भारतात विकल्या जाणा-या मोबाइलमध्ये या पुढे इंग्रजीबरोबरच हिंदी आणि एका स्थानिक भाषेचा समावेश असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागातर्फे येत्या तीन महिन्यांंत याबाबत एक अधिनियम काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागातील एका उच्च पदस्थ अधिका-याने ही माहिती दिली.
देशात विकल्या जाणा-या काही मोबाइलमध्ये सध्या भारतीय भाषांचा समावेश आहे. मात्र, काही कंपन्यांचा याला अपवाद असल्याने सरकारने हे पाउल उचलले आहे. देशाच्या कानाकोप-यातील सर्वसामान्य मोबाइलधारकांना परस्परांशी सहज संपर्क करता यावा, यासाठी या पुढे प्रत्येक इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असणे अनिवार्य असेल. एका अधिनियमाद्वारे तीन महिन्या नंतर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, असे या अधिका-याने सांगितले.
प्रतिक्रिया
21 Feb 2016 - 3:54 pm | मराठी कथालेखक
टाटा मोटर्स सारख्या देशीपणा मिरवणार्या कंपनीचेही कारची पुस्तिका फक्त ईंग्लिशमध्येच आहे ? जेव्हा इंडिकाचा खप/वापर जास्तीत जास्त टॅक्सी म्हणून झालाय त्या अर्धशिक्षित चालकांना इंग्लिशचे पुरेसे ज्ञान आहे का ?
तीच गोष्ट "देश की धडकन" म्हणवणार्या हीरो मोटर्सची.
अपवाद : मी २००२ साली बजाजची दुचाकी घेतली होती, तिची पुस्तिका इंग्लिश व हिंदी अशा दोन्ही भाषेत होती (अजूनही बजाज अशाप्रकारे पुस्तिका देते किंवा नाही याबद्दल माहिती नाही).
असे असताना भ्रमणध्वनी साठीच सक्ती करण्यात अर्थ नाही.
मग अॅपलचा आयफोन जर ठराविक वर्तुळात खपत असेल आणि स्थानिक भारतीय भाषेची मागणी ग्राहकांकडून होत नसेल तर सक्ती करण्याचे कारण नाही.
सरकारने तुर्तास SBI ला Internet Banking भारतीय भाषांत उपलब्ध करुन देण्याची सक्ति करावी.
19 Feb 2016 - 10:59 pm | माहितगार
मी भारतीय बाजारपेठेत मराठी सॉफ्टवेअर तीन तरी कंपन्यांमध्ये मार्केटींग सांभाळले आहे, उत्पादकांचा गंमत अनुभव सांगतो. जर्मन किंवा जपानी किंवा गल्फ मधला अरब ग्राहक उपलब्ध होतोय का, हो मग आम्ही तुम्हाला तुमच्या भाषेत सॉफ्टवेअर उपलब्ध करू, - मराठी ग्राहकांच्या एनक्वायर्यांना नाही म्हणणार- आता तुम्ही म्हणाल ह्यावर आयात उत्पन्न जास्त आहे - या ही केस मध्ये मराठी 'खपते' आहे हे आपण लक्षात घेत नाही :( असो - कन्नड ग्राहक आले की त्यांनाही हो म्हणणार बंगाली ग्राहक आहे की त्यांनाही हो म्हणणार पण मराठी ग्राहक आले की नन्नाचा पाढा वाचणार.
श्रीलिपी वाल्यांकडून लोकांनी पैसे देऊन सॉफ्टवेअर विकत घेतले (इंग्रजी टंकायला फुकट भारतीय भाषेत टंकायचे तर पैसे भरा असा युनिकोड पुर्विचा हिशोब) युनिकोड आल्या नंतर श्रीलिपीने कनव्हर्शन ग्राहकांना कितपत सहज उपलब्ध करून दिले या बद्दल श्रीलिपीचे ग्राहकच सांगू शकतील. श्री लिपीचे सोडा साधा किरण फाँट वाला युनिकोड आल्या नंतर युनिकोडची त्यांच्या ग्राहकांना माहिती कितपत देत होता हे साशंकीत वाटते त्यांचे उपयोग कर्तेच त्यांचे त्यांचे अनुभव सांगू शकतील.
19 Feb 2016 - 11:05 pm | माहितगार
आणि वर हे ही नमुद करतो की प्रिमीअम व्हॅल्यूला मार्केटींग आणि सेलींग मध्ये वाकबगार असून आणि मराठी साठी पैसा माझा ग्राहक मोजायला तयार असूनही आपल्याच मराठी माणसात अनास्था असते.
अगदी घरात कॉम्प्युटर इंजिनीअर असेल आई/वडलांना नॉनयुनिकोड कॉम्प्युटर मराठी टायपींग येत असेल पण मुले आपल्या आई बापांना युनिकोड टायपिंग शिकवण्याचे कष्ट घेणार नाहीत. अजून बरीच उदाहरणे आणि अनुभव लिहिण्यासारखे आहेत पण रडगाणे कशासाठी आणि कुणासाठी गावे ज्यांच्यासाठी करायला जावे त्यांनाच कितपत किंमत आहे असा प्रश्न पडतो. असो.
21 Feb 2016 - 12:13 am | अभ्या..
मी श्री लिपी १० हून अधिक वर्शे वापरीत आहे. श्री लिपीचा आम्हाला असलेला उपयोग आणि वेबवरचे मराठी ह्या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. श्री लिपी ही प्रामुख्याने डीटीपी क्षेत्रात वापरली जाते. त्यांना आवश्यक असे फॉन्टस युनिकोडात नव्हते, अजूनही नाहीत. डीटीपी साठी वापरल्या जाणार्या अॅप्लिकेशनना (कोरल, फोटोशोप, इल्स्ट्रेटर) युनिकोड किती सपोर्ट करते. श्री लिपीने वेळोवेळी ह्या सुधारणा केलेल्या आहेत. रुपासारखे डिझाइनिंग फॉन्ट्सचे (राउंड, कर्व्हस) अॅप्लिकेशन श्री लिपीने दिले. जोडीला हजारो क्लिपआर्टस आणि सिम्बॉल फॉन्ट्स पुरवले. श्री लिपीचे फॉन्ट्स पोस्ट स्क्रीप्ट प्रिंटरला जसे सपोर्ट करतात तसे उनिकोड आजही करु शकत नाहीत. मराठी माणसांना व्यवसायात उपयोगी असे अन भावणारे फॉन्टस श्री लिपीकडून मिळाले. श्रीलिपी जवळपास पंधरा कीबोर्ड लेआउटला सपोर्ट करते, त्यात केपीरावपासून डीओई (इन्स्क्रीप्ट) अन गोदरेज टाइअपरायटर लेआउट चा पण समावेश होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डीटीपी वाल्यांची पहिली फळी ही कंपोझिंग करणारी होती, त्यांना समजणार्या कन्सेप्ट्स अन ओळखीचे टाइपफाउंड्रीतले फोन्ट्स श्रीलिपीचेच होते. नंतरच्या काळात श्रीलिपीने कन्वर्शन अॅप्लिकेशन पण उपलब्ध करुन दिले आहेत. आय एस एम चे फॉन्ट्स ने उनिकोड वापरायची सवय लावली. खरे धन्यवाद त्यांनाच द्यायला हवे.
19 Feb 2016 - 2:38 pm | वेल्लाभट
मी वापरायचा प्रयत्न करतो. संपर्क क्रमांक मराठीत साठवलेले नाहीत पण टाइपिंग मराठीतच असतं बहुदा.
19 Feb 2016 - 2:39 pm | वेल्लाभट
त्यानिमित्ताने सांगतो की विंडोज ला मराठी कीबोर्ड अॅड करणं व टाईप करणं फार सोपं जातं.