मोबाइलवर आता मराठी बंधनकारक

समीर शिन्दे's picture
समीर शिन्दे in तंत्रजगत
16 Feb 2016 - 7:18 pm

भारतात विकल्या जाणा-या मोबाइलमध्ये या पुढे इंग्रजीबरोबरच हिंदी आणि एका स्थानिक भाषेचा समावेश असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागातर्फे येत्या तीन महिन्यांंत याबाबत एक अधिनियम काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागातील एका उच्च पदस्थ अधिका-याने ही माहिती दिली.
देशात विकल्या जाणा-या काही मोबाइलमध्ये सध्या भारतीय भाषांचा समावेश आहे. मात्र, काही कंपन्यांचा याला अपवाद असल्याने सरकारने हे पाउल उचलले आहे. देशाच्या कानाकोप-यातील सर्वसामान्य मोबाइलधारकांना परस्परांशी सहज संपर्क करता यावा, यासाठी या पुढे प्रत्येक इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असणे अनिवार्य असेल. एका अधिनियमाद्वारे तीन महिन्या नंतर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, असे या अधिका-याने सांगितले.

प्रतिक्रिया

मराठी कुठे बंधनकारक झाली आहे?

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 7:36 pm | समीर शिन्दे

तीन महिन्यानंतर या निर्णयावर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

प्रचेतस's picture

16 Feb 2016 - 7:24 pm | प्रचेतस

तुम्ही मटात पत्रकार म्हणून आहात का हो?

http://m.maharashtratimes.com/infotech/mobile/dot-to-make-local-language...

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Feb 2016 - 7:33 pm | माम्लेदारचा पन्खा

नामुम्कीन हय !!

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 7:46 pm | समीर शिन्दे

अशक्य काहीच नाही...

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Feb 2016 - 8:03 pm | माम्लेदारचा पन्खा

असो.....मिपावर स्वागत !

मी पत्रकार नाही पण एका नामांकित दैनिकात काम करतो आणि नवीन टेक्नॉलॉजीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायला आवडत.

प्रचेतस's picture

16 Feb 2016 - 7:39 pm | प्रचेतस

मग चोप्य पस्ते का करता उगा?

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 7:59 pm | समीर शिन्दे

क्षमस्व !
पण " चोप्य पस्ते " या शब्दांचा अर्थ कळाला नाही

माहितगार's picture

17 Feb 2016 - 7:43 pm | माहितगार

@ प्रचेतस

अशा प्रकारची बातमी जास्त लोकांच्या नजरेस आल्यास लोक मिळणार्‍या साधनांमध्ये स्थानिक भाषा काही कारणाने उपलब्ध नसल्यास आक्षेप घेऊ शकतील म्हणुन अशा स्वरुपाची बातमी जास्त लोकांच्या नजरेत येणे चांगले असे वाटते.

नया है वह's picture

16 Feb 2016 - 7:25 pm | नया है वह
समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 7:39 pm | समीर शिन्दे

तुमच बरोबर आहे
मी नवीन आहे आणि ही माझी पहिलीच पोस्ट आहे.

माहितगार's picture

17 Feb 2016 - 7:10 pm | माहितगार

@ नया है वह

तुमचे सदस्य खाते नाव बदला बुवा, नव्या लोकांचा तुमच्या खाते नावामुळे गोड घोटाळा होताना दिसतोय ;)

कंजूस's picture

16 Feb 2016 - 7:38 pm | कंजूस

देवनागरी म्हणायचंअसेल.

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 7:42 pm | समीर शिन्दे

मोबाइलवर आता मराठी भाषा बंधनकारक करणार असल्याबाबत बातमी आहे.

भाते's picture

16 Feb 2016 - 7:47 pm | भाते

या बातमीवर मिपाकरांकडुन काय चर्चा / प्रतिक्रिया अपेक्षित आहे?
याआधी असाच एक निरर्थक धागा आला होता.
अश्या बातम्या देण्यासाठी सदाहरित धागा आहे ना!
प्रत्येक वेळी नविन धागा काढण्याचा अट्टाहास का?

प्रतिसाद अयोग्य वाटल्यास संमंने अवश्य उडवावा.

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 8:20 pm | समीर शिन्दे

सरकारने हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जे काही नवनवीन अ‍ॅप्स येत आहेत त्यांना ही मराठी भाषेमधून अ‍ॅप्स बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ज्या प्रमाणे सध्या 80 % अ‍ॅप्स मध्ये मुळ भाषा इंग्रजी आहे त्यामध्ये मराठी भाषेचा समावेश झाल्यास नवीन अ‍ॅप्स वापरने अजून सोपे होईल.
शेवटी नवीन टेक्नॉलॉजी मधील महत्वपुर्ण निर्णय आहे. धागा निरर्थक वाटत असल्यास क्षमस्व
या नंतर नक्कीच सदाहरित धागा यामध्येच अशा आशयाचे लेखन करेन.

माहितगार's picture

17 Feb 2016 - 7:17 pm | माहितगार

समीर शिन्दे यांनी ज्या उद्देशाने स्वतंत्र धागा लेख काढला त्याचे समर्थन करतो. आधुनिक साधनांवर भारतीय भाषा अनिवार्य करावी या बाबत उशीरा का होईना शासकीय दरबारी ट्यूब पेटणे हि एक नक्कीच आनंद दायी घटना आहे हे इतरहि साधनांच्या बाबतीत व्हावयास हवे. मीठात आयोडीन कंपलसरी करता येते भारतात भारतीय भाषांची उपलब्धताही कंपलसरी असावयास हवी.
आधुनिक साधनांवर भारतीय भाषा असाव्यात असे भारतीयांनाच वाटत नाही त्या बद्दल कुणी उत्साह दाखवला तर त्यालाच आम्ही पाडतो हि खेदाची गोष्ट आहे.

भाते's picture

17 Feb 2016 - 7:56 pm | भाते

दुसऱ्या ठिकाणी दिलेली बातमी चोप्यपस्ते करून धागा काढण्यात काय अर्थ आहे? धागाकर्त्याला नाउमेद करण्याचा माझा उद्देश नव्हता. पण नविन धागा काढताना धागाकर्त्याने त्यात त्याचे विचार मांडणे अपेक्षित आहे.

समीर शिन्दे, चोप्यपस्ते म्हणजे कॉपी पेष्ट.

पैसा's picture

18 Feb 2016 - 12:54 pm | पैसा

असे चोरीचे लेख लेखकाला श्रेय न देता आणि स्वतःच्या मताशिवाय ठेवून अनिष्ट पायंडा पडतो आहे. copyright उल्लंघन होते ते अधिक महत्त्वाचे.

मराठी कथालेखक's picture

18 Feb 2016 - 1:26 pm | मराठी कथालेखक

पैसाजी,
बातमी ला पण copyright असते ?
शिवाय लेखकाने जिथे ते पेस्ट केले ते मिपा काही वृत्तपत्र्/माध्यम नाही. सदर बातमी चर्चा घडवून आणण्याकरिता चावडीवर आणली (हे म्हणजे वृत्तपत्र वा कात्रण घेवून चावडीवर जाण्यासारखेच आहे). लेखकाची चूक इतकीच त्याने मूळ बातमीची लिंक दिली नाही (म्हणजे त्याने कात्रण न आणता स्वतः बातमी कागदावर लिहून ती चावडीवर आणण्यासारखे आहे).
लेखक जर पत्रकार नाही तर अर्थातच त्या बातमीचा स्त्रोत दुसरा काही असला पाहिजे. आपण नेहमीच एकलेल्या वाचलेल्या बातम्या गप्पा मारताना इतरांना सागतो. पण एकूणातच या प्रकाराला चोरी म्हणणे फारसे योग्य वाटत नाही. नव्या सदस्याचे मनोधैर्य कमी होवू नये.
ह्या बातमीत विशेष रंजक किंवा आवर्जुन चर्चा करावे असे फारसे काही वाटत नाही. त्यामुळे लेखकाने असे धागे टाळावे. बाकी चर्चा न घडल्यास धागा खाली फेकला जाईलच.

पैसा's picture

18 Feb 2016 - 1:38 pm | पैसा

बातमी लिहिणाऱ्याने काही कष्ट घेतले असतीलच. त्याचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे. ही आता आंतरजालावर वावरणाऱ्याना नवीन गोष्ट नाही. धागाकर्ता स्वत: दैनिकात काम करतो म्हणून सांगत आहेत तर याला काय म्हणतात हे त्यांना चांगलेच माहीत असावे. नव्या लेखकाना प्रोत्साहन द्यावे हे ठीक, पण त्यांनी बातमीची लिंक देऊन हेच स्वतःच्या मोडक्या तोडक्या भाषेत लिहिले असते तर आवडले असते. दैनिकासाठी काम करत असतील तर अजून खूप काही लिहू शकतील. स्वतंत्रपणे जरूर लिहावे. शुभेच्छा आहेतच.

समीर शिन्दे's picture

19 Feb 2016 - 1:31 am | समीर शिन्दे

तुमच्या सुचनांसाठी धन्यवाद. _/\_

समीर शिन्दे's picture

19 Feb 2016 - 1:35 am | समीर शिन्दे

धन्यवाद... ही माझी पहिलीच पोस्ट आहे. या नंतर तुम्ही दिलेल्या सुचना लक्षात ठेवेन.

समीर शिन्दे's picture

19 Feb 2016 - 1:33 am | समीर शिन्दे

इंटरनेट, वृत्तपत्र अथवा कोणतीही ठिकाणी प्रसिध्द झालेली शासकीय बातमी ही कॉपीराईट अ‍ॅक्टमध्ये येत नाही.
तुम्ही दिलेल्या सुचनांसाठी धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2016 - 1:37 am | श्रीरंग_जोशी

मिपावर कुठल्याही प्रकारचे लेखन करताना सदस्याने मिसळपावचे आधिकारीक धोरण वाचले आहे अन त्यास ते मान्य आहे असे अध्याहृत असते. या धोरणाच्या पानावरील मुद्दा क्र.२ खालिलप्रमाणे आहे.

२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.

माहितगार's picture

19 Feb 2016 - 12:37 pm | माहितगार

इंटरनेट, वृत्तपत्र अथवा कोणतीही ठिकाणी प्रसिध्द झालेली शासकीय बातमी ही कॉपीराईट अ‍ॅक्टमध्ये येत नाही.
तुम्ही दिलेल्या सुचनांसाठी धन्यवाद.

@ समीर शिन्दे, आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माध्यमांशी संबंढीत असण्याची शक्यता दिसते तेव्हा कॉपी राईट विषयक बारकावे अधिक नेमकेपणाने माहित करून घ्यावेत असे सुचवावेसे वाटते.

१) शासकीय लेखनावर शासनाचे कॉपीराईट असतात . (महावृत्त का काय महाराष्ट्र सरकारच्या वृत्तसंस्थेचे धोरण या संदर्भाने लवचिक असावे -महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवरील प्रताधिकार धोरण बदललेले पाहिले आहे सद्य स्थिती माहित नाही)

२) केवळ शासकीय आधिकार्‍याने माहिती दिली म्हणुन त्या माहितीचा कॉपीराइट शासनाकडे जात नाही, वृत्तलिहिणार्‍या पत्रकाराकडे अथवा वृत्तपत्राकडे त्यांच्या आपापसातील करारावर अवलंबून असेल. म्हणून मटा बातमीचा कॉपीराइट मटा अथवा मटा पत्रकाराकडे असण्याची शक्यता असेल.

३) बातमीची बातमी देता येते पण तुम्ही ती स्वतःच्या शब्दात लिहिली असणे अभिप्रेत असते. उदाहरणार्थ म.टा. च्या बातमीनुसर अमुक तमुक.

४) किंवा त्या बातमीचे समिक्षण अथवा त्यावर टिका केलीत तर संबंधीत आवश्यक तेवढाच अंश वापरता यावा.

समीर शिन्दे's picture

19 Feb 2016 - 1:28 am | समीर शिन्दे

मी आधिच सांगितल्या प्रमाणे ही माझी पहिलीच पोस्ट आहे.तुमच म्हणन अतिशय योग्य आहे की दुसरीकडील बातमी कॉपी पेस्ट करून धागा काढण्यात काही अर्थ नाही पण ज्या ठिकाणी ही बातमी प्रसिध्द झाली आहे त्या ठिकाणी विशेष अशी चर्चा झालेली नाही. विचार केला तर चर्चा करण्यासारख खूप काही आहे या विषयामध्ये.... तुम्ही दिलेल्या सुचनांचे आवश्य पालन करीन.
नवीन शब्दासाठी धन्यवाद.

समीर शिन्दे's picture

19 Feb 2016 - 1:40 am | समीर शिन्दे

या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी गोष्टी किती महत्वाची आहे आणि किती जणांना याबद्दल काय वाटते ते महत्वाचे आहे. शासनाने उशिरा का होइना निर्णय घेतला पण आता याची अंमलबजावणी कधी होते ते महत्वाचे..

जव्हेरगंज's picture

16 Feb 2016 - 7:49 pm | जव्हेरगंज

opera mini सुद्धा गुगल प्लेवर मराठीत ऊपलब्ध आहे !!!

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 8:02 pm | समीर शिन्दे

ओपेरा मिनी सारख्या अ‍ॅप मध्ये मराठी भाषा असण ही अभिमानाची गोष्ट आहे...

हेमन्त वाघे's picture

16 Feb 2016 - 10:17 pm | हेमन्त वाघे

ओपेरा मिनी हा browser आहे ना ??

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 10:57 pm | समीर शिन्दे

ओपेरा मिनी हा ब्राउजर आहे पण या चे वैशिष्ट असे आहे की या ब्राउजर मध्ये वेबपेज ओपन करतांना आपला कमीत कमी डेटा वापरला जातो आणि वेबपेज किंवा वेबसाईट कमी वेळात ओपन होते आणि यासाठी इंटरनेटचा डेटा देखील कमी प्रमाणात वापरल्या जातो. आताच्या सर्वच ब्राउजरमध्ये अशी सुविधा असते पण ओपेरा मिनी आणि युसी ब्राउजर यांमध्ये डेटा कमी प्रमाणात लागतो.

कंजूस's picture

16 Feb 2016 - 10:24 pm | कंजूस

बरीचशी अॅप ही दुसय्रा भावंडाकडे गेल्यावर कपडे नेले नसल्यावर त्याचा टीशर्ट वगैरे तात्पुरते घालतो तशी असतात.मुख्य वेबसाइट्समधल्या सर्व गोष्टी नसतात.
सर्व वृत्तपत्रांची अॅप्स अशीच आहेत/असतात.त्यातल्या बातम्या लवकर अद्ययावत करत नाहीत. मराठीचंही असंच थातुरमातुर करतील तुमच्या समाधानासाठी.

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 11:00 pm | समीर शिन्दे

तुमच म्हणन मान्य आहे पण यासाठी ब-याचशा गोष्टी करणीभूत आहे. मराठी भाषेतील अ‍ॅप्स ला खूपच कमी वापरकर्ते मिळतात.
पण याला अपवाद देखील आहे हॅलो इंग्लिश हे इंग्लिश शिकण्यासाठीच अ‍ॅप आहे मी स्वतहा वापरत आहे या अ‍ॅपमध्ये विविध भाषांमधून इंग्लिश शिकू शकता.

समीर शिन्दे's picture

16 Feb 2016 - 11:00 pm | समीर शिन्दे

तुमच म्हणन मान्य आहे पण यासाठी ब-याचशा गोष्टी करणीभूत आहे. मराठी भाषेतील अ‍ॅप्स ला खूपच कमी वापरकर्ते मिळतात.
पण याला अपवाद देखील आहे हॅलो इंग्लिश हे इंग्लिश शिकण्यासाठीच अ‍ॅप आहे मी स्वतहा वापरत आहे या अ‍ॅपमध्ये विविध भाषांमधून इंग्लिश शिकू शकता.

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 11:50 pm | विवेक ठाकूर

देवनागरीत काय वाट्टेल ते टाईप करता येतं .

मराठी कथालेखक's picture

17 Feb 2016 - 7:06 pm | मराठी कथालेखक

अ‍ॅप्सचं राहूद्या अजून इंटरनेटवर तरी अनेक कामाच्या साईट्स फक्त इंग्लिशमधुन उपलब्ध आहेत (बँकिंग : अगदी सरकारी बॅक देखील).

मदनबाण's picture

18 Feb 2016 - 11:35 am | मदनबाण

मराठी माणसं मराठी टायपण्यात आळशी हायेत असं माझं निरिक्शण हाय... अँड्रॉइडवर गुगल मराठी किबोर्ड असुन सुद्धा तो वापरणारे कमीच आहेत. माझ्या कायअप्पा वरच्या मिपा सदस्यांना देखील मराठी टंकण्याचा कंटाळा आहे असे दु:खा ने नमुद करु इच्छितो.अनेकदा मराठीतच लिहा असे सांगुन देखील त्यांना शष्प फरक पडलेला नाही.
मराठी माणसाला मराठी लिखाण करण्याचा टंकाळा { निदान मोबल्यातवर तरी } आहे. माझ्या काही नातेवाईकांना मी मराठीतच लिहण्याचा आग्रह धरुन मराठी लिखाणातुनच कायअप्पा वरील संदेश देवाण-घेवाण करण्यास प्रवॄत्त केले आहे.
बाकी धाग्याचा उद्देश्य कळला... :) अ‍ॅन्ड्रॉइडच्या धाग्यावर एक मराठी रॉमचे दर्शन घडले होते,आणि फार आनंद वाटला होता.
मराठी माणसांना मराठीतच लिहा हे देखील सांगावे लागते,याचे वाईट वाटते... { निदान जिथे जिथे शक्य आहे तिथे } असो हे ही दिवस बदलतील.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

खटपट्या's picture

19 Feb 2016 - 3:16 am | खटपट्या

कचकून हाणूमोदन....

बोका-ए-आझम's picture

18 Feb 2016 - 12:13 pm | बोका-ए-आझम

नावाचं अॅप डाऊनलोड केलंत आणि सेटिंगमध्ये जाऊन जर ते तुमचं language input केलंत तर मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये लिहू शकता.

अच्छा, गुगुल मराठी किबोर्ड मध्ये देखील मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये लिहू शकता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

मराठी कथालेखक's picture

18 Feb 2016 - 1:27 pm | मराठी कथालेखक

स्वरचक्र पण चांगले आहे.

सुधांशुनूलकर's picture

19 Feb 2016 - 11:50 am | सुधांशुनूलकर

बातमीच्या मुख्य गाभ्यासंदर्भातच काही मुद्दे मांडतो.

अनिवार्य असण्याची कल्पना चांगली आहे, आवश्यकही आहे; पण गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक भ्र.ध्व.हस्तसंचांमध्ये ही सुविधा उपलब्ध असतानाही, किती मराठी वापरकर्त्यांनी तिचा वापर केला आहे? किती जण संचाची प्राथमिक भाषा (डिफॉल्ट लँग्वेज) मराठी ठेवून सर्व संपर्कनावं आणि संपर्कक्रमांक मराठीत साठवतात, आणि दुसर्‍या मराठी माणसाला सर्व संदेश मराठीत पाठवतात? (मी ११ वर्षं जुना हस्तसंच वापरतो, सुरुवातीपासून मराठीतूनच सर्व नावं-क्र्मांक साठवले,) काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या एका जाहीर समारंभात या विषयावर एका प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्याने हा प्रश्न विचारला, तेव्हा मराठी माणसांनी तुडुंब भरलेल्या त्या सभागृहामध्ये फक्त दोन हात वर झाले - एक त्याचा स्वतःचा आणि दुसरा माझा. मुद्दा असा, की अशी सुविधा उपलब्ध असतानाही ती आपण वापरत नसू, तर ही सक्ती करूनही काय उपयोग? मदनबाण यांचा प्रतिसाद पाहा, त्याच्याशी १०००% सहमत.

आपल्यालाच आपली भाषा वापरायची इच्छा नसेल, तर अशी सक्ती करून किंवा सुविधा उपलब्ध करूनही आपण तिचा प्रत्यक्ष वापर करणार नाही. दुसरं उदाहरण देतो : धनादेशावर नाव-रक्कम-तारीख इ. मराठीतून लिहिलेलं चालतं, तरी महाराष्ट्रामध्येही मराठी माणूस ते इंग्लिशमधूनच लिहितो ना? खरं तर, धनादेश मराठीतून लिहिला, तर तो स्वीकारणारा (उदा. दूरध्वनी देयक, महापालिकेची देयकं इ. स्वीकारणारा) मराठी माणूस मनमोकळेपणे कौतुक करतो, हा स्वानुभव आहे.

मूळ धाग्यापेक्षा प्रतिसाद मोठा झाला. असो.
मिपावर स्वागत.

माहितगार's picture

19 Feb 2016 - 12:48 pm | माहितगार

आपण वापरत नसू, तर ही सक्ती करूनही काय उपयोग?

दुष्टचक्र असते उपलब्ध नाही म्हणून लोकवापरत नाहीत आणि लोकवापरत नाहीत मागत नाहीत म्हणून उपलब्ध नसते, इन एनी केस सुविधेची उपलब्धता असणे टेक्निकल गरज आहे त्या शिवाय दुष्टचक्र भेदले जाण्याची शक्यता नाही. मिपा आणि इतर मराठी संकेतस्थळावर मराठी डिफॉल्ट आहे तर लोक वापरतातच, तेच मराठी विकिपीडियावर मराठी टंकन कंपलसरी असले तरीही टंकल पद्धती डिफॉल्ट नसल्यामुळे लोक मराठी विकिपीडियावर लिहिण्याचे टाळतात असेही होते म्हणून सुविधेची अधिकाधिक सहज उपलब्धता महत्वाची ठरतेच.

लोक स्वतःचीच भाषा व्यवहारात कमी वापरतात ही अधिक कंगोरे असलेली वेगळी समस्या तरीही मुख्य म्हणजे एखादा संवाद अथवा माहिती ज्या भाषेतून वाचली त्याच भाषेतून पुढचा संवाद होण्याची शक्यता वाढते, रुचीपूर्ण संवाद वारंवार साधला गेला तर केव्हातरी त्याच भाषेतून (लिपीतून) प्रतिसाद देण्याची इच्छा प्रबळ होणे सहाजिक असावे.

खटपट्या's picture

20 Feb 2016 - 3:12 am | खटपट्या

धनादेश मराठीतून लीहीलाच पाहीजे. पण मराठीतून सही करण्यास काही बँका हरकत घेतात. मागे आयसीआयसीआय बँकेतून कर्ज काढत असताना बाबांनी मराठीतून सही केली त्यास एजंटने हरकत घेतली. कारण विचारता तो म्हणाला की इंग्रजीशिवाय सही करणार्‍यास चेन्नई कार्यालय अशिक्षित ठरवते. हे ऐकुन हसावे की रडावे कळेना.

मराठी कथालेखक's picture

19 Feb 2016 - 1:06 pm | मराठी कथालेखक

बंधनकारक करणे चुकीचे वाटते.
सरसकट सगळ्या संचावर मराठी सक्तीचे असावे याची काही गरज वाटत नाही. मोबाईल ही प्राथमिक गरज नाहीये.
मोबाईल बनवणार्‍या अनेक कंपन्या आहेत आणि त्यांचे शेकड्यांनी पर्याय उपलब्ध आहे. जर मोबाईल घेणारा ग्राहक मराठी वा इतर कोणत्याही भारतीय भाषेकरिता आग्रह धरेल ("मला मराठी असलेलेच संच दाखवा" असे दुकानदाराला सांगेल) तर आपोआप ही माहिती कंपन्यांपर्यंत पोहोचेल आणि आपला खप वाढविण्याकरिता त्या मराठीचा पर्याय उपलब्ध करतील.
झालेच तर मोबाईलवर मराठी आहे म्हणजे काय ? "settings" च्या ऐवजी "सेटिंग्ज" असे दिसणे म्हणजे मराठी ?
मोबाईलपेक्षा अनेक जीवनावश्यक गोष्टींशी संबधित मजकूर (वापरकर्त्यासाठीची पुस्तिका ई) मराठी तर सोडा पण हिंदीत सुद्धा नाहित उदा :
१) सूपचे पाकिट आणले पण त्यावर कसे बनवायचे हे फक्त इंग्लिशमध्ये
२) दुचाकी - चारचाकीच्या पुस्तिका, गाडीत चिकटवलेल्या विविध सुचना फक्त इंग्लिशमध्ये
३) दुरचित्रवाणी , मायक्रोवेव ओवन, धुलाईचे यंत्र प्रत्येक उपकरणाची पुस्तिका केवळ इंग्लिशमध्ये
४) उद्वाहन (लिफ्ट) मधील महत्वाच्या सूचना केवळ इंग्लिशमध्ये

मोबाईल ही प्राथमिक गरज नाहीये.

आज आधुनिक संवाद माध्यमात सध्यातरी सर्वाधिक वापरली जाणारे साधन नाही का? आपण मानवाच्या अन्नवस्त्र निवारा या प्राथमिक गरजांशी संबंध लावत आहात का ? अन्न वस्त्र निवारा मागण्या साठी सुद्धा भाषा वापरावीच लागते ? भाषेचा वापर मानवासाठी प्राथमिक गरज आहे की नाही ? जर भाषेचा वापर संवाद पुर्ण होण्यासाठी जरूरी असेल आणि माझ्या आधुनिक संवाद साधनांच्या गरजांवर इतर भाषांनी कळत-नकळत असमानता लादलेली असेल तर ती भाषिक असमानता दूर केली जाणे हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे.

मराठी कथालेखक's picture

19 Feb 2016 - 6:09 pm | मराठी कथालेखक

मोबाईलचे खूप सारे मॉडेल्स उपलब्ध आहेत. अनेक मॉडेल्स मध्ये मराठी आहे.
त्यामुळे ज्या व्यक्तीला मराठीच भाषा असलेलेच मॉडेल हवे ती तसे घेवू शकते. बाजारातल्या एकूण एक मॉडेल मध्ये मराठी हवेच (किंवा त्याची सक्ती करावी) अशी काही गरज वाटत नाही.

माहितगार's picture

19 Feb 2016 - 10:38 pm | माहितगार

१) आपण बातमी पुन्हा अभ्यासल्यास त्यात कोणती न कोणती भारतीय भाषा उपलब्ध असावी अशी अपेक्षा आहे.
२) हे नेटवर्क न्युट्रॅलिटी सारखे आहे. कंपल्शन नसेल तर मार्केट मध्ये उपलब्धतेचे आश्वासन कमी होते. नवे मॉडेल लाँच करताना विचार न करता बधीर डोक्याचे लोक बर्‍याचदा भारतीय भाषा नसलेली साधनांनी मार्केट फ्लडकरतात मग आधुनिक साधनांवर भारतीय भाषा चालत नाहीत असे खोटे पब्लिक इंप्रेशन तयार फिरत राहते. वस्तुतः भारतीय भाषा इनकॉर्पोरेट करणे परवडावे एवढे भारतीय मार्केट मोठे असताना उत्पादकांनी/ विक्रेत्यांनी आपल्याच भाषांचा घसा घोटला जातो आहे हे लक्षात न घेणे दुर्दैवी सत्य आहे किंवा कसे.