचारधारेतून) लावला जाईल. बाकी तुमची विधानांनी निराशाच केली. तुमच्या जालीय वावराच्या आणि इतर ठिकाणी मांडलेल्या मुद्द्यांच्या तुलनेत थोडे परिपक्व मुद्दे अपेक्षीत होते. TRP मिळवण्यासाठी मिथुन बी ग्रेड सिनेमातून सतत काम करत राहिला तसे काहीसे वाटले (ह.घ्या.). :)) एफटीआयआय प्रकरण, बीफबंदी, धार्मिक भावनांना हात घालणं, पाकिस्तानात चालते व्हा हे मुद्दे अजुनही असतील तर अवघड आहे.असो. ही माझी निरीक्षणं आहेत. समाजशास्त्राबाबत अगदी काळं-पांढरं, गणिताने सिद्ध करता येण्यासारखं काही नसतं. तरीही मला जे जाणवलं आहे त्याचं हे वर्णन आहे.तुमची निरीक्षणे वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला टोचणार्या घटना / प्रकरणाचा वरवरचा किरकोळ (निष्पक्ष!) अभ्यास आणि स्वत:च विशेष अजेंडा राबवणारे मिडीया चॅनल टाळले असते तरी निरीक्षणे बदलली असती. हे माझे निरीक्षण. पुढील अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. :)जबराट!!!
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
अनुभव, अभ्यास आणि अधिकार
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे.आजूबाजूला पाहिले तर यालाच हल्लीच्या भाषेत विचारवंतगिरी म्हणतात असेच दिसते ! अगोदर आपल्याला हवा असलेला निष्कर्श नक्की करून मग त्यासंबंधात असलेला-नसलेला-उत्पादित (मॅन्युफॅक्चर्ड) पुरावा जनतेच्या गळ्यात बांधणे, त्याच्या सत्यतेचा दावा सिद्ध करा म्हटले की "तू बावळट सामान्य आहेस, मी विचारवंत आहे, मी मला हवे तसे हवे तेव्हा बोलेन/लिहेन/वागेन, तो माझा विचारस्वातंत्र्याचा अधिकार आहे, ते बेजबाबदारपणाचे आणि सबळ पुराव्याशिवाय असले तरी त्याबद्दल जाब मागण्याचा तुला अधिकार नाही." असे आक्रस्ताळेपणाने म्हणणे अथवा दुसर्याच्या नावे सरळ हात झटकून मोकळे होणे हे विचारवंताचे लक्षण झाले आहे. भौतिकशास्त्र असो वा समाजशास्त्र असो, "सबळ पुराव्याशिवाय आणि / अथवा संदिग्ध मत तडक वा आडून देणे म्हणजे असत्याची भलावण करणे होते" हे शास्त्रिय मूलतत्व मागे पडत चालले आहे... शेवटी आपले मत/नेता/पक्ष/बाजू जिंकणे महत्वाचे, सत्याची ऐसी की तैसी ! =)) :( या सगळ्या पार्श्वभूमीवर "त्या बिचार्या गोबेल्स नीतिचा सतत निषेध का केला जातो बरे ?" असा विचार मनात येतो... पण वरवर एखाद्या गोष्टीचा निषेध करत तीच गोष्ट छुपेपणे करणे, हे गोबेल्स नीतिचे एक वैशिष्ठ्य आहे हे समजल्यावर या सगळ्या वेडेपणामागे एक अर्थ (मेथड इन मॅडनेस) आहे हे ध्यानात येते ! ;) :)शास्त्रिय विचार करणे अपेक्षित
In reply to अनुभव, अभ्यास आणि अधिकार by डॉ सुहास म्हात्रे
+१११११११११
In reply to शास्त्रिय विचार करणे अपेक्षित by पॉइंट ब्लँक
कोणालाही आम्ही अगोदर
In reply to शास्त्रिय विचार करणे अपेक्षित by पॉइंट ब्लँक
आमच्यातर्फे टाळ्या. उत्तम
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
मस्त प्रतिसाद !!
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
चला एकेका मुद्याचा विचार
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
जर्मनीकर, तुम्हाला हा प्रश्न
In reply to चला एकेका मुद्याचा विचार by निनाद मुक्काम …
मिपावर तुम्ही नवे आहात का
In reply to जर्मनीकर, तुम्हाला हा प्रश्न by तर्राट जोकर
अभिव्यक्ती पण स्वातंत्र्याला
In reply to मिपावर तुम्ही नवे आहात का by निनाद मुक्काम …
आमचे लिखाण वाचायला या असे
In reply to अभिव्यक्ती पण स्वातंत्र्याला by तर्राट जोकर
आमचं स्वातंत्र्य बोचलं का...
In reply to आमचे लिखाण वाचायला या असे by निनाद मुक्काम …
अहोपन्नीयमदुर्लक्षकेलेटरपरिस्
In reply to आमचं स्वातंत्र्य बोचलं का... by तर्राट जोकर
http://www.misalpav.com/comment/6608#comment-6608
In reply to आमचं स्वातंत्र्य बोचलं का... by तर्राट जोकर
बरसचासततच्मिथेइतेथितेलिहिलेल्
In reply to http://www.misalpav.com/comment/6608#comment-6608 by होबासराव
माफ करा स्पष्ट बोलतो. पण
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
सह्मत
In reply to माफ करा स्पष्ट बोलतो. पण by मृत्युन्जय
मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का?
मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का?
जेंव्हा अशी भाषांतरे केली जातात तेंव्हा ज्यांच्या लेखनाची ती केली जातात ते कुठेतरी प्रथितयश असतात असा माझा समज आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक माणूस माहीत असेलच असे काही नसते. तेंव्हा वरील "माहितीपूर्ण" लेख वाचत असताना आपल्याला हे ब्रिट साहेब माहीत नाहीत, म्हणजे आपले तोडकेमोडके ज्ञान देखील किती क्षुल्लक आहे असे वाटले. म्हणून मग प्रश्न पडला की हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण की ज्याचे वाक्य ब्रम्हवाक्य, सॉरी आयमीन टू से बुद्धीवादीवाक्य म्हणून घ्यावे? मी जनरल नॉलेजचा नसेन कदाचीत पण जंक नॉलेजचा नक्कीच भुकेला आहे. (हे असे एक खाद्य आहे, जे जंक असून देखील कॅलरीज वाढवत नाही!) आता अशावेळेस जे काही अतिसामान्य माणसे करतात तेच मी देखील केले... Laurence W. Britt असे म्हणले आणि गुगलले. काय आश्चर्य! या नावाची व्यक्ती म्हणून काहीच पुढे आले नाही. आला तो फक्त परत परत तोच लेख जो एकाने आधी कुठेतरी टाकला, मग दुसर्याने नवीन पत्त्याने आणि गाडी चालूच राहते... त्यातील काही दुव्यांवरून असे देखील समजले की, हा लॉरेन्स ब्रिट नुसताच नाही तर डॉ. लॉरेन्स ब्रिट आहे. त्यामुळे मी अजूनच दबलो की बापरे हे मोठ्ठे प्रस्थ दिसतयं! तरी देखील त्यात एक समजले की हा लेख मूळ Free Inquiry Magazine, Vol 22 no 2, [15 July 2003] येथे आला आहे. मग Free Inquiry Magazine गुगलले की मूळ लेख शोधावा... तर Free Inquiry - Council for Secular Humanism याचा दुवा मिळाला... गंमत म्हणजे आमच्या फायरफॉक्स ला कसला तरी वास आला आणि खालील वॉर्निंग मिळाली:अरे भाई, आखिर तुम कहना क्या
In reply to मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का? by विकास
योग्य-अयोग्यता
In reply to अरे भाई, आखिर तुम कहना क्या by राजेश घासकडवी
आवडले!
In reply to योग्य-अयोग्यता by विकास
सहमत आहे
In reply to आवडले! by हुप्प्या
मुद्दा क्र ६ वर तर खांग्रेस
In reply to योग्य-अयोग्यता by विकास
२जी, कोळसा वगैरे घोटाळ्यांमध्ये उद्योगपतींचे हात कोणी बळकट केले हे देखील उघड आहे.
नरेगामुळे शेतमजूर मिळत नाहीत. किंवा काय्च्या काय मजुरी मागतात असं ऐकलं आहे. म शेतकर्याचं खच्चीकरण कोणी केलं?
+१००
In reply to योग्य-अयोग्यता by विकास
भाजपविरोधकांनी स्वार्थी
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
भाजपविरोधकांनी स्वार्थी हितसंबंधासाठी ते कोणत्याही टोकाला जावू शकतात, अगदी देशविघातक बोलण्या-करण्याला पाठिंबा देऊ शकतात, याचे उघड प्रदर्शन करून भाजपाला मदत करायला सुरुवात केली आहे.चांगले आहे.. बुरखे टराटरा फाटत आहेत. अजेंडा समोर येत आहे.धन्यावाद. कष्ट वाचवलेत.
In reply to योग्य-अयोग्यता by विकास
नंतर माझी मतंही खोलवर मांडली.
In reply to अरे भाई, आखिर तुम कहना क्या by राजेश घासकडवी
नंतर माझी मतंही खोलवर मांडली. माझी या विषयात थोडं वाचन असलेल्या सामान्य माणसाइतकीच गती आहे हे मानलं.ही परस्परविरोधी वाक्ये वाटत आहेत. एखादा प्रतिसाद तिकडून इकडे चिकटवायला विसरला आहात का? नसल्यास मला कृपया लिंक द्या. धन्यवाद.काय हे विकाससाहेब ? इतका
In reply to मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का? by विकास
एक सर्वसामान्य वाचक, नागरिक
सर्व प्रतिसादाशी सहमत.
In reply to एक सर्वसामान्य वाचक, नागरिक by बोका-ए-आझम
शब्दाशब्दाशी सहमत. म्हणजे इथे
In reply to एक सर्वसामान्य वाचक, नागरिक by बोका-ए-आझम
मी जगातला प्रत्येक माणूस
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. म्हणजे इथे by तर्राट जोकर
म्हणजे ह्यापेक्षा तिसरा
In reply to मी जगातला प्रत्येक माणूस by बोका-ए-आझम
माझा प्रतिसाद वाचा तजो.
In reply to म्हणजे ह्यापेक्षा तिसरा by तर्राट जोकर
ठिक आहे. विचार करतो, बाकीची
In reply to माझा प्रतिसाद वाचा तजो. by बोका-ए-आझम
माझा प्रतिसाद वाचा तजो.
In reply to म्हणजे ह्यापेक्षा तिसरा by तर्राट जोकर
मी जगातला प्रत्येक माणूस
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. म्हणजे इथे by तर्राट जोकर
तुमचा अर्णव आमचा रविश हा
In reply to एक सर्वसामान्य वाचक, नागरिक by बोका-ए-आझम
उत्कृष्ट प्रतिसाद.
In reply to तुमचा अर्णव आमचा रविश हा by निनाद मुक्काम …
बहुसंख्य तथाकथित विचारवंत
In reply to तुमचा अर्णव आमचा रविश हा by निनाद मुक्काम …
सध्या त्यांंच्यासाठी "ताटली
In reply to बहुसंख्य तथाकथित विचारवंत by सुबोध खरे
संघ आणि मोदी द्वेषाचा अजेंडा
किती दुर्लक्ष करणार? विशिष्ट
In reply to संघ आणि मोदी द्वेषाचा अजेंडा by प्रसाद१९७१
मुळात लेखकाने भारतीय घटना
अरेरे
घासुगुर्जींना
मिपा वर कंपुशाही काय नवी नाही
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
हे जर तुम्ही विनोदाने आणि उपरोधाने लिहिले असेल
In reply to मिपा वर कंपुशाही काय नवी नाही by नाना स्कॉच
____/\_____
In reply to हे जर तुम्ही विनोदाने आणि उपरोधाने लिहिले असेल by बोका-ए-आझम
+१
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
असहमत.
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
माफ करा पण इथे असहमती दर्शवतो
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
हो गुर्जी ह्यांची विश्वाचे
In reply to माफ करा पण इथे असहमती दर्शवतो by मृत्युन्जय
सुदैवाने मी राघांना कितीही
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
मांडवली
In reply to सुदैवाने मी राघांना कितीही by गवि
जुने स्कोर सेटल ......
निनाद योग्य प्रतिसाद
काही अवांतर मुद्द्यांबद्दलचे विचार
लेखाखालच्या पहिल्या
In reply to काही अवांतर मुद्द्यांबद्दलचे विचार by राजेश घासकडवी
खरतर फॅसिझम, लोकशाही,
In reply to लेखाखालच्या पहिल्या by मोदक
खरतर फॅसिझम, लोकशाही,
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by बाळ सप्रे
खरतर फॅसिझम, लोकशाही, साम्यवाद या पातळीवर लेखन असेल तर त्यात चूक बरोबर असं ठरवता येणं कठीण असतंमुळात जर तरच्या गोष्टी कशासाठी करायच्या? आणि फॅसीझम, लोकशाही, साम्यवादासंदर्भात लेखन करायचे असेल तर थोडे तरी विश्वासू संदर्भ असावेत. येथे लेख लिहिला आहे, आवेशपूर्ण प्रतिसाद दिला आहे आणि मतप्रदर्शन केले आहे. मग जर तर असे कशला? आहे ते आहे.असतो तो प्रत्येकाचा दृष्टीकोन.हेही मान्य. दृष्टीकोन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक रहावे. "राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीची झेप मला थक्क करते आणि मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे. या धाग्यावर अनेक ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे ताकाला जावून भांडे लपवणे वगैरे प्रकार कशाला? (तसेच या दृष्टीकोनावर कोणी योग्य मुद्द्यांसह बुद्धीवादी(?) प्रतिवाद केला तर असहिष्णुतेची कोल्हेकुई करायला कारणही मिळेल.)आणि तसही कुठलिही राजवट पूर्णपणे फॅसिस्ट अथवा लोकशाही असू शकत नाही. there is nothing black or white. It's always shade of grey..सहमत.म्हणून मला व्यक्तिशः सरकारवर टीका अथवा सरकारचे कौतुक करण्यासाठी कुठलेही मुद्दे गोळा करण्याऐवजी मुद्द्यावर टीका अथवा भलामण करणे योग्य वाटते.सहमत. मात्र हा सर्व प्रकार करताना निदान स्वत:शी आणि स्वत:च्या उद्देशाशी प्रामाणिक असणे आणि निघालेले निष्कर्ष मान्य करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.मोदक राव - झोपेचे सोंग
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
परत एकदा प्रतिसाद आवडला
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
अहो त्यांना ताकाला जाऊन भांडे
In reply to परत एकदा प्रतिसाद आवडला by गॅरी ट्रुमन
प्रतिसाद आवडला
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
मला संघवाला मोदी आवडत नाही,
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
प्रतिसाद आवडला. आपले मत पटले.
In reply to मला संघवाला मोदी आवडत नाही, by बाळ सप्रे
मी इतकेच म्हणत आहे की "तुमचा
In reply to मला संघवाला मोदी आवडत नाही, by बाळ सप्रे
पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही.टीका पॉझीटिव्हली घेण्याबाबत कसे असते.. हिंदू धर्म, भारत देश यांच्यावर टिका करण्यासाठी फारशी पात्रता लागत नाही आणि तसेही हिंदू लोक्स संघटित उपद्रवमूल्य बाळगून नाहीत. त्यामुळे इतके दिवस "मी म्हणते तोच मौत का सौदागर" आणि "मी म्हणतो तोच हिंदू कम्युनल" अशी परिस्थिती होती. आता अशा अन्याय्यपणे होणार्या टिकेला थोडेफार प्रत्युत्तर* मिळाले की असहिष्णुता, विचारांची गळचेपी, हुकुमशाही वगैरे कोल्हेकुई सुरू होते. ..आणि उदो उदोचा प्रश्न सगळीकडेच अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे त्यामध्ये काहीही नवीन नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की.. ऐतवडे बुद्रुकमध्ये एखादा माजी उपसरपंच काही बोलला की ते विधान भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीकडून आल्यासारखे न्यूज चॅनल दिवसरात्र दाखवत बसतात आणि त्यावर विश्वास ठेवून तथाकथीत विद्वान विचारवंत संस्थळांवरती मतप्रदर्शन करतात. *प्रत्युत्तर न्याय्य आहे की नाही ते त्या त्या घटनेवर अवलंबून आहे. "मोदींवर टीका करणार्यांनी पाकिस्तानात जावा", "राम मानत नाही म्हणजे हराम" हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निषेधार्हच.तुमचा जो काही दृष्टीकोन आहे
In reply to मी इतकेच म्हणत आहे की "तुमचा by मोदक
अहो पण मुळात खोडून काढायला
In reply to तुमचा जो काही दृष्टीकोन आहे by बाळ सप्रे
मोदीस्तुती करणारे लेख लिहा.
१००० च्या वर प्रतिसाद आलेले
In reply to मोदीस्तुती करणारे लेख लिहा. by तर्राट जोकर
तिकडे मोदीभक्त गिरे तो बी
In reply to १००० च्या वर प्रतिसाद आलेले by sagarpdy
व्यवच्छेदक लक्षणं म्हणजे नक्की काय?
बरोबर. कदाचित व्यवच्छेदक
In reply to व्यवच्छेदक लक्षणं म्हणजे नक्की काय? by गामा पैलवान
लोकशाही आणि फ्यासिझम
In reply to बरोबर. कदाचित व्यवच्छेदक by राजेश घासकडवी
हिटलर लोकशाही मार्गाने सत्तेवर आला होता
In reply to लोकशाही आणि फ्यासिझम by गामा पैलवान
बरोबर
In reply to हिटलर लोकशाही मार्गाने सत्तेवर आला होता by बोका-ए-आझम