व्यवसाय - आपला बहुमोल सल्ला

सुनिल साळी's picture
सुनिल साळी in तंत्रजगत
15 Feb 2016 - 11:35 am

त्याच्या मारी. ठरवून टाकले. आता बस ! लई झाली नोकरी चाकरी ! आता जे काही करायचे ते फक्त आपल्यासाठीच. बरेच दिवस मनात विचार चालु होता एखादा व्यवसाय चालु करण्याचा. पण हिंमत होत नव्हती. व्यवसाय चालेल का?
नुकसान होईल का? पण अर्धंगिनीने पाठबळ दिले, हिंमत दिली. म्हणाली करून बघा तुमची इच्छा आहे तर !
योग्य मेहनत घेतल्यास यश नक्कीच येईल !

तीच्या ह्या प्रोत्साहानापूर्वक शब्दामुळे खूप हिंमत आली. आणी एक महिन्याच्या परिश्रामानंतर व्यवसायाचा प्रारंभ केला आहे.

व्यवसाय: सायबर कॅफे, झेरोक्स, डिझाईनिंग अँड प्रिंटिंग - विज़िटिंग कार्ड, लेटर हेड, बिल बुक, चलन बुक, ब्रोशर, लॅमीनेशन, फ्लेक्स ईत्यादी.

असे समजुनच व्यवसाय चालू केला की 2-3 महिने कमी रीस्पान्स मिळेल. व मग हळूहळू कस्टमर वाढायला लागतील. बघुया पुढे....

ही आहे माझ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी केलेल्या वाटचालीची पार्श्वभूमी...

आपल्या मिपाकरांकडे व्यवसाय वाढीचा अनुभव नक्कीच असेल म्हणून खालील बाबित आपला बहुमोल सल्ला द्यावा. ही विनंती.

1. व्यवसायाची जाहिरात कशी करावी.
2. ह्या व्यवसायाला जोडुन अजुन काय जोडधंदा करता येईल.

आपल्या उत्तरांच्या प्रतीक्षेत...

प्रतिक्रिया

सुनिल साळी's picture

16 Feb 2016 - 10:25 am | सुनिल साळी

फुकट जाहिरात करण्यात आलेली आहे.

तसेच पोहे, उप्पीट, चहा इ. चे स्टॉल आइडिया चांगली आहे.

या भागात मित्र / नातेवाईक वेळप्रसंगी नक्की मदत करू शकतील. आमदार साहेब तर आमच्याच भागातले

प्रसाद१९७१'s picture

16 Feb 2016 - 10:48 am | प्रसाद१९७१

सुनिल साहेब - तुम्हाला शुभेच्छा. काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणुन लिहीतो.

१. तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांमधली फक्त "डिझाईनिंग अँड प्रिंटिंग" हीच मुल्यवर्धन करणारी कल्पना आहे. फक्त झेरॉक्स काढुन, मेमरी स्टीक विकुन फारसे काही हाती लागणार नाही, कारण त्यात तुमचे स्वताचे असे मुल्यवर्धन ( व्हॅल्यु अ‍ॅडीशन ) काहीच नाही.
२ सायबर कॅफे हा मरणाला लागलेला धंदा आहे. इतके स्वस्त प्लॅन आता येत आहेत की हा धंदा फार दिवस चालणार नाही.
३. जो धंदा सोप्पा त्यात स्पर्धा खूप. सायबर कॅफे, झेरॉक्स असल्या गोष्टींची दुकाने एक आड एक इमारती मधे दिसत आहेत. तुम्ही जो रहाता तो भाग नविन असला तर आत्ता कमी पण नंतर खुप होतील. १-१ रुपयाच्या झेरॉक्स मधुन दिवसाला कीती जमणार आहेत?

महिना कमीत्कमी ५०००० उत्पन्न मिळवायचे असेल तर जागा भाडे, व्याज, वर्गण्या, खंडण्या वगैरे धरुन महिन्याला नेट कॅश इन एक लाख असायला पाहिजे. हे झेरॉक्स वगैरे नी कधीही मिळणार नाही.

तुम्ही मुल्य वाढवणारे एकच काम करत आहात ते म्हणजे "डिझाईनिंग अँड प्रिंटिंग", त्यावरच सर्व लक्ष केंद्रीत करा.. हे काम कदाव्हित घरुन पण करता येइल.

प्रसाद१९७१'s picture

16 Feb 2016 - 10:52 am | प्रसाद१९७१

मी रहातो त्या भागात अनेक झेरॉक्स आणि सायबर कॅफेची मराठी माणसांची दुकाने आहेत. गेल्या १० वर्षात त्यांच्या आर्थिक रहाणीमानात फार फरक पडलेला मी बघितला नाही. नशिबा नी त्यांच्या जागा स्वताच्या आहेत, नाहीतर दुकान बंद करावे लागले असते.

एका स्त्री ने काढलेले बायकांच्या ड्रेस चे दुकान खूप चालले म्हणुन त्याच्याच आजुबाजुला ४-५ तशीच दुकाने चालू झाली आणि १-२ वर्षात बंद झाली किंवा मालक बदलले. पहिल्या यशस्वी स्त्री ने जे मुल्यवर्धन ग्राहकांना दिले होदे, ते बाकीच्यांना दिसले नाही. वाटले हा सोप्पा धंदा आहे आणि मग फसले.

प्रसादजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

बरीच कामे ही घरून करता येतात. पण मला असे वाटते की व्यवसाय करण्यासाठी ऑफीस / शॉप असणे खूप गरजेचे आहे.

"डिझाईनिंग अँड प्रिंटिंग" हाच माझा मुख्य व्यवसाय असणार आहे. बाकी सायबर कॅफे, झेरॉक्स हे जोडधंदे.

तसेच मी लीव अँड लाइसेन्स ASP साठी प्रयत्‍न करीत आहे. बघुया.

नाखु's picture

16 Feb 2016 - 11:44 am | नाखु

आणी वरील अनुभवी बोलांची माहीती आणि महतीही लक्ष्यात ठेवा.

तुमच्या व्यवसायाच्या ५व्या-१० व्या आणि २५व्याही वाढदिवसाला मिपाकरांना बोलवायला विसरू नका !!!!!

सुनिल साळी's picture

16 Feb 2016 - 11:54 am | सुनिल साळी

नाद खुळा जी धन्यवाद.

मिपाकरांकडून खूपच मोलाची माहिती मिळाली आहे. व्यवसायाच्या वाढदिवशी सर्वाना नक्कीच आग्रहाचे निमंत्रण देईन.

ई-रिचार्ज व्हाऊचर्स पण ठेवू शकता, जरी प्रत्येकाला ऑनलाईन रिचार्ज करायचा पर्याय उपलब्ध असला तरी कधि त्याचीपण गरज पडू शकते.

सुनिल साळी's picture

16 Feb 2016 - 12:23 pm | सुनिल साळी

लई डेंजर पब्लिक असते. लई डोके खाते. सगळ्या स्कीम समजावुन सांगायला लागतात. ई. ई.

मराठी कथालेखक's picture

16 Feb 2016 - 5:28 pm | मराठी कथालेखक

सायबर कॅफे सोबत विडीओ गेम्स वगैरे पण ठेवू शकतात. यात काही खास उपकरणे असल्याने घरोघरी गेमिग कन्सोल घेत नाहीत. १० ते १५ वयोगटातील मुलांना याचा भारी नाद असतो. पण गुंतवणूक तसेच देखभाल खर्चाची कल्पना नाही.

सुनिल साळी's picture

16 Feb 2016 - 5:54 pm | सुनिल साळी

गेमिंग झोन चालू करणार आहे. जसे काउंटर स्टाईक जे LAN कनेक्टिविटी असल्यास खेळता येतात.

मुक्त विहारि's picture

16 Feb 2016 - 5:37 pm | मुक्त विहारि

नविन व्यवसायाला शुभेच्छा.

आमचा पिढीजात व्यवसाय नसल्याने आणि व्यवसायाचा अनुभव नसल्याने, आम्ही फक्त शुभेच्छाच देवू शकतो.

सुनिल साळी's picture

16 Feb 2016 - 5:55 pm | सुनिल साळी

शुभेच्छा बद्दल धन्यवाद.

गॅरी शोमन's picture

21 Mar 2016 - 5:03 pm | गॅरी शोमन

http://vakrangee.in/banking-services.php या साईतला भेट द्या. तुमच्याकडे स्वतः ची किंवा भाड्याची दिर्घ मुदतीच्या करारवर १०० स्के फुट जागा आणि किमान ५ लाख भांडवल असेल तर हा व्यवसाय चालतो. याचे रिटर्न्स भरपुर आहेत. हा सरकार मान्य उद्योग आहे. मी याचे मार्केटींग करत नाही त्यामुळे या साईटवर संपर्क करुन अधिक माहिती मिळवा. खातरजमा करुन ह्यात हवे तर उतरा.

इरसाल कार्टं's picture

12 Feb 2017 - 10:46 pm | इरसाल कार्टं

त्यांच्या मुंबै हापिसात गेल्तो, शुकशुकाट हाय सगळा.

लीना कनाटा's picture

12 Feb 2017 - 5:19 am | लीना कनाटा

सुनील भाऊ,

आता एक वर्षा नंतर काय परिस्थिती आहे? तुमचा व्यवसाय बऱ्यापैकी सुस्थितीत आला असेल.

तुमच्या अनुभवानं बद्दल वाचायला आवडेल.

इरसाल कार्टं's picture

12 Feb 2017 - 10:40 pm | इरसाल कार्टं

शुभेच्छा, सगळ्यात आधी एक Facebook पान सुरु करा.
त्यावर नविन सरकारी नोकर्यांची माहीती द्यायची.
तसाच एक व्हाट्अॅप ग्रुप सुरु करा.
फक्त नोकरी बद्दल माहीती देणारा.
मी तेच केलं, फुकट मार्केटींग आणि समाजसेवाही.
खासगी नोकर्यांचीही माहिती देत जा ग्रुप वर.
माझ्या व्यवसायात खुप फरक पडला याने.
संदरभासाठी वेबसाईट: majhinaukri.in.