व्यवसाय - आपला बहुमोल सल्ला

सुनिल साळी's picture
सुनिल साळी in तंत्रजगत
15 Feb 2016 - 11:35 am

त्याच्या मारी. ठरवून टाकले. आता बस ! लई झाली नोकरी चाकरी ! आता जे काही करायचे ते फक्त आपल्यासाठीच. बरेच दिवस मनात विचार चालु होता एखादा व्यवसाय चालु करण्याचा. पण हिंमत होत नव्हती. व्यवसाय चालेल का?
नुकसान होईल का? पण अर्धंगिनीने पाठबळ दिले, हिंमत दिली. म्हणाली करून बघा तुमची इच्छा आहे तर !
योग्य मेहनत घेतल्यास यश नक्कीच येईल !

तीच्या ह्या प्रोत्साहानापूर्वक शब्दामुळे खूप हिंमत आली. आणी एक महिन्याच्या परिश्रामानंतर व्यवसायाचा प्रारंभ केला आहे.

व्यवसाय: सायबर कॅफे, झेरोक्स, डिझाईनिंग अँड प्रिंटिंग - विज़िटिंग कार्ड, लेटर हेड, बिल बुक, चलन बुक, ब्रोशर, लॅमीनेशन, फ्लेक्स ईत्यादी.

असे समजुनच व्यवसाय चालू केला की 2-3 महिने कमी रीस्पान्स मिळेल. व मग हळूहळू कस्टमर वाढायला लागतील. बघुया पुढे....

ही आहे माझ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी केलेल्या वाटचालीची पार्श्वभूमी...

आपल्या मिपाकरांकडे व्यवसाय वाढीचा अनुभव नक्कीच असेल म्हणून खालील बाबित आपला बहुमोल सल्ला द्यावा. ही विनंती.

1. व्यवसायाची जाहिरात कशी करावी.
2. ह्या व्यवसायाला जोडुन अजुन काय जोडधंदा करता येईल.

आपल्या उत्तरांच्या प्रतीक्षेत...

प्रतिक्रिया

सुनील's picture

15 Feb 2016 - 11:39 am | सुनील

दुकान आहे कुठे?

नाना स्कॉच's picture

15 Feb 2016 - 11:40 am | नाना स्कॉच

पण अर्धंगिनीने पाठबळ दिले, हिंमत दिली. म्हणाली करून बघा तुमची इच्छा आहे तर !
योग्य मेहनत घेतल्यास यश नक्कीच येईल !

खुप खुप नशीबवान आहात आपण साहेब. घरच्या लक्ष्मी ने कौल देणे ही मोठी बाब असते तुमची खुप भरभराट होणार हे मी खात्रीने सांगतो. :)

हा स्वानुभव आहे (धंदा नाही पण नोकरी बदलण्याच्या संदर्भात अनुभव आहे आम्हाला)

बाकी तज्ञ लोक तुम्हाला मार्केटिंग अन ब्रांडबिल्ड़िंग बद्दल तांत्रिक मदत देतील

मी फ़क्त शुभेच्छा देऊ शकतो. त्या तेवढ्या स्वीकाराव्यात __/\__

कविता१९७८'s picture

15 Feb 2016 - 11:41 am | कविता१९७८

मी ही अजुन फक्त विचारच करतीये, सुरुवात कुठुन करावी ते कळत नाहीये, सध्या तरी नोकरी सोडुन व्यवसाय करणे शक्य नाही पण साईड बाय साईड काही करता येईल. तुम्ही सुरुवात कशी केली. व्यवसायाला लागणारे भांडवल, जागा, काम करण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री, जोडीला मदतीला लागणारी माणसे. कच्च्या मालाची माहीती, स्वस्तात कुठुन मीळतात वगैरे यासारखी माहीती पुरवा म्हणजे बाकीच्यांनाही थोडीफार मदत होईल.

सुनिल साळी's picture

15 Feb 2016 - 11:41 am | सुनिल साळी

पिंपळे सौदागर, पुणे

ओल्ड मोन्क's picture

15 Feb 2016 - 11:52 am | ओल्ड मोन्क

पिंपळे सौदागर भागात सायबर कॅफे खूप कमी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे गोविंद garden जवळ एक आहे. तुमच नेमक location काय?

पैसा's picture

15 Feb 2016 - 11:45 am | पैसा

नवीन व्यवसायाला खूप शुभेच्छा! मिपाकरांमधे या स्वरूपाची कामे करणारे काही व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला काही उपयुक्त सूचना मिळू शकतील. आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

सुनिल साळी's picture

15 Feb 2016 - 11:49 am | सुनिल साळी

नाना स्कॉच, पैसा खूप खूप आभारी आहे.

कविता ताई हो लिहितो

साई व्हीजन मध्ये शॉप नंबर 120.

स्वामी संकेतानंद's picture

15 Feb 2016 - 12:14 pm | स्वामी संकेतानंद

शुभेच्छा! शाळाकॉलेज किंवा स्पर्धा परीक्षा देणारी तरुण मुले भरपूर असतील जवळ्पास तर मस्त चाल्तो कॅफे.

बाकी, मला आय्टी कंपनीबाहेर चहासिगारेट्ची टपरी टाकणे जबरदस्त व्यवसाय वाटतो. ;)

तुषार काळभोर's picture

15 Feb 2016 - 12:40 pm | तुषार काळभोर

सायकलला २ पिंप अडकवायचे: एक चहाचा, एक कॉफीचा. अन् २-३ ब्रँडची पाकीटे (सिगारेटची) हँडलला अडकवलेल्या पिशवीत ठेवायची. बास्स!

माझी सायकल व दोन तीन जादाच्या पिशव्या सध्या पडून आहेत. त्या देऊ शकीन.

उगा काहितरीच's picture

15 Feb 2016 - 12:53 pm | उगा काहितरीच

येऊ कधी तुमच्या दुकानावर. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.

गरिब चिमणा's picture

15 Feb 2016 - 1:04 pm | गरिब चिमणा

कॅफे आणि झेरॉक्सला अनुकुल ईतर जोड व्यवसाय तुम्ही सुरु केले आहेत, आणखी काही जोड धंदा केला तर तुमच्यावर ताण येईल ,त्यापेक्षा आता जे चालू आहे ते नेटाने करा म्हणजे झालं.

अभ्या..'s picture

15 Feb 2016 - 1:09 pm | अभ्या..

तुमचे शिक्षण, कलागुण, कॉम्पुटर चा अनुभव, बेसिक भांडवल, मॅनपॉवर आणि जागेचे स्वरुप सांगा.
मग डिटेल मार्ग सांगतो ह्याच धंद्यात पैसे मिळवायचे.
ह्या धन्द्याचे माझ्याकडून टेक्स्ट्बुक मिळेल, प्रश्नपत्रिका मिळणार नाही.
धन्यवाद. सिरीयसली करणार असताल तर जमेल तेवढी मदतीसहित शुभेच्छा.

उगा काहितरीच's picture

15 Feb 2016 - 1:20 pm | उगा काहितरीच

व्यनि वगैरे वापरण्यापेक्षा इथेच सांगा सगळ्यांना वाचता येईल .

अभ्या..'s picture

15 Feb 2016 - 1:22 pm | अभ्या..

हा. हे बरोबर आहे. व्यनिला माझ्याकडून उत्तर मिळणार नाही. जे काय ते बोर्डावर. बिन्दास.

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 2:50 pm | मराठी कथालेखक

सायबर कॅफेला जोडधंदा म्हणजे हार्डवेअर मेन्टेनन्स /रिपेअर, कॉम्प्युटर व मोबाईलशी संबंधित स्टेशनरी विकणे
उदा: पेन ड्राईव, मेमरी कार्ड, कार्ड अडॅप्टर , सीडी, डीवीडी, माऊस, कीबोर्ड विकणे, मोबाईल केस/कवर, केबल्स, चार्जर , कॅमेरासाठी मिळणार्‍या टेलिस्कोप्स, सेल्फी स्टीक्स विकणे, झालेच तर ऑनलाईन स्टोअर्स मध्ये (खासकरुन शॉपक्लूज) अनेक गमतीदार व स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीस असतात. त्यातील काही स्वतः (शक्यतो सेल मध्ये) खरेदी करुन कॅफेमध्ये काही नफा आकारुन विकायला ठेवा. ऑनलाईन शॉपिंग न करणार्‍या लोकांना त्या वस्तू आकर्षित करु शकतील.
असेंबल्ड कॉम्प्युटर विकणे, कॉम्प्युटर दुरुस्ती, OS Installation ई., टायपिंग

काही गोष्टींचे भान ठेवा
१) ज्या वस्तू विकताय त्यांची बाजारातली किंमत , दुकानात तसेच ऑनलाईन तपासून पहा
२) तुमचे तांत्रिक ज्ञान उत्तम आणि सेवा/वस्तू योग्य दरात असली की आपोआप जाहिरात होत राहिल.

त्याचप्रमाणे इतर काही सर्विसेस देवू शकता. आजकाल मनी ट्रान्सफर अनेक ठिकाणी पाहिले आहे. ते नेमके कसे चालते त्याचे ग्राहक कोण हे माहीत नाही.

जमल्यास जुन्या वस्तू (मोबाइल, डेटा कार्ड, मॉनिटर ) विकत घेणे /विकणे हे ही करु शकता.

बाकी मोठा धंदा करण्यसाठी शाळा , कॉलेज , ऑफिस, क्लासेस यांच्याशी संपर्क करा त्याना लागणार्‍या स्टेशनरी पुरवण्याचे काम मिळते का ते बघा.

अभ्या..'s picture

15 Feb 2016 - 2:58 pm | अभ्या..

सायबर कॅफेत काही फॅशन अ‍ॅक्सेसेरीज ठेवल्या तर? वॅलेट, पट्टा, रिस्ट वॉच, रिंग्ज, ब्रेसलेट्स ;)

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 4:22 pm | मराठी कथालेखक

:)
diversification वरुन conglomerate diversification वर जाणं होईल...
असो.

सुनिल साळी's picture

15 Feb 2016 - 2:55 pm | सुनिल साळी

प्रतीसादान बद्दल धन्यवाद.

शिक्षण: कॉमर्स ग्रॅज़ूएट
कलागुण: COREL DRAW, PHOTOSHOP बर्‍या पैकी येते.
कॉम्पुटर चा अनुभव: १५ वर्षांचा अनुभव आहे.
बेसिक भांडवल: 4 LAC
मॅनपॉवर आणि जागेचे स्वरुप: सध्या वन म्यान शो. २०० स्के. फूट.

अभ्या..'s picture

15 Feb 2016 - 2:59 pm | अभ्या..

रात्री डिटेल उत्तर.
सध्या जय भवानी, जय शिवराय.
जगात भारी १९ फेब्रुवारी.

तुषार काळभोर's picture

15 Feb 2016 - 4:45 pm | तुषार काळभोर

याच्यावार एक शेप्रेट लेख पाहिजे.
नायतर सोलापुरातनं पुन्याला जानारा रस्ता हडपसरातनंच जातोय ;)

पैलवान का माझ्या पोटावर पाय ओ उगीच. एकतर सगळ्यांच्या अस्मिता दुखवून घ्यायल्याच बसल्यात त्यात आमचं तोंड फाटकं. एखादा वरखाली शब्द यायचा आणि चाम्गल्या चाललेल्या धंद्याचे मातेरे व्हायचे. नकोच ते.
सध्या फक्त जय भवानी जय शिवराय इतकेच.

नाखु's picture

16 Feb 2016 - 11:37 am | नाखु

आधी जुने वायदे पुर्ण करा आनी मग पुढच काम !!!

पुण्यात वाट पाहणारा नाखु

तुषार काळभोर's picture

16 Feb 2016 - 11:48 am | तुषार काळभोर

१९ फेब्रुवारीचे फ्लेक्सचे अनुभव आणि १-२ दाखल्याचे फ्लेक्स टाका की हिकडं (क्लायेंटची प्रायवसी जपून)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2016 - 3:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

नवीन व्यवसायातल्या प्रगतीसाठी अनेकानेक शुभेच्छा !

इथे तुमच्यासारख्या व इतर व्यवसायातले अनेक अनुभवी सदस्य आहेत, त्यांच्याकडून अगोदरच अनेक सूचना आल्या आहेत अजूनही अनेक उपयोगी सुचना नक्कीच मिळतील.

नाना स्कॉच's picture

15 Feb 2016 - 3:03 pm | नाना स्कॉच

जमल्यास जुन्या वस्तू (मोबाइल, डेटा कार्ड, मॉनिटर ) विकत घेणे /विकणे हे ही करु शकता.

बाकी सगळे ठीक आहे सर, पण हा धंदा लैच वंगाळ आहे बघा.

म्हणजे हार्डवेयरचा धंदा उत्तम आहे फ़क्त ते मोबाईल सेकंड हैण्ड किंवा मेमोरी कार्ड वगैरे लै वंगाळ, कायदेशीर प्रॉब्लम होतात बहुदा, आमच्या एक ओळखीचा मोबाइलवाला सांगत होता सेकंडचे मोबाइल विकताना पोलिस त्रास देतात हफ्ते लागतात अन काय काय कारण नुसता तोंडी व्यवहारा वर मोबाइल विकला जातो, IMEI जुन्याच मालकाच्या नावं राहतो सुरक्षा प्रश्न म्हणून पोलिस ताबड़तात सेकंड मोबाइल घेणारे गिर्हाइक असले चॅप्टर तर ते कुठं वापरेल तो मोबाइल ते ही सांगता येत नाही ! परत जुनी मालकं जर मातब्बर असली तर ती येऊन दुकान अन मालक तीन टाइम फोडायचे एक दोन किस्से ठावुक आहेत म्हणून सांगितले हो! गैरसमज नसावा :)

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 4:17 pm | मराठी कथालेखक

फार काही त्रास असेल अस मला नाही वाटत. एखादी घटना घडू शकते. फक्त जुना मोबाईल विकत घेताना तो चोरीचा नाही याची खात्री करा (एकतर माणूस ओळखीचा असावा किंवा त्याने पावती त्॑री आणावी) शिवाय मोबाईल विकत घेतल्याचा दिनांक, IMEI , विकणार्‍याचा फोटो (सांगूनच काढावा. किंवा जास्त जोखीम वाटल्यास विडीओ घ्या हव तर "मी अमूक तमूक हा मोबाईल आज रोजी विकत आहे अस म्हणायला लावून") , विकत घेणार्‍याचा फोटो ई माहिती नीटप्रकारे जतन करावी म्हणजे कधी काही गुंतागुंत झालीच तरी त्यातून लवकर बाहेर पडता येईल.

IMEI ची नोंद कुठे असते ? ऑनलाईन वा मातब्बर स्टोअर्स हा विदा ठेवत असतील आणि कंपनीला पाठवत असतील, बाकी इतरत्र छोट्या दुकानातून नवीन मोबाइल जरी घेतला तरी दुकानदार एखादी कच्ची पावती देतो, त्यावर आपण सांगू ते नाव लिहतो. म्हणजे मी काहीही नाव सांगून मोबाईल संच विकत घेवू शकतो . झालंच तर ती माहितीसुद्द्दा असा दुकानदार पुढे कुठे (संच निर्मात्या कंपनीला वगैरे) पाठवत असेल असे वाटत नाही. म्हणजे त्या IMEI क्रमांकाशी माझे नाव जोडलेलेच नाही. मी जे सिम वापरेन त्यामुळे माझा त्या IMEI शी अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो इतकंच. पण पुढे मी तो मोबाईल विकला की दुसरा मालकही कुठलातरी सिम टाकेलच ना ?

बाकी पोलिसांना त्रास द्यायचा असेल तर काहीही बहाणा पुरतो.

तरी हे सगळं कटकटीच वाटत असेल तर सेकंड हँड मोबाईलचा व्याप टाळू शकता. पण हा धंदाही बराच चालतो हे खरे. मुख्य म्हणजे चांगला नफा कमावता येईल.
निदान जुने मॉनिटर्स वगैरेचा धंदा करण्यात काही धोका नाही.

कपिलमुनी's picture

15 Feb 2016 - 4:31 pm | कपिलमुनी

हा धंदा अजिबात करू नका .
लफड्यात सापडला तर पोलिस पिळतात , वर्षात कमावलेले एका दिवसाअत जाते.
या बाबतीत मपो महाचादरचोर आहेत

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 5:15 pm | मराठी कथालेखक

जुना मोबाईल वा इतर संवाद साधने (कम्युनिकेशन डिवाईस) यांचा व्यवसाय करण्यासाठी काही अधिकृत परवाना असतो का ते शोधून काढा. असला तर तसा परवाना काढा म्हणजे झालं.
तुम्हि जर काही चुकीचे /अनधिकृत काम करत नाही तर घाबरण्याचे कारण नाही, योग्य ती काळजी घेतली म्हणजे झालं

सुनिल साळी's picture

15 Feb 2016 - 4:23 pm | सुनिल साळी

खूपच चांगली माहिती मिळतेय जोड व्यवसायाबदद्ल.

व्यवसायाची जाहिरात कशी करावी याबद्दल च्या प्रतिसादांची वाट पाहतोय.

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 4:54 pm | मराठी कथालेखक

जस्ट डायल वर लिस्टिंग करा. गुगल मॅप्सवर पण लिस्टिंग हवं
बाकी प्रिंटींगचा व्यवसाय जास्तकरुन B2B असावा असे मला वाटते, तेव्हा वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटत रहा त्याची प्रिंटींगची काय निकड आहे हे समजून घेत चला. B2B मध्ये दर आणि उधारी हे मोठे निकष असतो. त्यामुळे बाजारातले दर , सूट यावर लक्ष द्या. तुमच्या क्षमतेत असेल इतकीच उधारी द्या. लग्नसराईच्या काळात पत्रिका छापण्याची कामे जोरात चालतील त्यावेळी तुम्ही आसपास हँडबिल्स वाटा. पत्रिकेचे भरपूर नमुने तुमच्याकडे तयार असतील याची काळजी घ्या.
जवळपासचे मंगलकार्यालय बघा, तिथल्या लोकांशी ओळख वाढवा. मंगलकार्यालयाचे ठरले की पुढचे काम पत्रिकेचे असते त्यामुळे तिथे तुमची जाहिरात होईल असे बघा. हिंजवडी , वाल्हेकरवाडी तुम्हाला जवळ आहे. तिथे मोठी कार्यालये आहेत , ती श्रीमंत लोकच बुक करत असतील तिथे हातपाय मारा. लग्नपत्रिकेच्या बाबत वेळेवर माल देणे आणि उत्तम प्रत हे महत्वाचे आहे, चांगला नफा मिळू शकतो.

कविता१९७८'s picture

15 Feb 2016 - 4:36 pm | कविता१९७८

व्यवसायासाठी लागणार्‍या भांडवलाबद्दल कुणी माहीती देउ शकतं का? कुठल्या बॅंकेतुन लोन घेणे फायदेशीर ठरु शकते. व्याज , परतावा याबद्दल माहीती हवी. महिलासाठी काही विशेष सवलती अशा काही योजनेअंतर्गत भांडवल उपलब्ध होउ शकतं का?

कलंत्री's picture

15 Feb 2016 - 5:03 pm | कलंत्री

दे आसरा नावाची संस्था, सेनापती बापट मार्गावर कार्यालय आहे. पर्सिस्टट चे प्रमुख या संस्थेचे कार्य बघतात ( सामाजिक उत्तरदायित्व).
ही संस्था प्रकल्प निर्मिती, बाजाराची माहिती, बीज भांडवल इत्यादी साठी मदत करते. शासकिय योजना, कर्ज उभारणी इत्यादी जरूर संपर्क करावा.

सुनिल साळी's picture

15 Feb 2016 - 5:16 pm | सुनिल साळी

+ १

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 5:22 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.
शक्य असल्यास दुकानाची लोकेशन (गुगल मॅप्सची लिंक देवून) शेअर करा.
भेट द्यायला आवडेल.

चांदणे संदीप's picture

15 Feb 2016 - 5:29 pm | चांदणे संदीप

मला वाटते की जागा/परिसराची गरज ओळखून व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावा/चालू ठेवावा.

यासाठी मला स्वत:ला, आयडियल म्हणून वाटणारे एक जम्बो झेरॉक्स या नावाने आकुर्डीत सुपरिचित असणारे दुकान लगेच आठवते. इतकी चांगली या दुकानाची भराभराटी या डोळ्यांनी पाहिली आहे की बस्स! व्यवसाय करावा तो असाच, असे मनात रुजून बसले आहे. म्हणजे, सुरुवातीला एक झेरॉक्स मशीन, नंतर दोन, नंतर एक ल्यामिनेशन मशीन, नंतर कॉम्प्यूटर टायपिंग, पुढे, अजून नवी मशिन्स आणी नव्या मोठ्या जागेत शिफ्टिंग, नंतर मोठ्या प्रिण्ट साठी प्लॉटर वगैरे आणि बरंच काही!

माझ्या मते तर हा सगळा जागेचा महिमा!

Sandy

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 5:51 pm | मराठी कथालेखक

साध्या (A4/A3) मध्ये स्पर्धा खूप त्यामुळे नफा कमी आहे. खूप रगडून काम केलं तरच चांगले पैसे मिळतात.
जम्बो, कलर मध्ये नफा जास्त आहे पण हे जास्त B2B म्हणजे व्यावसायिकांना (जम्बोसाठी आर्किटेक्ट वगैरे) पकडणे गरजेचे.
गुंतवणूकही जास्त.
मला वाटतय छोट्या धंद्यात B2B आणि B2C असं दोन्ही समप्रमाणात असेल तर नफा आणि रोख मिळकत (कॅश फ्लो) दोन्हीचा सुवर्णमध्य साधता येईल.

(नोकरी करुन धंद्याचे सल्ले देणारा उंटावरचा ) :)

आहो माणूस कोरलड्रॉ फोटोशॉप वाला आहे, १५ वर्शे क्म्प्युटरचा एक्स्पिरेन्स आहे. का असले लाख लाख घालून रुपया रुपया गोळा करायचे सल्ले देताय.
झेरॉक्स बिरॉक्स स्बसिडीरी म्हणून ओ. वाटल्यास डीसी घ्या. शॉर्ट रन प्रिंटर म्हणून वापरता येतय. जरा थांबा. मी आहेच सांगायला. :) वाटल्यास तवर एखादे ब्रोशर करुन घ्या तुमच्या ग्राफिक्स युनिटचे. ;)

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 6:09 pm | मराठी कथालेखक

मी जंबो/कलर झेरॉक्सचा सल्ल दिलेला नाहीये. साधी झेरॉक्स त्यांनी आधीच घेतलेली आहे.
बाकी मी सायबर कॅफे , मोबाईल ई बद्दल जास्त बोललो.
तसाही माझा सायबर कॅफेचा माझ्या जास्त जिव्हाळ्याचा विषय :)

https://www.google.com/maps/@18.5924772,73.8018888,20z/data=!3m1!1e3

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 6:25 pm | मराठी कथालेखक

दुकानाचे काय नाव आहे ?

सुनिल साळी's picture

15 Feb 2016 - 6:29 pm | सुनिल साळी

अनिरुद्ध सायबर कॅफे अँड झेरोक्स

_मनश्री_'s picture

15 Feb 2016 - 7:12 pm | _मनश्री_

नवीन व्यवसाया साठी खूप शुभेच्छा
ह्या व्यवसायात तुम्हाला भरपूर यश मिळाव हि सदिच्छा

बाबा योगिराज's picture

15 Feb 2016 - 7:29 pm | बाबा योगिराज

माझ्या दुकाना जवळ एक सायबर कॅफे आहे. त्या व्यक्तीने ऑनलाइन फॉर्म भरून देणे आणि प्रिंटिंग सुरु केलेले आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी एक मुलगा ठेवलाय. मुलाचा पगार 50₹ प्रत्येक फॉर्म साठी. आणि तो गिराईकास 100 - 150 ₹ च्या दरम्यान लावतो.
ऑनलाइन फॉर्म = बँक, स्पर्धा परीक्षा ई. ई.
अस काही तुमच्या दुकानात करता येईल का ते बघा.

तुम्ही फ्लेक्सच सुद्धा काम वाढवू शकता. गुंठा मंत्री शोधा. फक्त पैसे आधीच घ्यायला विसरू नका.

वरती एका प्रतिसादात दिल्या प्रमाणे सेल्फी स्टिक, मेमरी कार्ड, मोबाइल कव्हर ई. वस्तू एकदम जोरात विकल्या जातात. परंतु त्या साठी किंमत एकदम आकर्षक हवी. इंडिया मार्ट किंवा शॉप क्लूज सारखे संकेत स्थळावर ठोक विक्रेते भेटतील.

जाहिरात करण्या साठी, फ्लेक्स छापा.. २x3 फूट आकाराचे, दुकानाच्या 1ते 1.5 किलोमीटर परिघात लटकवून द्या. मस्त जाहिरात होते. आणि खूप काळासाठी जाहिरात होत राहते. मात्र या साठी मनपाची परवानगी आवश्यक आहे.

फ्लेक्स ऑटो रिक्षाच्या मागे सुद्धा चिटकवता येतात. औरंगाबाद मध्ये 100 ₹ एक रिक्षा एका महिन्या साठी असा दर आहे. आपल्या दुकानाच नाव भरपूर ठिकाणी होत. तुमच्या विभागातले दर बघा आणि जाहिरात करा.

सगळ्यात महत्वाचं :- उधार आणि मोलभाव अज्जिबात नको. माझा स्वतःचा अनुभव आहे. उधारी आणि मोलभाव करणारं गिऱ्हाईक वापस गेलं तरी आपलं काहीही नुकसान होत नाही.

बाकी नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा.

वा योगीबाबा, तुम्ही तर निम्मे काम हलके केले माझे. मस्त प्रतिसाद. सगळ्यात महत्वाचं मध्ये दिलेला सल्ला तर चेरी ऑन द टॉप. सध्या मी अनुभवतोय ते. नाही म्हणायला शिकायलाच पाहीजे.
बादवे सुरुवातीपासून. तुम्हाला कोरल आणी फोटोशॉप्चा एक्स्पिरेन्स आहे म्हणताय तर काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत.
आजकाल काय नेटवरुन इमेज घेऊन त्यावर टायपिंग बसवले की डिझाईनर झालो असे समजणारे बरेच असतात. त्यात घरोघरी पीसी असतोच. त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळे काय देता हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि ते स्क्रीन प्रमाणेच कागदावर प्रत्य्क्षात कसे दिसते हे अजून जास्त इम्पॉरटंट.
तुम्ही करु शकणारी कामे (एकट्याने पीसीवर)
व्हिकार्ड : डिझाईन करणे, पुण्यात बरेच प्रिंटींगचे युनिट्स आहेत. सोलापुरात ३ दिवसात मला कसल्याही कार्डची पुण्यातून डिलीव्हरी मिळते. पुण्यात २ दिवस. बटरफ्लाय (जुने न्यु पॉइन्ट) रोहन कार्ड्, प्रतिक हे विश्वासार्ह. त्यांची फ्रेन्चायसी घेतल्यास ऑनलाइन मनी ट्रान्स्फर करुन कार्डस पाठवू शकता. कुरीअर येते. जॉब ट्रॅकिंग फॅसिलीटी आहे. तुम्हाला मिळणार्‍या बेस रेटवर ३० % वाढवून डिझाइन्चे सेपरेट चार्ज घ्यायचे.
ब्रोशर : कलर ब्रोशर आणि इन्फरमेटिव्ह्स. बर्‍याच कंपन्यांना, सर्विसेस ना लागतात.
पॅम्प्लेट्सः सिंगल कलर आणि फोरकलर पॅप्म्पेट खूप मागतात लोक. न्युज पेपेर एजंट हाताशी धरुन इनसर्शन मध्ये पण परसेंटेज मिळते.
इन्विटेशन कार्डस : ऑफसेट, शोर्ट रन (डीसी प्रिंटरवर)
वेडिंग कार्डस : रेडिमेड पत्रिका आणि ऑफसेट पत्रिका. दोन्हीत मार्जिन भरपूर असते. चांगल्या कंपन्यांचे कॅटलॉग आणून ठेवणे. रिकाम्या वेळेत त्याचे ब्लॅन्क फोर्मॅट करुन ठेवणे फायदेशीर. (मराठी टायपिंग चा सराव मस्ट. गमभन किंवा युनिकोड तिथे चालणार नाही. श्रीलिपी ८ हजाराची विकत घ्यावी लागेल)
स्टीकर्स, पोस्टर्स : ऑफसेट पध्दतीने छापू शकता.
बॅनर्स, फ्लेक्स : डिझाईन करणे, एखादा भरोशाचा फ्लेक्स वाला पकडून टायप करुन कामे करुन घेणे.
कमर्शिअल फ्लेक्स : शॉप बोर्ड, इण्टेरिअर वॉल डिस्प्ले, डँगलर्स हे प्रकार पण क्रियेटिव्हली फ्लेक्स सारखे मशीन अस्ते इको सॉल्व्हंट म्हणून. त्यावर करु शकता.
छोटे इव्हेंटः डेकोरेटीव्ह पार्ट सगळा सांभाळू शकता. एखादा उत्साही इव्हेंट मेणेजरला बांधून ठेवणे.
कार्पोरेट स्टेशनरी: इ जमान्यात पण कंपन्यांना बरीच स्टेशनरी लागते. लेटरहेड, व्हावचर्स, इन्व्हाइसेस, मेमोस वगैरे डिझाईन करुन छापून घेऊ शकता.
फोटो प्रिंटस : करीझ्मा पेजेस डिझाईन करुन देऊ शकता. घरातील क्रियेटीव्ह फ्रेम्स पण.
रिअल इस्टेटः पुण्यात सध्या जास्त अ‍ॅडव्हर्टाईझिंग करतात बिल्डर लोक्स. त्यांना भेटून बरीच कामे मिळू शकतात. पण त्यांचा कामात सुपिरिअर वर्क अन क्रियेटीव्ह डिझाइनची गरज असते.
...............................................
सध्या फक्त पीसी अन डिझाईनिंग युनिट डेव्हलप करा. याला प्री प्रेस म्हणतात. पेपर साईझेसची माहीती घ्या, प्रिंट टेक्निकची माहीती घ्या. रेटस कोट करायला जमायला हवे.
प्रॉडक्शन युनिट ला ऑफसेट, फ्लेक्स किंवा स्क्रीन प्रिंट चे युनिट वाढवू शकता पण त्याला मॅन पॉवर खूप लागते. तो डीपेंडट बिझ्नेस आहे. तूर्तास नको.
ए ३ साईजचा डीसी प्रिंटर घेतला तरी त्यावर १२ बाय १८ इंचाच्या कलरप्रिंट कार्डवर येतात. कमी क्वांटीटीच्या पत्रिका आणि व्ही कार्ड् त्यावर छापून देऊ शकता. एकट्याने ऑपरेट करता येईल.
...............................................
विश्वासाची मॅन पॉवर तयार करा. गरजू मुलीला किंवा मुलाला डीटीपी शिकवून हाताशी घ्या. बुकवर्क ची कामे मिळू शकतात पुण्यात.
एखादा ऑफिस बॉय ठेवा. तुम्ही डिझायनिंग करीत असताना तो बाहेरची कामे आणणे नेणे करु शकेल.
बीकॉम आहात त्यामुळे हिशोब कसा ठेवावा हे तुम्हीच सांगताल थोड्या दिवसात. ;) पण रेग्युलरली ठेवा. बिझनेसमध्ये शक्यतो साईड मिळते पैशाला. मिळालेल्या अ‍ॅडव्हान्सचा विनियोग योग्य करा. हेवी कामाचे नियोजन आपोआप जमायला लागेल. त्याचा अभ्यास ठेवा. (किती वेळ लागतो, काय करावे लागते, त्याचा चार्ज कसा लावावा)
...............................................
सुरुवातीला पळायची तयारी ठेवा. गट्ठे उचलायला लाजायचे नाही. गिर्‍हायकाला डिझायनिंग मध्ये जास्त एंटरटेन करायचे नाही. तसे होत असल्यास त्याचे चार्ज पडतील हे सांगणे. कस्टमरला काय हो ते एकच त्यांचे लाडके काम असते. जितके डिझाइन दाखवाल तेवढे पाहतात. आपण पटकन आटपून दुसर्‍या कामाला लागणे श्रेयस्कर.
...........................................
ह्याला जोडून असणारे ऑफ्फ्सेट, पेपरवाले सिंगल कलर ओफसेट, बाईंडिंग करणारे, स्क्रीन, फ्लेक्स, ते बसवणारे, लाईटिंग करणारे ह्या फिल्डमध्ये फिरत जावा, ओळखी वाढवित जावा, माहीती करुन घेत चला. अगदी अडाणी दाखवायचे पण सगळे माहीत करुन घ्यायचे.
.............................................
एवढे विस्कळीत पणे लिहिले आहेच. संगतीने तुम्हास नेट कॅफे, झेरोक्स किंवा अजून काही करायचे असेल तर मॅनपॉवर पाहून करा.
बाकी काही अडचण आल्यास धाग्यावर विचारा. वाटल्यास हा धागा तुम्ही बुकमार्क करुन ठेवा ;)
शुभेच्छा अगदी मनापासून. धन्यवाद.

सुनिल साळी's picture

16 Feb 2016 - 10:20 am | सुनिल साळी

एकदम फुल्ल टु इन्फर्मेशन. नक्कीच अमलात आणेन.

धागा बुकमार्क करुन ठेवला आहे.

सुनिल साळी's picture

16 Feb 2016 - 10:14 am | सुनिल साळी

ऑनलाइन फॉर्म छान कल्पना. उधारी बद्दल शतशा: सहमत. धन्यवाद.

मास्टरमाईन्ड's picture

15 Feb 2016 - 11:58 pm | मास्टरमाईन्ड

डिझायनिंग प्रिंटिंगचा व्यवसाय उत्तमच आहे फक्त उधारीवाल्या क्लाएंटना जास्त वरचढ होऊ देऊ नका (जरा कसरतच असते.. पण जमणे आवश्यकच)

दुकान भाड्याचं आहे की स्वतःचं? सगळं भांडवल एकदम खर्च करू नका. आतापर्यंत नक्की काय काय equipments विकत घेतली आहेत? - थोडक्यात, व्यवसायाचा अंदाज यायला वर्षभर पण जाऊ शकतं, भांडवल शिल्लक ठेवा.

फुकट जाहिरात करण्यासाठी justdial, olx, quikr, Google local business, Facebook वापरा. व्यवसायाच्या नावाने Facebook page तयार करा. जमलं तर रोज नाहीतर किमान २-३ दिवसांमधून एकदा तरी facebook page वर post टाका.
How to market your business with facebook गूगलून बघा. अजून बरीच माहिती मिळेल.

सायबर कॅफे त्या ठिकाणी (तुम्ही लिंक दिलेल्या) किती चालेल काही अंदाज नाही कारण त्या भागात बहुतांश "Post Graduation students" किंवा "0 to 2 years experienced" आयटी पब्लिक राहतं, यांच्याकडे बहुधा तगडा नेटपॅक / डोंगल असतं.

त्या भागात सकाळी जवळपासचे लोक पोहे, उप्पीट, चहा इ. चे स्टॉल लावतात आणी premium rates लावून पैसे कमवतात. (मी स्वतः गेल्या वर्षी सप्टेंबरात सकाळी ८:३० - ९:०० वा. तिथे चहा, पोहे खाल्लेत) तुम्ही पण जोडधंदा म्हणून हे नक्की करू शकता.

महत्त्वाचं : तुमचं या भागातलं वास्तव्य किती? या भागात तुमचे मित्र / वेळप्रसंगी नक्की मदत करू शकतील असे कुणी आहेत का? कारण पिंपळे सौदागर, रहाटणी, बोपोडी वगैरे ठिकाणी खाद्यपदार्थ / सायबर कॅफे / उपाहारगृह इ. चालकांना लोकल गावगुंड बर्‍याच वेळेस त्रास देतात असं समजलंय / अनुभवलंय.