भन्साळीचा बाजीराव मस्तानी

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
21 Dec 2015 - 10:24 pm

भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे 'पिंगा' हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित 'मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक' यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते.

ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल 'बाजीराव-मस्तानी' पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले? तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला.

पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा 'पुरोगामी' होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते.

कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात 'सिनेमॅटीक लिबर्टी'च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते.

बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती 'तवायफ' की पत्नी ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला 'गाणी बजावणी' करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते.

ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर 'तवायफ' ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे! ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो.

सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे.

भव्य-दिव्य न् महागडे सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे.

राहता राहिले 'पिंगा' आणि 'मल्हारी' ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची 'तडफदार आणि धडाकेबाज' भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे.

बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!

चित्रपटमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Dec 2015 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्स वल्लीसेठ. माहिती वाचायला आवडेल. शिवकाळात एक वर्ग पंडित कवी रामकृष्णाच्या कथा गात होते तर एक शाहिरांचा वर्ग शुर शिपायांच्या पराक्रमाचे व राजाच्या गुणगानाचे पोवाडे गात होते. याच शाहिरांचे आधीचे स्वरूप गोंधळयाचे होते. शिवकाळात अशा मंडळीनी शत्रुच्या मुल्खात जाऊन राजकीय हेतूने गोंधळ उडवून देण्याचे काम केले. डफ तुणतुण्याच्या तालावर अंबाबाईचा उदो उदो करत थकल्या भागल्या सैनिकाच्या मनाची करमणुकही करत होते. त्याच बरोबर वीररस पोषक पोवाडा म्हणून सैनिकांच्या पराक्रमाला तेजोमय करीत होते तर कधी परकीय सैन्याला गाफील ठेवण्याचा कुटील डावही ही मंडळी करत होती.

वल्ली, तमाशातलं सुरुवातीचं वाद्य तुणतुणे डफच होते. या गोंधळीचे तमाशाशी जवळचे नाते आहे. लावणी आणि पोवाडे हे पेशव्यानच्याच काळात भरभराटीला आले, पण त्याची पहाट शिवकाळातही असू शकते ! आपल्याकडील माहिती वाचण्यास उत्सुक आहे.

-दिलीप बिरुटे

शाहिरी परंपरा आधीपासून होतीच.शिवकाळातील अज्ञानादासाचा पोवाडा प्रसिद्धच आहे.
नागेश कवी हा १६ व्या शतकचे शेवटी होऊन गेला. त्याच्या काव्याचा एक मासला देतो.

रूळत चंचल अंचल भूवरी | उसळतो वलयध्वनि अंबरी||
मदभरे मग गौळणी चालती | थरथरां स्तनमंथर हालती ||

बाकी लावणी व पोवाडा पेशव्यांचे काळात भरभराटीला आले असे म्हणण्यापेक्षा शाहूमहारांजाचे काळात भरभराटीस आल्या असे म्हणणे संयुक्तिक ठरावे. ह्या कलांना राजाश्रय सातारा व कोल्हापूर संस्थानात मिळाला. पुण्यात जवळपास नाही. नानासाहेबाच्या काळात नाटकशाळांचे प्रस्थ वाढले होते.

मालोजीराव's picture

29 Dec 2015 - 11:55 am | मालोजीराव

अंदाजापेक्षा प्रत्यक्ष आधार पाहण्यास आवडेल, जेव्हा तमाशाला राजाश्रय होता तेव्हा तमाशा अगदी पाटील,इनामदार यांच्या वाड्यातील चौकात व्हायचा पण याचे उल्लेख नंतरनंतर चे आहेत. आमच्या घराण्याच्या कागदात तर अगदी अंगवस्त्र म्हणून विकत घेतलेल्या बटक्यांचे पण उल्लेख आहेत, पण शृंगारिक लावणी/तमाशाचे (शिवकालीन ते शाहूकालीन ) नाहीत.

नागेश कवी प्रमाणे कवनांची उदाहरणे अनेक आहेत, छत्रपति संभाजी राजांचे नायिकाभेद याहून शृंगारिक आहे -

रीती तजी विपरीत सजी I रसना वजी मंजूळ अंकके रासतें II
दो उर बीच उरोज दबे ' नृपशंभू ' I बचे है अनंगके सासतें II

खालील चित्रे मराठा कालीन आहेत, काही तंजावूर भागातील आहेत. त्यावरून तरी हे नृत्यसंगीत अध्यात्मिक कार्यक्रमास जोड म्हणून होते असे म्हणता येईल. तत्कालील शाहिरी/ पोवाडे हे अध्यात्मिक कलगीतुरे अथवा वीररस असलेले आहेत असे तुलसीदास,अज्ञानदास यांच्या पोवाड्यांवरून दिसते.

s

p

आधार अजूनतरी काहीच मिळालेला नाही. सारस्वतात डोकावण्यास वेळ झाला नाही. संध्याकाळी बघतो. नवनीतात काही मिळू शकेल पण ते मजकडे नाही.
बाकी तू दिलेली चित्रे लै भारी आहेत.

मालोजीराव's picture

29 Dec 2015 - 3:45 pm | मालोजीराव

बरीच आहेत पेंटींग्ज, सापडली कि टाकतो , हे एक आहे बघ सर्भोजीराजे भोसले यांच्या दरबारातले

t

प्रचेतस's picture

29 Dec 2015 - 4:32 pm | प्रचेतस

फ़्याण्टास्टिक.

तंजावूरी हेच ना प्रचेतसराव?

अभ्या..'s picture

29 Dec 2015 - 4:36 pm | अभ्या..

कपाळावरची भरुन इबित्ती (विभूती) हा विचार करण्याजोगा पार्ट है. सध्या फक्त वीरशैवात स्त्री व पुरुष दोघात ही प्रथा दिसते.

पैसा's picture

29 Dec 2015 - 4:38 pm | पैसा

तमिळनाडु मधे हिंदू स्त्री पुरुष सर्वांना कम्पलसरी आहे ते.

काय सुरेख पेंटींग्ज आहेत! वा!

शब्दबम्बाळ's picture

28 Dec 2015 - 4:24 pm | शब्दबम्बाळ

आले का शिवाजी महाराज, छान! :)
मला नीटसे आठवत नाहीये पण त्यात शिवाजी महाराज घोड्यावरून जाताना कोणते तरी गाणे आहे बहुधा... आज जर कोणी सिनेमा बनवला तर तर काय सांगावे तसेच एखादे जोशपूर्ण गाणे बनविले देखील जाइल... आणि आक्षेप घेणारे आक्षेप घेतीलच!

जुन्या ऐतिहासिक साहित्यात जणू काही उद्दात्तीकरण अथवा अतिशयोक्ती नसेलच असे मानून चालायचे असेल तर विषयच मिटला.

काही वर्षांपूर्वी सम्राट अशोक वरती सिनेमा आला होता त्यातही गाणी वगैरे होती, काही लोकांनी थोडाफार विरोधही केला होता त्याबद्दल आपले काय मत? कारण कोणता इतिहास "आपला" म्हणायचा याची काही मार्गदर्शक तत्त्वे असतील तर सांगा म्हणजे बरे पडेल!

उगीच कोणत्याही कलाकाराला त्याने व्यक्त कसे व्हायचे हे सांगणारा नवीन सेन्सोर बोर्ड हल्ली आजूबाजूला दिसतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Dec 2015 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>उगीच कोणत्याही कलाकाराला त्याने व्यक्त कसे व्हायचे हे सांगणारा नवीन सेन्सोर बोर्ड हल्ली आजूबाजूला दिसतो

१०० टक्के सहमत. या सेन्सार बोर्डाचे कुठेही चालले की आपापले चष्मे काढून यांचं सुरु होतं हे असं पाहिजे होतं अन हे तसं पाहिजे होतं. अरे, आवरा राव यांना.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

28 Dec 2015 - 8:08 pm | पैसा

शिवाजी महाराज घोड्यावरून जाताना पार्श्वभूमीला गाणे असणे वेगळे आणि शिवाजी महाराज स्वतः वाट लावली म्हणून नाचताना दाखवणे वेगळे. ते तुम्हाला चालले असते कदाचित. ज्याना विकृत इतिहास चालत नाही त्यांना नाही चालणार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अशोकाचे विकृतीकरण केलेले सिनेमेही आमच्यासारखे लोक बघत नाहीत. ऐतिहासिक व्यक्तीच काय रामायण महाभारताच्या सीरियलीही मी बघत नाही हे लिहिले आहे ते सोयिस्करपणे वाचले नाही वाटते तुम्ही. असो. पुन्हा तेच, झोपलेल्याला जागे करता येते. सोंग घेतले तर घ्या मनसोक्त. इतिहास हा आपला किंवा परक्यांचा असा वेगवेगळा नसतो. तो फक्त असतो. काही लोक तो आहे तसा स्वीकारतात. काही लोक आपल्याला पाहिजे तसा विकृत करतात. तुम्ही तुमच्या अजेंड्यावर चाला. आम्ही आमच्या रस्त्याने जाऊ.

आपले मत मांडण्याला सेन्सॉर म्हणायचे असेल तर म्हणा. मला काही प्रॉब्लेम नाही. सेन्सॉर करायचा असता तर मोर्चे काढून सिनेमे बंद पाडले असते. मला असल्या गाण्यांचा मूर्खपणा आवडत नाही, तो सिनेमा मी बघत नाही. माझ्यापुरता विषय संपला. ते लिहिले तर तुम्हाला त्याची एवढी भीती का हो वाटते?

सोत्रि's picture

28 Dec 2015 - 8:24 pm | सोत्रि

पैसातै,
इतिहास कोणता व कसा खरा मानायचा ह्यात जाम गोची आहे खरतरं. कारण ते सर्जन असते सृजन नसते.
म्हणजे इतिहास हा नेहमी रचित असतो. जेत्यांनी किंवा सत्ताधीशांनी लिहीलेला. आपण आपापल्या श्रद्धास्थानांच्या विश्वासानुसार घ्यायचा असतो तो. आपल्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचला की विकृतीकरणाची भावना प्रबळ होते. मनुष्यस्वभावच तो, त्याला औषध नाही :)

पण नाण्याच्या दोन बाजू ही जशी वस्तुस्थिती तशीच इतिहासाचीही दुसरी बाजू असतेच. आपल्यासाठी शिवाजी महाराज दैवत असले तरीही सुरतच्या व्यापाऱ्यांची भावना त्यावेळी 'सुरतेचा लुटारू' अशी झाली असून त्यांच्या पिढ्या दर पिढ्या तशीच छबी जर प्रवाहित होत राहिली असेल तर ते विकृतीकरण मानायचे का? आपल्या परसेप्शननुसार ते चुकीचेच असेल म्हणून सुरती व्यापाऱ्यांची बाजू व भावना कवडीमोल ठरतात का?

अस्मिता असाव्यातच, जगण्याचा आधार असतात त्या! पण त्यांची बांडगुळं न करण आपल्या हातात असतो!

असो, इत्यालम्!

- (जे पटेल त्याला इतिहास मानणारा) सोकाजी

पैसा's picture

28 Dec 2015 - 9:05 pm | पैसा

सोत्रि, भापो. तू म्हणतो आहेस तो "त्यांचा आणि आमचा इतिहास" याचं उदाहरण झालं. यातलं शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे ऐतिहासिक सत्य आहे. ते कोणीही कोणत्याही चष्म्याने बघू देत. मात्र "सुरतेची लूट करतानी शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्या, किंवा बायकांना त्रास दिला" असे जर कोणी काही वाईट हेतूने म्हटले तर ते इतिहासाचे विकृतीकरण आहे. आलं लक्षात?

शब्दबम्बाळ's picture

28 Dec 2015 - 9:46 pm | शब्दबम्बाळ

बराच झोंबला वाटत प्रतिसाद! :)
बाकी आपल्या प्रतिसादात "आमच्यासारखे लोक" आणि "आम्ही" आमच्या रस्त्याने जाऊ असे काही वाचून करमणूक झाली... संघटना वगैरे आधीच काढलेली दिसतीये. "आम्ही" म्हणजे शहाणे, सगळे काही समजणारे आणि बाकीचे बिचारे भरकटलेले...

स्पष्ट शब्दात सांगायचे तर, तुम्ही सिनेमा बघा अथवा बघू नका कोणालाही काडीचा फरक पडत नाही. सिनेमाला परवानगी देण्यासाठी सेन्सोर बोर्ड अस्तित्वात आहे.
आणि विरोध करायला मोर्चे वगैरे निघाले होते बर का, अगदी भन्सालीचा पुतळा पण जाळला होता. आता ते करणारे "तुमच्या सारखे" लोक होते का ते मात्र मी अज्ञानी सांगू शकत नाही.

आणि हो, मला हा सिनेमा बघण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता पण जेव्हा टिममेट्स सोबत बंगलोरला हा सिनेमा पहिला त्यावेळी एका गोष्टीचा आनंद झाला कि सिनेमागृहात उत्साही लोक "हर हर महादेव"च्या आरोळ्या देत होते. महाराष्ट्राबाहेर अशा आरोळ्या ऐकण्याची गम्मत काही वेगळीच आहे!

मला कसली भीती वाटतीये असे तुम्हाला वाटले काही कळाले नाही. कसय ना, मला माहितीये तोच आणि तसाच इतिहास पडद्यावर दिसला पाहिजे अशा मताचा मी नाहीये. त्याशिवाय, चित्रपट हे इतिहास संशोधनाचे साधन नाही हे हि मला माहित आहे त्यामुळे चिंता नसावी...

आणि या चित्रपटाच्या सुरुवातीला सुमारे ३-४ मिनिटे सूचना आहे कि हा फक्त कादंबरीवर आधारित चित्रपट आहे आणि त्यात काही कलात्मक बदल देखील केले गेले आहेत. हे ऐकून देखील कोणी जर हाच आणि असाच इतिहास आहे असा समाज करून घेणार असेल तर ती त्या व्यक्तीची चूक आहे.

पैसा's picture

28 Dec 2015 - 10:02 pm | पैसा

न लिहिलेले बरेच काही वाचता की हो तुम्ही! फक्त लिहिलेले तेवढेच नीट वाचत नाही! आम्ही म्हणजे हे असले मूर्ख प्रकार आवडत नाहीत म्हणणारे अनेक लोक जे मिपावर सुद्धा आहेत ते. कुठच्या संघटनेचे नाव मी घेतले नाही बरं का! तुमच्यासारख्या एकांनी दुसर्‍या एका संघटनेचा उल्लेख केला होता. तुमची संघटना कुठची ते पण सांगून टाका एकदाचे!

चित्रपट हे इतिहास संशोधनाचे साधन नाही हे मला पण कळते बरं का! फक्त कोणी इतिहासाताली पात्रे घेऊन काही कलाकृती तयार करणार असेल तर जे इतिहासात नाही ते त्याने दाखवू नये हे साधे लॉजिक आहे. त्यावर स्वामी, छावा, श्रीमान योगी यातली कोणतीच कलाकृती खरी उतरत नाही. काढा की सिनेमे. मग त्याला बाजीराव पेशवे कशाला म्हणायला हवे? बाजीराव सिंंघम म्हणा की! त्यातल्या त्यात भालजींनी असे यडचाप प्रकार न करता सिनेमे काढले एवढेच मी बोलले. तर सेन्सॉर काय आणि काय काय लिहित आहात. लिहा लिहा बिनधास्त.

मी सिनेमा बघितला नाही म्हणून भन्साळीचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असा माझा समज आहे असं तुम्हाला खरंच वाटतंय की काय? =))

प्रचेतस's picture

28 Dec 2015 - 10:04 pm | प्रचेतस

सहमत आहे.

सतिश गावडे's picture

29 Dec 2015 - 9:19 pm | सतिश गावडे

तुमचा हा सहमतीदर्शक प्रतिसाद म्हणजे "घेणं ना देणं आणि कंदील लावून येणं"असा प्रकार आहे. ;)

"फुक्कटचा" राहिले धनाजीराव

नाखु's picture

9 Jan 2016 - 3:58 pm | नाखु

सहमत

शब्दबम्बाळ's picture

29 Dec 2015 - 9:51 am | शब्दबम्बाळ

हाहा!
माझ्यासारखा एक म्हणजे कोण हो? ;)

कसय ना, तर चित्रपट बंद पाडला असता वगैरे तुम्ही बोललात. त्यावर मी लिहिले होते कि तसे प्रयत्न देखील करून झाले!
कोणाला कसा चित्रपट काढायचाय ते जो तो ठरवेल. त्याला मान्यता द्यायची कि नाही हे सेन्सोर ठरवेल.

आता तुम्ही टीका जरूर करू शकता पण ते करायला तुम्ही दुसर्या महापुरुषांचा आधार घेणार असाल तर तुमच्यात काही विशेष फरक म्हणता येणार नाही. शिवाजी महाराज नाचलेले पाहायचे होते का हे तुम्ही कोणत्या विचारांनी लिहिले हे तुम्हीच बघा. आपण टीका/स्तुती केल्याने "कोणत्याही" महापुरुषाचे इतिहासातील योगदान कमी/जास्त होत नाही आणि ते असलेले योगदान येणाऱ्या पुराव्यांनिशी बदलतदेखील राहते.

मलातर कधी कधी वाटते इंग्रजांनी सगळे दफ्तरखाने जाळून टाकायला हवे होते म्हणजे भूतकाळाचा इतिहाससोडून भविष्यकाळात इतिहास घडविण्यासाठी इथला समाज एक तरी झाला असता. पण आता तरी ते होणे शक्य दिसत नाही.

पैसा's picture

29 Dec 2015 - 11:59 am | पैसा

तुमचा आयडीच शब्दबंबाळ! तेव्हा कीस पाडायचं काम चालू ठेवा. मी कोणाबद्दल आणि काय लिहिले ते मलाही चांगले माहीत आहे आणि नीट वाचणार्‍यांनाही समजले आहे. तुम्हालाही समजले असेल बहुधा. पण ते कबूल कराच असा माझा आग्रह नाही. इतिहासाचे विकृतीकरण कोणाच्याही बाबत केले तर त्याला माझा आक्षेप आहे आणि राहील. मग ते शिवाजी महाराज असोत की बाजीराव पेशवे. शिवाजी महाराज आमचे आणि पेशवे तुमचे अशी कोणतीही वाटणी मी मानत नाही. तुमचे तुमच्या अजेंड्यावर आधारित वाचन आणि लिखाण चालू द्या. माझा त्याला काही आक्षेप नाही. _/\_

पिलीयन रायडर's picture

29 Dec 2015 - 12:32 pm | पिलीयन रायडर

पैतै चे सगळे मुद्दे पटले. पण ताई मुळात तुझा मुद्दा समजुन घेण्यासाठी वाचला तर त्याचा उपयोग. फक्त प्रतिवाद करायला वाचले जात असतील तर वादच होऊ शकतो, चर्चा नाही.

इतिहासाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन असु शकतो हे मान्य आहेच. पण त्यातही बेसिक मुद्दे असतात, जसे की पेहराव, बोलण्याची पद्धत इ. शिवरायांनी सुरत लुटली ते आपण पॉझिटिव्हली पाहु.. पण कुणी त्यांना लुटारु म्हणुन पाहिल. हे एकवेळ समजण्यासारखं आहे. पण म्हणुन शिवाजी महाराज वाट लावली म्हणुन नाचतील असं कुणीच म्हणणार नाही.

बाकी ह्या सिनेमामुळे बाजीरावांबद्दल अमराठी लोकांना कळाले वगैरे मुद्दे आहेत. पण आपल्या लोकांना तोच इतिहास वाटतो हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे.

सोत्रि's picture

29 Dec 2015 - 12:53 pm | सोत्रि

म्हणुन शिवाजी महाराज वाट लावली म्हणुन नाचतील असं कुणीच म्हणणार नाही

हीच ग्यानबाची मेख आहे.
असं कुणीच म्हणणार नाही हे आपले आपणच आपल्या मनात ठरवायचे आणि कुणी तसं खरच म्हटलं की, "अरेच्चा, मी मनात ठरवलं होत ना की म्हणायचे नाही? मग कसं काय बोलताय? ऑ??" असा त्रागा करण्यात काय हशील आहे? नाही का?

- ('संवाद' साधायला आवडणारा) सोकाजी

पिलीयन रायडर's picture

29 Dec 2015 - 1:05 pm | पिलीयन रायडर

सोत्रि..
काशीबाई किंवा बाजीराव नाचलेच नसतील असं मला म्हणायचं नाहीचे.. पण बा़जीराव "वाट लावली" म्हणुन नाचले असतील का? काशीबाई पोट दाखवत ठुमके देत असतील का? ह्यात मी माझ्या मनात काय ठरवलय ह्याचा काय संबंध येतो? त्या हिशोबाने कलाकाराची अभिव्यक्ती आणि सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे म्हणुन काशीबाई मस्तानी सारख्या पायघोळ कपड्यांमध्ये दाखवता येऊ शकतात का?

दुनियादारी मध्येसुद्धा ह्याच अभिव्यक्तीच्या नावाखाली मुळ कादंबरीचा गाभाच बदलला होता. पण तेव्हा त्याला इतका विरोध झाला नाही कारण मुळात ती एक कथा होती. बाजीराव ही काही कवी कल्पना नाहीत ना? त्यांच्याविषयी आज एतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. त्याकाळची बोली, रहाणी इ विषयी मत मांडता येईल इतपत पुरावे आहेत. ज्यावर पुढे राऊ सारख्या कादंबर्‍या तयार झाल्यात. ह्या कादंबर्‍यासुद्धा कलाकराची अभिव्यक्तीच होती की. पण त्यात तर्क सोडुन गोष्टी मांडलेल्या नव्हत्या. काय घडलं असेल ह्याचा शोध घेतला होता.. असा शोध घेणे वेगळे आणि कल्पनेचे वारु चौखुर उधळणे वेगळे. दोन्ही गोष्टी सरसकट "कलाकाराची अभिव्यक्ती" ह्या एकाच नावाखाली ठेवता येणार नाहीत.

शब्दबम्बाळ's picture

30 Dec 2015 - 9:55 pm | शब्दबम्बाळ

मिपावरच्या सिनियर आयडीला देखील एखाद्याच्या सदस्य नामावरून टिप्पणी करण्याचा मोह टाळता येऊ नये हे पाहून एक मिपाकर म्हणून जे काही वाटायचं ते वाटल!

मी लिहिलं कि शब्दांचा कीस काय?
हे म्हणजे "आमच ते चुलीत आणि तुमच ते ललित" असे काहीसे झाले!

आणि तुम्ही न्यायाधीश वगैरे होतात का हो? :P (का माजी संपादक असण्याचा प्रभाव म्हणायचा?)
कारण डायरेक्ट निकालच सुनावालेत तुम्ही तर!
१. मी कोणाबद्दल आणि काय लिहिले ते मलाही चांगले माहीत आहे आणि नीट वाचणार्‍यांनाही समजले आहे. (अहो ते वाचणारे ठरवतील कि! तुम्हीच कशाला ठरवताय?)
२. तुमचे तुमच्या अजेंड्यावर आधारित वाचन आणि लिखाण चालू द्या. (बर! कोणता अजेंडा बरे आमचा? आणि तो पण तुम्हीच ठरवलात का? चालायचे, अधिकारच शेवटी तुमचा तो!)

भारतामध्ये एका विशिष्ठ धर्मावर टिप्पणी केली कि तुम्ही जातीयवादी होता. पण मिपावर मात्र नुसते "काही आयडीच्या" विरुद्ध मत व्यक्त केले कि लगेच तुम्ही "त्यांच्या" आवडत्या संघटनेचे (ब्रिगेडच ना हो?) फुकटात सदस्य होता!
पण त्यांनी तसे म्हटले तरी ते आयडी समानतावादीच असतात...

मध्यंतरी बरेच आयडी गायब झाले मिपावरून, लवकरच माझ्यावर पण ती वेळ येईल असे दिसतेय! :)

प्रदीप साळुंखे's picture

29 Dec 2015 - 12:15 pm | प्रदीप साळुंखे

माझ्यासारखा एक म्हणजे कोण हो? ;)

तो मीच आहे बहुधा!!!

बाकि,संघटनेचे नाव घेतल्याने कोणी त्या संघटनेचा होतो का? हे त्यांनाच माहित.

आदूबाळ's picture

27 Dec 2015 - 2:12 pm | आदूबाळ

भिकार सिनेमा. यापेक्षा तेवढ्या वेळात पाच शिरीयली पाहून झाल्या असत्या.

यशोधरा's picture

27 Dec 2015 - 2:38 pm | यशोधरा

आज शेवटी काही जणांनी अगदी सिनेमा आधी पहा आणि मग बोल, असे च्यायलेंज (चहा पिताना दिलेले आवताण कम आव्हान) दिल्याने सिनेमा मोबाईलवर पाहिला. एकच शब्द, बेकार. प्रियांकाचा आचरटपणा आवडला नाही. पेशवा मधेच टपोरी वाटायला लागतो. दोघांच्या तुलनेने दिपिका बरीच बरी. आदित्य पांचोली, महेश मांजरेकर आणि मिसो उगाच तोंड दाखवायला होते. वैभव तत्ववादी ठीक. राजा छ्त्रसालाची भूमिका करणार्‍या नटाचे नाव आठवत नाहीये :(

अख्ख्या सिनेमात तन्वी आझमीचे काम सगळ्यात उत्तम वाटले. बाकी बात कुच जमी नय.

हाच धागा सापडल्याने इथेच लिहिले आहे.

छत्रसाल बेंजामिन गिलानी आहे.
भारत एक खोज फेम.

यशोधरा's picture

27 Dec 2015 - 2:43 pm | यशोधरा

येस्स! बेंजामिन गिलानी. धन्यवाद अभ्या. काही केल्या आठवत नव्हते नाव.

जिन्क्स's picture

28 Dec 2015 - 11:23 am | जिन्क्स

मोबाईलवर शिनुमा?

पद्माक्षी's picture

29 Dec 2015 - 7:05 pm | पद्माक्षी

गाणी भिकार होतीच, पण बाकी दिग्दर्शन पण फसलय
रणवीरचे उठणे बसणे. यात रणवीरची काही चूक नहि. भन्साळीने माती खाल्ली आहे.
प्रियांका तर सिनेमाच्या पुर्वार्धात वेडसर वाटते. दीपिका उत्तम.

फक्त सिनेमाचा सेट चांगला आहे.

कालच पाहिला.सहमत आहे.बसणं उटणं बोलणं सर्वच सदोष असणारा बाजीराव बघवत नाही.गाणी तर सोडून दिलेला विषय आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Dec 2015 - 2:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

पांचोली न काय काम केले आहे :O ?

अभ्या..'s picture

27 Dec 2015 - 2:53 pm | अभ्या..

मैय्या बहुतेक वाघवाल्या निजामाचा रोल केलेल्या रझा मुरादला पांचोली समजली.
.
रझा मुरादसारखा आवाज पांचोलीच्या दोन्ही सुर्यांना मिळून काढता येणार नै.

ए नाही काय! रझा मुराद वेगळा आणि पांचोली वेगळा :P पांचोलीने शाहू महाराजांच्या दरबारातील पेशव्यांविरोधातील मानकर्‍यांची भूमिका नेहमीप्रमाणेच ठोकळेबाजपणे केली आहे.

मालोजीराव's picture

27 Dec 2015 - 3:14 pm | मालोजीराव

पांचोली श्रीपतराव पंतप्रतिनिधी आहे

तिमा's picture

27 Dec 2015 - 2:59 pm | तिमा

वाईट तितुके इथे चांगले
भलेपणाचे भाग्य नासले
पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा (पिंगा?)
वेश्येला मणिहार
अजब तुझे सरकार

हेमंत लाटकर's picture

27 Dec 2015 - 4:28 pm | हेमंत लाटकर

बाजीराव मस्तानी चित्रपट पाहिला. बर्याच गोष्टी खटकल्या.
1. बाजीरावांचे बसणे, उठणे, नाचणे.
2. काशीबाईचे पोट दाखवत, कंबर लचकत नाचणे.
3. मस्तानीचे बाजीरावकडे दुत म्हणून येणे.
4. बाजीरावचे मस्तानीच्या प्रेमात इतके मशगुल असणे.
5. लढाई जिंकल्यावर पोवाडा दाखवला असता तर छान वाटले असते.
6. पिंगा डान्समध्ये नर्तकींना नाचवले असते तर ठीक दिसले असते.

मस्तानी प्रकरणावरून पुण्यातील बाह्मणांनी, राधाबाई, चिमाजीअप्पा व नानासाहेबांनी बाजीरावांना मनस्ताप दिला. त्याकाळात दोन चार बायका असणे गैर नव्हते. दुसर्या बाजीरावांना अकरा बायका होत्या.

प्रदीप साळुंखे's picture

28 Dec 2015 - 6:04 pm | प्रदीप साळुंखे

मस्तानी प्रकरणावरून पुण्यातील बाह्मणांनी, राधाबाई, चिमाजीअप्पा व नानासाहेबांनी बाजीरावांना मनस्ताप दिला.

आताही तेच होतयं

विवेकपटाईत's picture

27 Dec 2015 - 7:48 pm | विवेकपटाईत

आज सिनेमा पहिला. कार्यालयात हि काही सहकर्मिनी पेशवा बाबत विचारपूस केली. निश्चित मराठा इतिहासाबाबत उत्तर भारतीय लोकांचे ज्ञान वाढेल. बाकी सिनेमा सिनेमा सारखा पाहावा. काशीबाईचे चरित्र जास्त उठून दिसले आहे.

नगरीनिरंजन's picture

28 Dec 2015 - 7:12 am | नगरीनिरंजन

लेख आवडला.
सिनेमा सिनेमा म्हणून पाहावा आणि इतिहास सिनेमावरुन शिकू नये हे बर्‍याच लोकांना कळते. ज्यांना कळत नाही अशा निर्बुद्ध लोकांची पर्वा करायची गरज नाही.
पण एकूणच भन्साळीचे चित्रपट आवडत नसल्याने हा पाहिला/पाहणार नाही.

यशोधरा's picture

28 Dec 2015 - 8:25 pm | यशोधरा

सिनेमा पाहून लोक इतिहास शिकतात हे अनुमान का काढावेसे वाटले? लोकांना निर्बुद्ध ठरवणे किती सोपे झाले आहे! तसेही सिनेमावरुन इतिहास शिकण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो, पण एका ठराविक काळातील घटनांबाबत सिनेमा काढायचा असल्यास तेव्हा जे होते आणि जसे होते तसेच दाखवायला नको का? भन्साळीने जे सगळे आणि जसे दाखवलेय त्याला डोळे मिटून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणणे काही पटत नाही. असो.

प्रचेतस's picture

28 Dec 2015 - 8:29 pm | प्रचेतस

सहमत आहे.
विशेषत: इतिहासावर आधारित एखादी कलाकृती बनवताना ती मूळ इतिहासाशी प्रामाणिक व समांतर जाणारी हवी.

पद्माक्षी's picture

29 Dec 2015 - 6:56 pm | पद्माक्षी

एवढेच म्हणणे आहे आमचे. इतिहासावर सिनेमा काढायचा असेल तर इतिहासाशी प्रामाणिक राहून काढा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2015 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठीक आहे.

-दिलीप बिरुटे

जिन्क्स's picture

29 Dec 2015 - 3:50 pm | जिन्क्स

मी दुसर्‍या बाजीरावांवर चित्रपट कधी निघतोय याची वाट पहात आहे.

हेमंत लाटकर's picture

29 Dec 2015 - 7:30 pm | हेमंत लाटकर

शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना पिक्चर मध्ये डान्स करायला लावणे चालले असते का महाराष्ट्रीयानां.

मालोजीराव's picture

29 Dec 2015 - 10:02 pm | मालोजीराव

शिवराय नाही पण संभाजी महाराज असे नाचलेले नक्की चालले असते, चिकदेवराया वरील युद्धानंतर किंवा गोव्याच्या युद्धानंतर. थोरले बाजीराव आणि छत्रपती संभाजी राजांचा बाणा हा पराक्रमी सेनानीचा वाटतो, त्यामुळे असा नाच त्यांना शोभूनही दिसला असता. अनुपुराण वगैरे मध्ये तर त्यांची तुलना तांडव करणाऱ्या शिवा शी केली आहेच.

आणि हो वाट लावली वगैरे शब्दांना हि आक्षेप घेतला नसता हो, कारण संभाजी राजे त्यांच्या एका पत्रात एका गद्दाराला म्हणतात "ऐसी हरामखोरी पुन्हा कराल तर चौरंग करून नामजाद करू (म्हणजेच वाट लावू)"

अभ्या..'s picture

29 Dec 2015 - 10:18 pm | अभ्या..

हांगाश्शी राजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2015 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर आम्ही पाहिला असता.

-दिलीप बिरुटे

हेमंत लाटकर's picture

29 Dec 2015 - 7:30 pm | हेमंत लाटकर

शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना पिक्चर मध्ये डान्स करायला लावणे चालले असते का महाराष्ट्रीयानां.

याॅर्कर's picture

31 Dec 2015 - 8:36 pm | याॅर्कर

हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काही आयडींनी सांगितलय ना?नाचले तर चालेल म्हणून.
अशा प्रतिक्रिया देऊन काय मिळतं?
.
.
Global and liberal व्हायला शिका थोडं.

हेमंत लाटकर's picture

29 Dec 2015 - 10:53 pm | हेमंत लाटकर

आम्हाला चालले नसते. थोरले बाजीरावांनी सरदार व सैनिकांना बक्षीसी देऊन गौरविले असते तर शोभले असते.

अभ्या..'s picture

29 Dec 2015 - 11:33 pm | अभ्या..

इतका काळ लोटला पण मुन्सिपालीटी अन उंदीर मारायचे खाते काही विसरु म्हणता विसरु देत नाहीत लोक.

संदीप डांगे's picture

30 Dec 2015 - 11:14 am | संदीप डांगे

+१००००. बेचव गुळाचे गुर्हाळ... चालु द्या..

शब्दबम्बाळ's picture

30 Dec 2015 - 8:30 pm | शब्दबम्बाळ

ओप्टिमिस्ट: पेला अर्धा भरलेला आहे

पेसिमिस्ट : पेला अर्धा रिकामा आहे

विचारवंत टीकाकार : काचेच्या पेल्यावरची कलाकुसर अगदीच सामान्य आहे. नक्षीवर बहुधा सोन्याचा फक्त लेप दिलेला आहे. जुन्या काळात अशा पेल्यांवर माणिक देखील जडवले जात असत. तसेच हा पेला पेशव्यांच्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे परंतु त्यातल्या द्रव्याच्या रंगावरून ते सरबत नसून मदिरा असण्याची शक्यता जास्त वाटत आहे. यामुळे इतिहासाचे विकृतीकरण, निर्मात्याचे उदरभरण, सरबताचे मदिराकरण आणि वादासाठी सरपण होत आहे! :P

सिरुसेरि's picture

31 Dec 2015 - 6:20 pm | सिरुसेरि

बाजीराव पेशवे यांच्याशी संबधित काही म्हणी ,शब्दप्रचार आहेत. जसे की -
"खिशात नाही आणा,आणि मला बाजीराव म्हणा ". "फुकट्ची बाजीरावकी" . फक्त हे बाजीरव १ले की २रे हे इतिहासाला माहित नाही .

हेमंत लाटकर's picture

31 Dec 2015 - 8:51 pm | हेमंत लाटकर

ह्या म्हणी दुसर्या बाजीराववर आहेत.

हेमंत लाटकर's picture

31 Dec 2015 - 8:51 pm | हेमंत लाटकर

ह्या म्हणी दुसर्या बाजीराववर आहेत.

गुल्लू दादा's picture

2 Jan 2016 - 1:42 am | गुल्लू दादा

सिनेमा उत्कृष्ठच आहे. पण बाजीराव च्या आईला थोडा अजुन सकारात्मक रोल हवा होता असे वाटते. सिनेमा पाहिल्यानंतर त्या एकदम विलन च्या पंगतीत बसल्यागत भासतात. अजुन ५ वर्षानी जी पिढी सिनेमा बघणार ते त्यांना नक्कीच विलन समजणार.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Jan 2016 - 9:08 pm | निनाद मुक्काम प...

तन्वी मुळची महाराष्ट्रीयन हे ह्या निमित्ताने कळले,
सर्वोत्तम सपोर्टिंग एकट्रेस तिलाच मिळणार
तिची नुसतीच मुलाखत पाहिली, ह्या भूमिकेसाठी किती मेहेनेत घेतली ते दिसून येते
मेहेता बाईंच्या घराण्यातील तन्वी ची भूमिका कसदार आहे, तिचे डोळे बोलतात .
महेश वैभव , मराठे , यतीन सगळ्या मराठी कलाकारांनी उत्तम काम केले आहे.
गाणी नसती तरी चालले असते पण एक सिनेमा म्हणून त्याकडे पहिले तर थेटर मध्ये अमराठी प्रेक्षक सुद्धा बाजीरावच्या कर्तुत्व , शौर्य त्याचे जातीविरहित राजकारण त्यांचे विजन , हिंदू पातशाही दिल्लीच्या तख्तावर स्थापन करण्याचे शिवार्याचे स्वप्न साकारण्यासाठी झटणे सगळेच डोळ्यासमोर येते,
धर्मांध टिपू सेक्कुलर दाखवणे किंवा राजनैतिक विवाहास पुढे प्रेमकथा म्हणून प्रेक्षकाच्या माथी मारणे हे इतिहासाचे विकृतीकरण त्यामानाने सिनेमातील गाणी चुकीची आहेत पण विकृतीकरण नक्कीच नाही
बहुतांशी प्रेक्षकांनी काशीबाई ची व्यक्तिरेखा आवडली असल्याचे सांगणे हे सिनेमाचे यश आहे
मस्तानी व काशीबाई प्रसंगात बॉलीवूड च्या भाषेत सांगायचे तर प्रियांकाने अक्षरशः खाल्ले आहे.
रेवती ताई अमेरिकेत थेटरात नक्की जाऊन हा सिनेमा पहा
सिनेमाच्या शेवटी डोळ्यातील असावे पुसत प्रेक्षक टाळ्यांचा गडगडात करतात त्या प्रसंगाचा साक्षीदार होण्यास तरी नक्की जा, हे भाग्य जोधा व अकबर च्या नशिबी नव्हते
चुकी आशुतोष ची नाही आहे
सदर सिनेमातून हिंदवी स्वराज्यास मारून मुटकून सेक्युकर बनवू पाहणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक दिली आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Jan 2016 - 9:11 pm | निनाद मुक्काम प...

काल पाहिला बाजीराव मस्तानी...

चित्रपट " राऊ " कादंबरीवर आधारीत आहे. ही ऐतिहासिक कादंबरी आहे इतिहास नाही.
आणि चित्रपटात राऊ मधे नसलेले देखिल काही प्रसंग आहेत. एकूण "लिबर्टी" खूपच घेतली आहे.
पण चित्रपट म्हणजे इतिहास नाही... त्यामुळे अक्षेप नाहीच.
सर्व कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. आणि त्यांची वेशभूषा, वातावरण निर्मिती उत्तमच आहे.

ए, सारखी सारखी चर्चा करू नका रे! माझा निश्चय मोडून जावे की काय असे दीडवेळा मनात येऊन गेलेय. ;)

हेमंत लाटकर's picture

2 Jan 2016 - 6:57 am | हेमंत लाटकर

रेवतीजी, काही खटकणार्या गोष्टी सोडून पिक्चर बघा. चांगला आहे.